Govinda Gaikwad in Marathi Mythological Stories by Ankush Shingade books and stories PDF | गोविंदा गायकवाड

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

गोविंदा गायकवाड

त्या तमाम अस्पृश्य समाजाला सादर समर्पीत

GOVINDA GAIKAWAD
गोविंदा गोपाळ गायकवाड उर्फ गणपत महार
प्रकाशक--अंकुश शिंगाडे १२२ बी गजानन नगर भरतवाडा रोड नागपूर ४४००३५ मो नं ९३७३३५९४५०
अक्षरजुळवणी-अंकुश शिंंगाडे
मुखपृष्ठ- कु. अनुष्का
प्रथमावृत्ती--१० आगष्ट २०२१
मुल्य-१००

मनोगत

गोविंदा गोपाळ गायकवाड ही चरीत्र कादंबरी वाचकांच्या पुढे देतांना मला आनंद होत आहे. महत्वाचं म्हणजे ही कादंबरी म्हणजे एक संग्राम आहे.
गोविंदा गोपाळ गायकवाड हे असं चरित्र की ज्याला माहित होतं की मी जर संभाजीच्या देहाचे तुकडे गोळा करुन त्याला अग्नी दिला तर मला औरंगजेब मारुन टाकेल. कारण औरंगजेबानं तशी अफवा राज्यात पसरवली होती. तरीही छातीला माती लावून गोविंदानं ते तुकडे गोळा करुन त्याला अग्नी दिला. यानंतर काय झालं ह्याचा मात्र इतिहासात उल्लेख नाही. तसं पाहता इतिहास हा पुराव्याच्या व नोंदीच्या आधारे लिहिला जातो. पण ज्याच्याबाबत पाहिजे त्या प्रमाणात नोंदीच उपलब्ध नाहीत. त्याचा इतिहास तरी कसा लिहिता येईल? हा एक प्रश्न नव्हे तर कोडं आहे. तरीही तर्क वितर्काच्या आधारावर अभ्यास करुन ही कादंबरी मी वाचकांसमोर साकारली आहे.
महत्वाचं म्हणजे संभाजी हा राजा असल्यानं व त्यानं दिलेरखानाच्या दरबारी राहून मियाखानच्या दोन्ही मुलींचे विवाह लावून दिल्यानं मियाखाननं औरंगजेबाच्या दरबारी राहून संभाजीबाबत घडलेल्या छळाची माहिती त्यानं रायगडाला दिली. पण गोविंदाची माहिती कोण देणार! तो तर साधारण व्यक्ती असून जातीनं अस्पृश्य होता.
औरंगजेब हा कपटी धुुर्त बादशाहा होता. असा इतिहास सांगतो. ज्यावेळी संभाजीचे तुकडे गोळा करुन त्याला अग्नी दिला ही माहितीही औरंगजेबाला झाली होती. त्यानंतर कल्पना करा की बादशाहा औरंगजेब हा काही चूप बसला नसेल. कल्पना करा की त्यानंही त्याला कैदेत टाकलं असेल आणि अत्याचारही केले असेल. ही सत्यता नाकारता येत नाही. तोच धागा पकडून मी ही कादंबरी लिहिली आहे. ही कादंबरी लिहिण्यामागं उद्देश एवढाच आहे की गोविंदाचा इतिहास वाचकांना माहित व्हावा.
संभाजीच्या अंत्यसंस्काराबाबत बरेच संभ्रम आहेत. कोणी म्हणतात की फक्त गोविंदानंच तुकडे शिवून त्याचा अग्नीसंस्कार केला. कोणी म्हणतात की मराठ्यांनी अंत्यसंस्कार केला. त्यात गोविंदाचा लवलेश नाही. याच दोन प्रकारच्या मतप्रवाहानं आज वढू गावातील राजकारण तापतं. त्यातच अख्ख्या देशात आजही याबाबतीत उद्रेक होतो. परंतू असा वाद न करता स्वतःच्या मनात कल्पना करुन त्यावेळची परिस्थीती आपल्या मनानं लक्षात घ्यावी. अंत्यसंस्काराचा कार्यक्रम हा काही एकट्यानं झाला नसेल. तो संपूर्ण गावाच्याच सहकार्यानं झाला असेल. त्यात सर्वच जातीचे लोकं अंत्यसंस्काराच्या कार्यात मतभेद न बाळगता सहभागी झाले असेल हे सत्य नाकारता येत नाही. तेव्हा फालतूच माझ्या परीवारानं अंत्यसंस्कार केला असं म्हणून केवळ श्रेय घेण्यासाठी वाद घालून फुकट आपला वेळ वाया घालवू नये वा ही पुस्तक वाचल्यावर आपल्या मनात तर्कवितर्काचे संभ्रम निर्माण करुन प्रश्न उत्पन्न करु नये. तसेच ही पुस्तक एक मनोरंजन म्हणून स्मरणात ठेवावी. जेणेकरुन कोणतेच वादंग निर्माण होणार नाही अशी आपणास हात जोडून कळकळीची विनंती. फक्त याच अटीवर ही पुस्तक वाचावी. अन्यथा वाचू नये. ही नम्र विनंती.
आपला नम्र अंकुश शिंगाडे नागपूर

कर्तव्य वीर गोविंदा गोपाळ गायकवाड उर्फ गणपत महार
असंच ते गाव......... त्या गावात भेदभाव चरणसीमेला पोहोचला होता. अस्पृश्य सवर्ण असा वाद होता. नव्हे तर अस्पृश्यांना चांगली वागणूक मिळत नव्हती. त्यांना आवर्जून सुर्यास्ताच्या वेळा पाळाव्या लागत असत. एवढंच नाही तर मोगली साम्राज्य होतं परीसरात. त्यामुळं साहजिकच भीती मनात होती. ती एवढी भीती होती की मनाचा थरकाप होईल.
शिवरायांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर राजा संभाजीला छत्रपती बनविण्यात आलं.,छत्रपती संभाजी हा शिवरायाचा आवडता पुत्र. वारसदार असल्यानं तोच हक्कदार होता. पण कटकारस्थानानं की काय, त्याला डावलून राजारामाला राजगादीवर बसविण्यात आलं. तसेचा महाराज शिवरायांचा गुपचूप गडावरच अंत्यसंस्कार करण्यात आला व गडावर हजर असलेले अण्णाजी दत्तो सह बाकीची काही मंडळी संभाजीला मारायला निघाले. जसे की संभाजीनं फार मोठा गुन्हा केला. त्यावेळी संभाजीराजे गडावर नव्हते.
संभाजीला ती माणसं मारायला निघाली अशी बातमी हंबीरराव मोहित्यांना मिळाली. त्यांनी या सर्व मंडळींना वाटेतच अडवलं व त्यांना अटक केली. हंबीररावांच्याच प्रयत्नातून पुढे संभाजी रायगडावर येताच त्यांना महाराज घोषीत करण्यात आलं. त्यातच आता नव्यानं संभाजीच्या नावानं राज्यकारभार सुरु झाला. त्याला राजारामानं विरोध केला नाही. कारण ज्यावेळी राजारामाला राजा बनवलं होतं. त्यावेळी त्याचं वय अवघं दहा वर्षाचं होतं.
छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी संभाजीला राजा बनवलं व त्यांच्या नेतृत्वात स्वराज्यरक्षणासाठी प्रखर लढा दिला.
शिवरायांचा मृत्यू १६८० मध्ये झाला. त्यावेळेपर्यंत मुगल बादशाह औरंगजेब दक्षिणेत भटकलाच नाही. पण महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं की आता मराठे हतबल झाले. आता आपल्याला मराठ्यांना जिंकता येईल. त्यातच या मराठ्यांना जिंकण्यासाठी औरंगजेब बादशाहा इ स.१६८२ ला म्हणजे महाराज मरायच्या दोनच वर्षानं दक्षिणेत आला. कारण त्याला वाटत होतं की महाराज शिवराय मरण पावले. आता मराठ्यांजवळ ताकदच उरली नाही. परंतू मराठे काही हतबल नव्हते. त्यांनी औरंगजेब बादशाहाला चांगलीच शिकस्त दिली.
संभाजी महाराज हे शिवरायांचे जेष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म १४ मे १६५७ ला पुरंदरच्या किल्ल्यावर झाला होता. ते शिवरायानंतर हतबल ठरलेल्या स्वराज्याचे छत्रपती बनले होते. त्यांच्यासमोर बरीच आव्हानं होती.
