अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग २८ )
अखेर तो दिवस आला होता. १५ ऑगस्ट.
प्रेम ने आधीच सर्व प्लॅनिंग केले होते. तिचा वाढदिवस सुट्टीच्या दिवशी येत असल्यामुळे तिला जास्त वेळ बाहेर पडता येणार नव्हते, हे प्रेमला माहित होते. कारण त्या दिवशी तिचे डॅड पण घरीच असत. त्यांच्या घरी तर तिचा वाढदिवस खुप मोठ्या उत्साहाने सेलिब्रेट केला जात असे.
पण प्रेमला तिच्यासाठी छोटसं का होईना पण छान काहीतरी सरप्राइज करायचं होतं.
ठरल्याप्रमाणे त्या दिवशी सकाळी ११ वाजता प्रेम आरवची बाईक घेऊन तिला घ्यायला ठरलेल्या ठिकाणी पोचला होता. अंजली अजुन आली नव्हती. हातात फोन घेऊन तिच्या घरी कॉल करावा की नको या विचारात ती येणाऱ्या दिशेकडे पहात तिची वाट बघत तो खुप वेळ तिथे उभा होता.
खुप वेळ वाट पाहिल्यानंतर अखेर त्याला समोरून अंजली येताना दिसली, ती जवळ येऊन त्याच्या समोर उभी राहिली तरी, त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती. एकटक पणे तो तिला न्याहाळून पहात होता. पिस्ता कलरच्या त्या वन पिस ड्रेस मधे ती जणू काही अप्सरा भासत होती.
त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळच हसू उमटलं होतं. अशातच अंजलीने त्याच्या चेहऱ्यासमोर हात नेत एक चुटकी वाजवली. तिच्या हातातील बांगड्यांचा आवाज त्याच्या कानावर पडताच तो भानावर आला. त्याच्याकडे पहात अंजली त्याला बोलली....
अंजली : काय झालं मिस्टर प्रेम...भर दिवसा स्वप्न बघत होता की काय....😊
* प्रेम तिच्या समोर हात करून तिच्या हातात हात मिळवत बोलतो....
प्रेम : हॅप्पी बर्थडे प्रिन्सेस.... तु आज खूपच सुंदर दिसतेय. नजर सुद्धा हटत नाही तुझ्यावरून.... 😊
अंजली : अच्छा... थँक्स फॉर बिग कॉम्पलिमेंट फॉर मी....😍 आणि असं असेल तर मी अशीच उभी राहते इथे, तु बघत बस माझ्याकडे, तुझं मन भरेपर्यंत. 😊
प्रेम : मग इथेच संध्याकाळ होईल, पण माझे मन भरणार नाही. 😊
अंजली : अच्छा... ठीक आहे मग... काय प्लॅन आहे. मिस्टर प्रेम....😊
प्रेम : हो... सांगतो, आधी गाडीवर बस...😊
अंजली : हो... का... बरं कुठे जायचं आहे आपल्याला जरा सांगाल का...? ते काय आहे ना, डॅड ना आज सुट्टी असते. त्यामुळे जास्त वेळ मी बाहेर नाही ना राहू शकत. 😊
प्रेम : अच्छा... म्हणजे हे बरं आहे तुझं, आधीच अर्धा तास लेट आली... आता लवकर घरी पण जायचं आहे. मग जाऊया की नको आत्ताच सांग... का मीच सोडू तुला घरी, आत्ता लगेच....😊
अंजली : अरे सोन्या... चिडतो काय असा, मी अशीच बोलले. 😊 चल कुठे जायचं आहे बरं....,😊
प्रेम : चल सांगतो... आधी बस गाडीवर. 😊
* अंजली गाडीवर बसताच प्रेम गाडीला किक मारतो आणि हाय वे नी सुसाट ते दोघे दादर च्या दिशेने रवाना होतात.
अंजली प्रेमला घट्ट मिठी मारून बसलेली असते. गाडीच्या डाव्या बाजूचा आरसा त्याने असा सेट केलेला असतो की, अंजलीचा चेहरा त्यामधे दिसेल, अधून मधून तिच्याकडे पहात प्रेम गाडीचा वेग अजुन वाढवत असतो. इतक्यात ती अलगदपणे त्याच्या कानाला हलकासा चावा घेत त्याच्या कानात बोलते.
