The sweetness of Maher in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | माहेरचा गोडवा

Featured Books
Categories
Share

माहेरचा गोडवा

माहेरचा गोडवा         गोविंदा आज म्हातारा झाला होता.त्याला चालता फिरता येत जरी नसलं तरी त्याचं डोकं जाग्यावर होतं.त्याची स्मृती अजून गेलेली नव्हती.ती अजूनही शाबूत होती.नव्हे तर तो आपल्या बुद्धीनं आजही विचार करु शकत होता.         त्याला आपल्या मुलीबद्दल गर्व होता.त्याचं स्वप्न होतं की आपली मुलगी वकील बनून समाजातील जे दुर्बल घटक आहेत.त्यांची सेवा करावी.ते स्वप्न साकार झालं होतं.कारण त्याची मुलगी वकील बनली होती.ती लढत होती अन्यायाविरुद्ध.जे कोणी अन्याय आणि अत्याचार करीत होते अबलांवर.          तो तसा खुश होता.पण त्यालाही दुःख व्हायचं.जेव्हा तो भुतकाळ आठवायचा.त्याची मुलगी नयना आणि कांता अशाच अत्याचाराच्या शिकार बनल्या होत्या.          गोविंदाला आज वाटत होतं की आपली मुलगी ज्याप्रमाणं हुंडाबळी स्रीयांना न्याय मिळवून देण्यासाठी लढते.ज्याप्रमाणे ती बलत्कार पिडीतेसाठी लढते.त्याचप्रमाणं तिनं भ्रृणहत्येविरोधातही लढावं.कारण त्या बिचा-या गर्भातील मुली.त्या मुलींचा अजूनही जन्म झालेला नसतो.त्यांनी अजूनही कोणाला त्रास दिलेला नसतो.काही लोकं अत्याचार झाल्यास पाप केल्याचा हवाला देतात.तसं तर काहीच नसतं.कारण ह्या गर्भातील मुलींनी कोणतं पाप केलेलं असतं? तरीही आमचा नागडी समाज त्यांना ठार करतो.कारण मुलगी होणं हाच आजच्या काळातील शाप आहे.           मुलगी झाली रे झाली की तिचा जन्मापासूनच छळ केला जातो.लहानपणीच तिचं नाक कान टोचलं जातं.त्यात तिला असंख्य वेदना होतात.पुढं खेळण्याच्या वयातच तिला घरची सगळी कामं करायला लावली जातात.पाणी भरणे,भांडी घासणे तसेच तिला लवकरच स्वयंपाक शिकवला जातो.मुलगी झालीच तर तिच्या नावानं पाहिजे तेवढ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा केला जात नाही.पण मुलगा झालाच तर खुप खुशी साजरी केली जाते.         पहिली मुलगी झाली.तर मुलासाठी वाट पाहिली जाते.कारण अमर्याद हुंडा आणि समाजातील स्रीयांची असुरक्षितता यामुळं स्रीयांचा जन्म हा नकोसा समजला जावून भ्रृणहत्या........भ्रृणहत्या हा गुन्हा असतांना देखील.काही काही ठिकाणी तर गर्भाला जबरदस्तीनं पाडलं जातं.म्हणूनच याबाबत ठोस कायदा बनायला हवा की जेणेकरुन कोणी भ्रृणहत्या करणार नाही.मुलींना संरक्षण मिळेल.           भ्रृणहत्येबाबत विचार केल्यास जर स्रीला समाजात सुरक्षा मिळाली तर भ्रृणहत्या होणार नाहीत.या सुरक्षेत हुंड्यासाठी मुलींना न छळणे.हुंडा पद्धती बंद करणे.देवदासी प्रथा बंद करणे एवढेच नाही तर ज्या ज्या क्षेत्रात आणि ज्या ज्या ठिकाणी मुलींना छळलं जातं.त्या त्या ठिकाणी चोख बंदोबस्त लावायला हवा.एवढेच नाही तर स्रीयांचे हुंड्यासाठी बळी जात असतील तर तिला सासरी पाठविण्याऐवजी मुलांनीच तिच्या माहेरी येवून राहिल्यास किंवा मुलीनं तिला माहेरी येवून राहायला बोलावल्यास हुंड्यासाठी कधीच छळ होणार नाही.स्रीयांना अभय मिळेल.परंतू जावई सास-याच्या घरी राहायला जावू नये म्हणून काही म्हणी आजही अस्तित्वात आहेत.जसे 'सास-याच्या घरी जावई चोर' 'घरढगल्या' 'बायल्या' खरं तर सास-याच्या घरी जावई जावून राहणे चांगली पद्धत असून त्या पद्धतीतून नक्कीच स्रीयांवरील अत्याचार कमी होवू शकतील.भ्रृणहत्याही कमी होतील.कारण स्रीयांचा सन्मान वाढेल व मुली पैदा करण्यात लोकांना कुचराई वाटणार नाही.पण आज मुली मुलांकडे राहायला जात असल्यामुळे हुंडाबळीसारख्या समस्या आहेत.तसेच भ्रृणहत्याही सर्रास होत आहेत.           आज गोविंदाच्या मुलीनं जनहित याचिका न्यायालयात स्वतःकडून दाखल केली होती.त्यात प्रावधान ठेवलं होतं की विवाहानंतर मुलींनी सासरी राहायला जाण्याऐवजी माहेरीच राहावं.तसेच वर मुलांनी पत्नीकडे येवून राहावं.त्यास हवालाही दिला होता.तो म्हणजे कांता आणि नयनाचा.केवळ नयनाच नाही तर समाजातील कित्येक मुलींचा.ज्या मुली हुंड्यासाठी जाळल्या जात होत्या नव्हे तर बलत्काराच्या शिकार होत होत्या.           आज तिनं दाखल केलेली तक्रार निकाली निघाली होती.न्यायालयानं स्पष्ट आदेश दिला होता की लग्न झाल्यानंतर पतीनं पत्नीच्या माहेरी जावून राहावं.            आज मुलींना अभय मिळालं होतं.मुली हुंड्यासाठी जाळल्या जात नव्हत्या.तसेच गावचीच मुलगी म्हणून गावात बलत्कारही होत नव्हते.एवढंच नाही तर मुलगी होवो की मुलगा, कोणाचीही गर्भलिंगतपासणी केली जात नव्हती.तसेच मुलापेक्षा मुलीच्या जन्माच्या वेळी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला जात होता.आज स्रीयांना माहेरी माहेरचा गोडवा वाटत होता.        अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०