Anubandh Bandhanache - 3 in Marathi Love Stories by prem books and stories PDF | अनुबंध बंधनाचे. - भाग 3

The Author
Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

अनुबंध बंधनाचे. - भाग 3

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ३ )

नवरात्रीचे उरलेले दिवस पण हे दोघेजन रोज भेटायचे, बोलायचे, एकमेकांशी बोलुन दोघांनाही खुप छान वाटायचं त्यामुळे दोघेही खुश होते. 😊
 दुसऱ्या आदल्या दिवशी फॅन्सी ड्रेस होता. आज प्रेम फॅन्सी ड्रेस मधे कृष्ण बनणार होता. तिथेच राहणाऱ्या एका महेश नावाच्या मित्राने आणि त्याची बहीण लिना या दोघांनी मिळुन हा प्लॅन केला होता.
अंजली साठी मात्र हे सरप्राइज होते. कारण प्रेम ने तिला याबद्दल काहीच सांगितले नव्हते.
अंजली प्रेमला रोज बोलायची, नाचायला का येत नाहीस म्हणुन, पण तो.... मला नाचता नाही येत म्हणुन टाळायचा... तरीही ती त्याला दांडिया खेळण्यासाठी हट्ट करायची. पण एवढ्या दिवसात प्रेम कधीच दांडिया खेळायला गेला नाही. 
पण शेवटच्या दिवशी नक्की येईन. असे त्याने तिला प्रॉमिस केले होते.
आणि आज तो दिवस होता. प्रेम कधीच दांडिया मधे नाचला नव्हता. आणि आज तर त्याला कृष्ण बनुन फॅन्सी ड्रेस मधे भाग घ्यायचा होता. या गोष्टीचे थोडंसं दडपण त्याला आलच होतं. 
तिथे गेल्यानंतर थोडा वेळ वाजवुन झाल्यावर महेशच्या घरीच कृष्णाचा गेट अप करायचा असं ठरलं होतं.
त्याने तर अंजलीला सरप्राइज द्यायचं ठरवलं होतं. पण अंजली ने पण असच काहीतरी प्लॅन केलं होतं. आणि ते प्रेम साठी सरप्राइज होते. 
 आज दांडियाचा तसा शेवटचा दिवस होता. प्रेम आणि त्याचे मित्र तिथे पोहचायच्या आधीच अंजली तिथे हजर होती. नेहमप्रमाणेच अगदी छान ड्रेस घालुन ती आली होती. मैत्रिणीसोबत गप्पा मारत असताना तिचे लक्ष प्रेमच्या येण्याकडे लागले होते. 
थोड्याच वेळात प्रेम आणि त्याचे मित्र ऑटो मधुन तिथे पोचले. 
ऑटोमधून खाली उतरताच त्याने इकडे तिकडे नजर फिरवली. बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर अंजली मैत्रिणीसोबत बोलताना त्याला दिसली. दोघांनीही एकमेकांना पाहिले आणि स्माइल केले. 😊😊
त्याला पाहुन अंजली खाली आली, प्रेम आणि त्याचे मित्र सर्व इन्स्ट्रुमेंट लावत होते. 
वाजवायची तयारी झाली होती. अंजलीने प्रेम कडे पहात कीबोर्ड कडे इशारा केला. प्रेम चा मित्र उभा होता तिथे. तो तिला बोलला,
प्रेम : तु जा आणि बोल त्याला, तो देईल वाजवायला.
अंजली : मी नाही जाणार एकटी, तु चल माझ्यासोबत.....
प्रेम : अरे मला कसं विचारले मग त्या दिवशी. तसच त्याला पण विचार ना...?
अंजली : नाही मी नाही त्याला विचारणार... 😔
प्रेम : अरे पण मला कसे विचारले त्या दिवशी...? 🤔
अंजली : कारण तुझी गोष्ट वेगळी आहे... म्हणुन तर फ्रेंडशिप केली ना तुझ्याशी. 😊
