Kamini Traval - 24 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | कामीनी ट्रॅव्हल - भाग २४

Featured Books
  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

  • તલાશ 3 - ભાગ 21

     ડિસ્ક્લેમર: આ એક કાલ્પનિક વાર્તા છે. તથા તમામ પાત્રો અને તે...

Categories
Share

कामीनी ट्रॅव्हल - भाग २४

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २४

प्राची हर्षवर्धन टूरवर जायला निघतात. दोघांना सोडायला राधा, शशांक आणि कामीनी बाई जातात. हर्षवर्धन गोंधळलेलाच असतो. सगळ्यांना ते जाणवतं पण कोणीच तसं दर्शवत नाही. दोघं ऊटी म्हैसूर हैद्राबाद फिरुन येणार असतात.

सुरवातीला प्राचीला लक्षात येतं प्रथम हर्षवर्धनची गोंधळलेली अवस्था दूर करावी लागणार तेव्हा तो मनमोकळेपणानी बोलेल. असं बोलणं सुरु झाल्यावर आपोआप त्याच्यातला न्यूनगंड कमी होईल. न्यूनगंड गेला की प्राचीच्या बरोबरच्या पातळीवर आपण आहोत हे हर्षवर्धनला जाणवेल.

दोघांमधलं प्रेम त्याचवेळी फुलायला सुरवात होईल. प्राची त्यांचं क्षणाची वाट बघते आहे. प्राची सगळ्या अंगानी हर्षवर्धनला समर्पित होण्यासाठी तयार आहे.

ते विमानात बसतात. हर्षवर्धनचं चेहरा बावरलेला असतो.त्याने प्राचीकडे बघीतलं तशी प्राची हसली.तिला हसताना बघून हर्षवर्धनने विचारलं,

" काय झालं?का हसलीस?"

"हर्षवर्धन आज मी खूप खूष आहे.कारण लग्नानंतर आज आपण पहिल्यांदा फक्त दोघचं घराबाहेर पडलोय तेही फिरायला. तू खूष आहेस की नाही?"

हर्षवर्धनला काय उत्तर द्यावं कळलं नाही. तो तिच्याकडे नुसताच बघत बसला. त्याचं तसं बघणं बघून मनातून प्राचीला खुप हसायला आलं.

तिच्या लक्षात आलं की पूर्ण प्रवासात आपणच हर्षवर्धनला प्रेम, रोमान्स, नवरा बायको मधील नाजूक नातं या सगळ्यांची ओळख करून द्यायला हवी. हर्षवर्धन या नशेमुळे बौद्धीक दृष्ट्या लहानच राह्यला आहे. त्याचं वय आपणच वाढवायला हवं. आपणच त्याला शिकवायला हवं.

प्राची पूर्ण प्रवास भर आपल्याच स्वप्नात गर्क होती. मध्येच तिनी हर्षवर्धनचा हात हातात घेऊन हलकेच दाबला. तशी हर्षवर्धनच्या मनात थोडी चलबिचल झाली.गांगरून त्याने आपला हात प्राचीच्या हातातून काढून घेतला.प्राचीच्या चेह-यावर हलकं स्मीत आलं. तिनी पुन्हा त्याचा हात पकडला.आता मात्र हर्षवर्धनने आपल्या हातावर तिचा हात तसाच राहू दिला.

प्राचीच्या स्पर्शाने काहीतरी वेगळंच वाटतंय आपल्याला हे हर्षवर्धनच्या लक्षात आलं. पण काय वाटतं हे त्याला कळत नव्हतं. तो नशेतून बाहेर आल्यावर त्याला कळलं प्राची ही आपली बायको आहे. तिच्याप्रती आकर्षण निर्माण व्हायला आत्ता थोडी सुरुवात झाली होती पण ते त्याला प्राचीला सांगता येत नव्हतं.

त्याच्यातला बदल प्राचीला जाणवू लागला होता. ती मनातून उत्साहीत झाली. तिला आता खात्री वाटू लागली की आपल्याला या प्रवासातच हर्षवर्धन नवरा, प्रियकर,मीत्र म्हणून सापडणारं. बरं झालं राधानी प्रवासाचं आपल्याला सुचवलं

प्राची आणि हर्षवर्धन बंगलोर विमानतळावर उतरतात.त्यांचं ज्या हाॅटेलशी टायअप असतो तिथे न उतरता ते दोघं दुस-या हाॅटेलला उतरतात.हाॅटेल छानच असतं. प्राचीच्या शरीरात एक गोड संवेदना झंकारली.रूममध्ये सेट झाल्यावर प्राची कामीनी बाईंना फोन लावला.

