Anubandh Bandhanache - 10 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 10

The Author
Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 10

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग १० )

प्रेम आणि अंजली यांचं नातं आता हळु हळू असच फुलत चाललं होतं. त्यांचं बोलणं आता अजुन वाढलं होतं, अधून मधून भेटत होते. नकळत दोघांनाही आता एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटू लागला होता. 

अंजली वयाने खुप लहान होती. या गोष्टीचं नेहमी भान ठेऊनच प्रेम तिच्याशी फक्त मैत्रीच्या नात्यानेच रहात होता. ते अंतर ठेवूनच तो तिच्याशी वागत होता. 
सर्व लहान मोठ्या गोष्टी एकमेकांसोबत बोलल्या जात होत्या. असेच छान दिवस चालले होते. दोघेही एकमेकांसोबत खुप खुश होते. 
बघता बघता अशीच दोन वर्ष निघुन गेली. या दोन वर्षांमध्ये ते दोघे अजुनच जवळ आले होते. त्यांची मैत्री आता हळु हळु वेगळं वळण घेत होती. 

प्रेम आता कॉलेज संपवून त्याच कंपनीमध्ये फुल टाईम जॉब करू लागला होता. कारण आता खर्च वाढला होता. लहान भाऊ गावी शिकत होता. त्याचा शिक्षणाचा खर्च वाढला होता. म्हणुन प्रेम ने स्वतःच शिक्षण अर्धवट थांबवलं होतं. आणि पुर्णवेळ त्याच कंपनीमध्ये जॉब करण्याचा निर्णय घेतला होता. बाकी सर्व काही ठिक चालु होते. 

अंजलीला मात्र एका गोष्टीची खंत कायम वाटत होती. कॉलेज मधे असताना प्रेम ने त्याच्या कोणत्याही मित्राशी तिच्याशी ओळख करून दिली नाही. 
कधी कधी अशीही वेळ यायची की, प्रेम आणि त्याचा सर्व ग्रुप एकत्र असताना अंजली पण तिथे जवळपास असायची कारण तिचे स्कूल पण जवळच होते. कॉलेज आणि स्कूल चे टाईम पण सेम होते.
 कॉलेज सुटल्यानंतर प्रेम आणि त्याचे सर्व मित्र जवळच असलेल्या तलावाजवळ गप्पा मारत बसायचे.
 अंजली पण स्कूल सुटल्यावर तिथे यायची. लांबुनच ती सर्वांना पहायची. पण प्रेम तिला ग्रुप मधे ओळख करून द्यायला नकार देत होता. कारण एवढ्या छोट्या मुलीशी मैत्री... मग त्यावरून अजुन काही प्रॉब्लेम व्हायला नकोत. म्हणून तो तिला कधी यांची ओळख करून देत नव्हता.
 पण लांब राहूनही अंजली तसं सर्वांनाच ओळखत होती. कारण यांच्या गप्पांमध्ये सर्वांचे विषय निघायचे.
 एकदा प्रेम ला ती बोलली सुद्धा, माझी ओळख करून दे सर्वांशी... पण प्रेम सध्या तरी नाही, योग्य वेळी मी तुझी सर्वांशी ओळख करून देईन. असं बोलला होता. 
त्यावर अंजलीने स्वतःहून त्याला कधी या गोष्टीसाठी फोर्स केला नाही. पण तिला मनातुन खूप वाटत होतं. त्याच्या मित्रांच्या ग्रुप मधे सामील व्हावं म्हणुन. 

 पण प्रेम या बाबतीत जरा वेगळा विचार करत होता. अंजली त्याला एकदा बोलली सुद्धा... की एक दिवस नक्की येईल की तु स्वताहून सर्वांची ओळख करून देशील. आणि मी त्या दिवसाची खुप आतुरतेने वाट पाहतेय.

