Anubandh Bandhanache - 30 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 30

The Author
Featured Books
Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 30

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ३० )

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे प्रेम आवरून कामाला चालला होता. एरिया मधुन बाहेर पडताच मेन रोड ला त्याला समोरच स्कुटी घेऊन उभी असलेली अंजली दिसली.... तिने लांबुनच त्याला पाहून हात केला.... तो घाईतच तिच्याजवळ जाऊन पोचला आणि तिला म्हणाला.....
प्रेम : तु काय करतेय इथे, एवढ्या सकाळी,...? आणि किती वेळा सांगितलं आहे तुला, इथे नको थांबत जाऊ, सगळे ओळखीचे लोक असतात इकडे.

अंजली : अच्छा...! असुदे मग...! मला नाही कोण ओळखत इथे तुझ्याशिवाय....!😊 आणि तसंही मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला आलेय...! मग त्यांना काय प्रोब्लेम आहे का....?🤔

प्रेम : कधी कळणार तुला काय माहित...!🤦 आधी चल इथून....! 
*असं बोलत तो तिला मागे सरकण्यासाठी सांगुन स्वतःच स्कुटी चालू करून तिथून निघतो. 
थोड्या अंतरावर गेल्यावर अंजली त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारून बसते.
तितक्यात अचानक पाऊस चालु होतो, थोड्याच अंतरावर गेल्यावर प्रेम रोडच्या बाजूला असलेल्या झाडाखाली स्कुटी थांबवतो. दोघेही उतरून त्या झाडाच्या बुंध्याजवळ जाऊन उभे राहतात. तिथेच प्रेम तिला विचारतो.

प्रेम : हा... बोल आता...! का आलीय तु एवढ्या सकाळी सकाळी... ?

अंजली : अरे...! का म्हणजे...?🤔 तुला भेटायला आलेय ना...! असं का विचारतोय तु...?🤨

प्रेम : अरे...! म्हणजे...! एक तर कालच आपण भेटलो होतो ना...! आणि रात्री पण उशीर झाला असेल ना...! मग आराम करायचा...! थकली असशील ना...! कालच्या पार्टी मधे...!😊 

अंजली : अच्छा...! म्हणजे हा टोमणा होता का...!🤨

प्रेम : अरे...! असा का विचार करते, मी तर सहज बोललो. 😊

अंजली : बरं... बरं...! ते जाऊदे....! आता मला नीट सांगशील काल तुला काय झालं होतं...?

प्रेम : मला...! मला कुठे काय झालं...?🤨

अंजली : अच्छा...! काहीच नव्हतं झालं का काल...? एवढं सर्व झालं तरीही....? काल तु अचानक रागात घरी निघुन आलास...! एवढं तरी कळतं मला...! आता तरी बोल ना...? माझं काही चुकलं होतं का...?😔 का असा वागत होतास...?🤔

प्रेम : अरे...! काही नाही....! जाऊदे ना ते...!

अंजली : नाही....! प्रेम,...! प्लिज बोल ना...! मी रात्रभर झोपलेली नाही, कधी एकदा सकाळ होतेय आणि मी तुला येऊन भेटते असं झालं होतं. 

प्रेम : अच्छा...! म्हणुन एवढ्या सकाळी सकाळी यायची काय गरज होती का...? कॉल वर पण बोलु शकली असती ना....?

अंजली : नाही....! मला तुला भेटूनच बोलायचे होते...कळलं...!

प्रेम : अच्छा...! मग बोल काय बोलायचं होतं बरं...! आपल्याला...?

अंजली : प्रेम...! एक विचारू...? मनापासुन सांगशील... ?

प्रेम : अरे....! आता काय हे....? बरं विचार...!

अंजली : तुझं माझ्यावर खरच प्रेम आहे ना....?😔


प्रेम : ओय...! हा काय प्रश्न आहे...? ठिक आहेस ना तु...? काय चाललय तुझं...? 🤔

अंजली : मी ठिक आहे, पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं अजुन....! ते हवंय तुझ्याकडून....! बोलशील...? 

* प्रेम थोडा गोंधळुन जातो, अंजलीने असा प्रश्न का केला असावा...? त्याचे उत्तर काय द्यावे...? थोड्या वेळासाठी तोही शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला आणि म्हणाला...