प्रेम : त्याच्याशी पण कर ना मग... 🤔
अंजली : असं थोडीच असतं ? सर्वांशी मैत्री थोडीच होते...? मला फक्त तुझ्याशीच मैत्री करायची होती, म्हणुन मी केली.... कळलं...." 😊
*प्रेमला तिचं बोलणं खुप छान वाटलं. आणि हसायला आले. 😊 तो तिला घेऊन किबोर्ड जवळ गेला. आणि तिला तो चालु करून दिला. अंजली हळुवार त्यावर बोटे फिरवायला लागली आणि त्यातुन छान सुर ऐकु येऊ लागले. 
🎹🎵 🎶🎵 🎶🎵🎶🎵 🎶🎵 🎶 
गाण्याचे बोल तर त्याला कळले नाहीत, पण ती धुन ऐकायला खुप छान वाटत होती.
तेवढं वाजवुन.... प्रेमला थँक्स् बोलुन ती तिथून निघाली. 
निघताना प्रेमला बोलली.
अंजली : आज लास्ट डे आहे आणि तु मला प्रॉमिस केलं आहेस की, तु आज नाचणार आहेस...😊
प्रेम : हो... आहे माझ्या लक्षात, नक्की येईन थोड्या वेळाने...ओके...😊
अंजली : बरं ओके... मी वाट बघते. 😊
असं बोलून ती नाचायला निघुन गेली. 
दांडिया आता चालु झला होता. शेवटचा दिवस होता, आणि त्यात फॅन्सी ड्रेस होता, त्यामुळे दांडिया रसिकांची आणि पाहणाऱ्यांची पण खुप गर्दी झाली होती.
हळु हळु खेळ रंगात येत चालला होता. आज खुप मुलामुलींनी वेगवेगळी रूपं घेतली होती.
थोड्या वेळाने महेश तिथे आला आणि त्याला त्याच्या घरी घेऊन गेला.
घरी त्याचा मेकअप चालु झाला अगदी अर्धा तास तयारी करून त्याला आरशासमोर उभे करण्यात आले. 
स्वतःला कृष्ण रुपात पाहून प्रेमला पण छान वाटले. छान मेकअप, कृष्णाचे कपडे, डोक्यावर सुंदर मुकुट त्यावर डूलणारे मोरपीस. आणि हातात बासरी घेऊन तो खुप वेळ आरशासमोर उभा राहून स्वतःला पहात स्वतः मध्येच हरवून गेला होता. 
त्याला असं पाहून महेशने त्याला आवाज दिला तसा तो भानावर आला. 
थोड्याच वेळात ते लोक बाहेर गॅलरीमध्ये आले आणि खाली पाहू लागले.
 तिथे एक गोल फिरता स्टेज बनवला होता. त्याच्या भोवती गोल करून सर्व गरबा नृत्य करत होते. 
आता त्याच्या जाण्याची ची वेळ झाली होती.
प्रेम त्याच्या मित्रांसोबत खाली आला आणि त्या मध्यभागी असलेल्या स्टेज कडे जाऊ लागला.
तो स्टेज कडे जात असताना त्याचे लक्ष समोर गेले...समोरून एक सुंदर मुलगी राधाच्या गेट अप मधे स्टेज कडे येत होती. जसजशी ती त्याच्या जवळ येत होती तेव्हा त्याच्या कळले की, ती दुसरी कोणी नसुन अंजलीच होती. ते दोघेही जवळ येताच एकमेकांना पाहून दचकले होते. पण एवढ्या लोकांमध्ये जास्त काही बोलु शकत नव्हते, कारण त्या दोघांवरही आजू बाजुच्या बिल्डिंग मधुन फुलांचा वर्षाव केला जात होता. ते दोघे राधा कृष्णाच्या रुपात सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मधेच ते दोघे एकमेकांकडे पाहून छान स्माइल करत होते. 😊
🌼🌺🌸🏵️🌸🌺💮🌼
 अखेरीस दोघेही त्या मध्यभागी असलेल्या स्टेज वर आले. आणि त्यांच्या मित्रांनी सांगितल्या प्रमाणे पोज देऊन उभे राहिले. तेवढ्यात कीबोर्ड वर गाणे वाजु लागले... 