औरंगजेब बादशाहा ज्यावेळी दक्षिणेत आला. त्यावेळी त्याच्याजवळ अफाट सैन्य आणि प्रभावी तोफखाना होता. त्यानं जंजि-याच्या सिद्धीला तसेच पोर्तूगीजांनाही आपल्या बोलणीनं आपल्या बाजूला वळवून घेतले. त्यामुळं संभाजीच्या शत्रूंमध्ये साहजिकच वाढ झाली. परंतू संभाजीही काही कमजोर नव्हते.
संभाजीला प्रत्यक्ष महाराजांनी आपल्यासोबत त्यांच्या लहानपणापासूनच सोबत नेले होते. त्यावेळी त्यांचं वयही तेवढं नव्हतं. आग्र्याच्या मोहिमेवेळीही संभाजी सोबतच होते. त्यातच शिवरायांच्याच देखरेखीखाली संभाजीला लहानपणापासूनच राज्याचा कारभार कसा करावा? शत्रूंचा बंदोबस्त कसा करावा? याचं शिक्षण सहजपणे मिळालं. त्यामुळं ज्यावेळी छत्रपती संभाजी राजे बनले. त्यावेळी त्यांचे बरेच शत्रू होते. अंतर्गत आणि बहिर्गतही. त्या शत्रूंना सहजपणे तोंड द्यायची ताकद साहजिकच छत्रपती संभाजीत निर्माण झाली होती.
छत्रपती संभाजी राजगादीवर बसताच मराठ्यांना दुर्बल समजणा-या मुघलांशी संघर्ष तीव्र झाला. त्यातच औरंगजेबाला वाटत होतं की आता आपला काबूल ते कन्याकुमारीपर्यंत एकछत्री अंमल निर्माण होईल. त्यामुळं तो जोरकसपणे कंबर कसून दक्षिणेत आला होता. त्याला वाटत होतं की आपल्या प्रचंड शक्तीसमोर मराठ्यांचं काहीही चालणार नाही. त्यांना एका क्षणात नष्ट करता येईल. हे त्याचं स्वप्न होतं. त्या स्वप्नाच्या स्वप्नपुर्तीसाठीच तो प्रयत्न करीत होता. परंतू संभाजीही काही कमजोर नव्हता. त्यानंही आपल्या आईचं दूध प्राशन केलं होतं. ज्या दूधात मराठ्यांचं रक्त होतं. नव्हे तर शुन्यातून साम्राज्य निर्माण करणा-या शिवरायाचं रक्तही संभाजीत होतं. ते रक्त........ज्या रक्तानं शिवरायांना छत्रपती बनता आलं होतं. जे रक्त द-याखो-यात फिरलं होतं. ज्या रक्तानं शायीस्तेखानाची बोटं तोडली होती. तसेच ज्या रक्तानं धिप्पाड देहाचा अफजलखान मारला होता.
औरंगजेब मराठ्यांवर स्वा-या करीत होता. एकेक किल्लाही घेत होता. पण मराठेही काही कमी नव्हते. औरंगजेबाचे सैन्य किल्ला ताब्यात घेवून पुढे गेले की तोच किल्ला परत ताब्यात घेत होते. त्यामुळं की काय, औरंगजेबाच्या मनाचा भयंकर तीळपापड व्हायचा. त्यातच एकदा त्यानं आपल्या डोक्यावरील पागोटं खाली फेकलं व प्रतिज्ञा केली की मी संभाजीचा पाडाव केल्याशिवाय पागोटं घालणार नाही.
औरंगजेबाची प्रतिज्ञा केली. त्यानुसार तो संभाजीराजांना नमविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होता. त्यानं मुकर्रबखानाची नेमणूक कोल्हापूरला केली होती. त्यावेळी या मुकर्रबखानाला कोणीतरी बातमी सांगीतली की महाराज संभाजी कोकणातील संगमेश्वरात लपून बसले आहेत. त्यानंतर मुकर्रबखानाने संभाजीला पकडलं. त्यांना औरंगजेबासमोर प्रदर्शीत केलं. औरंगजेब बादशाहानं पहिला प्रश्न केला की त्यानं इस्लाम कबूल करावं. जर ते इस्लाम कबूल करीत असतील तर त्यांना सोडून देण्यात येईल. परंतू छत्रपती संभाजींनी इस्लाम कबूल केला नाही. त्यामुळं की काय, औरंगजेबांनं त्यांचा एकएक अवयव त्यांच्या जीवंतपणीच कापला. तसेच तो एकएक अवयव मराठी साम्राज्यात फेकला. त्यातच तो दिवस उजळला. त्याच्या दुस-या दिवशी गुढीपाडवा होता.
११ मार्च दुपारची वेळ उजळली. दरबार भरला होता. संभाजीचे पाय कापून टाकले होते. हातही कटले होते. वाणीही कापली होती आणि डोळेही फोडले होते. त्यातच संभाजीला औरंगजेबासमोर दाखल करण्यात आलं.
अतिशय धिप्पाड देहाचा व पीळदार शरीराचा संभाजी राजा आज अगदी दुर्बल झाला होता. तरीही रग तेवढी शरीरात शिल्लक होती आणि त्याचबरोबर बाणेदारपणाही. औरंगजेबानं विचारलं.
"बोल मराठ्यांच्या राजा, तुला इस्लाम कबूल आहे की नाही."
हातपाय कापलेले. वाणीही कापलेली. डोळेही फोडलेले. त्यातच ते शब्द कानी पडले. औरंगजेबाचे ते शब्द. तीक्ष्ण बाणासारखे वाटले. त्यातच त्यानं मान हालवली. तसा औरंगजेब पुन्हा म्हणाला,
"हे राजा, मी तुला शेवटचं विचारतोय, बोल तुला इस्लाम कबूल आहे की नाही."
तशी संभाजीनं पुन्हा मान हलवली व अँ करीत स्पष्ट नकार दिला. तोच औरंगजेब जोरात म्हणाला,
"उडवा याची मान याचक्षणी. उद्या गुढीपाडवा आहे. आपण याच्या रक्तानं गुढीपाडवा साजरा करु. गुढीपाडवा हिंदूचा सण आहे ना. आपण याचं मस्तकच गुढीला उभारु."
औरंगजेब हर्षोल्लासानं हसत होता. त्याला मनात भय वाटत नव्हतं. वा कोणतीच दयामायाही वाटत नव्हती. तसा एक शिपाही पुढे आला. त्यानं म्यानातून तलवार काढली आणि म्हणाला,
"जहापनाह, काय आदेश आहे. उडवू का मस्तक?"
"होय, याचक्षणी उडव."
ती तलवार. ती तलवार चमकत होती. तळपत होती. आपल्या आवडत्या राजानं शरसंधान करण्यासाठी नव्हे तर गळाभेट करण्याची वाट पाहात होती. ज्या छत्रपतीनं अतिशय जड तलवार आपल्या जीवनात वापरली. ती तलवार आज त्याची शत्रू बनणार होती. त्या तलवारीच्या डोळ्यात अश्रू होते. पण ती तरी काय करणार होती. ती मजबूर होती. शेवटी तो क्षण आला. तसा तो शिपाही पुढं सरसावला आणि एका क्षणात संपूर्ण ताकदीनिशी त्यानं संभाजीचं मस्तक उडवलं.
संभाजीचं मस्तक एका वारात वेगळं होताच त्या शरीरातून रक्ताच्या चिरकांड्या उडू लागल्या. त्या चिरकांड्या आणि एवढं रक्त की मृत्यूनंतर पंधरा मिनिटं होवून गेले तरी रक्त थांबेना. एवढं रक्त. औरंगजेब बादशहा तर डोळे वटारुनच पाहात होता. त्याला तर अस्मीताच नव्हती. थोडा वेळ तर तो शुद्ध हरवूनच होता. तसा औरंगा म्हणाला,
"घ्या ते मस्तक उचला. उद्या त्याला भाल्यावर सजवायचं आहे."
सैनिकांनी ते मस्तक उचललं. त्याला सुरक्षीत ठेवलं. अशातच दुसरा दिवस उजळला. बारा मार्च. या दिवशी सकाळीच त्या मस्तकाला भाल्यावर सजवलं गेलं. तसे त्याच्या शरीराचेही तुकडे तुकडे केले गेले. संपूर्ण त्या गावात मिळवणूक काढण्यात आली आणि आवाहन करण्यात आलं की जो कोणी हे तुकडे गोळा करेल आणि या तुकड्यांना अग्नी देण्याचा प्रयत्न करेल, त्यालाही यमसदनी पोहोचविण्यात येईल.
