Anubandh Bandhanache - 11 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 11

The Author
Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 11

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ११ )

हा अजुन कसा आला नाही....🤔
 11 वाजेपर्यंत तरी येतो बोलला होता. मग कुठे दिसत कसा नाही. आज ऑफिस ला पण सुट्टी आहे. मग घरी कॉल करून बघु का...? असा विचार करत जवळच असलेल्या एका PCO कडे गेली. 
खरं तर प्रेम खुप आधीच तिथे आला होता. एका गाडीच्या पाठीमागे उभा राहुन हे सर्व पहात होता. शेवटी त्याला पण रहावलं नाही, अजुन त्रास द्यायला नको म्हणुन, तो हळूच जाऊन तिच्या मागे येऊन उभा राहिला. 
अंजलीने हातातील बॅग खाली ठेवत पर्स मधून एक कॉइन काढला. आणि रिसिवर उचलुन कॉइन टाकला आणि प्रेमच्या घरचा नंबर डायल केला. रिंग होणार तेवढ्यात प्रेम हळूच पाठीमागून तिच्या कानाजवळ बोलला. 
हॅलो.....हॅप्पी बर्थडे......😊

प्रेमचा आवाज ऐकताच तिने हातातील रिसीवर ठेऊन दिला. पटकन मागे फिरली आणि प्रेमला घट्ट मिठी मारली. प्रेमला काहीच सुचलं नाही, फोन मधील कॉइन बाहेर येऊन खाली पडला होता. प्रेम थोडा सावरत तिला बाजूला करत बोलला...
प्रेम : अरे.... काय झालं...?😊
अंजली : काय... काय... विचारतोय...? मला वाटलं तु नाही आलास. म्हणून टेन्शन आले होते.
प्रेम : अरे... असं कसं... तुझा वाढदिवस आणि मी नाही येणार असं होईल का...?
अंजली : हो तसे तर मला खात्री होती तु नक्की येणार... पण बाहेर आल्यावर कुठे दिसला नाहीस म्हणून.....😔
प्रेम : अच्छा... असं का...😊 पण मी आधीच आलो होतो, तुझी गम्मत बघत होतो. 😀
अंजली : गम्मत...?🤨 पागल... असं कोणी करतं का...? 😔
प्रेम : मी...😀
अंजली : झाली तुझी गंमत करून, का अजुन काही बाकी आहे...😔
प्रेम : अरे... राग आला का... अगदीं नाकाच्या शेंड्यावर असतो ना... पटकन येतो लगेच... बरं सॉरी...ओके... 😊
अंजली : इट्स ओके... आज माझा बर्थडे आहे म्हणून...😊
प्रेम : थँक गॉड... वाचलो....😀
अंजली : अच्छा... गिफ्ट काय आणले मला...? 😊
प्रेम : इथेच देऊ का...? स्कूल जवळ आहोत आपण... सर्व बघत आहेत आपल्याकडे...
अंजली : मग काय झालं... मला नाही फरक पडत काही.
प्रेम : अच्छा... पण मला पडतो. चल दुसरीकडे जाऊ कुठेतरी....😊
अंजली : बरं ठीक आहे... चल...😊

* असं बोलून अंजली तिची गिफ्ट ने भरलेली बॅग उचलते आणि प्रेम सोबत जायला निघते.
प्रेम : तलावाजवळ जाऊया...?😊
अंजली : नको... कुठेतरी बाहेर चल ना...😊
प्रेम : बाहेर...🤔 म्हणजे कुठे...? तुला घरी नाही जायचं आहे का...?🤨
अंजली : तुला नाही यायचं का माझ्यासोबत, मी जाईन घरी थोडं उशिरा. तसही मी मॉम ला सागितलं आहे, घरी यायला लेट होईल म्हणून कळलं...😏
प्रेम : अरे... हो... एवढी चिडते काय...? बरं चल कुठे जायचं आहे तुला...?😊
अंजली : आधी तर मला आता भूक लागली आहे. तु काही खायला देणार आहेस का...? तसही आज तुझा उपवास असेल ना...😊 मग तु काही खाणार नाहीस हो ना...😊
प्रेम : हो...का... तुला माहित आहे ना सर्व मग तरीही विचारते...😊
अंजली : मला बाकी काही माहीत नाही, मला आता भुक लागलीय, बस...😊
प्रेम : बरं... चल आधी खाऊ काहीतरी...😊

