Anubandh Bandhanache - 8 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 8

The Author
Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 8

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ८ )

कालच्या भेटीत दोघांनीही जास्त काही बोलता आले नव्हते. म्हणुन प्रेम ने अंजलीला कॉल करायचा विचार केला. दुपारचे चार वाजले होते, त्याने कॉल लावला आणि इकडे घरी अंजली पण त्याच्याच कॉल ची वाट पहात होती. रिंग होताच पटकन तिने कॉल उचलला...📞
प्रेम : हाय...कशी आहेस...?
अंजली : मी मस्त... तु कसा आहेस...?
प्रेम : रात्री किती वाजता आले घरी...?
अंजली : तीन वाजले घरी यायला... तुला पण लेट झाला ना...?
प्रेम : हो ना... पण तुला भेटलो ना रात्री, खरच खुप छान वाटलं.😊
अंजली : हो...तुझं तिथे येणं म्हणजेच माझ्यासाठी तर ख्रिसमस चे सर्वात मोठे सरप्राइज गिफ्ट होते. खरच तुला पाहिल्यावर एवढा आनंद झाला ना... तुला शब्दात कसं सांगु...😊
प्रेम : अच्छा... कळलं ते रात्री मला तुझ्या चेहऱ्यावरून....😊
अंजली : थँक्यू वेरी मच....😊
प्रेम : झालं... कशाबद्दल थँक्यू...?🤔
अंजली : असच...रात्रीच्या छान सरप्राइज बद्दल...😊
प्रेम : अरे... हो... ना... किती वेळा बोलशील, मला पण तुला भेटायचं होते म्हणुनच आलो होतो ना मी...😊
अंजली : जे काही असेल ते... पण माझ्यासाठी स्पेशल होते.😊
प्रेम : बरं ओके... मग आज घरी पण पार्टी असेल ना...🥳
अंजली : अरे हो... मी तेच बोलणार होते तुला... येशील तु घरी संध्याकाळी...
प्रेम : अच्छा... आता मी बोललो म्हणून...😊
अंजली : अरे मी बोलणारच होते तुला, खरच येशील ना... तु प्रॉमिस केले होते, येईल म्हणुन... आता नाही नको बोलू...
प्रेम : अरे लगेच काय... रात्री तर भेटलो ना आपण...🤔
अंजली : मग काय झाले... तुला यावच लागेल...
प्रेम : अरे यार... नको ना हट्ट करू, नंतर येईन बोललोय ना, मग नक्की येईन ओके...
अंजली : मला माहितीये... हे नेहमीचं झालंय तुझं... जा... परत नाही बोलवनार मी कधीच....😔
प्रेम : आला राग लगेच... अरे ऐक ना, आजचा दिवस नको लगेच... ओके
मी प्रॉमिस केलंय ना येईन म्हणून तर नक्की येईन...ओके.
अंजली : राहुदे... महितीय तुझं प्रॉमिस, नेहमीच असं करतो तु...😔
प्रेम : अगं वेडाबाई.... राग नको करू, तु मस्त एन्जॉय कर फॅमिली सोबत ख्रिसमस पार्टी, ओके... आता मी ठेवतो कॉल, ऑफिस मधे थोडं काम आहे.
अंजली : बरं ओके... तु नेक्स्ट टाईम फक्त नाही बोल मग बघच तु....😔
प्रेम : अरे..... काय करशील...?🤨
अंजली : ते तेव्हाच कळेल... आता कर तु तुझे काम.... बाय... सी यू...😔
प्रेम : हो... बाय... टेक केअर...😊

