आम्ही दोघे ही आमच्या आयुष्यात खुश होतो. सम्राट जॉब ला जायचा, मी ही टीचर होती. मी पण एका शाळेत जात होती. आम्ही जॉब वरून दोघे ही घरी येत होतो नंतर फॅमिली सोबत थोडा वेळ घालवत होतो. वेळ घालवत होतो याचे मला दोन अर्थ वाटतात. पहिला तर आनंदाने एकमेकांसोबत गप्पा मारत घालवत होतो आणि दुसरा असा की दुसरा काहीच पर्याय नाही म्हणुन मी शांत बसून वेळ घालवत होती. लग्नाआधी मी खूप वेगळी होती स्वभाव माझा खूप वेगळा होता. आनंदाने जगत होती, मनभरून हसत होती, वाटेल ते आणि जिभेवर येईल ते मन खोलून मी बोलत होती. पण लग्न झालं आणि माझ्यावर एक जबाबदारीच आली. जबाबदारी अशी की मी जरी लग्न आई बाबांच्या मनानी केलं असलं तरीही चॉईस माझी होती. मी त्यामध्ये आज उद्या काहीही घडलं तरी मलाच सावरून घेणं गरजेचं होते. काही गोष्टी लग्नाआधी मला माहित होत्या, जसं की सासू म्हणुन सम्राट च्या आईचा स्वभाव कसा असेल आणि ते मला अड्जस्ट करावंच लागणार होतं.
मी म्हणजे लग्नानंतर फक्त सम्राट सोबत मन खोलून बोलायची, त्याच्या आईनी खूप त्रास दिला मला. त्यांच्या स्वभावाने खरं तर खूपच. त्यांचा स्वभाव असा होता की त्यांना सर्व परफेक्ट हवं असायचं आणि पटकन काहीतरी बोलायचं. मी कधीच त्यांना उत्तर दिलं नाही पण मात्र सम्राट समोर रोज रडायची. असं वाटायचं काय करू मी स्वतःहून केलं आहे लग्न घरी आई बाबांना काहीच नाही सांगू शकत. या पासून माझी सुरुवातच झाली मनात सर्व ठेवायची कोणासोबतच काही शेअर करायचं नाही. एक एक शब्द ऐकायची आणि मनात ठेवून गप्प बसायची.
लग्नाला सात आठ महिने झाले होते, पण माहित आहे ना आपल्याला, एका स्त्रीला दुसऱ्या एका स्त्री च्या आयुष्यात खूप जास्त इंटरेस्ट असतो. तसेच माझ्या आयुष्यात ही होत होतं. प्रत्येक ठिकाणी गेली की कोणी तरी विचारणारचं. मग बाळाचा विचार कधी करणार? तेव्हा मी हसून उत्तर द्यायची 2,3 वर्ष तरी आम्हाला बाळ नको. तेव्हा सात आठ महिने झाले होते म्हणुन मी उत्तर असं दिल्यानंतर समोरची बाई गप्प बसत होती. त्याच दरम्यान माझी बहीण प्रेग्नेंट राहिली आणि आता सर्वाना माहित ही पडलं की अनन्या ची बहीण प्रेग्नेंट आहे आणि तिसरा की चौथा महिना सुरु आहे. आणि खरं सांगू मला तेव्हा माहीत नाही वाईट वाटलं तिच्यासाठी नाही हा माझ्यासाठी की मी असं का करून ठेवलं आहे अवघड सर्व. पण तरीही ते इग्नोर करून मी प्रिशासाठी खुश होती.
एक दिवस विचार आला आई बाबांकडे जाऊयात प्रिशाला ही भेटून येऊ. ती आईकडे गेली होती ना म्हणून मी ही निघाली आईकडे जायला जातावेळी ट्रेनमध्ये एक लेडीज मिळाली आमच्या गावातलीच होती.
ये.. अनन्या इकडे ये, माझ्या बाजूला जागा आहे, असं म्हणत तिनी मला बसण्यासाठी ट्रेनमध्ये तिच्या शेजारी जागा दिली. मग बसले तिच्याशेजारी..
अगं, प्रिशा प्रेग्नेंट आहे ना..??
हो, काकू.. चौथा महिना आहे आता.
समजलं अगं, तुझ्या आईकडून आम्हाला..
हो का..(मनात विचार सुरूच होता, ही लेडीज मुद्दाम मला प्रिशाबद्दल बोलते का?) तेवढ्यातच.. मग तु कधी देते गुड न्यूज, आम्हाला तर वाटलं तुझं लव्ह मॅरिज आहे, मग तर तूच आधी बातमी देशील म्हणत (तिनी मला टोमणा दिलाच.. ) स्वतःला कंट्रोल करत मी हसत म्हणाली नाही, अजून काही.. वरून वरून हसली. आता यावर मी काय बोलणं ह्यांना अपेक्षित होतं, काय माहित.. कदाचित त्यांना वाटतं असेल मी पण काहीतरी लपवते असचं मी स्वतःला समजावलं.. आणि शांत बसले. कानाला कॉड लावून गाणी ऐकत बसले..