Maziya Priya doesn't know love - Part 10 in Marathi Love Stories by Pradnya Chavan books and stories PDF | माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 10

Featured Books
Categories
Share

माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 10

आता नंबर तर मी तिने दिला होता पण तरी त्याला नंबर उगाच दिला का ???? नंबर देऊन मी काही चूक केली नाहीये ना या विचार असणारी ती कधी घरी पोहचली हे तिचं तिला लक्षात आले नाही.... गाडी घरच्या गेट मध्ये आली तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण घरी पोहचलो आहोत.... ती गाडीतून खाली उतरून घरात जाते....

ती तिच्या रूम मध्ये येते.....

बेड वर पडलेला तिचा फोन उचलते, त्यात अनुराग ने हाय पाठवलं होतं तो नंबर सेव्ह करत असताना सुद्धा हा विषय विचार करत होती की "अनुराग" म्हणून सेव्ह करू की "अनुराग दादा" म्हणून  मग शेवटी " AD "म्हणून नंबर सेव्ह करून त्याचा dp पाहते.....

त्याचा dp आयआयटी बॉम्बे चा फोटो पाहून ती मनातच म्हणते, इतकं छान बनवलय देवाने किती सुंदर चेहरा आहे याचा तरी ही स्वतः चा फोटो dp ला लावायला काय हरकत आहे..... मी जर इतका हँडसम मुलगा म्हणून जन्माला आले असते तर मी माझे किती छान छान फोटो dp ला लावले असते.... Dp पाहून मुली तरी फिदा झाल्या असत्या माझ्यावर.....

तिच्या विचारांनी तिचं चमकली..
हा काय विचार करत आहे मी , आधी फ्रेश होवून येते....


स्थळ : मृगजळ , अनुरागची बेडरुम 
संध्याकाळी : सात वाजता 

" दादा..... आत येऊ का ???? प्रिया 

" ये ना प्रिया त्यात विचारायचं काय ....
प्रिया बेड वर बसते....

" दादा तू म्हणाला होतास ना की तू माझा अभ्यास घेशील म्हणून .....

" हो .... चल मग कोणता चॅप्टर शिकवायला घेऊ.....

" सायन्स चा 3th chapter घेशील मला तो समजला नाही आहे proper.....

" Ok ... बूक दे तुझ आपण सुरुवात करूया.... 

स्थळ : कृष्णकुंज , मीराची बेडरूम
वेळ : संध्याकाळी साडे आठ वाजता 

" मीरा आज शाळेत युनिट टेस्ट चे पेपर चेक करून देणार होते , दिले का ते ???? 
मीराच्या आईने विचारले 

" हो दिले ना , हे बघ.....
मीरा ने शाळेत दिलेले चेक केलेले पेपर तिच्यापुढे ठेवले...

" मीरा तुला तर सर्व विषयात खूप छान मार्क्स पडले आहेत ग.... फक्त maths मध्ये सर्वात कमी मार्क्स आहेत आपण अस करू तुझ्यासाठी एक होम ट्यूटर लावू तो तुला maths आणि बाकी इतर विषय ही शिकवेल.... 

" नको .... कशाला तो होम ट्युटर शाळेत शिकवतात ते समजत मला.... घरी आल्यावर थोडी रिविजन केली की लक्षात राहत माझ्या.... 


" बर.... मग फक्त maths साठी लावूयात ना होम टयूटर .... तुझे maths चे मार्क्स खूप कमी आहेत ग... 

" नको ... काही गरज नाही ये त्याची , तो प्रिया चा भाऊ आहे ना अनुराग तो म्हणाला  की मी तुला maths शिकवीन.... त्याला अस वाटत की maths subject खूप सोपा आहे....  आम्हाला म्हणतो कसा की तुम्हाला maths कसं काय अवघड जाऊ शकत.... It's a very easy subject.... मी म्हणाले त्याला नाही maths खूप महा कठीण सब्जेक्ट आहे पण तो म्हणाला मला मी तुला शिकवीन त्यानंतर जर तुला maths कठीण गेलं तर नाव बदल माझं .....

" ओके.... पण त्याला तर जॉब असतो ना मग तो तुला कसं शिकवणार आणि तो रहतो ही खूप दूर.... 

" Saturday Sunday शिकवतो तुला ऑनलाईन असं म्हणाला आहे.... पण जर त्याला जमलं नाही तर आपण नक्की कोणतातरी चांगला क्लास नाहीतर होम टीचर ठेवावा लागेल.... 

" बर .... ठीक आहे....

" आई , बाबा कधी येणार.....

" त्यांना यायला खूप वेळ होईल .... आपण जेवण करून घेऊ .....

" ओके.....
तिची आई आणि मीरा सोबत डिनर करतात....

तोच मिराचा फोन रिंग होतो ती पाहते आदित्यच नाव होत... ती लगेच फोन उचलते व्हिडिओ कॉल होता....

"Hii.... काय चाललय ????? 

" Hello.... काही नाही आता जेवण करत आहे.... तुझ झालं का जेवण .... रमा 

" अच्छा... माझं मगाशीच झाल... 

"दादा कधी येणार पुण्याला.... मीरा ने तिच्या आईच्या हातातला फोन घेऊन त्याला विचारले 

" पुढच्या महिन्यात येईन.... बाकी अभ्यास कसा सुरू आहे???? मला काय म्हणाली आहेस लक्षात आहे ना.... यावर्षी पहिली यायला हवी आहेस....