अंजली : इतकीही घाई नाही आहे मला परत घरी जायची, जरा हळू चालवाल का...😊
* प्रेम गाडीचा वेग थोडा कमी करत हायवेच्या एका बाजूने गाडी चालवत असतो. अंजली पुन्हा त्याच्या कानाजवळ येऊन बोलते.....
अंजली : गूड बॉय... बरं आता तरी सांगशील आपण कुठे चाललो आहोत ते...😊
प्रेम : नाही... पोचल्यावर कळेल तुला. 😊
अंजली : बरं ठिक आहे...तुम्हाला सांगायचं नाही म्हटल्यावर आम्ही काय करणार....😊 चलो फिर...लेकीन इतना भी धीरे नही.... वापस भी तो जाना है. 😊
* प्रेम गाडीचा वेग अजुन थोडा वाढवतो, तसे अंजली त्याला अजुन घट्ट पकडते. त्याच्या पाठीवर डोके ठेऊन त्या प्रवासाचा आनंद घेत असते. थोड्याच वेळात ते दोघे दादर येथील सिद्धिविनायक मंदिराजवळ पोचतात.
आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे जरा जास्तच गर्दी होती. प्रेम एका शॉप समोर गाडी लाऊन त्याच्याकडून एक पूजेच्या सामानाचे ताट घेऊन अंजलीच्या हातात देत बोलतो.
प्रेम : आता कळलं आपण कुठे आलोय ते... 😊
अंजली : हो....😊
*दोघेही दर्शनाच्या रांगेत उभे राहतात. रांग हळू हळू पुढे जात होती. दोघे बोलत बोलत पुढे जात होते. एका तासानंतर ते दोघे बाप्पाच्या मुख्य गाभाऱ्यात पोचले. गर्दीमध्ये कसेबसे दर्शन घेऊन ते बाहेर पडले.
पूजेचे ताट परत देऊन दोघे तिथून बाप्पाच्या मूर्तीच्या समोरच बसण्यासाठी जागा होती, तिथे जाऊन बसतात. प्रेम आपले दोन्ही हात जोडुन एकटक बापाकडे बघत बसला होता. तो मनामध्ये बाप्पाकडे फक्त एकच गोष्ट मागत होता. " बाप्पा मी अंजलीला जास्त काही देऊ शकत नाही, आणि तुझ्याकडे फक्त एवढच मागतो की, तिला नेहमी हॅप्पी ठेव, तुझा आशीर्वाद नेहमी तिच्यासोबत असु दे बस... बाकी काही नको.... "
अंजली मात्र त्याच्या बाजुला बसुन हे सर्व पहात होती... प्रेमचे तिच्याकडे लक्ष जातं...
प्रेम : काय.....🙂
अंजली : काही नाही....🙂
प्रेम : बरं... निघुया आता....🙂
अंजली : हो.... 🙂
पुन्हा एकदा बाप्पाचे दर्शन घेऊन बाहेर पडतात. पूजेचे ताट परत करून त्याच्याकडून मोदकाचा प्रसाद घेऊन ते दोघे मंदिराच्या परिसरात असलेल्या शॉप मधे जातात.
प्रेम तिच्यासाठी एक छान ब्रेसलेट घेतो आणि तिला देतो. तिलाही ते खुप आवडते. मग दोघेही गाडीवर बसून तिथून निघतात. वाटेत एका केक शॉप मधुन छोटासा केक घेतो. आणि तिथूनच जवळच असलेल्या एका छानशा हॉटेल समोर तो गाडी पार्क करतो. आणि तिच्या हाताला पकडून तिला आत घेऊन जातो.
दोघे एका टेबलवर समोरासमोर बसलेले असतात. त्याच्याकडे पहात अंजली बोलते.....
