Praktan - 1 in Marathi Motivational Stories by अबोली डोंगरे. books and stories PDF | प्राक्तन - भाग 1

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

प्राक्तन - भाग 1

प्राक्तन भाग -१

आयुष्य म्हणजे जणू दोन घडींचा डाव... पण आपण कधी कधी या डावात नकळत स्वता: ला गमावून बसतो तेही आपल्याच माणसासाठी. हे आपल्याला खूप उशिरा कळतं. पण जेव्हा कळतं तो क्षण कोणता का असेना त्यात सारं जीवन जगून घेतल्याचं सामर्थ्य मिळवून अंत निश्र्चितच सुखद करता येतो. प्रत्येकाच्या छुप्या मानवी अंतर्मनाला ओलसर हाक देणारी ही कथा आहे. यातून सांगायचा उद्देश इतकाच की जे हवं त्यापाठी वेळ दवडण्यापेक्षा स्वता: ला स्वता: साठी घडवा, इतरांसाठी नव्हे...

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

अख्खी रात्र तिने विचार करूनही कोणत्याच एका निर्णयावर तिचं एकमत होत नव्हतं. आपली हक्काची असणारी व्यक्ती ही फक्त औपचारिकता म्हणून आपल्यासोबत आहे या विचारानेच तिला कीव येत होती स्वत:ची... अखेर ती अंथरूणातून उठली. मोबाईल हातात घेऊन वेळ बघितली तर पहाटेचे साडेपाच वाजलेले. तिने एकदा शेजारी शांतपणे झोपलेल्या त्याच्याकडे नजर टाकली. चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे निरागस भाव होते त्याच्या.. यावरून ती त्याला नेहमी म्हणायचीही की तू झोपल्यावर जास्तच क्यूट दिसतो. या आठवणीने नकळत तिच्या गालावर हसू फुललं पण ते क्षणभरच... त्याच्या मानेवर आणि दंडावर ते निशाण स्पष्टपणे दिसत होते. ते बघून तिने रागाने करकचून डोळे बंद केले. तसं तिला काल रात्रीचा प्रसंग आठवला.

भांडण, वाद आणि अगदी छोट्याश्याही गोष्टीवरून होणारी चिडचिड मग अबोला हे सगळं मागच्या अडीच वर्षांत नित्याचंच झालेलं... तसंच कालही त्याच विषयावरून त्यांचं कडाक्याचं भांडण झालेलं. तो रात्री उशिरा घरी आल्यावर नुकताच फ्रेश होऊन बसलेला.

" हे हे सगळं काय आहे मला कळेल का, आणि हो आता ना जे काही बोलायचं ते स्पष्ट बोल. स्वत: चा बचाव करण्यासाठी पोकळ कारणं देऊ नको. कारण आता मलाही कंटाळा आलाय या सगळ्याचा... " त्याच्यासमोर ते कंडोमचे पॅकेट फेकत ती त्राग्याने बोलत होती. त्यालाही कळून चुकलेलं की आता काही कारणं देऊन उपयोग नाही. कधी ना कधी तरी हे तिला सांगावंच लागणार होतं.

" हे बघ आजपर्यंत मी तुला कधी कशाची कमी पडू दिलीय का? तुला आणि अमेयला, किंवा आपल्या शारिरीक गरजांतही मी कधी कमी पडलोय का? आपले रिलेशनशिप ते लव्ह मॅरेज आणि आता १५ वर्षांनंतरही माझं तुझ्यावरच प्रेम होतं, आहे आणि राहील. पण गरज इथेच संपत नाही. ट्रस्ट मी, मी काही स्वताहून कुणाकडे जात नाही. जेव्हा विदेशी क्लायंट्स सोबत मिटींग असते तेव्हा हमखास असं घडतंच. आणि मी या गोष्टीकडे खूप नॉर्मली बघतो. कारण आपण मॅच्युअर आहोत. त्यामुळे प्लीज समजुन घे, मी काही लगेच त्या विदेशी मुलींसोबत संसार थाटून त्यांना घरी आणून बसवणार नाही. तो फक्त तुझा अधिकार आहे आणि तुझाच राहील. " तो अगदी शांतपणे म्हणाला. तिला मात्र आतून भयानक चीड येत होती या गोष्टीची..

