Niyati - 36 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 36

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

नियती - भाग 36








भाग 36


सुंदर च्या हालचालींचे निरीक्षण करत...
फौजदार म्हणाले...
"नानाजी.. आम्ही सगळे पाहुणचार तर तुमच्याकडेच घेणार आहोत पण त्यापूर्वी आम्ही सर्व बाबाराव यांच्या घरी चहा पाणी घेणार आहोत. हे मात्र आमचं पूर्वीच ठरलेलं होतं तेव्हा आम्ही ते बदलू शकत नाही... "

हे ऐकून सुंदर च्या माथ्यावरील शीर पुन्हा तट्ट झाली... पण तो काही बोलण्याच्या अगोदरच......






फौजदार पुन्हा म्हणाले.....
"नानाजी... आम्ही इथे दोन दिवस आहोतच.... आता मुक्काम आहे तोही... कुठे करायचा आहे सुद्धा ठरलं... पण आता आम्हाला बाबाराव यांच्याकडे महत्त्वाचे काम आहे तर चहा पाण्यासाठी आम्ही निघतो म्हणत आहोत...??"
असे म्हणून त्यांनी सर्वांना हात जोडून नमस्कार केला.

त्यांनी असे म्हटल्यानंतर नानाजी आणि सुंदर या दोघांचाही नाईलाज झाला.






आता एका दिशेने बाबाराव यांची गाडी निघाली आणि त्यांच्या मागे पोलीस ताफा निघाला...


दुसऱ्या बाजूने तणतणंत सुंदर
आणि नानाजी शांतपणे बाईकवर विरोधी दिशेने स्वतःच्या वाड्याकडे निघाले.


खरे पाहता बाबाराव यांनी.... त्यांना गुप्त माहिती मिळाल्याच्या अनुषंगाने..... शहरातील फौजदार आणि त्यांचा ताफा बोलावून घेतला होता.... फौजदारही बाबाराव यांनी दिलेल्या माहितीनुसार कुख्यात गुंड  "मूळकाट खाटीक" याला सापळा रचून पकडण्यास आलेले होते.





इथे सुंदरला.... आपण जवळपास दहा ते बारा दिवस 
कोणाच्यातरी कैदेत होतो.... मारहाण देखील सहन केली... नंतर कसेबसे सुटलो... आपल्याला तर माहिती नाही कोणी बंदी केलेले ते...??? पण त्याचा दाट असा संशय बाबाराव यांच्यावरच होता... त्यामुळे त्याच्या अंगाची अंगार...
लाही लाही होत होती.....





त्यातच आता मायराचे लग्न झाले... हे त्याच्या मनाला फारच लागले होते आणि बाईकवर वडिलांसोबत आता घरी जाताना सुंदर विचार करत होता.....






त्या मोहितच्या घरी इन मीन दोन खोल्यांमध्ये तर काही त्यांच्या जीवनाची सुरुवात होणार नव्हती...
तर.....





त्याने मनात पक्क पक्क आता ठरवले.....
"फौजदारासमोर दिलजमाईचं नाटक रंगवलं आतापर्यंत मी...
मेहनत अशीच वाया जाणार नाही. माझं नाव सुंदर आहे म्हणून काय झालं....,?? मला रुपंही सुंदर मिळालं नाही... आणि अंतरंगाचं दर्शनही जे मी दाखवलं ना ...!!!
ते तसं नाहीच आहे मुळी फौजदार साहेब..... 
मी अंतरंगात सुद्धा अजिबात सुंदर नाही...."


विचार करत करत आपसूकच त्याचा गाडी चालवता चालवता उजवा हात मिशीवर ताव मारायला गेला.... ओठांवर जवळून वर मिशीवर एक पीळ देऊन पुन्हा हँडलला हात पकडला.

आणि मनात बोलू लागला...
"झाले लग्न आज तुम्हा दोघांचे माहित आहे..... हेही तेवढेच पक्क माहित आहे की आजच काही तुम्ही एक होणार नाही. देवाचे दर्शन तर घ्यायलाच ना !! कोणत्या ना कोणत्या....!!! त्याच्याशिवाय कोणीही एक होत नाही... तसंही तुमचं दिल्लीचं तिकीट दोन दिवसानंतरचं आहे याचा मला पत्ता लागलाय. म्हणजे या दोन दिवसात मला काम करावे लागंल... आणि मी ते फत्ते करणारंच... असंच नाही खाटीकला आणले मी.. बक्कंळ पैसा मोजला आहे..."