अंजली : मिस्टर प्रेम.... खुप छान वाटलं. आजच्या दिवसाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने खुप छान झाली. 😊
प्रेम : अच्छा... खरच का...? 😊
अंजली : हो ना....तुझ्यासोबत असले की सगळच कसं छान वाटतं. 😊
दोघे एकमेकांकडे पहात असतात तेवढ्यात तिथे वेटर येऊन त्यांना ऑर्डर विचारतो. प्रेम त्याच्या हातात केकची बॅग देतो. आणि त्याला कानात काहीतरी बोलतो. वेटर तिथून निघून जातो.
अंजली : काय सांगितलं त्याला तु....🤔
प्रेम : काही नाही... केक डिश मधे घेऊन यायला सांगितले. 😊
अंजली : मग एवढं कानात सांगायची काय गरज होती... ते एवढं सिक्रेट होतं का....😊
प्रेम : हो... होतं.... बरं ते जाऊ दे... तु काय खाणार आहेस. तसं ऑर्डर करायला. 😊
अंजली : अच्छा... खरं सांगू....😊
प्रेम : काय....😊
अंजली : मला तर ना आत्ता तुलाच खावंस वाटत आहे. किती गोड आहेस तू....😘
प्रेम : अच्छा... मग खा... ना..., कोण नको बोललं....😊
अंजली : खाल्लं असतं पण इथे नको... 😋
प्रेम : बरं... आता सांगशील का, काय ऑर्डर करू खायला....😊
अंजली : मला काहीही चालेल, सांग तू... तुला आवडेल ते...😊
प्रेम : अरे.... असं कसं..बर्थडे तुझा आहे... तु सांग तुला काय आवडतं ते...😊
अंजली : मी सांगितलं ना तुला... मला काय आवडतं ते....😋
प्रेम : अंजु..... लेट होईल मग घरी जायला, पटकन बोल. 😊
अंजली : बरं बरं...मी देते ऑर्डर...😊
*ती मेनू कार्ड घेऊन बघत असते तोवर वेटर एका डिश मधे तो केक छान गुलाबांच्या पाकळ्यांनी सजवून घेऊन आलेला असतो.
तो टेबलवर ठेऊन. त्यावर एक कँडल ठेऊन ती लाईटर ने पेटवतो. अंजलीच्या हातात केक कट करण्यासाठी आणलेली सुरी देतो आणि टेबलाच्या बाजूला उभा राहतो.
प्रेम : चला... अंजली मॅडम... केक कट करा आता... 🎂
*अंजली प्रेमकडे हसत पहात... केकवरील मेणबत्ती वर हळूच फुंकर मारते. तसे प्रेम सोबत बाजूला उभा असणारा वेटर आणि बाजूच्या टेबलवरील लोक पण 'हॅप्पी बर्थडे टू यू' बोलत टाळ्या वाजवायला लागतात. अंजली केकचा एक छोटासा पीस कट करून हातात घेते आणि प्रेमला भरवते. प्रेम त्याच्यातीलच उरलेला भाग तिला भरवतो. पुन्हा एकदा तिला हात मिळवत बर्थ डे विश करतो.
प्रेम वेटर ला केक ची प्लेट घेऊन जायला सांगतो. दोघेही टीशु पेपर ने हात साफ करून खाली बसतात. प्रेम तिच्याकडे पहात बोलतो.
प्रेम : अंजु..... हात पुढे कर ना... तुला काहीतरी द्यायचं आहे. 😊
अंजली : अच्छा... आता अजुन काय...🤔😊
प्रेम : वाढदिवस आहे तुझा मग गिफ्ट नको का...?😊
अंजली : हो... का... पण ते तर मला खुप आधीच मिळालं आहे. मग अजुन काय...😊
प्रेम : तु दे ना हात इकडे....😊
अंजली : बरं बरं... हा घे....😊
*असं बोलुन ती त्याच्यासमोर हात करते. प्रेम हळूच त्याच्या खिशातून एक पंचधातूचा कडा काढतो. ( जो मंदिराच्या इथेच त्याने अंजलीच्या नकळत खरेदी केलेला असतो.) तिच्या हातात घालुन तो तिला बोलतो.