प्रेम : ज्या प्रश्नाचं उत्तर माहीत असुनही तो प्रश्न का विचारते....?🤨

अंजली : हो...! मला माहित आहे...! पण तुझ्याकडून पुन्हा पुन्हा ऐकायला मला खुप आवडतं...! म्हणुन विचारतेय...!🙂 आता बोलशील....?

प्रेम : (तिला जवळ घेत) आय लव यू....! अंजु.....!😊💞

*अंजली त्याला अलगद बिलगते. थोडी भाऊक होऊन ती त्याला बोलते...

अंजली : आय लव यू प्रेम...! मी तुझा दुरावा नाही सहन करू शकत.....!😔 प्लिज माझ्यापासून कधीच दूर नको जाऊ,...! नाहीतर तुझ्याशिवाय मी मरून जाईन....! 😢

* प्रेम तिचा चेहरा दोन्ही हातात पकडुन तिचे डोळे पुसत तिला बोलतो. 

प्रेम : ओय...! पागल...! वेडी आहेस का तु जरा...? काहीही बडबड करतेय....! काय होतं तुला असं अचानक...?😊

अंजली : काही... नाही...! असच...! काल रात्रीपासून मनात थोडी भीती वाटत होती म्हणुन...!😔 इट्स ओके,...! नाऊ आय एम फाईन...!🙂 सॉरी...!

प्रेम : गुड गर्ल...! 👍🏻😊 आता ओके ना... ? बरं चल आता पाऊस पण कमी झालाय...! निघायचं का...? मला ऑफिस ला सोडलं तर खुप बरं होईल...मॅडम.! मला उशीर होतोय ना....!😊

अंजली : हो....! चला जाऊ...!😊

* पाऊस थोडा कमी झालेला असतो, अंजली स्कुटी चालु करते, दोघेही तिथून निघतात. अंजली त्याला त्याच्या कंपनीच्या थोड्या अंतरावर सोडते. तिथून ती घरी निघुन जाते. 
प्रेम ऑफिस मधे येऊन काल घडलेल्या सर्व गोष्टींचा विचार करत बसतो. तिच्या डॅड समोर घडलेला प्रकार आणि त्यांचा चेहरा त्याला खुप काही विचार करायला भाग पाडत होता. त्यांच्या या नात्याचं भविष्य काय असेल...? अशा परिस्थितीत नको त्या विचारांनी तो गोंधळुन गेला होता. शेवटी या सर्व विचारांमधुन बाहेर पडण्यासाठी तो स्वतःला कामात व्यस्त करून घेतो.

पुढे काही दिवस निघून जातात...! अंजली तिचे कॉलेजचे दिवस एन्जॉय करत होती. ते दोघे अधुन मधुन भेटत असत. कधी कधी अंजली कॉलेज सुटल्यावर घरी येताना प्रेमला त्याच्या कंपनीच्या इथुन पिक् अप करून त्याला त्याच्या घराजवळ ड्रॉप करत असे. तिथून पुढे ती घरी निघुन जात असे. 

असेच पुढचे काही महिने निघून गेले. त्यामध्ये त्याचं भेटणं चालुच होते. पावसाळा संपून पुन्हा एकदा ते नवरात्रीचे दिवस आले होते. प्रेम आता रात्री उशिरापर्यंत तिच्या नजरेसमोर दिसणार होता त्यामुळे अंजली पण खुश होती. 
नेहमीप्रमाणे प्रेम त्याच्या मित्रांसोबत बँजो वाजवण्यासाठी तिथे आलेला असतो. आज नवरात्रीचा पहिलाच दिवस होता. अंजली आज छान यलो कलर चा ड्रेस घालुन आली होती. ती तिच्या मैत्रिणीच्या घरासमोरील बाल्कनीत उभी राहून त्याच्या येण्याची वाट पहात होती. तेवढ्यात एका बाईक वरून प्रेमला तिथे येताना पाहून ती खुश होते. 
बाल्कनीत असलेल्या झाडांच्या आड लपत ती त्याला पहात असते. प्रेम बाईकवरून खाली उतरतो. तो सगळीकडे नजर फिरवत अंजली कुठे दिसते का ते शोधण्याचा प्रयत्न करतो. पण ती त्याला दिसत नाही. म्हणुन तो त्याच्या मित्रांसोबत बँजोच्या सामानाची अरेंजमेंट करत असतो. अंजली मात्र त्याला त्या बाल्कनीत उभी राहून त्या झाडांच्या पानांमधून अगदी निरखुन पहात होती. कधी एकदा खाली जाऊन त्याला भेटावे, असं तिला झालं होतं. पण तरीही ती स्वतःला कंट्रोल करत तिथेच उभी होती.
खाली सर्व तयारी झाली होती. आज नवरात्रीचा पहिलाच दिवस होता आणि वार होता गुरुवार... 

