Remedies on lying suicide in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | शेयी आत्महत्येवर उपाय

Featured Books
Categories
Share

शेयी आत्महत्येवर उपाय

शेती कॉन्ट्रॅक्ट ; शेतकरी आत्महत्येवर उपाय?

          शेती ही लाभाची की नुकसानाची? असा प्रश्न आज पडायला लागलेला आहे. कारण आजची परिस्थिती तेच दाखवत आहे. आजच्या परिस्थितीचा विचार केल्यास उन्हाळा केव्हा लागतो, पावसाळा केव्हा असतो व हिवाळा केव्हा येतो. हे कळतच नाही. सर्व दिवस सारखेच असल्यागत आजच्या काळातील दिवसाचे काटे दाखवतात. मात्र पुर्वी असं नव्हतं. 
         पुर्वी पाऊस हा सतत झडी लावून मुक्कामी असायचा, पावसाळ्याचे चार महिने. सतत येणारा पाऊस हा खुणावणारा असायचा सृष्टीला. सतत पूर असायचा नद्यांना व नद्याही दुथडी भरुन वाहात असायच्या पावसाळ्याचे चार महिने. तसं पाहिल्यास पुर्वीच्या काळात शेतकरी सतत पावसात भिजतच असायचा. ना आताच्या सारखं रेनकोट असायचं त्याच्या अंगावर, ना छत्र्या. त्यांच्या अंगावर असायचं ते गोणपाट. ज्या गोणपाटाची घोंगडी तयार करुन पाऊस लागू नये म्हणून संरक्षण करण्यासाठी पांघरली जायची. ती घोंगडीही पाऊस झेलायची नाही. ती संपुर्ण ओली व्हायची व त्याचबरोबर अंगही. तरीही त्याही अवस्थेत शेतकरी दादा शेतात काम करायचा. मात्र आपल्या शेतीचं वा शेतमालाचं नुकसान झालं अशी त्यांची ओरड नसायची. ना आत्महत्याही घडायच्या.
        हळूहळू काळ बदलला व बदलत्या काळानुसार शोध लागलेत. शेतीमध्येही क्रांती झाली. गोणपाटाची जागा रेनकोटनं घेतली. त्यानंतर ओले होण्याला संधी नव्हती. शेतकरी दिवसभर शेतात काम करु लागला. त्याचबरोबर दुसरीकडे फरक पडला. पुर्वी शेतकऱ्यांना भिजविणाऱ्या पावसाला तो भिजताना आनंद वाटत असे. ज्यामुळे तो संततधार कोसळत असे. आता मात्र त्यानं कोसळणं बंद केलं शेतकऱ्याने घातलेल्या रेनकोटला पाहून. मग काय, त्या पावसानंही विचार केला की शेतकरी जेव्हा बेसावध असेल, तेव्हा कोसळायचं. त्यामुळं आता पावसाळ्याच्या दिवसात आठ दिवसाच्या वा पंधरा दिवसाच्या झडी नाहीत. जो दोनचार दिवस पाऊस येतो, त्यालाही लोकं तंग येतात व पावसाला शिव्या हासडतात. जरी आपल्याकडे संशोधन झालं असलं व आपल्याला आधीच पाऊस येण्याचा संकेत मिळत असला तरी. आछचा पाऊस हा बेमोसमातच जास्त कोसळतो. 
         पुर्वी जो पाऊस यायचा. तेव्हाही शेतकऱ्यांच्या शेतात मोडीवर मोडी व्हायच्या. पीकं करपून जायची शेतात पाणी गोळा असण्यानं. याच पावसाच्या सततच्या पडण्यानं लोकांनी आपल्या शेतात धानाची शेती करणं सुरु केलं. कारण धानाला जास्त पाणी लागत होतं. शिवाय जास्त पाणी येण्यानं मोडही होत नव्हती. परंतु धानाचीही शेती करपायची, ती शेवटच्या पाण्यानं. शेवटच्या काळात पाऊस यायचाच नाही. 
          शेतकऱ्यांना पुर्वीही लाभ नव्हताच. सततच्या मोडी व सततचं नुकसान यामूळं त्रस्त असणारा शेतकरी. तो शेतकरी जमीनदारांकडून शेत गहाण ठेवून कर्ज घ्यायचा. जे कर्ज कधी फिटत नसे, एकदा घेतलं तर....... अशातच कित्येक शेतकरी वर्गाच्या जमीनी सावकार व जमीनदारांनी हडपल्या व वेठबिगारी निर्माण झाली. परंतु त्या जमीनी जात असल्या तरी लोकांनी त्या काळात शेतीच्या नुकसानाबाबत आत्महत्या केलेल्या नाहीत. ते जगले. जगत राहिले. कारण त्यांचा आत्मविश्वास. शेती गेली तर काय झालं. दोन हात सलामत आहेत ना. मग कमवून खाऊ. हाच त्यांचा आत्मविश्वास. 
