Praktan - 3 in Marathi Motivational Stories by अबोली डोंगरे. books and stories PDF | प्राक्तन - भाग 3

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

प्राक्तन - भाग 3

प्राक्तन -३

अनिशा सहा वाजता सकाळी घरी आली ती मोकळ्या आणि हलक्या मनाने... सकाळचं कोवळं ऊन स्पर्श करून जात होतं. फ्रेश वाटत होतं तिला आता. मन स्थिर असलं की कसलेच विचार आजूबाजूला फिरकत नाहीत याचा पुरेपूर अनुभव तिला येत होता. मनावरचं खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. तिच्या वागण्यातील या बदलामुळे मात्र मयुरेश विचारात पडायचा. पण तिला आता या गोष्टी खूप क्षुल्लक वाटायला लागलेल्या... ती त्याला वेळेनुसार मोजकंच बोलून इग्नोर करत होती. जे तो मागची अडीच वर्षे तिच्यासोबत करत आलेला...

मयुरेश आता रात्री रोजच्यापेक्षा लवकर घरी येऊ लागलेला... तिचं आणि अमेयचं अटेन्शन मिळावं म्हणून धडपडत होता. पण तिला या गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता. ती दगडाची बनलेली आता... खरंच तर इतके दिवस ती ज्यासाठी झटत होती तेव्हा समोरच्याला याची कदर नव्हती, मग आता का तिने पाघळायचं म्हणून आता ती तिच्या विचारावर ठाम होती.

दुसरीकडे यश आणि अनिशाची भेट दर आठवड्याला तिथेच त्याजागी होत होती. न जाणो त्याच्याशी बोलल्यावर एक वेगळीच ऊर्जा तिच्यात संचारत होती. यशनेही कधीच तिला इनसेक्युअर वाटेल असं बिहेव्ह केलं नव्हतं. तिला आता त्याच्याप्रति आपलेपणा जास्त वाटू लागला होता. त्याचा विचार मनात आल्याशिवाय ना दिवस उगवत नव्हता, ना सरत होता. पण तिला आठवलं, तिला त्याच्या बद्दल, त्याच्या फॅमिली बद्दल काहीच कसं माहित नाही. तिला आता त्याच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा होत होती. पण मन मात्र जरासं कचरत होतं. मी चाळिशीकडे झुकलेली, संसाराच्या मधोमध असलेली.. मला हे सगळं वागणं रूचतं का? नवर्याला सर्वस्व मानून जगत आलेली मी, मला यशची मैत्री इतकी हवीहवीशी का वाटतेय? का माझं मन सदैव त्याच्याकडे ओढलं जातंय? मला जे त्याच्याबद्दल वाटतंय, तेच त्यालाही माझ्याबद्दल वाटत असेल का? हे आणि यासारखे असंख्य प्रश्न तिच्याभोवती आता घुमू लागलेले... एक मन सांगत होतं की आतातरी तू फक्त स्वत: साठी जग, आता पून्हा कोणत्या पाशात अडकलीस तर याहून भयंकर भविष्य असेल. आणि दुसरं मन सांगत होतं शेवटी कसाही असला तरी तुझाच नवरा आहे जो तूच निवडलाय.. त्याला एक संधी द्यायला काय हरकत आहे. हे डोक्यातले विचार आता तिला असह्य झाले होते. त्यामुळे तिने निश्चय केला की याबद्दल यशला बोलायचंच.. आणि तो कोण काय करतो हेही विचारायचं. ती दोनच दिवसांपूर्वी त्याला भेटलेली. पण आज मनातलं वादळ काही स्थिर बसू देत नव्हतं. यावर सजेशन फक्त यशच देऊ शकेल म्हणून ती पहाट होताच तिकडे जायला निघाली.

अनिशा तिथे येऊन पोहोचली तेव्हा यश आधीच तिथे येऊन बसलेला... तिने त्याला ती आल्याची चाहूल न लागू देता हळूच बाजूला उभारून त्याचं निरीक्षण करू लागली. तो एकटक त्या पुलाकडे पाहत होता. डोळ्यात आसवांनी गर्दी केलेली... जितका शांत त्याहुन जास्त तो गंभीर वाटत होता आज.. इतकं बारकाईने तिने गेल्या दोन महिन्यांत त्याला कधी पाहिलंच नव्हतं. बारीक डोळे, छोटंसंच पण टोकदार नाक, नितळ चंदेरी वर्ण, कुरळे उभट काळे नि भोरे केस; कदाचित रंगवले असतील. असा त्याचा टोटल ऑरा होता. पण आज तो फार खिन्न वाटत होता. कसल्याशा जुन्या खोल दुःखात बुडाल्यासारखा... तिला आता प्रश्न पडला होता नवीनच, आज काहीही झालं तरी त्याला हे सगळं विचारायचंच होतं तिला.. जसं तिने त्याच्यासमोर तिचं दुःख रितं केलेलं, त्याच ऋणातून आज तिला त्याच्या दुःखाचा वाटेकरी बनायचं होतं.

