Atonement in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | प्रायश्चित्त

Featured Books
  • ફરે તે ફરફરે - 67

    ફરે તે ફરફરે - ૬૭   હું  મારા ધરવાળા સાથે આંખ મિલા...

  • રાય કરણ ઘેલો - ભાગ 16

    ૧૬ પૃથ્વીદેવ   અરધી રાત થઇ ત્યાં ઉદા મહેતાના પ્રખ્યાત વ...

  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

Categories
Share

प्रायश्चित्त

प्रायश्चित        तो भिक्षा मागून आपलं पोट भरीत होता.नव्हे तर माधुकरी मागणं त्याच्या आयुष्याचा भाग बनला होता.आयुष्य सुंदर होतं.पण त्या आयुष्यात त्याला हेही दिवस उपभोगायला मिळाले होते.       मोहन व गीता हे पती पत्नी होते.त्यांचं जीवन आणि एकंदर संसार सुखी चालला होता.त्यांना एक दहा वर्षाची मुलगीही होती.तिचं नाव अमीषा होतं.पण अचानक त्यांच्या संसाराला कोणाची दृष्ट लागली कोणास ठाऊक?पतीचा एक मालवाहू वाहनाने अपघात झाला.तो पलंगाच्या आहारी गेला.त्याला उठणे बसणे महाग झाले.घरी करमेनासे झाले.घरी होता नव्हता सर्व पैसा उपचारात नष्ट झाला.आता मात्र त्याच्यावर आत्महत्येची पाळी आली.नशीब बलवत्तर होतं म्हणून तो वाचला.पण अंगूपंगू बनून.        गीता आता कामाला जावू लागली.सा-या संसाराचा भार तिच्यावर होता.तशी ती त्याला पालवू लागली.घरात सुरुवातीला मुळीच कुरकूर नव्हती.तो अपंग असला तरी तो तिला आवडत असे.ती त्याचेवर प्रेम करीत असे.पण जसजसा काळ गेला.तसतसे कामासाठी बाहेर पडलेल्या गीतावर फेसबूकरुपी पतंग घिरट्या घालू लागले.ती तासन् तास या फेसबूकवर माणसांशी बोलू लागली नव्हे तर प्रेमही करु लागली.तिचं संसाराकडे लक्ष लागत नव्हतं.पतीची सेवा बंद झाली होती.यातच ती एका माणसाच्या प्रेमात अडकली.जो माणूस तिच्या आयुष्याचा कर्दनकाळ ठरणार होता.        फेसबूकच्या त्या तरुणाने तिला प्रेमरुपी भोवळ घातली.'मी खुप कमवितो तुला सुखी ठेवणार.'अशी भुलथाप दिली.तिही त्याच्या भुलथापेची बळी ठरली.शेवटी दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.याच विचारात गीता राहात असतांना घरी खटकेही उडत असत.        तो फेसबूकचा तरुण व ती गीता यांचा गंधर्वविवाह पार पडला.ती कधी या पतीकडे तर कधी त्या पतीकडे राहात होती.तो फेसबुकचा तरुण तिला आता ब्लँकमेल करीत होता.कारण तिने आपल्या पतीकडून सोडचिठ्ठी घेतली नव्हती.         त्या फेसबूक तरुणाचं नाव मोहनीश होतं.मोहनीश स्वभावानं चांगला नव्हता.तो अट्टल गुन्हेगार होता.त्याने गीताचा इस्तेमाल केला होता.त्याला निरनिराळे शौक होते.दारु,गांजा,सिगारेट पिणे व कामाला न जाणे हा त्याचा नित्यक्रम होता.तसा तोच  तिला ब्लँकमेल करीत दारु,गांजा,सिगारेट साठी तिच्याचजवळून पैसा खिचत होता.तशी ती त्याला सोडू शकत नव्हती.       शेवटी तिनं निर्णय घेतला.आपणच मोहनला सोडायचं.आपण मोहनीशजवळ येवून राहायचं.तो धडधाकट आहे मोहनपेक्षाही.विचाराचा अवकाश तिने मोहनला सोडले होते आणि धडधाकट असलेल्या मोहनीशकडे राहायला आली होती.मात्र त्यासाठी तिने आपल्या दहा वर्षांच्या इवल्या पोरीचाही विचार केला नव्हता.          घरी पत्नी गीता आली नसल्यानं मोहन चिंतीत होता.त्याला अमीषाचीही चिंता होती.