कदाचीत व्हॅलेंटाइन दिवसाला हद्दपार करावं लागेल प्रेम...... अगदी दोनचार दिवसानंतर प्रेमाचा दिवस येणार आहे. ज्याला व्हॅलेंटाइन दिवस म्हणतात. तसं पाहिल्यास आठ तारखेपासूनच प्रेमाचा आठवडा साजरा करण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यातच हे दिवसं चॉकलेट डे, किक डे, किस डे, रोज डे, प्रपोज डे अशा साऱ्याच नावाने साजरे करण्याची प्रक्रिया विदेशात होती. आता ते लोण भारतात आले आहे व पसरले आहे. आता व्हॅलेंटाइन दिवसाचा हा सप्ताह अगदी दिवाळी दसऱ्यासारखाच भारतातही साजरा होतांना दिसतो. व्हॅलेंटाइन दिवसाचा खरा अर्थ जरी वेगळा असेल तरी त्याचा मुळात भारतात तरी अर्थ प्रेम असाच घेतला जातो. शिवाय हा दिवस आला की लोकं अगदी वेडे होवून जातात व स्वतःचं आयुष्य, वय विसरुन प्रेमाच्या मागं धावत असतात. ते अगदी म्हातारे झाले असले तरी. त्यानंतर ते आपला हशा करुन घेतात. ते असे चाळे करतात की साहजिकच काही लोकं त्यांना पाहून त्याला म्हातारचाळ लागली की काय, असेच बोलत असतात. काही लोकं प्रेमाला नावबोटं ठेवतात. ते स्वतः तर चांगले वागत नाहीत. परंतु इतरांना सल्ला नक्कीच देत असतात. म्हणतात की अमूक असा वागतो. असा वागायला हवा. तमूक तसा वागतो. तसा वागायला नको. त्यामुळंच त्यांच्याबद्दल नक्कीच म्हणता येईल की शेंबूड माझ्या नाकाला व मी सांगतोय लोकांला. वागणे वा प्रेम करणे. प्रेमाची आवश्यकता ही म्हातारपणापर्यंत असते. अगदी मरतानाही प्रेम हवंच असते. प्रेम जर नसेल आयुष्यात तर व्यक्ती तीळ तीळ मरत असतो. प्रेम ही कधीही न संपणारी आंतरक्रिया आहे. परंतु प्रत्येक वयातील प्रेम हे वेगवेगळं असायला हवं आणि असूही शकते. मात्र काही लोकं आजही आपलं प्रेम करतांना आपलं वय लक्षात घेत नाहीत. ते आपले वागणे जणू आपण बालवयातील माणसांच्या वागण्यासारखे ठेवतात. साहजिकच त्यांना बालवेडे अशी उपमा मिळते. उदाहरण द्यायचं झाल्यास एका शाळेचं उदाहरण देतो. काल आम्ही जेव्हा शिकलो. त्यावेळेस अगदी दहावीला असतांनाही आमच्या वर्गातील मुलींना बहिणी मानायचे. त्यातच बहिणींचं जसं रक्षण करतो. तसंच तिचंही रक्षण करीत होतो. त्यानंतर शेजारच्या वर्गातील मुलांने त्यांना काही म्हटलं तर आम्ही त्याच्याशी भांडण करुन त्याला धडा शिकवत असू. त्याच अनुषंगानेच एका शाळेतील तो दहावीचा वर्ग. आज त्यांना दहावा वर्ग सोडून तीस बत्तीस वर्ष झाले होते. त्या कार्यक्रमात मी आवर्जून उपस्थिती लावली. तो दहावीचा वर्ग व ते विद्यार्थी गेट टू गेदर साजरा करणार होते. ज्याला तब्बल तीस वर्षाचा काळ लोटला होता. परंतु आज ते एकत्र आल्यानं त्यांचं बहिण भावाचं प्रेम उचंबळून आलं होतं. प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. तसा तो दिवस प्रेमदिवस सुरु होण्याचाच दिवस होता. तरीही कुणामध्येच कोणत्याही स्वरुपाचं आजच्या तरुणपणातील वासनामय प्रेम आजही दिसलं नाही. हे पाहून मला गतकाळात जाता आलं आणि विचार करता आला की आम्ही दहावीत कसे वागत असू. आज मात्र तसं नाही. आज आम्ही दररोज शाळेत शिकतो. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. त्यानुसार एकाच वर्गात असलेली मुलं ही आपली साहजीकच भाऊबहिण असायला हवी. त्यांच्यात प्रेम निर्माण व्हायला हवं, ते भाऊ आणि बहिण म्हणून. मग व्हॅलेंटाइन दिवस येवो की आणखी कोणताही दिवस. आकर्षण निर्माणच होवूच नये. शारिरीक आकर्षण तर अजिबातच नाही. परंतु आजची मुलं एकाच वर्गातील असली तरी त्यांच्यात प्रेम हे एक भाऊ आणि बहिण म्हणून निर्माण होत नाही तर ते प्रेम निर्माण होतं एक प्रेमवीर म्हणून. वर्गातील मुलगी त्याला आवडायला लागते. तोही तिला आवडायला लागतो. मग इशाऱ्यावर इशारे सुरु होतात. त्यातच ते प्रेम एवढं वाढतं की त्यांना कळत नाही की मी किती