Anubandh Bandhanache - 17 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 17

The Author
Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 17

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग १७ )

जसजसे दिवस पुढे जात होते तसे, प्रेम आणि अंजली यांचं नाते अजुनच बहरत चाललं होतं.
दोन वर्ष अशीच अगदी आनंदात गेली होती. या कालावधीत ते दोघे एकमकांच्या अजुनच जवळ आले होते. 

त्या दोन वर्षात तिने स्वतः साठवलेल्या पैशातून प्रेमला एकदा मोबाईल फोन गिफ्ट म्हणुन दिला होता. आणि दुसऱ्या वर्षी एक सोन्याची चैन गिफ्ट दिली होती.
 
खरं तर प्रेमसाठी असे महागडे गिफ्ट स्वीकारणं खुप अवघड व्हायचं, पण अंजली थोडी हट्टी होती, ती काहीही करून ते त्याला घ्यायला भाग पाडायची. आणि आता प्रेम जवळ मोबाइल असल्यामुळे ती त्याला कधीही कॉल करू शकत होती. आता वेळेचं बंधन उरलं नव्हतं. 😊

   अंजली आता नववीतुन दहावीत गेली होती. हे वर्ष खुप महत्वाचे होते, त्यामुळे तिचे अभ्यासातून दुर्लक्ष होणार नाही याची काळजी प्रेमला पण होती. म्हणून तो आधिसारखा तिला भेटायचा नाही. या गोष्टीचे अंजलीला खुप वाईट वाटत होते. पण प्रेम तिची वेळोवेळी समजुत काढायचा.

 एक दिवस ते दोघे भेटल्यावर प्रेम ने तिला व्यवस्थितपणे समजावलं. या गोष्टी करण्यासाठी पुढे आयुष्य पडलं आहे. पण हे वर्ष तुझ्यासाठी खुप महत्वाचे आहे. आणि मी इथेच आहे. तुझ्या जवळच, पण तु तुझ्या अभ्यासावर लक्ष दिले पाहिजे. असं मला मनापासुन वाटतं. अंजली सुद्धा त्याला या गोष्टीची खात्री देते की, मी खुप मन लाऊन अभ्यास करेन, आणि चांगल्या मार्कांनी पास होऊन दाखवेन.

आणि तिने केलेलं प्रॉमिस सुध्दा पुर्ण करुन दाखवलं. अंजली दहावीत खुप चांगल्या मार्कांनी पास सुध्दा झाली. 

प्रेम आज तिला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या घरी आला होता. एवढ्या दिवसात मॉम आणि प्रेम यांच्यात खुप छान असं नातं तयार झालं होते. मॉम स्वताहुन त्याला कॉल करत होत्या, त्याच्याशी खुप बोलत होत्या. आज प्रेम घरी आला होता त्यामुळे त्या पण आज खुश होत्या. 

प्रेम येताना एक मोठी कॅडबरी घेऊन आलेला असतो. ती तिला देतो आणि हात मिळवुन शुभेच्छा देतो. अंजलीला पण छान वाटतं. ती त्याला बसायला सांगते आणि आत जाऊन पाणी घेऊन येते आणि त्याला देते.
तोपर्यंत मॉम प्रेमला बोलतात...

मॉम : प्रेम... खुप छान वाटलं तु आलास. 😊
प्रेम : हो... यावच लागलं, नाहीतर मॅडम नाराज झाल्या असत्या. 😊

* अंजली समोरच सोफ्यावर बसली होती. त्याच्याकडे पाहून तिने डोळे मोठे करत बोलली. *

अंजली : असं काही नाही, फोन वरती शुभेच्छा दिल्या असत्या तरी चालल्या असत्या. तसंही पाच महिन्यानंतर आपण उगवला आहात. एवढा कुठे बिझी होता.🤔

प्रेम : बिझी तर नव्हतो... पण म्हंटल मॅडम ना त्रास नको द्यायला, दहावीचे वर्ष आहे. उगाच अभ्यासात दुर्लक्ष नको व्हायला. 😊

अंजली : काहीही कारण सांगु नको. तुला वेळ नव्हता ते बोल. 😏

प्रेम : अरे खरच... 😊

अंजली : माहीत होते मला सर्व... 😏

मॉम : अरे... तुम्ही सेलिब्रेट करणार आहात की भांडत बसणार आहात...?😊

प्रेम : बघा ना मॉम... मी तर सेलिब्रेट करायला आलोय. हिच भांडते. 😊

अंजली : ओ हो... मीच भांडते का... बरं, तु भेट नंतर...😠

प्रेम : मॉम... बघितलं का धमकी देते सरळ सरळ. 😊

मॉम : तुम्ही मित्र आहात तुमचं तुम्ही बघुन घ्या, मला नाही यात पडायचं.😊

प्रेम : मॉम, तुम्ही पण...🤔

मॉम : बरं ओके...😊 अंजु.... जा आता काहीतरी खायला घेऊन ये त्याला.

