महात्मा बसवेश्वर दलित व शोषितांचे मसीहा संत हरळ्याच्या एकाकीपणामुळे त्यांचे मन गावात रमत नव्हते.त्याचे वडील ज्यांच्याकडे काम करीत असत,त्यांच्याकडून त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन मिळत असे. माहीत नसतांनाही वडीलांच्या कामाकडे लक्ष दिल्यामुळे पादत्राणे बनविण्याचा धंदा हरळ्या करु लागला. एक दया म्हणून लोकं हरळ्याची पादत्राणे घेत असत. अशाच अनुभवातून हरळ्याची पादत्राणे कलाकुसर पद्धतीने तयार होवू लागली. आज त्यांच्यात कौशल्य निर्माण झाले होते. एकटेपणामुळे लवकरच लवकरच त्यानं आपला विवाह कल्याणी नावाच्या मुलींशी केला होता. लहानाचा हरळ्या संसार सांभाळता सांभाळता मोठा होवू लागला. कल्याणीपासून त्याला एक मुलगा झाला. त्याचं नाव शिलवंत ठेवण्यात आलं होतं. बसवेश्वराने याच काळात जन्म घेतला होता. आपल्या लहानपणापासूनच बसवेश्वराने दलित आणि स्रियांवरील अत्याचार अगदी जवळून पाहिले होते. जन्माच्या वेळीच या बसवेश्वराने मुंज नाकारुन प्रथेला सुरुंग लावला होता. त्याचे शल्य बसवेश्वराच्या मातापित्यांना होतं. त्याला वेदविद्या यावी,तो वेदविद्येत पारंगत व्हावा म्हणून त्याला एका ब्राम्हणाकडे विद्यार्जनासाठी ठेवण्यात आले होते. पण बसवा तेथे दलितांबद्दलचे उलट सुलट प्रश्न विचारत असल्याने त्याचेशी तेथील ब्राम्हण वर्ग दुजाभावाने वागत असे. तसेच मत्सरभावानेही वागत होता. त्यामुळे बागेवाडीत जन्म घेवून लहानाचे मोठे होतांना त्याचे मन रमत नसल्याने त्याने बागेवाडी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कुंडलसंगम गावी स्थलांतर केले. जातेवेळी त्याने रस्त्यात पडलेल्या गावाचे निरीक्षण केले. कृष्णा व मलप्रभेच्या छायेत बसवअण्णा व त्याची बहिण अक्क नागम्मा लिंगायत धर्माच्या साक्षात्काराचे धडे घेत होते. ते शिवाला जास्त पुजत होते. त्यांना मातृपितृप्रेमाचा विसर पडला होता. दोघेही प्रातःकाळी उठायचे. प्रातःविधी आटोपून ग्रंथचिंतनात कुलगूरुंचे दर्शन घेवून त्यात दंग होवून जायचे. त्याच ठिकाणी वैदिक ग्रंथ, उपनिषद, पुराण वाचून त्यावर चिंतन मंथन करुन त्या ग्रंथवाचनातून समाजाची सेवा करण्याची प्रेरणा बसवेश्वराला मिळाली. कृष्णेत स्नानादी आटोपून बसवेश्वर बिल्वपत्र व फुले संगमनाथाच्या समाधीवर वाहात व नंतर शिवध्यानास बसत. सायंकाळी ते गुरुबंधूसोबत ब-याच विषयावर चर्चाही करीत. एकदा ते आश्रमातील मित्रांसोबत यलम्मा देवीच्या दर्शनाला निघाले. तिथे सा-या देवदासीचा बाजार भरला होता. त्यांच्याजवळ त्यांच्या पोटच्या मुलीही होत्या. त्याच ठिकाणी अर्धनग्न अवस्थेतल्या मुली विकणारे मायबाप बसवाने पाहिले. या मुली कमरेला कडूनिंबाच्या डहाळ्या व तोंडात लिंबडहाळी धरुन आपल्या देहाचं प्रदर्शन करतांनाही बसवानं पाहिलं. त्याच्या मनात त्या विचित्र प्रसंगाने खोल दरी निर्माण केली. त्यानंतर देवीच्या नावानं कोंबड्या बक-याचा बळीही देतांना बसवानं पाहिलं. त्यामुळं ही सर्व अंधश्रद्धा असून