Clapping is not done with one hand in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | टाळी एका हातानं वाजत नाही

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

टाळी एका हातानं वाजत नाही

टाळी एका हातानं वाजत नाही?

आत्महत्या...... नेहमीच आजच्या काळात आत्महत्या होत असलेल्या दिसत आहेत. त्यात वाढ होत असलेली सातत्यानं जाणवते. कारण दररोजच वर्तमानपत्रातून तशा स्वरुपाच्या बातम्या प्रकाशित होत असलेल्या दिसतात. अशाच स्वरुपाची एक बातमी प्रकाशित झाली. ती पोलीस शिपायाची. बातमी होती, एका पोलीस शिपायाच्या आत्महत्येची. त्याचा पत्नीवर संशय होता व तिचं बाजारात जाणं वा कामानिमित्त बाहेर जाणं त्याला खटकलं होतं. मात्र या घटनेत गुन्हा तिचा असेल की नसेल यावर प्रश्नचिन्हं ओढता येत नाही.
संशय...... संशय का बरं निर्माण झाला असेल त्याच्या मनात. त्याला काही कारण असेल काय? असू शकेल काय? असे विचार केल्यास असूही शकेल व नसूही शकेल. कधी कधी संशय हा आपल्या वागण्यावरुन वा बोलण्यावरुन बळावत असतो आणि एकदा का संशय निर्माण झालाच की त्यावर दुसरा कोणताच उपाय नसतो. मग शेवटी त्याची परियंती आत्महत्येतच होते. मात्र ती जरी आत्महत्या घडत असली तरी त्यात दोषी एकच व्यक्ती नसतो. कारण टाळी एका हातानं कधीच वाजत नाही. ती दोन्ही हातानं वाजते. परंतु हे जरी खरं असलं तरी संशय मनात घ्यायचाच कशाला की जो बळावू शकेल.
आत्महत्या ही संशयावरून जरी होत असली तरी यात त्याच्या पत्नीचा दोष होता की नव्हता ते माहीत नाही. परंतु ती आत्महत्या विचार करायला लावण्यालायक आहे. आजच्या काळात बऱ्याचशा आत्महत्या अशाच संशयावरुन होत असतात. एखादा मुलगा फेसबूकवर भेटतो. तो मोबाईल माध्यमातून बोलत असतो. मग तो व्हाट्सअपवर येतो. त्यानंतर चॅटींग सुरु होतं. तिथंपर्यंत काहीच फरक दिसत नाही. परंतु जेव्हा एखाद्यावेळेस ही व्हाट्सअपवरील चॅटींग एखाद्यावेळेस पतीला दिसते. तेव्हा मात्र संशय सुरु होतो. त्यानंतर ती जरी व्हाट्सअपवर चॅटींग करीत नसेल, तरी संशय हा सुरुच राहतो. त्यानंतर ती जरी कोणत्या निमित्यानं बाजारात जात असेल वा कधी कोण्या कामानिमित्त बाहेर जात असेल, तरी संशय हा दिसतोच दिसतो. त्यातच कधी एखाद्यावेळेस एखाद्या मुलासोबत अनवधानानं ती गोष्टी करीत दिसलीच तर संशय हा बळावतो. मग साधा मोबाईल पाहणंही मनात खलतं. त्यानंतर जीवनात नैराश्य येतं व माणूस आत्महत्या करतो. हे तेव्हा घडतं. जेव्हा पती पत्नी म्हणून जोडपं विवाहबद्ध झालेलं असतं. कुवाऱ्या लोकांबद्दलचं थोडं वेगळं आहे.
टाळी काही एकाच हातानं वाजत नाही. तसंच घडतं तरुण मुलांमुलींमधील प्रेमात. म्हणतात की मुलंच मुलींना प्रेमात भुलवतात. त्यांना मोठमोठी पोकळ आश्वासन देत असतात. त्यात मुली फसतात व मुलींचं नुकसान होतं. ते नुकसान एवढं होतं की त्या नुकसानाचीही परियंती आत्महत्येत होते. यात मुली चक्कं आत्महत्या करतात. परंतु हे जरी खरं असलं तरी आजच्या काळात मुलींच्या प्रेमात पडून आत्महत्या करणाऱ्या मुलांचीही संख्या काही कमी नाही. आजच्या काळातील मुली एवढ्या हुशार झाल्या आहेत की त्या चक्कं प्रेमाचे जाळे टाकतात मुलांवर. त्यांना भुलवत असतात आणि जेव्हा ही मुलं खरोखरंच प्रेमात पडलेली असतात. तेव्हा या मुलीच चक्कं प्रेमाला नकार देतात. अशावेळेस ही प्रेमात पडलेली मुलं स्वतःला सावरु शकत नाहीत व त्यातून निराश होतात व आत्महत्या करतात.
