Anubandh Bandhanache - 15 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 15

The Author
Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 15

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग १५ )

आज सोमवार होता. रोजच्याप्रमाणे प्रेम ऑफिस मधे आला होता. दुपारी लंच टाईम झाल्यावर दोन वाजता अंजलीचा कॉल येणार हे जवळजवळ नेहमीचं झालेलं होतं. कारण त्याचे बॉस लंच साठी घरी जायचे मग त्यांना यायला चार तरी वाजायचे. हा वेळ प्रेमसाठी तसा फ्री असायचा. 

अंजलीच्या घरी तसा काही प्रॉब्लेम नव्हता. कारण तिच्या रूम मधे पण फोन होता. म्हणून अंजली दुपारी दोन नंतरच त्याला कॉल करायची. आजची गोष्ट जरा वेगळी होती. दोन वाजून गेले होते. प्रेम खुप वेळ तिच्याच फोन ची वाट पहात होता. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. आणि प्रेम ने रीसिवर उचलुन कानाला लावला. 

अंजली : हाय... जानु.... कसा आहेस...?😊
प्रेम : अच्छा... प्रेमचा आता जानु झाला का...😊
अंजली : हो... ना... कधीपासूनची ही इच्छा होती की, तुला जानु म्हणून हाक मारायची. 
प्रेम : कधीपासूनची म्हणजे...🤔
अंजली : जाऊ दे ते सोड ना... तुला आवडतं ना मी तुला जानु बोलते ते...😊
प्रेम : आता एवढ्या प्रेमाने जर कोण असं बोलत असेल तर कोणाला नाही आवडणार.😊 हो... ना... मेरी जान...😍
अंजली : ओह माय गॉड... जान...🥰 पुन्हा एकदा बोल ना... प्लिज...😊
प्रेम : हा.... मेरी जान...😊
अंजली : हाय.... म्हणजे मी तुझी जान आणि तु माझा जानु... हो ना... 🥰 किती मस्त वाटतं... हे फिलिंग...🥰
प्रेम : अच्छा... खरच का...?😊
अंजली : हो...ना... सगळं कसं अगदी स्वप्नात घडत आहे असं वाटतंय, सर्वच बदललं आहे. म्हणजे माझ्या मनात त्या भावना आधीपासूनच होत्या, पण व्यक्त करू शकत नव्हती. कुठेतरी मैत्रीचं बंधन आड येत होते. पण आता त्याच मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले आहे. 😊

प्रेम : हो... पण अंजली मला काय वाटतं...!

* प्रेमचे बोलणे अर्धवट थांबवून...*

अंजली : हो.... मला माहित आहे, तुला काय वाटत होते तेव्हा, जेव्हा मी प्रपोज केला तेव्हा, आणि आत्तासुद्धा तुझ्या डोक्यात खुप विचार असतील. मला माहित आहे. म्हणून मी तेव्हा तुला फक्त एकच प्रश्न विचारला होता....
तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही....?
आणि मला त्याचे उत्तर मिळाले. आता पुढे जसं तु बोलशील तसच होईल. ओके....😊

प्रेम : अंजली.... मला ना खरच पुन्हा पुन्हा हाच प्रश्न पडतो. तु एवढीशी आहेस...! पण कुठून शिकते हे सर्व मोठ्या माणसांसारखे बोलायला...? 🤔

अंजली : अरे... असं का बोलतोय...तु...? मला जे वाटतं ते मी बोलते. त्यात या गोष्टीचा काय संबंध...,🤨

प्रेम : असं वाटतं, की तु फक्त वयाने लहान आहेस. बाकी सर्व बाबतीत तु मोठ्या मुलींसारखी आहेस. 😊

अंजली : हो... का... म्हणजे नक्की तुला काय बोलायचं आहे. मी थोडी जाडी आहे म्हणुन बोलतोय ना....😔

प्रेम : अरे... पागल... मी असं कुठे बोललो, तु जास्त समजदार आहेस, असं बोलायचं होतं मला... कळलं....😊

अंजली : आता विषय बदलू नको, कळलं मला... तुला सूट होत नाही ना मी... म्हणून बोलतोय...ना...😔

प्रेम : ओय... काहीही काय बोलते. असं काहीच नाही, तु जशी आहेस तशीच खुप सुंदर आहेस, आणि मला तशीच आवडतेस, समजलं...😊