प्रेम : अंजु..... तुझ्यासारखं महागडं गिफ्ट तर मी नाही देऊ शकत. पण माझ्याकडून तुला हे वाढदिवसाचं छोटंसं गिफ्ट....😊
अंजली : अच्छा.... झालं तुझं बोलुन, आता ऐक, पुन्हा असं काही बोलू नको प्लीज...🙏🏻 आणि तुला चांगलच माहीत आहे की, माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं आणि महागडं गिफ्ट तु मला आधीच दिलं आहेस. ते म्हणजे तुझं प्रेम.... त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही... कळलं.
आणि हो... हे जे छोटंसं गिफ्ट दिले आहेस. त्यामध्ये बाप्पाचा आशीर्वाद आणि तुझं प्रेम आहे. मग ते छोटंसं कसं...! तेही अनमोलच झालं ना माझ्यासाठी.... मग...😊
प्रेम : बरं ओके.... चुकलं माझं.... मी माझे शब्द मागे घेतो....🙏🏻
अंजली : अरे.... मी असच बोलत होते. बरं आवर लवकर, घरी पण जायचं आहे ना...😊
प्रेम : हो... मग काय खायचं ठरवलं आपण...😊
अंजली : मी सांगते... साऊथ इंडियन हॉटेल आहे ना... मग मसाला डोसा घेऊ....😋
प्रेम : बरं... चालेल....👍🏻😊
* प्रेम वेटर ला बोलऊन ऑर्डर देतो. आणि दोघे बोलत बसतात थोड्या वेळात वेटर डोसा घेऊन येतो. अंजली चमच्याने एक पिस कट करून प्रेमला भरवते. आणि स्वतः पण खात असते. ते उरकल्यावर दोघे कॉफी पिऊन तिथून घरी यायला निघतात.
ते दोघे तिथून हाय वे ला पोचतात, थोड्या अंतरावर जातात तसा हलकासा पाऊस चालु होतो. दोघेही भिजत असतात. अंजली प्रेमला पाठीमागून घट्ट मिठी मारून बसलेली असते. पाऊस वाढायला लागतो म्हणून प्रेम गाडी सर्व्हिस रोड ला घेऊन एका झाडाखाली थांबवतो. दोघेही गाडीवरून उतरतात. प्रेम हेलमेट काढून गाडीला अडकवतो. आणि तिच्या ओल्या झालेल्या केसांवरून हात फिरवत तिला बोलतो.
प्रेम : सॉरी..... माझ्यामुळे आज तुला भिजावं लागत आहे. 😊
*अंजली इकडे तिकडे बघत त्याच्या जवळ येते आणि त्याला मिठी मारत त्याच्या ओठांवर किस करते.
झाडावरील पाण्याचे थेंब तिच्या चेहऱ्यावर टपकत असतात. दोघेही ओलेचिंब भिजलेले असतात. तिच्याकडे पहात तिच्या चेहऱ्यावर आलेले तिचे ओले केस कानावरून बाजूला करत प्रेम सुद्धा तिला किस करतो. 💞
दोघेही थोडा वेळ एकमेकांच्या मिठीत सामावून जातात. तेवढ्यात तिथे अजुन एक कपल गाडीवरून थांबते. त्यांना पाहून ते दोघे जरा वेगळे होतात. तरीही अंजली त्याला बिलगुन उभी असते. थोडा पाऊस कमी आल्यावर दोघेही तिथून सर्व्हिस रोडनेच पुढे जायला निघतात.
अंजली मागे बसून दोन्ही हात पसरून हलक्याशा पडणाऱ्या पावसाच्या सरींचा आनंद घेत गाणं गुणगुणत असते.
🌧️ अब के सजन सावन में,
आग लगेली बदन में,
घटा बरसेगी, नज़र तरसेगी मगर,
मिल ना सकेंगे, दो मन, एक ही आँगन में....🌧️
* गाणे बोलत असताना मधेच ती त्याला मिठी मारत त्याच्याशी मस्ती करत असते. प्रेम आरशातून अधून मधून तिला पहात असतो.
पावसातील हा रम्य प्रवास आता संपायला आलेला असतो. ते दोघे अंजलीच्या घरापासून काही अंतरावर पोचलेले असतात. पाऊस पण आता थांबलेला असतो. आणि तसा थोडा उशीर पण झालेला असतो. म्हणून अंजली पण गाडीवरून उतरून घरी जायला निघते. जाता जाता प्रेमला एक घट्ट मिठी मारते. आणि पटकन त्याच्या गालावर किस करत बोलते.