          आज तेवढा पाऊस पडत नाही. पाऊस पडतोय, तोही सांगून. कमी दाबाचा, जास्त दाबाचा पट्टा तयार झालाय. पाऊस जास्त प्रमाणात येणार, कमी प्रमाणात येणार. हेच सांगत असतं हवामान खातं. मग नियोजन करायला सोपं जातं. आज कोणतं पीक शेतात घ्यायचं. कोणतं नाही हे नव्या संशोधनार्थी समजतं. तरीही शेतकरी ओरडतोय. आत्महत्या करतोय. ही चिंतेची बाब आहे. त्याला कारण काय असेल? त्याला कारण आहे आपला आत्मविश्वास. जो पुर्वीच्या शेतकऱ्यांसारखा आपल्या अंगात नाही. शेती सावकारानं हडपली तर काय झालं, दोन हात सलामत आहेत ना. मग कमावून खाऊ ही भावना. ही भावना व तसा आत्मविश्वास, आज शेतकरी बांधवात दिसत नाही. ज्यामुळं शेती ही लाभाची ठरत नाही. शिवाय आजच्या काळात थोडंसं जरी नुकसान झालं तरी आत्मविश्वास ढळतो. वाटतं की सारंच संपलं. त्यावर सरकारही काही दान पदरात टाकत नाही आणि ते तरी कुठून टाकणार. कारण त्यांनाच कमी आहे. त्यांचं वेतन जास्त असूनही व त्यांना मुबलक सोई सुविधा असूनही त्या सुविधा कमी पडत आहेत. असा देखावा ते दाखवतात. त्यांना शेतकरी उपाशी असलेला दिसत नाही व दिसणारही नाही. कारण जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. त्यामुळं कृषी मंत्री बनणारी मंडळी ही शेतात राबलीच असतील. याबाबत शंका आजही शेतकरी वर्गाच्या मनात आहे. महत्वाचं सांगायचं झाल्यास शेती ही कालही लाभाची नव्हती व आजही लाभाची नाहीच. कालही पाऊस, सावकार, जमीनदार शेतकऱ्यांचं नुकसान करीतच होते. आजही ते नुकसान करतात. फरक एवढाच पडला आहे की काल सावकार, जमीनदार शेतकऱ्यांना लुटत होते. आज त्याची जागा बदलली. आज सरकार त्यांना लुटत आहे, त्यांच्या मालाला भाव न देवून. पावसानंही आज आपली जागा बदलवली आहे. कालच्यासारखा पाऊस संततधार कोसळत नाही. मात्र बेमोसम पाऊस पडतो. पावसाला आज उन्हाळा, हिवाळा ओळखू येत नाही. त्याला पावसाळ्याचे ऋतूही समजत नाहीत. तो केव्हाही येतो व केव्हाही जातो. त्यामुळं काल शेतकरीवर्ग जे पिकांचं नियोजन करायचा. ज्यातून शेतीला लाभ करता येत होतं. ते आज घडत नाही. ज्यातून आजची शेती लाभाची की नुकसानीची ते ठरवता येत नाही. त्यामुळंच आज आत्महत्या घडतात. 
          शेती आजच्या काळातही लाभाची करता येवू शकते. जर सरकारनं सामूहिक शेतीची योजना आखली तर...... कॉन्टॅक्ट स्तरावर शेती सरकारनं घ्यावी. त्यात शेतकरी मजूर म्हणून राबेल. ज्यात शेतकरी वर्गाला सरकार वेतन देईल. समजा अवकाळी पावसानं एका ठिकाणची शेती बुडलीच वा नुकसान झालंच तरीही फारसा काही फरक पडणार नाही. कारण बाकी ठिकाणी पीक चांगलं आलेलं असणार. ज्यातून नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांनाही वेतन देता येईल. ही एक लाभाची योजना जर सरकारनं साकार केली तर कदाचीत त्यामुळंच देशातील प्रत्येक ठिकाणचा शेतकरी सुधरेल व त्याला कधीच आत्महत्या करावी लागणार नाही यात शंका नाही.

          अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०