* अंजली त्याच्याकडे हसतच पहाते, आणि ते दोघे जवळच असलेल्या प्रशांत हॉटेल मधे जातात. 
अंजली : इथे उपवासाचे काहीतरी मिळेल ना... साबुदाणे वडे वगैरे...
प्रेम : ओके... मी बघतो विचारून, तु काय खाणार आहेस...?
अंजली : मी पण तेच खाईन...😋
प्रेम : अच्छा... आज वाढदिवस आहे म्हणुन तु पण उपवास करणार आहेस का...😊
अंजली : हो... तु दे ऑर्डर आधी... मला खूप भुक लागलीय...😊
प्रेम : अरे... हो... किती घाई, वेळ लागतो त्याला तळायला.😊
अंजली : अच्छा... असं आहे का... मला वाटलं रेडी असतील. 😊
प्रेम : एवढी कशी भुक लागलीय तुला... सकाळी नाष्टा नाही केला का...?😊
अंजली : अरे... कधी करणार... आधीच लेट झाला होता...म्हणून तशीच आले.😊
प्रेम : मग आता थोडी वाट बघ... नाहीतर मला खा....😋
अंजली : तुझ्यात काय आहे खायला... नुसती हड्डी...😊 मास तर नाहीच आहे. 😊
प्रेम : हो...का... 😊
अंजली : मग काय... काही खातोस की नाही, का लाईफ टाईम डाएट वर आहेस. मी बघतेय तेव्हापसून तर जसा आहेस तसाच आहेस. जरा माझ्याकडे बघ... 😀
प्रेम : अच्छा... म्हणजे काय बोलायचं आहे तुला नक्की...🤔
अंजली : अरे म्हणजे पोटाला काहीतरी खात जा... एवढच बोलायचं होतं मला...😊
प्रेम : अरे तसं काही नाही, मी खातो ग, मला भूक असते तेवढं... पण मी जाड होत नाही त्याला मी काय करू....🤔
अंजली : हो... माहितीये किती खातोस ते... चांगलच...😊

* तेवढ्यात वेटर डिश घेऊन टेबलजवळ येतो. 
प्रेम : बरं चल भुक लागलीय ना तुला, मग आधी खाऊन घे....😋
अंजली : बरं चल आज बघु कोण आधी संपवत ते....😊
प्रेम : अरे... तुला भूक लागलीय तर तु खाशील पटपट, मी खाऊन आलोय, आणि मला असं फास्ट खायला नाही आवडत. 
अंजली : आवडत नाही का घाबरला, बेट हारशिल म्हणून...😀
प्रेम : अरे असं काही नाही...😊
अंजली : मग लाव ना बेट...😊
प्रेम : बरं... लागली... चल...😊
अंजली : बघ हा... हारलास तर, मी मागेन ते द्यावं लागेल, तसही आज माझा बर्थडे आहे....😊
प्रेम : बरं चल... डन...👍
अंजली : बघ हा...पुन्हा विचार कर आज मी काहीही मागेन... नाही बोलायचं नाही मग....
प्रेम : अरे चल... जास्तीत जास्त काय मागशील...😊
अंजली : कळेल ते नंतर... चल चालू कर.... 123 स्टार्ट...😋

* असं बोलुन अंजलीने पटापट खायला सुरुवात केली. आणि प्रेम नेहमीसारखा तिच्याकडे हसून पहात हळु हळु खात होता.
प्रेम : अरे... हळू खा... तुच जिंकणार आहेस... पण हळू खा...😊 आणि तसंही तुझं वाढदिवसाचं गिफ्ट आणलं आहे मी...😊
अंजली : अच्छा... म्हणजे हार मानलीस तु...😊 
प्रेम : हो... बाबा जिंकलीस तु... आणि हे.. घे तुझं वाढदिवसाचं गिफ्ट...🎁
* असं बोलुन तिच्या समोर एक पॅक केलेलं गिफ्ट चे बॉक्स ठेवतो.*
अंजली : हे... वाव... काय आणलं आहेस...😊
प्रेम : अरे खोलून तरी बघ म्हणजे कळेल... पण आधी ते डिश मधे जे आहे ते संपव... मग ओपन कर...ओके.
अंजली : बरं ठीक आहे... तु पण संपव..
प्रेम : गूड गर्ल.....😊

