Anubandh Bandhanache - 37 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 37

The Author
Featured Books
Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 37

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ३७ )
त्या रात्री अंजली याच विचारात असते की, मेघा आणि ती मिळुन हा जो सर्व प्लॅन करतोय तो सक्सेस होईल का...? 
खरं तर तिला आधी या प्लॅन बद्दल मॉम ला सांगायचं होतं, पण डॅड समोर ती बोलु शकत नव्हती. तिची मनापासुन इच्छा होती की, प्रेम तिच्यासोबत दुबईला यावा. पण तो यायला तयार होईल का...? त्याला कसं तयार करायचं...? 
खुप विचार करून ती आपल्या रूम मधे जाऊन मेघाला कॉल करून बोलते.
अंजली : हाय...! कुठे आहेस...? 
मेघा : घरी आहे... बोल काय झालं...? 
अंजली : ऐक ना... मला नाही वाटत, माझ्या सांगण्यावरून प्रेम यायला तयार होईल. तुच बोल ना त्याच्याशी...😔
मेघा : अरे...! तु आधी बोलुन तर बघ..! नाही बोलला तर मग मी बोलेन त्याच्याशी. ओके...😊
अंजली : मला माहितीय तो नाही तयार होणार. म्हणून बोलतेय ना तुला...!
मेघा : बरं ओके...! मी कॉल करते त्याला. बघतेच कसा नाही बोलतो ते...! 
अंजली : ओय...! नीट बोल त्याच्याशी शांतपणे. 😊
मेघा : हो... मॅडम... कळलं. आता ठेऊ का फोन...?
अंजली : हो... मला सांग त्याचा रिप्लाय काय आहे तो...!
मेघा : तो येणार...! नक्की....😊
अंजली : ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नको. आधी बोल त्याच्याशी. 😊
मेघा : तु ठेव फोन...! मी बघते काय ते....!😏
अंजली : बरं... ठेवते... बाय...!
मेघा : बाय... मेरी जान...!😘
* तिचा कॉल झाल्यावर मेघा लगेच प्रेमला कॉल करते. प्रेम जेवण वैगेरे आवरून बाहेर मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. मेघाचा कॉल बघुन तो थोडा टेन्शन मधे येतो. तिथून बाजूला जाऊन तो कॉल रिसिव्ह करतो.
प्रेम : हाय...! तु कसा काय कॉल केला...? एवढ्या रात्री...! 
मेघा : का...? करू शकत नाही का...? तिलाच परमिशन आहे का फक्त....?🤔
प्रेम : अरे...! असं काहीही नाही. तु कधीही कॉल करू शकते मला...! फक्त या वेळेला कॉल केलास ना... म्हणुन... थोडं टेन्शन आलं...! बाकी काही नाही. ठिक आहे ना सर्व....? 
मेघा : काय सांगु भावा तुला...! इकडे काही ठीक नाही. 😋
* प्रेम थोडा घाबरूनच बोलतो...
प्रेम : म्हणजे...? काही झालंय का मेघा...? 🤔
मेघा : काही नाही रे...! अशीच तुझी जरा गंमत केली. लगेच किती टेन्शन घेतो. 😊
प्रेम : हो... ना...! काय करणार...! या बाबतील जरा टेन्शन येतंच. 
मेघा : अरे...! नको एवढं टेन्शन घेऊ, आपण आहोत ना...! 😊
प्रेम : बरं सांग आता...! कॉल का केला होतास...?
मेघा : अरे हा...! ते तर बाजुलाच राहिलं. 😋 बरं ऐक...! तुझ्याकडे पासपोर्ट वगैरे आहे का...? 
प्रेम : नाही...! का...पण...? 🤔
मेघा : अरे...! असच विचारलं. 😊 ते काय आहे ना..., माझा एक मित्र आहे ना, तो पासपोर्ट वगैरे काढतो. म्हणुन तुला विचारलं. 😊
प्रेम : मला कशाला हवा आहे पासपोर्ट...! मी थोडीच कुठे परदेशात जाणार आहे...,😋
मेघा : अरे...! काढून ठेवायचा इमर्जन्सी...! कधी संधी मिळाली तर...! 😊
प्रेम : हा...! ते पण आहेच...! पण त्यासाठी डॉक्युमेंट वगैरे काही लागत असतील ना...?
