अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ३४ )
त्या भेटीनंतर पुढचे काही दिवस असेच निघुन जातात. प्रेमला प्रॉमिस केल्यामुळे अंजली पण स्वतःला थोडं अभ्यासात गुंतवुन घेते. अकरावीची परीक्षा जवळ आलेली असते, ती खुप मन लाऊन अभ्यास करते आणि चांगल्या मार्कांनी पास होते. त्यामुळे घरात सर्वजण तिचे कौतुक करतात.
मागील तीन महिन्यात ती प्रेमला एकदाही भेटली नव्हती. खुप वेळा तिने प्रेमला भेटण्यासाठी बोलवलं पण त्याने सरळ नकार दिला. परीक्षा होईपर्यंत आणि त्याचा रिझल्ट लागेपर्यंत आपण भेटायचं नाही असं त्याने ठरवलं होतं.
अंजलीच्या मनावरचं एक ओझं कमी झाले होते. आणि आता ती प्रेमला भेटू शकत होती.
या दरम्यान प्रेमला पण तिची खुप आठवण येत होती. तिला फक्त लांबुन पाहण्यासाठी तो कितीतरी वेळा तिच्या कॉलेज वर जात होता.
अखेरीस तो काळ आता निघुन गेला होता. आता त्यालाही तिला भेटायचं होतं.
ठरल्याप्रमाणे अंजली मैत्रिणीसोबत मुंबईला शॉपिंग ला जाते असं सांगुन ती प्रेमला भेटण्यासाठी घराबाहेर पडते.
प्रेम तिला रेल्वे स्टेशन वर भेटणार होता. घरातून निघताना ती मॉमला सांगुनच निघते की, मी आज प्रेमला भेटणार आहे म्हणून....
खुप दिवसांनी नाहीतर खुप महिन्यांनी आज अंजलीला भेटायचं होतं, त्यामुळे प्रेम छान तयार होऊन स्टेशन ला येऊन तिची वाट पहात होता.
सकाळचे दहा वाजले होते. स्टेशन ला येणाऱ्या प्रत्येक ऑटोकडे तो पहात होता. अंजली ऑटो मधुन येते खरी, पण ती थोडं अलीकडेच उतरते, तिथून एक गुलाबाचे फुल विकत घेऊन ती चालत स्टेशनला पोचते.
लांबुनच तिला तिथे उभा असलेला प्रेम दिसतो. धावत जाऊन त्याला मिठी मारावी असं तिला वाटत असतं पण, स्वतःला कंट्रोल करत ती मागच्या बाजूने हळूच प्रेमच्या मागे येऊन उभी राहते.
प्रेम मात्र पाठी लक्ष देत नाही, त्याचे लक्ष फक्त तिथे येणाऱ्या ऑटोमधून उतरणाऱ्या लोकांकडे असतं.
शेवटी अंजलीला राहवत नाही आणि मागूनच त्याला बोलते.....
अंजली : एक्स क्युज मी... मिस्टर ! कोणाची वाट पाहताय का....?
* प्रेम तिचा आवाज ऐकुन दचकतो आणि मागे वळून पाहतो तर अंजली हातात एक गुलाबाचे फुल घेऊन उभी त्याच्याकडे स्माईल पहात होती. तिला असं समोर पाहून तो स्वतःला कंट्रोल न करताच तिला मिठी मारत बोलतो....
प्रेम : पागल....! कधीपासून वाट बघतोय मी...! आणि तु कधी आलीय....?
* आज खुप दिवसांनी ती प्रेमने स्वतःहून घेतलेल्या मिठीत होती. त्यामुळे ती निशब्द झाली होती. ओठातून काही शब्द फुटत नव्हते, पण डोळ्यात मात्र आनंदाश्रु जमा झाले होते. एवढे दिवस ज्या क्षणाची ती वाट पहात होती, तो क्षण ती प्रत्यक्षात अनुभवत होती. तिला असं अबोल झालेलं पाहून प्रेम तिला मिठीतुन सोडवत तिच्याकडे पहात बोलतो.
प्रेम : ओय....! काय झालं...?
अंजली : काही नाही...! 🥲
* प्रेम तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून बोलतो...
प्रेम : मग हे काय आहे...?
