Malika....Aayushyatlya Anubhvanchi - 8 in Marathi Short Stories by Arpita books and stories PDF | मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 8

The Author
Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 8

पान ८

                        ( हे पान लिहिण्यासाठी काही वैयक्तिक कारणामुळे उशीर झाला , त्या बद्दल क्षमस्व. इथून पुढे असे होणार नाही.याची काळजी घेतली जाईल.)

 

                     आम्ही शाळेच्या इमारतीमध्ये राहत असल्यामुळे ती बिल्डिंग आमच्यासाठी आमचा बंगला असायचा . आमच्या बंगल्याला दोन दरवाजे होते . पण , दोन्ही समोरच्या बाजूनेच होते .

कारण, रूम मोठी होती ना म्हणून . तेव्हा आरती जे दुसरं दार होतं ते बंद करायची. आणि मला ' Tune Mari  Entry ' हे Song म्हणायला सांगायची . ती बाहेर  Passage मध्ये असायची. मी

जेव्हा Song मधला Entry हा शब्द म्हणेल तेव्हा ती दरवाजात एखादी Model Pose देऊन उभी राहायची आणि नंतर मग आत येऊन डान्स करायची. अजून एक म्हणजे आम्ही आमच्या गोल

जिन्यामध्ये एक- एक पायरीवर उभं राहायचो , एका लाईन मध्ये . आणि एकमेकांच्या खांद्यावर एक हात ठेऊन दुसऱ्या हाताने 'चला हवा येऊ द्या' असा थोडा Dance करायचो. आता खूप बालिश

वाटतंय बोलायला. पण , आम्ही सगळ्याजणी रोज संध्याकाळी ' चला हवा येऊ द्या ' करायचो.

 

              आमच्या रेक्टर मॅडम च आडनाव राजगिरे बाई असं होत. कोणी तरी त्यांच नाव राजगिऱ्याच्या लाडू असं ठेवलं होत. म्हणजे कोणी ठेवलं आम्हाला पण खरंच माहित नव्हतं. खरतर तेव्हा

सगळ्या मुली असच बोलायच्या बाईंना. म्हणून आम्ही पण असच बोलायचो बोलता बोलता. एक दिवस आम्ही बोललो होतो , हे कळलं बाईंना. त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं ओरडल्या नाहीत

. शांतपणे समजावून सांगितलं. नंतर आम्ही पण कधी बाईंना तस बोललो नाही. पण खरंच बाईंना ते नाव आम्ही ठेवलं नव्हत.

 

           एकदा काय झाल , धनश्री ने टॉप वाळायला टाकला होता. पण तिने जेव्हा नंतर पाहिलं तेव्हा टॉप मधला काही भाग गायब झाला होता म्हणजे टॉप मधला पण अर्धा च टॉप होता. नंतर

आम्हाला वाटलं की , कोणीतरी मुद्दाम टॉप कापला असेल. आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा तो टॉप पाहिल्यावर आम्ही पण खूप हसलो होतो. कारण , खूपच विचित्र कापला होता टॉप . पण , हे सगळं

काहीच नाहीये . खरी मज्जा तर पुढे आहे . आम्हाला हे नंतर समजलं की , तो टॉप कोणी मुद्दाम कापला नव्हता . तर , आमच्या रूम च्या Passage मध्ये रोज रात्री झोपण्यासाठी एक Ladies

Security Guard यायच्या . आणि त्यांच्यासोबत एक काळ्या रंगाचा कुत्रा होता. त्याने फाडला होता टॉप .

 

            आम्ही सातवीत असताना आमच्या Hostel च्या Gathering ला आमचा गोवा डान्स होता. त्यामध्ये माझी आणि आरती ची जोडी होती. मी मुलगा आणि ती मुलगी होती. मी शर्ट - पॅन्ट

आणि मोठी हॅट घातली होती डोक्यात आणि आरती ने फ्रॉक घातला होता . माझ्या आयुष्यातला हा माझा पहिला डान्स होता . आमचा डान्स खूप मस्त झाला होता. माझ्या पप्पांना तेव्हा मी घातलेला

तो ड्रेस खूप आवडला होता. तेव्हा त्यांनी कार्यक्रम झाल्यावर माझे खूप फोटो काढले .

 

          एवढ सगळं मी करत असले तरी , मला खरंतर चित्र काढायलाच खूप आवडायचं . आणि तेव्हा अभिलाषा कडे मोठी स्केचबुक होती. त्यात मी एकदा Nature च खूप मस्त

  Drawing काढलं होत . एकदा मला असेच पप्पा भेटीला आल्यावर मी त्यांना मी काढलेली चित्र दाखवली. पण , तेव्हा ते मला खूप ओरडले . त्यांनी माझी स्केचबुक फेकून दिली आणि म्हणाले,

" तुला इथं अभ्यासासाठी ठेवलय . इथं राहून हे असलं  करायच नाही. " आणि एवढं बोलून ते निघून गेले .तेव्हा मला खूप वाईट वाटलं , खूप रडले होते मी . ती सर्व चित्रे मी गोळा केली.

  आज पण ती स्केचबुक आणि त्यातली चित्रे अभिलाषाकडे आहेत.

  

       माझी सातवीत असताना ७ वी ब ही तुकडी होती . आणि ७ वी क मध्ये श्वेता नावाची एक मुलगी होती. आता एवढं लक्षात नाही . पण , तिची आणि माझी ओळख झाली आणि मैत्रीही . पण

, आमच्या मंद पोरी मला तिच्या नावाने चिडवायच्या . काही पण गाणं म्हणायच्या. खूप येड्या होत्या . तेव्हा म्हणजे असलं आमच्या शाळेमध्ये खूप चालायचं. 

 

पुढचं पान लवकरच......