Niyati - 40 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 40

Featured Books
Categories
Share

नियती - भाग 40






भाग 40




त्यानंतर दोघेही फ्रेश झाले आणि भक्त निवासाच्या परिसरात फिरावयास गेले.... तेथे असलेले सात्विक वातावरण त्यांना फार फार आवडलं.... मंदिरामध्ये चालू असलेली आरती.... तेही त्यात भक्तीभावाने हात जोडून प्रार्थना करू लागले....
पार्वतीने सांगितल्याप्रमाणे दोघांनीही पूजेचे सामान घेऊन मनोभावाने पूजा केली आणि सुखी संसाराची कामनाही 
तसेच सर्व सुरळीत असू दे .....ही इच्छा भक्तीभावाने व्यक्त केली....

दोघांच्याही मनाला एक विशिष्ट हूर हूर लागलेली ती काही केली तरी कमी होत नव्हती तर.... मनोभावाने मंदिरात थोडा वेळ दोघेही शांत बसले....


.....

इकडे बातमी द्यावी ...पार्वती आणि कवडूची... त्यांच्याबाबतीत सांगावे म्हणून बाबाराव यांनी कॉल करण्याचा प्रयत्न केला मायराला....

तर फोन स्विच ऑफ येत होता....

फौजदार साहेबांनीही सूत्र हलविली.... सुंदरला ताब्यात घेतले... एकाएकी पोलिसांनी असे सापळा रचून  सुंदरला त्याच्या राहत्या वाड्यातून ताब्यात घेतल्यामुळे नानाजी आणि घरचे सर्वच बिथरले.... मनात येईल तसे नानाजी बरळू लागले....


फौजदारांनी स्वतः त्यांना मग.... तंबी दिली आणि... सुंदर ने केलेला प्रताप सांगितला... सर्व ऐकताच नानाजींच्या अंगातले सारे अवसान गळून पडले.... ते तसेच हातापायामध्ये जोर नसल्यासारखे खुर्चीवर बसले....

त्यांना आता पश्चात्ताप होत होता की...
"कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मायराला आपण सुंदर साठी होकार दिला....
झक मारली आणि त्या पोरीचा नाद लागला या खुळ्याला.
आणि होत्याचे नव्हते करून बसला.... 

दोन दोन माणसांचा जीव घेतला म्हणजे.... असे तर याच्यावर मी संस्कार कधी केले नव्हते...."



हातात बेड्या टाकून सुंदरला . ....फौजदार साहेब आणि त्यांचा ताफा गाडीमध्ये बसवून घेऊन गेला...


पार्वती आणि कवडू यांच्या मृतदेहाच्या दहन प्रक्रियेसाठी आणि आणखीन काही योग्य त्या विधी करण्यासाठी.... कसे करावे सर्व वाट पाहत होते... कारण कोणालाही मायरा आणि मोहितला संपर्क कसा साधावा हे समजत नव्हते.....


वेळ होत चाललेला.... तर कवडूच्या शेजारचे लोकं ....
असेच कसे ठेवायचे मृतदेह...???? म्हणून विचार करत होते....
राम जवळ सुद्धा निरोप धाडला लोकांनी बाबाराव यांना...
की काय करावे...??...

कितीही नाही म्हटलं तरी मायरामुळे आता त्यांचे नातेवाईक म्हणून बाबाराव यांच्याकडे बघत होते गावातले लोक....???
राम कडून निरोप समजताच... बाबाराव पेचात पडले....
काय करावं ???...कसं करावं..????.. त्यांना काही सुचत नव्हतं....
शेवटी आता लोकांनीच त्यांना निवडून दिलेलं होतं.... त्यामुळे ते कोणत्याही गोष्टीला उघड उघड विरोध करू शकत नव्हते आता.
पण...........रामच्या सुपीक डोक्यातून उपाय समोर आला.... तो म्हणजे..... मूळकाट खाटीक...
तो जर मायरा आणि मोहितच्या मागावर असेल तर नक्कीच तो जिथे असेल तिथेच हे दोघेही असणार....




कॉल करून फौजदार साहेबांना बाबाराव यांनी माहिती दिली
तसे सूत्र हलविले गेले..... बाबाराव यांनी सुद्धा त्यांचेआपले माणसं ......त्यांच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या आणि फौजदार साहेबांनी सुद्धा सुंदरकडून पोलिसी खाक्या दाखवून माहीत करून घेण्याचा प्रयत्न केला...


...........

आज दुपारचे भोजन सर्वांनीच ते सर्व फोटोग्राफर मुल आणि मुली सर्वच..... त्यांनी भक्तनिवासातंच.... तेथे मिळत असणारे महाप्रसादाचे भोजन ग्रहण  केले.



