स्मशानाची राख पावसाळा सुरु झाला होता.आता पाऊसही फार कोसळत होत्या.नदीनाल्यांना फार पूर होता.नदीचं पाणी ओसंडून वाहात होते.पूराचं पाणी गावात पसरल्यानं अख्ख गाव वाह्यलं होतं.याच गावातील लोकांना ज्या गावातील नदी मदत करीत होती.ती नदी अक्राळविक्राळ रुप धारण करुन आज गावाची परीक्षा पाहात होती.काही लोकं वाहात होते तर काहींचं धान्य ही वाहून गेलं होतं.सुजयनं या पुरात आपला जीव धोक्यात घालून काही लोकांना वाचवले होते तर काहींना धान्य घेण्यासाठी सोने देवून त्यांना जगवले होते.जणू त्याने या परीस्थितीत गावावर उपकारच केले होते. सुजय गावातील एक तरुण होता.तो बारावी शिकलेला होता.पण गावात रोजगार नसल्यानं पिढीजात व्यवसाय म्हणून त्याने आपल्याच बापाचा हा स्मशानाची राख छानायचा धंदा स्विकारला होता.त्याचा विवाह झाला होता.त्याला दोन पोरी होत्या.तसे गावात कामधंदे नसल्यानं या नदीवर येणा-या प्रेताच्या राखेला छानून त्यात मिळालेले सोने विकून वा मिळालेले पैसे खर्च करुन सुजय आपलं पोट भरीत होता.राखेत मिळालेले एक एकचे शिक्के घासून तसेच काळपट पडलेली चांदी किंवा सोने घासून पाहून ते सोनाराच्या दुकानात नेवून देवून सुजय आपली उपजीविका चालवत असे.मिळालेले शिक्के काळपट का असेना त्या शिक्क्याने आजपर्यंत तेल मीठ आणून त्याने आपले आजपर्यंत पोट भागवले होते. कितीही ऊन,पाऊस वा थंडी का असेना सुजयचं त्यावरच जीवन असल्यानं सुजयला ते काम करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते.त्याचा बा याच धंद्यावर काम करतांना मरुन देखील सुजयचे डोळे उघडले नव्हते.नव्हे तर तो तरी काय करणार होता.दुसरे कसबच त्याच्या अंगी नसल्यानं तो मजबूरीनं ते काम करीतच होता. भर पावसाचे दिवस सुरु होते.पण याही पावसाळ्यात त्याने आपले काम बंद केले नव्हते.दररोज तो नित्यनेमाने उठून जीवावर उदार होऊन नदीवर जायचा व राख छानून त्यातून मिळकत मिळवायचा व आपला उदरनिर्वाह करायचा.कारण तो त्याचा पिढीजात व्यवसाय होता. दोन वर्षापुर्वी त्याचा बाप असेच सोने मिळवीत असतांना पुराच्या पाण्यात वाहून गेला होता.हे माहीत असतांनाही जोखीम उचलत अगदी पुराच्या पाण्यात घुसून तो ती स्मशानी राख छानायचा. नोटबंदी झाली होती.सरकारनं फतवा काढला होता.नोटबंदीनुसार पाचशे हजार रुपयाच्या नोटा बंद झाल्या होत्या.सरकारचा लोकांना धाक बसला होता.सरकारनं पाचशे,हजार रुपयाच्या नोटा जशा न सांगता बंद केल्या,तसं कदाचित सरकार चिल्लरही एखाद्या वेळी बंद करेल असे लोकांना वाटत होते.म्हणून त्यांनी चिल्लर घेणे बंद केले होते.पाच किंवा दहा रुपयाचे तेवढे शिक्के तेही दोन चार तेवढे चालत होते.बाकी शिक्के मात्र दुकानदारही घेत नव्हते. लोकंही मोठे हुशार होते.ते प्रेत पेटवितांना न चालणारे पाच किंवा दहाचे शिक्के टाकत नव्हते तर एक एकचे शिक्के टाकत होते.