Anubandh Bandhanache - 12 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 12

The Author
Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 12

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग १२ )

आपण एका हॉटेल मधे आहोत हे लक्षात घेऊन प्रेम अंजलीला स्वतःपासून थोडं बाजुला करतो. तिचे डोळे पाण्याने भरलेले असतात. प्रेम त्याचा खिशातील रुमाल काढून तिचे डोळे पुसतो. प्रेमला खरं तर खुप काही बोलायचं असतं पण तिच्या समोर तेव्हा तो शांत बसतो. तिच्याकडे पाहून एक हलकस स्माइल करतो. 🙂
प्रेम : अंजली मॅडम... या गंगा जमुना वाहुन झाल्या असतील तर. थोडं फ्रेश व्हाल का ? सर्व मेकअप उतरला आहे. 😊
अंजली : ( डोळे पुसत ) चल मी काही जास्त मेकअप करत नाही. इतर मुलींसारखा कळलं...😏
प्रेम : अरे हो.... पण ते खारट पाणी सर्व चेहऱ्यावर पसरलं आहे ना ते तरी साफ कराल की नाही....😊
अंजली : हो... जाते फ्रेश होते.

* वॉश बेसिन कडे जाऊन ती चेहऱ्यावर थोडं पाणी मारते. आणि समोर आरशात पाहून थोडीशी लाजते. 😊 डोळ्यात जरी अश्रू होते तरी ते आनंदाचे होते. आणि त्या पाण्याच्या थेंबानी तिचा चेहरा आता तिलाच वेगळा वाटू लागला होता. आज ती स्वतःला अजुनच सुंदर अनुभवत होती.
 तेवढ्यात प्रेमचा आवाज ऐकुन ती दचकते. आणि फ्रेश होऊन परत टेबल जवळ येते. प्रेमच्या हातातील रुमाल घेते आणि चेहरा पुसते. आणि त्याला एक गोड अशी स्माईल देते...😊

प्रेम : तु चहा तर पिणार नाहीस... तुला ज्यूस मागवला आहे. आणि मी असताना कोल्ड्रिंक्स मिळणार नाही.😊
अंजली : ज्युस नको मला.... मी चहाच घेइन.😋
प्रेम : अरे.... तुला तर चहा आवडत नाही ना...मग...🤔
अंजली : तुला आवडतो ना....मग मला पण सवय लावून घ्यायला हवी ना...😋
प्रेम : ओय... बरी आहेस ना... 🤔
अंजली : हो... मी तर आज खूपच बरी आहे. 😊

* प्रेम वेटर ला सांगुन ज्युस कॅन्सल करतो. आणि दोन चहा आणायला सांगतो. दोघे पुन्हा टेबलवर समोरासमोर बसलेले असतात. अंजली हसत हसत प्रेम कडे पहात असते. *

प्रेम : काय झालं... अशी काय बघतेय. 
अंजली : काही नाही असच... तुला पहावसं वाटतंय... डोळे भरून...😊
प्रेम : का बरं.... मी कुठे जाणार आहे का उद्यापासून....दुबईला वगैरे...?🤔
अंजली : बस... अजुन काहीही बोलू नको. आता यापुढे तु कुठेही जाणार नाहीस मला सोडुन, आणि मी तुला कुठेही जाऊन देणार नाही, माझ्यापासून दूर.... तु आता फक्त आणि फक्त माझा आहेस...आणि माझ्याजवळ असणार आहेस, कायमचा...कळलं. आणि हे तु पण लक्षात ठेव. 😊

* प्रेम तिच्याकडे फक्त पहातच राहतो, त्याच्या मनात खुप काही चालु होतं....

प्रेम : अंजली... मला तुझ्याशी अजुन खुप काही बोलायचं आहे, पण आता नको. तुला घरी जायला उशीर होतोय. मॉम घरी वाट पहात असेल. चल आपण निघुया.
अंजली : प्रेम... थांब ना अजुन थोडा वेळ... तसही मी मॉम ला सांगितले आहे, फ्रेंड्स सोबत छोटीसी स्नॅक्स पार्टी करून मग मी घरी येईन म्हणुन.😊
प्रेम : अरे हो... आता झाली ना पार्टी... तु चल आवर... 😊
अंजली : बरं ओके... निघुया चल...😏

* प्रेम वेटर ला सांगून बिल मागऊन घेतो. आणि ते देण्यासाठी खिशातून पर्स काढतो. *

अंजली : प्रेम... काय करतोय... माझा बर्थ डे आहे ना, मग बिल मी पे करणार.
प्रेम : अच्छा... राहू दे...आज माझ्याकडून ही छोटीसी ट्रीट असं समज...😊
अंजली : अरे थांब ना... मॉम ने पैसे दिलेत. तुला माझी शपथ आहे. पैसे मीच देणार. ओके...😊
प्रेम : बरं बाई... तूच दे....खुश...😊

