Blackmail - 11 in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | ब्लॅकमेल - प्रकरण 11

Featured Books
  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

Categories
Share

ब्लॅकमेल - प्रकरण 11

प्रकरण ११

न्यायाधीश समीप सरदेसाई स्थानापन्न झाल्यानंतर त्यांनी कोर्टात सभोवताली नजर टाकली. “ही वेळ सरकार पक्षविरुद्ध प्रचिती पारसनीस या प्रकरणातील प्राथमिक सुनावणीसाठी राखून ठेवण्यात आली आहे तिच्यावर विवस्वान याच्या खुनचा आरोप आहे आरोपी कोर्टात हजर आहे? आणि त्याचे वकील?”
पाणिनी पटवर्धन उठून उभा राहिला. “मी आरोपीचा वकील आहे अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धन.” तो म्हणाला
न्यायाधीश हसले. “मी ओळखतो तुम्हाला. आणि सरकार पक्षाकडून कोण हजर आहे?”
सरकारी वकील रौनक फारुख कुठून उभा राहिला. “मी आहे न्यायाधीश महाराज. माझं नाव रौनक फारुख”
“छान तर मग आपण सुरू करूया खटला. त्यापूर्वी मला एक सांगायचय की या खटल्यातील आरोपीचे वकील म्हणून काम पाहणारे पाणिनी पटवर्धन हे त्यांच्या नाट्यपूर्ण उलट तपासणीसाठी प्रसिद्ध असले आणि लोकप्रिय असले तरीही दोन्ही वकिलांनी हे लक्षात ठेवावं की ही प्राथमिक सुनावणी आहे. त्यातील हेतू दोन्ही वकिलांनी लक्षात घ्यायला हवा की गुन्हा घडला आहे का? आणि त्या गुन्ह्याचा संबंध आरोपीशी लावण्या जोगी परिस्थिती आहे का? एवढाच हेतू प्राथमिक सुनावणीचा असतो. त्यामुळे या खटल्यात हजर करण्यात येणाऱ्या साक्षीदारांच्या विश्वासार्हतेची तपासणी करण्याचं काम माझं नाही सकृत दर्शनी पुरावा जमा करणे एवढेच मी पाहणार आहे एकदा का लक्षात आलं की गुन्हा घडला आणि आरोपीशी त्याचा संबंध लावण्या एवढा पुरावा दाखल केला गेला आहे, की मी आरोपीला शिक्षा सुनवीन. आरोपीच्या बाजूने कितीही पुरावा असला तरी त्याचा मी विचार करणार नाही दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर पुरावे किती वजनदार आहेत याचा विचार मी करणार नाही. हां, मात्र आरोपीने जर सरकार पक्षाचा पुरावा पूर्णपणे उधळून लावण्या जोगा पुरावा स्वतः सादर केला तर मग परिस्थिती वेगळी असेल. आणि मी त्याचा विचार जरूर करीन. पण प्राथमिक सुनावणी मध्ये अशा प्रकारचे प्रसंग खूप कमी घडतात मला वाटतं हे दोन्ही वकीलानाही पटलं असेल तर खटल्याचं कामकाज सुरू करावं” न्यायाधीशांनी आदेश दिला.
सरकारी वकील रौनक फारुख याची ख्याती अशी होती की त्याने लढलेल्या प्रकरणात त्याच्या कार्यकाळात अनेक आरोपींना मृत्यूची सजा फर्मावली गेली होती. त्याच्या दृष्टीने हे प्रकरण म्हणजे त्याच्या लौकिकाला साजेस नव्हतं म्हणजे फारच सोपं प्रकरण होतं. पण मुख्य सरकारी वकील खांडेकर यांनी ही जबाबदारी त्याच्यावर सोपवल्यामुळे तो आत्ता कोर्टात हजर होता.
त्यांनी आणलेला पहिला साक्षीदार म्हणजे विवस्वान च्या घरात मोलकरीण म्हणून काम करणारी बाई होती. ती साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभी राहिली आणि तिने शपथ घेतल्यावर सरकारी वकील यांनी तिला पहिला प्रश्न विचारला
“विवस्वान याला तू ओळखत होतीस?”
