पार्टी ची वेळ झालेली असते प्रीतम तयार होऊन अनुराग च्या रूम मध्ये जातो....
स्थळ : अनुरागची बेडरूम
वेळ : संध्याकाळी 7 : 00 वाजता
प्रीतम : "दादा रेडी झालास की नाही ? खाली सर्व जण वाट पाहत आहेत उत्सवमूर्ती कुठे आहेत म्हणून गेस्ट यायची वेळ झाली आहे ."
(अस म्हणत रूम मध्ये एंटर करतो .)
अनुराग : "हो रे ...चल जाऊया खाली ."
प्रीतम : "दादा तू तर एकदम खत्रा दिसतोयस की , आज कोणी खास येणार आहे का पार्टीला म्हणून तू इतका छान रेडी झाला आहेस "
अनुराग :" तस काही नाही आहे तुला ही माहित आहे ."
प्रीतम : "दादा तू खूप सरळ मार्गी निघालास बाबा , आयआयटी बॉम्बे ला पाच वर्षे होतास करायचं होतस ना कोणालातरी डेट... काय प्रोब्लेम होता ?
मी असतो तर मी पाच वर्षांत किती तरी मुलींना डेट केलं असत ."
अनुराग : "प्रोब्लेम काही नव्हता... चल आपल्याला उशीर होतोय आई ओरडेल चल जाऊया, बोलण्यातच किती वेळ गेले बघ 7:15 झाले . चल लवकर ...
(अनुराग आणि प्रीतम दोघे खाली जातात )
अनुराग पार्टीसाठी रेडी होतो आणि खाली जातो , सर्व
जवळचे नातेवाईक , त्याचे मित्र हे सर्व एकेक करून पार्टीसाठी येत असतात .... तू जसा त्यांच्या गार्डनच्या दिशेने जातो, तर त्यांचे गार्डन मस्त डेकोरेट केलेले असते सर्वत्र फुलांनी सजवलेले , छान लाइटिंग केलेले असते तो हे सर्व पाहून भारावून जातो....
आई : "अनु किती वेळ ?? गेस्ट यायला सुरुवात झाली तरी पण तू अजून रूम मधून खाली आला नाहीस ..."
(आई त्याला थोडे रागावते )
अनुराग : " माझी काही चूक नाही ह्या प्रीतम मुळे वेळ झाला यायला मी रेडी होतोच ."
आई : बर बरं...पण आता इथेच थांब पाहुणे येतील त्यांचे वेलकम कर शेवटी तू आज उत्सवमूर्ती आहेस .... आम्ही असलो नसलो तरी आज चालेल पण तू हवास ... काय ???
अनुराग : "हो ग आई ...मी इथेच असेन तू नको काळजी करू."
आई : बरं आता माझ्या बरोबर जरा चल तुझे मामी मामी आलेत त्यांना भेट चल ...
( असं म्हणत आई त्याला मामी मामी कडे घेऊन जाते )
मामा : अनु कसा आहेस बेटा ???
अनुराग : मी मस्त मामा ...तुम्ही कसे आहात???
मामा : मी पण मस्त आहे .
मामी : काय अनुराग?? मामा मामीला विसरलास आता ... शेवटचं बारावी झाल्यावर आला होतास कोल्हापूरला ते इतकी वर्ष झाली अजून आला नाहीस... आम्हाला विसरला आहेस तू आता ...
अनुराग : तस काही नाहीये मामी मला माझ्या अभ्यासातून कधी कोणाकडे जाण्याचा वेळच मिळाला नाही पण आता येईन हा मी चांगला वेळ काढून राहायला ... पण ते नव्हे आजी ला येताना घेऊन या सांगितलं होतं ना मग का नाही घेऊन आला तुम्ही ???
मामी : वय झालंय आता आईंच झेपत नाही प्रवास या वयात . विमानात त्यांना काही झालं तर काय करायचं??? शिवाय कार चा 3-4 तास एका जागी बसू शकत नाहीत म्हणून नाही आणल म्हणून मी , ऐश्वर्या,आणि तिचे डॅडी आम्ही तिघेच आलोय ...
अनुराग : हा हा ... मीच येतो आता कोल्हापूरला
आजीला भेटायला .
मामी : ये रे अनुराग , तुझी सारखी आठवण काढतात त्या
एकदा त्यांच्यासाठी तरी ये ...
अनुराग : हो, येईन मी ....
आई : अग वहिनी ऐशू कुठे आहे???
मामी : अग मगाशी प्रिया तिला घेऊन गेली आता ,
असेल तिच्या सोबत ....
आई : ह्मम ... बर ठीक आहे .
