Even without the VM setting? in Marathi Anything by Ankush Shingade books and stories PDF | इ व्हि एम सेटींग नसतंच?

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

इ व्हि एम सेटींग नसतंच?

इ व्हि एम मशीन सेटींग ; होवूच शकत नाही?

अलिकडील काळात इ व्ही एम मशीन बेकायदेशीर असल्याचं मत भाजप आणि मित्र पक्ष जर सोडला तर सर्वच राजकीय पक्ष मांडतात. तसं पाहिल्यास २०१४ पासून भाजप सतत सत्तेवर येताच सर्व राजकीय पक्ष त्यात षडयंत्र असल्याचं कबूल करतात. म्हणतात की इस व्ही एम द्वारे मतदान सुरु असतांना मशीन हॅक केली जाते. तसा युक्तीवाद विरोधी पक्ष नेहमी व सातत्यानं करीत असतात. परंतु खरा विचार करायचा झाल्यास इ व्ही एम मशीन हॅक करता येवू शकते काय? किंवा त्या मशीनीत निदान फेरफार तरी? हं, काही लोकांचं म्हणणं असं आहे की त्या मशीनीत काहीही करता येवू शकतं. कारण ती एक मशीन आहे व मशीन सुरु असतांना तिला हॅकही करता येवू शकतं.
सन २०१४ पुर्वी २००९ चा काळ जर पाहिला, तर असं जाणवतं की त्याही काळात इ व्ही एस मशीनबाबत वादच होता. त्यावेळेस कॉंग्रेस शासन सत्तेवर होतं व भाजप आणि मित्रपक्ष म्हणत होतं की कॉंग्रेस इ व्ही एम हॅक करतं. मतांचं परीवर्तन करतं. आता मात्र सत्ता बदलली व तसा इ व्ही एम मशीन हॅक करण्याचा सूरही बदलला. आता चक्कं भाजपवर हल्लाबोल होतो. परंतु खरं सांगायचं झाल्यास ते राजकारण आहे. त्यात सामान्य लोकांनी पडायला नको असं मानून सर्वच मंडळी चूप बसतात.
एक मत........ लोकांना माहीत नाही एका मताची किंमत. लोकं आपल्या एका मताला एका शंभर रुपयाच्या पव्व्यात विकतात. जेव्हा की एका एका मतानं सरकार पडतं. असं बरेचदा झालेलं आहे. तसं पाहिल्यास सामान्य माणसाला देशात किंमतच नाही व इतर प्रसंगी त्याची किंमतही होत नाही. किंमत होते फक्त मतदान करतांना. जेव्हा एका मतानं सरकार पडत असते. आता लोकं म्हणतील की इ व्ही एम हॅक होते. मताचं परीवर्तन होते. कारण मशीनमध्ये आधीच सेटींग असते. तिथं लोकांच्या त्या मताला किंमत काय? याबाबतीत सांगायचं झाल्यास एवढंच सांगता येईल तेही हमखास म्हणजे इ व्ही एम मशीन ही सेट करता येवू शकत नाही. जर तशी मशीन सेट करता आली असती वा केल्या गेली असती तर लोकांना मतदान सुरु करण्यापुर्वी जे मॉकपोल दाखवलं जातं पन्नास लोकांचं मतदान करुन. ते दाखवलं गेलं नसतं. त्यानंतर व्हि व्हि पॅटमध्ये ज्या उमेदवाराला आपण मतदान केलं. त्याच्या निवडणूक चिन्हांचा फोटो आपल्याला दिसला नसता वा त्या फोटोची रशीद आपल्याला मिळाली नसती. यावरुन हे कळायला मार्ग मोकळा आहे की इ व्ही एम मशीनमध्ये आधीच सेटींग केलेलं नसतं. आता उरला प्रश्न हॅक करण्याचा. तर त्या दिवशी सर्व निवडणूक यंत्रणा व त्यातील अधिकारी कामाला लागलेले असतात. त्यातच सत्ताधीश पक्ष आणि विरोधी पक्ष देखील कामातच असतात. कुठे कसा गैरप्रकार होतो, त्या सर्वच गोष्टींकडे त्यांचं लक्ष असतं. अशावेळेस इ व्हि एम कोणी हॅक जर करीत असेल तर तो सहज पकडल्या जावू शकतो आणि सर्वांना आपला परीवार आहे. आपली मुलं व आपला संसार आहे. कोणी अशा प्रकारचं कृत्य कधीच करणार नाही. तेव्हा कोणीही आपल्या मनात इ व्हि एमच्या हॅक होण्याबद्दल वा त्याच्यात मतांचं परीवर्तन होण्याबद्दल किंतू परंतु बाळगू नये. जेणेकरुन इतर सामान्य लोकांमध्येही संभ्रम निर्माण होवू शकेल. इ व्हि एम ही मशीन मशीन जरी असली तरी ती सत्य दर्शविणारी मशीन आहे. असत्य दर्शविणारी मशीन नाही. यात शंका नाही. मग असे असतांना भाजपच सत्तेवर कसा?