🎹🎶🎵 
उधळीत ये रे गुलाल सजणा,
तू श्याम मी राधिका,
तुला शोधू कशी, झाले वेडीपिशी,
तू ये ना, मज ने ना, अरे ये ना कान्हा,

चांद बिलोरी, रात अधीरी,
प्रीत माधुरी तू देऊन जा,
धुंद होऊनी रास खेळुनी,
पुनवेच्या राती मला घेऊन जा,
रंग आला अती, वाट पाहू किती,
तू ये ना, मज ने ना, अरे ये ना कान्हा....

गाणे चालु होते, सर्व जण अगदी जोशात नाचत होते. 
राधा आणि कृष्ण ज्या स्टेजवर उभे होते ते स्टेज आता हळू हळू गोल फिरत होता. कृष्ण बासरी हातात पकडुन त्याच्या पोज मधे उभा होता तर राधा हातात एक घडा घेऊन त्याच्या पाठीला पाठ लावून उभी होती. 

मधेच दोघे एकमेकांना पाहतात, दोघानाही विश्वास बसत नाही. ते दोघे राधाकृष्ण बनले होते. अंजलीला राधा बनवण्याचा प्लॅन पण प्रेमच्या मित्राच्या बहिनीचाच होता. पण तिने प्रेमला याबद्दल काहीच सांगितले नव्हते. 
दोघांसाठीही हे सरप्राइज ठरले होते. 😊
ते दोघे एकमेकांमध्ये गुंग होऊन एकमेकांना पहात उभे राहिले होते. काय बोलायचं कोणाला काहीच कळत नव्हते. दोघे फक्त एकमेकांकडे पाहून हसत होते. आणि तो सुंदर क्षण एन्जॉय करत होते. 
थोड्या वेळाने त्यांचे मित्र दोघांनाही स्टेज वरून खाली नाचायला घेऊन येतात आणि सर्वांसोबत ते नाचायला लागतात. 
नाचता नाचता त्याच्याकडे पहात अंजली मनात विचार करते. हा मला दिलेले प्रॉमिस असे पूर्ण करेल असं तरी वाटलं नव्हते. तिच्यासाठी खरच मोठे सरप्राइज होते. आणि ती खुश होऊन त्याच्यासोबत आनंदाने बेधुंद होऊन नाचत होती. 
आज दांडियाचा शेवटचा दिवस असल्यामुळे रात्री खुप उशीरापर्यंत गरबा, दांडिया चालु होता.
सर्व मुलंमुली प्रेक्षक फॅन्सी ड्रेस मधे भाग घेतलेल्या सर्व पात्रांचे आवर्जुन कौतुक करत होते. सर्व घामाघूम होईपर्यंत नाचत होते. 
अखेरीस रात्रीचे २ वाजता दांडिया बंद झाला. 
प्रेम आणि अंजली तिथेच बाजुला खुर्चीवर बसून एकमेकांशी गप्पा मारत होते.
अंजली : प्रेम... किती छान सरप्राइज दिलं तु आज... मी विचार पण केला नव्हता. तु असं काहीतरी करशील. 😊
प्रेम : अच्छा... मला पण छान सरप्राइज दिले तु...😊 नक्की कोणाचा प्लॅन होता हा...,? तुला माहित होते ना सर्व...?
अंजली : अरे नाही माहीत मला... खरच.😊
प्रेम : खरच का...🤔
अंजली : हो.. रे.. मला फक्त लीना बोलली तुला राधा बनायचं आहे. पण तु कृष्ण बनणार आहेस ते मला खरच माहित नव्हते.😊
प्रेम : अच्छा... म्हणजे महेश आणि लिनाचा प्लॅन होता हा... म्हणुन त्यांनी आपल्याला काही सांगितले नाही आधी....😊
अंजली : हो.. ना.. दोघांनाही सरप्राइज दिले. 😊 पण मनापासून खुप छान वाटलं. 😊
प्रेम : अच्छा... मी पण लाईफ मधे पहिल्यांदा असं काहीतरी केलं आहे. 😊
अंजली : पण खरच खुप छान कृष्ण दिसतोय तु... 😊 आणि खुप छान नाचायला येत असताना पण बोलत होता, मला नाचता येत नाही म्हणून....ना..🤨
प्रेम : अरे... ते थोडंसं बघुन बघुन शिकलो तेवढं. तुझ्यासारख तर कधीच नाही जमणार.
तु खुप मस्त नाचतेस. 😊