(तोच अनुराग चे मित्र त्याला हाक मारतात ते आईकुन अनुराग be like सुटलो एकदासा ... ते का ते कळेल
तुम्हाला लवकरच )
(अनुरागचा मामा वसंत श्रीपती जोशी त्यांची पत्नी अंजली वसंत जोशी )
(छोटी पार्टी म्हणता म्हणता खूपच जंगी पार्टी च आयोजन केलंय की बाबांनी असा विचार अनुराग करत होता . त्याचं वेळी त्याचे बालपणी चे मित्र अमर , निखिल आणि जय तेथे येतात ....)
जय : " अनु तिथे काय उभा आहे इकडे ये ना आमच्यात ?
अनुराग : हो आलोच .अरे तुम्ही केव्हा आलात ?
जय : आम्ही आताच आलोय .
अनुराग : अच्छा, चला ना आपण तिथे बसून गप्पा मारुया ....
(सर्व जण तिथल्या एका काऊच वर बसतात )
अमर : काय लग्नाची बोलणी करत होतास का तुझ्या मामा सोबत ???
अनुराग : ये बाबा आता तू सुरू होऊ नकोस , प्लिज यार.... तरी बरं झालं जय तू मला हाक मारलीय नाही तर काही खरं नव्हतं माझं .... थॅन्क्स यार 🫡🫡🫡
निखिल : आम्हाला काय माहित नाही का ??? तुझी आई लहानपणापासून त्या ऐश्वर्याला सून करायचं म्हणून तुझ्या मागे लागलीय ते ....
जय : पण मला एक कळत नाही की तुला ती का नको आहे , म्हणजे दिसायला सुंदर आहे आणि तुझ्या आईची इच्छा आहे तरी ही तू का तयार नाही आहेस ....
अनुराग : अरे लहानपणापासून जिला मी माझी बहीण मानतो तिच्यासोबत लग्न कसं करू सांग ना मला किती विचित्र वाटेल ते....
जय : हमम् ते पण आहे जर तुझ तिच्यासोबत लग्न झालं तर खरंच तुला तिच्या स्वीकार करण खूपच अवघड जाईल....
( अनुराग , निखिल, जय आणि अमर यांच्या गप्पा सुरू झाल्या होत्या)
तिकडे मीराच घर "कृष्णकुंज"
(मीरा पार्टी साठी रेडी होऊन जायला निघते )
मीरा : वंदना काकू चला येते मी पार्टीला जाऊन आणि हो मी आई बाबांनी सांगितलं त्या वेळेपर्यंत परत येईन काळजी करू नका....
(ड्रायव्हरला पत्ता सांगते ,ड्रायव्हर गाडी तिने सांगितलेल्या पत्त्यावर नेतो अर्ध्या तासाने गाडी मृगजळ जवळ थांबते . ती गाडीतून खाली उतरते, समोर मोठा प्रशस्त असा बंगलो असतो . ती आत जाते आणि ड्रायव्हरला सांगते, इथून थोड्या अंतरावर पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली होती . ड्रायव्हर तिने सांगितल्यावर गाडी पार्क करण्यासाठी जातो )
ती तो बंगलो पाहून थबकली च इतका मोठा बंगलो तर
तिचा ही नव्हता . किमान दोन एकर मध्ये बांधलेला बंगलो होता तो ! भव्यदिव्य!आज पहिल्यांदा ती प्रियाच्या घरी आली होती . तिला माहित होत देशपांडे वकील हे फक्त पुण्यात नाही तर अख्ख्या देशात फेमस होते ....
शिवाय त्यांचे वडील हे श्री . दामोदर देशपांडे हे खासदार होते त्यामुळे हे इतकं वैभव असणारच ना ....
ती हे सर्व चकित होऊन पाहत होती पण इतक्यात.... तिला कोणाचा तरी जोरात धक्का बसतो आणि ती पडणार अस तिला वाटतं पण तस् काही न होता ती कोणाच्या तरी बाहुपाशात असते , डोळे घाबरून गच्च बंद केलेले असतात ....
(गेस करा तो कोण असेल अर्थात तो आपला हिरो अनुराग असतो दुसर कोण असेल का ??? 😁😁😁)
अनुराग : हे मिस, आय एम व्हेरी सॉरी ... ते चुकून तुम्हाला धक्का लागला , मी फोन वर बोलत होतो ना त्यामुळे सो सॉरी मिस ....😔😔😔
( पण मिस आईकून घेण्याच्या मनस्थितीत होती कुठे तिचे तर कान बंद झाले होते , त्याच्या मिठीत पूर्णपणे हरवून गेली होती....)
अनुराग : hey are you listening me...
( त्याने पाहिलं ती अजून त्याच्या मिठीत डोळे बंद करून बसली आहे , त्याने तिला हळूच बाजूला केले तशी ती भानावर आली)
मीरा : सॉरी सॉरी.. खरचं सॉरी ते लक्षात नाही आले माझ्या मला वाटले मी आता पडलेच ....