भाजप यासाठी सत्तेवर आहे की त्यांनी लोकांच्या प्राथमिक गरजा ओळखल्या आहेत. त्या प्राथमिक गरजा आहेत अन्न, वस्र व निवारा. भाजप याच प्राथमिक गरजा योग्य प्रकारे पुरवीत आहेत. रस्ते चकाचक आहेत. शिवाय शुद्ध पाण्याची चोवीस तास प्रतिपुर्ती होत आहे. सामान्य माणसाला फक्त तेच हवं. याव्यतिरिक्त सामान्य माणसाचा उत्साह देवादिकात असतो. देवाच्याच नावावर काल बरीच युद्धही झालीत. तीच बाब हेरुन भाजपनं राममंदिराचा वाद चुटकीसरशी सोडवला. ती त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. शिवाय काश्मीरचा प्रलंबित वादही त्यांनी चुटकीसरशी सोडवला. ही देखील त्यांची जमेचीच बाजू आहे. लोकांना त्यामुळं माहीत झालं आहे की भाजपच असे आव्हानात्मक मुद्दे हाताळू शकते. दुसरं कोणी नाही. म्हणूनच ते भाजपला मतदान करतात. जर असेच संवेदनशील, भावनात्मक मुद्दे विरोधी पक्षाने समोर आणल्यास लोकं निश्चितच बाजू पलववतील. तसं इतर विरोधी पक्षांनी करायला हवं व तसे मुद्दे पुढे आणायला हवेत. जेणेकरुन इ व्ही एम मशीनवर ताशेरे ओढावे लागणार नाही व सत्ता परीवर्तन करता येईल यात शंका नाही.
महत्वाचं म्हणजे आता जनता मुर्ख राहिली नाही की ती कोणालाही मतदान करेल. ती शहाणी झाली आहे. आता ती मतदान करतांना कोणाला करायचे व कोणाला नाही त्याचा विचार करते. मग ते सामान्य लोकं का असेना. पुर्वी लोकं म्हणायचे की आम्ही काय आमच्या स्वाभीमानाला डाग लावू काय? आमच्या पुर्वजांनी त्या काळातील ज्या पक्षाला मतदान केलं. त्या पक्षाला आम्हीही मतदान करणं योग्य आहे. परंतु आज तसं नाही. आजची मंडळी काल त्यांच्या पुर्वजांनी केलेल्या चुका सुधरवतात व मतदान करतांना जो चांगलं काम करणारा उमेदवार असेल, त्यालाच मतदान करतात.
मतदानाबद्दल सांगायचं झाल्यास प्रत्येकांनी मतदान करावं. तो आपला हक्कं आहे. संविधानानं मिळालेला आहे. प्रत्येकांनी आपल्या विचारांचा योग्य काम करणारा उमेदवार निवडावा. जेणेकरुन तो उमेदवार आपल्या हिताचं काम करेल. इ व्हि एमवर शंका घेवू नये. कारण माणसापेक्षा यंत्र चांगलंच काम करते. पुर्वी तर गुंड मवाली बुथावरच धिंगाणा घालायचे. बॅलेट शिटा ताब्यात घ्यायचे व ठप्पे मारुन आपल्या विशिष्ट पक्षावर शिक्के मारायचे. आज तो काळ राहिला नाही. कारण आज मतदान करतांना बॅलेट मशीनाचं बटन दाबावे लागतं. थोडा वेळ लागतो. त्यानंतर मतदान होतं. त्या यंत्राबाबत सामान्य लोकांना तेवढं समजत नाही. त्यामुळंच अगदी निरपेक्ष मतदान होतं. सेटींगचा प्रश्नच उरत नाही. कारण मॉकपोल दाखवलं जातं. शिवाय आजची जी जनता हुशार झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून उमेदवारही निवडून आल्यास चांगलंच काम करतो. न केल्यास त्यालाही माहीत असतं की पुढील काळात लोकं आपल्याला मतदानच करणार नाही व आपली जनतेसमोर जाण्याची लायकीच असणार नाही. म्हणूनच उमेदवारांनी चांगलं काम करावं. नाहीतर आजची जनता त्याला त्याची इ व्हि एम च्या माध्यमातून का होईना, जागा दाखविल्याशिवाय राहात नाही. मग आपण ओरडतो की इ व्हि एम मध्ये घोळ झाला. त्यात काही सेटींग आहे. परंतु तसं काही सेटींग नसतं. ती आपल्याच कामाची आपण पाच वर्ष काळात काम केलेल्या कामाची चांगली वाईट पावती असते. यात शंका नाही. म्हणूनच निवडून येणाऱ्या प्रत्येक उमेदवारानं चांगलं काम करावं. चांगल्या कामाची पावती चांगलीच निघेल. जेणेकरुन चांगला व योग्य उमेदवार निवडून येईल व तो जनतेलाही योग्य न्याय देईल. अनेक विकासाच्या योजना राबवून तो देशाचाही विकास करेल हे तेवढंच खरं आहे. मग इ व्हि एम मशीनचं मतदान असो की बॅलेट पेपरचं असो. चांगला व योग्य नेता. कशाही पद्धतीनं निवडून येवू शकतो यात शंका नाही. म्हणूनच नेत्यांनी चांगलं व योग्य काम करावं म्हणजे झालं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०