Niyati - 35 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 35

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

नियती - भाग 35













भाग -35



मायराने घरी सर्वांना रामने दिलेली ......
उद्या पहाटे सकाळी लवकर उठून ट्रेन ने जाण्याची दोघांची तिकीटे दाखवली होती. त्यासाठी स्टेशनवर पोहोचण्यास त्यांना अर्धा तास वगैरे लागणारच होता तर आताच महत्वाचे लागणारे सर्व सामान त्यांनी भरून ठेवले..






पार्वतीने दोघांनाही तिकडे गेल्यावर शिवपार्वतीचे मंदिर असेल तिथे त्यांचा आशीर्वाद घेऊन संसाराची सुरुवात करा असे सांगितले....



पहाटे पाच ची ट्रेन असल्यामुळे त्यांना तीन साडेतीन वाजता तरी पहाटेचे... या काळ्याकुट्ट अंधारातंच निघावे लागणार होते घरून......





इकडे बंगल्यात एकाएकी रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास बातमी आली आणि बाबाराव भयंकर संतापले आणि त्यांनी त्याभरातच एक कॉल केला......


आणि मग......


बाबाराव यांना समजले की सुंदर आणि नानाजी यांनी शहरातून एक कुख्यात गुंड "मुळकाट खाटीक"याला आणलेले आहे



ते ऐकूनच त्यांना आतून थरथर झाली ....हा जो त्यांनी आणलेला गुंड आहे हा ...अतिशय हिंसक गुंड म्हणून नावाजलेला हे त्यांना माहीत होते...





थोड्याच वेळात गावात पोलीस पार्टी घेऊन धडकल्याची बातमी सगळीकडे पसरली वाऱ्यासारखी.





गावातलं वातावरण तंग झालं.





पोलिसांच्या गाड्या नानाजींच्या वाड्या समोर थांबल्या त्यातून एक फौजदार आणि बारा शिपाई पटापट बाहेर पडले. 





रात्रीचे साडेनऊ वाजले होते. तरीसुद्धा लोकंआज जागे होते कारण चर्चेसाठी आज दोन मोठे मोठे विषय होते.




एक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला...


दोन म्हणजे मायरा आणि मोहितचे लग्न  ....त्यावर चर्चा करायची म्हणून इकडे तिकडे चौकात कुणी बसलेले ....
......कोणी उभे गोष्टी करतच होते.




त्या सर्वांना या गाड्या पोलिसांच्या..... दिसल्यानंतर ते बारकाईने तेथूनच पाहू लागले. तर त्यांनी गणवेशातल्या बँड पथकाप्रमाणे या पोलीस पथकांनाही पाहणाऱ्या ......गावकऱ्यांच्या नजरा आकर्षूण घेतल्या.






आपल्या गावात काहीतरी अजब होत आहे आता ....
जे आज पर्यंत होत नव्हतं असं.... असे विचार करत गावकरी मनात धाकधूक घेऊन पाहू लागले.






मग पंधरा मिनिटानंतर सर्व पोलीस पथक पुन्हा एका रांगेत बाहेर आले ....गाडीत बसले आणि थांबून राहिले...
जणू ते कुणाची वाट पाहत असावं.....





पाच एक मिनिटांनी नानाजी आणि सुंदर एका बाईकवर बसून निघाले. तसे त्यांच्या मागे मागे पोलीस पथकाची गाडी सुद्धा निघाली.





फौजदारांनी ग्रामपंचायत मध्ये बैठक बोलावली. नानाजी शेलार आणि सुंदर यांना बोलावून घेतलं... म्हणजे ते दोघे कुठेही जाऊ नयेत म्हणून फौजदारांनी स्वतः जाऊन बोलावून घेतलं.

आणि त्यांना समोर समोर पाठवली ना आपण त्यांच्या मागे मागे पथक घेऊन ग्रामपंचायतीत आले. 



बाबाराव कुलकर्णी यांनाही ग्रामपंचायतीत बोलवण्याचा निरोप धाडला... गावातील काही प्रमुख माणसांनाही बोलावून घेण्यात आले.



इकडे कवडू आणि मोहित यांच्याकडेही निरोप आला.



अचानक घेण्यात येणाऱ्या बैठकीचा... आणि तेही आता या वेळेला...
हे असं आता पहिल्यांदाच तेथे बोलविण्यात आलेलं होतं....
तर कवडूला आजपर्यंत आपण अशा सर्व लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यात कधीच गेलो नाही तर आता कसे जावे...?? आणि मोहितला तयारी करायची होती म्हणून..... दोघांपैकी कोणीही गेले नाही.







बाबाराव यांच्याकडूनही काही प्रमुख माणसांना ...
त्यांना जे वाटले महत्त्वाचे  ते त्यांना बोलवून घेतलेलं होतं.
रामही होता ........