* खाऊन झाल्यावर थोड्या वेळाने अंजली ते गिफ्ट पॅक ओपन करते. आतमध्ये एक छान ग्रीटिंग आणि एक छोटासा टेडी असतो. तो बाहेर काढून त्याला किस करते आणि त्याला जवळ घेत बोलते. *

अंजली : प्रेम... थॅन्क्स... खरच खुप सुंदर गिफ्ट आहे. मला खुप आवडलं. खुप क्यूट आहे हा टेडी... आवडला मला हा इथून पुढे नेहमी माझ्या जवळ असेल.😊
प्रेम : खरच आवडलं तुला... का मला बरं वाटावं म्हणून बोलतेय. मला माहित आहे. असे किंवा याहूनही महागडे गिफ्ट तुला आले असतील किंवा आज येतील. पण मी एवढच देऊ शकतो... 
अंजली : प्रेम... तु असं का बोलतोय... आतापर्यंत तु जे काही गिफ्ट दिलेले आहेस ना, ते माझ्यासाठी सर्वात जवळचे आहेत. त्याची तुलना मला दुसऱ्या कोणासोबत करायची पण नाही कळलं.😔
प्रेम : अरे... हो... एवढी इमोशनल का होतेय. एक साधं गिफ्ट तर असतं ते.

* अंजली थोडा वेळ शांत असते. मनात खुप विचार असतात. आज आपण काय ठरवून आलो आहे. हिच वेळ आहे ती, आता नाही बोलले तर मग पुढे कधी बोलणार... पण काहीही होऊ दे आता मी बोलणारच... असा ठाम विचार करून एक मोठा श्वास घेते, आणि प्रेम ला बोलते.*

अंजली : प्रेम एक गोष्ट विचारू... अगदी मनापासून सांगशील. 
* प्रेम अंजली कडे पाहून थोडा कन्फ्युज होतो, ही अशी का बोलतेय म्हणून. *
प्रेम : हा... बोल ना... काय झालं...?🤔
अंजली : मी मघाशी तुला मस्करीत जे बोलले, मी आज जे काही मागेल ते तु मला देशील...?
प्रेम : ( थोडा विचार करत ) हो नक्की... बोललो ना मी, अजुन काय हवं आहे तुला माझ्याकडून अजुन कोणतं गिफ्ट, जे मी तुला देऊ शकतो.😊
अंजली : हो... फक्त तुच देऊ शकतो ते गिफ्ट, तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही देऊ शकत. 
प्रेम : अरे..... एवढी का इमोशनल झाली आहेस. बरं काय हवं आहे तुला सांगशील का आता...,?😊
अंजली : खरच मागु मी... देशील मला जे हवं आहे ते तुझ्याकडून...?😊

* प्रेम थोडा टेन्शन मधे येतो. ती खाली मान घालुन प्रेम ने दिलेला टेडी छातीजवळ घट्ट पकडून उभी होती. तिच्या हृदयाची धडधड आता खुप वाढली होती, ती तिला स्वतालाच जाणवत होती. प्रेम हळूच तिची मान वरती करतो तर तिचे डोळे भरून आलेले असतात. ते पाहून प्रेम तिला विचारतो.*

प्रेम : आता बोलशील का...काय झालं...?🤔

* अंजली प्रेमचा एक हात घट्ट हातात पकडून ठेवते. आणि हिम्मत करून बोलते. *

अंजली : प्रेम.... मला तुझी साथ कायमची हवी आहे. अगदी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत हा हात माझ्या हातात नेहमी हवा आहे. मला आयुष्यभरासाठी तु मला माझ्या सोबत हवा आहेस. राहशील का माझ्या सोबत अखेरपर्यंत...?😔

* एवढं सर्व बोलुन ती एक मोठा श्वास घेते, आणि प्रेम कडे पहाते, तो थोडा गोंघळून गेलेला असतो. पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतो, आणि तिला बोलतो.*