* अंजली तिच्या पर्स मधून पैसे काढून वेटर ला देते. उरलेले तुला ठेव, असं बोलुन ते दोघेही तिथून बाहेर पडतात. बाहेर हलकासा पाऊस पडत असतो. *

अंजली : हे... मस्त ना...🌧️ पाऊस पण आलाय. 😊
प्रेम : अगं... काय करतेय, वेडी आहेस का...? उगाच का भिजतेय...?🤔
अंजली : प्रेम... आज मी खुप म्हणजे खुप खुश आहे, आज माझ्या एवढी हॅप्पी या जगात दुसरं कोणी नसेल. आय लव्ह यू... वेरी मच...😘
प्रेम : अंजली... काय करतेय... आपण बाहेर रोडवर आहोत. ते गिफ्ट पण भिजतायत.
अंजली : नाही भिजणार... कव्हर आहेत सर्वांना...😊

* अंजली त्या पावसात रोडवरतीच हातातील बॅग गोल फिरवत स्वतःभोवती फिरत होती. तेवढ्यात समोरून एक ऑटो येते. प्रेम पटकन तिला साइडला खेचतो. *

प्रेम : काय झालंय तुला आज...उडवली असती आता ऑटो वाल्याने....आणि का भिजतेय उगाच, आजारी पडायचं आहे का तुला...?🤔
अंजली : आजारी तर मी नाही पडणार, हे मला माहीत आहे, कारण मी नेहमीच अशी भिजते पावसात, मला सवय आहे याची...😊
प्रेम : बरं... खुप झालं आता... ऑटो पकड आणि घरी जा आता... खुप लेट झालाय.
अंजली : तुलाच जास्त घाई झाली आहे असं वाटतं, कुठे जायचं आहे का...? कोणाला भेटायला वगैरे... 😊 अरे... हो... मी ते विचारायचं राहूनच गेले. तुझं कोणी नाही ना तसं... म्हणजे वाट बघणार असं कोणीतरी...?😊
प्रेम : हो.... खुप आहेत. जे माझी वाट बघत आहेत. मग मला जायला हवं ना, आणि आता तु पण निघणार आहेस.😊
अंजली : प्रेम.... तु खरं बोलतोय का... खरच आहे का कोणी...?😔
प्रेम : अरे... पागल... असं कोणीच नाही, काहीही काय विचार करतेय. 😊
अंजली : मग तु असं का बोलला...? 😔
प्रेम : अरे थोडी गंमत केली, बाकी तसं काही नाही. कळलं...😊
अंजली : इट्स ओके... पण नंतर कधी असं नको बोलू, खुप कसतरी फील झालं.😔
प्रेम : खरच वेडी आहेस तू...😊 मस्करी पण कळत नाही. 😊
अंजली : नको... मला हा विषय मस्करी मधे पण नकोय कधीच...😔
प्रेम : बरं... सॉरी... नंतर अशी मस्करी नाही करणार... ओके, आता निघायचं का...? खुप भिजुन झालंय, आणि हा गोड चेहरा असा उदास बरा नाही वाटत, यावर फक्त गोड स्माईल छान दिसते. 😊

* अंजली प्रेम कडे पाहून गालात हसते आणि त्याच्याजवळ येते. प्रेम तेवढ्यात एका ऑटो बोलवतो आणि तिला बसायला सांगतो.*

अंजली : प्रेम... ऐक ना... तु चल ना माझ्यासोबत मला सोडायला...😊
प्रेम : अरे... मी येऊन काय करू...?🤔
अंजली : अरे मला तिथे सोड घराजवळ आणि तु याच ऑटो ने घरी जा...😊
प्रेम : आणि तिथे कोणी पाहिलं तर...?🤔
अंजली : मला नाही फरक पडत त्याचा, आणि ती काळजी तु नको करू,मी बघून घेऊन ते...ओके.😊
प्रेम : बरं... चल... 😊

* दोघेही ऑटो मधे बसतात, आणि अंजलीच्या घरी जायला निघतात. ऑटो मधे अंजली हातातील बॅग खाली पायाजवळ ठेवते. आणि प्रेमचा हात पकडते आणि स्वताच्या खांद्यावर ठेवते, आणि त्याला हळुच बिलगते.
 प्रेम साठी हे सर्व स्वप्नवत होतं, पण त्यालाही छान वाटत होतं. दोघेही थोडेसे भिजलेले होते, त्यात ऑटो मधे गार वाऱ्याची झुळूक अंगावर येत होती. बाहेर पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे वातावरण थोडंसं रोमँटिक झालं होतं. प्रेम समोर बघत होता, पण अंजली टक लावुन फक्त त्यालाच पहात होती. दोघांमधलं अंतर आता खुप कमी झालं होतं, 
थोड्या अंतरावर गेल्यावर मधेच प्रेमच्या नकळत अंजलीने पटकन त्याच्या गालावर किस केला. 😘 
 प्रेम तिच्याकडे पाहून थोडासा हसला.😊 थोड्याच वेळात ते अंजलीच्या सोसायटी जवळ पोचले. आता अंजलीचा चेहरा पडलेला होता, तिला प्रेमला सोडून आजिबात जावं असं वाटत नव्हते. प्रेम तिच्या खांद्यावरून हात काढत तिला बोलतो. *