मेघा : हो...! मी ते सर्व तुला एसएमएस करते. तु फक्त उद्या ऑफिस ला निघताना ते सर्व डॉक्युमेंट सोबत ठेव. मी तुला उद्या भेटेन. 
प्रेम : उद्याच...?
मेघा : हो...! म्हणुन तर कॉल केला ना तुला आत्ता. 
प्रेम : बरं...! ओके...! मी बघुन ठेवतो. पण किती पैसे घेईल तो...?
मेघा : ते आपण नंतर बघू...! तु फक्त न विसरता घे उद्या. ओके....! मी ठेवते आता. 
प्रेम : हो...! गुड नाइट... 😊
मेघा : गुड नाइट...🙂
* इकडे अंजलीच्या घरी मेघाचे पप्पा आलेले असतात. अंजलीला मेघासोबत पाठवण्यासाठी ते तिच्या डॅड ची परमिशन पण घेऊन झालेले असतात. 
अंजली ते पाहून मनोमन खुश झालेली असते. पण त्या दोघींनी ठरवलेल्या प्लॅन प्रमाणे प्रेम त्यांच्यासोबत येईल की नाही, हे अजुन कन्फर्म झाले नव्हते. 
याच विचारात ती रात्री उशिरा झोपुन जाते.
दुसऱ्या दिवशी मेघा तिच्या घरी येते, दोघी तिच्या रून मधे बोलत बसतात...
अंजली : काय झालं ग...? विचारलं का तु त्याला...? काय बोलला तो...?
मेघा : हो...हो...! स्वतःला विचारायची हिम्मत नाही, आणि मलाच सर्व करावं लागतं...😔
अंजली : तुझी नौटंकी बंद कर...! काय झालं ते सांग...?
मेघा : अजुन तरी काही नाही. पण आज होईल.,,😊
अंजली : म्हणजे...!🤔
मेघा : आपण आज संध्याकाळी भेटतोय त्याला...,😊
अंजली : आपण म्हणजे...? 🤔
मेघा : आपण म्हणजे... ! आपण दोघी....😊
अंजली : मी नाही येणार...! तु बोलली होती ना, मी विचारेन म्हणुन...? 🤨
मेघा : विचारणार मीच...! पण तुझ्यासमोर...! बघते ना, मी पण...! कसा नाही बोलतो ते...!😊
अंजली : म्हणजे नक्की काय करणार आहेस...? 🤔
मेघा : ते संध्याकाळी कळेलच...😋
अंजली : तु उगाच त्याला त्रास देऊ नको. 🤨
मेघा : ओ... हो...! आली मोठी....!😏
अंजली : तु नक्की काय करणार आहेस ते तरी सांग...?🤔
मेघा : तु टेन्शन नको घेऊ... मेरी जान...! हम है ना, सब संभाल लेंगे. 😋
अंजली : तु काही ऐकणार नाहीस...! 😏
मेघा : हो... ना...! मग कशाला बडबड करतेय. 😊
अंजली : बरं... चल, मी निघते. बाय...!
मेघा : ओके... पण संध्याकाळी जायचं आहे आपल्याला पाच वाजता स्कूटी घेऊन ये. 😊
अंजली : हो... पण...! अजुन एक गोष्ट आहे.
मेघा : आता अजुन काय....?🤨
अंजली : साधारण पैसे किती लागतील गं...? फ्लाईट चा खर्च आणि तिकडे जो काही खर्च होईल. 
मेघा : अरे...! डॅड नी परमिशन दिलीय ना...! मग ते लोक असच पाठवतील का तुला...? 
अंजली : अरे पागल...! ते माझ्यापुरते देतील पण, प्रेम जवळ एवढे पैसे तर नसणार. म्हणुन बोलतेय मी.
मेघा : हा...! ते पण आहेच...! तुझ्याजवळ किती जमा आहेत....?