" म्हणजे काय तर तू समाजसेवेचा विडाच उचललाय. तू त्या दीडदमडीच्या पोरींसाठी स्वत:चं चारित्र्य गहाण ठेवून त्यांच्या गरजा भागवत फिरतोय. वाह नोबेल पुरस्कार मिळायला हवाय तुला यासाठी. आपली एखादी बारीकशा वस्तूलाही इतर कुणी हात लावलेला आपल्याला सहन होत नाही, आणि इथे मी माझा नवरा सरळ दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भाड्याने देऊ.. शी लाज वाटतेय मला आता स्वताचीच... नाही सहन होतंय मला हे सगळं. आपली संस्कृती, आपला स्वाभिमान कायमच या पाश्र्चात्य लोकांपुढे गहाण का ठेवायचा आपण, मला किती मानसिक त्रास होतोय या गोष्टीचा मी कितीही सुशिक्षित असले तरी हे डायव्हर्ट होत नाहीये मला.. तू एक काम कर मला डिव्होर्स देऊन ही असली फालतु समाजसेवा करत बस. " ती मुसमुसत अवसान गाळून धापकन तशीच बेडवर बसली. तसा तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसून तिला समजावू लागला.

" अनू अगं असं काय करतेस. मी म्हणालोय ना तुझा अधिकार फक्त तुलाच राहील. आपलं वैयक्तिक आयुष्य हे वैयक्तिक च राहील, दोघांनाही एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायचा अधिकार नाही असं आपण लग्न करताना तूच म्हणाली होतीस. फक्त आपण एकमेकांपासून एकमेकांशी रिलेटेड गोष्टी लपवून फसवून करायच्या नाहीत असंही ठरलेलं आपलं. मान्य मी चुकलो, हे मी तुला कळू दिलं नाही कारण तुला त्रास होईल याचा म्हणूनच. आपण आयुष्यभर एकमेकांचे सोबती आहोत हकदार नाही.. त्यामुळे एकमेकांच्या प्रत्येक निर्णयात आपण समजून घेऊन एकमेकांना साथ देणं गरजेचं आहे. असं असताना तू डायरेक्ट डिव्होर्सपर्यंत कशी जाऊ शकतेस.. " ती भयानक चिडलेली तरीही तिला प्रेमाने समजावत होता तो, कधीही आदळआपट किंवा आरडाओरडा तो करत नव्हता.

" कसला अधिकार आणि कसलं काय मयुरेश.. बायको म्हणून ज्या गोष्टीवर माझा अधिकार आहे ते असं सहज दुसऱ्या कुणाला तरी देऊन तू बोलतोयस की तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे ते... हाऊ डिसगस्टिंग धिस... आणि समज मीही असंच तुझ्यासारखं करत बसले तर तुला काय वाटेल जस्ट इमॅजिन..." ती त्वेषाने असं बोलली जेणेकरून तिला वाटलेलं तो चिडेल.

" कम ऑन अनू... कुणी तुझ्याकडे साधं नजर उचलून बघितलं तर तू त्याला सुजवून ठेवशील आणि हे सगळं तू करणं शक्यच नाही. खात्री आहे मला..." तो अगदी सहज बोलला. तिच्या विचारानुसार हे सगळं उलट घडलेलं बघून तिचा तीळपापड होत होता. किती सहज त्याने तिला पूर्णपणे गृहित धरलेलं. तिच्या याच स्वाभिमानाचा त्याने द्विअर्थ उचलून आज तिचाच स्वाभिमान दुखावलेला असं तिला वाटत होतं. आणि ते काहीअंशी बरोबरही होतं.

