मुक्त व्हायचंय मला भाग १३ in Marathi Motivational Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मुक्त व्हायचंय मला - भाग १३

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

मुक्त व्हायचंय मला - भाग १३

मुक्त व्हायचंय मला भाग १३ वामागील भागावरून पुढे…सकाळी सकाळी सरीता ने माधवला फोन केला."माधव काल केला होतास का रात्री आईला फोन?""हो. आज दहाच्या सुमारास ती घराबाहेर पडणार आहे." माधव"तू केव्हा भेटणार आहेस तिला?" सरीता"ती म्हणाली घरी नको येऊ. मी बाबांशी बोलेन. तू माझ्या नवीन घरी ये अस म्हणून हसली." माधव"अरे खरंच आहे ते नवीन घर तिच्या हक्काचं आहे. इथे या घरात ती इतकी वर्ष राहायचं म्हणून राह्यली." सरीता"मलापण आता आजी, आजोबा,मामा आणि मामीला भेटावसं वाटतंय." माधव"होरे मलापण भेटावसं वाटतंय." सरीता"आईने पत्ता सांगितला नाही ती ऊद्या ऑटोरिक्षा मध्ये बसली की मेसेज करणार आहे.मी तो मेसेज तुला पाठवीन. मग तिथे ये." माधव"तू आईबरोबर कसा जाशील?" सरीता"मी रिक्षाच्या मागून जाणार आहे. कालपरवाच मामा मामीने घरातील सामान त्या नवीन घरात आणून टाकले आहे. एका आठवड्यानंतर आई आजी आजोबांना घेऊन येणार आहे. म्हणाली या म्हणून जाऊया आपण." माधव"हो. जाऊया. पण आज आईने तुला पत्ता पाठवला की लगेच मला पाठव.मी तयारच राहीन." सरीता"ठीक आहे.ठेवतो." माधव"हो." सरीतासरीताशी बोलणं झाल्यावर माधव तयार होऊन बसला.आईच्या फोनची वाट बघत होता.*** बराच वेळ वाट बघीतल्यावर माधवचा फोन खणखणला.त्याने घाईघाईने फोन उचलला."हॅलो बोल आई. तू निघालीस का? मला नवीन घराचा पत्ता पाठव मी तो सरीताला पाठवीन." माधव"माधव तुझे बाबा दरवाजाला बाहेरून कुलूप लावून निघून गेलेत." मालती"काय ! असे कसे गेले?" माधव"मला थोडी शंका होती.पण मला वाटलं ते मला सामान घेऊन जाऊ देणार नाही म्हणून त्यांच्या नकळत बॅगा नवीन घरात नेऊन ठेवल्या. मलाच घरात बंद करतील अशी शंका नाही आली." मालती"अरे यार.आई मला वाटतं मी तिथे यायला हवं होतं." माधव"काही वेगळं घडलं नसतं. तुलाही माझ्याबरोबर घरात बंद करून गेले असते." मालती"आई तू त्यांना सांगितलं आहे का की तुझा प्लॅन आम्हा दोघांना माहिती आहे." माधव"नाही." मालती"एक काम करतो. त्यांना फोन करून विचारतो कधी भेटाल? नंतर मी चाबीवाल्याला घेऊन येतो.त्याच्याकडून कुलूप उघडून घेऊ. ठीक आहे. तू घाबरू नकोस." माधव म्हणाला.मालतीला पूर्ण आयुष्यात आत्ता आपला मुलगा भेटल्यासारखं वाटलं. तिने कितीही दाबून ठेवला तरी तिच्या तोंडून एक हुंदका बाहेर पडलाच."आई तू रडतेस. एवढी स्ट्राॅंग आहे तू. रडू नको. मी लगेच बाबांना विचारतो." माधव "हो विचार." असं म्हणत मालतीने फोन ठेवला.माधवने लगेच रघूवीरला फोन लावला."हॅलो." रघूवीर"बाबा तुम्ही घरी आहात की बाहेर?" माधव"का ?काय काम होतं?" रघूवीर"मला आणि सरीताला तुम्हाला भेटायला यायचं होतं. एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं." माधवने रघूवीरला खोटंच सांगीतलं."मला एक ते दीड तास लागेल. मी घरी पोचलो की फोन करतो." रघूवीर"ठीक आहे मी वाट बघतो तुमच्या फोनची. ठेवतो फोन." माधव गडबडीने म्हणाला."ठेव." रघूवीरमाधवने कानात हेडफोन घालून बाईक स्टार्ट केली आणि सरीताला फोन लावला."हं बोल माधव आई निघाली का?" सरीता"कसली निघतेय! बाबांनी तिला घरात कोंडून बाहेरून  कुलूप लावून ते बाहेर गेले आहेत." माधव"काय !