तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की मीरा जेव्हा पार्टीत आली तेव्हा नेमका अनुरागचा धक्का मीराला कसा बसला ???? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की या भागात मिळेल....
फ्लॅशबॅक : अनुराग मित्रांसोबत गप्पा मारत बसलेला असतो तितक्यात त्याला त्याच्या बेस्ट फ्रेंड "अनामिका "चा कॉल येतो , मित्रांसमोर एका मुलीचा फोन कसा घेणार ना अनुराग उगाच त्याला त्यांना चिडवायचा मौका द्यायचा नसतो .... त्या नादात तो तिथून उठून एका कोपऱ्याच्या दिशेने चालत फोन वर बोलत असतो त्या नादात तिला धक्का लागतो .... 😵💫😵🫨
"अनामिका" ही आयआयटी बॉम्बेमध्ये त्याच्या सोबत शिकत होती... तिथे त्यांची चांगली मैत्री झाली कारण ते दोघे पुण्याचे होते ... आपल्या भागातलं असेल तर मैत्री पटकन होते ना ... तस काहीसं झालं होतं....
मीरा आपल्या फ्रेंड्स ना सांगत असते ना या accident बद्दल त्याचवेळी तिकडे .....👇👇👇👇
अनुराग (मनात ): " damm ! धक्का लागल्यामुळे फोन खाली पडून फुटल्यात जमा झालाय.... आता अनामिका ला पत्ता कसा सांगू ?
आणि काय ती मुलगी साधं थॅन्क्स पण म्हणाली नाही तिच्याच धुंदीत निघून गेली, मी तिला पडता पडता वाचवलं तरीसुद्धा थॅन्क्स म्हणाली नाही ती ....
ती नक्कीच प्रियाची फ्रेंड असेल ... जाऊदे आपल्याला काय करायचं कोणाची का असेना मी अनामिकाला फोन ट्राय करतो ."
( अनुराग पुन्हा अनामिकाला फोन करतो )
अनामिका : हॅलो, अनु मध्येच फोन कट कसा झाला रे ?
अनुराग : अग ते माझा फोन माझ्या हातून चुकून पडला त्यामुळे .....
अनामिका : ओके ,अनु मी पोहचले आहे ऑलमोस्ट पार्टी सुरू झाली नाही ना ....
अनुराग : नाही पार्टी 8 : 30 वाजता सुरू होईल ....
अनामिका : बर बरं... मी आलेच...
तिकडे प्रीतम आणि ऐश्वर्या एकमेकांसोबत बोलत असतात जिथे त्यांच्या आसपास कोणीही नसेल ....

❣️प्रीतम आणि ऐश्वर्या ❣️
प्रीतम : तुला कळत नाहीये का ऐश्वर्या , आई दादा आणि तुझ लग्न व्हावं अशी तिची इच्छा आहे... आणि तरी ही तू अशी वागतियेस....
ऐश्वर्या: अशी म्हणजे कशी सांग ना ??? आणि माझं तुझ्या वर प्रेम आहे ... I love you prit 🥺 तुझ आहे माझ्या वर प्रेम हे माहीत असूनही मी शांत बसू का ???
मला नाही करायचं आहे तुझ्या दादासोबत लग्न त्याला पण नाही करायचं.... तुझ्या आईला मी त्यांची सून व्हावी अशी इच्छा आहे... मग तुझी बायको झाले तर काय हरकत आहे ...
प्रीतम: आत्ता हा विषय आपण स्टॉप करूयात कोणी आपल्याला पाहीच्या आत .... पार्टी सुरू आहे , गेस्ट आले आहेत चल जाऊया पटकन....
( तो पार्टी आयोजित केली आहे तिथे पोहचतो सर्व च लोक जमलेले असतात, रात्रीचे 8:30 झालेले असतात... तो annoucement करण्यासाठी स्टेज वर जातो )
प्रीतम : the party officially began at 8:30 , but the excitement had been building all evening , and now the garden was a buzz with conversations and celebrations... 🎉🎉🎉
(पार्टी अधिकृतपणे 8 :30 वाजता सुरू झाली आहे परंतु संपूर्ण संध्याकाळपर्यंत उत्साह निर्माण झाला आहे आणि आता बाग ,चर्चा आणि उत्सवाने गजबजली आहे....)
