कधी कधी असं वाटतं, आयुष्यात अचानक असं काहीतरी घडतं की आपल्याला वारंवार मनातून आवाज येतो की हे तुझंच कर्म आहे. तुझ्या हातातून घडलेल्याच गोष्टींची फळं आहेत ही. शांत बसा आणी स्वीकारा आता.. त्याशिवाय तुमच्या हातात आता काहीही नाही..
माझे आणी सम्राट चे लव्ह मॅरीज झाले खरंतर झाले नाही आम्ही दोघांच्या परिवाराच्या संमतीने लव्ह प्लस अरेंज करून दाखवले. लग्न झाले, दिवस आनंदात एका मागोमाग एक जात होते. आमचं लग्न झाले तेव्हा आमचे वय दोघांचे पण चोवीस च होते. सांगायचं झालं तर सर्व नातेवाईकांच्या आणि सम्राट च्या घरच्यांच्या मते त्यांच्या मुलाचे लग्न कमी वयात झाले आणी मुलावर लवकर जबाबदारी पडली. तरीही या वयात सम्राट ला आमच्या लग्नाच्या वेळी अठरा हजार रुपये महिन्याला पगार होते. फक्त महिन्याला आणी माझ्या घरच्यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता माझ्या आनंदासाठी माझ्या हैप्पी लाईफ साठीच सम्राट सोबत माझं लग्न लावायला तयार झाले आणी लग्न करून ही दिलं.
बोलतात ना.. स्वतःच्या आयुष्यातले निर्णय स्वतः घ्यायला शिका भले ही ते कधीतरी चुकले आणी पुढे त्याचा तुम्हाला त्रास ही झाला तशी वेळ ही आली तर दोष मात्र तुम्ही स्वतःलाच देणार. पण जे निर्णय आपल्या आयुष्यात आपण घेणं महत्वाचं असतं आणी ते कोणी दुसरं घेतं तेव्हा त्यातून काही चुकीचं घडलं तरी दोष मात्र समोरच्या व्यक्तीला दिला जातो. कारण आपल्या आयुष्याचा निर्णय त्या व्यक्तीने घेतला म्हणुन आपण आज या जागेवर आहोत असं नेहमी मनातून आपल्याला वाटतं असतं.. असंच काहीस आमच्या दोघांसोबत घडले. लग्न फक्त आमच्या मनाने झाले पण काही महत्वाचे निर्णय घेणारे मात्र काही शहाणी माणसं आमच्या आयुष्यात आले.
लग्न फक्त चोवीसव्या वर्षी झालं आहे, सम्राट अजून तु सेटल ही झाला नाहीस. जो पर्यंत तु सेटल होत नाही तो पर्यंत किंवा दोन तीन वर्ष तरी तुम्ही काही बाळाचा विचार करू नका. असे सांगणारे सम्राटचे काही घरचे थोर मोठ्या बहिणी आणी त्यांचे नवरे त्यावेळी आमच्या आयुष्यात आले. सम्राट ने ही मोठ्या मनाने ते ऐकले ही आणि मनावर ही घेतले. माझं म्हणजे त्यावेळी असं झालं की चला नसेल सम्राटला जमणार तर नको. खरंतर पण असं बाळाचाविचार आणि प्लांनिंग आधीच करणं मुळात मला पटत नव्हतं पण मी ही काही बोलली नाही. स्विकारल्या काही गोष्टी खरतर मला तेव्हा त्यावेळी आपलं काय चुकतंय हे समजण आणि आपण नक्की काय करायला हवं हे समजणं खूप महत्वाचं होतं.
प्लांनिंग म्हणजे आम्ही ते ठरवलंच ना की बाबा आपल्याला ही गोष्ट आता नको, मग जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट नको असते आपण तेव्हा त्या पासून लांब राहायला बघतो इग्नोर करतो आणि खरं सांगायचं झालं तर त्याशिवाय ही आपण खूप खुश असतो. आम्ही ही खूप खुश होतो. आता बाळ नको म्हटल्या नंतर त्यासाठी प्लॅनिंग करावीच लागली ना, मुळात खरं सांगू माझं सम्राटला आपण 2,3 वर्षांनी बाळाचा विचार करू यासाठी कधीच होकार नव्हताच आणि माझा नकार ही नव्हता. मी कोड्यात अडकली होती पण मनातलं बोलली नाही.
खरंतर लग्न झाल्यानंतर लगेच एक दोन महिन्यात मी कसं काय हा निर्णय घेणार होती. गडबडलेली मी, इतकं काही समजतं नव्हतं मला.. मुळात हा विचार च माझ्या कल्पनेच्या बाहेरचा होता. पण सम्राटकडे बघून मी गप्प होती.. मनात सर्व ठेवून होती. लग्नानंतर जे क्षण आपोआप नकळत नवरा बायको जगतात ते क्षण आम्ही विचार करून जगत होतो. जिथे नवरा बायको कडून नकळत रोमान्स होतो किंवा नवरा बायको जवळ येतात ते आम्ही स्वतःहून ठरवून नाकारत होतो, म्हणजे आम्ही लग्न किंवा ते क्षण मनापासून जगत नव्हतोच तर ते जाणूनबाजून घडवत होतो..