Be kind at home too? in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | घरातही दयावान बना?

Featured Books
Categories
Share

घरातही दयावान बना?

जसे बाहेर दयावान दिसता, तसे घरातही व्हा?       


    काही लोकं असे असतात की ते दिखावा करीत असतात. कारण सध्या दिखाव्याचं जग आहे. या जगात काही लोकांना दिखावा केल्याशिवाय जमतच नाही.         महिला..... महिलांबाबत काही लोकं अशीच भुमिका ठेवणारे आहेत. ते बाहेरमध्ये महिलांच्या बाबतीत दया दाखवतात. त्यांना पाहून अससं वाटतं की त्यांच्याएवढं दयावान जगात कुणीच नाही. एवढा दयावानपणा ते दाखवीत असतात. तो दयावानपणा त्यांच्या कृतीतही असतोच. परंतु प्रत्यक्षात घरात त्यांचा दयावानपणा पाहायला दिसत नाही. घरात मात्र त्यांचा स्रीजातीवर अर्थात घरच्या पत्नीवर, मुलींवर, बहिणीवर वा त्याच्या स्वतःच्या आईवर अत्याचार सुरु असतो.        पत्नी, मुलगी, आई व बहिण. या चार घरातील महिला सदस्य. पुरुष नावाचा तो व्यक्ती. या चार महिलांचे घरात रक्तच पीत असतो. ज्य घरात या चार महिला असतील, त्या घरचा पुरुष व्यक्ती कधीच घरातील एखादी पडलेली काडीही उचलून ठेवत नाही. ती पडलेली पडलीच राहते. एखादाच अपवाद असतो. याबाबतीत एक उदाहरण देतो. एक व्यक्ती माझ्या ओळखीचा आहे. तो व्यक्ती घरात आपल्या पत्नीला मारझोड करीत असे. अन् बाहेर मात्र तो तसा नाही असा कांगावा करीत असे. एक दिवस मारता मारता त्याच्या पत्नीच्या डोळ्याला लागलं. त्यानंतर डोळ्यावर  सुज आली. पट्ट्ट्यानं तिला लागलीच डॉक्टरकडे नेलं. त्यानं तिला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरांनी लागलीच ओळखलं की ही कुठंही पडलेली नाही. तिला मारझोड झाली आहे घरात. ते तिला विचारु लागले. कसं लागलंय. त्यावर तिनंही खरं सांगीतलं नाही. कारण तिला संसार करायचा होता. ती मारहाणीची गोष्ट डॉक्टर तिला खोदे खोदू विचारत  होते. परंतु ती खोटीच बोलली शेवटपर्यंत. त्यानंतर तो सुधरला.         जगात असे डरेच महाभिग आहेत की जे घरी असेच आपल्या पत्नीला मारतात. परंतु त्यांच्या पत्नी आटला संसार टिकावा म्हणून कोणत्याच स्वरुपाची कुरकुर करीत नाही. तो अत्याचार असला तरी अगदी निमुटपणे तो अत्याचार सहन करतात. अन् हीच मंडळी बाहेर भाषणात सांगत फिरते की पत्नींना कोणीही मारु नये. तिच्यावर अत्याचार करु नये. त्यातच दयावानपणा दाखवतात.           मध्यंतरीच्या काळात एक लेख एका ग्रुपवर एका व्यक्तीनं पोष्ट केला. लेख आईसंदर्भात होता. त्यात आईचे गोडवे गायले होते. परंतु तो लेख पोष्ट करणे एका व्यक्तीला आवडला नाही. त्या व्यक्तीनं त्या लेखांवर प्रतिक्रिया दिली की असल्या प्रकारचा लेख ग्रुपवर पोष्ट करु नये.           तो लेख चांगला होता व तो लेख चांगला असल्यानं, तो लेख पोष्ट करु नये असं ग्रुपवर लिहून येताच लेखक महोदयांना थोडा राग आला व त्यांनी त्या प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीचा इतिहास जाणून घेतला. तेव्हा कळलं की ज्था व्यक्तीनं तशी उलटसुलट प्रतिक्रिया दिली होती. तो व्यक्ती, माहिती काढल्यावर एक मोठा अधिकारी असल्याचं कळलं. थसाच तो व्यक्ती आपल्या आईवडिलांची सेवा करीत नसून घरात फालतूची कटकट नको म्हणून त्यानं आपल्या आईवडीलांना वृद्धाश्रमात ठेवले असल्याचं कळलं. णात्र हे गुपीत होतं व तोच अधिकारी ज्यांना माहित नाही त्यांना आईवडीलांच्या सेवेचे किस्से सांगायचा.          लोकं असेच असतात. आपलं अंतर्मन झाकून पाहात नाहीत. दुसऱ्याचंच पाहतात. स्वतः शेंबडी असतात आणि दुसऱ्याच्या नाकातलं शेंबूड बघतात. अशी लोकं पाहिली की किळस येतो. परंतु किळस करुन उपयोग नसतो. कारण आजची संस्कृती त्यांचाच चांगलं म्हणते व जो आईवडीलांची सेवा करीत. असतो. त्यांना वाईट म्हणत असते.          