अंजली : थांब... बघुया आपण. 😊
* असं बोलुन तो कपाटातून तिची पिगी बँक काढते आणि बेडवर ठेवते.
मेघा : हे काय...? 🤔
अंजली : माझी खुप वर्षापासूनची सेविंग... आता तिची ओपन करायची वेळ आलीय...😋
मेघा : ग्रेट आहेस तु....👌🏻 
* दोघी मिळुन ती पिगी बँक खोलतात. त्यातुन खुप साऱ्या फोल्ड केलेल्या नोट आणि कॉइन बेडवर काढतात. आणि दोघी मिळुन ते पैसे मोजायला लागतात. 
अंजली : माझ्याजवळ चार हजार सहाशे आहेत. तुझे किती झाले. 😊
मेघा : पाच हजार शंभर....!😊
अंजली : म्हणजे... टोटल नऊ हजार सातशे. 😊
मेघा : अरे... खुप झाले. एवढ्यात दोघांचा पण खर्च भागेल. आणि उरतील पण...😋 कधी साठवले एवढे पैसे....?,🤔
अंजली : अंग...! खुप वर्ष झालीत. बर्थ डे ला मिळालेले , कोणी कोणी दिलेले, आणि पॉकेट मनी मधुन उरलेले ...😊
मेघा : ग्रेट....😊 मला आधी माहित असतं तर मीच गायब केली असती. 😋
अंजली : बरं ते जाऊ दे....! तु हे पैसे घेऊन जा, आणि तुझ्याजवळ ठेव. आणि प्रेमला याबद्दल काही सांगु नको. 😊
मेघा : हाय मेरी जान...! किती प्रेम....🥰
अंजली : काय बोलतेय मी...! कळलं ना...?😊
मेघा : हो... हो... कळलं...! 😊
अंजली : आणि जर त्याने विचारलं तर सांग, आपण सर्वांनी मिळुन खर्च करतोय म्हणुन. आहे हे सिद ला पण सांग. 
मेघा : बरं ओके.... डन👍🏻😊 आता मी निघते. तु पाच वाजता निघ. 😊
अंजली : हो...! येते....😊
* असं बोलुन मेघा ते पैसे घेऊन तिच्या घरी निघुन जाते. पैशाचे टेन्शन कमी झाले होते पण आता अंजली समोर दुसरा प्रश्न हा होता की, मॉम ला हे सर्व कसं सांगायचं. शेवटी ती मॉम सोबत बोलायला किचन मधे जाते.
मॉम : मेघा गेली का...? एवढा वेळ काय डिस्कस करत होते. दुबई प्लॅनिंग आत्तापासूनच...😊
अंजली : हो...! त्याबद्दलच बोलत होतो. 😊
मॉम : एवढा वेळ....?🤔
अंजली : हो...! मॉम एक गोष्ट बोलू तुला...? 
मॉम : बोल ना बाळा, काही अडचण आहे का..?
अंजली : अडचण वगैरे असं काही नाही, पण... तुला एक विचारायचं होतं. 😔
मॉम : काय...! बोल ना मग...! त्यात काय एवढा विचार करतेय. 🙂
अंजली : मॉम...! आम्ही असा विचार करत होतो की, प्रेमला पण सोबत घेऊन जायचं. म्हणजे तो यायला तयार असेल तर...🙂
मॉम : काय....? हे कधी ठरलं...? 🤔
अंजली : मॉम...! अजुन काही ठरलं वगैरे नाही, ना अजुन त्याला याबद्दल काही बोललोय. आम्ही फक्त हा विचार करत होतो. थोडी रिस्क आहे. पण तुला काय वाटतं....? 🤔
मॉम : अंजु बेटा....! आपण त्याला गोव्याला घेऊन गेलो तिथपर्यंत सर्व ठिक आहे. कारण त्याबद्दल डॅड ना कोणी काही सांगणार नव्हतं. पण इथे मला थोडं अवघड वाटतंय. आणि मुळात तो तयार होईल असं मला तरी वाटत नाही.
अंजली : हो... ना...! मी पण तिला हेच समजावत होते, पण ऐकेल ती मेघा कसली. 
