Whose festival is Diwali? in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | दिवाळी हा सण नेमका कोणाचा?

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

दिवाळी हा सण नेमका कोणाचा?

दिवाळी हा सण सर्वांचाच?

  

          *दिवाळी ही सर्वांचीच आहे. परंतु दिवाळी हा सण हिंदूंचा असे समजून सर्वच धर्मीय दिवाळी साजरी करतांना निरसता दाखवतात. बौद्ध मंडळी या दिवशी मोगलायन व सारिपुत्तची हत्या झाली असा दाखला देवून दिवाळी हा काळा दिवस मानतात तर मुस्लीम लोकं अल्ला एकच आहे व तो या दिवशी जन्मला नाही असं कारण देत दिवाळी साजरा करणे टाळतात. ख्रिश्चन मंडळी येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या तिथीला दिवाळी मानतात. तसं पाहिल्यास प्रत्येक धर्मातच दिवाळी आहे. दिवाळीचा अर्थच आनंद असा होतो. परंतु प्रत्येक धर्मात तिथ्या वेगवेगळ्या आहेत. शिवाय ही तिथीही हिंदू धर्मियांची नसेलच. कारण त्यांची तिथी वेगळी होती व ही तिथी शेतकऱ्यांची तिथी होती. म्हणूनच हा दिवस सर्व धर्मियांनी साजरा करण्यालायक तिथी आहे. ज्या ज्या धर्मात शेतकरी आहेत. हा केवळ हिंदूंचाच सण नाही. तो सर्व धर्मियांचाचाच सण आहे. जो अखंड हिंदुस्थानात राहात असेल.*

            दिवाळी हा सण नेमका कोणाचा. असा प्रश्न कुणालाही आज पडणार नाही. कारण आपल्या मनावर दिवाळी हा हिंदूंचा सण आहे, हेच कोरलं गेलेलं आहे आणि तो सण हिंदू धर्मीयच साजरा करतांना आपल्याला दिसत आहे. तो सण हिंदू धर्मीयच साजरा करीत आलेले आहेत आजतागायत. त्यामुळंच नेमका हा सण कोणाचा? याबाबतचा विचारच आपण कधी केलेला नाही. 

          अलिकडे दिवाळी हा सण साजरा होतोय आणि तो सण अगदी धुमधडाक्यात साजरा करण्याची एक प्रथा आहे. या दिवशी सर्व घरोघरी नंदादीप लावले जातात. घरासमोर रांगोळ्या काढल्या जातात. त्यानंतर फटाकेही फोडले जातात. परंतु हा सण नेमका कोणाचा आणि तो केव्हापासून अस्तित्वात आला असेल याचा विचारही केला जात नाही. 

        दिवाळी हा सण नेमका कोणाचा? असा प्रश्न उपस्थित केल्यास आतिशयोक्ती होईल. कारण या सणावर दावे प्रतिदावे नेहमीच चालत असतात. कधी या सणावर हिंदू धर्मीय दावे करतात. त्यासाठी इतिहास सांगतात तर कधी या सणावर बौद्ध धम्मीय लोकं दावे करतात व तेही हक्कं सांगत असतात. त्यामागे त्यांचा त्यांचा इतिहास आहे. हिंदूंचा इतिहास असा आहे की राम वनवासातून परत आले. ते परत आल्याने त्या दिवशी दिवाळी साजरी केली होती. म्हणूनच हा दिवाळी सण हिंदूंचा. परंतु यावर काही बौद्ध धर्मीय म्हणतात की राम हे वनवासातून वैशाख महिन्यात परत आले. त्यामुळंच हा सण त्यांचा नाही. तो सण आमचा आहे. कारण आमचे भदंत पावसाळ्याच्या आजारांचे प्रमाण जास्त असल्यानं स्वतःला तीन महिनेपर्यंत गृहेत वा लेणीत स्वतःला बंदिस्त करुन ठेवत. आजार त्यांना शिवू नये म्हणून. त्यात ते उपास तापासही ठेवत नव्हे तर त्या वर्षावासाच्या काळात सतत पाऊस पडत असल्यानं व अन्न मिळविण्यासाठी पुरेशी सोय नसल्यानं उपास तापासही घडत. त्यातच चार महिने पावसाळा असायचा. त्यानंतर वाऱ्याची दिशा बदलायची व परतीचा पाऊस सुरु व्हायचा. त्याचा अंदाज बौद्ध भिख्खूंना यायचा. त्यातच असा अंदाज आलाच की ते विशिष्ट अशी तिथी पाहून बाहेर पडत. ते ज्या दिवशी बाहेर पडत. त्याच्या आधीच्या दिवशी तीच मंडळी एक प्रकारचा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करीत असत. त्याला दिवाळी असे म्हणत. त्यानंतर ते धम्म प्रसारासाठी बाहेर पडत व तो उत्सव कोजागिरी पौर्णीमेला साजरा होत असे. ही त्यांची दिवाळीच असे. 