* ते दोघे बोलत असतात तेवढ्यात, फॅन्सी ड्रेसच्या स्पर्धेच्या निकालाची घोषणा होते. 
इतर सर्व बक्षीस देऊन झालेली असतात आणि माईक वरती पुकारले जाते....
आणि प्रथम पारितोषिक जात आहे........ राधा कृष्ण या जोडीला म्हणजेच अंजली आणि प्रेम यांना....🎊 ते ऐकुन प्रेम आणि अंजली दोघेही ऊठुन उभे राहतात. आणि बक्षीस घेण्यासाठी स्टेजकडे जातात. 
सर्व लोक टाळ्या वाजवत असतात. 
दोघांना मिळुन एक छान अशी ट्रॉफी आणि एक बंद पाकीट दिले जाते. 
सर्वांचे आभार मानून दोघे खाली येतात. आणि ड्रेस चेंज करण्यासाठी जातात.
थोड्या वेळाने दोघेही बाहेर येतात. सर्व लोक निघुन गेलेले असतात. काही ठराविक लोक आणि तिथे राहणारी मुलं मुली तिथे असतात.
महेश आणि लीना पण तिथे असतात. दोघांना मिळुन एक ट्रॉफी मिळालेली असते. पण यात लीना आणि महेश यांचाही मोलाचा सहभाग होता. तेवढ्यात अंजलीची मॉम तिथे येते. तिला जवळ घेऊन तिचे कौतुक करते. सोबत प्रेम चे सुध्दा अभिनंदन करते. 
सर्वामध्ये खुप विचार विनिमय होऊन, अखेरीस ट्रॉफी अंजली ला, आणि बंद पाकीट प्रेम ला... असा निर्णय होतो. 
अंजली ची मॉम महेशला बोलतात, तुमचं आवरलं की हिला घरी सोड . असे बोलून तिथून घरी निघुन जातात. 
मधेच अंजली ऊठुन स्टेज कडे जाते. तिथे फोटोग्राफर असतो त्याला काहीतरी बोलुन ती परत येते. 
पुन्हा यांच्या गप्पा चालु होतात. सर्वजण एकमेकांशी बोलत असतात. अंजली प्रेमला इशारा करून एका साइड ला बोलावते. आणि त्याच्याशी बोलते.
अंजली : अभिनंदन.... खुप छान दिसत होतास आज...😊👍🏻
प्रेम : तुझंही अभिनंदन, आणि राधा पण खुप सुंदर दिसत होती आज....👌🏻😊
अंजली : मग आता कधी भेटणार यानंतर आपण...?
प्रेम : माहीत नाही...🤔
अंजली : असं कसं बोलतोय तु...? 😔
प्रेम : पण आता उद्यापासून तर आपण भेटणारच नाही. 🤔
*ते ऐकुन तिचा चेहराच पडला. ते पाहून प्रेमला पण वाईट वाटत होते. त्यावर ती बोलली.