बँजो च्या आवाजाने आरतीचे गाणे चालु झाले. 

" मैं तो आरती उतारूं रे, संतोषी माता की,
जय जय संतोषी माता जय जय मां....
जय जय संतोषी माता जय जय मां...."

लहान मुलांनी टिपऱ्या हाती घेऊन नाचायला सुरुवात केली. हळू हळू रिंगण मोठे होऊ लागले होते. 
आता मात्र प्रेम आतुरतेने अंजलीची वाट बघत होता. अजुन कशी आली नाही ती...? या विचारात त्याची नजर एकडे तिकडे फिरू लागली होती. 
अंजलीची मैत्रीण शिल्पा अजुन तयार होत होती, त्यामुळे तीही वरती अडकून होती, "अगं आवर ना लवकर... किती वेळ लावते," असं बोलत ती तिचा ड्रेस नीट करत होती. तेवढ्यात शिल्पा तिला बोलली !
"अरे हो... एवढी काय घाई झालीय तुला, आत्ताच तर चालु झालाय ना गरबा, आपण काय लहान मुलांमध्ये जाऊन खेळायचं का...? 
त्यावर अंजली बोलली, " अरे त्यात काय झाले मग, आपणही अजुन लहानच आहोत ना...🙂
शिल्पा : मॅडम...! कॉलेज ला जायला लागलो आहोत आपण, लहान नाही राहिलो आता....! आणि आता जरा सांभाळून रहा...! 😊
अंजली : का बरं....?🤔
शिल्पा : काही नाही असच...! 😊
अंजली : शिल्पा...! जरा जास्त होतंय ना....!🙂
शिल्पा : माहीत नाही आज किती विकेट पडणार आहेत....!😊 
* अंजली थोडी डोळे मोठे करून तिच्याकडे पहात बोलते...🤨 आता निघायचं का मॅडम...? कारण तुमचीच तयारी चालू आहे, कधीपासून....! आणि कोणासाठी...! ते पण महितीय मला...! कळलं... ! चला आता खाली, तुमचे मजनू वाट बघत असतील खाली....!😀

दोघी खाली जायला निघतात, तोच खालून मेघा त्यांना आवाज देते. " ओय...! कधीची तयारी चालु आहे तुमची...? या पटकन खाली...!"
सॅड्रिक आणि ती खाली प्रेम सोबत बोलत उभे असतात. मेघाने तिला आवाज देताच, प्रेमची नजर वरती गॅलरीत जाते, दोघांची नजरानजर होते.
अंजली तिथुनच त्याला एक गोड स्माईल देत हाय करते...😊 आणि शिल्पा सोबत खाली येते. 
खाली आल्यावर ती प्रेमला सहज विचारते...

अंजली : हाय...! कसा आहेस...? 😊

प्रेम : मी... मजेत...!😊 तु कशी आहेस...? 😊

अंजली : मी पण मजेत....!😊

* तेवढ्यात मेघा बोलते....

मेघा : ओ...हो... झालं तुमचं....!😊 नाही म्हणजे किती वर्षांनी भेटतोय ना आपण... ? 😊 

अंजली : तु जरा गप्प बसशील....! 😊

मेघा : बरं...! चला आता ज्यासाठी आलोय ते करू....! हो ना अंजु.....?😊

अंजली : मेघा...!.🤫

मेघा : अरे म्हणजे देवीचे दर्शन घेऊ आणि गरब्याला सुरुवात करू....! प्रेम तुझं दर्शन झालं असेल ना...? आम्ही आलोच. (अंजलीकडे पहात) तुझं पण झालं का...? 😀

अंजली : किती बोलते ही....! चल मी पण येते. 😊

शिल्पा, मेघा आणि अंजली देवीचे दर्शन घेऊन येतात. प्रेम आणि सॅड्रिक तिथेच बोलत उभे असतात.