दया हे धर्माचे मुळ नाहीच, हा रास्त विचार बसवाच्या मनात अगदी लहानपणापासूनच रुजला. गुरु जातीवेदाने बसवांना शिवतत्व लय पावल्यावर पुन्हा शिवतत्व जन्माला येतं हा विचार शिकवला होता. त्यामुळे बसवाने पुर्ण लक्ष शिवभगवानावर केंद्रीत केले होते. पुढे तेच तत्व बसवाच्या विरशैव धर्मकार्याचे उगमस्थान बनले होते. तेहत्तीस कोटी देव असतील तरी विश्व एक असल्याने देवही एकच असा उपदेश जातीवेदाने बसवाला शिकविल्याने त्याचा पुढील काळात अंधश्रद्धेवर विश्वास उरला नाही. देवाच्या नावाने कोंबडे बकरे काढून पैशाची लुट करणारे पंडीत बसवाने पाहिले. त्यामुळे देवालयावर बसवाचा विश्वास उरलाच नाही. खरे दर्शन देवालयात नाही, तर आपल्या तळहाताचे जरी दर्शन घेतले तरी देव आपल्यावर प्रसन्न होतो हा चमत्कारी विचार बसवाला समजला व तोच विचार बसवाने समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला. तद् नंतरच्या काळात मंदीरातील पुरोहिताच्या शोषणापासून समाजाला मुक्त करण्याचा निश्चय बसवाने केला. देव देवळात नसून आत्म्यात आहे असे त्याने सांगितले. इष्टलिंगाला गळ्यात बांधल्यावर व ते ह्रृद्यावर धारण केल्यावर मानवी शरीरच देवालय बनते. त्यामुळे देव आणि माणूस यामध्ये पुरोहीत हा दलाल नसावा असा विचार बसवेश्वराच्या रुपाने समाजाच पसरु लागला. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्याच्या बहिणीचा नागम्माचा विवाह शिवदेव नामक व्यक्तीशी झाला. बसवाचे मामा बलदेव हे ब्रिज्वल दरबारी मंत्री होते. जातीवेदाच्या म्हणण्यावरुन त्यांनी आपली मुलगी गांगाबिका बसवाला देवून त्यांच्या प्रस्तावाचे स्वागतच केले. आपल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर जावयाच्या नोकरीची चिंता बलदेवाला होती. त्यामुळे मंगळवेढ्याला ब्रिज्वल दरबारी बसवेश्वराला बलदेवाने कर्णिकाची नोकरी लावून दिली.वया पदावर असतांना कामाची चिकाटी, प्रामाणिकपणा व कार्यनिष्ठा राजाला उचित वाटली. गणित विषय चांगला असल्याने हिशोबातील चूक शोधून बसवाने भरपूर संपत्ती वाचवली. त्यामुळे खुश होवून मंत्री सिद्धण्णाने बसवाची कोषागार पदी नियुक्ती केली. कोषागार पदी नियुक्ती झाल्यानंतर राज्याचा खजिना बसवाने वाढवला. मंगळवेढ्यातील राजमहालाची दुरुस्ती करतांना एक ताम्रपट दिसला. त्या ताम्रपटात कलचूरी राज्यात सिंहासनाच्या खाली भरपूर खजिना आहे हे लिहिलेले होते. ते बसवेश्वराने राजा ब्रिज्वलाला सांगितले. त्यामुळे ते ब्रिज्वलाने खोदकाम करुन मिळवताच ब्रिज्वल बसवेश्वरावर खुप खुश झाले. महात्मा बसवेश्वर दलितांचे व गरीबांचे मसीहा होते. ते त्यांची सेवा करीत. त्यांच्यासाठी कामही करीत. त्यांच्या सेवेसाठी आपली संपत्ती खर्च करण्याचे व्रत बसवाने घेतले होते. सिद्धम्मा राजाचा मंत्री होता.