Kamini Traval - 21 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | कामीनी ट्रॅव्हल - भाग २१

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

कामीनी ट्रॅव्हल - भाग २१

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २१

राधाचा फोन कशासाठी आला असेल बघू या भागात.

" हॅलो, बोल राधा.मी आत्ता तुलाच फोन करणार होते."

" कधी जाताय तुम्ही हनिमूनला?"

" प्रियाला प्लॅन करायला सांगते आहे."

" प्राची हनिमूनला जातांना ऑफीसमधले सगळे विचार ऑफीसमध्येच सोडून जायचे. तू जितके दिवस हनिमूनला जाणार आहेस तितके दिवस तुला हर्षवर्धनच्या जवळच राह्यचं आहे."

" हो कळतंय मला. मलाच हर्षवर्धनला आमच्यामधील नात्याची ओळख करून द्यावी लागेल. त्याच्या मनातील माझ्या प्रेमाला हळूवारपणे बाहेर आणावं लागेल. सध्यातरी तो माझ्या बद्दलच्या भावना व्यक्त करायला बिचकतो. ते बिचकणं मला आधी दूर करावं लागेल. राधा खूप हळूवारपणे मला वागावं लागणार आहे."

" तेच म्हणतेय मी. तुझ्या संसाराची गोष्ट वेगळी आहे. इतर बायकांच्या नव-याप्रमाणे तुझा नवरा या गोष्टींमध्ये पुढाकार घेणार नाही. त्याला तुझ्या बद्दल आदरयुक्त भीती आहे. त्याच्या मनात तुझ्या विषयी आदराबरोबर भीती ऐवजी प्रेम निर्माण झालं पाहिजे."

" माझ्या लक्षात आलंय. हर्षवर्धनला प्रेमासाठी नाजूक गोष्ट अजून कळलेली नाही तसंच त्याने कधी कोणत्याही स्त्री कडे या नजरेने बघितले नाही त्यामुळे स्त्रीविषयक जी ओढ असते ती त्याच्या मनात माझ्या बद्दल अजून फारशी निर्माण झालेली नाही. ती मला त्याच्या मनात निर्माण करावी लागणार आहे."

" म्हणूनच म्हणतेय की हनीमूनमध्ये तुला हर्षवर्धनच्या प्रत्येक गोष्टीकडेलक्ष देउन त्यांच्या मनातील तुझ्या बद्दलची ओढ कशी वाढवता येणार आहे यासाठी धडपड करावी लागेल. त्याचा प्रतिसाद बघावा लागेल. तुम्ही दोघं आज विशीबावीशीतले नाही त्यामुळे त्या वयातील नवथरपणा तुमच्या वागण्यात नसेल पण …"
राधा बोलायची थांबली तशी प्राचीने विचारलं,

" राधा बोलायचं का थांबलीस?"

" मला तुला हे सांगायचंय की तू आत्ताच तुझं वय विसर. तू विस वर्षांची आहे असं समजून हर्षवर्धनशी वाग. वीस वर्षांची मुलगी हनीमूनच्या कल्पनेने जशी रोमांचित होते तशी तू हो. होण्याचा प्रयत्न कर. म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर त्या सगळ्या भावना दिसतील. तुझ्या स्पर्शाने हर्षवर्धनच्या मनामध्ये चलबिचल व्हायला हवी. ती होतेय का हे निरीक्षण कर. त्याच्या मनातील चलबिचल त्याने कधी स्पर्धांमधून तर कधी शब्दांमधून उस्फुर्तपणे व्यक्त केली पाहिजे. प्राची कळतंय तुला?"

राधा ने विचारलं.

" हो." प्राचीने उत्तर दिलं.

"ऑफिसमधली प्राची तू काही दिवस विसर. तू अभिसारीका हो. हर्वर्धनची प्रेमिका हो.कळलं?"

"हो कळलं. मी तुझ्या सगळ्या सूचना लक्षात ठेवीन. आई आणि माझे बाबा ऑफीसमध्ये असतीलच पण तू आणि शशांक पाळीपाळीने ऑफिसमध्ये या म्हणजे आई आणि माझ्या बाबांना रिलॅक्स वाटेल."

"प्राची तू त्याची काळजी करू नकोस. ऑफीसमध्ये काय होतंय याचा डे टू डे रिपोर्ट तू मागू नकोस. यादव तुझ्या हाताखाली तयार झाला आहे आणि जुना कर्मचारी आहे. तो व्यवस्थित सगळं निभावेल. खूपच अडचण आली तर तुला फोन करू. हर्षवर्धनचे रूपांतर प्रियकरामध्ये करण्याच्या टास्कवर फोकस कर. असं माझं मत आहे."
राधा म्हणाली.

" तुझं मत योग्य आहे. परिस्थितीने मला भावनिक दृष्ट्या इतकं कोरडं केलय की त्यातून बाहेर पडून अभिसारीका होण्यापर्यतचा प्रवास खूप अवघड आहे पण मला तो यशस्वीरीत्या पार करावाच लागेल. त्याशिवाय आमच्या संसाराला आणि आयुष्याला सुरुवात होणार नाही.थॅंक्स राधा खूप छान टिप्स दिल्या."