मेघा : चला...! येताय ना तुम्ही...?

प्रेम : तुम्ही चालु करा, मी जॉईन होतो थोड्या वेळात. 👍🏻 

अंजली : लवकरच ये....!😊

मेघा : हो....हो.... येईल हा...! 😊 तुम्ही चला मॅडम, का, तो येईपर्यंत थांबणार आहेस. ?😊

अंजली : चल बाई...! तु तर ना...!😊

प्रेम तिथेच एका खुर्चीवर बसतो. दांडिया चालू असतो, हळु हळु रिंगण मोठे होत जाते. अंजली मुद्दाम हून बाहेरच्या बाजूने दांडिया खेळत असते. जेणेकरून प्रेम तिला दिसेल. अधुन मधुन दोघांची नजरानजर होत असते. त्याच्याकडे लक्ष असल्यामुळे खूपदा तिची टिपरी समोरच्या व्यक्तीच्या हाताला पण लागत असे. त्यामुळे आत्तापर्यंत खुप जणांना सॉरी बोलुन झाली होती. मधेच ती इशाऱ्याने प्रेमला खेळायला बोलवत होती. प्रेम मात्र त्याकडे दुर्लक्ष करत होता.
जवळपास एक तास नॉन स्टॉप दांडिया खेळून झाल्यावर एक एक करत सर्व बाहेर येऊन उभे राहिले. शिल्पा घरी जाऊन दोन थंड पाण्याच्या बॉटल घेऊन आली. 
अंजली आता घामाघूम झाली होती, एवढ्या वेळा बोलऊन सुध्दा प्रेम खेळायला आला नाही, त्यामुळे ती थोडी नाराज झाली होती. 
पण तरीही शिल्पाने आणलेली पाण्याची बॉटल हातात घेऊन ती गटागत पाणी पीत होती.
प्रेमने मागे वळुन एक नजर तिच्याकडे टाकली. पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष करत ती बॉटल सॅड्रिक ला दिली. प्रेमला ते जाणवलं... तो तिथून उठला आणि ते लोक जिथे उभे होते तिथे आला. सॅड्रिक कडून पाण्याची बॉटल घेत पाणी पिणार इतक्यात अंजली बोलली....

अंजली : तु पण दमला असशील ना....? पी पाणी.! 😏

प्रेम : अरे....! 🤔 पिऊ की नको...?😊

मेघा : अरे यार...! प्रेम तु पी पाणी...! ही मुलगी ना..!.😊 

अंजली : तु का सारखी त्याची बाजु घेत असते ग...? एक तास झाला, हा येणार होता ना खेळायला.,?🤨

प्रेम : हो... येणारच होतो...! पण माझे मित्र इथे वाजवायला आलेत मग त्यांना थोडा आराम द्यायला नको का... ? 😊

अंजली : हो... हो...! जसं काही तुच सर्व कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहेस. 😏

मेघा : अरे...! झालं का चालु तुमचं...! पहिल्या दिवशीच भांडायला सुरुवात....! दुर्गा माते...! कसं व्हायचं यांचं...?🙏🏻 

अंजली : तु गप्प बस्....! आमचं जे काही व्हायचं आहे ते चांगलच होणार आहे. कळलं....!😏

मेघा : अरे हो...! तेच मागितलं मी देवीला....!😊🙏🏻

सॅड्रिक : बरं चला आता सेकंड राऊंड...! प्रेम पण जॉईन होईल आता. हो ना प्रेम...!. 😊

प्रेम : हो... चला...! मी तयार आहे. 😊

अंजली : तुम्ही खेळा...! मी आराम करते थोडा वेळ. 