"हॅलो. पोचलात नं व्यवस्थित?" कामीनी बाईंनी विचारलं.

" हो. पोचलो व्यवस्थित.आई काही त्रास झाला नाही."

"हर्षवर्धन कसा आहे?" कामीनी बाईंनी थोडं घाबरलेल्या सुरात विचारलं.

"थोडा बावचळला आहे पण तुम्ही काळजी करू नका. मी आहे."

" होग तू आहेस म्हणून तर मला काळजी नाही. तू खूप छान सांभाळशील त्याला. मला खात्री आहे. बरं तुझ्या आई बाबांना केलास का फोन?"

"नाही करते आता. तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. ऑफीसमधे खूप वेळ थांबायची गरज नाही. राधा, शशांक रोज एक चक्कर ऑफीस मधे टाकणार आहेत. बाबापण आहेतच. ठेऊ फोन."

" हो ठेव.तू सांगीतलेलं सगळं लक्षात ठेवीन."कामीनी बाईंनी हसत म्हटलं आणि फोन ठेवला.

प्राचीचं फोन ठेवल्यावर लक्ष गेलं हर्षवर्धन खिडकीतून बाहेर बघत असतो. प्राचीने त्यांच्याजवळ जाऊन विचारलं,

" काय बघतोस एवढं बाहेर?"

हर्षवर्धनची इतकी तंद्री लागलेली असते की त्याला कळलच नाही प्राचीनी आपल्याला काही विचारलं आहे.

प्राची पण त्याची तंद्रीत मोडत नाही. त्याच्याबरोबर त्याच्या कलानीच वागावं लागेल.ती हळूच खिडकीपासून बाजूला होते.आणि रूमसर्विसचा नंबर फिरवून दोघांसाठी चहा बिस्कीटं सांगते.

***
प्राचीशी बोलल्याने कामीनी बाईंना बरं वाटलं. त्या आनंदी चेह-यानी स्वयंपाकघराकडे वळल्या.तेवढ्यात त्यांचा फोन वाजला.फोनवर शंकर ड्रायव्हरचं नाव बघून बिचकल्या कसला अंदाज येईना त्यांना. तरी फोन उचलला.

" हॅलो."

"मॅडम मी शंकर बोलतोय साहेबांना दवाखान्यात ॲडमीट केलंय.म्हणून फोन केला.साहेबांना आयसीयू मधे ठेवलंय." हे ऐकताच कामीनी बाई सोफ्यावर आदळल्यासारख्या बसल्या.

"मॅडम डाॅक्टरांनी घरच्यांना बोलावलंय. तुम्ही या इकडे. मॅडम...मॅडम ऐकताय नं?"

कसंबसं त्या हो म्हणाल्या.त्यांना काही सुचेना काय करावं? हर्षवर्धन आणि प्राची आत्ता तर पोचले.त्यांनी थरथरत्या हातांनी राधाला फोन लावला.आणि सगळं सांगीतलं. राधा म्हणाली,

"काकू काळजी करू नका. शशांक आणि मी दोघंही ऑफीसला आहोत शशांक आणि प्राचीचे बाबा दवाखान्यात जातील. मी तुम्हाला घ्यायला येते. घाबरू नका लगेच निघतेय." राधानी फोन ठेवला.

शशांक आणि प्राचीच्या बाबांना ही बातमी ऐकून धक्का बसला. त्यांनी प्रिया आणि यादववर ऑफीसची जबाबदारी सोपवली. त्यांना ही बातमी प्राचीला सांगायची नाही तिचा फोन आला तरी असं बजावलं. प्रियाला कळेना या बातमीचा प्राची मॅडमशी काय संबंध? भय्यासाहेब प्राची आणि हर्षवर्धनचे कोण आहेत हे अजून ऑफीसमधे कोणाला माहिती नव्हतं.