अंजली : खरं बोलतोय ना... का मला बरं वाटण्यासाठी बोलतोय. 🤔

प्रेम : अगदी खरं आणि मनापासून बोलतोय. ओके.... आणि आता हा विचार काढून टाक डोक्यातून कळलं...😊

अंजली : बरं... ठिक आहे....आता मला सांग कधी भेटायचं आपण...?😊
प्रेम : अच्छा.... भेटू लवकरच....😊
अंजली : पण नक्की कधी... मला भेटायचं आहे तुला .....😔
प्रेम : हो...रे...पण ऑफिस च्या कामातून मधून वेळ नाही मिळत. 
अंजली : मग सुट्टी घे ना एक दिवस माझ्यासाठी...🤨 मस्त जाऊ कुठे तरी फिरायला. 😊

प्रेम : हो... का... घरी काय सांगशील...?🤔
अंजली : सांगेन मी काहीतरी त्याचं टेन्शन तु नको घेऊ.... तु सुट्टी घेतोय का ते बोल....😊

प्रेम : आता लगेच तर पॉसिबल नाही, काम खुप आहे. बघु नंतर... मी सांगेन तुला...😊
अंजली : कधी नंतर... कधी येईल तो दिवस...?🤔
प्रेम : येईल लवकरच... सबर करो, सबर का फल मीठा होता है...😊
अंजली : मला नको ते मिठा वगैरे....तु भेट ना रे लवकर... खुप बोलायचं आहे तुझ्याशी...😌

प्रेम : अरे हो ना... मला पण खुप काही बोलायचं आहे. भेटू आपण लवकरच...ओके.
अंजली : ठिक आहे... मी वाट पाहीन त्या दिवसाची....😊
प्रेम : बरं आता ठेऊ फोन... काम आहे खुप, तु पण होमवर्क पूर्ण कर.😊
अंजली : लगेच काय... बोल ना अजुन थोडा वेळ, प्लिज...😌
प्रेम : बस ना सोन्या आता... खरच काम खुप आहे, सर पण येतील लवकर. आपण उद्या बोलू...ओके.😊
अंजली : बरं ओके...कर काम तु...😔
प्रेम : गूड गर्ल....😊
अंजली : प्रेम.... ऐक ना... 😊
प्रेम : आता काय राहिलं...🤔
अंजली : आय लव्ह यू.... जानु....😘
प्रेम : आय लव्ह यू टू...माय जान...😘

* एवढं बोलुन प्रेम फोन ठेऊन देतो. पुन्हा त्याच्या मनात तेच विचार यायला लागतात. मी तिच्याशी बोलताना असं का बोलतोय, एका प्रियकरासारखे,.... मी तर ठरवलं होतं की, तिच्याशी या विषयावर सविस्तर बोलावच लागेल. आणि या सर्व गोष्टी बोलण्यासाठी अंजलीला एकदा भेटावच लागेल.

 शेवटी गुरुवारी तिचा कॉल येतो, तेव्हा शुक्रवारी ते दोघे भेटायचं ठरवतात. 

अंजली १० वाजताच शाळेतुन निघते. प्रेम तिची बाहेरच गेटजवळ वाट पहात असतो. ती गेट मधुन बाहेर येते तसे ते दोघे एका ऑटो मधे बसतात. 
ऑटो मधे बसताच अंजली प्रेमला घट्ट मिठी मारते. आणि तशीच त्याला बिलगुन बसलेली असते. तिथून ते एका कपल स्पॉट वर येतात. अंजली स्कूल ड्रेस वर असते. म्हणून प्रेमला थोडे टेन्शन येते. 

खाली उतरल्यावर ते दोघे तलावाशेजारी एका झाडाखाली बसतात. अंजली प्रेमचा हात हातात घेऊन बोलते.

अंजली : प्रेम.... का गप्प आहेस...?🤨
 मला माहित आहे, तु आपल्या नात्याबद्दल विचार करतोय. खुप काही बोलायचं असेल तुला. आता बोल सर्व...जे काही चाललंय डोक्यात. आज ते सर्व बाहेर येऊ दे, मी ऐकते बोल....😊

प्रेम : अंजली तुला खरच वाटतं का... मी तुझा लाईफ पार्टनर म्हणून तुझ्यासाठी योग्य आहे...?