प्रेम तिच्याकडे पाहतो तर ती दुसरीकडे नजर करून त्याला दुर्लक्ष करत होती. 
त्या सर्वांनी पुन्हा खेळायला सुरुवात केली. छान जुनी गाणी चालू होती....
दांडिया पुन्हा रंगात आला होता. प्रेम आतील बाजूने खेळत होता. राऊंड फिरत जेव्हा तो अंजली उभी होती तिच्या समोर यायचा आणि तिला पाहायचा, तेव्हा ती त्याला इग्नोर करायची. मात्र तो जसा पुढे जाईल तसा ती त्यालाच पहात राहायची.
खुप वेळ झाला तरी ती काही खेळायला यायला तयार नव्हती. सर्वजण तिला विनवणी करत होते. तरीही तिचा राग अजुन गेला नव्हता. 
खेळता खेळता शेवटी शिल्पा प्रेमच्या कानात बोलली, " आत्ता बघ ती कशी येते " असं बोलून त्याला बाहेरच्या राऊंड मधे खेळायला सांगितले. त्याच्या बाजुला स्विटी नावाची एक मुलगी दांडिया खेळत होती. 
मागच्याच वर्षी स्विटी शिल्पाला प्रेम ची ओळख करून दे असं बोलली होती, आणि ही गोष्ट तिने अंजलीला सुद्धा सांगितली होती. 
आता मात्र ते पाहून अंजलीला रहावले नाही, ती अजुनच चिडली आणि रागातच ती त्यांच्या दोघांमध्ये येऊन खेळायला लागली. स्विटी कडे एक रागीट नजर देत ती प्रेमच्या बाजुला दांडिया खेळत होती. 
थोड्या वेळाने स्विटी तिथून निघून दुसरीकडे खेळायला लागली. 
ती त्याच्या बाजूला खेळत होती तरी त्याच्याकडे पहात नव्हती. प्रेम मधेच तिच्या कानाजवळ जाऊन तिला बोलत होता.

प्रेम : गेला की नाही राग अजुन...? आता आलोय ना खेळायला...! मग...! 😊 

अंजली : हो... ना...! मस्त मजा येत होती ना...?, 😏

प्रेम : हो...! आत्ता खरी मजा येतेय...! तु आलीस ना !😊

अंजली : हो... हो...! बघितलं मी....! मस्त एन्जॉय चालला होता. 😏

प्रेम : काय बघितलं...? कसला एन्जॉय...? 🤔

अंजली : काही नाही...!.😏

प्रेम : बरं सॉरी....!😊 आता तरी माफ करशील .😊

अंजली : कशाबद्दल... ?😏

* प्रेम तिच्या कानाजवळ जाऊन मोठ्याने पण तिला ऐकू जाईल अशा आवाजात बोलतो.

प्रेम : आय लव यू स्वीट हार्ट...! खुप गोड दिसतेय.😊

* अंजली ते ऐकुन थोडी माघार घेते, आणि बोलते.

अंजली : बस् बस्.....! आता मस्का लावायची गरज नाही.🙂

प्रेम : म्हणजे राग गेला मॅडम चा...?😊

* अंजली त्याच्याकडे पहात फक्त स्माईल करते...😊
तिचा राग निघुन गेलेला असतो. नवरात्रीचे पुढील सर्व दिवस ते लोक खुप एन्जॉय करतात.
शेवटच्या दिवशी नेहमीप्रमाणे फॅन्सी ड्रेस स्पर्धा असते. एक दिवस आधीच सर्वांनी प्लॅन तयार केला होता. यावेळी विषय होता रामायण. 
पात्रांची निवड केली जात होती. फायनली सर्वांचे एकमत होऊन ठरले. रामाचे पात्र प्रेम करणार, सीता... साहजिकच अंजली, सॅड्रिक लक्ष्मणाची भूमिका साकारणार, प्रश्न होता तो हनुमान कोण होणार....? शेवटी शिल्पाचा भाऊ थोडा गुबगुबीत होता, हनुमान तर तोच होणार...मग ठरलं तर सर्वांचं...
सर्व तयारी शिल्पाच्या घरी होणार होती. कारण ती तिथेच पहिल्या मजल्यावर रहात होती. 
दुसऱ्या दिवशी सर्वांनी दुपारी भेटायचे ठरवले. तसे सर्व भेटले प्रेम सुद्धा हाफ डे ची सुट्टी घेऊन आला होता. सर्वजण अगदी उत्साहात होते. 
ड्रेस वाल्याकडे जाऊन सर्व पात्रांचे ड्रेस घेऊन सर्व शिल्पाच्या घरी जमा झाले. चहा नाष्टा करताना खुप गप्पा रंगल्या... नेहमीप्रमाणे मेघा अधुन मधुन प्रेम आणि अंजलीला चिडवत होती. त्यावर अंजली थोडी चिडत होती. मजा मस्ती चालु होती. 
गप्पांमध्ये कधी संध्याकाळ झाली ते कळलं नाही. अंजली प्रेम जवळ जाऊन बोलली.