अंजली : हे....! माझं प्रेम आहे. ☺️
प्रेम : अच्छा....! 😊
* अंजली पुन्हा त्याला मिठी मारत बोलते....
अंजली : आय लव यू..... आय मिस यू... जानू.... 🥲
* प्रेम तिला मिठीतुन सोडवत बोलतो....
प्रेम : अच्छा...! साठवलेलं सर्व इथेच व्यक्त होणार आहात का मॅडम....? आपण स्टेशन वर आहोत..😊
अंजली : ते तर आहेच पण, अजुन खुप काही आहे.😊
प्रेम ; हो... का... काय आहे बरं अजुन...?
* अंजली त्याला हातातील गुलाबाचे फुल देत बोलते.
अंजली : ते.... सांगेन नंतर. आधी हे घे, माझ्याकडून 🌹
प्रेम : अच्छा....! थॅन्क्स फॉर धिस...🌹पण मी तुझ्यासाठी काहीच आणलं नाही...!😊
अंजली : तु आलास ना....! मग बस झालं...! हेच खुप आहे माझ्यासाठी. बाकी काही नको.😊
प्रेम : अच्छा....! 😊
अंजली : हो....!😊
प्रेम : बरं... ! सर्वात आधी अभिनंदन...! एवढी छान मार्क्स मिळवत आपण पास झालात. 💐😊
अंजली : खुप खुप आभार,......!🙏🏻😊
प्रेम : तु खरच खुप हुशार आहेस, आय येम प्राउड ऑफ यू डियर....😊
अंजली : अच्छा...! ते काय आहे ना मिस्टर.... आमच्याकडे अभ्यास करण्याशिवाय दुसरा काही पर्यायच उरला नव्हता. मग काय करणार. झाला अभ्यास मनासारखा. 😊
प्रेम : हो...का...!😊
अंजली : नाही का मग...? आपण काही ऑप्शन ठेवला होता का माझ्याकडे....! 😊
प्रेम : मग तर छानच आहे की....! हि आयडिया चांगली आहे. आपण नेक्स्ट टाईम पण असच करू. 😊
अंजली : ये...! गप्प बस हा आता...! खुप झालं...! तुला काय वाटतं या दिवसात तुझी आठवण आली नसेल का...? कसे दिवस काढलेत माझे मला माहित. आता नाही बस्......!
* अंजली असं बोलुन पुन्हा त्याला मिठी मारतो.
प्रेम : ओय...! कंट्रोल...! कुठे आहोत आपण...?
अंजली : हो...हो...हो... माहितीय मला आपण स्टेशन वर आहोत, हे एक पब्लिक प्लेस आहे. कळलं मला. 😊
प्रेम : अच्छा...! मग काय प्लॅन आहे आजचा...? 😊
अंजली : आजचा प्लॅन फक्त हाच आहे की, आजचा पूर्ण दिवस तुझ्यासोबत घालवायचा आहे.... बस्..!बाकी... कसा... कुठे... ते तु ठरव... फक्त मला एकांत हवा आहे तुझ्यासोबत....😊
प्रेम : संपुर्ण दिवस....? घरी काय सांगुन आलीय...?
अंजली : मॉम ला सांगितलं आहे, मी तुला भेटायला चाललीय. 😊
प्रेम : काय....? 🤔
अंजली : अरे...! एवढं काय...? आता सांगायला काही हरकत नाही, तसही तिला जावई पसंत आहे. 😊
प्रेम : मस्करी करू नको अंजु... खरच सांगितलं तु मॉम ला...?
अंजली : अरे हो... ! खरच....! आणि तिने परमिशन पण दिली. 😊
प्रेम : अच्छा...😊
अंजली : हो... मिस्टर...! मग निघायचं का आता...? काय ठरवलं आहे...? कुठे जायचं...?
प्रेम : मला काही सुचत नाही...? तु सांग... तुला कुठे जायला आवडेल माझ्यासोबत...!😊
अंजली : तुझ्यासोबत तर मी कुठेही यायला तयार आहे. फक्त मी तुला बोलले तसं...😊
प्रेम : म्हणजे...🤔
अंजली : अरे यार....! कसं समजावू तुला...? 😊
प्रेम : म्हणजे....🤔
अंजली : तु ना...! खरच...! पागल आहेस जरा, काहीही कळत नाही तुला...😊
प्रेम : हो... का...! मग जरा कळेल असं सांगाल का मला जरा...? 😊
अंजली : प्रेम....! मला तुझ्यासोबत एकांतात वेळ घालवायचा आहे, तिथे दुसरं कोणीही नकोय, कळलं...!