लोकांच्या वाईट स्वभावावर काही औषध नाही. लोकं आजच्या काळात एवढे मतलबी झाले आहेत की ते अगदी सरड्यासारखे रंगही बदलत असतात. एका शाळेत एका मुख्याध्यापकाच्या कार्यकाळात एका संस्थाचालकाची नातेवाईक असलेली शिक्षिका अगदी विरोधात होती. ती त्या मुख्याध्यापकाला कोणत्याच बाबतीत सहकार्य करीत नव्हती. कारण होतं, तिला मुख्याध्यापक बनायचं होतं. वाटत होतं की आपण त्या मुख्याध्यापकाला कामात मदत केल्यास आपल्याला आपलाच नातेवाईक असलेला संस्थाचालक मुख्याध्यापक बनवणार नाही. त्यातच काळ बदलला व ती पर्यायानं नातेवाईक असल्यानं मुख्याध्यापिका बनली. त्यातच ती सरड्यासारखी बदलली व एक सभा घेवून म्हणाली, "झाले गेले विसरुन जा. आपल्याला शाळा चालवायचीय. आपल्याला शाळा चालविण्यासाठी मदत करावीच लागणार. पैसेही द्यावेच लागणार."         ती मुख्याध्यापिका व तिनं ऐनवेळेस बदलविलेला रंग. त्याचा गत मुख्याध्यापकाला विचार येत होता. तिच्या रंग बदलविण्यावर निर्णय कसा आणि कोणता घ्यावा याचा प्रश्न त्याला पडला होता.           हे झालं रंग बदलणं. लोकं आपली वेळ चांगली असते. तेव्हा असे अहंकारानं वागत असतात की ज्यांच्याबाबत सांगणं कठीण होवून जातं. अन् आपल्यावर वेळ आल्यास असे वागत असतात की जशी गलज त्यांनाच आहे व तेच जणू यातना भोगत असावेत वा त्यांनाच मदत करावी, इतरांना करु नये. शिवाय त्यांच्या चेहऱ्यावर असा भाव असतो की जणू त्यांचे चांगले दिवस असतांना त्यांनी इतरांना मदत केली.        आज अशा मदतीच्या गोष्टी अजिबात दिसत नाहीत. सेवेच्या बाबतीत सांगतो की आज घराघरातून घरपण निघून गेलेलं आहे. पुर्वी प्रत्येक घरात संस्कार होता. कारण संसार होता. आज घराघरातून संसारच हद्दपार झालेला आहे. पती पत्नींमध्ये सतत वाद होत आहेत. त्याचा परिणाम हा घटस्फोटात होत आहे. मग जिथं संसारच दिसत नाही. तिथं संस्कार तररी कुठून दिसणार! आज जागतिक विश्व व जगाचं रहनसहन बदललं आहे. पाश्चात्यीकरणाची लोकांना हवा लागलेली आहे. संसार टिकत नाही आणि एखाद्या घरी टिकलाच तर लोकांना हम दो, हमारे दो अशी स्थिती आवडते व मार्गदर्शन करणारे मायबाप सहजच नकळत वृद्धाश्रमात पडतात. कारण संस्कार नसतोच. आजच्या काळात जे स्वतःला मोमोठे साहेब समजतात. त्यांच्या घरचे हाल बघण्यासारखेच असतात. बऱ्याचशा लोकांकडे त्यांचे मायबाप राहात नसतात. ते मायबाप वृद्धाश्रमातच असतात आणि ते साहेब असतात. हेच साहेब आपल्या मायबापाला वृद्धाश्रमात ठेवून मोठमोठ्या व्याख्यानमालेत मातृपितृदिनावर भाषण ठोकत असतात. मुलांनी आपल्या मायबापासाठी अमूक करावं, तमूक करावं. अशी स्पष्टोक्ती झाडत असतात. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या व्याख्यानाच्या दिव्याखाली अंधारच असतो. हे काही खोटं नाही.           महत्वाचं सांगायचं झाल्यास परवा मातृदिन आहे. या मातृदिनावर भरपूर असे महाभाग व्याख्यान देतील. ज्यातील काही मंडळी अधिकारीही असतील. ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं भाषणं ठोकतील. परंतु प्रत्यक्ष स्थिती वेगळीच असेल. मात्र आपल्याला त्यांचं काहीच करायचं नाही. करायचं आहे, सेवेचं. ज्या मायबापांनी आपल्याला जन्म दिलाय. त्या मायबापाची सेवा आपल्यानं आजपर्यंत जरी झाली नसेल. तरी परवा मातृदिन असल्यानं त्यादिवशी तरी प्रतिज्ञा करावी व आपल्या मायबापांची सेवा करण्याचा मनात निर्धार करावा. सेवा करावी. अन् ज्यांच्यानं त्यांचे मायबाप जीवंत असतांना तशी सेवा झाली ऑसेल, त्यांनी वृद्धाश्रमातील दोन तरी म्हातारी माणसं दत्तक घ्यावीत. त्थांचीच सेवा करावी. म्हणजे मातृपितृ ऋण फेडल्याचा आनंद तुम्हाला होईल. जो तुम्हाला झालेला आनंद गगनात मावणारा नसेल यात शंका नाही. तशी शपथ मातृदिनानिमित्य घ्यायला काहीच हरकत नाही. विशेष ण्हणजे तुम्ही बाहेर जसा दयावानपणा दाखवता. तसाच दयावानपणा घरातही दाखवत जा. आपली पत्नी, मुलगी, बहिण वा आई यांच्याबाबतही दयावानपणा दाखवा. कारण हेच घटक तुमच्या जीवनातील खरे आधारस्तंभ आहेत हे तेवढंच खरं.      

    अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०