एखाद्या वेळी चुकीनं दोनचे शिक्के टाकत होते.मात्र या स्मशानी राखेत पाचचे शिक्के क्वचितच सापडत. नोटबंदीची लागन चिल्लरलाही झाली होती.एक दोनचे शिक्के कसेतरी चालत.पण काळे शिक्के लोकांनी चालवणे बंद केले होते.कोणताच दुकानदार काळे शिक्के घ्यायला धजत नव्हता.सरकारने काळे शिक्के चालवणे बंद केले नव्हते,तरीही तो लोकांचा निर्णय होता.आता मात्र सुजयसमोर पेच निर्माण झाला होता.काय करायचं कसं जगायचं असं सुजयला वाटू लागलं होतं.त्यानं स्मशानी राख छानून मिळविलेले शिक्के कितीही घासले तरी त्याचा काळपटपणा जात नव्हता.आता मात्र कसेतरी सोने चांदी विकून सुजय आपली उपजीविका चालवायचा.पण आता सोनारही नखरे करायला लागला होता.आधीपासूनच तो सुजयवर अत्याचारच करायचा.जेवढे ग्राम सोने तेवढे पैसे बाजारभाव मुल्याने न देता अत्यंत कमी पैसे देवून तोही त्याला लुबाडायचा.आता मात्र तो सुजयला नोटा न देता एक एकचे शिक्के देवू लागला होता.जास्तचा भावही खावू लागला होता.त्यामुळंच सुजयच्या परीवाराची उपासमार होवू लागली होती.घरी खायलाही धान्य नसायचं. एकवेळ अशी होती की सुजयच्या बाच्या काळात त्यांचा राखेतील सोने चांदी गोळा करण्याचा धंदा जोरात चालायला.लोक मेलेल्या माणसाला जाळतांना खूप सारं सोनं चांदी त्याच्या प्रेतावर ठेवायची.तसेच शिक्केही टाकत असत.ज्यावेळी सावकारी पद्धती होती.आता सावकारी पद्धत बदलली होती. काळंही बदलला होता.सोने नाणे व चांदीला मुल्य आलं होतं.महागाईने चरणसीमा गाठली होती.लोकसंख्येची वाढ झाली होती.त्यामुळं प्रत्येकजण आपला पैसा जपून वापरत असत.मेलेला माणूस काय पैसे सोबत नेतो काय? असे स्वतःच वाटून घेवून ही मंडळी त्या प्रेताला जाळतांना पैसे वा सोने नाणे टाकत नसत.त्यामुळं साहजिकच सुजयला कमी पैसे वा सोने सापडायचे.त्यातच सोनाराचे तुणतुणे, उपासमार होणार नाही तर काय? सुजयने गावात लोकांना पुराचे वेळी भरपूर मदत केली होती.जेव्हा लोकांच्या घरात पावसाचं पाणी शिरत असे,धान्यही भिजून जात असे.पुरात जवळचं सगळी मालमत्ता वाहून जात असे.तेव्हा हाच सुजय जवळचे सोने देवून वा पैसे देवून त्यांच्या जगण्यात हिंमत भरत असे.नव्हे तर एखाद्या पुरात वाहात जाणा-या माणसालाही वाचवत असे.असे कितीतरी जीव त्याने वाचवले होते.पण आज परीस्थिती त्याचेवर होती. सुजयच्या घरी उपासमार होत होती.ज्या गावाला त्याने मदत केली होती.तेच गाव आज सुजयला मदत करीत नव्हतं.काय करावे सुचेनासे झाले होते. सुजयनं सरकारला चिठ्ठ्या लिहिल्या होत्या.त्यात नोटबंदीची कशी चिल्लरलाही लागन झाली याचं विचारपूर्वक विवेचन होतं.तो चिठ्ठ्या पाठवू पाठवू थकून गेला होता पण त्या चिठ्ठ्यावर प्रतिउत्तर मात्र कधीच आलं नव्हतं.त्या चिठ्ठ्यांपैकी एका चिठ्ठीत त्याने सरकारी मदतही मागीतली होती.नेमकी उपासमार कशामुळे होत आहे याचाही उल्लेख केला होता.