अरे हा काय फालतूपणा केला बाबांनी." सरीता"ए सरीता बाबांबद्दल बोलतेस. फालतूपणा हा शब्द काय वापरतेस?" माधव"वागलेच तसे ते .पण मग आता काय करायचं?" सरीता"मी आता चाबीवाल्याकडे आलोय.त्याला घेऊन घरी जातो कुलूप उघडून आईला बाहेर काढतो." माधव"अरे पण तेवढ्यात बाबा आले तर…?" सरीता"बाबा यायला कमीतकमी दिड तास आहे." माधव"तुला कसं माहिती?" सरीता"अगं मी आत्ताच बोललो बाबांशी. तू लगेच निघ तुझी स्कूटी घेऊन निघ. आईला स्कूटी वरून नव्या घरी सोड पाठोपाठ मी येतोच त्या चाबीवाल्याला सोडून." माधवने एवढं बोलून फोन ठेवला.माधव फोन ठेवून चाबीच्या दुकानात जातो."भय्या घरके ताले की डुप्लीकेट चाबी बनानी है.""कौनसे कंपनीचा याला है.चावी है की खो गयी?" चाबीवाला"भय्या मेरेसाथ घर चलो वहा ताला देखकर चाबी बना देना." माधव"दुकानमे कोई नहीं है साहेब." चाबीवाला"पंदरह मिनीटकी तो बात है.""आपके घर जाकर चाबी बनानी है तो पैसे जादा लगेंगे. पहलेही बता देता हूं.बादमे मेरेकू खिचखीच नही चाहिए." चाबीवाला"दे दूंगा आप चलो." माधवमाधवने बरीच मिन्नतवारी केल्यावर तो चाबीवाला तयार झाला."ऐ राजू थोडीदेर मेरी दुकान संभाल.मै ग्राहकके साथ जा रहा हूं" चाबीवाला"ठीक है भय्या जाके आव." राजूतो राजू तयार झाला. मग तो चाबीवाला आपली पोतडी घेऊन माधवच्या गाडीवर बसला.माधव त्याला घेऊन आपल्या घराजवळ आला.चाबीवाल्याने आपलं हत्यार वापरून त्या  कुलूपाच्या मापाची चाबी करून कुलूप उघडलं.माधवने लगेच दार उघडलं समोर मालतीला बघून काही कळायच्या आत माधवने मालतीला मिठी मारली आणि 'आई' म्हणून रडू लागला.मारुतीला हे अनपेक्षित होतं. माधवचा रडण्याचा उमाळा संपेपर्यंत मालती त्यांच्या पाठीवर थोपटत होती. हे दृश्य बघून चाबीवाला संभ्रमात पडला. तेवढ्यात तिथे सरीता येऊन पोहचली."साहेब मुझे दुकानपे छोड दोगे नं" चाबीवाला"हां चलो." माधवमाधव मालतीपासून लांब होतं म्हणाला."आई लवकर निघ. सरीता चल. हे घर पुन्हा आहे तसं लाॅक करून ठेवायचं आहे." माधव म्हणाला.मालती चटकन पायात चपला अडकवून बाहेर पडली. माधवने घराला पुन्हा कुलूप लावलं आणि निघाला.माधवच्या गाडीवर चाबीवाला होता तर सरीताच्या गाडीवर मालती होती. सरीताने गाडी स्टार्ट करून सोसायटीच्या बाहेर  काढली. मालतीने वास्तूला दुरून नमस्कार केला. आजपासून मालतीचं या वास्तूशी असलेलं नातं संपलं होतं.*** ब-याच वेळाने रघूवीर घरी आला. तो स्वतःशीच म्हणाला आज मालतीचं जाणं थांबवलं पण उद्याचं काय! मालती वर सारखी नजर ठेवावी लागणार नाही तर आपलं वर्चस्व कसं राहील?विचारात गुंग असलेला रघूवीर दाराचं कुलूप उघडून घरात शिरला. चिडलेली मालती घरात दिसेल असा त्याचा अंदाज होता पण मालती त्याला घरात कुठेही दिसली नाही. रघूवीरला स्वतःला वेड लागेल का असं वाटायला लागलं.मालती मालती म्हणत घरभर रघूवीर ने शोधलेच पण तो वेड्यासारखा कपाटात शोधू लागला. त्याला कळेना मालती गायब कशी झाली शेजा-यांशी काहीच संबंध नसल्यानें ते कशाला रघूवीरला सांगतात की तुमचा मुलगा येऊन घेऊन गेला म्हणून.रघूवीर शेजारी कोणाशीच बोलत नसे.त्याच्या चेह-यावर मग्रूरी दिसत असे त्यामुळे आपणहून कोणी त्यांच्याशी बोलायला येत नसे.मालती कुठे गेली. या प्रश्नात रघूवीर अडकला.______________________________क्रमशः मुक्त व्हायचंय मलालेखिका.. मीनाक्षी वैद्य.