Anubandh Bandhanache - 21 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 21

The Author
Featured Books
Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 21

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग २१ )


प्रेम आतल्या रूम मधे झोपलेला असतो. पहाटेचे सात वाजलेले असतात. अंजली अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन तयार पण झालेली असते. मॉम तिला प्रेमला उठवायला सांगतात तशी ती त्या रूम मधे येते. 

प्रेम गाढ झोपेत असतो. ती फक्त त्याला पहातच राहते. इकडे तिकडे बघुन हळुच ती त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या केसातुन हात फिरवत त्याच्या कपाळावर किस करते. तिचे ओले झालेले केस त्याच्या चेहऱ्यावर फिरत असतात. प्रेमला त्या सुखद स्पर्शाची जाणिव होते आणि त्याला जाग येते, तो डोळे उघडतो तर...😊


अंजली अगदी त्याच्या चेहऱ्याजवळ होती. नकळत त्याचे दोन्ही हात तिच्या पाठीवर जातात आणि तिला तसच मिठीत घेतो. तिने मारलेल्या परफ्यूम चा सुगंध त्याला मोहित करून टाकतो. तो तसाच तिला मिठीत पकडुन तिच्या कानाजवळ एक किस करतो. अंजली थोडी घाबरते. आणि पटकन स्वताला त्याच्या मिठीतुन सोडवते.

अंजली : ओय... काय करतोय पागल...😊

प्रेम : कुठे काय....😊 मला आधी सांग... तु काय करत होती...😊

अंजली : मी....कुठे काय...😋 तुला उठवत होती.😊 चल उठ लवकर. उशीर होतोय, चल पटकन आवर. 😊

प्रेम : अच्छा... असं उठवतात का....😊

अंजली : खरं सांगु.... माझी तर अगदी मनापासून इच्छा आहे की, तुला प्रत्येक सकाळी मी असच उठवावं. 😊

प्रेम : हे जरा जास्तच होतंय ना... 😊

अंजली : मला तर नाही वाटत असं...😊

प्रेम : हो... का... चल आता खुप बोलली. 😊

* प्रेम पण अंघोळ वगैरे करून तयार होतो. मामी सर्वांसाठी डिश मधे कांदे पोहे घेऊन येतात आणि सर्वांना देतात, प्रेम नको बोलतो, कारण, आज शनिवार होता... प्रेमचा उपवास असतो, पण मॉम त्याला खाण्यासाठी आग्रह करतात, आजचा दिवस उपवास नको करू, एक दिवस चालेल ना नाही केला तर,...😊 त्यांच्या बोलण्याला मान देत प्रेम पण मग नाष्टा करायला घेतो. तेवढ्यात शुभंकर त्याच्या बायकोसोबत गाडी घेऊन येतो. ते दोघेही नाष्टा करतात. सर्व आवरून गाडीतून ते निघतात...... 🚐

जाताना वाटेत एक प्रसिद्ध मंदिर होते. 🛕 तिथे थोडा वेळ थांबुन दर्शन घेऊन गोव्याच्या अंजुना बिच वर पोचतात. 🏖️⛱️ 

शुभंकर चा ट्रॅव्हल्स चा बिझनेस असल्यामुळे त्याची तिथे ओळख असते. एका हॉटेल मधे तो एक रूम घेतो. 

सर्वजण कपडे वगैरे चेंज करतात. अंजली पण टी शर्ट आणि शॉर्ट घालते. छोट्या बहिणीला बिकिनी टाईप ड्रेस घालुन गॉगल लाऊन तिला सोबत घेते. मॉम पण सेम टी शर्ट आणि शॉर्ट घालुन बाहेर येतात. चप्पल शुज वगैरे तिथेच काढून सर्वजण बीचकडे जातात.

शुभंकर ने कॅमेरा आणलेला असतो. पाण्यात जायच्या आधीच सर्वांचे फोटो काढतो. फोटो काढताना अंजली पण कोणाचं लक्ष नाही असं पाहून प्रेमच्या बाजुला जाऊन उभी राहते.