बोलताना प्राचीचा आवाज भरून आला.

"अरे यार सेंटी करू नको. तुझ्याबद्दलची काळजी माझ्या बोलण्यातून डोकावली एवढंच. तू बेस्ट आहेस. मला माहिती आहे. ड्रग्जचा एवढा मोठा अडथळा दूर करताना तू जो लढाऊबाणा दाखवलाय तसाच आत्ताही दाखवशील यांची मला खात्री आहे. तुझ्यातील कोरडेपणा घालवून प्रेम निर्माण करण्याचा टास्क अवघड असला तरी तू यशस्वीपणे पार करशील याची मला खात्री आहे."

हे बोलताना राधाचा स्वर ओलावल्या.

" चल ठेवते फोन."

" ओके.बेस्ट ऑफ लक."

दोघींनी फोन ठेवला.

***

योजनेप्रमाणे ॲडसाठी काही प्रवासी निवडल्या गेले. त्या सगळ्यांशी यादव फोनवर बोलले. त्यानंतर निवडलेल्या सगळ्या प्रवाशांच्या सोयीने एक दिवस मिटींग घेण्यासाठी ठरवल्या गेला.

***
मिटींगचा दिवस उजाडला.

संध्याकाळी चार वाजताची वेळ मिटींगची ठरवल्या गेली. दुपारी बाराच्या सुमारास प्रियाने सगळ्यांना संध्याकाळच्या मिटींगची आठवण करून दिली.

दुपारी लंच टाईम नंतर प्रिया प्राचीच्या केबिनमध्ये आली.

" मॅडम मी मघाशी सगळ्यांना मिटींगची आठवण करून दिली."

" गुड. चार वाजता माझ्या केबिनमध्ये मिटींगची तयारी करून ठेव.या डाव्या बाजूला हाफसर्कल खुर्च्या मांड."

" ठीक आहे. मी बिसलरीच्या छोट्या बाटल्या आत्ताच तुकाराम कडून मागवून घेतल्या आहेत. स्नॅक्स साठी परवाच मी ऑफीस जवळच्या गुप्ता स्नॅक्स सेंटरला सांगून ठेवलय."

" छान. प्रिया चहाकाॅफी ज्याला जसं हवं असेल तसं दे. आपल्याकडे मशीन आहेच. पुरेशी काॅफी पावडर आहे का ? नसेल तर तुकाराम कडून आणून घे." प्राची म्हणाली.

" आहे. एवढी तयारी झाली आहे.अजून काही राह्यला का?" प्रियाने प्राचीला विचारलं.

" तुझी तयारी झाली का? त्या लोकांना काय माहीती द्यायची ते आणि ती मंडळी काय प्रश्न विचारतील त्याला कशी उत्तर द्यायची."

" हो मॅडम. माझी तयारी झाली आहे.ते ऐनवेळी काय प्रश्न विचारतील ते आत्ता कसं सांगू?" प्रियाने हसतच म्हटलं.

" अगं ऐनवेळी काय प्रश्न विचारतील हे तू आत्ता सांगू शकणार नाहीस हे कळतंय मला. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपली ही कल्पना त्यांना सांगताना त्यांनी काहीही प्रश्न विचारले तरी त्यांना उत्तर देताना तू गडबडणार नाहीस नं? आपल्या कल्पनेची नीट सविस्तर माहिती तुझ्या डोक्यात आहे नं? कारण ही कल्पनाच नवीन आहे म्हणून मी विचारतेय."

प्राचीने सविस्तरपणे प्रियाला प्राचीने विचारलेल्या प्रश्नांचा अर्थ समजावून सांगीतला.

" अच्छा. असं म्हणायचं आहे का तुम्हाला? माझ्या डोक्यात ही कल्पना पूर्णपणे पक्की बसली आहे.

" ठीक आहे. साधारण साडेतीन वाजता तू तयारी कर. नंतर माझ्या टेबलच्या बाजूचा पडदा ओढून ठेव. ती मंडळी आली ,जरा स्थिरस्थावर झाल्यावर मी बाहेर येई.कळलौ?"

" हो मॅडम. जाऊ?"

प्रियाने विचारलं. प्राची मान हलवून हो .म्हणाली प्रिया जायला निघाली तेवढ्यात प्राचीने तिला हाक मारली,

" प्रिया…एक मिनिट थांबा."

प्रिया थांबली तशी प्राची तिला म्हणाली,

" प्रिया मी तुला माझ्या टूरचं प्लॅन करायला सांगितलं होतं कुठपर्यंत आलं? "

" मॅडम होतच आलंय.मी उद्या सकाळी पूर्ण करून तुम्हाला दाखवते. तुम्ही ओके केलं की मग विमानाचं,हाॅटेलचं बुकींग करीन."

" ठीक आहे.उद्या नक्की दाखव.तिथे फिरण्यासाठी कॅब बुक कर." प्राची म्हणाली.