“हो. ओळखत होते.”
“जिवंत अवस्थेत त्याला तू शेवटचं कधी पाहिलस?”
“या महिन्याच्या दहा तारखेला मंगळवारी.”
“दुपारी चार वाजता”
“त्यानंतर पुन्हा त्याला बघायचा योग कधी आला?”
“रविवारी संध्याकाळी १५ तारखेला”
“तेव्हा तो जिवंत होता?”
“नाही मेला होता तो”
“तू काय केलंस पुढे?”
“मी त्या अपार्टमेंटच्या सेक्रेटरी ला कळवलं आणि त्यांनी नंतर ते पोलिसांना कळवलं.”
“घ्या तुम्ही उलट तपासणी”
“मला काही विचारायचं नाही” पाणिनी पटवर्धन म्हणाला.
त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याला साक्षी साठी बोलवण्यात आलं. खोलीत पडलेल्या प्रेताची स्थिती निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेला नकाशा त्याला अनुलक्षून असलेले फोटोग्राफ हे पुरावा म्हणून दाखल करण्यात आले.
फारुखने नंतर पुष्ण मार्कण्डे या पोलीस अधिकाऱ्याला साक्षी साठी प्रचारण केलं विवस्वानच्या अपार्टमेंटची तपासणी या अधिकाऱ्याने केली होती.
“काय आढळलं तुला तपासणीत” फारुखने सुरुवात केली.
“प्रेताच्या जवळ प्रचिती पारसनीस क्रेडिट कार्ड पडलं होतं”
“त्या कार्डाचं काय केलंस तू पुढे?”
“ते कार्ड नंतर ओळखता यावं म्हणून त्याच्यावर मी काही विशिष्ट खूण करून ठेवली”
“ मी तुला आता एक कार्ड दाखवतो ते तुला ओळखता येतं का सांग म्हणजे हेच ते कार्ड आहे का हे सांग” -फारुख
असं म्हणून सरकारी वकीलाने त्याला एक कार्ड दाखवलं
“हे तेच क्रेडिट कार्ड आहे, जे मला प्रेताजवळ सापडलं.”
“कशा वरून?”
“त्यावर क्रेडीट कार्डाचा नंबर असतो मी टिपून ठेवला होता. शिवाय त्यावर खुणेसाठी मी विशिष्ट ठिकाणी भोकं पडून ठेवलं होतं.”
“क्रॉस”
“नाही घ्यायची मला” पाणिनी खुषित येऊन म्हणाला.
त्यानंतर रौनक फारुखने ठसे तज्ञ बोलावला.घरात सर्वत्र अनेक ठसे मिळाल्याचे त्याने कथन केले.
“या ठशांशी तू ओळख पटवलीस का?”
“हो सर. त्यातला एक ठसा आरोपीच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा आहे आणि दुसरा आरोपीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा आहे”
“तुला खात्री आहे तशी?”
“शंभर टक्के खात्री आहे”
“बेडरूम मध्ये आणखीन काही होतं ?”
“रक्ताचे डाग लागलेला एक टॉवेल तिथे पडला होता ओलसर झालेला टॉवेल म्हणजे वर करणी कोणीतरी तो धुवून .....”
“माझी हरकत आहे या प्रश्नाला हा साक्षीदाराचा अंदाज आहे.” पाणिनी म्हणाला
“सस्टेंड”
“ठीक आहे. रक्ताळलेला टॉवेल.” साक्षीदार म्हणाला
“तुमच्याकडे तो आता असेल तर तो इथे सादर करा.” साक्षीदाराने आपल्याकडील सील केलेल्या कागदी पिशवी मधून टॉवेल बाहेर काढला तो साक्षीदाराने वर्णन केल्याप्रमाणे थोडासा ओलसर आणि लालसर होता.
“आम्हाला हा सरकार पक्षाचा पुरावा म्हणून सादर करायचा आहे. पुरवा क्रमांक ब.”