मग सर्वजण पाण्यात जातात. 🤽🏊 खुप वेळ पाण्यात मस्ती करतात. शुभंकर बाहेर येऊन आईकडे दिलेला कॅमेरा घेऊन सर्वांचे छान पाण्यात मस्ती करतानाचे फोटो काढतो. 📸

अंजली पण प्रेमसोबत खुप फोटो काढून घेते. 
नंतर प्रेम कॅमेरा घेतो आणि शुभंकर आणि त्याच्या बायकोचे फोटो काढतो.📸 मधेच अंजली चे एकटीचे पण फोटो क्लिक करतो. 📸

नंतर ते लोक बनाना राईड घेतात. शुभंकर आणि त्याची बायको, प्रेम आणि अंजली चौघे मिळुन लाईफ जॅकेट घालून बनाना राईड ला जातात. शुभंकर पुढे असतो, त्याच्या मागे त्याची बायको, मधे अंजली आणि तिच्या मागे प्रेम. 

तिच्या अगदी जवळ बसुन एक वेगळं फिलिंग येत होते. पण त्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं करून दोघेही मस्त राईड चा आनंद घेतात. 
मस्त दोन राऊंड मारून आल्यावर सर्व पाण्यात पडतात. 


शुभंकर त्याच्या बायकोसोबत मस्ती करत असतो. अंजलीच्या नाकात वगैरे पाणी जातं, ती जरा घाबरते. प्रेम जवळ जाऊन तिला पकडतो. 
पाण्यामधे त्याच्या स्पर्शाने ती एकदम शहारून जाते. पण तिथे काहीच करू शकत नव्हते. दोघे पण हळू हळू बाहेर येतात. लाईफ जॅकेट काढून पुन्हा पाण्यात मस्ती करतात. मामा मामी पण जवळच थोडं आत येऊन लाटांचा आनंद घेत भिजत असतात. मॉम अंजलीच्या बहिणीला घेऊन तिथेच लाटासोबत खेळवत असतात. 

अंजली छोटीला आईजवळ सोडुन मॉम ला आत घेऊन येते. आणि त्यांच्यासोबत पाण्यात थोडी मस्ती करते. प्रेम पण तिथेच पाण्यात उभा असतो. शुभंकर आणि त्याची बायको पण तिथे येते. मामा मामी पण थोडे आत येतात. 

सर्वजण एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत असतात. प्रेम मात्र पहात असतो. मधेच अंजली त्याच्या चेहऱ्यावर पाणी उडवते. तिच्यासोबत मॉम पण सामील होतात. मग तोही त्या खेळात सामील होतो.

खुप वेळ पाण्यात खेळून झाल्यावर बाहेर येतात. एका बोट मधे बसुन सर्वजण समुद्रात आतापर्यंत राऊंड मारून येतात. प्रेम, अंजली दोघेही जेट स्की वरून पण राऊंड मारून येतात.


 शुभंकर आणि त्याची बायको पॅराग्लायडिंग ,🪂 साठी सोबत बोटीतून आत मधे जातात. ते दोघे पॅराग्लायडिंग करून परत आल्यावर मॉम प्रेमला पण जायला सांगतात. प्रेम नको नको करत तयार होतो. मग अंजली पण, मला पण जायचं आहे असं बोलुन त्याच्यासोबत बोटीतून आत जाते. 

तिथे दोघांनाही लाईफ जॅकेट घालून हार्नेस लाऊन तयार करतात. अंजली पुढे आणि प्रेम मागे होता. हळू हळू पुढची बोट जशी पुढे जाते तसे दोघे आकाशात वरती वरती जाऊ लागतात. 🪂 

वरती गेल्यावर अंजली थोडी घाबरते. प्रेम पाठीमागून तिला आवाज देत धीर देतो. खरं तर दोघेही पहिल्यांदाच हा अनुभव घेत होते. पण ते दोघे सोबत असतात. त्या गोष्टीने दोघेही खुश असतात. 


राईड संपवून दोघेही बाहेर परत येतात. मग शुभंकर आणि प्रेम हॉर्स रायडिंग ला जातात. खुप अंतरावर गेल्यावर पुन्हा स्पीड मधे परत येत असतात. प्रेमला असं घोड्यावर बसुन येताना पाहताना. अंजली खुप खुश झाली होती. 