प्रेम : अंजली... काय बोलतेय तु... स्पष्ट बोलशील का जरा...?🤔
अंजली : प्रेम... अरे अजुन काय स्पष्ट बोलू, मला नाही माहित काय चूक काय बरोबर, पण ही गोष्ट तेवढीच खरी आहे की, मी खुप प्रेम करतेय तुझ्यावर, हे कसं झालं, कधीपासून ते माहीत नाही मला. पण खुप दिवस झाले. मला ही गोष्ट तुझ्याशी बोलायची होती, पण हिम्मत होत नव्हती. पण आता नाही सहन होत. मला नाही वाटत मी काही चूकीच करतेय. मी तुझ्यावर प्रेम करते. हे तुला कधीतरी मला बोलायचं होतं. मुळात मला तुला गमावण्याची भीती जास्त होती. म्हणून मी आजपर्यंत तुला बोलू शकले नाही. पण माझ्याकडून तरी हे आपलं नातं कुठेतरी मैत्रीच्या पलीकडे गेलं आहे. याची जाणीव व्हायला लागली आहे मला, गेले काही दिवस मी याच विचाराने त्रस्त आहे. मला काहीही झालं तरी तुझी साथ हवी आहे. अगदी शेवटपर्यंत... मग ते कोणतही नातं असू दे आपल्यात...
आणि तुला माझी शपथ आहे. तुझ्या मनात जे काही आहे, माझ्याबद्दल तु काय विचार करतोय. ते ही मला क्लिअर सांग. आणि खरं खरं सांग. जे मी फील करते तसं तुला पण काही वाटतं का...,?
का.. फक्त मीच या गोष्टीचा एकतर्फी विचार करतेय. मला आज हे कळायला हवं तुझ्या मनात काय आहे ते. आणि जे काही असेल ते अगदी खरं सांगशिल. पण काहीही असलं तरी निदान आपली मैत्री तरी कायम राहू दे. नाहीतर मी जगुच शकणार नाही तुझ्याशिवाय. मी कल्पना सुद्धा करू शकत नाही या गोष्टीची. मला तुझं उत्तर हवं आहे. 

* एवढं सर्व बोलुन होईपर्यंत अंजलीने प्रेम चा हात अगदी घट्ट पकडून ठेवलेला असतो. आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालुन ती हे सर्व बोललेली असते. मनातलं तर सर्व त्याच्यासमोर मांडलेल असतं, पण आता अजुन जास्त टेन्शन वाढलं होतं, कि प्रेम आता काय बोलेल. 
पण प्रेम एकदम शॉक झालेला असतो. इतकं सर्व अंजली एका दमात बोलुन गेली होती, आता तिला काय उत्तर द्यायचे, हा विचार करत तो तिला बोलतो.*

प्रेम : अंजली... मला आत्ता खरच सुचत नाही ग... काय बोलावं ते...
अंजली : प्रेम... हे बघ आता तुझ्या मनात जे काही असेल ते फक्त मला ऐकायचं आहे. आणि खरं खरं...
प्रेम : तेच तर कळत नाही, की आतमध्ये काय चालू आहे. 
अंजली : फक्त एका गोष्टीचं उत्तर दे...
प्रेम : काय....?🤔
अंजली : तुझं माझ्यावर प्रेम आहे.....?
प्रेम : कसं सांगू यार....😔
अंजली : जे तुझ्या मनात आत्ता आहे ते सांग, बाकी कोणताच विचार न करता. हो की नाही एवढच बस्....

* प्रेम तिच्या डोळ्यात पहात बोलुन जातो.

प्रेम : हो..... आहे, खुप आहे.... पण...?

* अंजली एवढं ऐकुन त्याच्या जवळ येते आणि त्याला मिठी मारते. आणि बोलते.*

अंजली : बस... मला एवढच ऐकायचं होतं, बाकी काहीच नाही. त्या पण च्या पुढे खुप काही आहे हे मला माहीत आहे, पण आता अजुन काही बोलू नको. तु माझ्या प्रेमाचा स्वीकार केलास हेच तुझ्याकडून मला माझ्या वाढदिवसाचे सर्वात मोठे गिफ्ट दिलं आहेस. माझ्या आयुष्यातलं हे सर्वात अनमोल गिफ्ट आहे माझ्यासाठी. आय लव्ह यू... प्रेम.
 थॅन्क्स... माझ्या प्रेमाचा स्वीकार केल्याबद्दल. खुप टेन्शन होतं या गोष्टीचे पण मी आज खुप खुश आहे. 😊

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️