अंजली : प्रेम...! चल ना आपण घरी जाऊन येऊ. मॉम ला पण सांगुन येऊ म्हणजे पुन्हा इकडे तयारी साठी लवकर येता येईल.

मेघा : आम्ही पण यायचं का...?😊 का राम सीता दोघेच जाताय...? मासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला. 😜

सॅड्रिक : नको...! आपण कशाला,...? आपण बाकीची तयारी करू, त्यांना जाऊन येऊ दे, आणि लवकर या उशीर करू नका....! प्लिज....!🙏🏻

अंजली : हो... रे....! माहितीये मला, रहायला जात नाही. येतोय लगेच मॉम ला सांगुन.... कळलं....!
आणि मेघा....! तुला तर मी बघतेच नंतर....!😏

मेघा : अच्छा...! अगं लहानापासून आपण एकत्रच आहोत. अजुन किती मला बघणार आहेस...? नजर बिजर लावशील नको जास्त बघु....! त्यापेक्षा तिकडेच बघ....!😜

* अंजली तिच्या जवळ जाऊन तिचे केस ओढते...ती ओरडत बोलते.....

मेघा : हे राम... वाचव रे....! तुझी सीता एका अबला नारीवर अत्याचार करत आहे. काय कलियुग आलं आहे. 😀

* अंजली तिला मारतच बोलते....

अंजली : अबला नारी बघा....! हिला तर आपण शुर्पनखाचा रोल द्यायला हवा होता. खूपच बोलते ही. नाक कापायाच्या ऐवजी हीची जिभच कापली असती मी....!😜

मेघा : ओय...! ते लक्ष्मण बाण मारतो. सीता नाही, 😊

अंजली : तरीही मीच मारला असता...!😊

सॅड्रिक : तुमची मस्ती बंद करा, त्यांना जाऊन येऊ दे, आपण बाकी तयारी करू...! चला पटकन...!

अंजली आणि प्रेम खाली उतरून तिच्या घरी जायला निघतात. वाटेत अंजली बोलते....

अंजली : प्रभू....! कसं वाटतंय मग आता....?😊

प्रेम : खूपच छान...! प्रिये...! पण आधी सांगा आपले पितामह घरी आहेत का ?😊

अंजली : अरे... नाहीत...! ते उशिरा येतात माहीत आहे ना तुला. आणि असले तरी काय प्रॉब्लेम आहे तुला...? 🤔

प्रेम : तसं काही नाही, पण माझं असं वरचेवर घरी येणं त्यांना आवडत असेल की नाही माहीत नाही.

अंजली : अच्छा...! मग तसही तु किती वेळा आला आहेस घरी डॅड असताना...? जास्तीत जास्त दोन किंवा तीन वेळा... हो ना...! आणि तसंही माझे फ्रेंड घरी आले तर त्यांना काहीच प्रॉब्लेम नसतो. ते कधीही त्याबद्दल मला बोलत नाहीत. तु उगाच टेन्शन घेतो.

प्रेम : अरे...! तुझ्या बाकीच्या फ्रेंड ची गोष्ट वेगळी आहे, ते ओळखत असतील सर्वाँना. माझं तसं नाही ना....!

अंजली : अच्छा....! मग कसं आहे तुझं, आणि तुझीही ओळख करून दिली आहे मी, त्यांना काही प्रॉब्लेम असता तर ते आधीच बोलले असते...! आणि प्लिज आता हे सर्व डोक्यातून काढून टाक आणि जरा माईंड फ्री हो...!😊

दोघे बोलत बोलत घरी पोचतात. अंजली डोअर बेल वाजवते. मॉम डोअर ओपन करतात. प्रेमला पाहून त्या सुद्धा खुश होतात. दोघे आत येतात. प्रेम समोरील सोफ्यावर बसतो. तोवर मॉम त्याला विचारतात....

मॉम : काय रे प्रेम... कसा आहेस,? खुप दिवसांनी आलास...! जॉब वगैरे कसा चालु आहे...?😊

प्रेम : मी मजेत आहे, जॉब पण ठिक चालु आहे. तुम्ही कशा आहात. ?😊

मॉम : मी अगदी स्वस्थ आणि कामात व्यस्त...!😊

* प्रेम त्यांच्याकडे पाहून हसतो. अंजली आतुन पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि त्याला देते. प्रेम थोडे पाणी पिऊन ग्लास टि पॉय वर ठेवतो.