दिवसेंदिवस सुजय तसेच त्यांच्या परीवाराची हालत खस्ता होत होती.अशातच सुजयनं निश्चय केला.आपण मरायचं.पण पुन्हा विचार आला परीवाराचं काय?आपण मेल्यानंतर परीवार कसा जगेल?विचाराचा अवकाश त्याने तो विचार पत्नीला बोलून दाखवला.पत्नीलाही तो विचार पटला व तिही त्याच्यासोबत मरायला तयार झाली.पण तिच्याही मेंदूत तोच विचार पोरांचं काय?तिनं शाळेत ज्ञानेश्वर वाचला होता.बाप माय मेल्यानंतर मुलांचे काय हाल होतात तेही वाचले होते. आपण प्रसंगी मरुही पण पोरांना कसं मारायचं.ते तर पापच.खुनाचं पाप.त्या पोरांना तर जीवन म्हणजे काय हे साधं माहीत नाही.त्या पोरांना जीवन कळायच्या आधीच मारायचं.नाही आपणही जगायचं आपल्यासाठी नाही तर लेकरांसाठी.तिनं विचार बदलला होता. तशी ती सुजयला म्हणाली, "तुमाले मराचं आसन तं मरा धनी.पण मी मरणार नाय." "पण आपुन कसं जगायचं?" "जगू उकिरड्यावानी." "अवं पण......." "अवं गीवं काय नाय.आपल्यासाठी नाय पण पोरायसाठी जगायचं.मी बी मेयनत करीन तुमच्यासंगं." पत्नीनं धीर दिला खरा.पण सुजयला काही ती गोष्ट पटली नाही.तो सतत विचारी राहू लागला.काय करावे सुचत नव्हते.अशातच एक दिवस पत्नी व पोरं घरी नसतांना त्याने घरी गळफास लावला. सुजयनं गळफास लावला होता.त्याच दिवशी सरकारी मदत घरी आली होती.पोस्टमेननं पत्र पत्नीच्या हातात दिलं होतं.त्या पत्राच्या आत एक चेक होता व एक पत्रही होतं.त्यात लिहिलं होतं, "आम्हाला तुमचा विचार पटलाय.आमचं सरकार चुकलं.असं आम्ही करायला नको होतं.पण काय करणार,देशात घुसखोरी माजली होती.ती दूर करण्यासाठी आम्हाला असे पाऊल उचलावे लागले.नोटबंदी करावी लागली.पण आम्हाला माहीत नव्हतं की यामुळं कोणाचा परीवार दुखावला जाईल.याची लागन चिल्लरलाही होईल.आपल्यामुळं आमचे डोळे उघडले व कळलं की खरंच नोटबंदीने लोकांचे खूप नुकसान झाले आहे खरे चोर तर सापडलेच नाही.पण चांगली माणसं जाळ्यात सापडली.पण आता असे होणार नाही.पण एक कळवितो आम्ही की तुमचे आमच्यामुळे नकळत जे नुकसान झाले,त्याची नुकसान भरपाई म्हणून हा चेक पाठवित आहो.आपण तो स्विकार करावा व आम्हाला मोठ्या मनानं माफ करावं." सुजयच्या पत्नीच्या हातात पत्र होतं.डोळ्यातून झरझरा अश्रू वाहात होते.क्षणात तिचं लक्ष चेककडे गेलं आणि तद् वतच त्या प्रेताकडे.सुजयने जाता जाता आपल्या परीवाराचा फायदा केला होता.पण त्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी तो या जगात नव्हता. शुभदा कामाला जात होती.काबाडकष्ट करीत होती.लेकरांना शिकवीत होती.तिला लेकरांचे भविष्य बनवायचे होते.पिढीजात व्यवसाय मोडायचा होता.जो व्यवसाय माणसाच्या मृत्यूचे कारण बनते असा व्यवसाय सोडून चांगल्या उमेदीचा व्यवसाय करण्याकडे तिचा कल होता.तेच शिक्षण ती पोरांना शिकवीत होती.सुजयची आठवण मनात ठेवून......... अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०©®©