Blackmail - 5 in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | ब्लॅकमेल - प्रकरण 5

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

ब्लॅकमेल - प्रकरण 5



प्रकरण ५
प्रचिती ला सूचना देवून पाणिनी ७६७ नंबरच्या खोलीत आला.समिधा ने त्याला विचारलं, “ कितपत संकटात आहे ही पोरगी?”
“ संकटात नाहीये अगदी पण इथे येई पर्यंत तिने स्वत:चा खूप माग सोडलाय मागे.ती इथे आल्यापासूनच मला जरा बेचैन वाटायला लागलंय....” पाणिनी म्हणाला तेवढ्यात दार वाजल्याचा आवाज आला. “ पोलीस किंवा हॉटेल चा सुरक्षा रक्षक असेल असं वाटतंय. कोणीतरी अधिकाराने वाजवलेले दार आहे.” पाणिनी म्हणाला
“ विवस्वान असू शकतो?”
“ नाही,नाही. पोलीस असायची शक्यता जास्त आहे.” पाणिनी म्हणाला
“ दार उघडा.पोलीस आहोत आम्ही.” बाहेरून आवाज आला.
“ शक्य होईल तेवढ बोलायचं काम मी करतो.” पाणिनी समिधाला म्हणाला आणि दार उघडलं.दारात साध्या वेषातील दोन पोलीस उभे होते.त्यांनी पाणिनी पटवर्धन ला ओळखलं.
“ तुम्ही इथे काय करताय?”
“ माझा तुम्हालाच प्रश्न आहे, तुम्ही काय करताय इथे? ” पाणिनीने विचारलं.
“ बाहेर बोलण्यापेक्षा आत बोलूया.” त्यातील एक म्हणाला आणि कुणाच्या परवानगीची वाट न पाहता ते आत घुसले, आत येत येताच त्यांनी आपलं ओळखपत्र दाखवलं. त्यांची नजर समिधा कडे गेली.
“ उंची ५.२,वय बावीस, वजन साधारण ५० किलो, काळे केस,स्मार्ट.” त्यातील एकाने कागदावरील वर्णन वाचलं आणि दुसऱ्याने समिधाकडे बघत मान डोलावली.
“ आम्हाला काही प्रश्न विचारायचेत.”
“ विचारा.” पाणिनी म्हणाला
“ तुझं नाव प्रचिती पारसनीस आहे? ” कडे बघून एका पोलिसाने विचारलं.
“ त्याआधी मला सांगा तुम्ही इथे का आलाय?” पाणिनीने विचारलं.
“ तुला ते सांगायची गरज नाही.”
“ मला नाही पण हिला ते सांगायची गरज आहे. तुम्हाला ती कुठल्या गुन्ह्यात गुंतली असायचा संशय आहे?” पाणिनीने विचारलं.
“ देवनार च्या पोलिसांच्या सुचनेनुसार आम्ही काही माहिती घेतोय.”
“ माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं मला. तुम्हाला ती कुठल्या गुन्ह्यात गुंतली असायचा संशय आहे? ”
“ त्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाहीये.”
“ देवनारच्या पोलिसांना तसा संशय आहे?”
“ आम्हाला कसं कळणार त्यांच्या मनात काय आहे ते?”-पोलीस म्हणाला.
“ तुम्ही देवनार च्या पोलिसांच्या वतीने आला असाल इथे आणि देवनार च्या पोलिसांना हिच्या बद्दल संशय आहे किंवा नाही हे तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही तिला तिच्या वैधानिक अधिकाराबद्दल माहिती दिली पाहिजे. ” पाणिनी म्हणाला
“ जणू काही तिला ते अधिकार माहीतच नाहीत ”
“ ते तुम्ही कोर्टाला सांगा.” पाणिनी म्हणाला
“ ठीक आहे,ठीक आहे.” दुसरा पोलीस सांभाळून घेत म्हणाला. “ हे बघा मिस, आम्ही कुठलेही आरोप करत नाही आहोत तुमच्यावर.किंवा अटक करायलाही आलेलो नाही.आम्ही फक्त काही प्रश्न विचारणार आहोत. उत्तरं न देता गप्प बसायचा हक्क तुम्हाला आहे, तसच तुम्हाला वकील नेमायचा असेल तर तो ही नेमू शकता किंवा त्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर आम्ही सुद्धा तुमच्यासाठी ते करू.पण आमच्या प्रश्नाला उत्तरं दिलंत तर त्याचा वापर आम्ही तुमच्या विरुद्ध करू शकतो हे लक्षात ठेवा. तर आता सांगा, वकील नेमायचा आहे तुम्हाला?”
