Anubandh Bandhanache - 7 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 7

The Author
Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 7

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ७ )

कॉलेज आणि ऑफिसच्या कामात थोडे दिवस असेच निघुन गेले. पण प्रेमला अंजलीला भेटण्याची इच्छा मनातून जात नव्हती. 
एक दिवस असाच विचार करत असताना त्याला काही दिवसांपूर्वीच बोलणे आठवले. ख्रिसमसच्या दिवशी रात्री तिच्या स्कूळजवळ असलेल्या चर्च मधे ती आणि तिची फॅमिली दरवर्षी येतात. 
' तु पण येशील का ख्रिसमसच्या रात्री मला भेटायला ' अशी तीच सतत बोलत असायची. 
प्रेमला आता अंजलीला भेटण्याचा अजुन एक मार्ग मिळाला होता. 
अखेर तो दिवस आला होता.
 आदल्या दिवशीच रात्री बारा वाजता चर्चमध्ये अंजली आणि तिची फॅमिली प्रेयर साठी येणार होते हे त्याला नक्की माहित होते.
प्रेम रात्री जेऊन झाल्यावर थोड्या वेळाने ताईला बाहेर मित्राकडे जातोय, रमेश आला तर त्याला सांग रात्री उशीर होईल यायला, असे बोलुन घरातुन तयार होऊन निघाला.
 रात्रीचे अकरा वाजले होते. तो चर्चच्या गेट जवळ येऊन अंजलीची वाट पहात थांबला होता. जसजसा वेळ पुढे जात होता तसे, तिथे आता खुप लोकं जमा होत होते.
 गेटमधून आत जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम चे लक्ष होते. पण काही लोक कार मधुन पण येत होते. आणि अंजली कारमधून येईल याची त्याला कल्पना सुध्दा नव्हती. कारण त्यांच्या आजपर्यंतच्या बोलण्यात त्यांच्याकडे गाडी वैगरे आहे, असे कधी ऐकले नव्हते. आणि शेवटी तसेच झाले.
 एका ब्ल्यू कलरच्या झेन कारमधून अंजली आणि तिची फॅमिली गेट मधून आतमध्ये गेले होते. आणि प्रेम बिचारा अजुनही गेटवर तिच्या येण्याची वाट पहात होता. 
खुप वेळ झाला होता. रात्रीचे बारा वाजले होते. तसे आकाशात रंगबिरंगी फटाक्यांची आतिषबाजी होत होती. चर्चमधून प्रेयर चा आवाज येत होता.
 प्रेमला काही कळत नव्हते. अंजली आलीय की नाही...? खुप वेळ गेट वर वाट पहात होता तो, पण त्याला येताना तरी ती दिसली नव्हती. त्यामुळे आता काय करायचं... घरी परत जायचं... अजुन किती वेळ वाट पाहायची...🤔
 ती येणार असती तर, आतापर्यंत यायला हवी होती. आतमध्ये जाऊन बघायचं का...? पण आत कसे जाणार... शेवटी त्याने गेटवरील वॉचमन ला विचारले, आत जाऊ शकतो का म्हणुन... वॉचमन हो बोलल्यावर लगेच तो आत गेला. 
तिथे एक स्टेज वर मोठा केक ठेवला होता. डिजे वर गाणी चालु होती. खुप लोकं होती तिथे आणि बहुतेक सर्व पुरुष व्हाईट शर्ट किंवा सूट मधे दिसत होते. 
योगायोगाने प्रेम पण आज व्हाईट शर्टच घालुन आला होता. सर्व महिला आणि मुली पण व्हाईट कलर च्या ख्रिसमस स्पेशल गाऊन मधे दिसत होत्या. 
या सर्वात अंजलीला कसे शोधायचे हा प्रश्न त्याला पडला होता. तरीही त्याची नजर सर्वत्र तिलाच शोधत होती. कुठेतरी अंजली दिसेल अशी आशा त्याला वाटत होती. 
स्टेज वर सांता क्लॉज आला होता. अजुन काही लोक पण स्टेजवर होते.
 सांता क्लॉज नी तो भला मोठा केक कापला, तसा टाळ्यांचा आवाज आणि डिजे पुन्हा चालु झाला. 
स्टेज च्या बाजूलाच प्रेमला मुलामुलींची एक लाईन दिसली. एक एक करून सर्व स्टेज वर जात होते आणि सांता क्लॉज कडून गिफ्ट घेत होते. त्या सर्व मुलांमध्ये अंजली पण होती. पण प्रेमला अजुन तिचा चेहरा नीट दिसला नव्हता. 
प्रेम स्टेज पासुन खुप लांब उभा होता. त्यामुळे अंजली त्याला दिसत नव्हती. पण जेव्हा ती स्टेज वर गिफ्ट घ्यायला गेली तेव्हा तिला नाव विचारलं गेलं, आणि तिने नाव सांगितले. ते नाव कानावर पडताच प्रेम ने स्टेजवर पाहिले.
प्रेम त्या सर्व लोकांच्या गर्दीतून वाट काढत स्टेज जवळ पोहोचला. आणि त्याने जवळुन जेव्हा अंजलीला पाहिले, आणि तिच्याकडे एकटक बघतच राहिला, व्हाईट कलर च्या गाऊन मधे ती एखाद्या 👰🏻 परीसारखी भासत होती. 
अंजलीने अजुन प्रेमला पाहिले नव्हते. स्टेज वरून खाली उतरताना तिचे लक्ष खाली उभा असलेल्या प्रेम कडे गेले. आणि ते गिफ्ट घेऊन धावतच त्याच्याजवळ आली. आणि त्याला बोलली.....
अंजली : हाय... प्रेम... तु कधी आलास ? किती छान सरप्राइज दिलेस तू येऊन...😊 थॅन्क्स... अँड मेरी ख्रिसमस...☃️
प्रेम : मेरी ख्रिसमस टू यू... डिअर 😊
अंजली : खरच खुप छान वाटलं आज तु आलास, मला कुठेतरी असे वाटत होते, तु आज येशील मला भेटायला. 😊
प्रेम : अंजली... सॉरी... मी खुप वाईट वागलो ग तुझ्याशी... तुझी काही चुक नसताना पण मी तुला खुप काही बोललो. खरच सॉरी... पुन्हा कधी असे नाही होणार,... माफ करशील ना मला...😔
अंजली : अरे... वेडा आहेस का तु...?
एवढं काही झालं नाही, आणि फ्रेंड्स आहोत ना आपण, मग सॉरी वगैरे काय... मला खरच नाही राग आलाय, मलाच असं वाटलं की, मी ऑफिस मधे कॉल करायला नको होता, माझच चुकलं सॉरी...😊
प्रेम : अरे यार... प्लिज आता सोड ना ते... मम्मी पप्पा कुठे आहेत...?
अंजली : पाठीमागे बसलेत ते... चल मी ओळख करून देते तुझी...😊
प्रेम : काय..... नको आता... नंतर कधीतरी... आज नको.
अंजली : अरे पण काय झालं... तु का टाळतोय त्यांना भेटायला, त्या दिवशी पण घरी चल बोलले तरी आला नाहीस. आता पण नाही बोलतोय...🤔
प्रेम : अरे ... तसे काहीच नाही, पण तु काय म्हणुन ओळख करून देणार माझी...🤔
अंजली : पण तु फ्रेंड आहेस ना माझा, मग काय प्रॉब्लेम आहे...😊
प्रेम : अरे पण... ते विचारतील ना, हा कसा काय फ्रेंड झाला तुझा... ? आणि इथे कसा काय आला... ?
अंजली : मी मॉम ला बोलली आहे तुझ्याबद्दल, चल तु काहीच प्रॉब्लेम नाही.
प्रेम : प्लीज... ऐक ना, आता नको, नेक्स्ट टाईम नक्की, प्रॉमिस...👍🏻
अंजली : तु नेहमी असाच बोलतो, आणि भेटत नाहीस. 😔
प्रेम : नाही... प्रॉमिस नेक्स्ट टाईम नक्की...👍
अंजली : बघ हा... प्रॉमिस करतोय तर नेक्स्ट टाईम घरी यावं लागेल तुला, तेव्हा मी काहीच ऐकुन घेणार नाही ओके...
प्रेम : हो... नक्की, पण आता मी निघतो, खुप उशीर झालाय, कॉल कर मला उद्या. किंवा तुला वेळ मिळेल तेव्हा.
अंजली : अरे यार... लगेच का चालला आहेस ? थांब ना थोडा वेळ अजुन...
प्रेम : नाही... नको... तु पार्टी एन्जॉय कर, आणखी एक बोलायाचे राहिले....
अंजली : बोल ना... काय...🤨
प्रेम : आज खरच खुप सुंदर दिसतेय तु अगदी एखाद्या परीसारखी.....👰🏻👌😊
पुन्हा एकदा मेरी ख्रिसमस... 🤝
अंजली : फक्त हॅण्ड शेक करूनच विश करणार आहेस का....?🤔
( प्रेमला काही कळायच्या आतच अंजलीने त्याला मिठी मारली. )
प्रेमला हे सर्व खुप वेळाने जाणवलं, तोपर्यंत तो फक्त शांतपणे तिच्याकडे बघत होता. खुप दिवसांनी असा काही वेगळा अनुभव आला होता. दोघे एकमेकांकडे फक्त पहात राहिले होते. आजूबाजूला एवढी लोकं होती, एवढा आवाज होता, तरीही ते एकमेकांमध्ये गुंग होऊन गेले होते. तेवढ्यात अंजलीला कोणीतरी आवाज दिला, तसे ते दोघेही भानावर आले, प्रेम ला जाते बोलुन ती तिथून निघून गेली. 