दिवसभर मोगली सैनिक ते मस्तक एका भाल्यावर घेवून हर्षोल्लासात आनंद साजरा करीत नाचत बागडत गावभर फिरत होती. तर आपल्या लाडक्या महाराजांचं मस्तक गावातील माणसं घराघरातून पाहात होती. शोक व्यक्त करीत होती. त्यांच्या वेदना त्यांनाच कळत होत्या. पण कोणीच त्या मोगलांना अडवीत नव्हतं वा कोणीच त्यांचा प्रतिकार करीत नव्हता. कारण त्यांना माहित होतं की यात आपलाही जीव जावू शकेल. जीवाची पर्वा कोणाला नव्हती. तशी ती भीती त्या गावातील माणसांनाही होती.
गणपत त्याचं नाव.......तो जातीनं महार होता. तो त्याच गावात राहणारा माणूस. तोही संभाजीच्या शरीरयष्टीचा होता. तसा तोही संभाजीसारखाच बाणेदार व शूर होता.
सायंकाळ झाली होती. तसं सायंकाळी संभाजीचं मस्तक भाल्यातून काढून जमीनीवर फेकून देण्यात आलं. जे मस्तक फेकतांना गणपत महारानं पाहिलं.
भाल्यावरचं ते मस्तक. ते फेकतांना पाहणारा गणपत महार. तो विचार करु लागला. त्याचा तो विचार आपले आवडते महाराज. त्यातच संभाजीचे केलेले चार तुकडे त्याच्यासमोर थयथय नाचत होते.
वढू नावाचं ते गाव. त्याच गावात इस १६८९ ला फेकलेले संभाजी महाराजाच्या शरीराचे चार तुकडे. त्यातच विचार करणारा गोविंद गणपत गायकवाड. गोविंद गणपत गायकवाड हा वढू बुद्रूक गावात राहणारा. तो पहलवान होता. त्याने अनेक कुस्त्या मारलेल्या होत्या. तसेच तो शुरवीरही होता. तो हिंमतवान गडी असून धिप्पाड शरीरयष्टीचाही होता.
सायंकाळ झाली होती. तशी मोगल मंडळी आजमीतीला सर्व गावात आणि आजुबाजूच्या भागात फिरली होती.जशी सायंकाळ झाली. तशी ती दमली व दमून थकून झोपी गेली.
सायंकाळ झाली होती. तशी सायंकाळ जरी झाली असली तरी गणपत महार झोपला नव्हता. तो जागाच होता. त्या राजाचा विचार करीत. ज्या राजाचे मस्तक आज भाल्यावर सजले होते.
गणपत हा जातीनं जरी महार असला तरी धर्मानं हिंदू होता. तो राजाबद्दल विचार करीत होता की राजा हा आपला. जरी आज भाल्यावर सजला असला जरी त्या औरंगजेबानं आपल्याला धमकी दिली असली तरी आज राजा आपला आहे. आपला हिंदू राजा. आपला अन्नदाता. त्या राजानं आपल्याला अन्न दिलं. प्रजेचं रक्षण केलं. प्रजेचं रक्षण म्हणजे आपलं रक्षण. तो विचार करु लागला आपल्या पुर्वजांच्या कर्तृत्वाचा. ज्यांचा ज्यांचा या भोसले घराण्याशी संबंध होता.
शिवा काशीद असाच महार जातीचा माणूस. आज गणपतला शिवा काशिद व जीवा महाला आठवत होता. ज्यानं धन्यांसाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं होतं. ज्या शिवा काशिदला शिवरायानं प्रति शिवाजी बनवून स्वराज्यासाठी आवश्यक असणारा आपला जीव वाचविण्यासाठी बलिदान द्यायला लावलं होतं. नव्हे तर ज्या शिवा काशिदला औरंगजेबानं शिवाजी समजून मारुन टाकलं. असा शिवा काशिद जेव्हा शिवरायांचा पोशाख वापरुन शिवरायांसमोर आला. तेव्हा शिवराय म्हणाले,
"माहित आहे शिवा, हे सर्व तू माझ्यासाठी जे काही करीत आहेस. त्यातून तुला काय मिळणार. काहीच मिळणार नाही. तरीही तू हे करतोस. का करतोस ते कळत नाही." त्यावर शिवा काशीद म्हणाला.
"महाराज, मला आज शिवाजी राजा म्हणून मरता येणार आहे. आज मला औरंगा शिवा काशिद म्हणून नाही तर प्रत्यक्ष शिवाजी म्हणून मारणार आहेत. तीच संधी.......जी संधी इतरांना कधीच मिळणार नाही. ती संधी माझ्या भाग्यात चालूनन आलेली आहे.. ती संधी इतर कुणाच्याही भाग्यात चालून आलेली नाही."
शिवा काशिद स्वराज्यासाठी मरण पावलेला होता. त्यातच जीवा महालाही. अफजलखानाच्या तडाख्यातून शिवरायांना वाचविणारा जीवा महाला. ही दोन्ही माणसं गणपत गायकवाडाच्या डोळ्यासमोर तरळत होती. तशी सायंकाळ झाली.
गणपतरावानं आता पूर्ण विचार केला की आपण संभाजीच्या देहाला अग्नी द्यावा. त्यांच्या तुकड्यांना असं बेवारस कुत्र्या लांडग्यांची शिकार बनू देवू नये. आपण ते तुकडे गोळा करावेेत. ते जोडावेत. कारण तो माणूस आपल्या वतनासाठी लढला. हिंदू धर्मासाठी लढला.सरतेशेवटी प्राण दिलं. पण धर्म बदलवला नाही.
गणपतलाही माहित होतं की त्याच्या या कृत्याबद्दल त्याला मोगली बादशाहा प्राणदंड देईल. पण तो डगमगला नाही. त्यातच थोडा अंधार पडला.
भीमा नदी......... ही नदी ८६१ किमी वाहात असून ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगाणामधून वाहते. या नदीचा उगम पश्चीम घाटात भीमाशंकरच्या पर्वतश्रेणीतून होतो. या नदीच्या सीना आणी नीरा या उपनद्या आहेत. तसेच या भीमा नदीला इतरही काही नद्या म्हणजे इंद्रायणी,मुळा व माण तसेच वेळ,घोड व शोण याही नद्या मिळतात. या नदीवर एकुण बावीस धरणे असून या धरणातून मिळणा-या पाण्यानं आजूबाजूचे क्षेत्र लाभान्वीत झाले आहे. या नदीला महाराष्ट्रात अनेकदा पूर येतो. ही नदी पंढरपूरातूनही वाहात असते. तिथे या नदीला चंद्रभागा असं म्हणतात. ही नदी पुणे जिल्ह्यातील कोरेगावजवळूनही वाहात जाते. तसेच वढू बुद्रूक गावातूनही. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे.
धार्मीकदृष्ट्याही भीमा नदीला महत्व असून तिला महानदीही म्हणतात.मत्स, बम्ह वामन या पुराणातूनही या नदीचे उल्लेख मिळतात.
वढू बुद्रूक हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील गाव असून या गावाचाही स्वतंत्र्य असा इतिहास आहे.
वढू गावात संभाजी महाराजांचे तुकडे जरी टाकले असले तरी ते तुकडे का केले, त्याला काही कारण आहे. छत्रपती संभाजी राजानं हरसुलच्या गंगाधर कुलकर्णी या ब्राम्हण दांम्पत्यास औरंगजेबाने जबरदस्तीनं मुसलमान बनवले होते. पण त्याच्या विनंतीवरुन कवी कलश व संभाजीनं त्याला आपल्या धर्मात घेतलं. हे धाडस कवी कलशासोबत संभाजीनं दाखवलं होतं. म्हणून औरंगजेब बादशहा संभाजी व कवी कलशावर चिडून होता. त्यामुळं की काय, याचा बदला काढण्याचा निर्धार औरंगजेबानं केला होता. त्यातच १६८४ ला संभाजींनी इंग्रजांबरोबर एक करार केला होता. तो म्हणजे इंग्रजांनी या माझ्या राज्यात अवश्य राहावे. पण धर्मप्रसार करु नये. असे जर झाले तर आमचं राज्य सोडावं लागेल. ही कराराची गोष्टदेखील औरंगजेबाला माहित होती. म्हणून तो संतापून होता.