प्रेम : हो... पण...! असं कोणतं ठिकाण आहे की, जिथे कोणीच नसेल, आपण फक्त दोघेच असु...?
अंजली : एक आहे....!
प्रेम : कुठे बरं.....?
अंजली : आठव बरं... लास्ट टाईम आपण अशा कोणत्या ठिकाणी होतो, जिथे फक्त आपण दोघेच होतो. 😋
प्रेम : बांद्रा... ! त्या हॉटेल रूमवर.....! 🤨
अंजली : होय....! 😊
प्रेम : नाही....! त्या दिवशी ठीक होतं ते, पण मला खुप रिस्की वाटतं ते. आपण बँड स्टँड ला नाहीतर छोटा काश्मीर ला जाऊ. 😊
अंजली : प्रेम...! का कळत नाही तुला...? एकतर एवढ्या दिवसांनी आपण भेटतोय, आणि मला नाही यायचं तिकडे...! बँड स्टँड पण नको आणि ते छोटा काश्मीर पण नको. 😔
प्रेम : अरे पण....!
अंजली : काय अरे...! तुला कळत कसं नाही प्रेम ?😔
प्रेम : बरं... ओके...! पण अंजु... ! खरं सांगायचं तर माझ्याजवळ तेवढे पैसे नाहीत. 🙁
अंजली : तु त्याचं टेन्शन नको घेऊ. मी आहे ना...😊
प्रेम : म्हणजे...🤔
अंजली : म्हणजे......! माझ्याकडे आहेत, तु चल आधी, उशीर होतोय, तिकीट पण काढावी लागेल.
प्रेम : बरं... चल....😊
* असे बोलुन ते दोघे ट्रेन पकडून बांद्र्याच्या हॉटेल वर पोचतात. अंजली रिसेप्शन काउंटर वर जाऊन पैसे भरून एका रूम ची चावी घेते. ते दोघेही त्याच रूम मधे जातात जिथे प्रेमचा वाढदिवस साजरा केला होता. आत जाताच अंजली डोअर लॉक करून प्रेमला कडकडून मिठी मारते. प्रेम पण तिला घट्ट मिठीत घेत, तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. थोडा वेळ ते दोघेही निशब्ध होऊन तसेच एकमेकांच्या मिठीत राहतात.
काही वेळाने डोअर नॉक होतो... प्रेम अंजलीला आपल्या मिठीतुन सोडवत डोअर ओपन करतो. बाहेर एक वेटर उभा असतो. तो आत येऊन एक पाण्याची बॉटल आणि मेनू कार्ड टेबलवर ठेऊन जातो.
प्रेम त्याला थॅन्क्स बोलुन पुन्हा डोअर बंद करतो. तेवढ्यात अंजली पुन्हा त्याच्याजवळ येऊन त्याला बिलगते. तिला तसच मिठीत घेत तो बोलतो....
प्रेम : मॅडम... फ्रेश वैगेरे व्हायचं नाही का... ? का अशीच राहणार आहेस. ?😊
अंजली : तुझ्या मिठीत आल्यावर मला एकदम फ्रेश वाटतं...! त्यासाठी वेगळं काही करायची गरज वाटत नाही. 🥰
प्रेम : अच्छा...! ते सर्व ठिक आहे, पण आपण एवढ्या लांबुन प्रवास करून आलोय ना... म्हणून म्हटलं...😊
अंजली : हो...का...! तुला फ्रेश व्हायचं आहे का...? मग ठिक आहे, तु जाऊन ये....😊
प्रेम : ओके..., मी आलोच...😊
* असं बोलुन अंजलीला आपल्या मिठीतुन सोडवत तिला बेडवर बसावतो आणि तो वॉशरूम मधे जातो.
तो फ्रेश होऊन बाहेर येतो, अंजली त्याला बेडवर ठेवलेला टॉवेल देते.
