घरी गेल्यानंतर प्रिशा घरी होतीच. तिला बघून आनंद झालाच पण मला वेगळंच फील होतं होतं कोणासोबत बोलण्याची इच्छा होतं नव्हती, असं का होत होतं माहीत नाही, पण मला आता असं वाटतंय की तेव्हा कदाचित मला वाईट वाटतं असेल स्वतःबद्दलच.. सर्व तिची काळजी घेतं होते, शंभर टक्के अटेंशन तिला मिळत होतं म्हणुन ही.. असेल. ते दोन तीन दिवस मी शांत राहूनच काढले घरी. तसं माझ्या घरी कधी कोणी मला असं कधी विचारलं ही नाही प्रेग्सन्सी बद्दल वैगेरे तेवढे एक दोन वर्ष तरी...
सम्राट आणि माझं आयुष्य व्यवस्थित सुरु होतं, नात्यात एकमेकांसाठी ओढ, प्रेम होतेच. पण एकमेकांशिवाय करमत ही नसायचं. तसं सर्वच गोष्टी आम्ही एकमेकांसोबत शेअर ही करत च होतो. माझी बहीण जेव्हा प्रेगंट राहिली तेव्हाच योगायोग असा की माझी नणंद सुवर्णा ही प्रेगंट राहिली, फरक एक दोन महिन्याचा असेल ही. मग तिचा भाऊ वाहिनी म्हणुन आम्ही तिच्याकडे ही जातच होतो. पण तिच्या लग्नाला ला ही चार ते पाच वर्ष झाले होते म्हणुन आम्हाला तिथे कोणी बेबी बद्दल असं कही बोलतंच नव्हत. काही दिवसांनी सातव्या महिन्यात ताईचे म्हणजे सुवर्णा चे ओटी भरण्याचे कार्यक्रम होते. मग होणाऱ्या बाळाचे मामा मामी आणि होणाऱ्या आई चे भाऊ वाहिनी म्हणून बऱ्यापैकी जबाबदारी तशी आमच्यावरही होती.
सर्व तयारी करून आम्ही दोघे आणि घरातले सर्व ओटी भरण्यासाठी च्या कार्यक्रमाला गेलो. मला असं जास्त मेकअप करायला किंवा झगामगा साड्या नेसायला काही आवडत नाही. म्हणुन मी साधीच कॉटन ची साडी नेसून गेलेली. पण ती नवीन होती आणि पंधराशे रुपयांची होती आणि माझ्यासाठी तरी ती किंमत जास्तच होती. पण बोलतात ना बोलणाऱ्या च्या तोंडावर हात ठेवता येत नाही. त्या कार्यक्रमात ही नेहमी सारखं झालंच, काही नेहमीच बोलणाऱ्या लेडीज नी पुन्हा माझ्यामध्ये कमी शोधून काढली आणि सर्वांनसमोर मला दाखवून दिलं की तु किती साधी तयार होऊन आली आहेस आणि आमच्यामध्ये अजिबात तु सूट होतं नाहीस.
"अनन्या", तु का इतकी साधी साडी नेसून आली आहेस?? खूपच साधी वाटते गं..
ऐकून मी हसली पण मला वाईट वाटलेलं ते चेहऱ्यावर न दाखवता मी बोलली, मला साध्याच साड्या नेसायला आवडतात. मी टीचर आहे ना म्हणुन मला अश्याच आवडतात.
पण समोरच्यांनी तुम्हाला कमीपणा द्यायचा ठरवलेलंच असणार मग ते काय शांत बसणार नाहीत तुमची उत्तर ऐकून ह. मग एकच पर्याय असतो तिथून उठून जायचं आणि मी ही तेच केले. मी सरळ सर्वाना इग्नोर करून उठून गेली.
ताईंच्या सासऱ्या च्या माणसांनी मला विचारलं ही की मी अनन्या तुम्ही कधी देताय गुड न्यूज?? पण तेव्हा आमच्या मनात नव्हतं तस काही म्हणुन बघुयात असं हसत बोलून निघून जायचं इतकंच आम्ही ठरवलेलं..
पण ताईंना मस्त त्या हिरव्या साडीत, न ते दागिने घातलेले बघून मला पण असं वेगळंच फील होतं होतं, नंतर मग त्यांचं ते फोटो शूट चंद्रावर बसून, धनुष्य बाण हातात पकडून दोघं नवरा बायकोनी काढलेले फोटो बघून मनात तर वाटतं होतं, की आपल्या आयुष्यात कधी येणार बरं हा दिवस??? पण इमॅजिन तर करत होती मी आम्हाला दोघांना त्यांच्या जागी..
एक दिवस तर येणार असा एक दोन वर्षात हा दिवस की आपण दोघे ही ह्यांच्यासारखे फोटो काढत आपल्या होणाऱ्या बाळाचे स्वप्न सजवत असू...
पण नैसर्गिक पणे जे नशिबात येत किंवा आपोआप जे मिळतं ते तेव्हाच स्वीकारायचं असते, आणि तेव्हा आम्ही स्वतःहून ती संधी नाकारली होती.. मग सहज नाकारलेली संधी तुम्हाला तरी वाटतंय का सहजपणे आम्हाला हवी तेव्हा च आम्हाला मिळणार???
नाही असं कसं शक्य आहे ओ..??