" हो रे दादा लक्षात आहे माझ्या... आणि अभ्यास करत आहे मी आई विचार विश्वास नसेल तर.... 

" Hmm.... तू स्वतःहून अभ्यास करत आहेस.... चांगली गोष्ट आहे.... बाबा आले नाहीत का अजून ???

" नाही आले अजून ते उशिराच येतात तुला माहीत आहे ना....

" हाहा.... चालतंय आता ठेवतो फोन.... आदित्य 

" ओके बाय गुड नाईट....💝
मीरा : मी आता वरती जाऊन अभ्यास करते.... 
रमा : जा कर अभ्यास काही हवं असेल तर आवाज दे .... रूम मध्ये आणून द्यायला सांगते ....

मीरा : ठीक आहे....

------------------------------------------------------------
मृगजळ, रात्री ९ :०० वाजता....

अनुराग प्रियाचा अभ्यास घेत होता , तिचे डाऊटस् क्लिअर करून देत होता.... तोच प्रीतम अनुरागच्या रूम मध्ये येतो....

" अभ्यास झाला की नाही अजून बास आता खाली जेवायला जाऊ या.... चला खाली आई हाक मारत आहे....

" दादा आज आम्ही रूम मध्ये च डिनर केलंय.... तू जा जेवायला.... अनुदादा माझा अभ्यास घेत आहे तू जा आम्हाला डिस्टर्ब करु नको...

" बर बाई नाही distrub तुम्हाला मी जातो जेवायला तुम्ही करा तुमचं carry-on.... 

तो खाली जेवायला गेला आणि प्रियाला अनुराग तिच्या गणिताच्या शंका दूर करत होता.....

तोच प्रियाचा फोन  वाजला..... 
मीरा चा फोन होता.... तिने पटकन फोन उचलला....

" हॅलो मीरा, बोल ना ....

" हॅलो प्रिया , अग तुझा maths चा problem set सोडवून झाला का ????  मला तर काही कळत नाहीये बघ....

" मी आता तोच सोडवला बघ .... अनु दादा ने मला खूप छान समजावलं.... मग मला आता समजल आहे.... 

" मला तर कोणाला x मानायच आणि कोणाला y मानून कसं सोडवाच हेच कळत नाहीये..... M1 खूप difficult आहे यार....

तिचं ये सर्व बोलणं अनुराग ने ऐकल आणि प्रियाला म्हणाला,

" प्रिया मला दे बघू मी सांगतो तिला.... 

" हे घे दादा तूच तिला सांग कसं सोडवायचं ते ...

"मीरा .... कोणता qestion येत नाही सांग बर मला मी सांगतो तुला.....

आता त्याचा आवाज ऐकून तिचं हृदय पुन्हा फुल्ल स्पीड ने धडधड करू लागलं ना....

" मीरा.... माझा आवाज ऐकू येत आहे का ??? हॅलो मीरा हॅलो....

" हॅलो .... आवाज ऐकू येत आहे मला .... ते पेज नंबर 98 question नंबर 5 कळत नाहीये....

" प्रिया तुझ maths च पुस्तक दे जरा....
तिने पुस्तक दिल आणि हा तिला समजावू लागला...

" समजल का तुला ???

" हो समजल मला .....

" तुझ्या कडे फोन आहे तर तू यूट्यूब ला का टाकत नाहीस ग....

" माझ्या कडे फोन आहे पण माझ्या फोनला आई मंथली data pack मारत नाही....

" ओके.... Sunday ला आपण करू या तुझा maths चा अभ्यास तुझा आणि प्रियाचा एकत्र घेतो मी....

" ओके.... थॅन्क्स.... 

" ओके बाय आता ठेवतो फोन....

" Hmm

प्रियाचा अभ्यास झाला तस तीही तिच्या रूम मध्ये निघून गेली....

★ ★ ★ ★

इकडे मीरा ही फोन ठेऊन अभ्यास करत होती....

अभ्यास करत असताना ही तिला तो आठवत होता असं काय होत त्याच्यात की ती तो समोर असताना स्वतःलाही विसरून जायची.....


वेळ रात्री अकरा साडे अकरा ची मीरा तिचा अभ्यास संपवून ती बेड वर झोपली.... 

पण झोप काही येईना म्हणून डायरी लिहायला बसली...

मला माहित नाही मला नक्की काय झालय पण त्याला पाहिलं जरी तरी अंगावर शहारे येतात, त्याचा आवाज ऐकला तरी हृदय बंद पडत आहे की काय असं वाटत.... ते जे काही असेल पण मन प्रसन्न होत माझ त्याला पाहिल्यावर.... 

I just have crush on him ....
Obsessed with him....


When I see you ,I admire I start to lose my grip ....

I accept it... ✨✨✨

मला माहित आहे तुझ्या साठी मी फक्त तुझ्या बहिणीची मैत्रीण आहे.... पण तुला पाहून मी स्वतः ला आता थांबवू शकत नाही.... मी काय करू... I can't stop my self to  being obsessed by you....💗💗💗


.

.

Bye bye stay tuned ❤️ ❤️ ❤️ 

पुढे काय होणार यासाठी वाचत रहा....
माझिया प्रियाला प्रीत कळेना.... 🩷🩷🩷