mukta व्हायचंय मला भाग १२ in Marathi Motivational Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मुक्त व्हायचंय मला - भाग १२

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

मुक्त व्हायचंय मला - भाग १२

मुक्त व्हायचंय मला भाग १२वामागील भागावरून पुढे…" माधव आता आई या घरात थांबणार नाही असं दिसतंय" सरीता"हो आईला थांब असंही बाबा म्हणणार नाहीत हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. कारण त्यांचा अहंकार आडवा येतो." माधव"आपला जन्मच होऊ नये असं बाबांना वाटत होतं हे आई म्हणाली. माधव तुझा यावर विश्वास बसतोय?" सरीता"मनात शंका येते पण एवढं मोठं खोटं ती का बोलेल? आजपर्यंत आपण कधी आईच्या इतक्या जवळ गेलोच नाही त्यामुळे ब-याच गोष्टी आपल्याला माहिती नाही." माधव"मग आता काय करायचं? बाबांच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?" सरीता"आई ऊद्याच नवीन घरात जाणार आहे. तेव्हा घरात काय नाटक घडेल याचा अंदाज बांधणं कठीण आहे." माधव"आईने पाठवलेली घटस्पोटाच्या नोटिसीला बाबा काय उत्तर देतील.?" सरीता"ते पुढे ठरेल. मला वाटतं आईची नोटीस बघीतल्यावर बाबांची काय रिॲक्शन होईल ते बघू. त्यावरून ते काय उत्तर देतील यांचा अंदाज येईल." माधव"हो बरोबर आहे तुझं म्हणणं. आईलाच फोन करून विचारू" सरीताथोडावेळ दोघंही शांत होते."माधव आपण शाळा काॅलेजमध्ये  असताना आईशी कधी प्रेमाने बोललो नाही. बोललो ते फक्त बाबांशी" सरीता"हो. कारण आपणही काही कमी नव्हतो. पैसे बाबांचं देतात हे कळलं होतं आपल्याला." माधव"खरच रे आपण बघत होतो आईची होणारी धावपळ. ऑफीस,घरातलं काम,आपल्यासाठी आपण म्हणू ते खायला करणं. ती कधी थकत असेल, तिला आपण आराम द्यायला हवा हे सगळं कसं आपल्याला कळलं नाही." सरीता"बाबाचं तिला हूकूम सोडायचे. ती काही न बोलता सगळं करायची. म्हणून आपणही तसंच करायचो. आता मात्र आपण तिला साथ द्यायची." माधव"हो. बाबांना आता त्यांचं वागणं बदलायला हवं. आईला तिचं मोकळं आकाश आपण मिळवून द्यायला आपण तिला मदत करायची बाबा ऐकतील की नाही माहीत नाही." सरीता"आता त्यांना सांगायचं. जसे ते आईला सांगायचे तसं त्यांना सांगायचं. त्यांना विचारायचं नाही. आजपर्यंत आपण तिघ  आईला फक्त ऑर्डर सोडायचो. बाबांनी  आईला कधी काही विचारलं असं मला आठवतच नाही." माधव"हो रे आपण पण बाबांसारखे आईला ऑर्डर सोडण्यात धन्यता मानायचे" सरीता"सरीता आपण जी चूक अजाणतेपणी केली ती सुधरवायची. आईला आपण कोणीच विचारत नव्हतो तर तिला किती वाईट वाटत असेल पण तिने कधी आपली आबाळ केली नाही. आपल्याला सर्वोतोपरी  मदतच केली पण आपण समजलो ही आपल्याला घाबरते म्हणून आपलं सगळं करते."माधव"माधव आईला वेगळं राह्यला जाऊ दे. तिच्या माहेरच्या लोकांना तिला भेटायला मिळेल. वेगळं राह्यला लागली की ती बाबांना घटस्फोटाची नोटीस पाठवणार आहे." सरीता"बाबा तिला सहजा सहजी सामानासकट घरातून जाऊ देतील असं वाटत नाही." माधव"असं केलं त्यांनी तर मग काय करायचं?" सरीता"आपण आईला घराबाहेर पडायला मदत करू. बाबांचा विरोध शंभर टक्के होईल पण त्याला आपण दाद द्यायची नाही.कळलं?" माधव"हं.कळलं." सरीता"हे आपलं प्रायश्चित्त आहे असं समज." माधव"मला आता आपलं पूर्वीचं वागणं आठवलं की खूप वाईट वाटतं.  सगळ्यांना आईबद्दल प्रेम आदर असतो आपण तिचा अपमान कसा करू शकतो हेच बघीतलं. माधव तसं बघीतलं तर आईने तिचा घटस्पोट घेण्याचा निर्णय आपल्याला सांगायची काहीच गरज नव्हती. कारण आपण आत्तापर्यंतच्या आयुष्यातील निर्णय तिला विचारून घेतले नाही की तिला घेतलेले निर्णय सांगीतले नाही. बाबांचा विचार आपल्यासाठी महत्वाचा होता." सरीता"तेच तर. कळत नकळत किती आपण आईला दुखावलं आहे. आज जर माझ्या बायकोने कुठला निर्णय परस्पर घेतला तर मला राग येईल. तिने स्वतः निर्णय घेऊ नाही असं मी कधीच म्हणणार नाही पण तिने माझ्याबरोबर चर्चा करावी हे माझं मत मी सुरवातीलाच तिला सांगितलं होतं. आपल्या घरी बाबांनी आयुष्यभर त्यांचेच निर्णय योग्य समजले." माधव"माधव हे कुठेतरी थांबायला हवं.माझ्या नव-यानी असं केलं तर माझा किती संताप होईल याचा विचार करून मला अस्वस्थ होतं आहे.आईने कसं झेललं असेल आयुष्यभर. विचार करून माझं डोकं गरगरायला लागतं." सरीता"माझं पण. सरीता ऊद्या सकाळी आपण घरी जाऊ. रात्री आईला फोन करून कल्पना देतो. तू कधी येणार ऊद्या? तुझे काय प्रोग्राम आहेत?" माधव"आई  ! हाच माझा महत्वाचा प्रोग्राम आहे. सरळ सुट्टी टाकते. आमच्या ऑफीसमधली अनीता फालतू कारणांसाठी सुट्टी टाकते आणि इतकी नाटकं करते. मी तरी खूप महत्वाच्या कारणासाठी सुट्टी टाकणार आहे. माधव ऊद्या तुझ्या मिटींग शेड्युल आहेत का?" सरीता"आहेत पण त्यांना दोन दिवसांनी बोलवतो. त्यांना घाई असेल तर माझा असीस्टंट शर्माला पाठवीन." माधव"चल मग आता घरी जाऊ. तू आईशी बोलून वेळ ठरव आणि मला मेसेज कर." सरीता"ओके.चल.बाय." माधव म्हणाला.माधव आणि सरीता दोघंही आपापल्या घरी जातात.______________________________क्रमशः मुक्त व्हायचंय मलालेखिका.. मीनाक्षी वैद्य.