त्याच्या पत्नीने ब्रिज्वल लहान असतांना आपल्या स्तनातून दूध पाजले होते. म्हणून सिद्धमाच्या मृत्यूनंतर ही निलांबिका उर्फ नीललोचना राजदरबारात भगीनी म्हणून वावरत होती. ब्रिज्वल राजाला तिच्या विवाहाची चिंता होती. त्यांनीच बसवेश्वरापुढे विवाहाचा प्रस्ताव ठेवला. बसवेश्वराने गांगाबिकेला विचारुन निलांबिकेशी विवाह केला. कारण त्या काळात बहुपत्नीत्व ही प्रथा रुढ होती. त्यानंतर बसवअण्णाची नियुक्ती राजाने प्रधानमंत्री पदावर केली. एकदाचा प्रसंग. प्रधानमंत्री बनताच बसवेश्वर एकदा हरळ्याच्य.झोपडीत गेले. हरळ्या संत होता. बसवेश्वर झोपडीत येताच हरळ्याचं संतपण पाहून त्यानं हरळ्याला त्रिवार वंदन केलं. त्याच्या उपकाराची परतफेड म्हणून हरळ्यानं आपल्या उजव्या मांडीचं कातडं काढलं व आपल्या पत्नीच्या डाव्या मांडीचं आणि त्याची पादत्राणे बनवून ती बसवेश्वराला दान दिली. हा केवढा मोठा असीम त्याग होता. बसवेश्वरानं याच दलित शोषींतांससाठी अनुभवमंटपाची स्थापना केली होती. त्यात सर्व धर्माचे व जातीचे लोकं होते. त्याचबरोबर ते भेदभाव करीत नसत. ह्या अनुभवमंटपाच्या स्थापन करण्याने व त्याकाळी असलेल्या भेदभावाने व बसवेश्वराच्या सल्ल्याने अनुभवमंटपात होत असलेल्या वेगवेगळ्या जातीच्या विवाहाने बसवेश्वरांबाबतची कुरघोडी मंत्रीवर मचण्णानं ब्रिज्वल दरबारी केल्यानं बसवेश्वराला पुढे प्रधानमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यातच ते निराश झाले व त्यांचे त्याच निराशतेत महापरीनिर्वाण झाले. त्यांनी त्या काळी जी समाजाला दिशा दिली. ते पाहता वाटते की महात्मा बसवेश्वरासारखा असा मानव........ त्यांच्याकडून बरंच शिकून घ्यावं. कारण त्यांच्याकडे सर्वकाही असतांना त्यांनी त्या ऐषआरामाचा केवळ आणि केवळ दलित व शोषींतांच्या सेवेसाठीच त्याग केला. ही विचार करण्यालायक बाब आहे. अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०(लेखक संत हरळ्या व बसवेश्वरावर आधारीत चर्मयोगी कादंबरीचे लेखक आहेत.)*अक्षय तृतीया;केवळ पुजापाठ नको,कर्तृत्वही हवं* अक्षय तृतीया भारतात मोठ्या उत्साहानं साजरा होणारा सण आहे.हा सण हिंदूंचाच नाही तर जैन लोकही या सणाला मोठ्या उत्साहानं साजरा करतात.नव्हे तर या पाठीमागे एक पुरातन परंपरा आहे. या दिवसाला साजरा करण्यामागे काही पुरातन परंपरा खालीलप्रमाणे या दिवशी भगवान परशुरामाचा जन्म झाला.तोच विष्णुचा सहावा अवतार मानला जातो.या दिवशी परशुराम जयंती साजरी करण्याच्या दृष्टीने या दिवसाचे महत्व आहे.गंगा नदीही याच दिवशी भगीरथाने पृथ्वीवर आणली.तसेच या दिवशी गंगेत स्नानाचे महत्व आहे.हिंदू पुराणानुसार याच दिवशी अन्नपूर्णा मातेचाही जन्मदिवस मानला जातो.त्यामुळे या देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ या दिवशी बनवून ते अन्नपूर्णा देवीला चढवले जातात.याच दिवशी कुबेराने जास्त धन प्राप्ती व्हावी म्हणून शिवपुरम येथे भगवान शिवाची पुजा केली.याच दिवशी महर्षी वेद व्यास यांनी महाभारत कथा लिहिण्यास प्रारंभ केली.याच दिवशी युधीष्ठराला अक्षय पात्राची प्राप्ती झाली.ज्या पात्राने तो गरीबांना अन्न चारत असे.