(प्रीतम ने सर्व कुटुंबाला एकत्र करून केक कट केला ... Shampian च टोपण उघडून जल्लोष व्यक्त करत .... त्याच्या दादा च कौतुक केले....🍻🥂🍻 ✨✨✨ सर्व गेस्ट आणि आलेले मित्र मंडळी बुके आणि गिफ्टस देऊन अभिनंदन करत होते.... 💐💐💐)
(इतक्यात अनामिका पण तेथे पोहचते... त्याला अभिनंदन करते .... पल्लवी , संजना आणि मीरा सुद्धा त्याला अभिनंदन करायला जातात .... )
मीरा : ओ तेरी ... हा प्रियाचा भाऊ आहे ‼️...😱😱
संजना : मीरा अग काय झालं ???
मीरा : काही नाही .... काही नाही तू चल न आपण हे देईन येऊ पटकन ...🙄
(असं म्हणत त्या स्टेज वर जातात पण मीरा नाही जात का नाही जात काय माहीत पण तिला जाऊ वाटत नाही ती एका कोपऱ्यात उभी असते.... त्या मस्त त्याला बुके देतात आणि अभिनंदन दादा असं म्हणत एक छान फोटो काढून स्टेज वरून खाली येतात)
पल्लवी : अग तू का आली नाहीस ??? कुठे गायब झाली होतीस ???
मीरा : कुठे नाही ग , ते आईचा कॉल आला होता...
(ती असं सांगून वेळ मारून देते ... काही वेळात फोटो सेशन संपत आणि नाच गाण्याला सुरुवात होते.... डान्स फ्लोअरवर अनुराग व अनुरागचे मित्र ,प्रीतम , ऐश्वर्या व अनामिका हे डान्स करत असतात )
"प्रिया - संजना पल्लवी आणि मीरा यांना डान्स फ्लोअरवर घेऊन जाते .... मीरा ला जायची अजिबात इच्छा नव्हती तर ही जबरदस्ती त्या तिला ही घेऊन जातात ....त्यावेळी गाणं सुरू असत , सामने ए कौन आया दिल मै हुई हलचल.... बस्स देख के ही एक झलक हो गये हम पागल .....❤️❤️❤️
( मला अस वाटतं की प्रेमात पाडण्यासाठी हार्मोन्स आणि आपल्या मित्र मंडळी सोबतच इतर ही घटक जबाबदार असतात आणि मगच आपण crush वरून प्रेम या पायरीवर चढतो ... जसं की मीरा त्या डान्स फ्लोअरवर डान्स करत असताना लागलेलं हे गाणं ... म्हणजे नियती सुद्धा तिला त्याच्या जवळ जाण्यासाठी attract करती ये का ❓)
मीरा डान्स करत असते पण तिचं लक्ष अनुराग आणि अनिमिका यांच्या वरच असते ... डान्स फ्लोअर खूप मोठा होता .... खूप सारे जण तेथे डान्स करत असताना अचानक पार्टनर स्विच होतात आणि मीरा आणि अनुराग डान्स करू लागतात ....
अनुराग : तू प्रियाची मैत्रीण आहेस का ???
मीरा : हो ... मी तिची बेस्ट फ्रेंड आहे .
अनुराग : हमम ... I see your group
मगाशी तुझ्या मैत्रिणी मला बुके देऊन गेल्या तू कुठे होतीस तेव्हा????
तिला कळत नाही काय उत्तर द्यावे मग मगाशी जी थाप पल्लवीला मारली होती तीच थाप ती त्याला मारते....
(पुढे कोणीच काही बोलत नाही)
डान्स करताना त्याचा हात तिच्या कमरेवर असतो त्यामुळे ती थोडी अनकम्फर्टेबल फिल करत असते ....
तिच्या अंगावर शहारे येत असतात.... पण इकडे त्याला काही फरक पडत नव्हता तो मस्त डान्स करत असतो ....
काही वेळात पुन्हा एकदा पार्टनर स्वीच होतात त्यावेळी तिच्या जीवात जीव येतो ....
डान्स करून भूक लागल्यावर या सर्वजणी डिनर करायला जातात ....
जेवणासाठी तिथे बुफे पद्धत होती... डिनर मध्ये पुढील पदार्थ होते....