प्रेमाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास काल खरं प्रेम व्हायचं. त्या खऱ्या प्रेमाला विरोध असायचा परीवाराचा. परंतु तो विरोध जरी असला तरी त्या विरोधाला विरोध जुमानता प्रेमाला अजरामर करीत असत प्रेमप्रेमी. ते प्रेमी पुढे जावून विवाहबद्ध व्हायचे व प्रेमाच्या या बंधातून कधीकधी आत्महत्या करायचे. कारण त्यांचा विवाह निव्वळ परीवारच नाही, तर समाजालाही मान्य नसायचाच. ते वाळीत टाकायचे त्यांना. अशी काही उदाहरणं गाजलेली आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास नल दमयंतीचं देता येईल.
आज मात्र काळ बदलला आहे. या नवीन काळातील काही मुलं मुली प्रेम तर करतात परंतु ते प्रेम असतं वासनेसाठी. एकदा का वासना तृप्त झाली की बस. ते एकमेकांना सोडून जातात. परंतु या पलायन काळात जर या दोन्हीपैकी एक जर इमानदार वा खरा प्रेमी असला तर वाद होतात. त्यातच संशय, बदला, आणि बरंच काही. मगही निराशता आणि त्याची परियंती आत्महत्या. कालचा काळ गेला की मुलींना मुलं धोका देत होती. जो समज आजही प्रचलीत आहे. परंतु तो समज फक्त प्रचलीत आहे. प्रत्यक्षातील परिस्थिती थोडी वेगळीच आहे. मात्र तसा समज आजच्या या बदलत्या काळात बदललेला आहे. आज चक्कं मुलीच मुलांना भाळवतात. भूलथापा वा खोटे आश्वासन देतात. मग एकदा का मुलं प्रेमात पडलीच की वेळ पाहून त्यांच्याकडून असे काही कृत्य करवून घेतात. त्याचे व्हिडीओ रेकॉर्ड करतात. त्यानंतर ते ब्लॅकमेल करीत असतात मुलांना. त्यातूनच भीतीनं का असेना, मुलं निराश होतात. ज्यातून आत्महत्या घडते. परंतु समाजमाध्यमांसमोर मुलींचे चेहरे निष्पाप असतात. त्यांच्यावर दोष न लादता, त्यांना चक्कं सोडून दिलं जातं. विचार केला जातो की चूक मुलांचीच होती, मुलीची नाही.
महत्वपुर्ण बाब ही की आज काळ बदलला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीपासून आपण सुधारलो असून आपण आचार आणि विचारानेही बरेच पुढे गेलेलो आहोत. आजच्या मुली एवढ्या पुढे गेल्या आहेत त्या पाश्चिमात्यांची संस्कृती पाहून की ज्याची आपण कल्पनाच करु शकत नाही. त्यांच्यासाठी आजच्या काळात लैंगीकता वा नशापाणी वा तोकडे कपडे या गोष्टी सामान्य झाल्या आहेत. त्यांच्यासाठी प्रेम वैगेरे काही मोलाचं नाही. प्रेमाला त्या भातूकलीचा खेळच समजतात. अशातच त्या खरे प्रेम मानणाऱ्या वा करणाऱ्या मुलांना धोकेच देत असतात. त्यांना आवडतात ती मुले. जी मुलं त्यांना बाईकवर फिरवतात. जे रोजरोज बाईक बदलवतात. पैसा नसून पैसा असल्याचा आव आणतात. मुलींना सतत नाश्तापाणी चारतात. जी मुलं वर्तमान परिस्थितीला धरुन नशापाणी करतात. दररोज वेगवेगळे कपडे परीधान करतात. सिगारेट, गांजा याच्या आधीन असतात व तीच सिगारेट गांजा मुलींनाही ओढायला देतात.
आजचा काळच मुळात असा आला आहे की आजच्या काळात मुलींना साधी मुलं आवडत नाहीत. जी मुलं अभ्यासात हुशार आहेत. स्वभावानं सोज्वळ आहेत. थोडी कंजूष आहेत. त्यांच्याजवळ पैसा आहे. परंतु तो खर्च करतांना ते सतरावेळा विचार करतात. ते नशापाणी करीत नाहीत. बाईक वा पोशाख रोजरोज बदलवत नाहीत.
प्रेम करणं काही वाईट नाही. परंतु प्रेमात जास्त स्वतःला वाहवत नेणं वाईट आहे. तसं आपण स्वतःला वाहवत नेलं तर त्याचे गंभीर परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. म्हणूनच प्रेम करावं. परंतु ते करण्यापुर्वी अनेक वेळा विचार करावा म्हणजे झालं. कारण टाळी एका हातानं वाजत नाही. ती दोन्ही हातानं वाजते. त्यामुळं गुन्हा एकाचाच राहात नाही. दोघांचाही असतो. म्हणूनच जरी दोषही द्यायचं काम पडलं तर दोष एकालाच देवू नये. दोघांनाही द्यावे हे तेवढंच खरं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०