गुरुपौर्णिमा विशेष
अवघड ठिकाणी जायला शिक्षकांनी तयार व्हावं?
शिक्षक....... शिक्षकांचा पेशा हाडाचाच असतो. बिचारे शिकवीत असतांना ऊन, पाऊस, वारा, वादळ, हिंस्र श्वापदे या सर्वांची पर्वा करीत नाहीत व आपलं कार्य करीत असतात. एक शिक्षक असाच की जो शिक्षक शिकवायला जात असतांनाच आपला जीव धोक्यात घालून नदी पार करुन जाते. मग त्या नदीला पूर असो की नसो, त्या नदीत हिंस्र प्राणी असो की नसो, त्याला त्याची सवय झालीय. त्या शिक्षकांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तो शिक्षक शाळेत कधी गैरहजर राहिला नसेलच. तशीच एक शिक्षिका. दिव्यांग मुलांना शिकवते. ती शिक्षिका सांगत होती की सर, पाऊस असो की पूर असो, मला जावेच लागते. एकदा तर गाडीवर जात असतांना मला एका हिंस्र प्राण्याची त्वचा दिसली. त्या त्वचेवरुन वाटलं की तो वाघच असेल. मग वाटलं की आता आपण गेलो अर्थात मरण पावलो. परंतु थोडं जवळ जाताच समजलं की तो लांडगा आहे. त्यानंतर सुटकेचा श्वास सोडला.
लांडगा....... लांडग्यावरुन आठवतं की लांडगेही वाईटच. कारण एक प्रकारचा वाघ परवजला की तो एकटा असतो. वाटल्यास तो एकटा असल्यानं त्याचा प्रतिकार करु शकू. परंतु लांडगे हे सामूहिक हमले करतात. त्याचा प्रतिकार करणं अवघड असतं. तसंच शिकवायला जात असतांना शिक्षकांच्या वाहनांना आडवे येतात ते हिंस्र श्वापदच. जर त्यांच्या शिकवायचं गाव हे जंगलातच असेल तर.
शिक्षणाच्या क्षेत्रात काम करीत असतांना शिक्षकांना शिकवायला चाःगलं स्थळ मिळेलच याची शाश्वती नाही. कधी डोंगरदऱ्यातील शाळा मिळतात की ज्या ठिकाणी जायला पुरेसे रस्ते नसतातच. कसेतरी पायी कितीतरी मैलाचा परीसर पार करुन शिक्षकांना शिकवायला जावे लागते आणि शिकवायला गेल्यावर ज्था ठिकाणी ते शिकवायला जातात. त्या ठिकाणच्या लोकांची बोलीभाषाही समजत नाही. शिकवितांनाही जो भाग शिकवला. तोच भाग अर्ध्या तासानंतर विद्यार्थ्यांना विचारल्यावर तो भाग त्याला येत नाही. दहावेळेस त्याला तोच भाग शिकवावा लागतो. तरीही त्या विद्यार्थ्यांना तो भाग जेव्हा येत नाही. तेव्हा त्याला तो भाग येत नसल्यानं त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना शिकवणं सोडून द्यावं लागतं. एवढा राग येतो त्या विद्यार्थ्यांचा. परंतु अलिकडील काळात अशा विद्यार्थ्यांना रागवताही येत नाही. तसेच त्याचेवर प्रेमानं संस्कार फुलवायचे आहेत.
ते आदिवासी भाग. त्या भागात शिक्षक जेव्हा शिकवायला जातो. तेव्हा तो आपल्याला गलेलठ्ठ पैसे विद्यावेतन मिळतं म्हणून जात नाही. तर आपण काही समाजाचे देणे लागतो. आपली जबाबदारी आहे. असे समजून जातो. जो हाडाचा शिक्षक आहे, तो तो विद्यार्थी कसा शिकेल यासाठी त्याचेवर विविध प्रकारचे प्रयोग करतो. त्यासाठी आपल्याला प्रशासन सांगेल व मी शिकवील याचा विचार तो करीत नाही. त्याला काळजी असते. अशावेळेस जर प्रशासनानं त्याचेवर ताशेरे ओढल्यास त्याला फारच राग येत असतो. वाटतं की आपण आपलं कर्तव्यच करायला नको होतं. अशी वैषम्यता मनात येताच जो हाडाचा शिक्षक असतो. त्याच्याही मनात किंतू परंतु येत असतं. मग तोच शिक्षक काळानंतर कामचुकार बनतो.
विस्मरण....... विस्मरण ही प्रदत्त परमेश्वरानं माणसाला दिलेली देणगी आहे. ती देणगी आहे म्हणून माणसे दुःख विसरुन जगत असतात. नाहीतर जगणंच कठीण झालं असतं. एक मुलगी अशीच की तिला जीवन का जगावं? याचं विस्मरण झालं होतं व ती आत्महत्या करायला गेली. क्षणात तिला जगणं का जगावं हे आठवलं व तिनं आत्महत्येचा विचार बदलवला. हे वारंवार घडत गेलं तिच्या आयुष्यात. ज्याचा परिणाम आत्महत्येला जाणं व परत येणं, यात झाला. शिक्षकांचं जीवनही असंच आहे. काबाड संकचं शोषून तो जेव्हा शिकवायला जातो, तेव्हा विस्मरणानं त्याच्या विद्यार्थ्यात काहीच फलीत निघत नाही. तेव्हा त्याला शिकविणंच सोडून द्यावंसं लागतं. तेव्हा एक मुलगा वा मुलगी आपल्या जवळ येते. जिला शिकवितांना तिचं वारंवार विस्मरण होत असतं. ती म्हणते की सर, मी आपण शिकविलेला पाठ शिकण्याचा वारंवार प्रयत्न करते. परंतु णला विस्मरण होतं. ते का बरं होत असेल यावर उपाय सांगा. तेव्हा शिक्षकांची न शिकविण्याची भुमिका शिकविण्यात बदलते व तो शिकवायला लागतो.