Snacks:
- Samosas
- Pakoda
- Papri chaat
- Pani Puri
- sandwich 🥪
Sancks पाहून पल्लवीच्या तोंडाला पाणी सुटले पण मीरा म्हणाली अग main course मध्ये काय आहे ते पाहूया नंतर तुला काय हवं ते खा....
Main Course:
- Buffet-style:
- Chicken tikka masala
- Palak paneer and puri
- Chana masala
- chicken biryani and veg biryani
- jera rice 🍚 and dal tadka
- Chicken and vegetable korma
- pamplet curry
Desserts:
- Gulab jamun
- Jalebi
- Kulfi
- Fruit salad
- Mango lassi
इतकं सगळं पाहून संजना पल्लवी प्रिया आणि मीरा या चौघींच्या तोंडाला पाणी सुटतं....
त्यात रात्रीचे दहा वाजलेले असतात डान्स नादात त्यांना कळतच नाही घड्याळात किती वाजून गेलेत.... आता मात्र पोटात कावळे ओरडायला सुरुवात होते....
चौघी पटकन हातात डिश घेतात आणि त्यात जेवण वाढून जेवायला सुरुवात करतात.... तेव्हा संजना प्रिया म्हणते ,
संजना: ये प्रिया तुझा भाऊ खूप हँडसम आहे ग माझा तर त्याच्या वर crush आलाय ग... तो थोडा वयाने लहान असला असता ना तर मी प्रपोजच केलं असत त्याला ....
पल्लवी : हो ग ... हिचा भाऊ खरचं खूप हँडसम आहे... एखाद्या हिरो सारखा कोणाचा पण क्रश होईल असा ...पण तो आपल्या रेंज बाहेर आहे , सो विषय न काढलेलाच बरा... प्रियाचा भाऊ तो आपला पण भाऊ...
प्रिया : आणि तस ही तो कोणाला भाव देत नाही .... तो खूप फोकस्ड आहे त्याच्या करिअरच्या बाबतीत मला तरी वाटत नाही आज वर कधी त्याने कोणावर प्रेम केले असेल ....
मीरा मात्र त्यांच्या या संभाषणात भाग न घेता निमूटपणे आपलं जेवण करत असते...
थोड्या वेळानंतर -
पल्लवी : काय मस्त पनीर टिक्का आणि वेज बिर्याणी त्यानंतर मगाशी जेवण झाल्यावर आपण खाल्लेली मँगो लस्सी होती मन तृप्त झाल माझ... ऑल थँक्स टू प्रिया .... ☺️☺️☺️
मीरा : जेवण एकदम मस्त होत , थॅन्क्स प्रिया.... यार आता आपल्याला घरी जायला हवं रात्रीचे साडेदहा वाजलेत आईचा मार खाऊ आपण ....
संजना: काय रात्रीचे साडेदहा वाजलेत !!!! आता मी मेले आईला सांगितलं होतं रात्री साडेनऊ वाजेपर्यंत येईन आता वाट लागेल माझी ....
प्रिया: काही वाट वैगरे लागत नाही, काकू काही नाही म्हणणार तुम्ही टेन्शन घेऊ नका....
पल्लवी : आता असं बोलत बसलो तर नक्की वाट लागेल चला ना आपण घरी जाऊया ....
( त्या प्रियाला बाय करतात , ड्रायव्हरला कॉल करून त्या निघून जातात....)
मीरा गाडीत बसून डोळे मिटते तेव्हा तिच्या डोळ्यासमोर आनुरागचा चेहरा येतो ती पटकन दचकून डोळे उघडते.... ड्रायव्हरला विचारते , घर किती दूर आहे ... ड्रायव्हर तिला सांगतो की , फक्त दहा मिनिट दूर ....
ती रात्री अकरा वाजता घरी पोहचते, तिचं नशीब चांगल म्हणून ती आई आणि बाबा यांच्या आधी घरी आली होती... नाहीतर आज आईचा ओरडा खाण्यापासून तिला कोणी वाचवू शकल नसतं .... ती देवाचे मनात आभार मानते ... आणि डायरेक्ट रूममध्ये पळते ....
पुढे काय होणार हे पाहण्यासाठी वाचत रहा.... माझिया प्रियाला प्रीत कळेना 🩷🩷🩷🩷