अंजली : असं का बोलतोय रे...😔 प्रेम तुला चांगलच माहीत आहे. जेव्हापासून प्रेम या गोष्टीची जाणीव व्हायला लागली होती ना... तेव्हा फक्त तुच समोर असायचा. त्यामुळे तिथे तु सोडुन दुसरे कोणीही येऊ शकत नाही.

प्रेम : अंजली.... खरं सांगु.... माझंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. पण... माझं स्वतःचं असं काही अस्तित्व नाही. माझ्याकडे काहीच नाही ग... साधं रहायला स्वतःचं घर सुद्धा नाही. ना तेवढं शिक्षण आहे की, मी कुठे चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकतो. खुप अंतर आहे आपल्या दोघांच्या राहणीमानात. पुढे जाऊन या सर्व गोष्टींचा खुप त्रास होईल दोघांनाही.

अंजली : प्रेम... मला फक्त एक गोष्ट माहीत आहे. की माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि पुढे जे काही होईल ते फेस करायला मी तयार आहे. पण तुझ्याशिवाय मी नाही जगु शकणार.

प्रेम : एवढं सोपं नसतं ते... तु अजुन खुप लहान आहेस. या गोष्टी लक्षात यायला अजून खुप वेळ आहे तुला...

अंजली : ठिक आहे ना...मी मान्य करते, मी अजुन लहान आहे. पण मला कळतंय सर्व तुला काय बोलायचं आहे ते... आता मी काय करू तूच सांग... फक्त एक गोष्ट सोडुन मी तुझं सर्व ऐकेन... मला तु हवा आहेस, आयुष्यभरासाठी, बाकी काही नकोय.

प्रेम : अंजली... आपण खुप घाई करतोय असं नाही वाटत का तुला...?
 तु अजुन आठवीत आहेस. अजुन खुप शिकायचं आहे तुला... हे सर्व करण्यासाठी पुढे आयुष्य पडले आहे.

अंजली : मला पण कधी कधी वाटतं असं, पण खरं सांगु... मी का घाई केली... मला भीती वाटत होती की, तुझ्या लाईफ मधे अजुन दुसरी कोणती मुलगी नको यायला. आणि ते मी सहन करू शकले नसते. म्हणून मी जरा लवकरच प्रपोज केला ना... सॉरी...😔

प्रेम : अरे... हे कारण झाले का...? ,😊

अंजली : का नाही होऊ शकत... मी वाट बघत बसू का त्या दिवसाची की, एक दिवस तुच मला प्रपोज करशील... आणि त्याआधी जर तुला दुसऱ्याच कोणत्या मुलीने प्रपोज केलं असता तर....आणि तु तिला होकार दिला असता तर... 😔 नाही... मी कल्पना पण करू शकत नाही या सर्व गोष्टींची...😌

प्रेम : अरे पागल... असं काही असतं का...?

अंजली : का नाही... मला तुझ्या बाबतीत कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती. म्हणून मी जरा...घाई केली. पण खरच असं काही नाही ना...?

प्रेम : काय.... असं... म्हणजे...नक्की काय बोलायचं आहे तुला...?

अंजली : हो... ना... मी त्या दिवशी तुझ्या बाबतीत हा विचार पण केला नाही, की तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आहे की नाही, मला तर नाही जाणवलं आत्तापर्यंत तरी.... पण तसे काही असेल तर आत्ताच सांग... उगाच जबरदस्ती नको...😔

प्रेम : हो...का... आणि खरच जर मी बोललो की, आहे कोणीतरी आधीपासूनच तर....🤔
अंजली : मस्करी करतोय ना माझी.... एवढी पण नासमज नाही ना मी... कळतात काही गोष्टी... तुझ्या डोळ्यांत बघितलं की, समजतं सर्व... तुझ्या आतमध्ये काय चालु आहे ते...
प्रेम : अच्छा... एवढं ओळखतेस का मला...?🤔
अंजली : किती ओळखते ते तुलाच माहीत असणार. पण हा... थोडं तरी नक्कीच ओळखते. 😊

प्रेम : अच्छा... बरं मग सांग... आत्ता मी काय विचार करतोय ते...😊

अंजली : ते तर तु बोललाच आहेस, खुप प्रश्न पडलेत तुला... आपल्या नात्याबद्दल... कळतंय मला... प्रेम खरच मी नाही विचार केला या सर्व गोष्टींचा... मी फक्त खुप प्रेम करते तुझ्यावर बस्... एवढंच मला माहित आहे.

