The need of time to donate labor? in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | श्रमदान करणं काळाची गरज?

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

श्रमदान करणं काळाची गरज?

श्रमदान करणं ही काळाची गरज?

वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्यानं आयुष्य वाढत नाही तर विचार येतो की वडाच्या झाडाला फेऱ्या कशाला? असा विचार कोणाच्याही मनात येईल. याबाबतीत विशेष सांगायचं झाल्यास वडाच्या झालाला फेऱ्या मारण्यानं आयुष्य वाढत नाही. परंतु वडाच्या झाडाचं तेवढंच महत्व वाढते. कारण वडाचं झाड हे जास्तीत जास्त ऑक्सिजनची मात्रा वातावरणात प्रवाहीत करीत असते. शिवाय पाणी साठवून ठेवण्याचीही क्षमता वडाच्या झाडात आहे. त्यातच वडाची सावली गार असल्यानं त्या झाडाच्या सावलीत बसल्यानं अतिशय आल्हाददायक वाटत असते.
वटसावित्रीनिमीत्यानं विचार करीत असतांना काल एका महिलेला विचारलं, "अजी, खरंच वडाच्या झाडाला फेऱ्या मारुन पुरुषांचं आयुष्य वाढतं का?"
त्यावर ती म्हणाली, "तुमचा विश्वास असेल व विचार असेल तर नक्कीच तुमचं आयुष्य वाढेल."
विचार....... प्रत्येक माणसाचा विचार असतो की आपण जास्त जगू. परंतु त्यातील काहीच माणसं जगतात. काही जगत नाहीत. त्याचं कारण काय? त्यांचा विचार नसतो का जास्त जगायचा. त्यांच्या पत्न्या वटसावित्री व्रत करीत नाहीत काय?
सगळं करतात त्या आपल्या पतीच्या लांब आयुष्यासाठी. परंतु पतीचे आणि तिचे एकंदर कर्म वाईट राहतात. त्यामुळंच अकाली मृत्यू येत असतो. हे निर्वीवाद सत्य आहे. परंतु हे तत्व कोणालाच मान्य नाही. मग वटसावित्री पुजा करा अगर नका करु. चांगल्या कर्मावरच आयुष्याचं गणित अवलंबून असतं. तसंच चांगल्या कर्मानंच आयुष्य वाढतं. आता योगपद्धतीचंही सांगतो.
योगपद्धतीबाबतही मी एकदा एका व्यक्तीला विचारलं,
"भाऊ, योगा केल्यानं आयुष्य वाढेल काय?" त्यावर तोही तसंच म्हणाला होता.
"योगा केल्यानं आयुष्य वाढतं."
आयुष्य....... आयुष्य वाढणं वा कमी जास्त होणं ही काही जादूची कांडी नाही की आयुष्य वाढणार वा कमी होणार. काहीजण तर दररोज कितीतरी वेळा योगा करीत असतात. मग त्यांचं आयुष्य वाढतं काय? काही स्रिया तर कितीतरी वर्ष सतत वडाला धागे बांधतात. फेऱ्या मारतात. मग आयुष्य वाढते काय? अन् स्रियांसाठी तर कोणताच पुरुष वडाच्या वा कोणत्याच झाडाला फेऱ्या मारत नाहीत. मग का स्रियांचे आयुष्य कमी होते. यातही काहीजण म्हणतात की योगा केल्यानं सुदृढ राहातं.
योगा केल्यानं सुदृढ राहातं. बरोबर आहे. कारण योगा म्हणजे मेहनत. मेहनत ही कोणत्याही कामासाठी केली जाते. तशीच मेहनत योगात असते. परंतु योगा करण्यातील मेहनत ही आपल्या स्व शरीरासाठी असते व तो आपला वैयक्तिक प्रश्न असतो.
योगा ही शरीराची सुदृढ बनावटीची कृती जरी असली तरी ती कृती स्वतःच्या कामाची. स्वतःचं शरीर मजबूत बनविण्याच्या कामाची. ती मेहनत स्वतःसाठीच असून स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या कामाची. ती देशाच्या कोणत्या कामाची? त्या कृतीनं देशाचा विकास होवू शकतो काय? की त्या कृतीनं एखाद्याचं भलंतरी? त्याचं उत्तर नाही असंच आहे. यापेक्षा जर एखाद्या व्यक्तीनं योगा करण्याऐवजी श्रमदान केलं तर ती कृती त्याच्या शरीरालाच नाही तर समाजालाही लाभदायक ठरु शकेल योगासारखी. जसे झाडे लावण्याची कृती. झाडे लावत असतांना खड्डे करणे. यात शरीराच्या संपुर्ण अवयवाची हालचाल होत असते व स्नायू बळकट होतात. शिवाय रक्ताचं वहन होतं. श्वासोच्छ्वास सुधारतो. शिवाय झाडं लावण्यानं पर्यावरणाचं संतूलन राखता येतं आणि पर्यावरण संतूलन असेल तर सृष्टीचं ही रक्षण होतं. त्याचबरोबर देशातील शेतकऱ्यांच्या शेतात पीक भरघोस येवू शकतं. ज्यानं देशाचा विकास होणं सहज शक्य होतं.