मॉम : अच्छा...! म्हणजे एवढा वेळ हे डिस्कशन चालु होतं तर...! 🙂
अंजली : हो...ना...! मी बोलले तिला, नको त्याला सांगायला , पण ऐकतच नाही. 😔
मॉम : अंजु...! तुला माहित आहे सर्व, मग उगाच त्याला प्रेशराईज करू नका. तो स्वतःहून जर तयार झाला तर मग पुढे विचार करू या गोष्टीचा. 
अंजली : ओके...! 🙂
मॉम : अजुन एक गोष्ट, तिकडे जायचं म्हणजे खर्च पण खुप आहे. कसं मॅनेज करेल तो...? हा पण विचार करा ना...? तुमचं ठिक आहे. घरून पैसे मिळतील तुम्हाला. पण तो काय करेल...?
अंजली : त्याची सोय झालीय....!😊
मॉम : म्हणजे...?🤔
अंजली : सॉरी... मॉम, पण मी माझी पिगी बँक ओपन केली. 😔
मॉम : अच्छा....? मग तेवढे पैसे पुरतील...? किती जमा झालेत त्यामधे.... दोन तीन हजार...?😊
अंजली : नऊ हजार सातशे रुपये....! 😋
मॉम : काय बोलतेय....? एवढे कधी जमवले ? 🤔😊
अंजली : जमले असेच... गिफ्ट आणि पॉकेट मनी मधुन.😊
मॉम : अच्छा...! तरीच म्हटलं हिचे पैसे जातायत कुठे....?🙂
अंजली : मग... साठवले मी तेवढे...! 😊
मॉम : बरं ते ठिक आहे, पण तो तयार होईल या गोष्टीला, की त्याचा खर्च तु करणार आहेस. मला तरी तसं वाटत नाही. 
अंजली : पण आम्ही त्याला हे सांगणारच नाही आहोत. 
मॉम : म्हणजे नक्की काय...? 🤔
अंजली : सर्वजण मिळुन खर्च करतोय असं सांगायचं ठरलंय आमचं. 🙂
मॉम : वा...! छान आयडिया आहे तुमची. 👌🏻😊
अंजली : पण मॉम तुला काही प्रोब्लेम नाही ना, तो येणार असेल तर...?😔
मॉम : प्रोब्लेम तसा काही नाही, पण तिकडे तिची बहीण आणि तिचा नवरा, हे लोक कोणाला काही बोलले तर...?
अंजली : त्यांच्याशी हे सर्व बोललीय ती, आणि त्यांना काही प्रोब्लेम नाही. ते लोक स्वतःहून बोलले. घेऊन ये त्याला पण सोबत म्हणुन.
मॉम : म्हणजे तिच्या दिदी आणि जीजुला सांगितलं तिने तुमच्याबद्दल सर्व....?🤔
अंजली : हो... ना...! मला पण माहित नव्हतं. पण तिने प्रॉमिस केलंय की, ते लोक कोणालाही याबद्दल बोलणार नाहीत.
मॉम : हे भगवान...! एवढं सर्व झालंय तर. 🤨
अंजली : हा...! 😔
मॉम : बरं ओके, आपण आधीच पुढचा विचार नको करायला. तुम्ही आधी त्याला विचारा. तो जर तयार झाला तर मग पुढे विचार करू यावर...,🙂
अंजली : ओके... मॉम...! आणि थँक्यू वेरी मच. आय लव यू....! माय स्वीट मम्मा....!😘
मॉम : लव यू टू...! मेरा बच्चा. 😘 बरं कधी विचारणार आहात त्याला...? 🙂
अंजली : आजच... संध्याकाळी भेटणार आहोत आम्ही सर्वजण. 😊
मॉम : बरं.... ठिक आहे. काय बोलतोय ते कळव मला लगेच.,🙂
अंजली : हो... मॉम...! 😊
* असं बोलुन ती मॉमला प्रेमाने एक मिठी मारते. त्यांच्या गालावर एक किस करून आपल्या रूम मधे येते. 
 संध्याकाळी पाच वाजता तिला मेघाचा कॉल येतो.
