Mistakes are ours, blame others? in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | चुका आपल्याच, दोष दुसऱ्याला?

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

चुका आपल्याच, दोष दुसऱ्याला?

चुका आपल्याच ; दोष दुसर्‍याला?

पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून पदर खोचून पुरुषांइतकंच काम करु लागलेल्या आहेत. काही ठिकाणी तर त्या कितीतरी जास्त प्रमाणात काम करीत आहेत. तशाच त्या विकासाच्या क्षेत्रातही आघाडीवर गेलेल्या आहेत. त्यातच त्यांच्या सवयी आणि वागणंही बदललेलं आहे. ज्या सवयी आणि वागण्यातून इतरांना नक्कीच त्रास होवू शकतो. तो त्रास पुरुषांनाच नाही तर इतर कितीतरी स्रियांनाही होवू शकतो. असं त्यांचं वागणं आहे.
वागणं बदललं आहे? सवयी बदलल्या आहेत? असं त्यांचं वागणं आहे? यावरुन काय समजायचं? वागणं याचा अर्थ त्यांचा पेहराव. त्यांचा पेहराव हा संस्कृतीला धरुन नाही. पेहरावाच्या दृष्टीनं विचार केल्यास कालच्या स्रिया बरोबर भांगात कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, कपाळाला कुंकवाचा टिळा व डोक्याला लुगड्याचा पदर असायचा. त्या स्रिया कोणाकडेही वाकडी नजर करुन पाहायच्या नाहीत. त्यांचं तसं वागणं पाहून चालणारा इतर कोणताही पादचारी त्या महिलेकडे नजर रोखून पाहात नसे. शिवाय कोणी पाहिल्यास त्याला अशी शिक्षा देत असे की तो पुन्हा इतर कोणत्याही स्रियांकडे पाहणार नाही. कदाचीत त्याच मंगळसूत्रातून वा त्या कपाळावरील कुंकवातून तिची सौजन्यशिलता अगदी हुबेहुब उमटून दिसायची. ती संस्कारी वाटायची व तिचा पतीही चांगला असेल. तो आपल्याला मारेल, पिटेल अशी भावना इतरांमध्ये असायची. मात्र आज काळ बदलला व आज त्याच डोक्यावरील भांगातील कुंकवानं आपलं स्थान हद्दपार केलं. कपाळावरील कुंकू अदृश्य झाला. शिवाय आजच्या काळात गळ्यात मंगळसूत्रही दिसत नाही. साऱ्याच महिला विना विवाहाच्या दिसतात. शिवाय कपडेही कमी असतात. हे सर्व पाहिलं की साऱ्याच पुरुषांची नजर, मग तो कितीही चांगला असला तरी त्यांच्याकडेच जाते. अशातच जी महिला अशी वागते. तिला असले पुरुष मंडळी सोडतात व जी चांगली असते. तिलाच धरतात की ज्यातून इतर महिलांचं नुकसान होत असतं. मग त्याला प्रशासकीय दोष वा पुरुषांना दोषी धरलं जातं. आपला दोष लपवला जातो. उदाहरण द्यायचं झाल्यास मोनिका किरणापुरे या नागपूरच्या मरण पावलेल्या तरुणीचं देता येईल. बिचारीला विनाकारणच अशा इतर महिलेच्या वागण्यातून मरण पत्करावं लागलं होतं.
आजच्या काळात अगदी लहान लहान मुलींना त्या विद्यार्थी दशेत असतांना आपण मायबाप अगदी कमी कपड्यात ठेवतो. त्यांच्या वेण्या घालायला त्रास होतो म्हणून त्यांच्या केसाची केससज्जा कमी ठेवतो. त्यांना विनाकारण लिपस्टीक लावायची सवय लावतो व त्यांच्या ओठाचं सौंदर्य हिरावून घेतो. त्यांना लहानपणापासूनच पुर्ण मेकअपनं ठेवतो. डोक्यावर टिकलीची सवय आपण लावत नाहीत. शिवाय त्यांचे शिक्षकही कमी कपड्यात त्यांना वावरायला लावतात. सलवारवरील ओढणी सवारलेली नसेल तर ती शिक्षकांना