विचार करता करता गाडीचा वेग मंदावलेला...
नानाजी यांनाही जाणवला.... पण सध्या त्यांनी शांत राहणे पसंत केले.... त्यांना सुंदर मध्ये जो आता सकारात्मक बदल दिसला.... त्यांना बरं वाटले.... राग तर त्यांना होताच बाबाराव आणि त्यांच्या मुलीचा. पण त्या रागाच्या वरती त्यांना आपल्या मुलाचं भविष्य महत्त्वाचे होतं... फौजदार गावात आलेत म्हणजे गोष्ट फारंच पुढे गेलेली दिसू लागली.... आपला एकुलता एक मुलगा या फंदात पडू नये आणि तो फसू नये म्हणून मुलाच्या प्रेमापोटी एका बापाने माघार घेतली होती त्यांच्यातल्या.







इकडे बाईकवर दोघेही जाताना रस्त्याच्या आजूबाजूने लोक जे पारीवर किंवा ओट्यावर घोळक्याने बसलेले होते.
ते जरी प्रत्यक्षात पाहत नसले तरी तिरकस नजरेने बघतच होते.. आणि ते सुंदरला जाणवत होते... तशी त्याच्या अंगातली अजूनच लाही लाही वाढली होती.. त्याचं तरुण रक्त ह्या सर्व प्रकरणाने खवळलेलं होतं... सर्व गावकऱ्यांच्या नजरेसमोर आपली काही ऐपत राहिली नाही...असं त्याला आता वाटू लागलं होतं.







अंगातली बदल्याची ज्वाला इतकी भडकली की त्याने मनातंच भीष्मप्रतिज्ञा घेतली.....
"या दोन दिवसांत तुझी मुलगी आणि जावई दोघेही एकत्र येण्याच्या अगोदरंच... नाही मी तिला पळवीन आणि तिचं कौमार्य लुटेन ... तर नावाचा सुंदर नाही.... बाबाराव....!!!"

पण त्याच्या मनातला उद्वेग त्याने स्वतःच्या सावलीलाही माहीत होणार नाही ....आता एवढी त्याने दक्षता घेतली होती. त्याचबरोबर "मुळकट खाटीक" याला सुपारी दिलेली आहे आणि तो गावात त्याच्या छत्रछायेत लपून बसला आहे. हे सुद्धा त्याने त्याच्या दगडी छातीच्या बाहेर अजिबात झिरपू दिले नव्हते. अगदी नानाजीपर्यंत सुद्धा.....






........







इकडे सर्वांपासून अनभिज्ञ असलेले मोहित आणि मायरा तसेच कवडू आणि पार्वती हे आपल्याच विश्वामध्ये मश्गुल होते...






कवडू आणि पार्वती दोघांनाही ही माहिती नव्हती की त्यांच्या मुला-सुनेची दिल्लीची तिकीट खरीखुरी दोन दिवसांनी आहे. मायराने तिकीट मोहितच्या सल्ल्याने त्या दोघांना दाखवलं... त्यांचे समाधान व्हावे म्हणून...






पण मोहित ने ठरवले होते की दोन दिवसांनी जायचेच आहे तर जे त्याच्या जवळ थोडे बहुत पैसे आहेत तर संसाराची रहाटगाडी सुरू करण्यापूर्वी मायरासोबत दिल्लीला जाण्याच्या मार्गावरच असलेले जागृत असलेल्या ज्योतिर्लिंगाचे दर्शनाला जाऊन आई-वडिलांची इच्छा पूर्ण करावी आणि तिकडेच आणखीन एक दिवस घालवावा मोकळेपणाने आणि नंतर त्याच मार्गावरून जाणाऱ्या रिझर्वेशन केलेल्या ट्रेनमध्ये बसून पुढे दिल्लीला जावे...
या उद्देशाने ती दोघं आज निघणार होते काळाकुट्ट  रात्री जवळपास पहाटे अडीच ते तीन च्या दरम्यान...
.....







इकडे कुलकर्णी बंगल्यात ....
सर्वांचा चहा पाणी गडी माणसाने केला आणि त्यावेळी स्पेशल खोलीमध्ये फौजदार साहेब , बाबाराव आणि राम... गंभीर विषयावर चर्चा करत होते त्यांच्या स्पेशल खोलीमध्ये...

आणि इकडे हॉलमध्ये सर्वांना विचारपूस करत असलेल्या 
लीला यांच्या मनावर दडपण आलेले होते...

कारण त्यांनाही मूळकाट खाटीक कसा आहे हे माहिती होते..
.





.......



पहाटे जवळपास अडीच ते तीन च्या दरम्यान दोघेही....
पार्वती आणि कवडूचा आशीर्वाद घेतला आणि सामान घेऊन निघाले.




सामान जास्त असल्यामुळे पार्वतीने कवडू ला जाण्याचा आग्रह केला स्टेशन पर्यंत तर कवडूनेही  एक बॅग घेतली सोबत.....