बीच वर असलेल्या जवळ जवळ सर्व गोष्टींचा आनंद घेत असतात. मॉम स्वताहून प्रेमला फोर्स करत होत्या त्यासाठी. या सर्व गोष्टींसाठी खुप काही खर्च पण झालेला असतो. हे प्रेमला सतत जाणवत असतं. शेवटी मॉम सर्व पैसे पेड करतात. 
 हे सर्व करता करता कधी चार वाजले ते कळलंच नाही. आता सर्वांना खुप भुक लागली होती.

सर्वजण परत हॉटेल वर येतात. अंघोळ वगैरे करून फ्रेश होतात. आणि छान पोटभर जेवण करून तिथून निघतात. तिथूनच ते लोक एका सुंदर अशा चर्च मधे जातात. 


बाहेर एका शॉप वरून मॉम काही कँडल घेतात. आत गेल्यावर किती शांत वाटत होते. 
मॉम अंजली आणि तिच्या बहिणीला सोबत घेऊन पुढे जातात. प्रेम पण त्यांच्या पाठोपाठ जातो.

कँडल पेटवून ते लोक प्रेअर करत असतात. प्रेम पण समोर असलेल्या येशुंना पाहून मनात एकच प्रार्थना करतो. या परिवाराला नेहमी सुखी ठेव. 🙏🏻


बाहेर आल्यावर थोडा वेळ तिथे घालवतात. हळू हळू अंधार पडायला सुरुवात झालेली असते.
 तिथून जवळच असलेल्या फ्लिया मार्केट मधे सर्व येतात.

 तिथे मॉम सर्वांसाठी खुप काही कपडे, आणि इतर वस्तू खरेदी करत असतात. त्या सर्वांमध्ये प्रेम साठी पण दोन, तीन टी शर्ट, कॅप, गॉगल, खुप काही खरेदी करतात. मग सर्वजण घरी जायला निघतात.

दुपारी लेट जेवल्यामुळे आता जास्त कोणाला भूक नसते. वाटेत एका ठिकाणी फास्ट फूड पॉईंट वर थांबुन थोडे थोडे खाऊन तिथून रात्री उशिराच घरी पोचतात.

दुसऱ्या दिवशी लवकरच त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी जायचे असते. म्हणून सर्व पटपट आवरून झोपतात.

प्रेमची मात्र झोप लागत नसते. आज दिवसभरात जे काही त्याने अनुभवलं होतं ते त्याच्यासाठी खुप खास होते. त्याने कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता या सर्व गोष्टींचा.... 

सर्व काही मॉम मुळे शक्य झाले होते. नाहीतर विमान प्रवास आणि गोवा... हे तर शक्यच नव्हते. 😊 मनातल्या मनात मॉम चे आभार मानतो. आणि दिवसभराच्या गोड आठवणींमध्ये रमुन झोपून जातो.

*****************************

दुसऱ्या दिवशी पहाटे त्याला स्वतःलाच जाग येते. आज अंजली कशी आली नाही उठवायला अजुन... हा विचार त्याच्या मनात येतो. आणि तिची वाट पहात तो तसाच पडुन राहतो.

 पहाटेपासूनच सर्वाची तयारी चालू झालेली असते. शेवटी तो ऊठुन बाहेर येतो. पण अंजली त्याला कुठे दिसत नाही. मागे जाऊन तो ब्रश करत असतो तर किचन मधून मॉम अंजली बद्दल काहीतरी बोलल्याचा त्याला आवाज येतो. तो ब्रश करतच तिथे जातो आणि मॉम ला विचारतो...

प्रेम : मॉम काय झालं....🤔

मॉम : अरे बघ ना... अंजु...😔

प्रेम : काय,... काय झालं तिला...🤨

मॉम : अरे रात्री पासुन उलटी करतेय, काल येताना ते ऑईली चायनीज वगैरे खाल्ले ना, त्यामुळेच झालं असावं. 😔 एक तर लग्नाला जायची घाई. आणि.... 

* तेवढ्यात मॉम च्या आई बोलतात....

आई : अगं ठिक आहे ना... तुम्ही जाऊन या तिला राहु दे घरी, थोडा आराम केला की, बरं वाटेल. मी आहे ना तिची काळजी घ्यायला. झोपु दे तिला, तुमचं आवरा आणि निघा तुम्ही. जा बरं आता... पिल्या ची तयारी कर आणि तिला घेऊन जा.