वढू गाव हे भीमा नदीच्या काठी वसलेलं होतं. या गावाला वढेश्वर असेही म्हणत. या गावात इंद्रायणी, भामा व भीमा अशा तीन नद्यांचा संगम आहे.
संभाजी महाराजांच्या मृत्यूपुर्वी या वढू गावात औरंगजेबाचं राज्य होतं. या ठिकाणी औरंगजेबानं एक कारागृह बांधले होते. या कारागृहात पुढे संभाजी महाराज व कवी कलश यांना ठेवण्यात आले. औरंगजेबाचा एक शुर सरदार सिकंदरखान या कारागृहावर पाहारा देत होता.
वढू हे गाव. या गावात चारही बाजूंनी वीस फुट उंच दगडी तटबंदी उभारली होती. जणू ते गाव म्हणजे भुईकोट किल्लाच शोभावा. गावाच्या पुर्वेला एक वेस होती. गावातील सांडपाणी हे उत्तरेकडील खिडकी दरवाज्यातून पाबळ रस्त्यावर निघत असे. आज त्याचं नाल्यात रुपांतर झालं आहे. भीमा नदीकाठी वसलेलं ते गाव. या गावात वडेश्वराचे प्राचीन मंदीर होते. हे यादवकालीन मंदीर होते.आता हे मंदीर शंभूसागर धरणामुळं पाण्यात बुडाले आहे. तसेच औरंगजेबानेही या मंदीराला नष्ट केले आहे. हे शहर इ स बाराव्या शतकापासून व्यापार करणा-या लोकांचे राहण्याचे ठिकाण होते.
या ठिकाणी विविध जातीधर्माचे लोकं राहात असून कुंभार वेशीतून एक दरवाजा होता. उन्हाळ्यात या नदीला पाणी नसायचं. त्यामुळं व्यापार व्हायचा. पण पावसाळ्यात पाणी असल्यानं हा दरवाजा बंद व्हायचा. त्यानंतर पुर्व दरवाजाचा वापर व्हायचा.
तटबंदीच्या आत दक्षिणमुखी हनुमान मंदिर विठ्ठल मंदिर, भैरवनाथ मंदिर, उधोबा महाराजांची समाधी मंदिर होतं. तटबंदीच्या आतच राबता असायचा. रात्री दरवाजे बंद होताच सारा गाव पेटीत बंद व्हायचा. त्यातच गावात दिवेलागण व्हायची व सारा वढू गाव झगमगायचा.
तटबंदीच्या बाहेरुन ओढा वाहात असे. ओढ्याकाठी भरपूर प्रमाणात वडाची झाडे होती. ही झाडे वाटसरुंना सावली देण्याची कामे करीत असत.या वडाच्या झाडावरुनच गावाला वढू नाव प्राप्त झालं असावं असं काहीजण म्हणत. गावात एक सतीचं मंदिरही होतं. तसेच पिरांची थडगीही होती.
गणपत गायकवाड एक साधारण माणूस. तो पुण्याला लाल महालात शिपायाची नोकरी करायचा. ज्या महालात शिवरायांचा ताबा होता. तो तरुणपणापासूनच लालमहालात नोकरी करीत असून त्यानं अगदी जवळून शिवरायाचं कार्य पाहिलं होतं. तसंच त्याच्या पीढीनंही भोसले घराण्याची चाकरी केली होती. ज्यावेळी संभाजीराजांना मारलं गेलं, त्यावेळी संभाजीराजे केवळ बत्तीस वर्षाचे होते. कोणी म्हणतात की संभाजीचे तुकडे फेकतांना गणपत गायकवाडनं पाहिलं. तर कोणी म्हणतात सर्वात प्रथम एका धोबीनीनं पाहिलं. जी धोबीण त्या गावची रहिवासी होती. तिचं नाव जनाबाई होतं.
गुढीपाडवा हा हिंदूचा सण. अनादीकाळापासून हिंदू लोकं गुढीपाडवा साजरा करीत असायचे. ते या दिवशी तोरणे, पताका लावून व गुढी उभारुन हा सण साजरा करायचे. त्यातच गुढी उभारतांना मंदिरातील कलशाप्रमाणे तो कलश उपडा ठेवायचे. त्याचं वैज्ञानीक कारणही होतं. ते म्हणजे आकाशातून आलेली सकारात्मक उर्जा खिचून ती उर्जा जमीनीवर पोहोचविणे. याचाच अर्थ असा की या जमीनीवर राहणा-या जीवजंतूंना या उर्जेचा फायदा होईल. कलश यासाठी वापरला जाई. कारण तो तांब्याचा होता व तांबा हा धातू उर्जेचा जास्त प्रमाणात वाहक आहे. त्यातच ही प्रक्रिया लाभदायी असल्यानं गुढी उभारण्याची प्रथा मोठ्या हिरीरीनं सुरु होती.
मुघल जेव्हा सातव्या शतकात मोहम्मद बिन कासीमच्या रुपानं भारतात आले. तेव्हापासूनच ते भारतीय लोकांचा राग करायचे. कारण श्रीलंकेतून सिंधच्या देबल बंदरामार्गे इराकला जाणारं जहाज भारताच्या देबल बंदराजवळ अज्ञात लुटारुंनी लुटलं. ज्यात अतिशय मौल्यवान खजिना होता आणि जो इराकच्या खलिफाला बक्षीस म्हणून जात होता. तो खजिना देबलच्या बंदरात लुटला गेला. तो कोणी लुटला हे खलिफालाही वा कोणालाही माहित नव्हतं. परंतू त्याचं पाप देबल बंदरात ज्या राजाची सत्ता होती. अर्थात देबल बंदर ज्यांच्या ताब्यात होतं. त्या राजा दाहिरवर लावण्यात आलं. राजा दाहिर जो एक हिंदू राजा होता. याचाच अर्थ असा की त्यात एकट्या राजा दाहिरला दोषी न ठरवता संपूर्ण हिंदू धर्मालाच दोषी ठरविण्यात आलं. कारण राजा दाहिर हा हिंदू धर्माचा पुरस्कर्ताही होता.
महाराजा संभाजीला गुढीपाडव्याच्या दोन दिवसापुर्वी मारुन दुस-या दिवशी त्यांचं मस्तक भाल्यावर चढवून वाजत गाजत त्या मस्तकाची मिळवणूक मुघलांनी काढली आणि त्यातच त्यांच्या देहाचे तुकडे करुन ज्या वढू गावाच्या कारागृहात त्यांना बंदीस्त केलं होतं. त्याच गावच्या भीमा, भामा व इंद्रायणी संगमावर म्हणजेच वढेश्वराच्या बाजूलाच त्यांच्या देहाचे तुकडे नदीपात्रात टाकण्यात आले. जेणेकरुन त्या तुकड्यांना ओळखता येवू नये व त्यांचं मांस मासोळ्यांनी वा कोल्ह्याकुत्र्यांनी खावं. त्यांच्यासोबतच कवी कलशांचेही तुकडे करुन टाकण्यात आले होते. आणि फर्मान जाहिर करण्यात आले होते की उद्या कोणीही या तुकड्यांना अग्नी देवू नये. त्यातच कोणीही गुढीपाडवा साजरा करु नये. त्याचं पुर्वसंध्येला मारुन त्यांचं मस्तक भाल्यावर चढविण्याचा अर्थ असाच निघत होता. तरीही लोकांनी गुढीपाडवा साजरा केला व संभाजी आणि कवी कलशांच्या तुकड्यांना अग्नीही दिला.
गुढीपाडवा हा हिंदूचा सण असून त्याला गालबोट मुघलांनी लावण्याचा प्रयत्न केला. एवढच नाही तर या तमाम महाराष्ट्रातूनच नाही तर देशातूनही समुळ हिंदू धर्माचं उच्चाटन कसं करता येईल याचा विचार स्वार्थी व धुर्त औरंगजेबानं केला. परंतू त्याला त्यात यश आले नाही.
