Praktan - 6 in Marathi Motivational Stories by अबोली डोंगरे. books and stories PDF | प्राक्तन - भाग 6

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

प्राक्तन - भाग 6

प्राक्तन -६


" डॉक्टर काय झालंय यशला...? आता बरा आहे ना तो.." डॉक्टर यशला चेक करून बाहेर पडताच अनिशाने त्यांना विचारलं.

" हो आता बरे आहेत ते काळजीचं कारण नाही. पण तुम्ही कोण त्यांच्या मिसेस का?" डॉक्टरांनी तिच्याकडे बघत स्वाभाविकपणे विचारलं.

" अं नाही मी त्याची मैत्रिण... त्याला चक्कर आली सकाळी मॉर्निंग वॉक वेळी धावताना म्हणून लगेच घेऊन आले.. " ती कशीबशी थाप मारत म्हणाली. आणि सुदैवाने डॉक्टरांनाही ते पटलं.

" अच्छा. पण लो बीपी आणि त्यात काहीही खाल्लं नसावं त्यामुळे अशक्तपणा आलाय. म्हणून हा त्रास उद्भवला. मी काही गोळ्या औषधे देतो ती आणून द्या त्यांना. आणि दुपारपर्यंत डिस्चार्ज मिळेल. " डॉक्टरांनी सांगितलं तसं हुश्श झालं तिला...

लगेचच ती औषधे आणायला तिथल्याच मेडिकलमध्ये गेली. पण तेव्हा तिला आठवलं तिने पर्स आणलीच नव्हती. तरी मोबाईल होता ते बघून तिचा जीव भांड्यात पडला. आणि फोन पे वरून तिने औषधे, शहाळ आणि बिस्कीटे घेऊन यशजवळ गेली. तेव्हा तो उठून बसलेला...

" तू अजून इथेच ?" तिच्याकडे बघत त्याने प्रश्न केला. पण तिने याकडे सरळ दुर्लक्ष केलं आणि ते शहाळ त्याच्यासमोर धरलं. त्याला कळत नव्हतं त्याचं असं काय चुकलंय की ती डायरेक्ट इग्नोर मारतेय ते...

" डॉक्टर साहेब विचार करू नका. पटकन हे सगळं खाऊन औषधे घ्या. काल दिवसभर काही खाल्लं नव्हतं त्याचाच परिणाम म्हणून आपण इथे पोहोचलात..." ती जराशी नाराज होत म्हणाली. तेव्हा कुठे त्याच्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली.

" अरेच्चा अनिशा आय अॅम सॉरी. काल कामात मला जेवायला वेळच मिळाला नाही. आणि माझ्यामुळे तुला इथे यावं लागलं त्यासाठीही... आणि थॅन्क्यु सो मच." तो अपराधीपणाने म्हणाला.

" नाही यश माझ्या जागी दुसरं कुणीही असतं त्यानेही हेच केलं असतं. थॅन्क्यु वगैरे नको म्हणू मी माझं कर्तव्य पार पाडलं मैत्रीचं.. और दोस्ती में नो सॉरी नो थॅन्क्यु " ती त्याला धीर देत म्हणाली. तसं त्यालाही बरं वाटलं.

अनिशा त्याला डिस्चार्ज मिळेपर्यंत त्याच्यासोबतच होती. खरं तर तो टॅक्सीने जाणार होता पण तिने ऐकलं नसतं आणि ती त्याला त्याच्या घरी सोडायला गेली असती. म्हणून त्याने ड्रायव्हरला कार घेऊन यायला सांगितलेलं. तो त्याच्या घरी एकटा असतो म्हणून तिने त्याचा नंबर घेतलेला तो वेळेवर जेवण आणि औषध घेतो की नाही ते बघण्यासाठी... आणि तो गेल्यावर ती घरी जायला निघाली. आज ऑफिसला रजा घेतलेली तिने. आणि अमेयला सकाळी फोन करूनही सांगितलेलं तिने त्यामुळे त्याने बाहेरून ब्रेक फास्ट मागवलेला...

अनिशा घरी आली तेव्हा अमेयने दार उघडलं. आज वीकेंड शनिवार असल्याने त्याला तशी सुट्टीच होती. पण सकाळच्या क्लासला मात्र त्याने दांडी मारलेली.

" अमेय तू आज क्लासला नाही गेलास?" तिने बसताच त्याला विचारलं.