खुप दिवसांनी दोघे एकमेकांना भेटले होते, दोघांनाही खुप काही बोलायचं होतं, पण तिथे ते शक्य नव्हते. पण दोघेही आज खुप खुश होते. 
रात्रीचे दोन वाजता प्रेम घरी आला, आज काही त्याला झोप लागणार नव्हती, तिच्या विचारातच त्याची आणि साहजिकच तिची पण रात्र निघुन गेली.
दुसऱ्या दिवशी कॉलेजला सुट्टी होती पण ऑफिस चालू होते. प्रेमला सकाळी थोडा उशीरच झाला होता उठायला. आवरून तो ऑफिस मधे आला. रात्रीची भेट अजुनही त्याला आठवत होती, तिचा चेहरा काही डोळ्यांसमोरून जात नव्हता. मनाने किती जरी नाही म्हटलं तरी हे नातं फक्त मैत्री पुरते मर्यादित राहिले नव्हते. याची जाणीव त्याला होत होती. 
पुन्हा तिच्या वयाचा विचार डोक्यात यायचा, आणि पुन्हा तो स्वतःला सावरायचा प्रयत्न करायचा. पण जितका जास्त विचार करायचा तेवढाच तो तीच्यामधे गुंतत जात होता. अंजली खरच वयाने खूपच लहान होती पण तिची समज आणि वागणं एखाद्या मोठ्या मुलीसारखं होतं. त्यामुळे तिला स्वतःलाही कदाचित माहीत नव्हते की, प्रेम सोबतचे तिचे नाते काय...? मैत्री की बालिश प्रेम...?

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️