गुढीपाडवा हा हिंदूचा सण जरी असला तरी तो इतरही धर्मीयांनी मानायला हवा. कारण याच दिवशी ख-या अर्थानं नवीन वर्षाची सुरुवात होते. शिशिर ऋतू जावून वसंताला सुरुवात होते.,झाडांना नवी पालवी फुटलेली असते. त्यामुळं साहजिकच या पालवीतून मनमोहक असा सुगंध दरवळत असतो. ज्या सुगंधानं अगदी मन प्रसन्न होवून जाते. या दिवशी चैत्र मासाला आरंभ होत असून शेतकरी आपल्या शेतात साजवणी करीत असतात. साजवणी याचा अर्थ असा की या दिवशीपासून शेतकरी नवीन वर्षातील शेतीच्या कामाची सुरुवात करीत असतात. साजवणी करतांना गुळ आणि पोळीचा नैवेद्य वखरावर ठेवतात. बैलांना गुळपोळी चारतात. ज्यूची व वखराची हळद कुंकू लावून पुजा करतात. तसेच इतर माणसांनाही गुळपोळी देतात. काही लोकं पुर्वी भजन किर्तनही करायचे या दिवशी. आता मात्र ती प्रथा काही ठिकाणी दिसते तर काही ठिकाणी दिसत नाही. याच दिवशी कोणी मोठी माणसे, ज्यांच्याकडे भरमसाट शेती आहे. ती मंडळी सालदार ठेवतात. सालदार याचा अर्थ गडी माणूस. जो गडी माणूस शेतात वर्षभरासाठी नोकर असतो. बदल्यात तो धान्य आणि पैसा घेतो. पुर्वी मात्र धान्य घ्यायचा. आता मात्र तसं नाही. आता हा सालदार रोख पैसाच घेत असतो. काही लोकं या दिवसापासून हिशोबाच्या वह्या बदलवितात. तसेच हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात.
गुढीपाडव्याला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व असून अशा या हिंदू सणाला औरंगजेबानं गालबोट जरी लावण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याचं महत्व हिंदूनी कमी होवू दिलं नाही. ज्यावेळी संभाजी राजांचा मृत्यू झाला, त्यावेळीही हिंदूंनी ह्या सणाच्या दिवशी शोक व्यक्त केला नाही. कारण या सणाच्या दिवशी शोक व्यक्त करणे म्हणजे मुघलांची कुठेतरी जीत होती. ती जीत हिंदूंना होवू द्यायची नव्हती.
महत्वाचं म्हणजे या दिवसाच्या दोन दिवस पुर्वी धर्मासाठी बलिदान देणारा धर्मवीर संभाजी राजांचा मृत्यू झाला असला किंवा त्यांना मुघल बादशाहा औरंगजेबानं तडपवून मारलं असलं आणि तमाम हिंदूच्या भावना दुखावल्या असल्या तरी आजही आम्ही गुढीपाडवा साजरा करतो. कारण त्या गुढीपाडवा साजरा करण्यामागे आमचे तीन उद्देश आहेत. एक म्हणजे गुढीपाडवा सण साजरा करणे. दोन म्हणजे महाराज संभाजींना त्या निमित्यानं श्रद्धांजली अर्पण करणे व तिसरा हेतू म्हणजे औरंगजेबाच्या आत्म्याला व त्याच्या वंशजांना चपराक देणे. आम्ही आता डौलानं गुढीपाडवा साजरा करु. जो आमच्या लाडक्या राजांचा विरगती दिवस आहे. तसेच हा दिवस साजरा करणे याचा अर्थ महाराजांना श्रद्धांजली अर्पण करणे होय.
जनाबाई पहाटेला उठायची. ती पहाटेसच अंघोळ करायची व कपडे धुण्यासाठी या नदीवर जायची. त्यानंतर ती परत यायची. तशी घरी येताच जेवनखावण करुन दुस-याची कपडे धुण्यासाठी निघून जायची. ही तिची दिनचर्याच नाही तर रोजचा क्रम होता. ज्यावेळी संभाजींना औरंगजेबानं मारलं, त्यावेळीही त्याची कल्पना तिला नव्हती. ती नित्यनेमानं कपडे धुण्यासाठी नदीवर गेली. त्यातच तिला माहित नसल्यानं ती कपडे धुत होती. तसा तिनं पाण्यात हात घातला. तोच तिला त्या पाण्यावर काहीतरी तरंगतांना दिसलं. तिनं ते दृश्य न्याहाळलं. परत तिनं काहीही असेल असा बनाव करुन ती आपल्या कामाला लागली. त्यातच दूर अंतरावर काही कुत्री एकमेकांवर भुंकत पुन्हा काहीतरी खातांना दिसली. तिनं त्यांच्याकडे जाणीवपुर्वक लक्ष दिलं असता ती कुत्री कोणाचं तरी शरीर खात होती.
जनाबाई काम करीत होती. तोच जनाबाईनं त्या कुत्र्यांचं ओरडणं पाहून त्यांच्याकडं पुन्हा दुर्लक्ष केलं आणि धुण्याकडे लक्ष वळवलं. तोच तिला त्या मुंडक्याला केसं दिसले व तो माणसाचा मुंडका दिसला. ती लांब वाढलेली दाढी जणू तो संभाजीच वाटावा. तसं संभाजीला तिनं पाहिलं होतं. त्याला कवेतही खेळवलं होतं.! कारण तिनं शिवरायांच्या घरीही चाकरी केली होती.
ते मुंडके........फक्त ते मुंडके. ते मुंडकेच पाहून ती घाबरली. ती एवढी घाबरली की तिला शुद्धच राहिली नाही. ती आपलं धुणं तसंच टाकून क्षणाचाही विलंब न करता गावाकडे धावत धावत माघारी फिरली. जशी ती घाबरली आणि धुणं तसंच घाटावर ठेवून धावतच ती गावात आली.
तो शंभूराजाचा देह. त्या देहाला कुंत्री खातांना दिसली होती. तो चेहरा. ज्या चेह-याची केसं जनाबाईच्या हाताला लागली होती. ज्याक्षणी ते मुंडके हाताला लागले. तोच जनाबाई गावात आली. ती थेट दामाजी पाटलाच्या वाड्यात गेली. तिच्या तोंडून शब्द फुटेनासे होते.
दामाजी पाटील........गावातील एक प्रतिष्ठीत माणूस. तो घरी होता. त्याची पत्नीही पाळण्यावर बसून झोके घेत होती. तसा दामाजी म्हणाला,
"काय झालंया जनाबाई?"
जनाबाईनं दामाजी पाटलांच्या तोंडचे वाक्य ऐकले. पण तिच्या तोंडून शब्द फुटेना. ती स्तब्धच होती. तशी दामाजी पाटलाची पत्नी म्हणाली,
"जनाबाई, काय झालंया. तू एवळी घाबरली का?"
"........." जनाबाई तरीही गप्पच होती. तशी परत राधाबाई तिच्याजवळ येवून म्हणाली,
"जना, सांगणं. असं काय झालं की तू घाबरलेली दिसतेय?"
राधाईनं तिच्या पाठीवरुन हात फिरवला. तोच जनाबाई बोलती झाली.
"सरकार, त्या नदीवर मले एक मुंडकं गवसलं. मुंडकं कोणातरी मायराजाचं दिसतंया. पण मी वळखलं नाय अजूनपर्यंत कोणाचं मुंडकं हाय ते. समजलं नाय."
"मुंडकं........जनाबाई काय बोलतुया तू. अवं ते मुंडकं आपल्या लाडक्या संभाजीचं तं नसन. काल त्याचंच मुंडकं औरंग्यानं भाल्याले लटकवून त्याची मिळवणूक काहाळली होती न वं. तुले नाय मालूम का जने."
"मुंडकं आन् ते बी संभाजीचं. छे!"
"हो जना. पण मले एक आश्चर्य वाटते का संभाजीचं मुंडकं आपल्या शिवारात! ते कसं टाकलं बा या वळूच्या शिवारात."
"सरकार, मले नाय वाटत की ते आपल्या लाडक्या राजाचं मस्तक असन म्हून."
"कदाचित नसावं ते मस्तक आपल्या राजाचं."
"ऋण चालावं तं सही. निदान पावून तं घ्या सरकार का ते मस्तक कोणाचं हाय ते?"
"हो, का नाही. पण जने पाह्यलं आणि वळखलं बी त्या मस्तकाले तरी आपून काईपण करु शकत नाय. कारण औरंगानं काल दवंडी पिटवली का जो कोणी त्या तुकड्याले हात लावन. त्यालेबी मृत्युदंड मिळन."