“माझी काही हरकत नाही.” पाणिनी पटवर्धन म्हणाला
“तुला सापडलेल्या ठशांचा तू फोटो काढलास?” फारुखने पुढचा प्रश्न केला
“हो सर”
“ते फोटो पण इथे सादर कर”
साक्षीदाराने आपल्याकडील विविध फोटोंची एक एक मालिकाच सादर केली त्यात मृत व्यक्ती अंथरुणा त रक्ताच्या थारोळ्यात पडलेली उशीर जवळ रक्त जमा झालेलं काही रक्त जमिनीवर सांडलेलं दिसत होतं.
पाणिनीने त्याचीही उलट तपासणी घेतली नाही.
त्यानंतर सरकारी वकिलाने ऑटोप्सी सर्जन ला साक्षीसाठी बोलवलं त्याने साक्षीत सांगितलं की मृत व्यक्तीच्या कवटीच्या मागच्या बाजूला शिरलेली गोळी त्याने बाहेर काढली ती गोळी पॉईंट २२ कॅलिबर ची होती. ती कपाळातून आज शिरली होती डोळ्याच्या पातळीच्या दोन इंच वरच्या बाजूने ती आत शिरली होती आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता .
सरकारी वकीलाने त्याला विचारलं, “मृत्यू कधी झाला?”
“माझ्या अंदाजानुसार आणि मी केलेल्या विविध चाचण्यांच्या आधारे मी असे सांगू शकतो की १२ तारखेच्या गुरुवारी दुपारी दोन ते १४ तारखेच्या शनिवारी पहाटे पाच या दरम्यान झाला असावा.”
“मृत्यू तातडीने आला?”
“नाही. मला नाही वाटत तसं. गोळी लागल्या लागल्या तो प्रथम बेशुद्ध पडला असावा आणि शरीराची कुठलीच हालचाल त्यामुळे झाली नसावी पण बेशुद्ध अवस्थेत असताना सुद्धा हृदयाकडून मेंदूकडे रक्तपुरवठा होत होता त्यामुळेच खूप मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला असावा. गोळी लागल्यानंतर १० ते १५ मिनिटांनी किंवा तासाभराने तो गेला असावा. नक्की नाही सांगता येणार मला.”
“तुम्ही मघाशी म्हणालात की तुम्ही गोळी डोक्यातून बाहेर काढलीत?”
“हो सर.”
“त्या गोळीच काय केलं तुम्ही?”
“दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत ती गोळी मी बॅलेस्टिक एक्सपोर्ट च्या ताब्यात दिली.”
“ज्या बंदुकीतून ती गोळी मारण्यात आली ते हत्यार तुम्ही निश्चित करू शकता?”
“नाही आत्ताच्या घडीला तरी नाही. म्हणजे आम्हाला हे माहितीये की लांब नळी असलेल्या बंदुकीतून....”
“थांबा, हा साक्षीदाराचा अंदाज आहे आणि हा साक्षीदार बंदुकी बाबतचा तज्ञ नाही.” पाणिनी म्हणाला.
फारुख च्या चेहऱ्यावर आनंद पसरला पाणिनीने जरी हरकत घेतली असली तरी त्याला न्यायाधीशांच्या मनावर जे काही ठसवायचं होतं ते या प्रश्नातून ठसवलं गेलं होतं.
“मी या साक्षीदाराला तात्पुरतं थांबवतोय गरज पडेल तेव्हा त्याला पुन्हा मी बोलवीन तोपर्यंत मी युनायटेड एअरलाइन्स मध्ये रीवाइथल्या विमानतळावर काम करणाऱ्या मिस मैथिली यांना साक्षीसाठी बोलवतो.
मिस मैथिली साक्षीदाराच्या पिंजऱ्यात हजर झाली शपथ वगैरे घेऊन झाल्यावर फारुख ने तिला पहिला प्रश्न विचारला
“१२ तारखेच्या गुरुवारी तुम्ही नोकरीवर हजर होतात? आणि असला तर मला सांगा की आरोपीला तुम्ही यापूर्वी पाहिलं होतं का?”
