Don't want to fight over religious issues? in Marathi Classic Stories by Ankush Shingade books and stories PDF | धार्मिक मुद्द्यांवरुन भांडण नकोच?

Featured Books
  • ફરે તે ફરફરે - 67

    ફરે તે ફરફરે - ૬૭   હું  મારા ધરવાળા સાથે આંખ મિલા...

  • રાય કરણ ઘેલો - ભાગ 16

    ૧૬ પૃથ્વીદેવ   અરધી રાત થઇ ત્યાં ઉદા મહેતાના પ્રખ્યાત વ...

  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

Categories
Share

धार्मिक मुद्द्यांवरुन भांडण नकोच?

भांडण? धार्मिक मुद्द्यांवरुन? करु नका.

        धार्मिक तसाच जातीशी संबंधीत गोष्टी व त्यावर चर्चा करणे. वादविवाद व त्या संबंधीत भांडणं. या गोष्टी कधीच समाप्त होणाऱ्या नाहीत. जर त्यावर चर्चा केली तर वादविवाद उत्पन्न होवू शकतात. ते वादविवाद शिंगेला जावू शकतात व त्याची परियंती न्यायालयातील प्रकरणं वा गुन्हेगारीची प्रकरणं उभी करण्यात होते. 
         धर्माबाबत सांगायचं झाल्यास धर्म हा प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा विषय आहे. तसंच धर्म हवाही आहे. कारण धर्म जर नसेल तर माणसं स्वैराचारी बनू शकतात. तसे सर्वच धर्म हे पवित्र आहेत व सर्वच धर्मात कमीजास्तपणा हा आहेच. शिवाय जो धर्माचं विषय पेरतो. तो मतलबी असतो. त्याला काहीतरी आपला स्वार्थी हेतू साध्य करायचा असतो नव्हे तर तो धार्मिक भांडणं लावतो. ज्यातून त्याला आनंद मिळत असतो. जो असूरी आनंद असतो. त्यामुळं अशा धर्माचं विषय पसरविणाऱ्या माणसावर अति विश्वास ठेवणे बरोबर नाही. तसा विश्वास ठेवल्यास आपलाच विश्वासघात होत असतो. शिवाय आपणच त्यामुळं संकटात पडत असतो. विशेष म्हणजे आपण माझा धर्म माझा धर्म म्हणण्याऐवजी विश्वाचा एकच धर्म, तोही मानवधर्म समजावा. त्याच धर्माचं पालन करावं. मानवधर्म हाच सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. त्याचा अर्थ असा की सर्व माणसाला माणसासारखं समजणं. त्याची हत्या न होवू देणं. त्याच्यावर कोणताच अत्याचार होवू न देणं. त्याला कोणत्याच कुप्रथांचा बळी होवू न देणं. प्राणीमात्रावर दया करणं. त्यांची हत्या न करणं. झाडं न कापणं. कुणाला असं न बोलणं की त्याचं मन दुखावेल. चोरी न करणं. शिव्या न देणं. राग, द्वेष, लोभ, मद, मत्सर न करणं. हा मानवधर्म होय. तसंच प्रत्येक माणसांबद्दल आदर बाळगणं. इतरांच्या धर्माबाबत आदर बाळगणं. जातीबाबत मनात कोणतीही हिनता न ठेवणं. प्रत्येकांच्या धर्म व जातींना समान लेखणं व एवढंच नाही तर प्रत्येक माणसांना समान लेखणं. ज्यात महिला व मुलांचाही समावेश असावा. अशा गोष्टीचे पालन केले तर त्यामुळं धर्माधर्मात तेढ निर्माण होणार नाही. सर्व लोकं आनंदी राहतील, राहू शकतील. परंतु ह्या बाबी लक्षातच कोण घेतो. ह्या बाबी लक्षात न घेता आपण स्वतःला श्रेय देत स्वतःला श्रेष्ठ समजत लढत असतो स्वतःसाठी. स्वतःचा स्वार्थ सिद्ध करण्यासाठी. ज्यातून वादविवाद होत असतात. 
           काय पाळावं काय नको हे आपण ठरवावं. धर्माला दोष देवू नये. आम्ही आमची मानसिकता बदलायला हवी. स्वतंत्र व्हायला हवं आम्हीही. आमच्या मनातील कुविचार काढून टाकायला हवेत. आमच्या मनात सुविचार भरायला हवेत. परंतु असं आम्ही करीत नाही. म्हणूनच भांडणं होत असतात. 