तिने यादवला विचारलं,
" यादव सर हे भय्यासाहेब कोण आहेत? त्यांचा प्राची मॅडमनी काय संबंध आहे?"

" मलापण माहिती नाही.त्यांनी सांगीतलं आहे तर आपण प्राची मॅडमना ही बातमी नाही सांगू.तुम्ही करा तुमचं काम."

प्रिया आपल्या टएबलकडए गेल्यावर यादवने सुटकेचा निःश्वास सोडला. त्याला वाटलं होतं की प्रियाने खोदून खोदून विचारल्यावर आपण काय सांगायचं याचा त्याला ताण आला होता.पण तसं काही न विचारता प्रिया सरळ निघून गेल्यामुळे यादवने सुटकेचा निःश्वास टाकला.

***

शशांक आणि अशोक दवाखान्यात पोचले. तेवढ्यात राधा कामीनी बाईंना घेऊन दवाखान्यात आली. भय्यासाहेब ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या मिटींगला गेले होते त्याचे अध्यक्ष, सेक्रेटरी भय्यासाहेबांना दवाखान्यात घेऊन आले होते.

भय्यासाहेबांना मासीव्ह हार्टअटॅक आला होता. ऊपचार सुरू झाले होते.अठ्ठेचाळीस तास डाॅक्टर त्यांच्याबद्दल पक्कं काही सांगू शकणार नव्हते.

कामीनी बाईंच्या चेहरा घामानी डवरला होता.कसेही असले तरी त्यांच्यामुळे कामीनी बाईंच्या माहेरी सुखाचा दर्शन झालं होतं. ही गोष्ट त्या विसरू शकत नव्हत्या. अशोक त्यांना म्हणाला

"मी असं म्हणतो की प्राची आणि हर्षवर्धनला कळवावं." कामीनी बाईंना काय सांगावं समजत नव्हतं.

"तुम्ही प्राचीशी बोला. हर्षवर्धनला एकदम सांगू नको असं तिला सांगा. कुठलतरी कारण देऊन अर्ध्या प्रवासातून घरी जावं लागतंय असं सांग म्हणा त्याला. अजून तो पुरता सावरलेला नाही. तिकडे त्याला काही त्रास झाला तर प्राचीला झेपणार नाही."

कामीनी बाई अशोकला म्हणाल्या.

"ठीक आहे .मी सांगतो तसं प्राचीला."

अशोकने प्राचीला फोन करून सांगीतलं.प्राचीला धक्का बसला. बंगलोरमध्ये येऊन जेमतेम काही तासच झालेले असतात. हर्षवर्धनला पटेल असं कारण प्राचीला शोधावं लागणार होतं. ती विचार करत होती.तेवढ्यात हर्षवर्धनने तिला विचारलंच.

" कोणाचा फोन होता? तू कसला विचार करतेय.?"

आपला चेहरा घाबरलेला दिसणार नाही याची काळजी घेत ती म्हणाली.

" ऑफीसला खूप मोठं प्रोजेक्ट मिळतंय.त्यासाठी प्रियानी मिटींग ठरवली आहे कारण जे आपल्याला प्रोजेक्ट देणार आहेत त्यांना घाई आहे. म्हणून मी आताच ऑनलाईन विमानाचं तिकीट बुक करते आहे."

एवढं बोलून प्राचीनी नि:श्वास सोडला. तिनी लगेच तिकिट बुक करायला साईट उघडली.हर्षवर्धनला फारसं कळलं नाही किंवा त्याला तिच्या चेह-यातला सूक्ष्म बदल कळला नाही.

तो तिच्या बाजूला येऊन बसला. प्राची तिकीट बुक करत होती. ते बुक झाल्यावर लगेच तिने विमान तळावर जाण्यासाठी कॅब बुक केली.

प्राची हर्षवर्धनला म्हणाली.

"आपण आजच आलोय आणि लगेच जातोय तर रिसेप्शन काउंटरवर मी सांगून येते आम्ही का जातोय. तू खोलीतच थांब. मी कॅबपण बुक केली आहे. अर्ध्या तासात येईल ती. मी वर आले की सामान घेऊनच खाली डायनिंग हाॅलला जाऊ. थोड खाऊ कॅब आली निघू." यावर हर्षवर्धनने हो म्हणून मान डोलावली.