“हो पाहिलं होतं मी”
“कुठे ?”
“गुरुवारी म्हणजे बारा तारखेला संध्याकाळी तिकिटाच्या काउंटरवर”
“साधारण किती वाजता?” फारुख
“बरोब्बर पावणे सात.”
“अगदी एवढ काटेकोरपणे कसं लक्षात आहे?”
“कारण तिने विचारलं मला की संध्याकाळी ६.२७ ला ला सुटणारं विमान हे वेळेवर सुटलं आहे की तिला ते विमान आता गाठता येईल म्हणून. हे जाणून घेण्यास ती खूप उत्सुक होती. मी त्यावेळी घड्याळात बघून म्हणाले की विमान फक्त पाच मिनिटच उशिरा सुटल आहे. म्हणजे ६.३२ ला. आता पुढचं विमान मिळवण्यासाठी तिला साधारण सव्वा तास थांबावं लागेल म्हणजे आठ वाजता तिला ते विमान मिळेल.”
“तिने काय केलं मग?”
“तिनं देवनारला जाण्यासाठी तिकिटाची चौकशी केली.”
“आणि नंतर काय झालं हा प्रश्न विचारताना आता फारुखच्या चेहऱ्यावर विजयाच हास्य होतं .
“तिने आपली पर्स काउंटर वर ठेवली आणि ती म्हणाली की बँकेच्या क्रेडिट कार्ड ने ती पेमेंट करेल तिने पर्स वर ठेवली त्यावेळी मला ती दिसली. अचानक तिने ती पर्स खाली टाकली.”
“तुम्ही अचानक असा शब्दप्रयोग वापरलात?”- फारुख
“हो अचानक पण अगदी जाणीवपूर्वक”
“असं करण्याचं काही कारण होतं?”
“तिच्या पर्समधे रिव्हॉल्व्हर होतं.”
“कुठल्या प्रकारचे रिव्हॉल्व्हर?
“लांब नळी असलेल आणि लाकडी हँडल असलेलं”
“बर, नंतर काय झालं?”
“नंतर तिने आपल्या पर्समध्ये हात घालून काहीतरी धुंडाळल्यासारखं केलं. परत पर्स काउंटर वर ठेवली पण ती काऊटर वर ठेवल्यामुळे मला त्याच्या आतलं आता दिसत नव्हतं आणि अचानक ती म्हणली, ‘अरेरे माझं क्रेडिट कार्ड कुठे दिसत नाहीये.’ नंतर तिने क्षणभर विचार केला आणि म्हणाली , ‘अॅडव्होकेट पटवर्धन यांनी माझ्या तिकिटाचे पैसे देऊन तिकीट राखून ठेवल आहे का?’ त्यावर मी तिला सांगितलं की पाणिनी पटवर्धन यांनी ६.२७ च्या विमानाचे तिकीट ठेवले होते आता ते तिकीट दुसऱ्या विमानाला नाही चालणार.पुन्हा तिने आपली पर्स धुंडाळली. तिचा चेहरा थोडा तणाव मुक्त झाला आणि म्हणाली माझ्याकडे तिकीटा पुरते पैसे आहेत.
“ म्हणून तुम्ही तिला तिकीट दिलं ?”- फारुख
“हो सर”
“बर पुढे काय झालं?”
“नंतर ती जायला निघाली मी परत तिच्या पर्स कडे नजर टाकली त्या पर्स मध्ये ठेवलेल्या रिव्हॉल्व्हर मुळे पर्स चा आकार थोडा.....”
“या गोष्टीला पाणीने पटवर्धन हरकत घेऊ शकतात कारण हा साक्षीदाराचा अंदाज आहे ते हरकत घेतील असं गृहीत धरून मी उत्तराचा हा भाग काढून टाकत आहे.”
न्यायाधीश स्वतःहून म्हणाले.
पाणिनी कुठून उभा राहिला. “आपण असं वाक्य रेकॉर्डवर घेऊया पर्समधील कुठल्यातरी एका मोठ्या वस्तूमुळे पर्सचा आकार बिघडला होता.”