           आम्ही भांडण करतो. कधी धर्मावरुन तर कधी जातीवरुन. परंतु कधी विचार केलाय का की आम्ही भांडण करणारे नेमके कोण? आमचा धर्म कोणता होता? तसं पाहिल्यास आम्हाला कोणताच धर्म नव्हता. आम्ही भांडण करणारे ना कोणी बौद्ध आहेत. ना कोणी मुस्लीम आहेत ना कोणी हिंदू ना कोणी इतर धर्मीय. कारण आमची उत्पत्तीच झाडावरील माकडाच्या रुपातून झाली आहे. हे डार्वीनचा उत्क्रांतीवाद सांगतोच. आपण झाडावर माकडरुपात राहात होतो. मग खाली आलो. खाली आल्यावर मानवरुपात राहू लागलो. त्यावेळेस काही काळानं विदेशी आक्रमणकर्ते आले. त्यांनी आपल्यावर राज्य करण्यासाठी आपला धर्म आपल्याला सांगीतला. त्याचे नियम सांगीतले. मग भीती दाखवली की आपण घाबरुन त्यांच्या तत्वाचं नव्हे तर धर्माचं पालन करु. ज्यात वीज कडाडली तर देव धावतो. भुकंप आला तर देव धावतो. अशा कल्पना रुजल्या. त्यानंतर त्याच विदेशी लोकांनी आपल्या मनात आस्था फुलवली. अमूक अमूक केल्यानं आपण देवाजवळ जातो. देवाचे लाडके बनतो. ज्यात आपलाच जीव गेला. आपलंच गेलं. त्यांचं काहीच गेलं नाही. ते तर जसे आले तसेच आपल्या देशात निघून गेले. उरलो आपण. आपण त्यांच्यासोबत जावू शकलो नाही. कारण हा देश आपला होता. त्यांचा देश आपला नव्हताच. परंतु ज्यावेळेस आपण इथेच राहायला लागलो. त्यावेळेस आपण आपला धर्म बदलवला होता. मानव धर्मात असलेले सगळ्याच रहिवाशांचा धर्म बदलला होता. कोणी हिंदू झाले होते. कोणी मुस्लीम झाले होते. कोणी ख्रिश्चन तर कोणी इतर धर्मीय. 
         त्यांनी आपल्याला इथंच ठेवलं, आपल्याला त्यांच्या धर्मात रुपांतरीत करुन. मग आपण कोण आहोत? आपण आहोत कालच्या त्या एकाच आईची लेकरं. ज्या आईच्या लेकरावर विदेशातून आलेल्या लोकांनी अत्याचार केला. आपल्या पुर्वजांना धाक दाखवला व आपल्याकडून धर्म बदलवून घेतला नव्हे तर रुपांतरीत केलं आपल्याला. कधी जीव घेण्याचा धाक दाखवून. कधी आपल्या आईबहिणीवर बलात्कार करुन, त्यांच्याकडून संतती निर्माण करुन. अन् त्यांनी जीवं घेतलेही, धर्मासाठी. आपल्याला त्यांच्या धर्मात रुपांतरीत करीत असतांना. उदाहरण द्यायचं झाल्यास नेतोजी पालकरांचं देता येईल. ज्यांना जीव घेण्याची धमकी देत त्यांचा धर्म बदलला गेला व नव नाव देण्यात आलं होतं रहिम कुल्लाखान. दुसरं उदाहरण संभाजी महाराजांचं देता येईल. धर्मासाठी त्यांची जीभ कापली. मान कापली. हात, बोट, पाय कापले. परंतु त्यांच्यासारखी अशीही बरीच माणसं होती की ज्यांनी जीव दिला. परंतु धर्म बदलवला नाही. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की आपल्या पूर्वजांचा धर्म बदलवला गेला. आपण धर्म बदलायला हवा म्हणून गोव्यातील कातरीखांबाला आपले हात व पाय बांधून आपले हात कापणारे पोर्तुगीज. आजही तेथील हातकातरी खांब त्याची साक्ष आहे.
          महत्वपुर्ण बाब ही की धर्माबाबत नेहमीच वाद होत असतात. कधी हिंदू मुस्लीम तर कधी बौद्ध हिंदू. तसे वाद पुर्वीही व्हायचे. पुर्वी विदेशात तर येशू ख्रिस्ताला सुळावर चढावं लागलं होतं धर्मासाठी. आज तोच धर्म येशूला मानतो. तसं धर्माच्या उत्पत्तीबाबत सांगायचं झाल्यास माकड रुपातील माणूस जेव्हा जमीनीवर आला. तेव्हा त्याचा धर्म होता मानवधर्म. तो माणसाशी माणसासारखाच व्यवहार करीत होता. त्यानंतर कालांतरानं आर्य आले व त्यांनी आपला वैदिक धर्म इथे लादला. त्यांनीच देव धर्म, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा आपल्यात शिरवल्या. ज्यात हेतू होता आपल्यावर राज्य करणं. त्यानंतर त्याच आर्यांनी असे असे नियम आपल्यावर लादले की धर्माचे स्तोम माजले. ज्यातून दुःख होत असे. हे स्तोम विपरीत पद्धतीचे असल्यानं शांतीसाठी बौद्ध व जैन धर्म अस्तित्वात आले. ज्यांचा जन्म हिंदुस्थानात झाला. त्यानंतर हखामनी या पहिल्या अरबी राजानं हिंदुस्थानात प्रवेश केला. परंतु त्यानं धर्म प्रसवला नाही. 