मेघा : हाय मेरी जान...! झाली का तयारी...?😊
अंजली : मी तयारच आहे, तुझीच वाट बघतेय. कुठे आहेस तु...? आलीय का...खाली.? येऊ मी...?
मेघा : हाय....! किती ती उत्सुकता, प्रियकराला भेटण्याची....!🥰
अंजली : झालं तुझं...? 😏 कुठे आहेस ते सांग आधी...! 
मेघा : मी सध्या बाहेर आलीय, तु एक काम कर, तु आत्ता निघ, आणि प्रेमला त्याच्या ऑफिस च्या इथून घेऊन तलावाजवळ ये. आपण तिथेच भेटू.
अंजली : बरं..! ठिक आहे. सिद कुठे आहे पण...? त्याला बोलली ना तु हे सर्व...? 
मेघा : तो सध्या माझा ड्रायव्हर आहे. आणि मी बोलले य सर्व. कळलं...! आता सर्व कॉल वरच बोलणार आहात का...? निघा आता...! 😊
अंजली : हो... निघतेय...,!😊
* स्कुटीची चावी घेऊन ती मॉम ला सांगुन घरातून निघते. आणि प्रेमच्या ऑफिसच्या इथे येऊन त्याची वाट बघत असते. थोडा वेळ वाट बघुन ती टाईम बघते. साडे पाच होऊन गेलेले असतात. मग ती प्रेमला कॉल लावते. प्रेम कॉल रिसिव्ह करतो.
प्रेम : हाय...! कुठे आहेस....?😊
अंजली : मी.... तुझ्या ऑफिस च्या बाहेर....!😊
प्रेम : काय...! तु कशी काय आली अचानक...?
अंजली : का... ! नाही येऊ शकत का मी...?,😊
प्रेम : अरे म्हणजे तसं नाही,...!😊
अंजली : मग कसं बरं....?😊
प्रेम : अरे...! मेघा भेटणार होती मला. ती पण आहे ना तुझ्यासोबत...?🙂
अंजली : तिनेच पाठवलंय मला...! तु.. ये ना लवकर. मी त्या हॉटेल जवळ उभी आहे.
प्रेम : बरं ओके... आलोच मी पाच मिनिटात.😊
* सर्व आवरून तो ऑफिस मधून बाहेर पडतो. लांबुनच त्याला स्कुटी घेऊन उभी असलेली अंजली दिसते. तो तिच्याजवळ पोचतो.
अंजली : हाय.....! 🥰
प्रेम : काय चाललंय तुमचं...? 🤔😊
अंजली : कुठे काय...!😊
प्रेम : अच्छा....! मग मेघा कुठे आहे...? 
अंजली : बस गाडीवर, मग सांगते...,😊
प्रेम : कुठे जायचं आहे....? 🤔
अंजली : तु बस तरी आधी... नाहीतर तुच चालव गाडी. मी मागे बसते. 🥰
* प्रेम स्कुटी चालु करतो, अंजली त्याला पकडुन मागे बसते. अंजली त्याला कुठे जायचं ते सांगते, त्याप्रमाणे ते लोक एका हॉटेल जवळ पोचतात. सिद ची बाईक बाहेर लागलेली असते. त्याच्या बाजुला स्कुटी पार्क करून ते दोघे आत जातात. तिथे मेघा आणि सिद बसलेले असतात. या दोघांना पाहून मेघा बोलते.
मेघा : वेलकम...! स्वीट कपल...🥰
प्रेम : बरं...! आता तरी सांगाल मला काय झालंय ते...? का असा अचानक भेटण्याचा प्लॅन केलाय...?🤔
मेघा : अरे...! एवढं काय टेन्शन घेतो. बसा आधी शांत. सांगते सर्व. 😊
* दोघेही खुर्ची सरकवून त्यांच्यासोबत बसतात.