अंजली : मॉम...! मी काल तुला बोलली होती ना, आजचा फॅन्सी ड्रेस चा प्लॅन. आम्ही आत्ताच ड्रेस वगैरे घेऊन आलो. 😊

मॉम : अरे वा...! छानच 👍🏻 प्रेम तु राम बनणार आहेस असं कळलं. 😊 पण सुंदर दिसशील तु त्या गेट अप मधे. सितेच माहीत नाही....!😊

अंजली : मॉम..!. मी तुला कालच बोलले ना, मी सीता होणार आहे. तरीही तु माझ्याबद्दल काहीच बोलत नाहीस. तोच फक्त सुंदर दिसणार आहे का ? मी नाही..?.😔

मॉम : अरे हो....! माझी जानकी सर्वात सुंदर दिसेल. ओके....!😊

अंजली : ओके...ओके...! बरं आम्ही लगेच जाणार आहोत, खुप तयारी करायची आहे.

मॉम : मग आता पोटभर खाऊन जा, आज दांडिया उशिरापर्यंत असणार मग मधेच सीतेला भुक लागेल.😊

अंजली : नको काही...! मला भुक नाही, आम्ही खाल्ले आहे बाहेर. 

मॉम : ते काही नाही. उपमा करते लगेच. प्रेम सोबत तु पण खा. कळलं....!


अंजली : हो... आईसाहेब....!🙏🏻 तसंही तुम्ही ऐकणार आहात का ? पण लवकर करा, नाहीतर तिकडे मेघा घर डोक्यावर घेईल शिल्पाचे.

मॉम : हो...! होईल लगेच पटकन. 😊

मॉम किचन मधे निघून जातात. अंजली प्रेमला इशाऱ्याने तिच्या रूम मधे यायला सांगते. प्रेम काही तिथून उठत नाही. शेवटी ती त्याला हाताला धरून ओढून तिच्या रूम मधे घेऊन जाते. दरवाजा अर्धा बंद असतो. त्याला आत घेऊन भिंतीजवळ उभी करते. त्याचा चेहरा दोन्ही हातात घेत पटकन त्याच्या ओठांवर किस करते. प्रेम पण तिला रिस्पॉन्स देतो. नंतर ती त्याला घट्ट मिठी मारत त्याच्या कानात बोलते.  

अंजली : हा छोटासा क्षण पण मला खुप एनर्जी देतो. आय लव यू जान....!😘

* प्रेम तिला थोडंसं दूर करण्याचा प्रयत्न करतो पण ती मिठी काही सोडत नाही. 

प्रेम : अंजु.... मॉम....!😊

* ती लगेच बाजूला होऊन दुसरीकडे जाते. प्रेम मात्र तिच्याकडे पाहून हसू लागतो.

प्रेम : घाबरली ना.....?😀

अंजली : पागल....!😊

प्रेम : कुठे पण काय सुरू होते...?. आपण कुठे आहोत हे पण भान नसते. 😊

अंजली : हा... ना....! काय करू... ! तु समोर असला की असं वाटतं खाऊन टाकावं तुला....! तरी मी किती कंट्रोल करते माझं मलाच माहितीय....!😊

प्रेम : अच्छा....! खा मग...!😋

अंजली : आता पुरते बस् , पण नंतर भेट तु एकांतात मग बघ तु....!😊

प्रेम : धमकी देते की, घाबरवते का मला...?🤔

अंजली : तुला जे काही वाटेल ते समज....!.😊

*दोघे बोलत असतात तेवढ्यात मॉम आवाज देतात...

मॉम : उपमा तयार आहे, घेऊन जा बाहेर. गरम आहे तोपर्यंत खाऊन घ्या पटकन. 

* दोघेही तिच्या रूम मधून बाहेर हॉल मधे येतात. अंजली किचन मधे जाऊन दोन्ही डिश घेऊन येते. एक डिश प्रेमला देते, त्याच्या समोर बसुन ते दोघे खाऊ लागतात.
थोड्या वेळात मॉम एका ट्रे मधे चहाचे कप घेऊन येतात आणि दोघांना देतात.
चहा, नाष्टा संपवुन ते दोघे पण शिल्पाच्या घरी येतात.

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️