mukta vhayachay mala - 6 in Marathi Motivational Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मुक्त व्हायचंय मला - भाग ६

Featured Books
Categories
Share

मुक्त व्हायचंय मला - भाग ६

मुक्त व्हायचंय मला भाग ६मागील भागावरून पुढे…मालतीला बाळाची चाहूल लागते. ती रघूवीरला ही आनंदाची बातमी सांगते. तिला वाटतं यामुळे तरी रघूवीरचा स्वभाव बदलेल. पण रघूवीर तिला गर्भपात कर म्हणतो. मालती ठामपणे गर्भपाताचा नकार देते. त्यावर रघूवीर खूप चिडतो.मालतीला अद्वातद्वा बोलतो तरी मालती ऐकत नाही.मालती ऐकत नाही म्हणून  रघूवीर तिला खूप त्रास देतो त्यामुळे तिचा गर्भपात होतो.ही गोष्ट मालतीच्या जिव्हारी लागते. मालतीची मानसिक अवस्था खराब होते. तिला नोकरी वर सुद्धा जायची इच्छा होत नाही. घरातील कामं करण्याचं बळ तिच्या अंगी नसतंच. पण रघूवीरला तिची दया येत नाही.नोकरी,घरातली कामं आणि रघूवीरची सेक्सची इच्छा पूर्ण करता करता मालतीची तब्येत इतकी खराब होते की एक दिवस ती ऑफीसमध्ये चक्कर येऊन पडते.ऑफीसमधले लोक तिला दवाखान्यात घेऊन जातात. डाॅक्टर मालतीला तपासून काही औषधं लिहून देतात." यांचे नातेवाईक कोणी आहेत इथे?" डाॅक्टर विचारतात."नाही डाॅक्टर आम्ही ऑफीसमधले कलीग आहोत." वर्षा म्हणाली. वर्षा तिच्या बाजूच्या डेस्क वर बसत असते म्हणून दोघी मैत्रिणी असतात." यांची तब्येत फारच खराब आहे.यांना सलाईन लावावं लागेल. एक दोन दिवस दवाखान्यात ठेवावं लागेल. यांच्या घरी कळवून द्या." डाॅक्टर" हो.कळवते." वर्षा म्हणाली.डाॅक्टर निघून गेल्यावर वर्षा आणि तिच्याबरोबर आलेले शाम आणि मंदार विचार करू लागतात की हिच्या घरी कळवायचं कसं." वर्षा तुला यांच्या घरचा नंबर माहिती आहे का?" वाहने विचारलं." मला माहिती नाही पण ऑफीसमध्ये असेल नं." वर्षि" अरे हो ऑफीसमध्ये असेल.मी एक काम करतो. ऑफीसमध्ये फोन करून यांच्या घरचा नंबर घेतो. मंदार तू इथेच थांब" शाम" हो आहे मी इथे. तू बाहेर जाऊन फोन कर कारण या दवाखान्यात रेंज नाही येत." मंदार" हो माहिती आहे म्हणूनच बाहेर जाऊन फोन करतो." शाम म्हणाला आणि दवाखान्याच्या बाहेर फोन करायला गेला.***शामने मालतीच्या घरचा नंबर ऑफीसमधून घेतला आणि घरी फोन केला. हा नंबर मालतीच्या माहेरचा होता.फोन नंदाने घेतला." हॅलो" नंदा" नमस्कार मी शाम अवधूत बोलतोय. मालतीच्या ऑफीसमधून.आपण कोण बोलतात?" शाम" मी तिची वहिनी बोलतेय नंदा. मालती बरी आहे नं?" नंदा" मालतीला ऑफीसमध्ये चक्कर आली म्हणून तिला सह्याद्री हाॅस्पीटलमध्ये दाखल केलंय.तुम्ही लवकर दवाखान्यात या." शाम" हो.लगेच येतो. कोणत्या मजल्यावर आहे?" नंदा" दुस-या मजल्यावर  दोनशे तीन नंबरची खोली." शाम" आलोच आम्ही." एवढं बोलून नंदा फोन ठेवते."आई मालतीच्या ऑफीसमधून फोन होता मालतीला सह्याद्री दवाखान्यात दाखल केलं आहे." नंदा." काय ! काय झालं मालतीला?" आई"माहिती नाही. चक्कर आली तिला. चला दवाखान्यात जाऊ." नंदा." हो.पण आधी चंदूला कळव तो ऑफीसमधून परस्पर दवाखान्यात येईल." आई" हो कळवते. रघूवीरना पण कळवायला हवं." नंदा" ते आधी कळव." बाबा म्हणालेनंदा मालतीच्या घरी फोन लावते.एव्हाना सात वाजत आले होते तरी  मालती घरी न आल्यामुळे रघूवीर संतापला होता. तेवढ्यात फोन वाजतो." हॅलो."" मी नंदा बोलतेय मालतीची वहिनी.