" नाही. तू नव्हतीस तर मला तुझी काळजी वाटत होती मग तिथे लक्ष नसतं लागलं माझं म्हणून घरीच थांबलो. आणि हो आई तू आता स्वयंपाक वगैरे करत बसू नको. मी जेवण पण बाहेरून मागवलंय. " अमेय म्हणाला. खरं तर ती रागवेल असं वाटत होतं म्हणून त्याने एवढं बोलून डोळे घट्ट मिटून घेतले. तिला मात्र माया वाटली त्याची... आणि तिने त्याला तिच्या शेजारी बसवत त्याला कवटाळलं. इवलंसं होतं तिचं पाडस आज किती समजूतदार आणि मॅच्यूअरली वागतंय हे बघून तिला भरून आलं.

" बाबा तुझ्याबद्दल विचारत होते तू इतक्या सकाळी कुठे गेलेलीस ते... मी सांगितलं मग की ती मॉर्निंग वॉकला गेलीय आणि तिथेच तिला तिची मैत्रीण भेटली मग ती तिच्या घरी गेली. " अमेय जीभ चावत म्हणाला. आणि तिला हसू आलं. पण ते आवरलं तिने लगेच..

" उशीर होईल एवढंच सांगितलंय आईने किंवा माहित नाही म्हटलं असतं तरी चाललं असतं. खोटं नाही बोलायचं राजा परत असं..." त्याचे केस बोटांनी हलकेच विस्कटत ती प्रेमाने समजावत म्हणाली.

" सॉरी आई पण खोटं नाही काही, छोटीशी थाप मारली फक्त... जसं ते आपल्याला इग्नोर करताना थाप मारतात ना तसं. " तो सहजपणे म्हणाला. पण यावरून अनिशाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.
कारण मयुरेशची उणीव किंवा त्याच्याबद्दलचा तिढा अमेयच्या मनात निर्माण होऊ नये याची तिने आजपर्यंत खूप बारकाईने काळजी घेत आलेली... पण मुलांपासून कोणती गोष्ट फार काळ लपवून ठेवण्यात यश येत नाही, याचा प्रत्यय तिला आज येत होता. तेवढ्यात एक वेगळीच भीती तिच्या मनात चमकून गेली. मयुरेशच्या त्या गोष्टींचा सुगावा अमेयला लागणार नाही ना... अमेय हुशार, अभ्यासू आणि तितकाच समंजस होता. एकुलता एक असला तरी त्याने कधीही या गोष्टीचा त्याच्यावर दुष्परिणाम होऊ दिलेला नव्हता. याला कारण अनिशाचे त्याच्यावर असलेले उत्तम संस्कार आणि मयुरेशकडून जन्मतः त्याला मिळालेली दूरदृष्टी... मयुरेश पण सेम असाच तर होता, पण वाईट गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत. मग भविष्यात अमेयने पण हीच चुक केली तर शेवटी मेल विल बी मेन... नाही नाही मी अमेयला तीच चुक करू देणार नाही. तिच्याच अंतर्मनातील दोन विविध बाजू ऐकून ती भांबावलेली...

" आई काय झालं? बरं वाटत नाहीये का तुला? डॉक्टर कडे जाऊया का आपण..." ती कसल्याशा भयानक विचाराने डिस्टर्ब झालीय ते बघून तो काळजीने विचारत होता.

" अमेय.... तू... म्हणजे मी तुला सांगितलेली उत्तम पुरूषाची लक्षणे ती तू कधीच विसरणार नाही ना. तू त्यानुसारच वागशील ना नेहमी..." ती जराशी धायकुतीला येऊन विचारत होती. अमेयने तिला होकार दर्शवला.
तिने त्याला लहानपणापासून शिवाजीराजे, शंभूराजे यांच्यासारखा उत्तम पुरुष बनण्याचे धडे दिलेले... कारण मुलगा असला की पालक त्याकडे इतकं लक्ष देत नाहीत, किंवा मुलींइतकी बंधने नसतात त्यामुळे साहजिकच मुलं वाममार्गाला लागतात हे ती नेहमी पाहत किंवा ऐकत आलेली...

" आई तू फ्रेश होऊन ये, आपण जेवायला बसू. मग त्यानंतर तू आराम कर मग थकवा निघून जाईल तुझा... " अमेय तिला समजावत म्हणाला. तसं ती एकदा अपार मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आत गेली.

क्रमशः
©️®️ अबोली डोंगरे.