        हिंदू मात्र खऱ्या अर्थानं दिवाळी गुढी पाडव्यालाच साजरी करायचे. त्या दिवशी ते गुढी उभारायचे. त्याचं कारण होतं, हिंदू धर्माचं पित्तरांना मानणं. ते पित्तरं निराश होवू नये म्हणून गुढी उभारली जायची व तो सण अतिभव्य प्रमाणात हिंदू धर्मीय साजरे करीत असत. त्याला गालबोट लागलं संभाजी महाराजांच्या हत्येनं. मुघलांनी पाहिलं की हिंदू लोकं गुढीपाडवा जोमानं साजरा करतात. तेव्हा हा सण त्यांनी साजरा करु नये म्हणून त्यांनी संभाजी महाराजांची त्याच दिवशी रात्रीला हत्या केली व त्यांचं मस्तक त्याच दिवशी गुढी रुपात भाल्यावर सजवलं व हिंदूंचा दिवाळी म्हणून साजरा होणारा सण नष्ट केला. 

         दिवाळी ही हिंदूचीही साजरी होत असे व दिवाळी ही बौद्धांचीही साजरी होत असे. मात्र त्यांच्या तिथ्या वेगवेगळ्या होत्या. मग हीच दिवाळीची तिथी हिंदूंनी का घेतली असेल यामागे कारणमिमांसा आहे व हा सण नेमका कोणाचा? हे सुद्धा आज अज्ञात स्वरुपात आहे आणि विचार करणारा प्रश्न आहे. 

          या सणाबाबत सांगायचं झाल्यास हा सण तसं पाहिल्यास व सखोल विचार केल्यास शेतकऱ्यांचा आढळून येतो. माणूस झाडावरुन जेव्हा खाली आला आणि तो शेती करु लागला हे सर्वांनाच माहीत आहे व ही गोष्ट डार्वीनचा उत्क्रांतीवाद सांगतोच. त्यातच त्याहीवेळेस भारताला भारत जरी नाव नसलं तरी भारत असेलच ही शक्यताही नाकारता येत नाही. तसं पाहिल्यास दिवाळी हा सण आपल्याच भारतात आणि त्यावेळच्या हिंदुस्थानात साजरा होत असेलच. ज्या अखंड हिंदुस्थानात सर्वदूर हिंदू धर्म किंवा बौद्ध धर्म नसेलच. मग कोणाचं राज्य असेल बरे? ते राज्य होतं शेतकरी वर्गाचं. 

          *हीच तिथी का?*

           ज्यावेळेस भारत अस्तित्वातही नव्हता आणि ज्यावेळेस धर्मही अस्तित्वात नव्हता. त्यावेळेसही हा सण साजरा होत असे. अन् तो त्या काळानुसार साजरा केल्या जात असे. मग हीच तिथी तो सण साजरा करण्याची होती काय? असाही एक प्रश्न आपणाला पडू शकतो. तर याचं उत्तर होय असंच येईल. यापुर्वीच्या चार महिन्याच्या काळात भारतात म्हणजेच अखंड हिंदुस्थानात जुन ते सप्टेंबर पावसाळा असायचा. सतत पाऊस पडायचा. ज्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसानही व्हायचं. तरीही काही माल शेतात उरायचंच. त्यातच पाऊस संपला की शेतकरी वर्ग ते धान्य कापायचे व त्याला मार्गी लावून धान्य काढायचे. त्यातील राशी घरी भरल्या जात असत. अशातच त्या राशी घरात भरल्या गेल्या की एक दिवस निवडायचे. त्या दिवशी त्या राशीच्या सन्मानार्थ नाचगाणे करायचे. पर्यायानं सांगायचं झाल्यास उत्सव साजरा करायचे. ज्यात उत्सव साजरा करतांना त्यात घराची साफसफाई करायचे. त्यात उद्देश होता. घरात जे जीवजंतू आहेत. ते बाहेर पडायला हवेत. ज्यापासून धान्याला नुकसान आहे. पुढं चुनखडकाचा शोध लागल्यानंतर चुना मारण्याची पद्धत रुढ झाली. ज्यात चुना मारल्यावर धान्याला किड्यापासून व मुंग्यांपासून वाचवता येत असे. 