खाली उतरल्यावर प्राचीने आधी मीनी बाईंना फोन लावला.

"हॅलो."

"आई मी प्राची बोलतेय.आम्ही लगेच निघतोय. विमानाचं तिकीट बुक केलय. तुम्ही अजीबात काळ्जी करू नका आणि धीर सोडू नका. काही होणार नाही भय्यासाहेबांना. ते खूप कणखर आहेत आणि शशांक बाबा राधा आहेत नं तिथे. काही तासांतच आम्ही पोचतो.सरळ दवाखान्यातच येऊ."

" हो.येग लवकर.मी घाबरलेय." कामीनी बाईंनी रडवेल्या आवाजात म्हटलं.

" आई तुम्ही घाबरू नका.राधा आहे नं तुमच्याबरोबर?"

" हो. तुझे बाबा, शशांक आणि शंकरपण आहे."

" तुम्ही शांत रहा. आम्ही येतोय."

प्राचीने फोन ठेवला पण तिच्या मनात कामीनी बाईंचेच विचार होते.

रिसेप्शन काउंटरवर जाऊन प्राची त्यांना लगेच हाॅटेल सोडण्याचं कारण सांगून पैसे देऊन बील चुकतं केलं.

"प्लीज कोणाला तरी पाठवा आमच्या बॅग्ज खाली आणायच्या आहेत. इथेच डायनिंग हाॅलला काहीतरी खाऊ आणि जाऊ."

" ओके मॅम.ऐ सदाण्णा इधर आओ." रिसेप्शन काऊंटर वरील माणसाने आवाज दिला.

कपाळावर आडवं भस्म लावलेल्या मद्रासी अण्णांनी त्यांच्या बॅग्ज खाली आणून दिल्या. दोघांनी डायनिंग हाॅलला थोडं थोडं खाल्लं. तेवढ्यात कॅब आली.कॅबमधे त्यांच मद्रासी माणसाने सामान ठेवले.नंतर कॅब निघाली.

प्राचीच्या डोळ्यासमोर कामीनी बाईंचा चेहरा आला. फोनवर त्या फक्त मी घाबरले म्हणाल्या पण त्याही पलीकडचं म्हणजे शब्दांच्या पलीकडचं खूप काही त्यांचे हुंदके सांगून गेले.

कितीही भय्यासाहेब वाईट,विकृत असले तरी त्यांचे जोडीदार आहेत. इतकी वर्षांचा सहवास आहे. तो वाईट प्रसंगांमुळे तोडल्या गेला नाही. कामीनी बाईंनी तसं होऊ दिलं नाही. मुलाच्या आणि माझ्या प्रेमाखातर त्या आमच्याबरोबर आल्या पण त्यांचं मन तर त्या घराभवती रिंगण घालत असणार.

अठराव्या वर्षी लग्नं होऊन त्या या घरात आल्या. या घराचा सहवास सोडणं त्यांच्यासाठी कठीणच गेलं असेल. केवळ आपल्यासाठी त्या आपल्याबरोबर आल्या. त्यांचं आयुष्य विचीत्र स्वभावाचा नवरा आणि नशेत बुडालेला मुलगा यांच्यात ओढून ताणून वाटल्या गेलं होतं.

प्राचीच्या डोळ्यातून कधी पाणी ओघळू लागलं याचा तिला पत्ता लागला नाही.तिला रडताना बघून हर्षवर्धन गडबडला.

"तू का रडतेस? मी काही वेडंवाकडं बोललो का तुला?"

"अरे...नाही.तू काहीच बोलला नाहीस.काहीतरी जुनं आठवलं आणि डोळ्यातून पाणी आलं.एवढच."

तो नुसता प्राचीकडे बघत राहीला. तशी ती म्हणाली.

"खरच काही झालं नाही. तू काही बोलला नाही मला."

प्राचीनी डोळ्यातलं पाणी पुसलं. तिच्या लक्षात आलं पूर्ण प्रवासात आपण डोळ्यात पाणी आणायचं नाही.तो यासाठी स्वतःला उगीचच दोषी मानेल.

विमान मुंबईच्या विमानतळावर उतरलं. दोघेही आपल्या बॅग्ज पट्ट्यावरून घेऊन कॅबनी सरळ दवाखान्यात पोचले.