याच दिवशी दुःशासनाने द्रौपदीचे चिरहरण केले व याच दिवशी भगवान श्रीक्रिष्णाने कधीही न संपणारी अक्षय साडी द्रौपदीला पुरवली.याच दिवशी सुदामा क्रिष्णाचा मित्र क्रिष्णाला मदत मागायला द्वारकेला आला.याच दिवशी ओरीसामध्ये शेतीत वखर चालवला जातो.आणि याच दिवशी बंगालमध्ये व्यापारी वहीखात्याचा हिशोब करतात.ज्याला हलखता म्हणतात. पंजाबमध्ये तर याच दिवशी सकाळी उठून शेतकरी शेतात जातात.त्यांना रस्त्यात जे जे पशुपक्षी भेटतात.त्यावरुन पावसाचा अंदाज लावला जातो. जैन धर्मामध्ये तर या दिवसाला वेगळे महत्व आहे.जैन राजा ऋषभदेव याने आपली संपत्ती आपल्या एकशे एक पुत्राला दान देवून तो सुखप्राप्तीसाठी अरण्यात गेला.त्या काळात त्याने वर्षभर उपवास ठेवला.त्यामुळे त्याचा उपवास सोडण्यासाठी कोणी या राजाला कपडे लत्ते,कोणी घोडे,कोणी हत्ती,तर कोणी राजकन्याही दान दिल्या. पण राजा काही उपवास सोडायला तयार नव्हता.शेवटी अंतर्यामी राजा श्रेयांशस यांनी अंतर्ज्ञानाने ऋषभदेवाची इच्छा ओळखली व त्यांना याच दिवशी उपवासाला उसाचा रस दिला.याला जैन धर्मात पारणाा म्हणतात. आज लोक वास्तववादी जगत असले तरी त्या वास्तव्यवादी जगण्यात पौराणिकतेची जोड आहे.म्हणूनच आम्ही कितीही वास्तविकतेला मानत असलो तरी नाईलाजानं आमचे सण उत्सव साजरे करीत असतो.बौद्ध मंडळी बैशाखी,बुद्धपौर्णीमा मोठ्या उत्साहानं साजरी करतात.तर हिंदू दिपावली,होळी, दसरा इत्यादी सण साजरा करतात. मुस्लीम ईद साजरी करतात.ख्रिश्चन नाताळ आणि इस्टरडे.यापैकी अक्षय मात्यापित्यांच्या पुजणाचा एक दिवस म्हणून अक्षय तृतीयाही साजरा केला जातो. वर्तमानकाळात अक्षयतृतीयेला केवळ माय बापाचीच पुजा करणे तसेच आपआपल्या पिढीत जे पुर्वज झाले.त्यांना पात्रावळीत सुग्रास अन्न टाकून त्यांचं पुजन करणे बस एवढाच अर्थ घेतला आहे.हे पित्तरांना दिलेले जेवण कदाचित या दिवशी केलेले पुण्य कधीच संपत नाही,या अर्थानं हा सण साजरा केला जातो.तसेच ते पुण्यात्मे आशीर्वाद देतात या अर्थानहीे या दिवसाचे महत्व आहे.या दिवशी कावळ्यांना काव काव ये असा आवाज देवून कावळ्यांना जेवण घालण्याचे महत्व आहे.कावळा अन्नाला शिवला की बस आपले पित्तरं जेवले व आपल्याला पुण्य मिळाले असाही एक समज प्रचलित आहे. आम्ही जीवंतपणी म्हाता-या मायबापाला वृद्धाश्रमात टाकतो आणि मेल्यावर त्यांची पुजा करतो.सगळे पदार्थ पात्रावर टाकण्यासाठी बनवतो.त्यातच एखाद्या कावळ्याला भूक लागली आणि तो त्या पात्राला शिवलाच तर तो परीवार पुण्य परीवार असे आम्ही समजतो.यात कावळ्याचा आणि पुण्याचा संबंध आला कुठून?वर्षभर ज्या कावळ्याला हाकलतो,कापतो, तोच कावळा या दिवशी देव कसा?तरीही त्याला देव मानत आम्ही आमची संस्कृती जोपासतो.कारण आमचे आमच्या संस्कृतीवर प्रेम आहे.मग ज्या अर्थाने आमचे आमच्या संस्कृतीवर प्रेम आहे.त्याच अर्थाने आमचे आमच्या मायबापावर प्रेम का नाही?आम्ही आमच्या मायबापावरही प्रेम करावे,त्यांना वृद्धावस्थेत त्रास देवू नये.जीवंतपणीच त्यांची फार सेवा करावी.