अंजली : म्हणजे तु खरच उद्यापासून नाही भेटणार ? 😔
प्रेम : नाही....आता डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटू. 😊
*तसा तिचा चेहरा अजुनच पडला. 😔
अंजली : पण तु तर जवळच राहतो ना ? मग का नाही भेटू शकत ? " 😔
प्रेम : अरे पण कसे काय भेटणार ? 🤔
अंजली : कसे काय म्हणजे ?
प्रेम : अरे... भेटायला काही कारण तर हवे ना ? 🤔
अंजली : मैत्री मधे भेटायला कारण लागते का ? 🤔
प्रेम : अरे... तसे नाही पण...😊
अंजली : मग कसे...? 🤔
प्रेम : अगं... कसे समजावू तुला आता...?
अंजली : ते मला माहित नाही. तु मला भेटायला आलाच पाहिजेस.😔
प्रेम : कसं शक्य आहे ते...?🤔
अंजली : का शक्य नाही...?🤔
प्रेम : अरे यार...( मनात; काय मुलगी आहे...किती हट्ट करते.)🤦
अंजली : एक काम करशील ?
प्रेम : काय ? 🤔
अंजली : मी संध्याकाळी ट्युशन ला जाते. सहा ते आठ. मग तु आठ वाजता बस स्टॉप जवळ भेट...चालेल...? 😊
प्रेम : अरे पण का भेटायचं आपण...? 🤔
अंजली : का म्हणजे फ्रेंड्स आहोत ना ? 🤨 आपण... तुला नाही भेटायचं का...? मग राहुदे नको येऊ मग. जा...बाय..मी जाते. 😠
प्रेम : अरे... काय लगेच राग येतो ग तुला...? 🤦
अंजली : हो... येतो मला राग.😠
प्रेम : बरं... ठिक आहे. मी येईन भेटायला. पण रोज नाही जमणार. कधीतरी येईन असच ओके...😊
अंजली : ( खुश होऊन ) खरच येशील...? 😊
प्रेम : हो... नक्की येईन..ओके...आता खुश ना...? 😊
अंजली : हो.....☺️ थॅन्क्स...👍🏻
प्रेम : बरं चल मी निघतो सर्व निघालेत.
अंजली : हा...पण उद्या येणार आहेस ना...? देवीचे विसर्जन आहे ना. आणि दसरा आहे ना उद्या...☺️
प्रेम : येईन पण... उद्या सोनं देशील ना...? 🍁
अंजली : तु ये तरी...तुला हवे तेवढं देईन.😊
प्रेम : बरं ओके ... बाय मी निघतो. ✋🏻
अंजली : हा बाय....नीट जा. ✋🏻
*असे बोलुन ती छानशी हसली आणि महेश सोबत तिथून घरी निघुन गेली. जाता जाता दोन तीन वेळा तिने हसत हसत मागे पाहिलं. 😊