" हा मॅडम.जाऊ ?"

" हो जा."

प्रिया केबीनबाहेर गेल्यावर प्राची स्वतःशीच गालातल्या गालात हसली. तिच्या आणि हर्षवर्धनच्या आयुष्याची नवी सुरुवात या टूरने होणार असल्याने एक रोमांच प्राचीच्या शरीरात वेगाने लहरत गेला आणि एक शिरशिरी तिच्या अंगावर उमटली.

प्राची खुर्चीवर मागे डोकं टेकवून डोळे मिटून शांतपणे बसली. क्षणात प्राची सद्य परिस्थिती विसरली. प्राची प्रणयरम्य वातावरणात प्राची झपाट्याने गुरफटले गेली.
एका वेगळ्याच रोमॅंटिक मूडमध्ये तिने हर्षवर्धन बरोबरचा उटीपर्यंतचा प्रवास केला. हर्षवर्धनच्या डोळ्यातील निरागसता, तिच्याकडे चोरून बघण्याचा प्रयत्न, त्याच्या चेहऱ्यावर तिच्याबद्दलची ओढ बघून प्राची मनोमन सुखावली.

उटीच्या त्या नयनरम्य वातावरणात हर्षवर्धनच्या प्रेमळ नजरेने प्राचीच्या मनावर जादू केली. कोरड्या ठक्क मनात प्रेमाची रूजवण झाली. एखाद्या षोडशेप्रमाणे तिचं मन लाजेने धुंदफुंद झालं. प्राचीचे गाल लाजेने आरक्त झाले.

हर्षवर्धनने तिला स्पर्श करताच 'स्स्…' असा उद्गार प्राचीच्या तोंडून बाहेर पडला आणि क्षणात तिने एका आवेगाने हर्षवर्धनला मिठी मारली. हळूच हर्षवर्धनचे हात तिच्या पाठीवर फिरू लागले.

हा उन्मादाचे क्षण संपूच नये असं प्राचीला वाटत होतं
तिचा चेहरा आणखीनच आरक्त होऊ लागला.

प्राची हर्षवर्धनला जास्तच बिलगली. हर्षवर्धनच्या स्पर्शातून तोही प्रणयाने उत्तेजीत झाल्या सारखं प्राचीला वाटलं आणि तिच्या मनात आलं हाच तो क्षण ज्या क्षणाची मी आजवर आतुरतेने वाट बघत होते.तो आपल्या समीप आला आहे. त्याला आता हातून निसटू द्यायचं नाही. या विचाराने प्राचीने हर्षवर्धनभोवतीची आपली मिठी आणखी घट्ट केली.

प्रणयाचा रंग अधिकच खुलत गेला. प्राची आणि हर्षवर्धन दोघंही या गोड क्षणांना आपल्या ओंजळीत घेण्यासाठी धडपडू लागले.

हर्षवर्धन हळुवारपणे प्राचीच्या गालावरून बोट फिरवू लागला. प्राचीने अधीरल्या मनाने हर्षवर्धनच्या बोटांचा स्पर्श आपल्या रंध्रा रंध्रात भिनवून घेतला. एक अभिसारीके प्रमाणे सगळं विसरून आपल्या प्रियकराला समर्पित होण्यासाठी प्राची उत्तेजीत झाली होती.

किती तरी वेळ प्राची हा प्रेमाचा उन्माद अनुभवत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटू लागले. या आनंदात असंच हर्षवर्धनला बिलगून रहावं वाटल्याने तिने हर्षवर्धन भोवतीची मिठी आणखी घट्ट केली.त्याला घट्ट मिठी मारतानाचे भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले.

प्राची अचानक या आनंदसोहळ्यातून भानावर आली कारण तिचा फोन तिच्या नावाचा पुकारा करत होता.

फोनच्या रिंगमुळे अतिशय उद्विग्नपणे प्राचीने डोळे उघडले तेव्हा तिच्या लक्षात आलं की ती हर्षवर्धनच्या मिठीत नाही तर ऑफीसमधील तिच्या खूर्चीवर बसलेली आहे. क्षणभर तिला धक्का बसला. हे स्वप्नं होतं की भास होता की आपल्या मनाचा खेळ होता हे तिला समजत नव्हतं.

प्राची जराशी खिन्न झाली. पळभर का होईना ती हर्षवर्धनबरोबर प्रणयाच्या सुंदर क्षणांना आपल्या ओंजळीत भरून घेण्यात मग्न झाली होती. क्षणभर कल्पनेत जगलेले हे क्षण प्रत्यक्षात उतरवण्याचे प्राचीने मनोमन ठरवलं.

कंटाळवाण्या चेह-याने तिने मोबाईल हातात घेतला.

—----------------------------------------------------
क्रमशः कोणाचा फोन आला असेल प्राचीला? तिने कल्पनेत रंगवलेले क्षण प्रत्यक्ष तिच्या आयुष्यात येतील का? बघू पुढील भागात.
मीनाक्षी वैद्य.