 आता या गोष्टीला दोन तीन वर्ष झाली होती. तरीही प्रेम अजुनही तिच्याबद्दल कोणाशी बोलत नव्हता. फक्त रमेश ला थोडा अंदाज आला होता, कारण एक वर्ष तो प्रेम सोबत गरबा खेळायला तिथेच आला होता. तेव्हा त्याने अंजलीला प्रेमशी खुप वेळा बोलताना पाहिले होते. 
रमेश ने त्याला विचारलं पण तिच्याबद्दल... पण प्रेम ने फक्त नॉर्मल फ्रेंड आहोत असं बोलून विषय टाळला होता. पण रमेश मुलींच्या बाबतीत खूप वेगळा होता. 
तो प्रेमला बोलला पण, प्रेम ती मुलगी समोरून तुला सरळ लाईन देतेय आणि तु काय फ्रेंड फ्रेंड करत बसलाय... 
त्यावर प्रेम त्याला बोलला, अरे मुर्खा ती किती लहान आहे, आणि तु काय विचार करतोय. त्यावर रमेश बोलला, प्रेम... ती मुलगी खुप श्रीमंत आहे असं वाटतं. ही संधी सोडू नको. तु जर नाही इंटरेस्ट दाखवला तर ती दुसऱ्या कोणत्या तरी मुलाकडे जाईल.
 या श्रीमंत मुलींचं असच असतं. लहान लहान करत बसू नको. मस्त चान्स मिळाला आहे. बघ नंतर वेळ निघून गेलेली असेल. 
प्रेम ला त्याच्या बोलण्याचा खुप राग येतो. पण तो त्याच्या गोष्टींकडे सरळ दुर्लक्ष करतो. 

रमेशने ही गोष्ट हलकीशी ग्रुप मधे पसरवली होती. पण प्रेम ने जस्ट फ्रेंड होतो तेवढ्यापुरते असं म्हणुन विषय टाळला होता. 
या काही दिवसांमध्ये प्रेम खुप वेळा अंजलीच्या घरी वैगरे पण जाऊन आला होता. काही वेळा तिचे डॅड पण घरी असायचे, तिने त्याची नॉर्मल फ्रेंड म्हणुन त्यांच्याशी ओळख करून दिली होती.
पण अंजलीच्या डॅडी ना अंजलीची प्रेम सोबत असलेली मैत्री तेवढी आवडली नव्हती. 
त्यांच्या वागण्यावरून प्रेम च्या ही गोष्ट लक्षात आली होती. म्हणून तो आता जास्त घरी पण जात नव्हता. 
पण अंजलीची मॉम त्याला नेहमी बोलवत असायच्या. त्यांना प्रेम चा स्वभाव खूप आवडला होता. तो घरी आला की त्यांच्या खुप गप्पा रंगत असायच्या. पण हल्ली ते कमी झालं होतं. 

प्रेम आणि अंजलीच्या नात्यात आता काहीतरी वेगळं घडत होतं. अंजली आता थोडी मोठी झाली होती. आठवी मधे शिकत होती. दोघांना एकमेकांची एवढी सवय झाली होती. एकही दिवस एकमेकांशी बोलल्याशिवाय जात नव्हता. 
अंजली रोज प्रेम ला त्याच्या ऑफिस मधे लंच टाईम मधे कॉल करायची. वेळ मिळेल तेव्हा दोघे भेटायचे. या काही दिवसांमध्ये अंजलीला ही गोष्ट कळून चुकली होती की, आपण प्रेम शिवाय एक दिवस ही राहू शकत नाही. 
खरच ही फक्त मैत्रीच आहे का...?🤔
हा प्रश्न तिला सतत बेचैन करत असायचा. तिच्या मनात हळू हळू प्रेम बद्दल वेगळ्या भावना दाटून यायला लागल्या होत्या. आता ती स्वतःला थांबवू शकत नव्हती. 
तिच्या मनात मैत्रीचं रूपांतर आता प्रेमात कधी झालं हे तिचं तिला सुद्धा कळलं नव्हतं. पण ही गोष्ट प्रेम ला सांगायचं धाडस होत नव्हतं. कारण प्रेम फक्त मला एक चांगली मैत्रीण मानतो. त्याच्या मनात आपल्याबद्दल असे काही विचार असतील का...? 
 जो विचार आपण त्याच्या बाबतीत करतोय तसच काहीसं प्रेमच्या मनात असेल का...?
असे खुप प्रश्न तिच्या डोक्यात गर्दी करू लागले होते. 
पण त्याच उत्तर फक्त प्रेम देऊ शकत होता. आणि त्याला विचारायची हिम्मत अजुन तरी अंजली मधे नव्हती. म्हणून सध्या तरी जे मनात आहे ते मनातच ठेऊन ती प्रेम सोबत रहात होती... 
 वाढत्या वयानुसार तिच्यात झालेला बदल आता तिला जाणवू लागला होता. जेव्हा जेव्हा प्रेम तिच्या जवळ यायचा, कधी कधी तो मिठी मारायचा तेव्हा तिला आता वेगळं फिलिंग येत होतं. प्रेम मात्र या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे घेत होता. 

