Niyati - 39 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 39

Featured Books
Categories
Share

नियती - भाग 39













भाग 39



जॅक म्हणाला..."नको... तिघेही आले म्हणजे मी त्यांच्यासोबतच जाईन नाश्ता करायला..."

त्याने सांगितल्यानंतर शाला पुढे निघाली ..शालाच्या मागे कळसुत्री बाहुली प्रमाणे मायरा चालू लागली...
तेवढ्यात जुलीने जॅकला लोचट नजरेने मायराकडे पाहताना पकडले .... तसं त्याने डाव्या हाताने केसांचा झूपका कपाळावरून मागे सरकवत जुलीकडे बघून एक डोळा बारीक केला आणि पुन्हा... मायरा समोर जात होती... तर तिची आकर्षक मागून दिसणारी फिगर तो ताडू लागला...
मायराची पाठ त्या दिशेने असल्यामुळे ती जॅक आणि जुलीची नेत्रपल्लवी पाहू शकली नाही....

दोघींच्याही मागे जुली फास्ट निघाली.... त्यांच्याजवळ जात जुली मायराला म्हणाली....की.....

"हे मायरा.... आपण चाय घ्यायचा का...??"


त्यावर मायराने होकारार्थी मान हलवली...

तिला चहाची किती गरज होती ....???ते तिलाच माहिती होते.
सकाळच्या अकरा वाजायला आले होते आता. काल रात्रीपासून तिच्या पोटात जेवण...पाण्याचा थेंबही गेला नव्हता. तिला काही खावेसेच वाटत नव्हते.. घरी कधीही तिला कामं करण्याची गरज पडली नव्हती. पण आता इकडची गोष्ट वेगळी होती .तिला थोडीफार कामे करावी लागली...जागरण दोन दिवसापासून सुरू होते सारखे.. जागरणाने... श्रमाने आणि भुकेने तिचे शरीर पिळवटून निघाले होते... खरंतर तिला माहिती होते की मोहित सुद्धा तसाच आहे... त्याचेही जेवण.... रात्री कसा बसा दोन-तीन घास जेवलेला होता तो... सर्व त्यांची जाण्याची सोय सुरू होती ....त्याच भानगडीत होता...


तेथे टपरी सारखे स्टॉल होते या तिघेही तेथे पोहोचल्या. तिथे गेल्यावर तिथले काचेच्या आत मध्ये असलेले खाद्यपदार्थ पाहून मायराची भूक जास्त भडकली. शाला आणि जुली एका कोपऱ्यातल्या टेबलाकडे गेल्या. तशी त्यांच्या मागून यंत्रासारखी मायरापण गेले. तेथे या तिघींशिवाय कोणीही नव्हते...

आता मायराच्या चेहऱ्यावरील कावरे बावरेपणा आता कमी झाला होता...


कारण तिला समोरून त्या दोन फोटोग्राफर सोबत मोहित येताना दिसला... दुरूनच मायरा त्याच्याकडे बघत होती.
ते तिघेही जॅक जवळ गेले आणि सामान घेऊन यांच्याकडे टपरीच्या दिशेने येऊ लागले.



तेथे आल्यानंतर मोहित ने मायराकडे पाहिले.. मायरा त्या तिघी मध्ये उजव्या साईडने बसलेली... तिने नजरेने मोहितला इशारा केला आणि तो तिच्या बाजूला बसला... त्याबरोबर मायराने
त्याच्या दंडाला हात टाकून पकडून बसली.... 


तसे त्याने तिच्याकडे बघितले.. तर तिची नजर ....
" मला एकटा का सोडून गेला....????".... हा जाब विचारत होती...
ते ओळखून त्यानेही नजरेनेच "सॉरी" म्हटले.


बाकीचे पाचही जण ....त्यांनी चहाची ऑर्डर दिली....
पण मोहितला कल्पना होती की.. मायराला फार भूक लागलेली असेल... आणि त्यालाही तर भूक लागलेली होती....

त्याने हळूच विचारले....
" मायू.... आपण काहीतरी थोडसं खाऊ आणि मग नंतर चहा घेऊ...."


त्यावर तिने उत्तर देण्या अगोदरच त्याने छोले भटूरे होते तर नाश्त्याची ऑर्डर दिली....

