Child abuse is life-threatening. in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | मुलांचा उपद्व्याप जीवघेणाच

Featured Books
  • Do you Love Me - 1

    Episode 1: The First QuestionThe college campus was full of...

  • Beyond His Memory

    Once upon a time, in a small village, lived a young woman na...

  • Parents

    The Two LampsIn a small village near an ancient temple, ther...

  • Lakshmi Amma - 2

    Sumit had gradually accepted the strange comfort of being ca...

  • Specialz - 3

    S- Such a b- big amount!W- Why would master g- give me?This...

Categories
Share

मुलांचा उपद्व्याप जीवघेणाच

मुलांचा उपद्व्याप जीवघेणाच?

          मूल...... मल जन्मास आल्यानंतर त्याला मोठे करीत असतांना फार मोठं आव्हान पालकांसमोर उभं असतं. ते मूल जर वात्रट वा मस्तीखोर असेल तर जास्त कटकटी निर्माण होत असतात. कारण आपलं मूल इतर मुलांसोबत जेव्हा कोणतेही खेळ खेळतं. त्यावेळेस ते मूल काहीतरी कारणावरुन घरी गाऱ्हाणी आणत असतं. ती गाऱ्हाणी सोडवता सोडवता पालकांच्या नाकीनव येत असतं. जसं एखाद्या मित्रासोबत भांडण होणं. असं भांडण झाल्यावर ज्यांच्यासोबत भांडण होतं. ते मूल व त्या मुलांचे मायबाप घरी येत असतात.
           कधीकधी घराकडे मूल आईवडिलांचं लक्ष नसतांना असे उपद्व्याप करतं की ज्यातून ते एखाद्या गुंडात फसतं. अशावेळेस संपुर्ण गुंडच कातरावं लागतं. त्याला पर्याय नसतो. याच गंमतीजमती शाळेतही घडत असतात. शाळेत मूल आलं की साधा सरळ बसत नाही. तिथंसी उपद्व्याप करीत असतं. कधी एखादी लहानशी लेखन नाकात टाकतं तर कधी तीच लेखन कानात. असे घडल्यानंतर त्याचे आईवडील शाळेत येतात. त्यातील काही पालक थोडेसे बिनडोकंच असतात की जे आपल्या मुलांचा गुन्हा मान्यच करीत नाहीत. तर ते शिक्षकांवरच ओरडत असतात. म्हणतात की सर, ज्यावेळेस माझ्या मुलानं कानात वा नाकात लेखन टाकली, तेव्हा तुम्ही काय करीत होते. आपल्याजवळ उत्तर नसतं. शेवटी त्याच्या कानात वा नाकात टाकलेली लेखन निघत नाही. मग आपल्यालाच स्वतःला त्याला रुग्णालयात न्यावे लागते व लेखन काढून घ्यावी लागते. कधीकधी हीच मुलं वात्रटपणाची हद्द करतात. शाळेत जर खेळायची साधनं असतील तर अशी मुलं त्या साधनांचा गैरवापर करतात व कुणाचे हातपायही सहज तोडून ठेवतात. कधी हीच मुलं आपल्या सहाध्यायींना पेनाचे टोक टोचून रक्त काढत असतात. ज्यात आपला गुन्हा नसतो. आपण तरी लक्ष कुठं कुठं देणार? परंतु ती चूक आपल्यालाच भोवते व आपणच त्या प्रकरणात गोवले जात असतो. असं होवू नये. यासाठीच नियोजनाची गरज पडते. 
          शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी व शिक्षक यांचा ऋणानुबंध असतो. तो ऋणानुबंध जेवढा निकटचा. तेवढं ते मूल चांगलं शिकत असतं. तसंच त्यांच्यात व आपल्यात प्रेम असायला हवं. ते निर्माण व्हायला हवं. तरच आपण त्यांना चांगल्याप्रकारे शिकवू शकू. शिवाय शिक्षक म्हणून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचीही जाणीव असायला हवी. त्यांच्या भावभावना या त्यांनी जोपासायला हव्यात. याचाच अर्थ असा की त्यांना शिकविणे म्हणजे केवळ अक्षरांची ओळख व त्या अक्षरांना आकार देणे नाही. त्यांना शिकवायचे झाल्यास मेंदूआधारीत शिक्षण देणं महत्वाचं ठरतं. 
           मेंदू....... अतिशय महत्त्वपुर्ण शरिराचा भाग. मेंदूच्या आधारेच सर्वप्रकारच्या क्रियापक्रिया चालत असतात. तोच सर्वांना कार्य करण्यासाठी आदेश देत असतो. आपण जरी झोपलो असेल तरी मेंदूचं कार्य सुरु असतं. ज्यावेळेस मेंदूचं कार्य बंद होतं. त्यावेळेस सगळं समाप्त होत असतं. अशावेळेस शिक्षक म्हणून शिक्षकाने आपल्या वर्गात कार्य करीत असतांना सर्वात प्रथम विद्यार्थ्यांच्या मेंदूंचा ताबा घ्यायलाच हवा. त्याशिवाय विद्यार्थी सकसपणे ज्ञान अर्जितच करु शकणार नाही.