समिधा काहीतरी बोलणार एवढ्यात पाणिनी म्हणाला, “ मीच तिचा वकील आहे.”
“ तुम्ही इथे कशासाठी आलाय मिस पारसनीस? ” एका पोलिसाने विचारलं
“ एका व्यावसायिक कामासाठी आल्ये ही बाई इथे.” पाणिनी म्हणाला
“एकादषम अर्वाचिन कंपनी म्हणजे , देवनार मधे,जिथे तुम्ही काम करता तिथे कंपनीच्या लॉकर मधे मोठी रोकड ठेवलेली होती याची तुम्हाला कल्पना आहे? ”
“ काही बोलायचं नाही.” पाणिनी सामिधाला म्हणाला
“ एक मिनिट पटवर्धन, तुम्ही विनाकारणच या मुलीला अडचणीत आणताय, आम्ही फक्त रुटीन माहिती घेतोय.”
“ का?” पाणिनीने विचारलं.
“ देवनार पोलिसांसाठी.”
“ का? तिथे काही गुन्हा घडलाय?” पाणिनीने विचारलं.
“ आम्हाला माहित नाही देवनार पोलीसानाही खात्री नाहीये.”
“ तर मग पूर्ण परिस्थितीचे आकलन होई पर्यंत माझी अशील काहीही माहिती देणार नाही.”
“ तुमच्या या वागण्यामुळे आम्हाला देवनार पोलिसांना सांगावं लागेल की मोठ्या रकमेची अफरातफर किंवा अपहार झाल्याची शक्यता वाटत आहे म्हणून.”—पोलीस.
“ खरंच की काय? किती रक्कम आहे?” पाणिनीने विचारलं.
“ ऑडीट पूर्ण व्हायचंय पण साधारण वीस लाख रक्कम असणार आहे.”
“ का ss य !” पाणिनी ओरडलाच. “ एखाद्या कंपनीत एवढी मोठी रक्कम म्हणजे फारच मोठी आहे.” पाणिनी म्हणाला
“ या पेक्षा सुद्धा मोठ्या रकमेचे अपहार झालेत काही ठिकाणी.”
“ आणि देवनारच्या पोलिसांना माझ्या अशिलाचा संशय येतोय?” पाणिनीने विचारलं.
“ मी अजून तरी तसा आरोप नाही केलेला. आम्हाला बऱ्याच गोष्टींचा उलगडा करून घ्यायचाय पारसनीस कडून, या कंपनीत कॅश ठेवायची पद्धत काय आहे, तिजोरी उघडायचे अधिकार कसे आहेत, या रकमेचे हिशोब कसे ठेवले जातात,मुख्य म्हणजे एवढी मोठी रोकड कंपनीला लागतेच का? तिजोरीच्या कोड नंबरची माहिती कोणाकोणाला असते.सर्वात महत्वाचे म्हणजे कुणीतरी आधी तपासल्या शिवाय रोख रकमेत खोट आल्याचे कंपनीला समजलं कसं?”
“ बरेच दिवस घडतंय हे?” पाणिनीने विचारलं.
“ आम्हाला नाही माहित.त्यासाठीच आम्हाला प्रश्न विचारावे लागताहेत.”
“ माझ्या अशिलाने हा अपहार केला असेल असं तुम्हाला वाटतंय का?”
“ झालेल्या अपहाराशी तुमच्या अशिलाचा संबंध आहे हे दर्शवणारा पुरावा अत्ता तरी नाहीये पण याचा अर्थ असाही नाही की तिला ते करणे अशक्य होते असा पुरावा आम्हाला मिळालाय.”—पोलीस म्हणाला.