प्रेम : हा...! बोल आता काय झालय...? आणि ही डॉक्युमेंट, पासपोर्ट... काही कळेना....🤔
मेघा : ते सांगते मी, पण तुम्ही काय खाणार आहात, आधी ऑर्डर करा, मला तर खुप भुक लागली आहे. तुमची वाट बघत बसलोय आम्ही कधीपासून. 😊
अंजली : ओ हो...! माहित आहे, खाऊन तर झालं असेल तुझं...! 😏
मेघा : ओ... मेरी जान...! खरच काही नाही मागवलं अजुन, आम्ही पण आत्ताच आलोय, पाच मिनिट पण झाले नाहीत. हो ना सिद...?
सिद : अरे... हो...! आत्ताच आलोय आम्ही. 😊
अंजली : बरं ओके...! काय खाणार आहात ते ऑर्डर तरी कर मग...!😊
* सर्व मिळुन पावभाजी ऑर्डर करतात. आणि पुढे गप्पांना सुरुवात होते.
प्रेम : बरं आता तरी मला कळेल का, आपण असे अचानक का भेटलोय ते...?
मेघा : अरे हो...! तु तुझे डॉक्युमेंट आणि फोटो आणलेस ना...?
* प्रेम त्याच्या बॅग मधुन त्याचे डॉक्युमेंट काढून तिला देत बोलतो.
प्रेम : हो...! हे घे....! पण मला खरच गरज नव्हती पासपोर्ट ची. तु... का उगाच करतेय हे सर्व...?🤔
मेघा : अरे त्याचं काय आहे ना...! आम्ही असं ठरवलं आहे की, अंजुचे डॅड तर तुमच्या लग्नाला तयार होणार नाहीत. मग तुमचे लग्न लाऊन तुम्हाला बाहेर परदेशात पाठवायच. 😋
चालेल ना तुला....? 😊
अंजली : ओय...! काय मस्करी चालु आहे तुझी...! जे बोलायला आलोय ते बोल. फालतू बडबड करतेय. 😏
मेघा : अरे...! मी त्याला विचारतेय ना...! तु का मधे बोलतेय. आली लगेच मधे....!😏
सिद : तुम्ही भांडायला आलात का इथे...? महत्वाचं काय आहे...? ते बोलुया...! 😊
अंजली : मग...! तेच बोलतेय ना मी...! हिच काही भलतच चालु आहे. 😊
मेघा : बरं...! सॉरी...!🙏🏻 आता सिरियस पॉइंट वर बोलुयात. 😊
सिद : हा...! सांग मग आता तुच त्याला सर्व...!
मेघा : ओके...! तर... प्रेम... आपण भेटण्याचं कारण हे आहे की, तुझं खरच खुप प्रेम आहे ना अंजुवर....? 🙂
अंजली : हा काय प्रश्न आहे...! असं का विचारतेय त्याला...? 🤔
मेघा : तु परत बोलली...? मी बोलतेय ना आता, तु आधी शांत बस बघू....🤫
प्रेम : अरे... पण...! असं का विचारतेय तु...? 
मेघा : मला फक्त उत्तर दे....! हो की नाही...?
प्रेम : अफकोस हो....!
मेघा : मग तिच्यासाठी काही करावं लागलं तर करशील...? 
प्रेम : म्हणजे....? नक्की काय....? 🤔
मेघा : म्हणजे तिची एक इच्छा आहे, पण ती तुला बोलू शकत नाही, त्यामुळे मी विचारतेय असं समज. 
* प्रेम अंजलीकडे पाहतो, तसे ती मान खाली घालून गप्प बसते.
प्रेम : अरे पण काय ते तरी कळेल का...? 🤔
मेघा : एवढं टेन्शन घेऊ नको. तु फक्त सांग की, तु करू शकतो का तिच्यासाठी काहीही...?
प्रेम : मेघा...! माझं अंजुवर खुप प्रेम आहे हे वेगळं सांगायला नको तुम्हाला, पण तरीही सांगतो, माझ्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं तिच्यासाठी काहीही करू शकतो.
* एवढा वेळ मान खाली घालून बसलेली अंजली मान वरती करून त्याच्याकडे पहात राहते. तोही तिच्याकडे पहात राहतो. हे पाहून मेघा मधेच बोलते.