दोन तीन दिवस झाले होते.आता काय करावे त्याच्याजवळ उपाय नव्हता.कारण कोणतेच काम त्याच्याने जमत नव्हते.मुलगी दहा वर्षाची असून ती शाळेत जात होती.         त्याने निर्णय घेतला.आपली मुलगी जिचा आधार आहे,तसेच जी आपल्या मुलीचा आधार आहे तिचा शोध घेण्याचा.त्याने तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मदत घेतली.चौकशीची सुत्र हलली आणि गीता मोहनीशकडे निघाली.तिनं विवाह केल्याचं जेव्हा कळलं तेव्हा मोहनच्या पायाखालून वाळू सरकली.त्याला कसंबसं वाटत होतं.पण उपाय नव्हता.काय करावे सुचत नव्हते.अशातच कोणीतरी म्हणत होतं की तिनं सोडचिठ्ठी न घेता दुसरा विवाह केला.तिला धडा शिकवावा नव्हे तर खावटीही मिळवावी.कारण त्याच्याकडून काम करणं जमत नाही.        मोहन विचार करीत होता की न्यायालयात खटला दाखल करुन खावटी मिळालीही.पण खरंच याने मी आणि अमीषा सुखी होणार का?त्यापेक्षा आपणच काहीतरी करावं आणि आपल्या पोरीला पोसावं.हवं तर उच्च शिक्षण द्यावं.सोडचिठ्ठी,खावटी धडा या भानगडीत पडू नये.       विचारांचा अवकाश तो खावटीच्या भानगडीत न पडता भिक्षा मागू लागला.आलेल्या पैशातून तो घरखर्च चालवू लागला.उरलेल्या तुटपुंज्या पैशातून अमीषालाही शिकवू लागला.        अमीषा आज तरुण झाली होती.ती कलेक्टर बनली होती.बापाच्या केलेल्या कष्टाचं तिनं चीज केलं होतं.तिनं त्यास शेवटपर्यंत दगा दिला नव्हता.हे केवळ मोहनच्या भिक्षेतून साकार झालं होतं.मात्र गीताचे संबंधीत दिवसं खुप कठीनाईत गेले होते.रोजच मोहनीशचे दारु प्राशन करणे,गांजा पिणे व शौकासाठी गीताला मारहाण करणे सुरु होते.ती त्याला सोडून जावूही शकत नव्हती. कारण तो तिला वारंवार ठार करण्याची धमकी देत होता.तिला मात्र आता काबाडकष्ट करुन त्याला बैठी पोसावे लागत होते.तो धडधाकट असूनही.कष्टाचं चीज झालं नव्हतं.तिला विचार येत होता की जर मी माझ्या या कष्टानं मोहन आणि अमीषाला पोषलं असतं तर कदाचित मला पुण्य लागलं असतं.पण मी जीवनात केलेली लहानशी चूक आज मला भोगायला लावत आहे.       जीवनभर काबाडकष्ट करत करत गीता खंगारली होती.नव्हे तर तिला जीवन नकोसं वाटत होतं.जीवनाचा तिला तिटकारा आला होता.पण आज उपाय नव्हता.तिचं पाऊल फेसबूकच्या नादानं चुकीच्या मार्गानं पडलं होतं.जे पाऊल सुरुवातीला बरं वाटलं होतं.       म्हातारपण मात्र तिचं खुप दुःखात जात होतं.काम करणे जमत नसल्यानं रोजची उपासमार होत होती.सेवेचा कोणी वाली नसल्यानं कोणी दवाखान्यात नेणारं नव्हतं.दारुच्या व्यसनाच्या आहारी गेलेला मोहनीश आजही तिला मारतच होता.नव्हे तर दारु,गांजासाठी आजही घरची भांडी विकून तो आपला शौक पुर्ण करीत होता.तिकडे नाश्ताही खातच होता.पण ज्या पत्नीच्या पैशातून आजपर्यंत त्याने शौक पुर्ण केला होता,तिच्यासाठी नाश्त्याचा लहानसा कणंही आणत नव्हता.हिच तिने केलेल्या पापाची शिक्षा होती.कदाचित फेसबूकच्या नादात वाहून जावून तिनं मोहनला सोडलं नसतं तर.......आजही तिला चांगले दिवस राहिले असते. पण आज ती तिनं केलेल्या पापाची शिक्षा भोगत होती.ज्या शिक्षेचं कोणतंच प्रायश्चित नव्हतं.        अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२