थोडा वेळ त्याचं निरीक्षण करून ती इतका मागे उभारलेली थेट त्याच्या समोर येऊन उभी राहिली. तिच्या अचानक समोर येण्याने तो जरासा दचकला. आणि तिला बघून त्याने नेहमीप्रमाणे हसण्याचा प्रयत्न केला. हे तिला लगेच कळालं.

" काय झालं? इतका का दचकलास?" तिने विचारलं.

" काही नाही तू असं अचानक समोर आली सो.. पण बाय द वे, तू आज कशी काय आली? म्हणजे परवाच तर भेटलो ना आपण इथे.. मग सारखं सारखं तू तुझी झोप मोडून का घेतेस..." तो जरासा स्थिरस्थावर होत म्हणाला.

" असंच आले येऊ वाटलं म्हणून... आणि तुला आवडलं नाही का मी सारखं इथे आलेलं किंवा तुला आता डिस्टर्ब केलं का मी.. तसं असेल तर सॉरी. " ती विनयतेने म्हणाली.

" असं काही नाहीये. पण झोप झाली नाही तर अॅसिडिटी होते, त्यामुळे झोप खूप गरजेची आहे आरोग्यासाठी. म्हणून सांगतोय मी." तो तिला समजावत म्हणाला.

" अच्छा मग तुला नाही का गरज झोपेची? तू तर रोजच इथे येतोस ना..."

" हो जेवढी गरज आहे तेवढी झोप घेतोच मी आणि मगच इथे येतो. कारण यावेळी कितीही झोपायचा प्रयत्न केला तरी झोपच येत नाही. मग येतो पाय मोकळे करायला..." त्याने हलकेच हसत उत्तर दिलं. पण का कुणास ठाऊक तिला ते त्याचं हसणं बनावट वाटलं. कारण त्या हास्यामागे खूप मोठं काहीतरी साचलेलं आहे हे तिला कळत होतं.

" ओके. पण यश तुझी हरकत नसेल तर मी एक विचारू तुला?" तो लपवत असलेल्या डोळ्यात थेट बघत ती म्हणाली.

" फक्त एकच विचारून तुझं पोट नाही भरणार.. त्यामुळे विचार विचार तुला हवं ते सजेशन विचार. मी नक्की सांगायचा प्रयत्न करेन. " तो नम्रपणे म्हणाला.

" मी आज कोणतंही सजेशन नाही विचारणार तुला... मी तुला... म्हणजे आय मीन मला तुझ्याबद्दल आणि तुझ्या ऑक्यूपेशनल स्टेटसबद्दल जाणून घ्यायचंय. " ती जरासं कचरत म्हणाली. पण तो मात्र मनमोकळं हसला यावर.. त्याच्या हसण्याने ती जरा भांबावली.

" का नाही. हे बघ मी डॉ. यश गोसावी पेशाने एक फार्मासिस्ट. हा पण पीएचडी करून डॉक्टरेट मिळवलीय बरं का.. माझे मेडिकलचे बिझनेस आहेत. काही वर्ष प्रोफेसर होतो पण आता फक्त बिझनेस सांभाळतो. " त्याने सांगितले.

" मग विचारल्यावर हसलास का ?"

" जे जे खूप आधीच विचारायला हवं होतं ते तू आता विचारतेय म्हणून हसू आलं. नाहीतर मुली खूप संकुचित असतात, कुणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळेच बाकी काही नाही. "

" ओहह असंय होय. पण ते जाऊदे, तू एवढं भारी समुपदेशन करतोस त्यावरून वाटलेलं तू सायकिअॅट्रीस्ट वगैरे आहे की काय.. पण तू तर निघाला फार्मासिस्ट. " ती म्हणाली. तसं ते दोघेही हसले.

क्रमशः

©️®️ अबोली डोंगरे.