प्रेम : अंजली... मला बोलायचं तर खुप आहे, पण बोलू शकत नाही, अशी अवस्था झाली आहे माझी. तुला कसं समजावू हे सर्व...खरच काही कळत नाही.

अंजली : जाऊ दे ना प्रेम... आत्ताच नको ना या गोष्टींचा विचार करायला. पुढे जे काही होईल ते होईल. आपण दोघे सोबत आहोत ना, मग होईल सर्व ठिक तु नको ना जास्त टेन्शन घेऊ ... प्लिज.🙏

प्रेम : बरं ठिक आहे, तु बोलते तर नाही घेत टेन्शन... ओके. पण एका अटीवर.!

अंजली : म्हणजे... कोणती अट...?🤔

प्रेम : आधी प्रॉमिस कर, मी बोलतोय तसच करायचं....😊

अंजली : असं कसं... तु काहीही बोलशील, मी आधीच का प्रॉमिस देऊ... तु आधी सांग... मग ठरवू.... 🤨

प्रेम : बरं... मग ऐक आता... माझे तुझ्यावर प्रेम आहे. हे कळले ना आता तुला. 😊

अंजली : हो... कळले...😊 पण पुढे काय...?🤨

प्रेम : पुढे.... निदान तुझी दहावी ची परीक्षा होईपर्यंत आपण जसे आधी होतो तसचं राहायचं. फक्त आणि फक्त मित्र म्हणुन. कळलं.... कर प्रॉमिस आता....😊

अंजली : अरे... कसं शक्य आहे ते... आणि असं का... त्याने काय होणार आहे.🤔

प्रेम : त्याने बाकी काय होणार हे माहीत नाही, पण तुझ्या अभ्यासावर परिणाम होणार हे नक्की. 😊

अंजली : ओय... असं काहीच होणार नाही. वाटलं तर तुला मी हे प्रॉमिस देऊ शकते की, या गोष्टीचा मी माझ्या स्टडी वर कसलाही इफेक्ट होऊ देणार नाही. आणि तु जे बोलतोय ते आत्ता कसं पॉसिबल आहे. 🤔

प्रेम : का नाही पॉसिबल... आधी पण रहात होतोच ना मित्र म्हणुन... मग आता का नाही...?🤔

अंजली : खरच... वेडा आहेस तू... असं नाही होत....प्रेम..., काहीही विचार करतो तु...😊

प्रेम : त्यात काहीही काय... का नाही राहू शकत तु सांग...?🤔

अंजली : हम्म...😊 कसं सांगू तुला आता...🤔 बरं एक काम कर. उभा रहा.😊

प्रेम : का पण ... कशाला...🤨

अंजली : सांगते ना...तु रहा तरी...😊

* दोघे पण ऊठुन उभे राहतात.* 

प्रेम : हा... बोल आता काय...?🤨

अंजली : अरे हो... किती घाई...😏 आता मला मिठीत घे... 😊

प्रेम : हे काय नवीन... 🤔

अंजली : नवीन कुठे काय...? आधी पण घ्यायचा ना... तसच आत्ताही घे. 😊

* प्रेम अलगद तिला मिठीत घेतो. अंजली पण त्याला घट्ट मिठीत घेते. नकळत प्रेम चे डोळे बंद होतात. खुप वेगळं वाटतं त्याला आणि तिला सुध्दा...😊 आजपर्यंत ते जेव्हा जेव्हा असे भेटलेत तेव्हा नेहमीच ते एकमेकांना हलकीशी का होईना मिठी मारायचे. पण आजची गोष्ट वेगळी होती. प्रेमला ती मिठी सोडवत नव्हती, आणि अंजलीला ती सोडायचीही नव्हती. ती फक्त प्रेमला हीच गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करत होती. 😊

 साधारण दोन अडीच मिनिट ते दोघे एकमेकांच्या मिठीत होते. थोड्या वेळाने प्रेम डोळे उघडतो. अजुनही आपण मिठीत आहोत. हे त्याला जाणवलं. त्याने हळूच मिठी सैल केली. आणि थोडा बाजुला झाला.

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️