अंजली : झालास फ्रेश....😊
प्रेम : हो... तु पण फ्रेश हो जरा... छान वाटेल...😊
अंजली : अच्छा...! ठिक आहे... मग आलेच मी पण थोडीशी फ्रेश होऊन.
* असं बोलुन ती पण वॉशरूम मधे जाते व फ्रेश होऊन बाहेर येते. प्रेम आपल्याजवळील टॉवेल तिला देत बोलतो.
प्रेम : बरं वाटलं ना...? 😊
अंजली : हो.... जानु....😊
* ती आरशासमोर उभी राहुन टॉवेल ने आपला चेहरा पुसत असते. तिला असं पाहून प्रेमला पण राहवत नाही. तो तसाच तिच्या जवळ जातो आणि पाठीमागूनच तिला मिठी मारतो, त्याच्या अशा मिठीत घेण्याने अंजली सुध्दा शहारून जाते. प्रेम तिच्या मानेवरील केस बाजुला करत अलगद तिच्या मानेवर हलकासा किस करतो. तशी अंजली अजूनच शहारते. ती त्याचा एक हात घट्ट पकडुन ठेवते. प्रेम पुन्हा अलगद तिच्या कानाला किस् करतो... तशी अंजली एकदम मागे वळते आणि त्याला मिठीत घेत बोलते.
अंजली : प्रेम....! खुप मिस करत होते, हे सर्व.... तुझा स्पर्श... गेले काही महिने कसे गेलेत माझे मला माहित.... आय लव यू प्रेम....😘
* असे बोलत ती थोड्या टाचा उंचावून प्रेमचा चेहरा हातात घेत त्याच्या कपाळावर, डोळ्यांवर, गालावर किस करून शेवटी त्याच्या ओठांवर ओठ ठेवते. प्रेम सुद्धा तिला हवा तसा प्रतिसाद देत असतो.
आज खुप दिवसांनी आज त्यांना हवा तसा एकांत मिळाल्यामुळे ते दोघेही एकमेकांत हरवून गेले होते.
एवढ्या दिवसांचा विरह संपून ते दोघे आज अखंड प्रेम सागरात बुडाले होते.
दोघे जेव्हा त्या सुंदर विश्वातून बाहेर पडले तेव्हा ते दोघे बेडवर एकमेकांच्या मिठीत होते.
तेवढ्यात रूम मधील फोन ची रिंग वाजली... प्रेम अंजलीच्या मिठीतुन बाहेर येत त्याने तो कॉल रिसिव्ह केला. रिसेप्शन वरून डिनर ऑर्डर साठी कॉल होता. त्यांना थोड्या वेळात सांगतो असं बोलुन तो रिसिवर ठेऊन देतो. आणि अंजली जवळ येऊन तिच्या केसातुन हात फिरवत तिला बोलतो....
प्रेम : गुड आफ्टरनून मॅडम....!😊
* अंजली त्याचा हात पकडून ठेवत त्याच्याकडे पाहून बोलते...
अंजली : धिस इज द बेस्ट आफ्टरनुन इन माय लाइफ.🥰
प्रेम : अच्छा...! चला मग उठा आता... डिनर साठी कॉल आला होता रिसेप्शन वरून. काय खाणार आहात. 😊
अंजली : माझं तर पोट भरलं....😋 तुला अजुन काही खायचं आहे का...? 😋
प्रेम : अच्छा....! त्याने पोट भरलं का...?😊
अंजली : माझं तर भरलं... खरच...! 🥰
प्रेम : नखरे करू नको....२ वाजलेत दुपारचे... नीट सांग काय खाणार आहेस, तसं ऑर्डर करायला.
अंजली : खरं तर मला ना...! तुलाच खावं असं वाटतं...,,😋
प्रेम : झालं तुझं....! 😊
अंजली : नाही अजुन.... खुप बाकी आहे....😋
प्रेम : तु... ना... जास्तच आगावू होत चाललीय. 😊
अंजली : तुझ्यासोबत असताना असा आगाऊपणा करायला पण मज्जा येते. 🥰
प्रेम : हो... का...? 😊
अंजली : हो... ना... खरच. 🥰
प्रेम : बरं... आता पुरे झाले... सांग पटकन मला तर भूक लागलीय. 😊
अंजली : बरं...ओके... ते मेनू कार्ड दे, मी बघते काय ऑर्डर करायचे ते....😊
* प्रेम टेबलवरील मेनू कार्ड तिच्याकडे देतो आणि उठून फ्रेश व्हायला जातो.