शिक्षक शिकवतोच. जो हाडाचा शिक्षक असेल तर. परंतु त्याच्या वर्गातील सर्वच मुलं शिकत नाहीत. असं का होतं? त्याचं कारण आहे, विस्मरण. अशा विस्मरणातून त्याचं लक्ष वर्गात लागत नाही. परंतु हे विस्मरण अभ्यासाच्या बाबतीत होत असलं तरी इतर बाबीतून ते मुल आघाडीवर असतं. ज्याचा नवीन शैक्षणिक धोरणात समावेश झालेला आहे. अन् शिक्षकही आपली जबाबदारी ओळखून व कर्तव्यपरायणतेवर भर देवू लागला आहे. तो आटले कर्तव्य व्यवस्थित करीतच असतो. तरीही शासन त्यालाच धारेवर धरतं. त्यालाच त्रास देत असतो. त्याला देण्यात येणाऱ्या वेतनालाही लक्ष करीत असतो. खाजगी शाळेत तर त्याच्या वेतनावर संस्थाचालकांचा डोळाच असतो.
महत्वपुर्ण बाब ही की शिक्षक हा आपल्याला वेतन मिळतं यासाठी वर्गात शिकवीत नाही तर ते आपलं कर्तव्य आहे या उद्देशानं शिकवतो. परंतु त्यालाही पोट आहे म्हणून तो विद्यावेतन मागतो आणि ते मागणं काही गैरकृती नाही. परंतु शासन, प्रशासन व संस्थाचालक त्याला जे लक्ष करीत असतात. त्याच्या कामावर ताशेरे ओढत असतात.
विद्यार्थ्यात होत असलेल्या विस्मरणाला गृहित धरुन. ते पाहात नाहीत, त्या शिक्षकांचा विद्यार्थ्यांप्रती असलेला त्याग. ती समर्पण भावना. ते त्यांचं नदी पार करुन जीव धोक्यात घालून जाणं. थंडी, असो, ऊन असो, पाऊस असो, रस्त्यावर येणारी हिंस्र श्वापद असो, ज्यातून कधीकधी जीवही जात असतो. हे माहित असूनही शाळेला जाणं. खरंच शिक्षक जर स्वार्थी व कामसाधू असता तर तो अशा धोकादायक ठिकाणी राहात असलेल्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शिकवायला त्या शाळेत तरी गेला असता काय? खरंच कधीकधी कितीतरी मैलाचा पायी प्रवास करुन तो आपल्या विद्यार्थ्यांसाठी शिकवायला गेला असता काय? याचं उत्तर नाही असंच येईल. तो गेलाच नसता. आऔआ लोकं म्हणतील की त्याला पैसे मिळतात. परंतु पैसे तर त्याच्या अधिवासाच्या ठिकाणीही मिळतात. एक लहानशी चहाची टपरी जरी टाकली तरी त्याच्या पोट भरण्यालायक रक्कम त्याला मिळू शकते. जर नोकरीच्या तासाएवढं त्या टपरीला सांभाळलं तर...... अन् जर नशिबानं साथ दिली तर हीच चहाची टपरी त्याला महिन्याला जे वेतन मिळतं. त्याहीपेक्षा कितीतरी जास्त पैसा मिळवून देवू शकते. तसेच कामाचे तास जर धरले तर एक शिक्षक सकाळी आठला घरुन निघतो. त्याला घरी पोहोचायला रात्रीचे आठ वाजतात. म्हणजेच जवळपास त्याच्या नोकरीचा संपुर्ण काळ हा बारा तासाचा असतो. प्रवास व शिकविणं यांची एकंदरीत बेरीज केल्यास आपल्याला ती लेळ दिसून येईल.
महत्वाचं म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी राब राब रावतो. तो आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेम करीत असून सर्वच मुलं शिकायला हवीत असं त्याला वाटत असतं. परंतु विस्मरणानं एखादा विद्यार्थी शिकत नसेल तर त्यात त्याचा दोष नसतं. त्याचं शिकविणं पडताळून पाहण्यासाठी विस्मरणातून न शिकलेल्या मुलांचेच मुल्यमापन करण्याची गरज नाही. फर्वच मुलांचं मुल्यमापन गरजेचं असतं. ते जेव्हा होतं. तेव्हा खऱ्या अर्थानं शिक्षकांना न्याय मिळतो. शिवाय जी मुलं विस्मरणानं अभ्यासात मागं राहतात. ती कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात आघाडीवर गेलेली असतात. हेही तेवढंच खरं. त्यामुळं शासन काहीही म्हणो, आपण शिक्षक आहोत, राष्ट्र घडविणारे शिक्षक. तेव्हा आपण शिक्षक असल्यानं आपण अवघड ठिकाणीही जायलाच हवं. जेणेकरुन आपल्याला राष्ट्र घडवायचंय. त्यासाठी आधी विद्यार्थी घडवायचेय. जे आपल्याला आपल्या वेतनापेक्षाही मोठे असतात. यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०