दोघांच्या दोन्ही साईडने.... मोहितच्या उजव्या साईडने ते तिघेही फोटोग्राफर बसलेले होते... मायराच्या डाव्या बाजूने शाला आणि जुली बसलेल्या होत्या...


टपरीवाला जेव्हा  छोले भटूरे घेऊन आला तेव्हा...
या दोघांना खाण्यासाठी जागा व्हावी म्हणून.... बाजूचा कोपऱ्यातला आणखी एक टेबल रिकामा होताच तो साफ करून दिला.....

आता कुठे मायराला मोकळे वाटू लागले... तिला तेथे ते पाचही जण अवतीभवती होते तर कसेतरी वाटत होते.

एक छोटासा टेबल आणि बसायचासुद्धा एक छोटासा बेंच...
मायराला मोहितने आपल्या उजव्या बाजूने भिंतींकडून बसवले.

तस ती आता मोहितच्या आड बसली गेल्यामुळे तिला निश्चित वाटत होते...
डाव्या हाताने त्याचा हात पक्का पकडून उजव्या हाताने छोले भटूरे खाऊ लागली.... त्याचे छोले भटूरे खाता खाता लक्ष मायरा कडे गेले तर तिला..... मन लावून खाताना पाहून...
त्याला लक्षात आले की तिला किती भूक लागली असावी..
लाडाकोडात वाढलेली.. बंगल्यामध्ये ऐशआरामाचे जीवन जगणारी...... आपल्यामुळे तिने भूक सहन केली..... आणि आता साध्याश्या टपरीवर आपल्या सोबत  साधे जेवण जेवत आहे.. कोणतीही कुरकुर नाही.....

तिला असं समाधानाने खाताना बघून... त्याने ठरवून टाकले की ...
"आता...तिच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये आपल्या हातून....
निदान तिचे जेवण तरी बरोबर केले पाहिजे.."



छोले भटूरे खाऊन झाल्यानंतर....

मोहित.....
"खूप भूक लागली होती ना...!!"


मायरा....
"खरंच खूप...."



मोहित....
"मग सांगायचं ना राजा....!!! बर आता चहा घ्यायचा...
(टपरीवाल्याकडे बघून)"
दादा...... दोनकट छान चहा द्या"


चहा यायचा होता दोघांचा... तर ....तर मायराने त्याच्या दंडाला चिमटा काढला कोणाला दिसायला नाही पाहिजे असा...
तिने तसं करताच तो तिच्याकडे पाहू लागला.

"तिकडे हळूच बघ.... उजव्या साईडला बघ..... दिसलं...,"


तसं त्याने मग ती सांगते त्या दिशेने बघितले.....

तर तेथे भिंतीवर एक रंगीत पोस्टर होते.... उलटा रेड कलरचा ट्रँगल..


आणि त्यावर चित्र रेखाटले होते पुरुषस्त्रीचं जोडपं आणि त्याखाली एक मुलगा आणि एक मुलगी.
आणि लिहून होतं......." हम दो .....हमारे दो."

तो तिकडे म्हणत मंदस्मित करत पाहात वाचू लागला...
इकडे मायराचे सहज बाजूला लक्ष गेले ... तर तिला जॅक डाव्या हाताने केस मागे सारत उजव्या हातातील सिगरेटचा दीर्घ झुरका घेत तिच्याकडे एकटक डोळे ठेवून पहात होता.... जसे तिने त्याच्याकडे पाहिले तसेच त्याने एक डोळा मिचकवला.

ते बघून तिला किळसवाने वाटले पण मग तिला कदाचित आपला... भ्रम होतो आहे...
त्याला तर माहित आहे की आम्ही नवरा बायको आहोत... मग तो असा कशाला करेल...???? असा स्वतः विचार करत मोहित सोबत समाधानाने ....छोटे कुटुंब सुख महान.... स्लोगन लिहिलेले तो पोस्टर.... दोघेही त्या पोस्टर कडे पाहून स्वतःला विसरून गेले.... नकळत तिच्या हाताची बोटे त्याच्या हातात घट्ट रोवली तिने.... तसे त्यानेही त्याच ओढीने हातातला हात घट्ट तिच्यासारखाच पकडला. आणि दोघेही एकमेकांकडे बघून 
मंदस्मित करू लागले......