योग्याऐवजी श्रमदान करण्याचं दुसरं उदाहरण म्हणजे शेतीत मेहनत करणं. एखाद्याच्या शेतीत योगा करतांना जेवढा वेळ देतो. तेवढाच वेळ मेहनत केली तर शेती सुधारेल व शेतीत उत्पादन भरघोस येईल. परंतु कोण करणार? हा आळस असतो मनात. मग श्रमदान घडत नाही व योगा करण्याची वेळ येते.
श्रमदानाचे अनेक प्रकार आहेत. जसे एखाद्या ठिकाणी रस्ता नसेल तर रस्ता बनवणे. याबाबत एक उदाहरण आहे एका व्यक्तीचं. त्याची पत्नी डोंगराच्या पलीकडे राहात होती व ती गरोदर होती. ती दिलवरीसाठी माहेरी गेली. त्यानंतर दिलवरी झाली आणि तो भेटायला जाणार. तोच दरड कोसळली व संपुर्ण रस्ताच बंद झाला. आता आपल्या पत्नीला व नवजात बाळाला भेटणार कसं? त्यानं विचार केला व विचारांती त्यानं स्वतःच रस्ता बनवायला सुरुवात केली व रस्ता बनवला. परंतु तसा रस्ता बनवायला त्याला जवळपास पंचवीस वर्ष लागले. त्यासाठी तो दररोज श्रमदान करुन त्या डोंगरातून रस्ता बनवीत होता. जर त्यानं विचार केला असता की कोण रस्ता बनवणार तर तो आपल्या पत्नी आणि मुलाला भेटूच शकला नसता.
दोनतीन दिवसापुर्वी अशीच एक घटना घडली. एक जेसीबी नागनदीत फसली. मग सारे लोकं पाहायला आले. काही हरहळत होते. काही फालतूचे सल्ले देत होते. परंतु कोणीच काढायला तयार नव्हतं. कारण त्यांना वाटत होतं की जेसीबी अतिशय भव्यदिव्य. तिला काढण्याएवढी ताकदही आपल्यात नाही. मग ती काढायची कशी? सर्व बघ्यांची भुमिका पार पाडत होते.
ताकद....... ताकदीविषयी सांगतांना हेच सांगता येईल की ज्यावेळेस प्रभू श्रीरामानं रामसेतू बनवला. त्यावेळेस एका खारीनंही मदत केली होती. खरंच त्या खारीच्या इवल्याशा स्वरुपात रेती आणण्यानं रामसेतू तरी बनला असता काय? नाही. परंतु आज तीच खार अजरामर झालेली असून प्रत्येक माणसांच्या तोंडी एकच वाक्य असतं. ते म्हणजे खारीचा वाटा असायला हवा. महत्वाचं सांगायचं झाल्यास ही खार श्रमदानानंच अजरामर झालेली आहे. जर तिनं विचार केला असता की आपण काहीच करु शकणार नाही. आपण तर लहान आहोत. तर खरंच ती अजरामर होवू शकली तरी असती का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे.
कोणताही माणूस हा लहान आणि मोठा नसतो. प्रत्येकजण महानच असतो. परंतु तो विचार आपल्यात हवा. जेणेकरुन श्रमदानाचं कार्य घडेल. कारण श्रमदानाला आरोग्याच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्व आहे. परंतु ते महत्व कोणाच्या लक्षात येत नाही. तसंच तेही रक्तदानासारखं महान दान आहे. रक्तदानानं फक्त आपण एकाचाच जीव वाचवू शकतो मात्र श्रमदानानं अनेक लोकांचा जीव वाचवू शकतो. शिवाय आरोग्यही अगदी सुदृढ ठेवता येवू शकतं. त्याबरोबर सृष्टीचे रक्षण आणि देशाचा विकासही.
विशेष बाब ही की वडाच्या झाडाला फेऱ्या मारणे ही कृती योग्य अशी कृती असली तरी त्या वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्याबरोबरच जर वडाचीच नाही तर तत्सम झाडं जर लावली तर पर्यावरणाचं संतूलन ठेवता येईल. महत्वपुर्ण बाब ही की वडाची पुजा करुन वा हे व्रत करुन स्रिया झाडं लावा व त्याचं जतन करुन पर्यावरणाचं संवर्धन करण्याचा संदेश देत असतात. ज्यातून पर्यावरणाचं संतूलन राखता येतं. तसंच योगा करणं ही कृतीही अतिशय चांगली कृती असून ती कृती करण्याऐवजी त्याच कृतीद्वारे थोडसं झाडं लावण्यासाठी श्रमदान केलं तर तिही कृती पर्यावरणाचं संतूलन राखण्यासाठी नक्कीच फायद्याची ठरु शकते. यात किंचीतही खोटेपण नाही.
महत्वाचं म्हणजे ह्या दोन्ही कृती महत्वाच्या असून या दोन्ही कृती करुन देशहिताला संदेश मिळतो. परंतु असा संदेश निव्वळ देण्याऐवजी जर या संदेशाव्यतिरीक्त सर्वांनी जर झाडं लावण्यासाठी श्रमदान केलंच. तर तीच कृती वडाच्या पुजेपेक्षाही व योगा करण्यापेक्षाही अतिशय योग्य ठरेल यात शंका नाही. जेणेकरुन त्यातून पर्यावरणाच्या संतुलनासोबतच सृष्टीचेही रक्षण करता येईल. जी कृती आपल्याच भावी पिढीच्या भवितव्यासाठी अतिशय फायदेशीर ठरु शकेल. हे तेवढंच खरं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३५३३५९४५०