* एवढं बोलून दोघेही फोन ठेऊन देतात. 
पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली होती. 
खरं तर प्रेमला फक्त तिची माफी मागायची होती. म्हणुन त्याला अंजलीला भेटायचे होते. आणि जेव्हा पण तो तिला भेटायचा तेव्हा तिला पुन्हा भेटण्याची ओढ निर्माण व्हायची. 
मनातुन किती जरी प्रयत्न केले तिच्यापासून दुर राहण्याचे तरी ते त्याला शक्य होत नव्हते. रोज तिच्याशी बोलल्याशिवाय त्याचा दिवस जात नव्हता. कधी जास्तच विचार केला तर तेच प्रश्न त्याच्या समोर उभे रहायचे.
 मग फक्त मैत्री म्हणुनच रहायचं का...? कारण ती एवढी लहान आहे की, पुढच्या गोष्टीचा विचारच करू शकत नाही. पण तिच्याशी बोलताना वेगळच फिलिंग येतं. मग असं का होतंय...?
जरी ती लहान असली तरी मग तिला मोठ्या मुलींसारखी बोलण्याची एवढी समज कुठून येते...? आपणच का असा विचार करतोय...? आणि या वयात तिच्या मनात अशा वेगळ्या भावना येऊच शकत नाहीत. म्हणजे मी तिच्याकडे चुकीच्या नजरेने पाहतोय का...? पुन्हा या सर्व विचारांनी डोक्यात गर्दी व्हायला लागली होती.