सर्वजण... तेथे जवळच असलेले शंकर-पार्वतीच्या मंदिराच्या परिसरात तेथील ट्रस्टींनी बांधलेले भक्तनिवास...धर्मशाळा...
तेथे त्यांना मिळालेल्या रूममध्ये गेले...
त्यांच्यासाठी तीन रूमच्या चाव्या मिळाल्या होत्या.
एका रूममध्ये शाला आणि जुली राहणार होती. एका रूममध्ये तिघेही फोटोग्राफर... आणि एका रूम मध्ये हे दोघे.... मायरा आणि मोहित....


हे दोघे नवरा बायको असल्यामुळे यांना.. परिवार राहण्यासाठी ची सोय पाहिजे आहे त्यानुसार भक्तनिवासामधील रूम दिल्या गेली होती.... रूमवर आल्याबरोबर....
मोहितने जवळचे त्याने खाली सामान ठेवले.... मायराने आतून कडी घातली दाराला....

आणि त्याच्याजवळ गेली... तो उभा होता तिथे जाऊन त्याला बिलगली..... त्यानेही तिला जवळ घेऊन पाठीवरून प्रेमाने तिच्या हात फिरवले..... दोन मिनिटं तसेच उभे राहिले एकमेकांजवळ....

एकमेकांच्या बाजूला होताच त्याने तिची हूनवटी वर धरून
मायराला विचारले.....
"..मायू.... जा तिथे बस आरामशीर... मी आंघोळ करण्यासाठी गरम पाणी आहे का बघतो..??"

तसे तिने मग अंगावरचे दुपट्टा काढून टाकला आणि आरामशीर टेकून बसली....
त्याने तिथे रूम मध्ये कोणती कोणती व्यवस्था आहे ....??
चेक करत बघत होता.....


गरम पाण्याचा गिझर आहे लक्षात येताच त्याने गिझर ऑन केला.... आणि बाहेर येऊन त्यांच्या खोलीला एक दार दिसत होते ... ते खोलले..... तर...

आश्चर्याने त्याचे डोळेच मोठे झाले...
..... आपोआप त्याच्या तोंडून उद्गार निघाले.....

"वाह...!!!. मायू... इकडे बघ..."



तशी तीही लगबगिने त्याच्याजवळ गेली.... तीही बाहेरचा नजारा बघून मंत्रमुग्ध झाली... बाहेरचे दृश्यच एवढे नयनरम्य होते की किती पहावे आणि किती नको.....


ती त्याच्या पुढ्यात उभी राहिली आणि तो तिला मागून मिठीत घेऊन बाहेर बघू लागला.....

भक्तनिवासातली त्यांची रूमची दिल्या गेलेली होती त्यांना .
ती दुसऱ्या मजल्यावर होती.... आणि हे भक्त निवास 
टेकडावर होतं.... वरून त्यांच्या खिडकीतून.... निसर्गाने घडवलेली किमया.....
धरतीमातेला या किमयेने दिलेला        ...हिरवा शालू
तिने परिधान केलेला... आणि त्यात तिचा रूप खुलून आलेलं होतो.... सूर्याचे सोनेरी किरणे त्यावर आलेली... 
त्यात तो शालू चमकत होता....


....
मंद मंद गार वारा दरवळत होता... या गार वाऱ्याची शीळ तिथे जाणवत होती.


मोहित तिच्या खांद्यावर ठेवून बाहेर पाहत असताना...


तो म्हणाला.....
" किती सुंदर दिसतेय ना....?? मी इमॅजिनच केलेलं नव्हतं की असाही सुंदर दिवस येईल आपल्या जीवनात.... तू अशी माझ्या मिठीत उभी असशील बिनधास्त.... याच्यावरही माझा भरोसा नव्हता.... पण आज सर्व शक्य झालेलं आहे...."
पण तेवढ्यात ... सूर्याचे किरणं वातावरणात आपलं तापमान चढवू लागले होते तरीही एक-दोन चुकार ढग आकाशात असलेले गडगडले.

तिच्या मानेवर नाक घुसळत हळूच म्हणाला ...

"बघ निसर्गही सांगतोय,
तुझी माझी जोडी अशीच असावी...
याच जन्मात नाही तर,
पुढचे सात जन्म ही तू माझीच असावी..."

आणि त्यानंतर......




🌹🌹🌹🌹🌹