        हा मुळचा शेतकऱ्यांचा सण. दिवाळी आणि होळी हे दोन्ही सणं शेतकऱ्यांचेच. पहिला सण खरीप पिके घरी आणल्यावर साजरा केल्या जायचा तर दुसरा सण रब्बी पिकं हातात आल्यावर साजरा केल्या जायचा. त्याला तिथ्या नव्हत्याच. त्यानंतर पुढं जेव्हा धर्म स्थापन झाला. त्या त्या धर्मानुसार तथाकथीत लोकांनी शेतकरी वर्गाचं काहीच चालू दिलं नाही आणि आपली मक्तेदारी स्थापन केली. कृषक वर्गाचं दिवाळी आणि होळी सणाबाबत अस्तित्वच समाप्त करुन टाकलं आणि आपलं अस्तित्व निर्माण केलं व दावेदारी ठोकली. दिवाळी हा सण आमचाच. 

          मौर्य साम्राज्याच्या अस्तापर्यंत दिवाळी सणाची स्थिती ठीकच असेल. दिवाळी हा सण हिंदू वर्गीय लोकं उन्हाळ्यातच साजरा करीत असतील तर कोजागिरी पौर्णिमेला वर्षावास संपल्यानंतर बौद्ध धर्मीय लोकं दिवाळी सण साजरा करीत असतील. कारण दिवाळीचा मुळात अर्थ आनंद असा तथाकथीत लोकांनी घेतला. दिवाळी साजरी करायची म्हणजेच आनंद साजरा करायचा. असंच ठरल्यानं जेव्हा धर्म स्थापन झाले. तेव्हा प्रत्येक धर्माची दिवाळी वेगवेगळीच होती. असं जर होतं तर दिवाळीची ही तिथी हिंदूंची तिथी म्हणून का अस्तित्वात आली? असाही एक प्रश्न उपस्थित होतो. त्याचं कारण आहे, त्या काळातील वाद. त्याही काळात धर्माधर्मांचे वाद व्हायचे. आताच्या काळात जसे कधीकधी हिंदू मुस्लीम वाद होतात तसे. त्याही काळात वैदिक धर्म व बौद्ध धर्म वैदिक धर्म व जैन धर्म असे वाद व्हायचे. प्रत्येक धर्मीय माणसांना एकमेकांचे आचार विचार पटायचे नाहीत. पचायचेही नाहीत. मग वाद व्हायचे. त्यातच हत्याही. ज्यात राजा बृहद्रथच्या हत्येनंतर येथे राजपद धारण केलेल्या पुष्यमित्र शृंग घराण्यानं वैदिक धर्माला राजाश्रय दिला. कारण तो वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता व त्याच्याच राज्यात कितीतरी बौद्ध भिख्खूंची हत्या करण्यात आली. त्यातच गौतम बुद्धाच्या अगदी जवळचे असलेले शिष्य मोगलायन व सारीपुत्त यांचीही हत्या करण्यात आली व तो दिवस एक आनंद उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. त्याला दिवाळी असं नाव देण्यात आलं. त्यानंतर परंपराच पडली की हाच दिवस दिवाळी म्हणून साजरा करायचा. 

         दिवाळीची ही तिथी मुळची शेतकरी वर्गाची तिथी होती. शेतीतून आलेल्या धान्यावर आनंद व्यक्त करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली तिथी. म्हणतात ना की दोघांचं भांडण व तिसऱ्याचा लाभ. परंतु यामध्ये दोघांचं भांडण झालं व तिसऱ्याचं नुकसान. वैदिक आणि बौद्ध धर्मियांचं भांडण. ज्यातून शेतकऱ्यांच्याच तिथीच्या दिवशी हत्या आणि मग परंपरा. आज दिवाळी म्हणून साजरी होत असलेली शेतकऱ्यांची तिथी मिटली नव्हे तर मिटवली गेली आहे आणि त्या जागेवर विशिष्ट अशा धर्मानं बाजी मारत आपली तिथी बनवली आहे. त्यानंतर ती बौद्ध धर्मीय लोकांची तिथी नव्हतीच. म्हणूनच त्यांनी त्यावरचे दावे करणे सोडून दिले आहे. शेतकरीही चूप बसले आहे. कारण त्यांना दिवाळीशी व तिथीशी काही घेणंदेणं नव्हतं आणि नाही. शिवाय ते अज्ञानी देखील होते. शिवाय त्या शेतकरी वर्गातील बरेचसे शेतकरी वैदिकच होते. तद्नंतर त्यात लक्ष्मी, कुबेर, गणपती शिरवल्या गेलीत. तद्नंतर रामालाही शिरवल्या गेलं. ज्यांचा या दिवाळीशी दूरचाही संबंध नव्हता. पुढं जेव्हा या भारतात मुस्लीम समुदाय आला व हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या. तेव्हा या सणाला अधिक महत्व निर्माण झालं व घरोघरी हिंदू समुदाय मुस्लीम राजवटीतही मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करु लागले. त्यानंतर इंग्रज आले व त्यांना हाकलून देण्यासाठी व हिंदूंना एकत्र करण्यासाठी या सणाची महती आणखीनच वाढली. त्याचं कारण होतं, असा सण साजरा करुन आपल्या धर्माबाबत लोकांच्या मनात आत्मीयता निर्माण करणं. 