अंजली : थँकयु वेरी मच... यू मेक माय डे.... ब्युटीफूल अँड रोमँटिक.....💞😘
प्रेम : अच्छा... 😊
अंजली : बरं... मी आता निघते. खुप उशीर झालाय ऑलरेडी...आणि त्यात मी भिजलेय, आता तर डॅड चा ओरडा खावा लागणार....😋
प्रेम : बरं ओके...पुन्हा एकदा हॅप्पी बर्थडे....आणि आता जा... तु.... खरच उशीर झालाय... बाय....😊
* ती तिथून निघते.... प्रेम तिथेच उभा राहून तिच्याकडे पहात असतो. पुढे जाईपर्यंत ती खूपदा मागे वळून प्रेमला जाण्यासाठी इशारे करत असते. शेवटी ती दिसेनाशी झाल्यावर प्रेम गाडीवरून घरी जायला निघतो.
घरी आल्यावर बाप्पाचा प्रसाद ताईकडे देतो. ताई त्याच्याकडे पहात त्याला विचारते.
ताई : अरे.... आज अचानक मंदिरात जाऊन आलास. सकाळी पण बोलला नाहीस, जाणार आहे म्हणून....🤔
प्रेम : अगं ते अचानक ठरलं, म्हणून मित्रासोबत जाऊन आलो.
ताई : बरं ठीक आहे, हात पाय धुवून घे, मी जेवायला वाढते.
* प्रेम थोडं जेवून घेतो, आणि टीव्ही बघत बसतो. संध्याकाळी त्याच्या मोबाईलची रिंग वाजते. तो जवळ घेऊन नाव बघतो. तर अंजली होम. तो थोडा टेन्शन मधे येतो, ताई घरात नाही हे पाहून तो कॉल रिसिव्ह करतो. समोरून मॉम बोलत असतात.
मॉम : हाय प्रेम... कसा आहेस ? घरी येतोय ना मॅडम च्या बर्थडे ला...?😊
*प्रेम ला काय बोलू ते सुचत नव्हते... तरीही त्या गडबडीत तो बोलून जातो....
प्रेम : हो... येईन....पण अंजली कुठे आहे. मला बोलायचं आहे तिच्याशी.
मॉम : अरे ती डॅड सोबत शॉपिंग ला गेलीय. आज काय तिचा दिवस आहे. 😊
प्रेम : बरं ओके... 😊
मॉम : नक्की ये पण, नाहीतर मॅडम मलाच ओरडतील तु बोलवलं नाहीस म्हणुन...😊
प्रेम : हो... येईन नक्की....😊
मॉम : बरं ठिक आहे, मी ठेवते आता, अजुन खुप कॉल करायचे आहेत आणि तयारी सुद्धा.
प्रेम : हो... चालेल. 😊
* कॉल ठेऊन दिल्यावर मात्र त्याला अजुन टेन्शन येतं. आता पुन्हा घरी जावं लागणार. तिच्या डॅड ना फेस करावं लागणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला सर्वासामोर गिफ्ट कसं आणि काय देणार. असच रिकाम्या हाताने तर जावू शकत नाही. पण आता जावं तर लागणार. कारण मॉम नी खास आमंत्रण दिलं होतं. चला मग तयारीला लागा... असं मनातल्या मनात बोलत तो उठतो आणि फ्रेश होऊन छान तयार होऊन बाहेर पडतो.
गिफ्ट काय घ्यायचं या विचारात तो गिफ्ट शॉप मधे खुप वेळ फिरत असतो. काय घ्यायचं ते त्याला काहीच सुचत नाही. शेवटी थोड्या वेळाने तिथून काहीच न घेता तो बाहेर पडतो.
थोड्या अंतरावर पुढे जात असता त्याची नजर एका शोरुम मधे काचेत लावलेल्या घड्याळाकडे जाते. पाहताक्षणी ते घड्याळ त्याला आवडते. आजपर्यंत त्याने स्वतः कधी साधं घड्याळ वापरलं नाही. आणि एवढ्या मोठ्या शोरुम मधे जाण्याचा प्रश्नच नाही.