दिसत नाही. ती सवारायला ते सांगत नाहीत. ते त्यांना संस्कार शिकवीत नाहीत. ते डोक्यावर टिकली लावायला सांगत नाहीत. अन् जे शिक्षक सांगतात. त्यांना दोष दिला जातो की संबंधीत शिक्षक स्री स्वातंत्र्यावर बाधा आणत आहे. अगदी बारीक नजर ठेवतात माझ्या मुलीवर ते शिक्षक. त्यांना काय गरज आहे. त्यामुळंच शिक्षक कशाला टोकतील त्यांना. कदाचीत अशा मुलींना कमीजास्त जर झालंच तर अशा शिक्षकांचे काय घोडे मरतील. अन् जे शिक्षक असे सांगतात आपल्या विद्यार्थ्यांना, ते शिक्षक त्या विद्यार्थ्यांना आपली स्वतःचीच मुलं समजतात. त्यांनाही वाटते की हीदेखील आपलीच मुलं आहेत आणि ही वाया जावू नये. यासाठीच टोकणं असतं. परंतु त्यावर काही लोकांचं जे मत असतं, ते मत अशा शिक्षकांच्या भुमिकेला शोभणारं नसत. त्यामुळंच जरी शिक्षकांना वाईट जरी त्यांच्या विद्यार्थ्यात दिसलं तरी ते टोकत नाहीत. घरीही त्या मुलींना जर तिचे वडील टोकत असतील तर आई ओरडते की मुलीनं आपल्या घरी तोकडे कपडे घालू नये तर कोठे घालावे? त्यावर वडीलांना चूप राहावं लागतं. ज्याचे पुढील काळात दुरगामी व गंभीर परिणाम आपल्याला पाहावयास मिळतात. त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते.
एकंदरीत सांगायचं झाल्यास बदलाव व्हावाच. कारण काळ बदलत आहे. अशा बदलत्या काळानुसार आपल्यातही बदल हवाच. तो व्हायलाच हवा. परंतु असाही बदलाव नको की जो बदलाव आपलाच जीव घेईल वा आपल्यामुळं आपल्याचसारख्या इतरही आया बहिणींचा व मुलींचा जीव जाईल मोनिका किरणापुरेसारखा. आज अशाच बदलावानं कित्येक महिलांवर ॲसिड फवारणी झाली व कित्येक महिलांचा चेहरा विद्रूप केल्या गेला. कित्येक महिलांना चाकूनं भोपून यमसदनी धाडल्या गेलं. कित्येक महिलांवर बलात्कार केले गेले. कित्येक महिलांचे अपहरण झाले. ज्याचा दोष आम्ही प्रशासनाला दिला. ज्याचा दोष आम्ही पुरुषी मानसिकतेला दिला. ओरडलो की आम्ही स्वतःत बदलाव करु नये काय? स्वतःत बदलाव करुन वागू नये काय? यात द्वेषभावना का असावी? परंतु स्रियांमधील हा बदलाव पाहून त्यानं ज्या पुरुषांची मानसिकता बदलत असेल, तर त्या बदलणार्‍या विकृत मानसिकतेच्या लोकांना कोण सांगेल. कोण सांगेल की त्यानं तसं करु नये. असं करु नये. महत्वपुर्ण बाब ही की आपण दुसर्‍याला दोष देण्यापेक्षा स्वतःच सुधारलेलं बरं. जेणेकरुन आपल्यावर कोणीही ताशेरे ओढणार नाही. कोणीही आपल्याकडं वाकडी नजर टाकणार नाही. कारण सगळीच मंडळी ही चांगल्या मानसिकतेची नसतात. काही विकृतही मानसिकतेची असतात. अशाच लोकांपासून आपलं गंभीर नुकसान होत असतं. त्यामुळंच अशा लोकांपासून आपण सावधान राहिलेलं बरं. तसंच आपण इतरांनाही सावधान ठेवलेलं बरं. हे तेवढंच खरं. विशेष म्हणजे आपणही सुरक्षीत राहावं व इतरांनाही सुरक्षीत ठेवावं. तसंच आपलं वागणं असावं व सवयही असावी. जेणेकरुन आपणही सुरक्षीत राहू आणि इतरांनाही सुरक्षीत ठेवू शकू यात शंका नाही. महत्वाचं म्हणजे चुका आपल्या असल्यानं त्याचा दोष दुसर्‍यांना देवू नये म्हणजे झालं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०