*प्रेम ला तिच्याकडे जावस वाटतं पण, तो स्वतःला थांबवतो, आणि टॉवेल घेऊन अंघोळ करायला बाथरूम मधे जातो.
अंघोळ करत असताना मॉम बाहेरून त्याला आवाज देतात.

मॉम : प्रेम... झाली का अंघोळ...?

प्रेम : मॉम नाही अजुन... काय झालं..😊

मॉम : अरे काही नाही,.... मी काय बोलते, 

प्रेम : काय बोला ना....🤨

मॉम : तु काय करतो,... लग्नाला येतोय का...? अंजु नाही येत, मग तु तिकडे बोअर होशील, त्यापेक्षा घरी आराम कर मग चालेल ना...?

*प्रेमच्या मनातही तोच विचार चालु असतो. 

प्रेम : हो... चालेल, मी थांबेन घरी. 😊

मॉम : प्रेम... सॉरी बाळा...पण मला जावं लागेल. आई आहे घरी, काही लागलं तर तिला सांग हवं ते, दुपारी जेव पोटभर, लाजू नको. आणि हो अंजुची काळजी घे. तिला बरं नाही वाटत.

प्रेम : हो... मॉम तुम्ही नका काळजी करू तिची... बिनधास्त जा, लग्न एन्जॉय करा. 

मॉम : ओके... मग आम्ही निघतोय लगेच तु आरामात अंघोळ कर. कॉल कर नंतर मला.

प्रेम : हो....करेन... तुम्ही जा, काळजी न करता. 😊

* प्रेम पण तोच विचार करत असतो, जर अंजली तिथे नसेल तर मी तिकडे जाऊन काय करणार. बरं झालं मॉम स्वताहून बोलल्या. 
तो अंघोळ उरकुन बाहेर येतो. रूम मधे जाऊन टी शर्ट आणि शॉर्ट घालून बाहेर येतो. सर्वांची निघायची तयारी झालेली असते.
अंजली मात्र आतल्या रूम मधे झोपलेली असते. बाहेर पडतच मॉम त्याला बोलतात...

मॉम : प्रेम... सॉरी... तुला असं घरी सोडुन जावं लागत आहे. पण संध्याकाळी लवकर परत येऊ आम्ही.... तु आता नाष्टा वगैरे करून घे... आईने मस्त जवला भाकरी बनवलीय, 😋 आणि लाजू नको, काय हवं असेल तर बिनधास्त आईला बोल....ओके. 😊

प्रेम : हो... मॉम, तुम्ही नका काळजी करू. मी सांगेन आईंना काही हवं असेल तर...😊

मॉम : बरं ओके... अंजुकडे पण लक्ष दे, आराम करायला सांग तिला आणि दुपारी जेवण करून तुही थोडा आराम कर. आणि भांडत बसू नका दोघे.....😊

प्रेम : नाही...मॉम...तुम्ही रिलॅक्स होऊन जा...😊

मॉम : बरं ओके... कॉल कर मला नंतर...😊

प्रेम : हो... करेन...😊👍🏻

* थोड्याच वेळात सर्वजण गाडीत बसुन निघतात. अंजली अजुनही आतल्या रूम मधे झोपलेली असते. आई प्रेमला टीव्ही चालु करून देतात. आणि किचन मधे स्वयंपाक बनवण्यासाठी जातात. 

प्रेम टिव्ही वर गाणी बघत कोच वर बसलेला असतो. थोड्या वेळाने अंजली ऊठुन हळुच बाहेर येते. त्याच्या नकळत पाठीमागून दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती टाकत कानात गुड मॉर्निंग बोलते आणि अलगद त्याच्या गालावर किस करते. 😘

प्रेम : ओय.... काय करतेय पागल... 😊 

अंजली : कुठे काय.... 😊 फक्त गुड मॉर्निंग केलं. 😊

प्रेम : अरे... पण... आई आहेत घरात...😊

अंजली : अरे हो... जानु.... माहित आहे मला. 😊 लक्ष होते माझे....कळलं 😊

प्रेम : तु... ना... खरच वेडी आहेस. 😊 

अंजली : हो... ती तर आहे... तुझ्या प्रेमात...😊

प्रेम : जास्त होतंय असं नाही वाटत का...😊

अंजली : बिलकुल नाही वाटत... मला तरी...😊

प्रेम : काय बोलू तुला आता....😊

अंजली : जान... बोल ना...😊 खुप मस्त वाटतं ते ऐकल्यावर....🥰

प्रेम : बरं ते जाऊ दे..... तब्येत कशी आहे आता...? बरं वाटतंय ना...?