( तिला काय बोलावं सुचेना )
अनुराग : इट्स ओके, खरतर मघाशी माझ्याच मुळे तुम्हाला धक्का लागला... सॉरी बर का.....
आता यांचं सॉरी पुराण सुरू होत तोच मीराचा फोन वाजला ... Ladies and gentleman will you please stand ?
With every guitar string scare on my hand
I take this magnetic force of a man to be my lover ...❤️❤️❤️
पण तिचं लक्ष कुठं होत, ती तर त्याच्या घाऱ्या डोळ्यात अडकली होती ... तिची रिंगटोन त्या सिच्युएशनला अगदी बरोबर रिलेट करत होती ...
अनुराग : तुझा फोन मघापासून वाजतोय . घे ना फोन ?
(मीरा फोन घेते तर प्रिया तिचं काही न ऐकता बोलायला सुरुवात करते )
प्रिया : हॅलो मीरा , अजून कुठे आहेस तू ??? संजना व पल्लवी आल्या सुद्धा तू अजून आली नाहीस ....
मीरा : मी पण आले आहे , तुम्ही लोक कुठं बसलाय??
प्रिया : आम्ही जो पार्टीसाठी स्टेज केली बघ त्याच्या समोर बसलोय
मीरा : बर बरं .. मी येते तिथे
मीरा पार्टी स्टेज च्या बरोबर बॅक स्टेज ला उभी असते ....
(मीरा आता गडबडीने त्या ठिकाणी जाते)
प्रिया : किती वेळ लावलास यायला इतका वेळ लागतो का ? मी कितीला सांगितलं तुला आणि तू कितीला आली आहेस ....
मीरा : सॉरी ना प्रियू , अग मगाशी ना एक हॅडसम मुलगा धडकला ग आणि मी पडता पडता वाचले ग .म्हणून मला त्यामुळं थोडा लेट झाला ....
सॉरी ना यार 🥹🥹🥹
प्रिया संजना आणि पल्लवी एकदम बोलतात "काय ??? 😲😯😲 हँडसम मुलगा कोण होता तो??? आणि खरच इतका हँडसम होता का ???
मीरा : हळू आवाजात बोला ग जरा आपण कुठे आहोत याचं ही भान नाही आहे तुम्हाला आणि काहीही प्रश्न विचारताय ....
संजना : बर हळू आवाजात विचारतो , तो मुलगा खूप हँडसम होता का ???
मीरा : तुला काय करायचं ???
संजना : सांग ना मीरा अस काय करतेस ...
मीरा : हममं... तो खूप हँडसम होता, त्याचे डोळे खूपच सुंदर होते ...☺️☺️☺️
प्रिया : खूप आवडलाय वाटतं ... प्रेमात पडलीस की काय त्याच्या ते love at first sight म्हणतात तस काही झालं नाही ना तुला ???
पल्लवी: मगाशी तू म्हणालीस की त्याचा तुला धक्का लागला आणि तू पडता पडता वाचलीस त्याने वाचवलं का ??? ते मूव्ही मध्ये हिरोईनला कसा पडता पडता वाचवतो तस....
(पल्लवी अस म्हणाली तेव्हा तिचा चेहरा गुलाबी गुलाबी झाला होता चेहऱ्यावर हलकीशी लाज दाटून आली होती... पोटात फुलपाखरे नाचत होती हे सर्व ती पहिल्यांदा अनुभवत होती... तिचं तिला च कळत नव्हतं...
पण या सगळ्यातून भानावर येते आणि रागात त्यांच्या कडे पाहत बोलते ...)
मीरा : तुम्ही काहीही काय विचार करताय अस काहीही नाहीये ... तस ही तो मुलगा खूप मोठा वाटत होता आणि तुम्ही हे काय बोलतायत मला तस काही नाही वाटत सो प्लीज असा काही विचार करू नका ...😡😡😡
(ती जरा रागातच बोलली तश्या साऱ्या जणी गप्प बसल्या 🤐😐🤐 चिडीचूप एकदम )
काय होईल जेव्हा मीरा ला कळेल की तो मुलगा प्रियाचा भाऊ अनुराग आहे ???
पुढे काय होणार ते पाहण्यासाठी वाचत रहा ... "माझिया प्रियाला प्रीत कळेना "
कमे्टेड लाईक्स आणि रेटिंग द्यायला विसरू ना ....🩷🩷🩷
तुम्ही केलेली एक comment, लाईक आणि रेटिंग मला कथा लिहिण्यासाठी प्रोत्साहित करेल ....
आता तर मीरा अनुराग ची भेट सुद्धा झाली आता तरी करा की राव लाईक्स अँड कमेंट्स❣️❣️❣️
.
.
.
Bye bye stay tuned ❤️❤️❤️
लवकरच भेटू पुढच्या भागात.... 🤗🤗🤗