"सरकार, पावून तं घ्या. ते संभाजीचंच मुंडकं हाये का ते. अन् गुपचूप नोको पावा. गावालेबी सोबत घेवू म्हंते. कोणी ना कोणी तं तयार होईनच. तुमी फक्त पाहात रायजा. बाकीच्याईले काम करु देजा. हं औरंग्या पुढा-यालेच मारन न वं."
"हो जने, तुह्यं बी बराबर हाये." दामाजी म्हणाला.
वढू ते गाव. त्याही गावात औरंगजेबानं कारागृह जरी बांधलं असलं तरी गावात काय चाललं आहे याची फारशी कल्पना त्या अधिका-यांना नसायची. त्यातच दामाजी उठला. तो झपाझप पावले टाकत चालू लागला. सोबत राधाई व पाठीमागं जीजाई होती.
सायंकाळ पुरती ढळत चालली होती. तसा दामाजी गोरखनाथच्या घरी पोहोचला. गोरखनाथ गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती. तोही दामाजीसारखाच. तसा दामाजी, जनाबाई व राधाईला पाहताच गोरखनाथ म्हणाला,
"दामाजी काय झालंया? असे कसे अकस्मात आलात?"
"गोरखनाथजी घात झाला असं वाटतूया."
"म्हंजे?"
"अहो, त्या औरंग्यानं आपला रंग दाखवला म्हणा."
"म्हंजे झालं तरी काय?"
"अवो नाथजी, या जनाबाईले एक मुंडकं गवसलं म्हणा. त्या नदीच्या पात्रात हे आपले कपडे धुवाले गेलती. तं हिनं एक मुंडकं आनं एक देह पाह्यला म्हंते मनुष्यधारी."
"हो काहो जना."
"हो जी मायबाप. मी आपल्या उघड्या डोळ्यानं पाह्यलो जी. मी कपडे धुवाले पाण्यात हात बुडवला. तोच माह्या हातात केस आले बा. ते केसं वर काळून पाह्यतो तं का ते मायराजाचं मुंडकंच हातात आलं जी. मग माह्यी सटारली आन् मी धावत धावत दामाजीच्या वाड्यात आलो जी."
"आतं का कराचं दामाजी?"
"नाथा, तुम्हाले तं माहितच हाय का माह्यी धाव तुमच्यापर्यंतच. आता तुम्हीच सांगा नं बुवा."
"कालची दवंडी पाह्यल्या का? ऐकल्या तरी का? औरंग्यानं दवंडी देली का जो कोणी त्या संभाजीच्या अवयवांना उचलून अग्नी देणार त्यालाही मृत्युदंड देवू. मग कोण हिंमत करणार बरं. मी एक सांगतो दामाजी. तुमी घरला जावा. शांत बसा अान् मलेबी शांत रावू द्या. उगाच लपडा कायले पाह्यजे. अवो तुमाले बी परीवार हाये. मले बी परीवार हाये. शांत बसा तुमी. संभाजी राजा तं मरणच पावला. पण त्याचा आपल्याले कायले पाह्यजे त्रास?"
"मले वाटते का त्या औरंग्याले का आपलंच गाव भेटलं होतं हे तुकडे टाकाले. दुसरं गावंच भेटलं नव्हतं. बुवा तुमचं म्हणणं बराबर हाय. मीबी शांत बसतो. तुमी बी बसा."
ते नाथाचे शब्द व ते दामाजीचे शब्द जनाबाई ऐकत होती. तशी ती म्हणाली,
"बुवा कसे बोलता तुमी. अवो आपण शिवरायाची माणसं. एवळे दिस आपल्याले शिवरायानं पोसलं. लेकरांसारखं पिरम केलं आपल्यावर. अन् हा संभाजी म्हणजे आपलाच पोरगा नव्हं. आज त्या संभाजीच्या जागी आपला पोरगा राह्यला असता तं. आपून का केलो असतो? अन् ते मुंडकं संभाजीचंच होये कशावरुन? अजून वळख तं पटाचीच हाये."
जनाबाई काय बोलायचं ते बोलून गेली. पण तिचा मुद्दा सर्वांना पटला. तशी जनाबाई बोलून झाल्यावर नाथ म्हणाले,
"दामाजी, जनाबाईचं म्हणणं बराबर हाये. पण त्या प्रेताले हात लावन कोण?"
दामाजीला नाथानं केलेला प्रश्न. तसा काही वेळातच दामाजी बोलला. आपला आहे नं गोंयद्या. त्याले नेवू. आन् त्याले काढाले लावू मुंडकं. मंग तं झालं."
"बरं."
दामाजी म्हणाला व तो तसा गोविंद उर्फ गणपत गायकवाडच्या घराकडे निघाला.
पुढे दामाजी, त्यानंतर राधाबाई, जनाबाई व गोरखनाथ यासह एकदोन जण जशी त्यांची मिळवणूकच निघाली होती. ते थेट गोविंदाकडे गेले. तसा दामाजीनं आवाज दिला.
"गोंयद्या गोंयद्या."
गणपतनं आवाज ऐकला. तसा गणपत कोकलीतून बाहेर आला. तसं त्यानं पाहिलं. दामाजी, गोरखनाथ, जनाबाई राधाई आणि अजून दोन तीन जण आपल्या घरी आलेले आहेत. तसा तो म्हणाला,
"काय झालं सरकार? आपण असे अचानक. झालं तरी काय?"
"गोंयद्या, घाबरु नोको. अरे या जनीनं त्या इंद्रायणीत एक मुंडकं पाह्यलं. ते मुंडकं बहूतेक संभाजी राजाचं असावं. असं वाटतं. त्यासाठी तुले बोलवाले आलो बा. आमची तं हिंमतच होत नाही. तू जाते का पाहाले या जनाबाईसोबत. काई कराचं नाय. फक्त ते मुंडकं कोणाचं ते वळखावं. हं आपल्याले अग्नीवग्नीच्या भानगडीत पडाचं नाय. कारण कालच औरंग्यानं दवंडी पिटवली का जो कोणी त्याले अग्नी देईन. त्याले मृत्युदंड मिळन. म्हून सांगतो का त्याची फक्त वळख करुन घ्यायची. बाकी काहीच कराचं नाही. समजलं का?"
गोविंदानं ते ऐकलं. संभाजीबद्दल त्याच्या मनात फार आदर होता. एरवी संभाजीला त्यानं जवळून पाहिलं होतं. त्याला लहानपणचा संभाजी आठवत होता. हळूहळू तो भुतकाळ त्याच्यासमोर तरळू लागला.
संभाजी जेव्हा लहान होता. तेव्हा सईबाई मरण पावली होती. तसा संभाजी अनाथ झाला होता. पण त्याला सोयराबाईनं अगदी जीवापाड जपलं होतं आणि महाराजानं तर त्याला राज्यकारभाराचे शिक्षणच दिले होते. महाराज संभाजीला सोबत सोबत घेवून जात. ज्यावेळी आग्र्यावरुन महाराज परतले. तेव्हा मथुरेत एका ओळखीच्या ठिकाणी संभाजी सुरक्षीत राहावा म्हणून शिवाजीनं ठेवून दिलं व त्याच्या मृत्यूची बातमी पसरवली. अन् तोच संभाजी राजा बनल्यावर त्याला औरंगजेबानं ठार करावं धर्म स्वीकारला नाही म्हणून. आपण ओळख करायला जायलाच हवं असं त्यानं मनाशी ठरवलं. तसा तो म्हणाला,
"चला गड्यानु, मी वळख करायला येत हाये."
हळूहळू गावात बातमी पसरली आणि अख्खं गाव दामाजीच्या मागं मागं नदीकाठाकडं निघालं.
ते वडेश्वराचं मंदिर आलं होतं. त्याच ठिकाणी धोबीघाट होता. तसा दामाजी म्हणाला,
"जने, कोठं दिसलं तुले ते मुंडकं बा."
"त्या तेथं." जनाबाई बोलली. तसं अख्खं गाव डोळे विस्फारुन त्या मुंडक्याला शोधू लागले. त्यांना ते मुंडकं काही केल्या दुरुन दिसत नव्हतं. एवढ्यात गोरखनाथ म्हणाला,
"अरे गोंयद्या, उतरनं बे पाण्यात. हातानं पाय हातानं."
गोविंदा खाली उतरला. तसा तो ते मुंडकं हातानं चाचपडून पाहू लागला आणि तसा तो म्हणूही लागला.
"अवं जनाबाई, हितंच हाये नं वं मुंडकं?"