अंजली : कोणाची तब्येत....? कोणाला बरं वाटत नाही...?😊

प्रेम : अंजु... काय... हे, काय चाललंय तुझं...😊

अंजली : कुठे काय...? 😊

प्रेम : अगं... तुला बरं वाटत नव्हते, म्हणुन तु झोपली होती ना...? लग्नाला पण नाही गेली...🤔

अंजली : अरे हा... रात्री जरा उलटी झाली. 😊 चायनीज सुप बाहेर आले सर्व...😋

प्रेम : मग कशाला खायचं... नाही जमत तर...? 🤨

अंजली : अरे... ते भाईने गाडी किती फास्ट आणली येताना. त्यामुळे जरा पोटात गडबड झाली असेल. 😊 

प्रेम : अच्छा... पण आता ओके आहेस ना...?

अंजली : हो... रे... राजा... आता एकदम ओके आहे. 😊

प्रेम : बरं ठिक आहे...पण मॉम ना कॉल कर आधी, सकाळी त्या किती टेन्शन मधे होत्या. 

अंजली : हो...हो... करते. आधी फ्रेश तर होऊ दे... मग कॉल करू. ओके....😊

प्रेम : बरं ओके... जा... तु अंघोळ कर जा...😊 

अंजली : अच्छा बाबा... जाते, तु गाणी बघ तोपर्यंत....🤨👍🏻

* असं बोलुन ती तिथून निघून जाते. तेवढ्यात आई प्रेम ला किचन मधून आवाज देतात. आणि तो किचन मधे जातो.

आई : बाळा तु जवला भाकरी खाऊन घे बघ गरम गरम ..... आवडते ना तुला...😊

प्रेम : हो... आई... आवडते. पण थोड्या वेळाने खातो ना... अंजली सोबत. 😊

आई : अरे... ती आत्ताशी उठलीय, तिला आवरायला खुप वेळ लागेल, तु खाऊन घे बरं गरम आहे तोवर...😊

प्रेम : बरं ठिक आहे खातो... असं बोलुन तो तिथेच खाली बसतो. 

आई : अरे... इथे कुठे बसलाय... आत बस... मी आणुन देते आत. 

प्रेम : नको आई... इथेच ठिक आहे. तुम्ही द्या इथेच. 😊

आई : बरं बाबा... तुला आवडतं ना... मग बस इथे. मी देते थांब...

* असं बोलुन आई एका ताटात एक तांदळाची भाकरी आणि मस्त फ्राय केलेला जवला वाढुन देतात. त्याला आता खरच राहवत नव्हते. प्रेम लगेच खायला सुरुवात करतो. तेवढ्यात अंजली ब्रश करत तिथे येते.

अंजली : हे... काय... मला सोडुन एकटाच ब्रेकफास्ट ......🤨

* प्रेम मान वरती करून तिच्याकडे पहात हसत असतो तोवर आई बोलतात. 

आई : खाऊ दे ग त्याला... भुक लागली असेल सकाळपासून काहीच नाही खाल्ले त्याने. 😊

अंजली : मला पण हवाय... मला पण भुक लागलीय खुप... मी तोंड धुऊन येते लगेच.

आई : हो... पण तुला हे नाही मिळणार, तुझ्यासाठी साजुक तुपातला शिरा बनवलाय. तो खा तु... पोट बिघडलंय ना... मग तिखट नको. 

अंजली : काय ग आई...आता बरं वाटतंय ना पण.... मला जवला भाकरी पाहिजे. नको तो गोड शिरा. 😌 

आई : अगं... बाई, तुला ठेवतेय ना, पण ते दुपारी खा, आता शिरा खाऊन बघ, आवडतो ना तुला म्हणुन बनवला. 😊

अंजली : बरं ठिक आहे, तु एवढ्या प्रेमाने बनवला आहेस तर खाईन मी ओके....😊

असं बोलुन ती तिथून अंघोळ करायला निघुन जाते. प्रेम मस्त दोन भाकरी खाऊन बाहेरच्या रूम मधे येऊन टीव्ही बघत बसतो. 

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️