अंजलीने कॉल करून काहीतरी मागवलेले असते.
तो बाहेर यायच्या आधीच ती टॉवेल घेऊन बाथरूम कडे जाते आणि अलगद दरवाजा खोलून आत जाते. आणि शॉवर ऑन करते. 🚿
प्रेम मागे वळून पाहतो तर अंजली त्याच्या समोर असते. वरून शॉवर चालू असतो. तो पुर्ण भिजलेला असतो. त्याच अवस्थेत तो तिला जवळ ओढून घेतो.
दोघेही पुन्हा एकदा त्या शॉवर खाली ओले चिंब होऊन एकामकांत विलीन होऊन जातात. दोघेही मनमुराद त्या क्षणाचा आनंद घेतात.
थोड्या वेळाने डोअर बेल वाजते. तसा प्रेम टॉवेल वरच बाहेर येऊन डोअर ओपन करतो. डिनर आलेला असतो. दरवाज्यातून डिनर ची ट्रॉली आत घेतो आणि पुन्हा डोअर लॉक करतो.
आरशासमोर उभा राहून तो टॉवेलने आपले केस पुसत अंजलीला आवाज देतो.
प्रेम : मॅडम... आवरलं का...? डिनर आलाय, थंड होईल. आवर पटकन....!
अंजली : (आतूनच) हो... आलेच. पण मला टॉवेल दे ना....!
* प्रेम स्वतः जवळचा टॉवेल घेऊन तिला द्यायला जातो. तशी अंजली त्याचा हात पकडून आत ओढते. आणि त्याला मिठी मारते. थोडा वेळ तिला तसच मिठीत घेत तिच्या ओल्या केसांतून हात फिरवत तिला बोलतो.
प्रेम : अंजु.... हे सर्व करायची काय गरज होती का...? आता हे केस कधी सुकतील...? अशीच ओले केस घेऊन घरी जाशील का...?
अंजली : अरे...! त्यात काय एवढं...? सुकतील ते जाईपर्यंत, पण हा क्षण पुन्हा कधी येईल माहित नाही, म्हटलं जगुन घ्यावं....🥰
प्रेम : अच्छा....! ते ठिक आहे मॅडम... बाहेर डिनर आले आहे. त्याचं काय...? थंड होईल ना...!
अंजली : अरे हो... मी विसरलेच...😋 तुझ्यामुळे होतंय हे सर्व...! 🥰
प्रेम : अच्छा....! माझ्यामुळे....🤔😊
अंजली : मग तर काय....🥰 चल आता बाहेर का अजुन इथेच थांबायचं आहे... चालू करू का शॉवर...? 😋
प्रेम : ओय... पागल...! चल बाहेर....!😊
अंजली : ओके...ओके... जरा थांब मी केसांना टॉवेल गुंडाळून ठेवते म्हणजे थोडे सुकतील. 😊
* असं बोलुन ती आपल्या केसांना टॉवेल गुंडाळून प्रेमसोबत बाहेर येते आणि आरशासमोर उभी राहुन स्वतःला पहाते. प्रेम तिच्या मागेच उभा असतो.
पुन्हा तिला पाठीमागून मिठीत घेत तिला गालावर किस करत बोलतो....
प्रेम : खुपच सुंदर दिसतेय.... ब्लश करतेय आज मेरी जान....😊
अंजली : हो... ना....! 🥰
प्रेम : मॅडम.... डिनर वाट बघतोय आपली...! 😊
अंजली : अरे... हो... पुन्हा विसरले, तुझ्यामुळेच... चल आता...😋
प्रेम : अच्छा...! 😊
* दोघेही टेबलजवळ येतात, प्रेम ट्रॉली मधील ट्रे काढून टेबल वर ठेवतो. तो पूर्ण झाकलेला होता. ते झाकण काढायच्या आधी तो अंजलीला विचारतो...