अंजली : हो आणते....😏

* असं बोलून ती किचन मध्ये जाते आणि एका डिश मधे केक घेऊन येते आणि प्रेम ला देते. *

प्रेम : अरे व्वा... मस्तच...😋 कोणी बनवला.?

अंजली : मॉम नी बनवला.😏

प्रेम : हा... तरी वाटलच मला, खुप टेस्टी आहे, तु पण शिकुन घे काहीतरी, आता सुट्टीच आहे दोन महिने, कॉलेज चालु होईपर्यंत तरी. 😊

अंजली : मला पण येतो बनवता केक... कळलं 😏

प्रेम : हो...का... मग कधी येऊ खायला...😋

अंजली : तुम्हाला वेळ आहे का ते पहा आधी...😏

मॉम : अरे हो... शांत बस आता त्याला खाऊ तरी दे, किती बोलशील. 😊

प्रेम : बघा ना मॉम... सारखी भांडत असते. एवढ्या दिवसांनी घरी आलोय तर असं वेलकम करतात का मित्राचं...?😊

अंजली : आता तु केक खातोय का, मार खायचा आहे. 😏

प्रेम : अरे बाप रे... हा पण प्लॅन आहे का, मग थांब थोडं खाऊन घेतो, सहनशक्ती वाढेल. 😊

अंजली : प्रेम ... आता गप्प बस... आणि खा.😔

प्रेम : ओके मॅडम...😊

मॉम : बरं प्रेम तु चहा घेणार की कॉफी...?

प्रेम : चहा...👍🏻😊

मॉम : बरं ठीक आहे मी बनवते.😊

अंजली : मॉम... तु बस... मी बनवून आणते.😊

प्रेम : अच्छा... नक्की येतो ना चहा बनवायला. 😋

अंजली : म्हणजे काय बोलायचं आहे तुला, मला साधा चहा पण बनवता येत नाही का...?😠

प्रेम : अरे असं काही नाही, कधी प्यायलो नाही ना, तु बनवलेला चहा.😋

अंजली : हो ना... मग आज पिऊन बघ, नंतर सांग, येतो की नाही ते कळलं. 😠

प्रेम : बरं ठीक आहे बनव, तोपर्यंत मी मनाची तयारी करतो. 😊

अंजली : मॉम... सांग ना याला, बघ कसा बोलतोय, मी नाही करत का हे सर्व. 😔

प्रेम : अरे... असं काही नाही ग... मस्करी केली ना... बरं सॉरी...😊 जा बनव चहा, तोपर्यंत आम्ही गप्पा मारतो.😊

अंजली : हो... मारा गप्पा... मी आलेच.😏

* असं बोलून ती किचन मधे चहा बनवायला जाते. *

मॉम : किती भांडता रे तुम्ही...😊

प्रेम : असं काही नाही मॉम...पण मजा येते तिला चिडवायला...😊

मॉम : अरे पण तिला खरच आवड आहे किचन ची, पण मीच जास्त येऊ देत नाही. स्कूल, ट्युशन, तिचा अभ्यास, त्यात छोटीला पण छान सांभाळते ती. 😊

प्रेम : हो... तुमचे संस्कार आहेत. दिसतात तिच्या वागण्यात बोलण्यात, खुप फरक पडतो मुलांच्या आयुष्यात या गोष्टींचा, तुमचा स्वभाव इतका गोड आहे, मग थोडातरी तिच्यात येणारच ना. 😊

मॉम : बरं आता माझी तारीफ पुरे झाली. 😊

प्रेम : नाही मॉम... खरच बोलतोय मी, नाहीतर माझ्यासारख्या मुलाला एवढ्या आपुलकीने प्रेमाने आपलंसं केलत. इथे प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात बिझी असताना असं दुसऱ्यांसाठी कोणी वेळ सुद्धा देत नाहीत. हे अनुभवलं आहे मी या काही वर्षात. पण तुमच्याशी बोललो, भेटलो की खुप छान वाटतं.😊