“.”ठीक आहे न्यायाधीश म्हणाले
“घ्या उलट तपासणी” सरकारी वकील फारुख म्हणाला.
उलट तपासणी घेण्यासाठी पाणिनी उभा राहिला आणि त्याने पहिला प्रश्न विचारला
“आरोपीची ओळख पटवताना तू तिला ओळख परेड मध्ये रांगेत ओळखलस?”
“नाही तशाप्रकारे रांगेत ओळख पटवली नाही.”
“तिकीट काउंटर वर तू तिला पाहिल्यानंतर आत्ता या कोर्टात येण्यापूर्वी तू तिला पाहिलेलं नाहीस?”
“मी तिचा फोटो ओळखलास?”
“पण तू तिला ओळख परेडमध्ये ओळखलं नाहीस?”
“नाही आणि त्याची गरजही नव्हती पटवर्धन सर. तिकीट च्या काउंटरवर ती माझ्याशी ज्या पद्धतीने बोलत होती वागत होती आणि माझं लक्ष वेधून घेतलं होतं त्यावरून मी तिला कुठेही कधीही ओळखू शकले असते”
दॅट्स ऑल युवर ऑनर” पाणिनी म्हणाला
फारुख चा पुढचा साक्षीदार हा एक मध्यमवयीन माणूस होता साक्ष देताना त्याने सांगितलं की विमानाच्या स्वच्छतेचे तो काम करतो.
“गुरुवारी 12 तारखेला रात्री आठ वाजता लॉस एंजलिसच्या विमानतळावरून देवनार ला जाणाऱ्या विमानाची स्वच्छता तुम्ही केली होती?”
“होय सर”
“स्वच्छता करत असताना तुम्हाला वेगळं काही सापडल?”
“मला रिव्हॉल्व्हर सापडलं”
“कुठे सापडलं?”
“विमानाच्या टॉयलेट मध्ये जे टॉवेल्स ठेवलेले असतात त्या टॉवेलमध्ये ते ठेवलेलं सापडल”
“पण तुमचं तिकडे लक्ष कसं काय गेलं नेमकं?”
“हे टॉवेल एकमेकांवर एक रचून एका खोक्यात ठेवलेले असतात मला स्वच्छता करताना त्या खोक्याच्या खालचा भाग सुद्धा स्वच्छ करायचा होता म्हणून मी तो खोका वर उचलला. मला तो खोका नेहमीपेक्षा जास्त जड वाटला म्हणून मी काय आहे ते बघण्यासाठी खोक्यात हात घातला तेव्हा टॉवेलच्या मध्ये लपवलेलं रिव्हॉल्व्हर मला दिसलं.”
“तुम्ही पुढे काय केलं?”
“मी ती माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिली”
“त्या अधिकाऱ्यांनी पुढे काय केलं तुम्हाला माहिती आहे?”
“त्यानं पोलिसांना कळवलं आणि पोलिसांच्या सूचनेनुसार आणि त्या रिव्हॉल्व्हर चा तपशील नोंद करून घेतला”
“काय तपशील होता तो?”
“ते पॉईंट 22 कॅलिबरचं रिव्हॉल्व्हर होतं. नऊ इंचापेक्षा थोडं जास्त लांबीचं. आणि लाकडी हँडल होतं. त्या रिव्हॉल्व्हर वर एक नंबर कोरलेला होता १-३-९-५-७-३ याशिवाय त्याचं उत्पादन करणाऱ्या कंपनीचा नाव सुद्धा त्याच्यावर कोरलेलं होतं.”
“मी तुला आता एक रिव्हॉल्व्हर दाखवतो आणि तेच रिव्हॉल्व्हर तुला विमानात सापडल होत का सांग”
असं म्हणून सरकारी वकिलाने पुढे येऊन त्या साक्षीदाराला एक रिव्हॉल्व्हर दाखवलं. प्रचिती पारसनीसने एकदम घाबरून पाणिनी पटवर्धन चा हात इतका जोरात दाबला की तो सोडवून घेण्यासाठी पाणिनीला आपल्या दुसरा हाताचा वापर करावा लागला प्रचिती चा चेहरा आता एकदम तणावाखाली होता आपले दोन्ही ओठ तिने घट्ट मिटून घेतले होते. तोपर्यंत साक्षीदाराने ते रिव्हॉल्व्हर ओळखलं होतं.