“ छान.या सर्वाचा अर्थ असाच आहे मित्रांनो, माझ्या अशिलाला वकील नेमणे आवश्यक आहे.” पाणिनी म्हणाला
“ ते मी मगाशी सांगितलंच आहे की.”
“ मी तिचा वकील म्हणून तिला सल्ला देतो की तुमच्या कोणत्याही प्रश्नांची तिने उत्तरं देऊ नयेत.” पाणिनी म्हणाला
“ हिशोब ठेवायची पद्धत,कंपनीच्या धंद्याचं स्वरूप, या बद्दल सुद्धा नाही?”
“ नाही.ती कोण आहे याबद्दल सुद्धा नाही.” पाणिनी म्हणाला
“ असा असहकार बरोबर नाही पटवर्धन.”
“ देवनार च्या पोलिसांना एवढा सविस्तर तपशील, अपहाराबद्दल, माहित कसा झाला?ज्या आधारे तुम्हा दोघांना त्यांनी पाठवलं?”
“ मी उत्तरं नाही देणार.”
“ तुम्ही तसं वागू शकता.” पाणिनी म्हणाला त्या दोघांनी समिधाकडे पाहिलं. “ आम्ही इथे आलो होतो तेव्हा फक्त काही माहिती घेण्यासाठी आलो होतो.”
“ आणि आता काय हवय?” पाणिनीने विचारलं.
“ वीस लाख. हे बघा मिस्टर पटवर्धन, या अपहार केलेल्या रकमेतून तुम्ही तुमची फी वसूल करू शकत नाही.”
“ निघा तुम्ही.नंतर भेटू आपण ” पाणिनी म्हणाला
“ कोर्टात.”—पोलीस म्हणाला.दोघे उठून दाराबाहेर पडले.
ते जाताच पाणिनीने समिधाला खूण केली की काही बोलू नको.अचानक त्याने दार उघडलं आणि बाहेर ते पोलीस नसल्याची खात्री केली.
“ मी आता प्रचिती ची बॅग घेऊन विमानतळावर जातोय.तिथेच तिला भेटेन.”
“ पटवर्धन सर, वीस लाखाचा अपहार! ” समिधा उद्गारली.
“ मलाही कळत नाहीसं झालय.बघू.” पाणिनी म्हणाला त्याने इंटरकॉमकरून सामान नेण्यासाठी वेटर पाठवा म्हणून सूचना दिली आणि तातडीच्या कामासाठी निघावं लागत असल्याने ७८९ रूम चं बिल तयार ठेवायला सांगितलं.प्रचिती आणि स्वत:ची बॅग घेऊन तो निघाला.
“ तू इथला किल्ला लढव समिधा.तुला आता सर्व पार्श्वभूमी माहिती झाल्ये.गरजेनुसार कनकचा सल्ला घे.आपण प्रचिती असल्याचं नाटक कर पण शक्यतो स्वत”च्या तोंडून आपण प्रचिती असल्याचं बोलू नको.समोरच्याची तशी समजूत मात्र करून दे.” तेवढ्यात वेटर सामान न्यायला आला.त्याच्या बरोबर पाणिनी रिसेप्शन ला गेला.स्वत:ची खऱ्या नावाने ओळख करून दिली आणि सांगितलं की खर तर आज रात्री मुक्काम करणार होतो पण अचानक एक फोन आल्यामुळे तातडीने जावं लागतंय.मी फक्त अंघोळीसाठी हॉटेल वापरलय.त्याचे पैसे देतो पण खोलीचं भाडं पूर्ण आकारू नका. पण रिसेप्शन वाल्याने स्पष्ट सांगितलं की एका दिवसाचं भाडं द्यायलाच लागेल.त्यावर पाणिनीने जरा वाद घातला आणि शेवटी माघार घेत म्हणाला, “ ठीक आहे, द्या बिल ” सामान आणणाऱ्या वेटरला तो म्हणाला, “ टॅक्सी बोलाव, मला एसटी स्टँड ला जायचय.” वेटर ने टॅक्सी आणली. टॅक्सीत बसल्यावर पाणिनी ड्रायव्हर ला म्हणाला, “ एस.टी. स्टँड ला घे गाडी. ” टॅक्सी सुरु झाली आणि रहदारीत मिसळली. वाटेत एका ठिकाणी त्याने टॅक्सी थांबवायला सांगितले.एका इमारतीत पाणिनी शिरला. आणि दोन मिनिटांनी बाहेर आला.