पण ते घड्याळ अंजली साठी घ्यायचच या विचाराने तो आत मधे जातोच.
समोर काउंटर वर उभी असणारी मुलगी हसत त्याच्याकडे पाहून बोलते. "या ना सर... काय हवंय... जेन्स वॉच हवंय... कशा टाइप मधे दाखवू.... नॉर्मल ...स्पोर्ट...😊
प्रेम त्या काचेत लावलेल्या घड्याळाकडे बोट दाखवत बोलतो. " त्या घड्याळाची किंमत किती आहे ?"
ती मुलगी काचेतून ते घड्याळ बाहेर काढत " अच्छा... हे...😊 कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं आहे का...? 😊 खुप सुंदर चॉईस आहे तुमची, एकदम लेटेस्ट मॉडेल आहे. ज्या कोणाला देणार असाल त्या हे पाहून खुप खुश होतील.
त्या मुलीच्या बोलण्यातून अजुन घड्याळाची किंमत किती आहे हे काही तिने सांगितलं नव्हतं.
प्रेम ते घड्याळ हातात घेऊन बघतो. त्याला ते खरच खूप आवडलेले असते. म्हणुन पुन्हा तो त्या मुलीला त्याची किंमत विचारतो.
ती मुलगी एक पेपर हातात घेऊन चेक करत त्याला बोलते. " सर... हे वॉच तुम्हाला फक्त वन थाउजंड नाईन हंड्रेड नाईंटी नाइन ला पडेल. 😊
किंमत ऐकुन प्रेम एकदम थक्क होऊन जातो. हातातील घड्याळ त्या मुलीला परत करत तो त्या मुलीला बोलतो... " सॉरी मॅडम, मी हे नाही घेऊ शकत." ती मुलगी त्याला पुन्हा विचारते, " मग तुम्हाला कमी रेंज मधील दाखवू का...?"
ते घड्याळ इतकं त्याच्या मनात भरलं होतं की, प्रेमला दुसरं घड्याळ बघण्यात काहीच इंट्रेस नव्हता. तो त्या मुलीला बोलतो, "नको... मी हेच घेऊन जाईन पण आत्ता नाही." असं बोलुन तो शोरुम च्या बाहेर येतो. थोडा साईट ला जाऊन खिशामधील पाकीट काढून चेक करतो. जेमतेम सातशे पन्नास रुपये त्यात असतात. चोर कप्प्यात जपुन ठेवलेले हजार रुपये त्याला आठवतात. ते पकडून पण तरीही रक्कम पूर्ण होत नव्हती. काय करावे त्याला सुचत नव्हते. पुन्हा जावून त्यांना विचारावे का...? अजुन कमी करतील का....?
त्या विचाराने तो पुन्हा आत जातो... ती मुलगी समोरच उभी असते. त्याला बघुन ती बोलते... "अरे तुम्ही आलात परत... काय झालं... करू ना पॅक ते वॉच...😊" असं बोलून ती ते घड्याळ बाहेर काढत असते तोवर प्रेम तिला बोलतो..." मॅडम ऐका ना... प्राईज थोडी कमी नाही का होणार... अजुन..."
ती मुलगी त्याला बोलते, " सर... अहो मी तुम्हाला ऑलरेडी डिस्काउंट करूनच प्राईज सांगितली होती. ती फायनल आहे. अजुन कमी नाही होणार. "
ते ऐकून प्रेम बोलतो, " मग राहू दे... माझ्याजवळ पैसे थोडे कमी आहेत. तुम्ही ठेऊन द्या ते घड्याळ परत."
ती मुलगी जरा रागानेच त्याच्याकडे बघत बोलते. " अहो मग कशाला काढायला सांगितलं, आधीच सांगायचं ना तेवढे पैसे नाही आहेत म्हणुन... मी तुम्हाला कमी रेंज मधील वॉच दाखवत होते ना मघाशी..."