" अनू प्लीज रडू नकोस आणि खचून जाऊ नकोस. शांत हो. आपण उद्या निवांत बोलू तुझा राग शांत झाल्यावर. हवं तर उद्या तू तुझ्या ऑफिसला हाफ डे घेऊन घरी ये आपण माझ्या साईटवर एकत्र जाऊ तेवढाच चेंज मिळेल. आणि हवं तर तुझी माझ्या विदेशी मैत्रिणींसोबत ओळख करून देतो तेव्हा बघ किती ओपनली विचार करतात त्या, यामुळे तुझा डायरेक्शन पण बदलेल. पण आता झोप कसलाही विचार न करता शांतपणे ओके.. " तो तिचा चेहरा ओंजळीत पकडून प्रेमाने बोलला आणि कपाळावर हलकेच ओठ टेकवून अंथरूणावर जाऊन पडला. तिला मात्र काहीच कळलं नव्हतं आताचं त्याचं बोलणं, ती पूर्णपणे कोलमडलेली आतून.. रडण्यासाठी अश्रूही गवसत नव्हते. ती तशीच निपचित बसल्या बसल्याच बेडवर तशीच कलंडली.

आता हे सगळं आठवताच मेल्याहून मेल्यासारखं झालं तिला... तिने वेळ बघण्यासाठी म्हणून मोबाईल ऑन केला तर मोबाईल मध्येही वॉलपेपरवर त्या दोघांचा एकत्र फोटो बघून तिने कसलाही विचार न करता मोबाईल फॉरमॅट मारला डायरेक्ट... आणि तशीच तिथून तडक बाहेर निघाली. जाता जाता एकदा अमेयच्या खोलीत दूरूनच मनभरून पाहिलं. आणि घराबाहेर पडली.

ती चालत होती, कुठे जायचं, काय करायचं काहीच माहीत नव्हतं तिला.. फक्त या सगळ्यापासून कायमचं दूर निघून जायचं हे एकच मनात घोळत होतं. चालता चालता ती शहराच्या मध्यभागी असलेल्या पुलाजवळ आली. पुलाखाली रेल्वेचं रूळ आणि बाजूलाच लागून एक तलाव होता. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे मिटून घेत तिथून तोल सोडणार तितक्यात कुणीतरी खचकन मागे खेचलं तिला... तिला भानच नव्हतं कुणीतरी ओढलंय आपल्याला ते. समोरच्या व्यक्तीने तिला भानावर आणण्यासाठी गालावर थोपटलं. तशी ती जागी झाली.

" ओ मिस, हे काय करत होतात तुम्ही.. जीव एवढा स्वस्त झालाय काय..." ती व्यक्ती तिला किंचित रागाने विचारत होती. ती शांतच होती कसलेच भाव नव्हते तिच्या चेहऱ्यावर... फक्त एकटक कुठेतरी शून्यात नजर लावून बसलेली ती. ते बघून त्या व्यक्तीने त्याच्या सॅकमधून पाण्याची बॉटल काढत तिच्यासमोर धरली. मला नकोय एवढंच काय ते मान हलवत म्हणाली ती. पण त्याने पून्हा तिला सांगितलं. तसं तिने त्याच्याकडे बघितलं.

" कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय?? आपण ओळखतो का एकमेकांना? मग मला थांबवून काय मिळालं तुम्हाला?? " चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं करत तिने एकामागून एक त्याला विचारलं. खरंतर मनातून चीडच आलेली तिला त्याची पण कसंबसं राग आवरत तिने विचारलं.

" मी यश, ही माझी नेहमीची जागा आहे जिथे मी दररोज यावेळी इथे येतो. खरंतर मी तुम्हाला विचारायला हवं की तुम्ही कोण आणि इथे काय करत होतात. मी वाचवलं याचा राग येत असेल तुम्हाला. पण मला समाधान वाटतंय. कारण आत्महत्या करणं हा गुन्हा आहे आणि ते करण्यापासून मी रोखलं कुणाला तरी... " तो जरा गंभीरपणे म्हणाला. तसं ती वरमली. आणि काहीच न बोलता पून्हा शांत बसली शून्यात बघत...