शेवटी प्रेम हाच विचार करतो, की जोपर्यंत हे मैत्रीचे नाते सांभाळता येईल तोपर्यंत तरी असच रहायचं मित्र बनुन. पुढे जे काही होईल ते होईल.
थोड्याच दिवसांनी नवीन वर्ष चालु होणार होते. अंजलीला ख्रिसमसची सुट्टी होती त्यामुळे ती घरीच होती. फोनवर बोलताना तिने 1 जानेवारीला प्रेमला भेटायला बोलवले होते.
 आणि तोच दिवस होता आज. प्रेम ऑफिसमधून लवकरच घरी आला होता. फ्रेश होऊन छान कपडे घालून तो आधी मंदिरात गेला. आज गुरुवार होता. दर गुरुवारी तो साईबाबा मंदिरात जायचा. तिथूनच तो अंजलीला भेटण्यासाठी नेहमीच्या ठिकाणी पोचला. 
रात्रीचे आठ वाजले होते. अंजली आधीच तिथे त्याची वाट बघत होती. आज तिने खुप छान असा पिंक कलर चा ड्रेस घातला होता. हलकीशी पिंक कलर ची लिपस्टिक आणि त्यावर ज्वेलरी पासून शूज पर्यंत सर्व काही मॅचींग करून आली होती. खूपच सुंदर दिसत होती ती, 
 प्रेम समोरून येताना दिसला तशी ती एकदम खुश झाली. तिने तिथुनच त्याला हात दाखवला. तो जसा जवळ आला तसा तोही भान हरपून तिला पाहु लागला. थोडा वेळ दोघेही एकमेकांकडे पहात होते. मग तिने हात पुढे करून त्याला हॅपी न्यू इअर, असं बोलून विश केले आणि हलकीशी त्याला मिठी मारली.
 प्रेमला काहीच सुचत नव्हतं. त्याला असं काही होईल असं वाटलं नव्हते. कारण त्याच्यासाठी हे सर्व त्याच्या विचारांच्या पलीकडचे होते. आणि त्यामध्येच तो हरवून गेला होता.
तेवढ्यात अंजली त्याला बोलली...
अंजली : खुप छान वाटलं, तु आलास...😊
प्रेम : हो... मला पण खुप छान वाटलं तुला पाहून....आणि खरं तर आज खुप सुंदर दिसतेय तु...👌🏻😊
अंजली : अच्छा... खरच का...? म्हणजे फक्त आजच, इतर वेळी नाही का...?🤨
प्रेम : अरे म्हणजे तसे काही नाही, तु नेहमीच खुप छान दिसतेस. 👌
अंजली : हो... का... तु कधी नेहमी पाहतोस मला... आपण तर कधीतरीच भेटतो.🤔
प्रेम : अरे.... जेव्हापन मी तुला पहातो तेव्हा तु मला छानच दिसतेस, असं बोलायचं होतं.
अंजली : अच्छा... असं आहे का...😊
प्रेम : हो... असच आहे. 😊
अंजली : बरं... मग माझी खोटी तारीफ करून झाली असेल तर आपण घरी जाऊया का आता...?
प्रेम : काय...? घरी आणि आत्ता...?🤔
अंजली : हो... आत्ताच... मग कधी ?🤨 आठवतंय का तुला लास्ट टाईम कोणीतरी प्रॉमिस केले होते.😊
प्रेम : अरे पागल.... तुला का एवढी घाई लागली आहे, मला घरी घेऊन जायची ?
अंजली : तुला यायचं नाही का मग माझ्या घरी.... असं ठरवलं आहेस का तू...?🤨
प्रेम : अरे..... तसे काहीच नाही, पण आता तर आपण फ्रेंड्स झालो आहोत. मग लगेच घरी वगैरे .... 🤔
अंजली : मग काय झालं...? माझे सर्व फ्रेंड्स घरी येतातच ना...😊
प्रेम : त्यांची गोष्ट वेगळी आहे ग....ते खुप आधीपासून तुझे मित्र आहेत ना...
अंजली : हो... का.... मग तु पण आहेसच ना आधीासूनच....☺️
आणि आज जर का तु नाही आलास घरी तर बघच....😏
प्रेम : अरे बाप रे... म्हणजे ही धमकी होती का....?🤨
अंजली : तुला जे समजायचे ते समज...ओके. 😏
प्रेम : बरं ओके...पण घरी काय सांगशील ?
अंजली : घरी मी मॉम ला सांगितले आहे सर्व तुझ्याबद्दल...😊
प्रेम : म्हणजे नक्की काय सांगितले आहेस...?
अंजली : आपल्या फ्रेंडशिप बद्दल...😊
प्रेम : अच्छा... मग काय बोलली मॉम...🤔
अंजली : तिलाच तर तुला भेटायचं आहे...😊
प्रेम : काय....?🤨
अंजली : हो.....म्हणजे तिच बोलली की, प्रेम कधी. इकडे आला की, त्याला घरी घेऊन ये म्हणुन....😊
प्रेम : अरे व्वा... असं काय सांगितले आहेस माझ्याबद्दल मॉम ला...?🤨
अंजली : सर्वच सांगितले, आपली फ्रेंडशिप कशी झाली ते...😊
प्रेम : काय बोलते...?🤔
अंजली : हो... खरच बोलतेय... आणि तु चल आता, खुप टाईमपास झाला मघापासून, बाकी घरी जाऊन बोलू...
प्रेम : डॅडी पण असतील ना घरी...?
अंजली : ते नाहीत आता, रात्री उशिरा येतात ना...
( तिचे डॅडी घरी नाहीत हे ऐकुन प्रेम ला थोडं तरी बरं वाटतं, कारण आता अंजली त्याला काही झालं तरी घरी घेऊन जाणार हे निश्चित होते. )
प्रेम : बरं चल... जाऊया घरी...👫
अंजली : खरच...😊
प्रेम : नाही... खोटं खोटं...☺️ चल आता...😊
अंजली : थँकयु... तु फायनली तयार झालास घरी यायला...😀
प्रेम : बरं आता चल लवकर... मला परत पण जायचे आहे घरी...😊
अंजली : हो... रे... जाशील ना, अजुन घरी गेलो पण नाही, लगेच परत जायची घाई लागली तुला...🤨
प्रेम : तसे काही नाही, पण घरी पण ताई वाट पाहत राहते ना मग, उशीर झाला की, काळजी करत बसते.
अंजली : बरं ठीक आहे, चल आधी घरी, नंतर बघू ते....😊
* असे बोलुन अंजली प्रेमला घरी घेऊन जाते. 
🧑‍🤝‍🧑,............🏬

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️