अंजली आता आठवीत शिकत होती, आसपासच वातावरण बदललं होतं. जसजसे दिवस पुढे जात होते, तशी तिच्या मनातली बेचैनी वाढत चालली होती. कधी एकदा प्रेमला हे सर्व सांगावं असं पण वाटत होते, आणि मनात एक वेगळी भीती पण निर्माण होत होती. त्या भीतीने ती मनातली गोष्ट मनातच ठेऊन होती.
 पण असे किती दिवस चालणार, एक ना एक दिवस हे सर्व बोलायलाच हवं ना, निदान त्याच्या मनात काय आहे ते तरी कळेल. असा विचार करून शेवटी तिने प्रेमला प्रपोज करायचंय ठरवले. खुप वेळा तसा प्रयत्न केला पण... तिला जे बोलायचं होतं ते मात्र मनातच राहून जायचं, काही केल्या तिची हिम्मत होत नव्हती.
 शेवटी ती मनाशी ठरवते, काही दिवसात तिचा वाढदिवस असतो. त्याच दिवशी प्रेमला प्रपोज करायचा.

अंजलीचा वाढदिवस आदल्या दिवशी रात्रीच 12 वाजता घरी केक कापून साजरा करण्यात आला होता. घरी छोटीशी पार्टी पण झाली होती. त्यामुळे झोपायला पण उशीर झाला होता. 
 रात्री खुप वेळ ती याच विचारात जागी होती की, प्रेमला कसं प्रपोज करायचंय...? 
तो काय उत्तर देईल...? 
तो हो बोलेल का...? 
त्याच्या मनात सुद्धा असच काहीतरी असेल ना...? 
का त्याला राग येईल, आणि तसं काही झालं तर मग आपली मैत्री कायमची.........😢

नाही नाही !!!!!!!! असं काहीच होणार नाही, मी काहीही विचार करतेय, जे काही होईल ते होईल पण आज काहीही करून मी प्रेमला प्रपोज करणारच, हे फायनल आहे. या सर्व विचारांमध्ये तिला कधी झोप लागली ते कळलं सुध्दा नाही.

शेवटी तो दिवस आला.
 15 ऑगस्ट, आज शनिवार होता. पहाटे पाच चा अलार्म वाजताच ती पटकन उठली. तासाभरात सर्व तयारी उरकली. आज तिने सफेद रंगाचा छान सलवार कुर्ती असा ड्रेस घातला होता. त्यावर तिरंगी ओढणी घेतली होती.
 नेहमीसारखी आज पण ती खुप छान दिसत होती. आज आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडणार आहे, याची कल्पना तिला होती, त्यासाठी तिने मनाची पूर्ण तयारी केली होती. 
सर्व तयारी झाल्यावर निघताना पुन्हा एकदा ती आरशासमोर स्वतःला न्याहाळत उभी राहिली. आणि काहीतरी विचार करू लागली, तेवढ्यात मॉम ने आवाज दिला. 
अंजु.... निघतेय ना मेघा आलीय. निघा आता लवकर....
मॉम चा आवाज ऐकून ती पटकन बाहेर येते, आणि मेघासोबत स्कूल मधे निघुन येते.
 
आज स्कूल मधे झेंडावंदन चा प्रोग्राम फार उत्साहात पार पडला होता. त्यानंतर क्लासरूम मधे तिचे टीचर व फ्रेंड्स यांनी मिळून तिचा वाढदिवस पण सेलिब्रेट केला होता. तिला खुप सारे गिफ्ट पण मिळाले होते.
 ते सर्व गिफ्ट एका बॅग मधे घेऊन ती घाईतच स्कूल च्या गेट वर येऊन पोचली. 
प्रेम तिला स्कूल जवळच भेटणार होता. त्याची वाट पहात ती स्कूल च्या बाहेर उभी होती. अकरा वाजून गेले होते... तिची नजर इकडे तिकडे सर्व ठिकाणी प्रेमला शोधत होती, पण तिला प्रेम कुठेच दिसत नव्हता. 

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️