तिचं बोलणं ऐकून प्रेम बोलतो," सॉरी मॅडम... पण मी तुम्हाला फक्त विचारण्यासाठी आलो होतो. तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल खरच सॉरी 🙏🏻"
त्याच्याकडे पहात ती बोलते," अहो... ठिक आहे. जावू दे... या तुम्ही...🙏🏻"
प्रेम त्या शोरुम मधुन बाहेर पडत असतो इतक्यात त्याच्या कानावर एक आवाज येतो.
" एक्स् क्युज मी... काय झालं तुम्हाला आवडलं नाही का ते वॉच...?"
त्या शोरुम ची मॅनेजर एक लेडीज होती, आणि तिनेच प्रेमला आवाज दिला होता. खुप वेळ झाला ती हे सर्व पहात होती. एव्हाना सर्व प्रकार तिच्या लक्षात आला होता. म्हणूनच प्रेमला बाहेर जाताना बघताच तिने तिथे येऊन त्याला आवाज दिला.
प्रेम पुन्हा मागे वळुन पहात त्या मॅडम ना बोलतो, "तसं काही नाही मॅडम... मी नंतर येऊन घेऊन. आत्ता पैसे कमी आहेत माझ्याजवळ. "
त्यावर त्या मॅडम बोलतात,"बरं ठीक आहे, पण किती कमी आहेत."
प्रेम बोलतो " तुमच्या किमतीपेक्षा दोनशे पन्नास रुपये कमी आहेत."
मॅडम बोलतात," मग तुम्ही दुसरं वॉच घ्या ना जे त्या किमतीत बसेल, आमाच्याकडे कमी रेंज मधे पण खुप छान डिजाइन आहेत."
प्रेम बोलतो, " नाही... मॅडम... मी तेच घड्याळ घेऊन जाईन."
मॅडम बोलतात,"अच्छा... असं आहे तर... खुपच आवडलेललं दिसतंय तुम्हाला...😊 गिफ्ट वगैरे द्यायचं आहे का...?😊"
प्रेम बोलतो," होय....😊"
मॅडम जरा हसतच बोलतात..."बर्थ डे गिफ्ट, सम वन स्पेशल....😊 !"
प्रेम हसतच त्यांना मानेनेच होकार दर्शवतो. 😊
त्याला पाहून मॅडम बोलतात " कधी आहे बरं बर्थ डे....त्यांचा....😊"
प्रेम बोलतो," आजच आहे....😊"
मॅडम बोलतात,"मग तर तुम्हाला हे आजच घेऊन जायला हवं...."
प्रेम बोलतो," हो....पण...🙁"
त्याच्याकडे पहात मॅडम बोलतात,"बरं ठिक आहे, तुम्ही या इकडे काउंटर वर....आपण बघु काय ते...😊"
प्रेम त्यांच्यासोबत मेन काउंटर वर जातो. त्या मॅडम त्या मुलीला ते घड्याळ घेऊन यायला सांगतात. त्याच्या हातात देत त्या मॅडम बोलतात," चेक करून घ्या... ब्रँडेड आहे... पाच वर्ष गॅरंटी सुद्धा आहे. मी पॅक करायला सांगु ना....?😊"
प्रेमला काही कळत नाही, तो मॅडम ना बोलतो, " मॅडम पण ते पैसे कमी आहेत ना माझ्याजवळ मग.....?"
मॅडम बोलतात, " ठिक आहे ना.... नंतर द्या, जमलं तर, आणि नाही जमलं तरी चालेल, तुमच्या गिफ्ट मधे आमचं थोडं कॉन्ट्रब्युशन असं समजा... चालेल ना...😊
त्यांचं बोलणं ऐकून प्रेम मनातल्या मनात खुप खुप होतो. तो मॅडम ना बोलतो, " थँकयु सो मच... मॅडम,.... मी उरलेले पैसे नक्की देऊन जाईन. चार पाच दिवसात. "
असं बोलुन तो खिशातले सतराशे पन्नास रुपये एकत्र करून काउंटर वर ठेवतो.