***

प्राची जशी दिसली तसा कामीनी बाईंना हुंदका आवरला नाही आणि त्यांनी रडतच प्राचीला मिठी मारली. प्राची त्यांच्या पाठीवरून हळूहळू हात फिरवत होती. हर्षवर्धनला कळेना आपण दवाखान्यात का आलो? आणि आपली आई का रडते आहे. प्राचीनी हळूच अशोकला खूण केली हर्षवर्धनकडे लक्ष द्या म्हणून. मानेनीच हो म्हणून अशोक हर्षवर्धनपाशी गेला आणि काय घडलं आहे ते त्याला सांगीतलं.

हर्षवर्धन गोंधळून गेला.आपल्या वडलांबद्दल ऐकल्यावर खूप तिव्र घाबरल्याची जाणीव त्याला झाली नाही. कारण त्याच्या आठवणीत त्यांच्यावर प्रेम करणारे वडील म्हणून भय्यासाहेब कधीच नव्हते. तसे असते तर कदाचित त्यालाही कामीनी बाईंसारखं दु:ख झालं असतं.

जरावेळानी कामीनी बाई सावरल्या.त्यांचं लक्ष हर्षवर्धन कडे गेलं त्याला त्या म्हणाल्या

" बाळा तुझ्या बाबांना हार्टअटॅक आला आहे. डाॅक्टर काही सध्या सांगत नाहीत. "

हर्षवर्धनचा चेहरा निर्विकार होता.ते बघून कामीनी बाईंना हर्षवर्धनची काळजी वाटली.

प्राची नी त्यांना समजावलं.

"आई काळ्जी करू नका. तुमचं आणि त्याचं भय्यासाहेबांशी असलेलं नातं वेगळं आहे. हर्षवर्धननी तुमचं प्रेम, माया बघीतली आहे. भय्यासाहेब त्याच्या आठवणीत प्रेमळ रुपात कधीच रूजले नाहीत. म्हणून त्याची प्रतिक्रीया अशीच राहणार. घाबरू नका.तो ठीक आहे."

प्राचीने त्यांना थोपटलं.त्यांना घेऊन तिथल्या खुर्चीवर बसवलं.

आता प्राचीची भुमिका होती कामीनी बाईंशी शब्देविणा संवाद साधणे. हर्षवर्धनकडेपण तिचं लक्ष होतं. तो अगदी निर्विकार होता. मधून मधून शशांक, अशोक, राधा आय.सी.यू पाशी जाऊन बघत होते.

डाॅक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना बोलावलंय हा निरोप राधा घेऊन आली.तिला कामीनी बाईंजवळ बसवून प्राची आणि अशोक डाॅक्टरांच्या केबीनमध्ये शिरले.

"बसा " डाॅ.म्हणाले.

" हा पेशंटला आलेला मासीव्ह हार्ट अटॅक होता.चोवीस तास काहीच सा़गू शकत नाही. नंतर काय प्रगती होते. ऊपचाराला कसा प्रतिसाद देतात यावर सगळं अवलंबून आहे."

" डाॅक्टर मी त्यांची सून आहे. का बरं असा अटॅक आला असेल?"

"त्यांचं बीपी एकदम वाढलं. त्यांना त्रास आहे का बीपीचा?"

"हो." प्राचीने उत्तर दिलं.

"आता त्यांच्यावर लक्ष आहे आमचं. कोणीतरी एकजण सध्या थांबा. बाकी घरी गेलेत तरी चालेल."

दोघंही केबीनबाहेर आले.

"बाबा आईला कळवला का?"

" हो मगाशीच. मुद्दाम रात्रीचं येऊ नको म्हटलं."

तेवढ्यात शशांकनी विचारलं,

"प्राची डाॅ. काय म्हणाले?"

प्राचीने डाॅक्टर काय म्हणाले ते सांगीतलं. यावर शशांक म्हणाला

" तुम्ही सगळे घरी जा. मी थांबतो."

शशांक शिवाय बाकी सगळे घरी निघाले. प्राची कामीनी बाईंना डाॅ. काय म्हणाले ते सांगीतल्यावर कामीनी बाईंंची मन: स्थिती कशी असेल?
---------------------------------------------------------------
क्रमशः
लेखिका.. मीनाक्षी वैद्य.