मेघा : बस्...! मला हेच अपेक्षित होतं तुझ्याकडून. झालं तर मग... प्लॅन फिक्स...!😊
प्रेम : अरे हो...! काय...! कसला प्लॅन...? आता तरी नीट सांगशील का....? 
मेघा : बरं...सांगते...! आम्ही सर्वजण मिळुन पुढच्या महिन्यात बाहेर म्हणजे माझ्या दिदी कडे जायचा प्लॅन केला आहे. आणि आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे की, तु पण आमच्यासोबत यावं. बस् एवढच...!😋 
प्रेम : ठिक आहे ना...! येईन मी...! त्यात काय एवढं...!😊
* मेघा खुर्चीवरून ऊठुन त्याला जाऊन मिठी मारत बोलते. 
मेघा : बस् भावा...! माझी इज्जत ठेवलीस. 😊
प्रेम : त्यासाठी एवढं सर्व करायची काय गरज होती. मला असच विचारलं असतं तरी मी होकार दिला असता. 😊
सिद : थांब...! पुढे ऐक...! आपण बाहेर म्हणजे दुबईला चाललोय. 😊
प्रेम : काय...! 🤨
सिद : होय...! म्हणुन म्हटलं नीट ऐकुन घे आधी. 😊
प्रेम : पण कसं शक्य आहे ते, पासपोर्ट वगैरे. ?
मेघा : तु त्याचं टेन्शन नको घेऊ, मी आहे ना...! त्याची जिम्मेदारी माझी. तु तयार आहेस ना यायला मग बस्....!😊
प्रेम : पण...! असं अचानक कसं जमेल...? आणि साधारण खर्च वगैरे किती येईल...?
मेघा : काही जास्त खर्च नाही, तु कशाला एवढं टेन्शन घेतोय. चिल्ल ब्रो...!😋
प्रेम : तरीही सांग ना मला...! असं अचानक ठरलय आपलं, मग मला पण थोडं मॅनेज करायला लागेल ना...!
मेघा : हे बघ प्रेम...! तु आमच्यासोबत यायला हवा ही आमची इच्छा आहे. त्यामुळे त्यासाठी होणारा खर्च आम्ही मिळुन करणार आहोत, तुला पॉसिबल होईल तेवढे पैसे घे तु सोबत. आणि आता जर तु काही इमोशनल ड्रामा केला ना, तर बघच मी काय करेन ते. 😠
प्रेम : अरे... हो...! ते सर्व ठिक आहे, पण सांग तरी आपण का चाललोय ते...?
मेघा : बरं ऐक, माझे जीजु आणि दिदी, ते दोघे मिळुन तिथे एक नवीन ज्वेलरी शॉप ओपन करत आहेत. त्याच्या ओपनिंग साठी त्यांनी आपल्याला बोलवलं आहे. 
* ते लोक बोलत असतात तेवढ्यात पावभाजी घेऊन वेटर येतो. सर्वजण बोलत बोलत ती खाऊन झाल्यावर कॉफी ऑर्डर करतात. वेटर लगेच कॉफी पण घेऊन येतो. 
कॉफी पीत पीत पुढील गप्पा चालु होतात. अर्थातच अंजली मनोमन खुप खुश झालेली असते, कारण प्रेम यायला तयार झालेला असतो. थोडा वेळ गप्पा मारून झाल्यावर ते लोक तिथून घरी जायला निघतात.
अंजली स्कुटी स्टार्ट करते. प्रेम तिच्या मागे बसलेला असतो. मेघा सिद च्या बाईक वर बसून ते सर्वजण सोबतच निघतात. 
वाटेत प्रेमला सोडायचं होतं, त्याच्या घराजवळ ते पोचतात. प्रेम स्कुटी वरून खाली उतरतो. आणि सर्वांना बाय करून घरी जातो.
एवढ्या वेळात अंजली त्याच्याशी काहीच बोलली नव्हती. प्रेम पण तिला काही बोलला नव्हता. 
घरी येताच प्रेम मोबाईल वर आलेला एसएमएस वाचतो. आणि गालात हसतो. 😊
" थॅन्क्स प्रेम...! मी आज खुप खुश आहे. 🥰
आय लव यू... माय जानु...😘 "

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️