सरकारी वकील फारुखने त्याला पुढचा प्रश्न विचारला,
“तुला ते रिव्हॉल्व्हर टॉवेल खाली मिळालं तेव्हा ते कुठल्या अवस्थेत होतं?”
“त्याच्यातली सर्व काढतुसे भरलेली होती फक्त एक काडतुसाची जागा रिकामी होती म्हणजेच एक गोळी त्याच्यातून आधीच उडालेली असणार.” साक्षीदारांन उत्तर दिलं
“घ्या उलट तपासणी मिस्टर पटवर्धन” सरकारी वकील फारुख पाणिनीला म्हणाला.
पाणिनी उठून उभा राहिला त्याने एकच प्रश्न साक्षीदाराला विचारला.
“तुला टॉयलेट मधल्या टॉवेल्स खाली जे रिव्हॉल्व्हर मिळालं ते नेमकं कधीपासून तिथे ठेवण्यात आलं होतं तुला माहिती आहे का?”
“नाही सर त्याची मला काहीच कल्पना नाही ते मला तिथे मिळालं एवढंच माहिती आहे .”
“थँक्यू मला आणखी काही प्रश्न विचारायचे नाहीत.” पाणिनी खुष होवून म्हणाला.
सरकारी वकील फारुख याने त्यानंतर ते रिव्हॉलवर प्रचिती पारसनीस चा भाऊ प्रयंक याने खरेदी केले असल्याबाबत नोंद असलेले रजिस्टर पुरावा म्हणून दाखल केले. त्याबद्दल पाणिनी ने कोणतीही हरकत घेतली नाही
त्यानंतर सरकार पक्षातर्फे प्रचिती पारसनीसने ज्या विमानाने प्रवास केला होता त्या विमानाच्या एअर होस्टेस ला साक्षीदार म्हणून प्रचारण केलं गेलं तिने आपल्या साक्षीत सांगितलं गुरुवारी 12 तारखेच्या रात्री आठ वाजता रीवावरून देवनारला जाणाऱ्या विमानात पॅसेंजर म्हणून होती आणि ती तिच्या लक्षात राहण्याचं कारण म्हणजे तिने टॉयलेटला जाताना सुद्धा तिच्या कडील पर्स आपल्याबरोबर घेतली होती. विमानात चढताना त्या पर्समध्ये काहीतरी मोठी लांबडी वस्तू असावी असं तिला वाटलं होतं कारण त्यामुळे पर्स च आकार बिघडल्यासारखा वाटत होता. टॉयलेट मधून बाहेर आल्यानंतर मात्र ती पर्स सर्वसामान्य पर्स प्रमाणेच वाटत होती. टॉयलेटला जाताना स्त्रिया आपली पर्स शक्यतो बरोबर नेत नाहीत त्यामुळे हा प्रसंग तिच्या लक्षात राहिला त्यामुळे प्रचिती पारसनीस च व्यक्तीमत्व देखील तिच्या लक्षात राहिल. पाणिनीने तिची कोणतीही उलट तपासणी घेतली नाही.
त्यानंतर सरकार पक्षातर्फे बॅलेस्टिक एक्सपर्ट म्हणजे बंदुकीच्या गोळ्या मधील तज्ञ व्यक्ती साक्षीसाठी पाचारण करण्यात आली त्याने असा निर्वाळा दिला की ज्या गोळीने विवस्वानचा मृत्यू झाला ती गोळी प्रयंक पारसनीसच्याच रिव्हॉल्व्हर मधून मारण्यात आलेली होती. याही साक्षीदाराची उलट तपासणी पाणिनी ने घेतली नाही.