प्रेम : चला मॅडम उतरा आता घर आलं...😊
अंजली : नाही... मला नाही उतरायचं...😔
प्रेम : अगं... वेडी आहेस का...? घराजवळ आलोय आपण, चल उतर, मॉम वाट बघत असेल. 😊

* अंजली मनात नसतानाही गिफ्ट ची बॅग घेऊन खाली उतरते. *

अंजली : प्रेम... थॅन्क्स... टुडे.... यू मेकिंग माय डे ब्युटीफूल... नॉट ओन्ली डे.... अल्सो माय लाईफ. थँक्यू वेरी मच... अँड... आय लव यू...... 😘

प्रेम : अच्छा.... अजुन काही...😊
अंजली : अजुन खुप काही आहे... पण आता नाही सांगत, आणि हो... रात्री घरी पार्टी आहे. आणि मॉम कडून तुला खास आमंत्रण आहे. त्यामुळे तुला नाही म्हणता येणार नाही. मी तुझी वाट बघतेय, रात्री आठ वाजता तु येणार आहेस, आणि तु आल्याशिवाय मी केक कापणार नाही....कळलं... बाय...😊

* असं बोलून ती जायला निघते, तेवढ्यात प्रेम बोलतो. *

प्रेम : अरे ऐक ना... आता तर भेटलो ना आपण, मग रात्री यायलाच पाहिजे का...?🤔
अंजली : ते मला नको सांगू... मॉम ला सांग, तिने निरोप द्यायला सांगितला तो मी दिला. बाकी तुझी मर्जी... 😊

* अंजली एवढं बोलुन हसत हसत त्याच्याकडे पाहून घराकडे जायला निघते. जाताना खुप वेळा मागे फिरून त्याला पहात असते. प्रेम अजुन तिथेच ऑटो मधेच बसलेला असतो. ती गेट मधुन आत जाते. तसा प्रेम ऑटो वाल्याला निघायला सांगतो. आणि थोड्या वेळात घरी पोचतो.
 दुपारचे दोन वाजलेले असतात. घरी आल्यावर फ्रेश होऊन ताईने बनवलेली खिचडी खात असतो. आज जे काही झालं होतं... तेच सर्व त्याच्या डोळ्यांसमोर दिसत होतं. 
हे खरच असं काही घडलं आहे का...? हा भास तर नाही ना...? असे खुप काही विचार मनात गर्दी करायला लागले होते.  

रात्री अंजलीच्या घरी जायचे की नाही हा एक प्रश्न असतोच... तसही खुप दिवस तो अंजलीच्या घरी गेला नव्हता. तिच्या मॉम ला पण भेटुन खुप दिवस झाले होते. आणि आज तर अंजलीचा वाढदिवस आहे. नाही गेलो तर मग अजुन काहीतरी वेगळं वाटायला नको. म्हणून तो जायचं ठरवतो.
 थोडा वेळ मित्रांसोबत मैदानात क्रिकेट खेळून संध्याकाळी घरी येतो. फ्रेश होऊन, ताईला बाहेर जातोय असं सांगुन तो अंजलीच्या घरी जायला निघतो.

 तिला गिफ्ट तर सकाळीच दिले होते. पण आता जाताना असं रिकाम्या हाताने कसं जायचं. म्हणुन जाताना एका गिफ्ट शॉप मधे तिच्यासाठी गिफ्ट घ्यायला जातो. पण गिफ्ट काय घ्यायचं तेच सुचत नव्हते. सकाळीच त्याने तिला ग्रीटिंग सोबत एक छोटासा टेडी गिफ्ट केला होता. तिच्या मॉम ला पण तिने कदाचित सांगितलं असेल, त्याबद्दल... मग आता अजुन एक गिफ्ट... काय विचार करतील...? आणि पार्टी आहे म्हटल्यावर रिकामे तरी कसे जायचे....🤔. 

मग आता काय घ्यायचं...असा विचार करून शेवटी एक कॉफी मग घ्यायचं ठरवतो. त्या मग वरती, Happy Birthday Princes.
असा मेसेज होता, तो ते गिफ्ट पॅक करायला सांगतो. 
गिफ्ट सिलेक्ट करण्याच्या नादात तिथेच त्याला अर्धा पाऊण तास गेलेला असतो. आठ तर वाजुन गेलेले असतात. तो घाईघाईत ते गिफ्ट घेतो आणि बाहेर येऊन ऑटो पकडुन अंजलीच्या घरी पोचतो.

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️