"व्हय रं गोंयद्या. म्या तिथंच पाह्यला नं बा."
"हो का?" असं म्हणत गोविंदा पुन्हा ते मुंडकं चाचपडून पाहू लागला. तोच त्याच्या हाताला ते संभाजीच्या मुंडक्याचे केसं लागले. त्यानं ते संभाजीचं मुंडकं बाहेर काढलं. तशी त्याला ओळख पटली व तो जोरजोरात रडू लागला. तोच दामाजी म्हणाला,
"अबे गोंयद्या, रडू नोको बे. रडू आवर बे. ते औरंग्याचे माणसं आयकतीन अन् आपल्याले शोधत येतीन अन् फालतूच मारुन टाकतीन. तवा तू आपलं रडू आवर."
तसा गोयंद्या म्हणाला,
"कसा आवरु. सरकार हे तं माह्ये धनी होते.,अवं आपल्या गावात लागस कोणी मदत करीत नाही. पण हा माह्या अन्नदात्याचा पोरगा होये. जणू माह्याच पोरगा समजा. मग कसा रडू आवरु?"
"गोयंद्या, हा संभाजीच होये का रे?"
"हो सरकार. हा संभाजीच व्हय."
"मंग सोडून दे पाण्यात आन् परत चाला. नायतं ती औरंग्याची माणसं येतीन आन् समद्याईले मृत्युदंड देतीन."
गोरखनाथानं बोललेले शब्द. सर्वांचं त्याकडं लक्ष होतं. तसा गोयंद्या म्हणाला,
"थांबा, हा शिवाजीचा पोरगा. शिवरायांचा पोरगा म्हंजे आपलाच पोरगा. आपल्यासमोरच लहानाचा मोठा झालाय. तवा आपल्याले या जीवाले असं फेकून देवून चालन का? नाही नं. तूमी जात असन तं जा. मी नाही जाणार या संभाजीले सोडून. वाटल्यास मले त्या औरंग्यानं फाशी देली तरी चालन. पण मी माघार घेणार नाही. वाटल्यास तुमाले माह्यासोबत राहाचं असन तं राहा. वाटल्यास त्या औरंग्याची माणसं आलीच तं म्हणावं हे समदं गोयंद्यानच केलं."
"गोयंद्या हे समदं बराबर हाये रे बाबा. पण हे इपरीत गावावर नोको याले." गोरखनाथ म्हणाला.
"नाही येेणार. मी पुढाकार घ्याले तयार हाये. मरालेबी. आमी शिवरायाची माणसं हाओत. मरणाले भेत नाही. हे दाखवावं लागन का नाही औरंगाले. अन् मरते कोण हितं. जो घाबरन तो. आमाले तं मरतांनी ही खुशीच हाय. आमी बी धर्मासाठी मेलो असेच समजू संभाजीसारखं."
गोविंदाचे ते खडे बोल. संपूर्ण गावाला ती गोष्ट पटली होती. तसा गावक-यांना गोविंदा आवाहन करीत होता.
"आपण मले हे तुकडे गोळा कराले मदत करा. फार लान लान हायेत हे तुकडे."
गोविंदाच्या मतानुसार गावानं ते तुकडे गोळा करायला गोविंदाला मदत केली. काही काही तुकडे तर अगदी लहान लहान होते. काही तुकडे नदीत होते तर काही तुकडे नदीकाठावर होते. त्यातच ते सर्व तुकडे गोळा करुन ते एका कपड्यात बांधण्यात आले. त्यातच ते तुकडे एका शिरप्या चांभाराला देण्यात आले. त्यानं ताबडतोब ज्याप्रमाणं एखादं जनावर शिवलं जातं. त्याप्रमाणे ते तुकडे पटापट शिवले. त्यातच ते संभाजीचं शरीर तयार झालं. त्यातच शिर्के नावाच्या शिंप्यानंही त्या शरीराला आकर्षक कपडे शिवून दिले. तसं पाहता शिर्के राजदरबारातील कपडे शिवत असे. त्या शरीराला ते शिर्केनं शिवलेले कपडे परीधान केले गेले. आता शरीर तयार झालं होतं. त्यातच आता त्या शरीराचा अंत्यसंस्कार. अंत्यसंस्काराचा प्रश्न उभा झाला. तसा एक गावकरी दामाजीला म्हणाला,
"दामाजी, आपून या संभाजीचा अंत्यसंस्कार तुमच्या नदीकडील शेतात करु."
तसा दामाजी म्हणाला,
"नाही. कदाचित औरंगाची माणसं येतीन आन् मलेच उचलून नेतीन. मी मराले तयार नाही बाबा. ज्याले मराचं असन. त्यानंच अग्नी द्यावा. फुकटचं इपरीत नोको."
गावक-यांनी ते बोलणं ऐकलं. सर्वजण मरणाला घाबरत होते. कारण त्यांना माहित होतं की जर या संभाजीचं प्रेत ज्यानं जाळलं किंवा ज्यांच्या जागेत अग्नी दिली. त्यांना मृत्युदंड मिळेलच. कारण तशी धमकी औरंगजेबानं आधीच देवून ठेवली होती.
संभाजीचं शरीर शिर्के व शिर्प्यानं शिवून तयार केलं होतं. पण आता अग्नी देणार कोण? सर्व गाव एकमेकांकडं पाहात होता. कोणाचीच हिंमत होत नव्हती. तसा गोविंदाही खचला होता. त्यालाही वाटत होतं की माझ्यानंतर या माझ्या परीवाराचं पालन पोषण कोण करेल? प्रत्येकाच्या जीवनाचा प्रश्न होता.
शिवरायांचा काळ बरा होता की त्या शिवाजीनं तानाजी मरण पावताच त्याच्या उमरठे गावी जावून त्याला मदत केली. रायबाचा विवाह लावून दिला. पण माझ्या परीवाराचं काय होणार. सर्वजण असाच प्रश्न करीत होते. प्रत्येकजण तसाच विचार करीत होता. तसा गोविंदानंच विचार केला की जे होईल ते पाहिल्या जाईल. आपणच तयार व्हावं. हे आपलंच लेकरु आहे. आपल्या धन्याचं लेकरु आपलं लेकरु. तसा तो म्हणाला,
"दामाजी, मी तयार हाये अग्नी द्याले. मी माह्या घराच्या अांगणातच अग्नी देतो संभाजीले. मी संभाजीसाठी बलिदान द्याले तयार हाये. मात्र एक अट हाये?"
अट........प्रत्येकानं एकमेकांकडं पाह्यलं. तसा दामाजी शंका मनात ठेवून म्हणाला,
"अट. कोणती अट?"
"मी मेल्यावर माझ्या परीवाराले आपण पोसावं. एवळीच अट हाये सरकार."
"एवळीच अट ना. बरं बरं. आम्ही समदे गावकरी पोसून टाकू तुह्या परीवाराले. आतं तं झालं नं."
"हो, अातं झालं." गोविंदा बोलला. तसा त्यानं सुटकेचा श्वास सोडला.
तशी रात्र झाली होती. ती औरंगजेबाची माणसं ढाराढूर झोपली होती. त्यांना गावात काय झालं आणि काय होत आहे याची कल्पना नव्हती. तसा गोविंदानं आपल्या अंगणातच त्याचं शरण रचलं व त्यात संभाजीचं शरीर ठेवत त्याला स्वतःच मुखाग्नी दिला. पण तो अग्नी देतांना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते. ते अश्रू त्याच्याच डोळ्यातून नाही तर संपूर्ण गावाच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते. त्या गावातील बासष्ट लोकांनी अत्यंत धाडसानं संभाजीच्या अंत्ययात्रेत भाग घेतला होता. बाकी लोकं मात्र धाकानं घरातच दडले होते. त्यांना वाटत होतं की संभाजीला जर आपण अग्नी दिलाच तर आपल्याला मुघल बादशाहा औरंगजेब सोडणार नाही. मृत्युदंड देईल.
संभाजी अग्नीच्या स्वाधीन झाला होता. त्यातच गावक-यांनी ती झालेली राखही त्या भीमा,भामा व इंद्रायणीच्या संगमात विसर्जीत केली. त्या प्रकरणाची वाच्यता कुठेही केली गेली नाही. असेच काही दिवस गेले.