मोठा आहे व मी किती लहान आहे. संसार पेलवू शकतो का? त्या वर्गातील मुलांना ते माहीत नसतं. एकदा संसारात पडल्यावर काय होणार याची कल्पना नसते. ती मुलगी त्या मुलाला एवढी आवडत असते की अगदी त्याला तिच्याशिवाय राहाणं अवघड असतं. अशा परिस्थितीत शारिरीक आकर्षणानं ते जवळ तर येतात. त्यांच्यात शारिरीक संबंध घडतात. ज्याचा परिणाम गर्भधारणेवर होतो. त्यातच गर्भधारण झाल्यानंतर काही दिवस जातात. अशी वेळ जात असते व त्यांच्यात शारिरीक आकर्षणाने जे घडतं, ते विदारक स्वरुपाचं असतं आणि त्याला खतपाणी घालतं व्हॅलेंटाइन डे नावाचा दिवस. हा दिवस त्यांच्यातील उत्तेजीत प्रेम आणखी वाढवत असतो. व्हॅलेंटाइन डे नावाचा दिवस. ज्यातून प्रेम नावाचा शब्द तयार होतो व त्या शब्दातून पुढे शारिरीक आकर्षण व गर्भधारणा. त्यानंतर त्याचं वय,नसतांना गर्भधारणा झालीच तर ती त्याचेकडे जाते. सांगते की माझ्या गर्भात तुझंच बाळ आहे. तू माझ्याशी विवाह कर. त्यावर तो नकार देतो. ज्यातून आत्महत्या घडतात. काही वेळेस तो तयार होतो विवाह करायला.परंतु जात आडवी येते. ती जात एवढी आडवी येते की ते पळून विवाह करतात. अन् पळून जावून जरी त्यांनी विवाह केला तरी जातीचे गुंड त्यांना शोधत असतात. आपली जात बदनाम होवू नये म्हणून. त्यानंतर ते जिथे कुठे सापडले, तर त्यावेळेस त्यांना समाप्त करण्याचं काम हेच आमचे जातगुंड करीत असतात किंवा निदान वाळीत तरी टाकत असतात. व्हॅलेंटाइन डे येणं व तो साजरा करणं या क्रियेला कोणी रोखू शकत नाही. कारण आज काळ बदलला आहे व या बदलत्या काळानुसार तरुणपणाही बदलला आहे. आजच्या मुलांना कालच्या वर्गातील प्रेमाचा संदर्भ आमच्याही काळात कसा होता आम्ही कसे एकमेकांना भाऊबहिण मानत होतो. हे काही सांगता येत नाही. शेवटी दोन चार संपर्कातील मुलं समजतात. बाकी सर्व सोडून देतात चांगल्या गोष्टी. ज्या प्रेमाच्या विकृतीपणावर फुंकर घालू शकतील. आज जात महत्वाची आहे व ही जात असे व्हॅलेंटाइन दिवसाचे प्रेम स्विकारु शकत नाही. आज जातीनंच बदलत्या काळानुसार सातत्यानं प्रयत्न चालवायला हवा. त्यातच प्रेमाबद्दलचं शिक्षण प्रत्येक जातीत द्यायला हवं की जी मुलं शाळा तर शिकतील. परंतु प्रेम करणार नाहीत. जरी व्हॅलेंटाइन दिवस दरवर्षी येत असला तरी. कारण असं केल्यानं कुठंतरी जातीतील संस्कार नष्ट होत असतात. काल त्या दहावीत असणारी सर्व मुलं मुली एकत्र आली व ठरवलं की आपण गेट टू गेदर घेवू. मग ठरलं, तो क्षण साजरा करायचा. गेट टू गेदर करायचं. गेट टू गेदर झालं व ज्या दिवशी गेट टू गेदर झालं. त्याच दिवशी माहीत पडलं की मुलांमध्ये दहावीचं प्रेम उचंबळून आलं होतं. ते गोमू संगतीनंच्या गाण्यात त्यावेळेस स्नेहसंमेलनातील नाटकात केलेलं त्यांचं नृत्य त्यांना आज आठवत होतं व ते सांगत होते की अमूक अमूक व्हॅलेंटाइन दिवसाच्या दिवशी आपल्या प्रेयसींना फुल देत नव्हतो. कारण आम्ही एकमेकांचे भाऊबहिण होतो नव्हे तर एकमेकांना भाऊबहिण मानत होतो. ते काल एकमेकांना भाऊबहिण मानत होते. म्हणूनच आज तब्बल बत्तीस वर्षानंतरही ते एकत्र आले व गेट टू गेदर साजरा करु शकले. कदाचीत त्यांनी ते दहावीत असतांना जर प्रेम केले असते प्रेमवीर असल्यागत तर कदाचीत ते आज एकत्र येवू शकले नसते व गेट टू गेदरही साजरा करु शकले नसते. हे तेवढंच खरं. महत्वपुर्ण बाब ही की आज व्हॅलेंटाइन दिवस साजरा करावा. परंतु तो साजरा करतांना प्रेम जरी असलं तरी वासनेची भावना त्यांच्यात नसावी. शारिरीक आकर्षण तर अजीबातच नसावे. जेणेकरुन बदलत्या काळात व्हॅलेंटाइन डेवर विश्वास निर्माण होईल. नाहीतर आज जो दिवस प्रेमदिवस म्हणून भारतात आला. पसरत आहे. त्याला हद्दपार करायलाही वेळ लागणार नाही. अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०