ते पाहून मॅडम त्याला बोलतात," त्याची काहीच गरज नाही, आपलं ठरलं ना आत्ताच, उरलेले कॉन्ट्रब्युशन माझ्याकडून.... आणि सोबत बर्थ डे विश पण....सांगा नक्की त्यांना.😊"
प्रेम खुश होऊन बोलतो,"हो नक्की सांगेन, आणि पुन्हा एकदा तुम्हाला... थॅन्क्स 🙏🏻"
मॅडम बोलतात," बरं पुरे आता... लवकर घेऊन जा आता, उशीर होईल नाहीतर, तुमच्या मॅडम आतुरतेने वाट पहात असतील तुमच्या स्पेशल गिफ्ट ची...😊"
असं बोलुन त्या मॅडम ते घड्याळ पॅकिंग करण्यासाठी देतात. थोड्या वेळात ते पॅक होऊन एका छोट्याशा बॅग मधे त्याच्या समोर काउंटर वर ठेवले जाते. आणि त्याच्या हातात बिल दिले जाते... बिलाची रक्कम तेवढीच असते एक हजार नवशे नव्यांनऊ रुपये...
प्रेम ते बिल तसेच बॅग मधे टाकत असतो. त्याला त्या बॉक्स सोबत एक कॅडबरी सुद्धा दिसते. ती बाहेर काढत तो मॅडम कडे पाहतो.
तेवढ्यात मॅडम बोलतात..."हे माझ्याकडून बर्थ डे गर्ल साठी. 😊"
ती कॅडबरी तशीच पुन्हा आत ठेवत तो पुन्हा त्या मॅडम ना थँकस् बोलुन आनंदाने तिथून बाहेर पडतो.
या गिफ्ट मुळे खुपच वेळ गेला होता. पटापट चालत तो बसस्टॉप गाठतो. थोड्याच वेळात त्याला तिच्या घराकडे जाणारी बस् पकडतो. पंधरा मिनिटातच तो अंजलीच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या बसस्टॉप वर उतरतो.
रात्रीचे नऊ वाजलेले असतात. बसस्टॉप वरून अंजलीच्या घरी जायला निघतो. सोसायटीच्या गेट वर आल्यावरच त्याला पहिल्या मजल्यावर केलेली लायटिंग दिसते, तिच्या घरी चालु असलेल्या गाण्यांचा आवाज कानावर पडतो. त्याच्या मनात असलेल्या एका वेगळ्याच भीतीने तो स्वतःला रोखत तिथेच थांबतो. पण शेवटी मॉम चा विचार करून घराकडे जायला निघतो. जिन्याच्या पायऱ्या चढत पहिल्या मजल्यावर पोचतो. पुढे होऊन तो घरामधे वाकून पाहण्याचा प्रयत्न करतो.
आतमधे खुप लोक होते. आत जाऊ की नको असा विचार करत तो तिथेच दरवाज्याजवळच उभा असतो.
त्या गर्दीमध्ये लोक आत बाहेर येत जात होते, त्यामुळे अनेकांचा त्याला धक्का लागत होता. तसे ते सर्व अनोळखीच असल्यामुळे सर्व त्याच्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघत होते,
जणू काही त्याला प्रश्नच विचारत होते..."कोण तु....? इथे का आला आहेस....?"
त्याला थोडं अस्वस्थ वाटू लागलं होतं. खरच आपण इथे येऊन चुक तर नाही केली ना...?
असा विचार त्याच्या मनात येऊ लागला होता. तोवर अचानक गाण्यांचा आवाज बंद झाला आणि कोणीतरी माईक वर इंग्लिश मधे काहीतरी बोलू लागले होते.
त्याची नजर समोर गेली असता. त्याला अंजली नजरेस पडली. तिला पाहताच मनातले सगळे प्रश्न बाजूला पडले आणि तो तिला त्या गर्दीतून एकटक पहात राहिला होता.
आज पुन्हा एकदा खरच ती एखाद्या परीसारखी सजली होती. तिला पाहून खरच हेवा वाटावा इतकी ती सुंदर दिसत होती. प्रेमची नजर काही तिच्यावरून हटत नव्हती.
एवढ्या गर्दीतून तिची नजर आपल्यावर कधी पडेल या आशेने प्रेम तिच्याकडे पहात होता.
क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️