          महत्वाचं सांगायचं झाल्यास आज दिवाळी साजरी होतोय हिंदूंचा एक सण म्हणून. त्याचं पावित्र्य जपलं जातं. घरोघरी आनंद सोहळा असतो. तोरणे, पताका लावल्या जातात. त्यातच हा सण हिंदूंचाच सण आहे असं गृहीत धरलं जातं. परंतु तो हिंदूं नावाच्या एकाच धर्माचा सण नाही तर तो सर्व धर्मियांचाच सण आहे. ज्या ज्या धर्मात कृषक वर्ग आहे. 

          आज शेतकरी कोणत्या धर्मात नाहीत. हिंदू, मुस्लीम, बौद्ध, जैन, शिख, पारशी, ख्रिश्चन या सर्व धर्मात शेतकरी आहेत व पर्यायानं सांगायचं झाल्यास हा सण त्या सर्वांनीच साजरा करायला हरकत नाही. परंतु हा सण साजरा करतांना ती मंडळी बंधन पाळतात. कोणी म्हणतात की दोन बौद्ध भिख्खू त्याच दिवशी मारले गेले. असे बोलून समाजात तेढ निर्माण केली जाते. असे जर आहे तर ज्या दिवशी धर्मवीर संभाजीची हत्या केली. तो गुढीपाडवा होता. तो सण हिंदू धर्मीय साजरा करतात की नाही.

           हत्या त्या काळात ह्या होणारच होत्या. त्याचं कारण होतं त्या काळात एकमेकांचे विचार न पटणं. कधी धर्मावरुन वाद व्हायचे व हत्या केली जायची. मग हत्या करतांना तिथी व दिवस पाहिल्या जात नव्हता. आजही हत्या केल्याच जातात अशाच कुविचारातून. उदाहरणार्थ ज्या दिवशी मुंबईत बॉम्बस्फोट झाला. ती तारीख होती २६/11. संविधान बनल्याची तारीख. याचा अर्थ तो काळा दिवस पाळून संविधान दिवस म्हणून ती तारीख साजरी करु नये काय? करायलाच पाहिजे. हत्या करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी. हे जरी खरं असलं तरी आपण तो मुद्दा थोडासा बाजूला ठेवून व समाजातील दिवाळीबाबतची थोडीशी कलुषता बाजूला ठेवून, सर्व धर्मीयांनी हा सण सर्व मिळून गुण्यागोविंदानं साजरा करायला हवा. दिवाळी हा हिंदूचा सण म्हणून नाही तर तो शेतकऱ्यांचा सण आहे असं मानून. तेव्हाच आपण सहिष्णू आहोत याचा परीचय देता येईल.      

          भारत आपला आहे. तो शेतकऱ्यांचा आहे तेवढाच तो सर्व धर्मियांचाही असून दिवाळी साजरी करण्याचा सर्वांनाच हक्कं आणि अधिकार आहे. त्यामुळंच त्यांनीही दिवाळी हा सण नेमका एका विशिष्ट धर्माचाच असं म्हणून वा मानून दिवाळी या सणाचा अपमान करु नये तर तो साजरा करुन दिवाळी या सणाचं महत्व वाढवावं. जेणेकरुन आपण आपला धर्माबाबत कितीही वाद असला तरी देशांतर्गत कोणताच वाद नाही हे सिद्ध होईल व आपली एकजुटता दिसेल व आपल्या एकतेचाही परीचय देता येईल हे तेवढंच खरं, यात शंका नाही. 


          अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०