मेल्यानंतर कोण पाहते.तरंच अक्षयतृतीयेला पुण्य घडेल.नाहीतर कितीही सुग्रास अन्न पित्तराच्या पात्रावर चढवाल.कितीही कावळे ते अन्न खातील.तरी तुम्हाला पुण्य लाभणार नाही.कारण पाप आणि पुण्य ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. मायबापाच्या सेवेचे महत्व तुमच्या पुराणातही सापडतात.ज्या महाभारत रामायणाला तुम्ही मानता,त्याच रामायणात मायबापाच्या सेवेचे दृष्टांत दिलेले आहेत.काशीला मायबापाची कावळ घेवून जाणारा श्रवण बाळ रामायणातीलच.तसेच पित्याला व मातेला दिलेले वचन पाळून चौदा वर्ष वनवास भोगणारा राम रामायणातीलच.त्याही वरती जावून ज्या क्रिष्णाला जगात मानाचं स्थान आहे.त्या महाभारताची सुरुवात पाहिली का कधी.नसेल माहीत तर माहीती करुन घेवू.राजा शांतनूच्या दोन राण्या.गंगा आणि सत्यव्रती.भीष्म गंगेचा पुत्र.राजा शांतनूने भीष्माला युवराज घोषीत केलं.तेव्हा राणी सत्यव्रती नाराज झाली.तुमच्या पहिल्या पुत्राला राजगादी आणि मी मात्र दासी.मला दासत्व का?याच दासत्वासाठी माझ्याशी विवाह केला का म्हणून राणी शांतनुला सोडून गेली.ही गोष्ट भीष्माला माहीत होताच त्याची मातृपितृभक्ती जागृत झाली व त्याने कधीही विवाह न करण्याची प्रतिज्ञा केली.तीच भीष्मप्रतिज्ञा होय.या भीष्मप्रतिज्ञेच्या बदल्यात शांतनूने देवव्रताला(भीष्माला) इच्छामरणाचा वर दिला. आई.......मग ती आपल्या आईची सवत का असेना.आई आईच असते.हे रामायण, महाभारत शिकवतं.आम्ही अक्षय तृतीया साजरा करतो.त्या दिवसापुरते मायबाप पित्तरं आठवतो.मोठ्यांची सेवा करावी हेही आठवतो.नव्हे तर या सेवेसाठी आणि पुण्य प्राप्त व्हावं म्हणून दानही करावे म्हणून करतो.पण हा दिवस निघून जाताच आम्ही ही सेवा विसरतो आणि मन मानेल तसे वागू लागतो.हे आमचे कितपत बरोबर आहे?हीच आमची मातृपितृभक्ती असावी काय?ज्या उदरातून आम्ही जन्म घेतो.त्याच उदराला पुढे त्रास देत लोभासाठी त्यांची हत्या करतो?तसेच जे मायबाप आम्हाला हा देव हा दानव हे अंकीत शिकवितात.त्याच मायबापाची तस्वीर भींतीवर लावून त्यांची पुजा करायलाही आम्ही लाजतो.नव्हे तर मायबापाची पुजा करु नका.हे धर्म शिकवितात का?नाही........तरीही आम्ही ते करतोच.हेही कितपत बरोबर आहे.ज्या दगडाला आम्ही देव मानतो.तोच दगड साक्षात आमच्या पुढे आल्यास आम्ही त्याला ठार करतो.हे तरी कितपत बरोबर आहे?(साप सापाला देव मानण्याची प्रथा) या वैज्ञानिक जगात या भौतिक साधनाला देव मानणे सोडा.ज्या पित्तरांसाठी हा दिवस साजरा करताय ना.खरंच सर्वांनी साजरा करा.बंधन नाही.पण.........त्याबरोबर आपल्या पितृमातृभक्तीला सदैव जागृत ठेवा.त्यांनी तुम्हाला उन्हातून सावलीत नेलंय.मृत्यूपुर्वी त्यांची सेवा या अक्षयतृतीयेनिमित्याने घडू द्या तुमच्या हातून.तेच सर्वात मोठे दान आहे.हे लक्षात घ्या.अक्षय तृतीया निमित्यानं केवळ पुजापाठच नको.कर्तृत्वही असावे हेही लक्षात असू द्या. अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०