प्रेम : काय मागवलं आहेस...?😊
अंजली : बघ ना उघडून... तुझ्यासाठी आज नवीन डिश आहे. 😊
प्रेम : अच्छा.... मग तर ट्राय करायला हवी. 😋
* असं बोलुन तो ट्रे वरील झाकण उघडतो, दोन डिश मधे वेगळे पदार्थ असतात. एका डिश मधे ग्रेव्ही होती तर दुसऱ्या डिश मधे राइस, नुडल्स आणि भाज्या असं काहीतरी होतं. सोबत सॉस, ग्रीन चटणी, ते काय होतं हे त्याला काही कळत नाही. अंजली त्याच्याकडे पाहून बोलते...
अंजली : कशी आहे डिश....?😋
प्रेम : दिसायला तर खुप छान आहे...! पण नक्की काय आहे हे...?🤔
अंजली : खाऊन बघ...! मगच कळेल ना...!😋
प्रेम : अच्छा....! ठिक आहे. 😊
* असं बोलुन तो चमच्याने त्यातील एक घास घेऊन अंजलीला भरवतो. अंजली तो खात खात त्याला पण चमच्याने घास भरवत बोलते....
अंजली : कशी आहे टेस्ट....?😊
प्रेम : छान आहे....,😋
* खरं तर प्रेमला ते जेवण एवढं काही आवडलं नव्हते, पण अंजलीला वाईट वाटू नये म्हणुन तो तिच्यासोबत थोडं थोडं खात होता, आणि अंजलीला भरवत होता. अंजलीला हि गोष्ट लक्षात येते. ती प्रेमला बोलते....
अंजली : प्रेम....! आवडलं नाही का तुला...?🤔
प्रेम : हो... तर...! आवडलं ना...!😊
अंजली : मग स्वतः छोटा घास का खातोय...? मलाच मोठा घास भरवतोय...🤔
प्रेम : अरे... ! असं काही नाही... मी पण खातोय ना..!
अंजली : नाही...! मला वाटतं तुला नाही आवडलं हे...! आपण दुसरं काहीतरी मागवू थांब...!
* असं बोलुन ती टेबलवरील मेनु कार्ड घेते. प्रेम तिच्या हातातील मेनू कार्ड घेऊन बाजूला ठेवत बोलतो.
प्रेम : अरे....! काय करते...? अजुन कशाला...? मग हे कोण संपवणार...!😊
अंजली : हे राहु दे...! आपण दुसरं काहीतरी मागवू...! तुला काय आवडतं ते...! मी उगाच घाई केली... तुला विचारलं नाही... सॉरी...😔
प्रेम : अरे...! पागल...! त्यात काय एवढं...! ठिक आहे ना...! तुला आवडतं ना...! मग तु खाल्ले की माझे पोट आपोआप भरेल....😋
अंजली : डायलॉग मारू नको...! मला माहितीय तु असच बोलतोय ते....😔
* प्रेम तिला जवळ घेत बोलतो....
प्रेम : अरे यार...! कशावरून पण तुझा मुड ऑफ होतो. इट्स ओके ना...! बघ एवढा छान दिवस आहे, आणि या छोट्या गोष्टीवरून तु अशी नाराज होते. 😊
अंजली : सॉरी... जानु....😔
प्रेम : बरं...! आता एक छानशी स्माईल कर बघु, माझी जान अशी बरी नाही वाटत....😊
* अंजली त्याच्याकडे पाहून स्माईल करत त्याला मिठी मारते आणि बोलते....