सर्व आल्यानंतर फौजदारांनी सर्वांना समजूतदारपणाच्या आणि शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या. 






फौजदारांनी गावातील शांतता भंग होऊ नये.....
ती टिकून राहावी यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे सांगितले.


निवडणुकीचे कार्य चांगल्या रीतीने शांततेने पार पडलेले आहे.


आता पुढेही गावात शांतता अबाधित राहणे जरुरी आहे असेही ते म्हणाले.....





तसंच हेही सांगितलं की कोणाच्यातरी प्रतिष्ठा दुखवल्याचा
केवळ कल्पनेपायी दुसऱ्याच्या मंगल कार्यात संकट आणून उभी करणे...... हेही खपवलं जाणार नाही ...
नाहीतर पोलिसांना आपले अधिकार वापरावे लागतील.
तिथे कुणाचीही दया माया केली जाणार नाही.






फौजदारांनी हे सर्व बोलणे ....उघड उघड म्हटले नसले तरी नानाजी आणि सुंदर यांना उद्देशून आहेत हे बैठकीतील सर्व मंडळींना कळून चुकले होते. 




नानाजी यांना सुद्धा ते समजले होते. सुंदरलाही समजायला वेळ लागला नाही. त्याचं तर रक्त उफाळून आले होते रागाने. 
डोळे लाल झाले ...रक्तदाटू लागलं ऊरात त्याला 
.......नकळतच त्याचा हात मीशीवरून फिरू लागला होता..




आता तो फौजदाराला नजरेला नजर देणे टाळू लागला पण मात्र नानाजी फौजदाराला काय उत्तर देतात ...??
याकडे त्याचे लक्ष वेधले होते.





पण नानाजींनी काहीही उत्तर दिले नाही साहेबांना .....
......... तिरप्या नजरेने मात्र सुंदर कडे पाहिले जणू त्यांना म्हणायचे होते.......



"गोष्ट आता जास्त दूरपर्यंत गेली आहे ...........फौजदारापर्यंत कोणत्या गोष्टी गेल्या म्हणजे अंगावर यायला वेळ लागत नाही. काय करायचं त्या पोरीचं.... गेली उडत..... छप्पन पोरी भेटेल ......आता आपल्याला शांत बसावं लागेल अन्यथा आपलं भविष्य ......तूझं भविष्य खराब होऊन जाईल ...??"





फौजदार हे नानाजी आणि सुंदर यांच्याकडे कधी पाहत होते तर कधी बाबाराव यांच्याकडे पहात होते....




सर्वांचे चेहरे शांत आहेत हे फौजदाराला त्यांच्या चेहऱ्यावरून कळले पण एकमेव सुंदर ........त्याच्या चेहऱ्यावर असे दिसत होते की त्याच्या मनात वादळ उठले आहे आणि तो काहीतरी करणार आहे नक्की......!!!





हा विचार फौजदारांच्या मनात आलाच होता की लगेच सुंदर म्हणाला.... 
" ठीक आहे.... फौजदार साहेब.... गावात शांती राहील ..
आम्ही कोणताही दंगा करणार नाही."




फौजदार म्हणाले......
" दंगा तर करायचा नाही पण... काही शहाणपणा पण करायचा नाही."




सुंदर त्यावर म्हणाला.....
"आम्ही सर्व व्यवस्थित राहू.... नाही ....शहाणपणा करणार. नाही ....दंगा करणार."




फौजदार म्हणाला....
"असा शहाणपणा सर्वांच्या अंगी असता तर आम्हाला कशाला यावं लागलं असतं..??"




फौजदार हसत हसत म्हणाला तरी त्याच्या हसण्यातली खोच सर्वांना समजली होती.




बैठकीत बसलेले बाबाराव सर्व शांतपणे पहात होते. निरीक्षण करत होते सुंदरचं.... त्याचं असं सर्वांमध्ये उथळ बोलणे त्यांना आवडले नव्हते.
त्यांचं मन आता सुशिक्षित मोहित आणि हा कमी शिकलेला दहावीपर्यंतचा सुंदर यांच्यात तुलना करू लागलं...




आणि इकडे फौजदारांचे बोलणे ऐकल्यानंतर सुंदर लगेच म्हणाला.....
"तुम्ही आला नसता तर तुमची ओळख तरी कशी झाली असती साहेब...??? तसेही आता दंग्याचं कारण काही उरलं नाही बघा.. सर्वच तर नीपटलं की...."




सुंदरते हे शब्द ऐकून नानाजी यांना बरे वाटले. गावामध्ये रक्तपात घडावा अशी त्यांची बिलकुल इच्छा नव्हती. तसंही बरेच वेळा नानाजींना सुंदर ला आवरणे कठीण जायचं. फौजदारांनीच त्यांला आवरलं हे बरं झालं असं नानाजींना वाटलं.