मॉम : प्रेम... अरे किती विचार करतोय. कसं आहे ना, मुळात मला तुझा स्वभाव आवडतो, तुझे विचार आवडतात. तु ज्या परिस्थितीत लहानाचा मोठा झाला आहेस. आणि आत्ता तु स्वतः आई भाऊ यांना सांभाळत आहेस. या सर्व परिस्थितीची जाणीव आहे तुला. हल्ली या वयात मुलं खुप भरकटतात. पण तु खुप वेगळा आहेस. 😊

*दोघे बोलत असतात तेवढ्यात अंजली चहा घेऊन येते आणि दोघांना चहा देते *

अंजली : गप्पा चांगल्याच रंगल्या आहेत. एवढी तारीफ तर मी आत्तापर्यंत कोणाची केलेली आठवत नाही मॉम कडून...🤔

प्रेम : अच्छा म्हणजे तु सर्व ऐकत होती तर...😊

अंजली : हा थोडफार....😊

मॉम : अंजु... तारीफ असं नाही ग बाळा, प्रेम खरच खुप चांगला आहे. आणि जे खरं आहे तेच मी बोलली.😊

प्रेम : (अंजलिकडे पहात) तुला नाही आवडली का मॉम नी माझी तारीफ केलेली. 😊

अंजली : असं काही नाही...😊

प्रेम : मग कसं आहे बरं...🤔

अंजली : कसं नाही... तु चहा पी... मी बनवलाय... कसा झालाय ते पण बोलले नाही दोघेही...😔

प्रेम : अरे हा... विसरलो, 😊 खरच खुप छान बनवला आहेस. मस्त...👍🏻😋

अंजली : राहु दे... आता मी बोलल्यावर,.. खोटी तारीफ करून काय उपयोग...😔

प्रेम : अरे नाही... खरच खुप छान झालाय, हो ना मॉम...😊 

मॉम : अग् हो... छान झालाय चहा...👍🏻

अंजली : थँकयु वेरी मच...🙏🏻😊

*तिघे मिळुन गप्पा मारत चहा संपवतात. अंजली कप घेऊन आत जाते.*

मॉम : प्रेम... मी काय बोलते...!😊

प्रेम : बोला ना मॉम...🤔

मॉम : आम्ही आमच्या गावी चाललोय, गोव्याला चार पाच दिवस... तुला यायला आवडेल का...?😊

प्रेम : मॉम... खरच आवडलं असतं, पण एवढे दिवस सुट्टी मिळेल की नाही, ते सांगता येत नाही. 

मॉम : बघ ना तरीही प्रयत्न करून, बॉस ला सांग काहीतरी...😊 

प्रेम : कधी जाणार आहात ? अंजु चे डॅड पण असतील ना ?🤔

मॉम : अरे नाही, ते नाही येणार, त्यांना सुट्टी नाही मिळत. आणि मी माझ्या माहेरी म्हणजे आईकडे जाणार आहे. बघ ना तु आलास तर खुप मज्जा येईल. 😊

प्रेम : ठिक आहे मी ट्राय करतो. 😊

मॉम : ठिक आहे मी तुला तारीख कळवते नंतर, पण ऐक अंजु ला काही बोलू नको. तिला सरप्राइज देऊ.😊

प्रेम : ठिक आहे पण मी आधी सुट्टीचे काय होतंय ते बघतो. 😊

मॉम : होईल रे... जरा मस्का लाव बॉस ला. 😊

प्रेम : हो... ते तर करावच लागेल. 😊

*तेवढ्यात अंजली तिथे येते.*

अंजली : काय चाललंय ? एवढे का हसताय दोघेही ? 🤔

मॉम : अगं काही नाही, जोक सांगितला प्रेम ने. 😊 

अंजली : अच्छा... नक्की ना, का माझ्यावरून काही चाललं होतं...?😔

प्रेम : अरे... नाही ! आम्ही दुसऱ्या विषयावर बोलत होतो. 😊

अंजली : हो का... मग मला पण कळेल का तो विषय, का सांगायचं नाही.? 😔

मॉम : नाही ग असं काहीही नाही. आम्ही असच बोलत होतो. 😊

अंजली : बरं ओके...,,😊

प्रेम : मॉम... मी निघतो आता,खुप वेळ झाला.😊

मॉम : अरे बस ना थोडा वेळ, नंतर जा थोड्या वेळाने.

प्रेम : नको, निघतो मी आता. एका मित्राकडे जायचं आहे.