“ मला अंदाज होताच.” तो ड्रायव्हर ला म्हणाला. मला अचानक खितौला ला जायला लागतंय,यामुळे एस.टी. स्टँड ऐवजी विमानतळावर टॅक्सी वळव.आणि पटकन
“ अत्ता एवढ्या रहदारीत पटकन शक्य नाही.” ड्रायव्हर म्हणाला.
“ प्रयत्न कर.” पाणिनी म्हणाला आणि त्याने खिशातून काही नोटा काढून आधीच ड्रायव्हर ला दिल्या. “ विमानतळावर जाई पर्यंत जेवढे भाडे होईल,त्यापेक्षा जास्त पैसे देऊन ठेवतोय. कारण उतरु तेव्हा विमानाची वेळ अगदी जवळ आली असेल आणि तुला पैसे देण्याइतकाही वेळ हातात नसेल माझ्या.”
टॅक्सी ड्रायव्हर खुष झाला. “ काळजी करू नका आता बघा कशी पळेल टॅक्सी.” तो म्हणाला.
विमानतळ जवळ येताच टॅक्सी थांबली.पाणिनीने टॅक्सी ड्रायव्हर ला हमालाला बोलावण्यास सांगितलं.
“ खितौला ला जाणाऱ्या विमानात ”माझं बुकिंग आहे,तू सामान वाहून नेणाऱ्या पट्यावर या बॅग टाक.” हमाला बरोबरच ही सूचना टॅक्सी ड्रायव्हरही ऐकेल याची दक्षता पाणिनीने घेतली.टॅक्सी निघून गेली. ती जाताच पाणिनीने हमालाला थांबवले. “ थांब जरा, मला खितौला जायचय हे चुकीचं सांगितलं तुला मी.त्या बॅग आण इकडे परत.” मला एक काम आहे ते आधी करू दे.”
“ ठीक आहे. ” हमालाने उत्तरं दिले. पाणिनीने त्याला पैसे देऊन खुष केलं आणि जायला सांगितलं.तो गेल्यावर पाणिनीने तिकीट काऊंटर वरून तिकीट घेतलं. थोडा वेळ वेटिंग रूम मधे थांबला.आणि विमानाची अनाउन्समेंट झाल्यावर निवांतपणे विमानात चढला.आत शिरतानाच त्याने सर्व प्रवाशांवर नजर फिरवली.आत कुठेच प्रचिती चा पत्ता नव्हता.पण आता उशीर झाला होता विमानात चढणारा तो शेवटचा प्रवासी होता आणि आणि विमान आता उड्डाणासाठी तयार होते.परतीचा प्रवास शक्य नव्हता. नाईलाजाने तो देवनार येई पर्यंत बसला.नंतर खाली उतरून हॉटेल मधे गेला.शांतपणे जेवण केलं आणि डेल्मन हॉटेल ला समिधाला फोन लावला.
“ तू जिची भूमिका करते आहेस तिची काही खबर?” त्याने समिधाला विचारलं.
“ काहीही नाही.”
“ ती आणि मी एकाच विमानाने देवनार ला जाणार होतो.ती आधी जाऊन बसणार आणि मी आयत्या वेळेला येणार असं ठरलं होतं.पण मी विमानात बसलो तेव्हा कळल की ती आत नाहीये.”
“ आता?”-समिधा ने विचारलं.
“ मला डबल क्रॉस केलंय. तरी अखेरची संधी म्हणून मी उद्या १०.३० ला तिच्या ऑफिसात जाणार आहे.ती असेल तर ठीक आहे नसेल तर मी निघून येईन आणि मी हात झटकून या प्रकरणातून मोकळा होईन.”
“ काही घडलं तर तुम्हाला कळवू? आणि कधी?”
“ मला नको तुझ्या सरांना कळव.कनकला.” पाणिनी म्हणाला
( प्रकरण ५ समाप्त)