यानंतर प्रयंक ज्या अपार्टमेंट मध्ये राहत होता त्या अपार्टमेंटच्या सेक्रेटरीची साक्ष घेण्यात आली त्यामुळे सांगितलं की प्रयंक पारसनीस अपघातात बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्या बहिणीला त्याच्या फ्लॅटची किल्ली देण्यात आली आणि पुढच्या बऱ्याच गोष्टी मार्गी लावण्यासाठी त्याची बहीण त्या फ्लॅटमध्ये सातत्याने येणे जाणे करत होती. याही साक्षीदाराची पाणिनी पटवर्धन ने उलट तपासणी घेतली नाही
पुढचा साक्षीदार म्हणजे मयताच्या अपार्टमेंट मधील वॉचमन होता. त्यानं सांगितलं की आरोपी प्रचिती पारसनीस हिने मयत व्यक्तीच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करताना त्यानं तिला पाहिलं नव्हतं पण तिथून बाहेर पडताना त्याला ती दिसली होती त्यावेळी तिच्या हातात एक काळी पर्स होती आणि एक हॅन्डबॅग होती पर्स ही आकाराने त्याला थोडी विचित्र वाटली म्हणजे आत काहीतरी मोठ्या आकाराची वस्तू बळजबरीने भरली असावी त्यामुळे पर्सचा आकार बिघडला असावा असं त्याला वाटलं त्यामुळे ती पर्स त्याच्या लक्षात राहिली. सरकारी वकील फारुख याने या साक्षीदाराला प्रचिती पारसनीसची तथाकथित पर्स दाखवली आणि त्याची ओळख पटवायला सांगितली त्याने हीच पर्स आपल्या हातात घेऊन प्रचिती पारसनीस बाहेर पडली असे सांगितले तो पुढे असेही म्हणला की एक तर हीच ती पर्स असावी किंवा अगदी बरोबर याच पर्स सारखी दिसणारी दुसरी पर्स असावी.
एवढ्या साक्षी झाल्यानंतर न्यायाधीश दोन्ही वकिलांना उद्देशून म्हणाले,
“कोर्टाचं कामकाज थांबवण्याची आता वेळ आली आहे.हा खटला उगाचच लांबवण्यात काही अर्थ नाही गुन्हा घडलाय आणि त्याचा संबंध आरोपेशी आहे हे सिद्ध करणारा पुरेसा पुरावा सरकार पक्षांना सादर केलेला आहे खरं म्हणजे इतका सविस्तर आणि बारकाव्यांनीशी पुरावा आणि साक्षीदार सादर केले गेले याचंच मला आश्चर्य वाटतंय कारण या प्राथमिक सुनावणीत खरंतर हे अपेक्षित नाही.”
सरकारी वकील फारुख म्हणाला,
“आरोपीचे वकील पटवर्धन एक अत्यंत हुशार आणि प्रसिद्ध असे वकील आहेत. पुराव्यात थोडी जरी त्रुटी राहिली तरी त्यावरून ते संपूर्ण खटला उलटवू शकतात अशी त्यांची ख्याती आहे. म्हणून आमचा प्रयत्न होता की साक्षीदारांच्या जबानीत आणि पुराव्यात कुठेही त्रुटी राहू नये.”
“नाही तुमच्याकडून कुठली त्रुटी राहिली असं मला वाटत नाही. आपण आता साक्षी ,पुरावे थांबवूया आणि आरोपीला दोषी ठरवण्याबाबत निर्णय घेऊ या.” न्यायाधीश म्हणाले.
पाणिनी उठून उभा राहिला आणि न्यायाधीशांना उद्देशून अत्यंत आदराने पण ठामपणे म्हणाला, “जर कोर्टाची काही हरकत नसेल तर बचाव पक्ष काही साक्षीदार हजर करू इच्छितो.”
न्यायाधीशांना आश्चर्य वाटलं. “का बरं?”