घरी आल्यावर पुन्हा रात्री झोपताना तिचाच विचार प्रेम च्या डोक्यात घुटमळत होता. त्याचे एक मन स्वतःलाच प्रश्न विचारायला लागले होते.
" प्रेम....गेल्या काही दिवसंपासून जे काही चालले आहे ते फक्त मैत्री म्हणुनच आहे ना ?" तर दुसरे मन त्याचीच समजुत काढत होते. " ही फक्त मैत्रीच आहे, एवढ्या लहान मुलीबाबत असा विचार मनात कसा येऊ शकतो माझ्या...शक्यच नाही ते." 
खुप वेळ असेच मनांचे खेळ असेच चालु होते. त्यांच्या भांडणामुळे प्रेमला झोप येत नव्हती. शेवटी त्याने ठरवले. 
उद्या दसरा आहे. गेल्यावर ती भेटेल, तेव्हा तिला सांगुन टाकू की यानंतर मी तुला नाही भेटू शकत. अशी मनाची समजुत काढून तो झोपुन गेला. 
****************************

आज दसरा होता, प्रेमला आज सुट्टी होती. त्यामुळे तो जरा उशीराच उठला. दुपारी त्याच्या मित्रासोबत मार्केट मधे जाऊन कपड्यांची शॉपिंग करून आला. 
संध्याकाळी नवीन कपडे घालून देवीच्या विसर्जनासाठी तो आणि त्याचे मित्र बेंजो चे सामान घेऊन निघाले. 
इकडे विसर्जनाची सर्व तयारी झाली होती. आल्यावर त्याने पाहिलं की अंजली सुध्दा तिथेच काहीतरी आवरत होती. आज तिने लाल कलर चा ड्रेस घातला होता. डोक्याला चुनरी बांधली होती. प्रेम आणि त्याचे मित्र तिथे आल्याचे पाहताच ती त्याच्याजवळ आली आणि प्रेमला हाय...करून म्हणाली...
अंजली : कधीपासून वाट पाहतेय, एवढा उशीर का झाला तुम्हाला ? 🤔
प्रेम : अरे.... उशीर कुठे झालाय... वेळेतच तर आलोय, आता फक्त सहा वाजलेत. 😊
अंजली : अच्छा.... बरं ठिक आहे. 👍🏻
प्रेम : ☺️.... (तिच्याकडे पहात)
अंजली : हसतोय का असा माझ्याकडे पाहून, मी काय जोकर दिसतेय का...? 🤨
* प्रेम पुन्हा हसायला लागतो आणि बोलतो.
प्रेम : अरे... तसे काही नाही. मी असाच हसत होतो. 😊
अंजली : असच कोण का बरं हसेल वेड्यासारखे....☺️
प्रेम : म्हणजे तुला काय म्हणायचे आहे, मी वेडा आहे का...? 🤔
अंजली : मी कुठे अशी बोलले, 😊
प्रेम : पण तुझ्या बोलण्याचा अर्थ तोच आहे ना...? 🤔
अंजली : 😃😃😃 (मोठ्याने हसते)
प्रेम : अरे.... आता काय झाले. एवढं हसायला. 🤨
अंजली : काही नाही मी पण अशीच हसले. 😊
प्रेम : म्हणजे तु पण ...., वेडी 😊😊😊
अंजली : हा.... दोघेपण...😃☺️😃
* असे बोलत दोघेही हसायला लागतात.
देवीच्या विसर्जनाची मिरवणूक चालू होते.
प्रेम वाजवायला जातो. अंजली तिच्या मैत्रिणीसोबत नाचत असते. मधेच त्यांची नजरानजर होत असे तेव्हा दोघेही एकमेकांकडे पाहून हसत असतात. 😊😊

मिरवणुक खुप वेळ चालु होती, रात्रीचे अकरा वाजत आले होते. खुप लोकं मिरवणुकीत नाचत होते. त्या गर्दीमध्ये ती कुठे दिसेनाशी झाली होती. खुप वेळ झाला ती दिसली नाही म्हणुन प्रेम पुढे येऊन तिला शोधु लागला. पण ती कुठेच दिसत नव्हती. 
आता मात्र प्रेमची बेचैनी वाढली होती. तेवढ्यात त्याला तिची मैत्रीण मेघा नाचताना दिसली. जिच्यासोबत ती नेहमी असायची. त्याने तिला इशारा करूनच बाहेर बोलावले. बँजो चा आवाज खूप होता त्यामुळे काही ऐकायला जात नव्हते. ती बाहेर आली तसं त्याने तिला विचारले अंजली कुठे आहे...? 
ती म्हणाली खुप उशीर झालाय ना म्हणुन तिचे पप्पा तिला घरी घेऊन गेले. 
ते ऐकुन प्रेमचा चेहराच पडला... आज त्याला तिला काहीतरी सांगायचे होते. पण ती घरी निघुन गेली होती. 
देवीचे विसर्जन आटपून प्रेम घरी आला. आज तो खुप थकला होता. रात्रीचे २ वाजले होते तरी त्याला झोप येत नव्हती. 

 आज अंजलिशी जे बोलायचं होतं ते बोलू शकला नव्हता. आता तिला जर भेटायचं म्हटलं तर पुन्हा तिकडे जावे लागणार. पण जायचं का नाही...? 
हा विचार करतच तो रात्री उशिरा झोपुन गेला. 

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️