अंजली : थांब ना थोडा वेळ, मॉम बोलते तर...🤨

प्रेम : नाही... आज नको, नंतर येईन. 😊

अंजली : नंतर कधी...? म्हणजे किती महिन्यांनी...?🤨

प्रेम : अरे... लगेच टोमणा मारला...😊 येईन लवकरच... आता निघतो. बाय मॉम, बाय अंजली.😊

मॉम : बरं ठिक आहे. पण मी बोलले आहे ते लक्षात आहे ना ?,😊

अंजली : (दोघांकडे बघत) 🤔

प्रेम : हो आहे लक्षात. मी सांगतो नंतर.....👍🏻

मॉम : ओके. नीट जा, काळजी घे. 👍🏻

प्रेम : हो... बाय...✋🏻

*असं बोलुन प्रेम जायला निघतो. अंजली पण मॉम ला सांगुन त्याच्यासोबत खाली जायला निघते. ते घरातुन बाहेर येतात. प्रेम पायऱ्या उतरायला जातो, तेवढ्यात अंजली बोलते. *

अंजली : प्रेम... लिफ्ट ने जाऊया ना...😊

प्रेम : अरे... आपण पहिल्या मजल्यावर आहोत. किती वेळ लागणार आहे खाली जायला. चल ईकडून...😊

अंजली : नाही... मला कंटाळा आलाय...तु ये इकडे, लिफ्ट नेच जाऊ. 😊

प्रेम : किती आळशी झालीय तु...😊

अंजली : असु दे...तु चल लिफ्ट आली.

* दोघे लिफ्ट मधे जातात. अंजली डोअर बंद करते. G बटण दाबताच लिफ्ट खाली जाऊ लागते. लिफ्ट थोडी खाली आल्यावर ती त्याला मिठी मारते आणि ओठांवर अलगद किस् करते, आणि बाजुला होते. तोपर्यंत लिफ्ट खाली पोचते. डोअर ओपन करून ते बाहेर पडतात.*

प्रेम : हे काय होतं... 😊

अंजली : तुझ्यासाठी गिफ्ट होतं... घरी खुप कंट्रोल केलं स्वतःला म्हणुन इथेच.... 😊

प्रेम : अच्छा... लगेच चान्स मारते. एवढ्या कमी वेळात. 😊

अंजली : हा... काय करणार आता... मला तर खुप काही करावं असं वाटतं पण, तुमच्याकडे वेळ नाही ना...😋

प्रेम : अच्छा... असं कोण बोललं...?😊

अंजली : तु.... अजुन कोण, एक्झाम चे कारण पुढे करून गेल्या काही महिन्यांपासून खुप टाळलं आहेस मला तु,,,,,,,, पण आता बस्... इथुन पुढे बघतेच मी...किती भेटतो ते...🤨

प्रेम : अरे... सरळ सरळ धमकी...🤔

अंजली : हा... तुला तसं वाटत असेल तर तसं समज, पण यापुढे मला काहीही कारणं नको आहेत कळलं...😠

प्रेम : अरे हो... किती बोलशील.😊

अंजली : हसु नको, मला सांग आता कधी भेटायचं आहे ?😊

प्रेम : ओए... आत्ताच तर भेटलो ना...😊

अंजली : प्रेम... नखरे करू नको आता, सांग ना कधी भेटूया...?😔

प्रेम : बरं ओके... लवकरच भेटू...ठिक आहे.😊

अंजली : ते लवकर म्हणजे कधी, मला वार, तारीख, वेळ ते नक्की सांग...🤨

प्रेम : अरे हो... सांगतो मी, उद्या बोलू दुपारी, आता मी निघतो. खुप लेट झालाय.😊

अंजली : प्रेम प्लिज...🙏🏻 आता काही कारण काढून टाळू नकोस. एवढे दिवस तु बोलला म्हणुन मी पण तुला फोर्स नाही केला. पण आता तरी नको असं करू. 🙏🏻😔

प्रेम : अगं असं नाही... भेटू लवकरच ओके.
अंजली : नक्की...प्रॉमिस...👍🏻

प्रेम : हा...प्रॉमिस...🤝🏻 आता निघु मी.😊

अंजली : बरं ओके... नीट जा, आणि थँकस ,😊

प्रेम : अच्छा... कशाबद्दल...🤔

अंजली : असच....😊

प्रेम : बरं आता हात सोडशिल, सर्व बघतायत. 😊

* अंजलीने पकडून ठेवलेला हात सैल करते. प्रेम अलगद तिच्या हातातुन आपला हात काढून घेत, तिला बाय करून तिथून जायला निघतो. नेहमीप्रमाणे तो नजरेसमोरून दुर होईपर्यंत ती तिथेच उभी असते. तो दिसेनासा झाल्यावर अंजली घरी परत येते.

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️