आता मात्र आईने सांगितल्याप्रमाणे आपण जोडीने शंकर पार्वतीच्या मंदिरात मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला म्हणून मोहितला समाधान वाटत होते... पण तरीही त्याला काहीतरी आपल्या हातून सुटत आहे... काहीतरी आपल्यापासून दूर जात आहे.... अशी त्याला जाणीव हुरहूर लागलेली होती..


तसे त्या परिसरात हातात हात घालून फिरत असताना मोहितने आपल्या मनातले मायराला बोलून दाखवले...
त्यावर मायराने त्याला..." कदाचित आपण आता सर्व सोडून दूर जात आहोत ....बरेच दिवस आता आई-बाबांना भेटू शकणार नाही म्हणून कदाचित असे वाटत असेल " असे म्हटले..

मोहितलाही तिचे म्हणणे पटले.... आपसात बोलत असतानाच ते पाचही जण तेथे आले....



शाला म्हणाली...
"मायरा...... येथे जवळच गावचा यात्रा भरली आहे... खूप छान वाटते यात्रेमध्ये...... चला ...दोघेही ..
येऊ आपण यात्रेत जाऊन.... येथील यात्रा रोमांचक असते... निरनिराळे नवीन नवीन खेळ असतात त्यात....आता आपल्याला तसेही वेळ आहे....रूमवर जाऊन काय करायचं....???.....भारी मजा येते...."



तसे मायराने मोहितकडे पाहिले.... मोहितच्या चेहऱ्यावर इच्छा दिसली नाही कुठेही जाण्याची.... त्याच्या मनात कोणती चलबिचल सुरू आहे ????....हे मायराला माहीत होते...

तिला वाटले ...."कदाचित याला आपण यात्रेत घेऊन गेलो तर कदाचित त्याच्या मनातली जी विचाराची शृंखला आहे... होऊ शकते ती थांबेल..."


बाकीचेही चलण्यास आग्रह करू लागले... अगोदरंच राहण्यासाठी.... सोय करण्यासाठी त्यांची मदत मिळालेली होती. त्यामुळे मोहित जास्त वेळ नकार देऊ शकला नाही... तोही त्याच विचाराने..." कदाचित तिथे गेल्यावर मन शांत होईल" याच विचाराने त्याने यात्रेस जाण्यास होकार दिला.


'मूळकाट खाटीक"... मागावरच होता त्यांच्या ट्रेनमध्ये पण... दोन मिनिटाला डोळा लागला... आणि ते ट्रेनच्या डब्यातून केव्हा गेले त्याला समजले नाही....
पण त्याला लक्षात आले होते की याच गावात उतरलेले असतील तर तोही त्या गावात पोहोचला... त्या गावात तोही भटकत होता मायरा आणि मोहितला शोधण्यासाठी..


यात्रेत खूप गर्दी होती.... सर्व जमेल तसे एकमेकांच्या सोबत राहत आनंद घेत होते..... गर्दीची लाट असल्यामुळे बरेच वेळा हात मायराचा सुटत होता ...भांबावून ती मोहितला गच्च पकडून ठेवत होती हाताने.....
पण एक वेळा गर्दीची एवढी लाट आली की दोघांचा एकमेकांचा पकडलेला हात सुटला... मायरा घाबरली तिथेच थांबली... गर्दीच्या लाटेमुळे ती मागेमागे  सरकल्या गेली..मोहितही तेथेच उभा राहून तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता.. पण शक्य होत नव्हते गर्दीमुळे... ती त्या गर्दीमुळे मागे मागे सरकल्या जात होती ते बघून त्याचा जीव कासावीस होत होता. 

आता तर ती दिसतच नव्हती...
आणि त्याच्या हृदयाची धडधड वाढली...

तिच्यापर्यंत पोहोचणे शक्य होत नव्हते...

इकडे मायराला मोहित दिसणे बंद झाले... तर ती कावरी बावरी झाली आणि डोळ्यांतून अश्रू पडू लागले....

एका दुकानात उभी राहून ती इकडे तिकडे पहात ओढणी गच्च पकडून रडत कोणी ओळखीचे दिसते का...??? म्हणून शोधत होती. 
तिला आता काहीच समजत नव्हतं... सर्वीकडून यात्रेच्या त्या बाजारात फसल्यासारखे वाटत होतं....

तेथील लोकांच्या नजरा तिच्याकडे परत परत वळत होत्या ती रडत असल्यामुळे... एका पोलिसाचे डोळे तिला चाचपून बघत होते... तोच तिच्याजवळ जुली आली... मायराला जुलीकडे पाहून हायसे वाटले.....
ती मायराकडे पाहून हसून बघू लागली... ती जशी हसली 
तशी मायराला कसला तरी उग्र दर्प आला बहुतेक तिने कोणतेतरी अत्तर लावलेले असावे... असे.