" हम्म..." तिचा एवढाच प्रतिसाद... त्याला नेमकं कळत नव्हतं की काय झालंय तिला की डायरेक्ट ती जीव द्यायला निघालीय. गळ्यात मंगळसुत्र आहे म्हणजे मॅरिड आहे असा अंदाज त्याने बांधला. तो पुढे अजून काही बोलणार तितक्यात ती तिथून निघून गेली. त्यानेही अडवलं नाही.

दुसऱ्या दिवशी,
बरोबर त्याच वेळी तो तिथे येऊन बसलेला, तसा तर तो रोजच यायचा तिथे.. पण आज येताच कालचा प्रसंग आठवला. हा विचार डोक्यातून काढतो की नाही तोवर मागून उजेडात एका व्यक्तीची सावली दिसली आणि त्याने वळून बघितलं तर तीच होती ती कालची व्यक्ती.. ते बघून त्याला आश्र्चर्य वाटलं. ती काहीही न बोलता त्याच्याशेजारी येऊन बसली, समोर कुठेतरी शून्यात बघत.. तो गोंधळलेला तिला आजही याच अवस्थेत बघून.

" तुम्ही आजही आलात. आज पण आत्महत्या करण्याच्या इराद्याने आला असाल तर त्यात यश येणार नाही. " तो म्हणाला तसं तिने त्याच्याकडे एकवार बघितलं. आणि पून्हा समोर बघत बसली. त्यानेही त्यापुढे काहीच विचारलं नाही. दोघेही शांतच...


" तुम्ही मला ओळखता का?" तिने तसंच शून्यात बघत मध्येच त्याला विचारलं. त्याने नाही असं सांगितलं.

" मग का वाचवलंत मला? सुखाने जगू शकत नाही तर मग सुखाने मरायचाही अधिकार नाही का मला? " तिने त्याच्याकडे वळून बघत त्याला विचारलं.

" समस्या कोणती का असेना पण त्यावर शेवटचा पर्याय आत्महत्या हा असू शकत नाही. निदान हे पाऊल उचलण्याआधी आपल्या जवळच्या व्यक्तीचा तरी विचार करायला हवा. नाहीतर आपल्या पार्टनरचे असा अचानक एकटं सोडून सुसाईड केल्यानंतर काय हाल होतात ना ते मला विचारा... यासाठीच मी तुम्हाला थांबवत होतो." तो अस्वस्थपणे म्हणाला. ते ऐकून तिच्या डोळ्यात पाणी तरळलं.

" त्यासाठी आपल्या पार्टनरला पण आपली काही वाटत असेल तरच ना... माझ्या असण्या नसण्याने कुणाला काही फरक पडला नाही आणि पडणारही नाही तर मग मी का उगाच कुणाच्या आयुष्यात अडगळ म्हणून राहू.. म्हणून मला संपवायचंय स्वताला. " ती करड्या आवाजात म्हणाली. तसा तो जरावेळ शांत झाला.

" मी निशब्द आहे. काय झालं वगैरे विचारण्याचा मला हक्क नसला तरी यातल्या भावना मी समजू शकतो. पण जीव एवढा स्वस्त नाही की एखाद्या साठी आपण इतर जवळच्या व्यक्तींना दुखवावं. आपल्या असण्या नसण्याने कुणाला फरक पडावा इतकं परग्रही आयुष्य जगावं का माणसाने? इतके दिवस यासाठी जगत होतात पण आजपासून स्वता: साठी जगा. " तो शांतपणे बोलत होता. ती लक्ष देऊन ऐकत होती. तिला पटत होतं सगळं... पण इतके दिवस स्वता:कडे दूर्लक्ष केलं याचा पश्चातापही होत होता. ती रडत तशीच खाली बसली. हाताच्या ओंजळीत तोंड खुपसून हमसून हमसून रडायला लागली. तो तसाच उभा होता. त्याने तिला अडवलं नाही किंवा विचारलंही नाही. तो तसाच तिथून निघून गेला.


क्रमशः

©️®️ अबोली डोंगरे.