“कारण आमचा तो अधिकार आहे.” पाणिनी ठामपणे म्हणाला
“तुम्ही साक्षीदारांना बोलू शकता पण मी प्रथमच सांगितल्याप्रमाणे साक्षीदारांची विश्वासार्हता तपासण्याचं काम हे कोर्ट करणार नाही त्याचप्रमाणे वरकरणी वाजवी वाटणाऱ्या संशयाची शहानिशा करण्याचे काम हे कोर्ट करणार नाही. सकृतदर्शनी आरोपीला या प्रकरणात गोवण्याजोगी स्थिती आहे या गोष्टीला तुम्ही नाकारू शकत नाही मिस्टर पटवर्धन.”
“सकृतर्शनी आरोपी दोषी ठरला आहे किंवा नाही हे खटल्याच्या अखेरीस सर्व पुरावे सादर झाल्यानंतर आणि त्याचा विचार केला गेल्यानंतरच ठरवता येत. बचाव पक्षाला आपले पुरावे आणि साक्षी देण्याचा अधिकार डाउनलोड परस्पर आरोपीला दोषी ठरवलं जाणं हे......” पाणिनी म्हणाला त्याचं बोलणं मध्येच तोडून न्यायाधीश म्हणाले, “ठीक आहे ठीक आहे आपण उद्या हा खटला पुढे चालू ठेवू. पण बचाव पक्षाच्या वकिलने केवळ वेळ घालवण्यासाठी मुद्दामून संबंध नसलेले साक्षीदार उभे करणे किंवा गरज नसलेले प्रश्न त्यांना विचारणे अशा गोष्टी करू नयेत. हे कोर्ट अर्थातच बचाव पक्षाला किंवा सरकार पक्षाला विनाकारण झुकते माप देणार नाही.” न्यायाधीश म्हणाले आणि आपल्या आसनावरून उठले.
“पटवर्धन साहेब आपली केस सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार म्हणजे हे कोर्ट मला दोषी ठरवणार?” प्रचितीने घाबरून विचारले.
“आत्ताच काही सांगता येणार नाही तुम्ही आता कुठल्या गोष्टीचा विचार करून नको उद्या सकाळी साडेदहा वाजेपर्यंत आपल्याला वेळ आहे त्याच्यात आणखीन काही माहिती काढता येते का मी प्रयत्न करणार आहे. पण मला एक सांग तुला हे रिव्हॉल्व्हर कुठे सापडलं?”
“तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे मी जेव्हा विवस्वानला भेटायला गेले तेव्हा तिथे ते जमिनीवर पडलं होतं त्याला रक्त लागलं होतं मी ते उचलून बाथरूम मध्ये नेलं ते स्वच्छ धुतलं त्याच्यावरती रक्ताचे डाग स्वच्छ केले आणि ते रिव्हॉल्व्हर माझ्या पर्समध्ये ठेवलं आणि हे सगळं करत असतानाच बहुतेक माझं क्रेडिट कार्ड पर्स मधून बाहेर पडलं.”
“आणि ते रिव्हॉल्व्हर तू विमानात लपवून ठेवलंस?”
“हो.त्या साक्षीदाराने सांगितल्याप्रमाणे टॉवेलच्या गठ्ठ्यात मी ते ठेवून दिलं मला वाटलं कोणालाच ते मिळणार नाही.”
“तू ज्या ऑफिसमध्ये काम करतेस तिथल्या तुझ्या सहकारी मुलींबद्दल मला जरा सांग त्यातल्या कोणी मला ती चिठ्ठी लिहिली असावी?”
“तिथल्या कोणीतरी ती लिहिली असावी नेमकं सांगता येणार नाही.”
“पण ती चिठ्ठी टाईप केलेली होती इलेक्ट्रिक टाईपरायटिंग मशीन वर”
“पटवर्धन साहेब आमच्या ऑफिसमधले सगळेच टाईपराईटर इलेक्ट्रिक टाईपराईटर आहेत.”
“बर,ठीक आहे.” पाणीनी नाईलाज होऊन म्हणाला “धीर धर उद्याची सकाळ काहीतरी चांगलं घेऊन येईल.” आणि आपली ब्रिफ केस घेऊन कोर्टातून बाहेर पडला.
(प्रकरण ११ समाप्त)