अंजली : रिअली... सॉरी... जानु...,😊
प्रेम : ये हुईं ना बात...😊 चल आता पटपट खाऊन घे, घरी पण जायचं आहे, हो की नाही...! 😊
अंजली : नाही....! मला इथेच राहायचं आहे, तुझ्या मिठीत. असच कायमचं....🥰
प्रेम : अच्छा...! मॉम चा कॉल मला येईल... झाली की नाही शॉपिंग म्हणून....😊
अंजली : सांग मग..., अजुन खुप बाकी आहे. 😋
प्रेम : अच्छा....! 😊 बरं चल... आवरून निघुया. 😊
अंजली : काय....? आत्ताशे तर तीनच वाजलेत अजुन खुप वेळ आहे. 😋
प्रेम : अंजु...! एक तर तु शॉपिंग ला जाते म्हणुन आलीय, शॉपिंग तर काही केलीच नाही, आणि आपल्याला घरी पोचायला एक दिड तास तरी लागेल. मग लवकर निघायला नको का...🤔
अंजली : प्रेम...! तु किती टेन्शन घेतोस रे...! नको ना या सर्व गोष्टींचा विचार करू....! मी करेन मॅनेज सर्व. तु रिलॅक्स हो बघू आधी.....😊
प्रेम : बरं... ओके...! मग तु सांग कधी निघायचं ? 😊
अंजली : निघु आरामात....संध्याकाळी...😊
प्रेम : संध्याकाळी...? म्हणजे किती वाजता....?🤔
अंजली : सहा, सात वाजता...!😊
प्रेम : काय...! एवढ्या उशिरा....🤔 काय करायचं एवढा वेळ...? 🤔
अंजली : तुझं मला माहित नाही...! पण मला काय करायचं आहे ते चांगलं माहीत आहे....😋🥰
प्रेम : तु ना... खरच पागल झाली आहेस. 😊
अंजली : हो...? आय अग्री विथ धिस...🥰
प्रेम : काय बोलू तुला मी आता.....?😊
अंजली : जान...बोल...! आवडतं मला...!🥰
* अंजली बोलण्यात प्रेमला काही ऐकत नव्हती. प्रेम ने सुध्दा हार मानली होती. गप्पा मारत त्यांनी थोड फार खाऊन पुढचे काही तास तिथेच एकमेकांच्या सहवासात घालवले.
संध्याकाळी सहा वाजता ते दोघे आवरून तिथून बाहेर पडले. अंजली त्याला बँडस्टँड ला घेऊन गेली. तिथे एका हॉटेल मधे त्यांनी डोसा घेतला. सोबत कॉफी घेऊन ते दोघे तिथून बाहेर येऊन बीचवर असलेल्या एका बाकावर बसले. तिथे ते दोघे सुर्यास्ताचा आनंद घेत एकमेकांना पकडुन गप्पा मारत बसले होते. संध्याकाळचे छान रोमँटिक वातावरण होते. आजूबाजूला खुप कपल ती संध्याकाळ एन्जॉय करत होते. हळू हळू अंधार पडायला सुरुवात होत होती. अखेरीस प्रेम तिला बोलतो.
प्रेम : अंजु....! थोड्या वेळात रात्र होईल. आपण कधी पोहोचू घरी....? मॉम वाट बघत असतील ना.....🤔
अंजली : बरं... ओके...! चल निघुयां...😊
* असं बोलुन ती तिथेच त्याच्या गालावर किस करून उठते. प्रेमला हात देत त्याला उठवते आणि दोघे पुढे चालू लागतात.
प्रेम : इथून आपण ऑटो करू आणि स्टेशन ला जाऊ.
अंजली : ओके... जानु....? आता तु बोलशील तसं. 🥰
* दोघे ऑटो पकडतात आणि स्टेशन ला पोचतात. तिथे अंजली तिच्यासाठी प्रेमच्या आवडीने दोन ड्रेस खरेदी करते. प्रेम नको बोलत असताना सुध्दा त्याच्यासाठी पण दोन जीन्स आणि दोन टि शर्ट घेते.
तिथून ते ट्रेन ने घरी यायला निघतात. ट्रेन मधुन उतरल्यावर ऑटो पकडतात. प्रेम तिला सोडायला तिच्या सोबतच जातो. तिचे घर जसे जवळ येते तशी अंजली त्याला घट्ट मिठी मारत बोलते.
अंजली : थॅन्क्स प्रेम... ! आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही. माझ्या आठवणींच्या खजाण्यामध्ये अजुन एका दिवसाची भर पडली. 🥰
* तेवढ्यात तिचे घर येते... ती जाता जाता प्रेमच्या गालावर पुन्हा किस करते आणि तिच्या ड्रेस ची बॅग घेऊन ती त्याला बाय करून घरी जायला निघते. प्रेम पण तिथून त्याच ऑटो ने घरी पोचतो.
आजचा दिवस त्या दोघांच्या आयुष्यातला एक सुखद अनुभव देणारा होता. त्या संपूर्ण दिवसाच्या आठवणी पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर घेऊन ती रात्र उशिरापर्यंत जागून ते झोपी जातात.....🌃
क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️