मालतीच्या ऑफीसमधून फोन आला होता की मालतीला दवाखान्यात नेले. तुम्ही लवकर सह्याद्री दवाखान्यात या. आम्ही लगेच निघतोय." नंदा" एवढ्या मोठ्या आवाजात का बोलता? बहिरा नाही मी. फोनवर बोलण्याचे साधे मॅनर्स नाही तुम्हाला. मालतीला दवाखान्यात नेलं आहे नं मग होईल ती बरी. ठेवा फोन" रघूवीर" रूम नंबर दोनशे तीन." नंदा.नंदा हे बोलतच होती की तिला पलीकडून फोन आपटून ठेवल्यासारखं वाटलं. नंदा रघूवीरचं बोलणं ऐकून हत्तबद्ध झाली. तिचा असा चेहरा बघून मालतीच्या आईबाबांना काही कळेना." अगं नंदा काय झालं? तुझा चेहरा कसा का दिसतो आहे? रघूवीर पोचतात आहे नं दवाखान्यात?" बाबांनी नंदाला एवढे प्रश्न विचारले पण नंदा निश्चल पुतळ्यासारखी फोन जवळ बसली होती.शेवटी मालतीच्या आईने नंदाला गदागदा हलवला तेव्हा नंदा भानावर आली."आई आपण मालतीचं त्या रघूवीरशी लग्न लावून देऊन फार मोठी चूक केली." नंदा" काग? रघूवीर काही म्हणाले का?" आई" आई मालती दवाखान्यात आहे या बातमीने त्यांना काहीही फरक पडला नाही. ऊलट फोनवर कसं बोलायचं. म्हणजे फोनवर बोलण्याचे मॅनर्स मला शिकवत होते. हृदयशून्य माणूस आहे हा रघूवीर." नंदा" हं.खरच विचीत्र आहे रघूवीर.पण आता त्यावर चर्चा करायला वेळ नाही पटकन निघूया. तुम्ही पाण्याची बाटली घ्या. अश्या काही बातम्या ऐकल्या की तुमच्या घशाला शोष पडतो." बाबा" हो.घेते." आई तिघही रिक्षाने दवाखान्यात पोचतात.नंदा आई आणि बाबा दवाखान्यात येतात तेव्हा तिथे शाम, मंदार आणि वर्षा असतात. मालतीची अवस्था बघून नंदा, आई आणि बाबा तिघांच्या पायाखालची जमीन सरकते." काय हाल केले बाई माझ्या लेकीचे." आईला रडू आवरेना. वर्षा लगेच त्यांना बसायला खूर्ची देते. आई मालतीच्या पलंगाजवळ खुर्ची घेऊन बसतात. त्या हळूच मालतीचा हात हातात घेतात. मालतीच्या हाताला सलाईन लावलेली असते."डाॅक्टर काय म्हणाले?" बाबा शामला विचारतात." मालतीची अवस्था खराब आहे म्हणाले." शाम." आणखी काही म्हणाले का?" बाबा" घरच्यांना बोलवा म्हणाले." वर्षा" मालती बेशुद्ध आहे का?" बाबा"दवाखान्यात आणलं तेव्हा होती.नंतर तिला सलाईन लावलं.त्यातून काही औषधं दिली मग थोडी शुद्धीवर आली पण लगेच झोपली" शाम" औषधांची गूंगी असेल." बाबा" हो.डाॅक्टर पुन्हा येणार आहेत.तेव्हा कळेल." वर्षाएवढ्यात घाईघाईने चंदू येतो.मालतीची अवस्था बघून त्यालाही धक्का बसतो." काय अवस्था झाली आहे मालतीची!" चंदू. तोही मालतीची अवस्था बघून मनातून घाबरतो.आई,बाबा,चंदू आणि नंदा या चौघांची अवस्था एकच असते ती म्हणजे भेदरलेली.एवढ्या वेळात रघूवीरपण दवाखान्यात पोचतो.त्याला बघताच मालती भवती कोंडाळं केलेले सगळे बाजूला होतात. फक्त आई खुर्चीवर बसलेल्या असतात. मालतीची अवस्था बघून सगळ्यांची जी अवस्था झाली तशी रघूवीरची अजीबात झाली नाही.शाम, मंदार आणि वर्षा प्रथमच रघूवीरला बघत होते. त्यांनाही रघूवीरची मालतीला बघून झालेली थंड प्रतिक्रिया बघून धक्का बसला. मालती रघूवीर विषयी ऑफीसमध्ये फारसं बोलत नसे.बेशुद्ध असलेल्या आपल्या बायकोला बघून कोणत्या नव-याची एवढी थंड प्रतिक्रिया असू शकते? पण रघूवीरची  होती. कारण तो अतिशय हृदयशून्य माणूस आहे.रघूवीर अगदी थंड नजरेने मालती कडे बघत होता. त्याच्या चेह-यावर कोणतेही भाव नव्हते. एखादा रोबोट रघूवीर म्हणून उभा आहे असंच तिथे असलेल्या सगळ्यांना वाटत होतं.

____________________________

_क्रमशः मुक्त व्हायचंय मलालेखिका.. मीनाक्षी वैद्य.