जुली म्हणाली....
"अगं मायरा... रडत का आहेस...?? तू मागे कशी काय राहिली..??? मोहित तर तिकडे समोर आहे बाकीच्यांसोबत..."

मायरा म्हणाली....
"जुली .... बरं झाल तू भेटलीस... गर्दीमुळे माझा मोहितचा पकडलेला हात सुटला.... आणि मी मागे राहिले.... आता कसं जायचं मोहितकडे...??? तू पण मागे राहिलीस काय???"

आता मायराने रडणे थांबवले... कुणीतरी ओळखीचं दिसल्यामुळे तिच्या मनाला आता उभारी आली.... गळलेल्या अवसान आता संपून हाता पायाला तटवाई आल्यासारखे वाटले.


जुली म्हणाली....
" अगं... गर्दीच भारी झालेली आहे आता म्हणून आपण मागे पडलो... मी होती तेथेच सर्वांसोबत.... पण मला ते अत्तर आवडलं होतं ना...!! तर घेण्यासाठी थांबले होते... मग मागेच राहिले... मला मोहित दिसला.. तो तुलाच शोधत होता... तोही गर्दीत तिकडे तिकडेच सरकले गेला... मग मला त्याने आवाज देऊन सांगितले की तू मागे अडकलेली आहे तर तुला सोबत घेऊन ये....."


हे ऐकून मायराला समाधान वाटले की कोणी का होईना थांबले तिच्यासोबत....
तेवढ्यात जुलीने तिच्या खिशातून दोन कागदी पुड्या काढल्या आणि त्यातील एक खोलून त्याच्यातील विड्याचे पान तिच्यासमोर पकडले.....

नजरेने खाण्यासाठी सुचवले.... तसे मायराने नकारार्थी मान हलवत नाही म्हटले...


जुली म्हणाली....
"घे गं ....आत्ताच दोन पानं घेतली..."

असं म्हणून तिनेही स्वतः एक विड्याचे पान खाल्ले आणि दुसऱ्या तिच्या समोर धरलं कागदी पुडी खोलून....


सारखे नाही कसं म्हणायचं....???..... म्हणून मग मायराने विड्याचे पान तोंडात टाकले.....

तोंडात पान खाता खाताच जुली म्हणाली....
" माय...य....ळा.....ग...ळ..डी...क...मी...झाळ्लावळ जाऊ"



असं म्हणून ती मायराचा हात पकडून बाजूला घेऊन गेली. तिच्या तोंडात पानाचा तोबरा होता तर स्पष्ट बोलता येत नव्हते तिला.....तर तोंडाच्या दोन्ही कडातून लाल मुखरस किंचित बाहेर आलेला होता. तो तिने उजव्या हाताच्या अंगठ्यानं आणि मधल्या बोटांने पुसला... ते बघून मायराला किळसवाणे वाटले..

पान चघळणे चालूच ठेवून मायराचा हात पकडून इकडे तिकडे बघणे चालू होते जुलीचे....


जुलीने विचारले....
"इथून कुठे जाणार आहे...??"

आता मायराला उत्तर द्यावे की नाही द्यावे हे सुचत नव्हते...
ते दोघे दिल्लीला जाणार तर या अनोळख्या व्यक्तीला का सांगायचे...?? अशी कितीशी ओळख आहे ह्यांची आणि आपली की यांना आपली पर्सनल माहिती द्यावी... मायरा थोडा वेळ गप्प बसली... जुली अपेक्षेने पहात होती तिच्याकडे.. 
तर मायराने आपल्या तोंडाकडे बोटाने इशारा करून दाखवले.... की "माझ्या तोंडात पान आहे त्याच्यामुळे बोलता येत नाही मला."


तिची ती सांगण्याची पद्धत पाहून जुली डोळे तिरपे करून हसली.... आणि पुन्हा म्हणाली....
"हावभाव मस्त करतेस गं तू..??... म्हणून मोहित फिदा आहे तुझ्यावर....!!"


तिचे एकूण मायराला विचित्र वाटले... तिच्याकडे पाहत असून जुलीने पुन्हा बाजूला तोंडातली पिंक टाकली....

गर्दी कमी व्हायचे नाव घेत नव्हते.... मोहितच्या ओढीने मायराला अस्वस्थ वाटू लागले..... जुली सोबत बोलण्यात तिला अजिबात इंटरेस्ट नव्हता.... तिचे काळीज तर मोहितला भेटण्यासाठी धडपडत होते.... 

पण मुख्य म्हणजे कोणत्या रस्त्याने आपल्याला जायचे आहे तेच तिला समजत नव्हते. जुलीने मायराच्या चेहऱ्यावरील  कावरेबावरेपणा निरखून घेतला आणि ती अतिशय हळुवार आवाजात म्हणाली....


🌹🌹🌹🌹🌹