          सध्याच्या परिस्थितीत मेंदू हा सरूव प्रकारचे कार्य करतो. तो मेंदू विद्यार्थ्यांना काय हवं, काय नाही, याचाही विचार करीत असतो. परंतु हे जरी खरं असलं तरी आज पालक बदलला आहे व त्याला वाटायला लागलं आहे की माझं मूल अशाच प्रकारचं व्हावं. त्याच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास जीवघेण्या स्पर्धा सुरु झालेल्या आहेत. ज्यात आपलं मूल बसलंच पाहिजे असं वाटतंय. अशा अवस्थेत बालकांचं बालपण नष्ट झालेलं आहे. त्यातच वयानुसार सक्ती केली जात आहे. हे चाकोरीबद्ध शिक्षण आहे. 
         मुलं ही उपद्व्यापीच असतात. ती लहान असतात, तेव्हा काही ना काही उपद्व्याप करीतच असतात. ज्यातून कधीकधी जीवघेणे प्रसंगही उद्भवत असतातच. एक गुडगावची घटना
          माही तिचं नाव. या घटनेत एका मुलीचा वाढदिवस साजरा केल्या गेला होता. ज्यात वाढदिवस साजरा झाल्यानंतर माही एका बोरवेलमध्ये पडली व मृत झाली. अशीच एक मुलगी. मुलगी साधारणतः तीन वर्षाची. तिनं एकदा एका सापाच्या पिल्लावरच पाय दिला. तिला तो साप आहे हे माहीत असूनही. बरं झालं की दुर्घटना टळली. 
         मुलं ही उपद्व्यापी असतात. आधी असा उपद्व्याप केल्यानं मुलांना रागावलं जात होतं. परंतु नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलांना रागवायचं नाही असं शिक्षण आलंय. तर त्यांना तोच उपद्व्यापीपणा वाढवायचा आहे व त्याच उपद्व्यापीपणातून त्यांच्यात असलेली शोधक वृत्ती वाढवायची आहे. त्यांना माहीतच आहे की थॉमस अल्वा एडीसन हे थोर शास्त्रज्ञ लहानपणी उपद्व्यापीच होते. ते उपद्व्यापी असल्यानं त्यांना शिक्षकांनी शिकविण्याचं नाकारलं. त्यांना शाळेतून बाहेर काढलं. त्यानंतरही त्यांचा उपद्व्यापीपणा कमी झाला नाही. त्यांनी तसा उपद्व्यापीपणा सुरुच ठेवला व वीज कशी निर्माण होते, याचा प्रयोग करीत असतांना त्यांनी आपल्या घरची धानाची गंजीच जाळून टाकली. ज्यात घरचं नुकसान झालं. हे घडल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला घराच्या बाहेर हाकलून दिलं. पुढं एडीसन पोट भरण्यासाठी रेल्वेत ब्रेड व बिस्किट विकू लागला व रेल्वेतच राहू लागला. परंतु त्यांनी आपला उपद्व्यापीपणा सोडला नाही. तो सतत सुरुच ठेवला. ज्यात रेल्वेतच प्रयोग करीत असतांना पिवळा फॉस्फरस सांडल्यानंतर रेल्वेत आग लागली. ज्यातून त्यांना रेल्वेतूनही हाकलून दिलं. परंतु थॉमस एडीसननं आपले प्रयोग करणे सोडले नाही व त्यांनी तद्नंतर वीजेचा शोध लावलाच. 
          मुलांचा उपद्व्यापीपणा असाच शोध लावण्याच्या व देशाच्या विकासाच्या कामात येतो. म्हणूनच ते मूल जर उपद्व्यापीपणा करीत असेल तर त्याला रागवायचं नाही. त्यातून कोणी थॉमस अल्वा एडीसन बनू शकतो. जो विजेचाच नाही तर इतर प्रकारचे शोध लावू शकतो. ज्यातून देशाचा विकास होवू शकतो. असं नवीन शैक्षणिक धोरण तयार करणाऱ्या तज्ञांचं मत. त्यामूळे त्यांनी प्रत्येक मुलांच्या उपद्व्यापीपणाकडे दुर्लक्ष केलं नाही. शिवाय या उपद्व्यापीपणा वाढायला हवं. म्हणून साचेबंदपणा ठेवला नाही. त्यांनाही माहीत आहे की विद्यार्थ्यांच्या उपद्व्यापीपणाला वर्गखोल्या बंधन टाकू शकतात. साचेबंदपणा येवू शकतो. म्हणूनच वर्गाबाहेरील शिक्षणाला त्यांनी पसंती दिली व मैदानी शिक्षण देण्यास प्राधान्य दिलं.
           पर्यावरण पुरक शिक्षणाचा पुरस्कार केला. प्रकल्प, कृतीसंशोधन व नवोपक्रम करण्यास भाग पाडलं. ज्यातून सरकारला वाटलं की यातील एखादा उपद्व्यापी व्यक्ती सचीन तेंदुलकर सारखा क्रिकेटर भनेल. कोणी थॉमस एडीसन बनून एखादा शोध लावेल तर कोणी आणखी काही. 
          महत्वपूर्ण बाब ही शिक्षक म्हणून केवळ शिक्षकांनी संशयास्पद भुमिका ठेवून विद्यार्थ्यांंना चाकोरीबद्ध शिक्षण देवू नये तर त्यानं चाकोरीबाहेरील शिक्षण द्यावं. त्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणात एक दिवस दप्तराविना शाळेचं प्रावधान आणलं. हसा, खेळा, आपल्यातील आपलीच संशोधन वृत्ती वाढवा, सुप्त गुण वाढवा, असा विद्यार्थ्यांना संदेश आहे. त्यातून त्यांचा विकास होवू शकेल व त्यांचा विकास म्हणजेच देशाचा विकास असेल. हे तेवढंच खरं. जेणेकरुन मुलांचा उपद्व्याप हा राष्ट्रासाठी उपद्व्यापी ठरणार नाही. तो राष्ट्राला मारक ठरणार नाही तर तारकच ठरेल यात शंका नाही.

           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०