थोडा समोर गेलेला मोहित त्याने सामान खाली ठेवले आणि परत पार्वतीकडे येऊन ओलावल्या नजरेने तिच्या दोन्ही गालावर हात ठेवून माथ्यावर ओठ टेकवले... पार्वतीनेही अश्रू गाळत त्याला उराशी कवटाळून घेतले... खरं पाहिलं तर पार्वतीला जास्त ओढ होती मोहितची.... 







लहानपणीच त्याला दूर शिक्षणाला पाठवण्यासाठीच ती कवडू सोबत भरभरून भांडली होती. पण जसे जसे मोहित मोठा होऊ लागला आणि ती त्याला भेटायला शहरात ...मध्ये मध्ये जाऊ लागली.. तेव्हा तिच्या लक्षात आलं होतं की मुलं शिक्षणाने हुशार होतात आणि बुद्धीने मोठी होतात.
त्याची शिक्षणात होणारी प्रगती पाहून ती हरखून जात होती.
आणि काळजावर दगड ठेवून इकडे येऊन गावात पुन्हा राहत होती...
आता तर तिलाही तो कुणीतरी साहेब व्हावा असे वाटू लागले होते.. आणि त्यासाठी ती आता तो एवढ्या दूर जात होता तरीही तिचे हृदय तिने पाषाणासारखे घट्ट केले होते.

तिने थरथरत्या नजरेने त्याच्याकडे पहात त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला... तशीच वळून मायराकडेही डावा हात पुढे करत मानेने बोलावले.... तशी मायरा हातातील बॅग खाली ठेवून त्यांच्याजवळ आली...





मायरा जवळ आल्यानंतर... पार्वतीने दोघांनाही जोडीने समोर उभे केले ...डाव्या बाजूला मायरा ...उजव्या बाजूला मोहित...

दोघांच्याही गालावरून हात फिरवत म्हणाली दोघांना....




"हे बघा पोरांनो... आमच्या दोघांची चिंता करू नका. नाहीतरी आम्ही आजपर्यंत दोघं राहिलोच आहे.. तुम्ही दोघे एकमेकांची साथ सोडू नका... (दोघांच्याही नजरेत भिरभिर पाहत पार्वती बोलत होत्या)...हं...???"

त्यावर मायरा आणि मोहितने खालीवर मान हलवली.






त्यांच्याही हृदयात गलबलून आले आणि डोळ्यांमधून अश्रू पडत होते.





पार्वती पुढे म्हणाल्या....
"हां... आपण घरी कोणती पूजा अर्चना ठेवली नाही.... तर देवाच्या दर्शनानेच संसार सुरू करायचा... एखादे दिवस काही नसलं तर मीठ भाकर खा पण एकमेकांना टाकून खाऊ नका.
आता बंधनात बांधले गेले तुम्ही.... आता एकमेकांच्या साठीच जगायचं बरं.... 
आणि मोहित.... कितीही परिस्थिती आली तरी सुनबाईची साथ सोडायची नाही. ती तुझ्या विश्वासावर आली आहे तुझ्यासोबत आणि तुझ्यासोबत पुढेही राहणार आहे. नात्यामध्ये विश्वास असणं जरुरी आहे... जर नवरा बायकोच्या नात्यात विश्वास नसंल तर नातं टिकत नाही...
आणि सुनबाई.... याने कधीच कोणताच हट्ट केला नाही. आमच्याकडे पैशाची नेहमीच कमी आहे... ते जाणून त्याने कधीच ....कोणतीच गोष्ट पाहिजे.... म्हणजे पाहिजे असं कधीच म्हटलं नाही.
पण तू मात्र त्याच्यासाठी हट्ट होतीस बरं..
प्रेम तर तो तुझ्यावर खूप करतो... पण त्याचा पहिला हट्ट तू आहेस. आणि आम्ही दोघांनी त्याचा तो हट्ट मानला... लहानपणापासून तो मामा जवळ राहिला पण कधीच त्याच्याकडे कोणता हट्ट केला नाही त्याने...
आता तू त्याला अशी साथ दे की तो तुझ्याकडेही असे हट्ट 
करू लागला पाहिजे..हं..."
त्यावर साश्रू नयनाने मायराने होकरार्थी मान हलविली.






पार्वती पुढे म्हणाल्या....
" बरं ...आता निघा.. नाहीतर उशीर होईल गाडी चुकल..."

असे म्हणून पार्वतीने दोघांनाही हृदयाशी लावले...





दोघेही जड अंत:करणाने कवडूसोबत सामान घेऊन एक नजर पार्वतीकडे पाहून पुढे निघाले..... ते तिघेही दिसेनासे होत पर्यंत पार्वती तिथेच उभी राहिली..





... काळोखातून जात असलेले तिघेही चाचपडत पुढे पुढे पाऊले टाकत होते...
कवडू पुढे पुढे निघाला.... रस्ता माहित असल्यामुळे सरसर ... चालत होता आणि त्याच्या मागे...हे दोघेही....
पण....

🌹🌹🌹🌹🌹