सुंदर फौजदारांना हसत हसत म्हणाला....
"साहेब... तुम्ही तुमचं पथक आता निश्चित घेऊन जावा शहरात."




फौजदार म्हणाले...
"परत जाऊ... असं म्हणायचं का..??"




सुंदर म्हणाला....
"मग..??? ज्या कारणासाठी आला तुम्ही.. ते कारणंच आता कुठे उरलं...?? म्हणून म्हणतोय मी.... तुम्ही गेला तरी आता काही बिघडणार नाही."





आलेल्या त्या फौजदारांनी सुंदर च्या चेहऱ्यावर नजर रोखली.
आणि त्यांच्या मिशांच्या आत स्मित झळकलं...



ते मनात म्हणाले....
"बेटा ....तुझ्यापेक्षा दहा उन्हाळे तरी मी जास्त पाहिले आहे.
तुझ्यासारखे दहा हजार जण तरी पाहून झालेले आहे आतापर्यंत. तू काय माझ्या हातावर तुरी देतोस काय...???"




विचार करतच ते नानाजी कडे पहात सुंदरला म्हणाले....
"आता आम्ही या गावात पहिल्यांदाच आलेलो आहे.... तर आम्ही दोन दिवस राहू म्हणतोय... या गावाला पाहुणे जड तर होत नाही ना...!!"






त्यावर नानाजी आणि इतर सर्व हसले... सुंदरही हसला... पण ते ओढून ताणून होते हे फौजदारांच्या अनुभवी नजरेने हेरले.





बाबाराव तर तेथे निव्वळ बसलेले होते... आणि त्यांचे लोकं पण... राम ही असाच बसलेला होता संभाषण ऐकत...





फौजदार हे बाबाराव यांना म्हणाले....
"काय म्हणता कुलकर्णी साहेब??? निवडणूक जिंकला आहात... तरी यावं का आम्ही पाहूणचाराला.."





त्यावर बाबाराव म्हणाले....
"स्वागतच आहे तुमचं आमच्याकडे... या की...!!"





त्यावर फौजदार उत्तर देण्याच्या पहिले सुंदर म्हणाला....
"फौजदार साहेब... पाहुणे म्हणून राहायचं असेल गावात तर या की आमच्याकडे .....रात्रीच्या जेवणाला आता... आम्ही निवडणूक जिंकलो नाही म्हणून काय झालं...???
काय म्हणता...???"



नानाजी पण त्यावर दुजोरा देत म्हणाले....
"खरं म्हणतोय सुंदर... आम्हाला करू द्या की तुमचा पाहुणचार."




पुन्हा फौजदार साहेब काही बोलायचे त्या अगोदरच सुंदर आणखी म्हणाला...
"का फौजदार साहेब...?? आम्ही केलेल्या पाहुणचाराला चव नसणार काय...??? ते काही नाही ..साहेब... तुमची गोष्ट ऐकली ना आम्ही... आता एवढं तुम्ही आमचा ऐका.... एक बोकड कापतो आत्ता... मग तर झालं...??"




सुंदरच असं बोलणं नानाजींना , बाबाराव यांना , रामला तसेच फौजदार साहेबांना चकित करून गेलं.
नाईलाजाने हसत त्यांनी आमंत्रण स्वीकारले.





बाबाराव तर सुंदर च्या या रूपाला प्रथमच पाहत होते. विचार करत होते..
एवढं याला बंदिस्त करून चोप दिला होता... तरीही त्याची थोडीशी ही जिरली नाही किंवा शेकली नाही. खरंच गेंड्याची कातडी आहे याची... याने त्या "मूळकाट खाटीक"ला आणले आहे ते..... माझ्यासाठी तर नक्कीच नाही... याने त्याला नक्कीच आणलेले मायरा आणि मोहित साठी....





फौजदारांनं आणि पार्टीनं नानाजीच्या घरी हातावर पाणी घेतलं म्हणून काही बिघडत नाही.




इकडे तेथेच बसून असताना सुंदर ना पोलिसांची व्यवस्था मळ्यातील घरात करायचं ठरविलं आणि त्याप्रमाणे झटपट हालचाली केल्या.




सुंदर च्या हालचालींचे निरीक्षण करत...
फौजदार म्हणाले...
"नानाजी.. आम्ही सगळे पाहुणचार तर तुमच्याकडेच घेणार आहोत पण त्यापूर्वी आम्ही सर्व बाबाराव यांच्या घरी चहा पाणी घेणार आहोत. हे मात्र आमचं पूर्वीच ठरलेलं होतं तेव्हा आम्ही ते बदलू शकत नाही... "

हे ऐकून सुंदर च्या माथ्यावरील शीर पुन्हा तट्ट झाली... पण तो काही बोलण्याच्या अगोदरच......




🌹🌹🌹🌹🌹