        हिंदुस्थानात मुस्लीम राज्यकर्ते सन सातव्या शतकात मोहम्मद बिन कासीमच्या रुपानं आले. ज्यानं येथील राजा दाहिरचा पराभव केला. त्यानंतर इथं सत्ता स्थापन करुन येथील बऱ्याच लोकांना मुस्लीम बनविण्याचा प्रयत्न झाला, तेही जबरन. परंतु त्याची सत्ता टिकलीच नाही. तसा तो फारसा यशस्वीही झाला नाही व तो परत गेला. त्यानंतर बाप्पा रावलच्या नेतृत्वात येथे पुन्हा वैदिक धर्म सुचारु रुपात नांदू लागला. त्याला गालबोट लागलं अकराव्या शतकात. ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाणचं दिल्लीवर शासन असतांना त्याचा द्वेष करणाऱ्या त्याच्याच भावानं म्हणजे जयचंदानं मोहम्मद घोरीला हिंदुस्थानात बोलावलं. ज्यातून त्यानं पृथ्वीराज चव्हाणचा पराभव केला व तो त्यांना नजरबंद करुन घेवून गेला. परंतु त्याच्याच कारकिर्दीनंतर हिंदुस्थानात मुस्लीम रुपांतरण निर्माण झालं. त्यानंतरच्या आलेल्या सर्व शासकांनी हिंदुस्थानाला मुसलमान बनविण्यास सुरुवात केली. ज्यात खिलजी, तुघलक, मुघल या सर्व मुस्लीम शासकांचा समावेश आहे. त्यांनी केवळ हिंदुस्थानातील जनतेवर जोरजबरदस्ती वा तलवारीच्या धाकानं धर्मांतरण केलं नाही तर इथल्याच स्रियांना भार्या बनवूनही मुसलमान बनवलं. शिवाय येथील आपली लोकसंख्या वाढविण्यासाठी लोकसंख्याही वाढवली. त्यानंतर व्यापार करण्यासाठी आलेल्या डच, पोर्तुगीज, फ्रेंच व इंग्रज यांनी या देशात आपला ख्रिश्चन धर्म पसरवला. तोही जोर जबरदस्तीनंच. 
          विशेष म्हणजे ज्यांनी हिंदुस्थानात धर्म रुपांतरीत केला नव्हे तर पसरविण्याचा प्रयत्न केला. ते सर्व भारतातून निघून गेले. ज्यात मुस्लीम शासक मोहम्मद बिन कासीम असो वा मोहम्मद घोरी असो वा इंग्रज असो वा आर्य असो. फ्रेंच, डच, पोर्तुगीज असो. अन् उरले आपल्याच हिंदुस्थानातील रुपांतरीत झालेले मुळचे झाडावरुन जमीनीवर आलेले व जमीनीवर निवास करीत असलेले मानव. ज्यांचा कोणताच धर्म नव्हता. आज तीच रुपांतरीत असलेली माणसं मी अमुक धर्माचा मी तमूक धर्माचा असे म्हणून वाद करीत आहेत व विसरत आहेत की मी रुपांतरीत धर्माचा आहे. हा माझा मुळ धर्म नाही. त्यातच तो विसरत आहे त्यांचा मुळ धर्म आणि विसरत आहे तो त्याच्या मुळ भाऊबंद आणि त्याच्या बिरादरीतील माणसांना. ज्यात त्याची त्याच्या नात्यातीलच कोणीतरी आई आहे. कोणीतरी बहिण आहे. कोणीतरी वडील आहे अन् भाऊही आहे. तो त्याच हिंदुस्थानातील तमाम लोकांचा धर्मांतरीत भाऊ आहे. हे सर्व विसरुन तो रुपांतरीत भाऊ आपल्याच भावांच्या धर्मावर टिका करुन त्याच्याशी धर्मावरुन भांडण करतो व रक्त सांडवतो. कधी धर्मावरुनच हत्याही. हे बरोबर नाही. 
         विशेष सांगायचं म्हणजे आपलाच बांधव व आपण त्याच धर्मातील रुपांतरीत झालेले सर्व. आपला मूळ धर्म तो नसतांनाही आपण धर्मासाठी असे भांडणे, एकमेकांचा हेवादावा करणे. ज्यातून वाद उत्पन्न करुन एकमेकांच्या जीवांवर उठणे. धार्मिक द्वेष भडकिवणे. आपला धर्म श्रेष्ठ समजणे व ज्यातून एकमेकांची कत्तल करणे. या गोष्टी योग्य नाहीत. धर्माच्या नावावर आपल्याच बांधवाची हत्या करण्याऐवजी वा भांडण्याऐवजी आपण गुण्यागोविंदानं राहावं. ज्यातून शांतता राहिल. सुख निर्माण होईल. ज्यातून आपला विकास करता येईल आणि देशाचाही विकास करता येईल यात शंका नाही.

           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०