असेच काही दिवस गेले. कुणाला काहीपण भनक नव्हती. त्यातच गोविंदानं आपल्या घराच्या अंगणात दिवा लावणं सुरु केलं होतं. त्यातच त्यानं अंगणातच एक चबूतरा बनवला. त्याला नाव दिलं संभाजीची समाधी. तसा तो रात्रदिवस त्या समाधीची पुजा करु लागला. त्यातच हळूहळू त्या समाधीची चर्चाही वाढायला लागली. त्यातच वढू गावात संभाजीला अग्नी देण्यात आला ही बातमी हवेसारखी औरंगजेबाला माहित झाली आणि त्यानं सैनिकांना आदेश दिला.
"त्या गोयंद्याला ताबडतोब माझ्या समक्ष आणा."
औरंगजेबाचाच तो आदेश एक दिवस काही सैनिक गोविंदाच्या दारात उभे झालेत. त्यांनी गोविंदा कोण असं विचारलं. तसा गोविंदा न घाबरता कोकलीतून बाहेर आला. हात जोडून म्हणाला,
"मीच गोयंदा, आपण कोण? काय काम हाये जी माह्याकडं?"
सैनिकांनी एकमेकांकडं पाहिलं. तसा एक सैनिक म्हणाला,
"तूच गोयंदा नं. तुले बादशहा सलामत औरंगजेबानं बोलावलंय."
"कशासाठी जी?"
"तुह्यावर आरोप हाये का तू त्या संभ्याले अागीन देली. बोल खरं हाये का हे?"
क्षणभर गोविंदा स्तब्ध उभा राहिला. तसा न घाबरता तो म्हणाला,
"हो, मीच महाराज संभाजीच्या पार्थीवाले अग्नी देली. मी येतो तुमच्या मायराजाकडं."
"तुले माहित नोयतं का की औरंगजेब तुले पकडून नेईन अन् तोफेच्या तोंडी देईन."
"माहित होतं आन् हाये. पण आमी शिवरायाची माणसं. आमाले कोणाची भीती नाही."
गोविंदा निर्भीडपणानं बोलून गेला. तसं सैनिकानं त्याला पकडलं व त्याला साखळदंडानं जखडत त्याला औरंगजेबासमोर उभे करण्यासाठी घेवून गेले.
तो भल्लामोठा साखळदंड. त्या साखळदंडात बंदीस्त केला गेलेला गोविंदा. त्याचेसमोर विराजमान झालेला औरंगजेब. गोविंदा हे सर्व पाहात होता. तसा दाढीला हात लावून दाढी कुळवाळीत औरंगजेब म्हणाला,
"तू होय, ज्यानं संभाजीला अग्नी दिली."
बलदंड शरीरयष्टी. लांबलचक दाढी. उंचपुरा धिप्पाड देहाचा औरंगजेब. पण त्याच्यासमोर किंचीतही न घाबरता गोविंदा म्हणाला,
"होय, मीच अग्नी दिलीय त्या आमच्या लाडक्या संभाजीले."
"का दिली? तुला माझी भीती वाटली नाही?"
"कसली हाये तुही भीती! उलट तुच भेतेस मले."
"ते कसं काय?"
"तुले एवळी माह्यी भीती हाये का तू मले मोकळा सोडू शकत नाही. तुले माहित हाये का जर याले मी मोकळा सोडलो तं हा गणपत तुले मारुन टाकन. म्हूनच तं तुनं मले साखळदंडात जखडलास. तू असा भागूबिल्लीसारखा घाबरट हायेस. तुह्यासारख्याले कोण भेईन."
"बहोत बोलता है। जबान खींच लुँगा तेरी। तू साखळदंडात जखडला आहेस तरी खुप बोलतोस."
"बोलणारच. कारण आम्ही शिवरायांची माणसं हाओत. तुले घाबरतो की काय? आमचा जीव गेला तरी चालते..,आमी आमच्या धन्यासाठी आमचे प्राण द्याले बी मागंपुळं पाहात नाय. आमच्यात माणूसकी हाये. तुह्यासारखी लबाडी नाही."
औरंगजेब ते खडेबोल ऐकत होता. त्याला ज्याप्रमाणे संभाजीचा राग आला. त्याप्रमाणे गोविंदाचाही राग येत होता. गोविदा काही त्या औरंगजेबाला किंचीतही घाबरत नव्हता. ते पाहून औरंगजेब म्हणाला,
"बघ, तू शुरवीर आहेस. आम्ही तुला सरदारकी दिली असती. पण तू खुप मोठी चूक केली. जर तू, तू केलेल्या चुकीबद्दल क्षमा जर मागत असशील आणि मुसलमान बनत असशील तर आम्ही तुला सोडून देवू."
"मले नोको तुह्यं राज्य. आन् नोको तुह्या धर्म. मले माह्याच धर्म बरा वाटते."
तो काळ........ त्या काळातही अस्पृश्यता शिगेलाच होती. जातीजातीत भेदभाव दूरपर्यंत पसरलेला होता. त्यातच अस्पृश्यांसाठी वेगवेगळे नियम लावले गेले होते. सकाळी दहा वाजेपुर्वी आणि सायंकाळी पाच वाजेनंतर अस्पृश्यांना गावात प्रवेश नव्हता. त्यातच अन्न मिळत नसल्यानं उष्ट्या पत्रावळी चाटल्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यातच ही अस्पृश्य माणसे हिन दर्जाची कामे करीत नव्हे तर त्यांना ती कामे करावीच लागत असे.
गावात त्यांना उच्च जातीच्या माणसांसमोर झुकूनच काम करावं लागत असे. त्यांचा स्पर्श जर झाला तर विटाळच होता.
मात्र शुद्ध अशुद्धतेच्या बाबतीत थोडा वेगळा प्रकार होता. जर इतर समाजाची माणसं मरण पावली तर ब्राम्हण समाजाला जीवनावश्यक वस्तू दान देत असत. त्यानं आपल्या घरची अलाबला जावून आपल्याला चांगलं वैभव प्राप्त होते असं लोकांचं मानणं होतं. त्यातच ब्राम्हणाच्या घरी जर मैयत झालीच तर त्यांना स्वतः शुद्ध करण्यासाठी अस्पृश्यांची गरज होती.
गावात अस्पृश्यासह इतरही जातीची माणसं अगदी गुण्यागोविंदानं राहात असत. ते एकमेकांच्या कामात पडत असत. इतर जातीसह अस्पृश्य माणसेही सेवेचं कार्य करीत असत.
राजेरजवाड्याचा काळ. गावात जशी माणसं राहायची. ती माणसं मेल्यानंतर त्या प्रेताची विल्हेवाट लावण्याचं काम जी होत असे. त्यात अस्पृश्यांची फार मोठ्या प्रमाणात मदत होत असे. जशी शिकोटी बांधणे आणि शरण रचण्यासारखी कामं अस्पृश्य करीत. तसेच त्या प्रेताला वाजतगाजत न्यायची कामही अस्पृश्य करीत. त्यातच ही अस्पृश्य माणसे रक्षा गोळा करण्यासाठी येत असत. ती रक्षा गोळा करण्यासाठी अस्पृश्यच माणसे कामात येत असत. गावात ज्याप्रमाणे माणसं राहायची. तसं पशूधन राहायचं. त्या पशूधनाची मरणानंतर विल्हेवाट लावायचं काम अस्पृश्यच करीत असत.
ती अस्पृश्य माणसं पशुधन मृत होताच त्या पशूधनाला ओढायचे. त्याचं चामडं काढायचे व त्या चामड्यांना पकवून त्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवायचे. ही अस्पृश्य माणसं जेव्हापर्यंत ब्राम्हणांच्या घरी दूरुन का होईना, जेवत नसत. तोपर्यंत ब्राम्हण माणसे शुद्ध होत नसत. मग या अस्पृश्यांना ही ब्राम्हण मंडळी वेगवेगळं दान देवून आपल्या घरची अलाबला या अस्पृश्य माणसांच्या घरी दत्त म्हणून देत.,असाच त्यांचा समज होता.
तो काळ........ त्या काळातही अस्पृश्यता शिगेलाच होती. जातीजातीत भेदभाव दूरपर्यंत पसरलेला होता. त्यातच अस्पृश्यांसाठीर वेगवेगळे नियम लावले गेले होते. सकाळी दहा वाजेपुर्वी आणि सायंकाळी पाच वाजेनंतर अस्पृश्यांना गावात प्रवेश नव्हता. त्यातच अन्न मिळत नसल्यानं उष्ट्या पत्रावळी चाटल्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यातच ही अस्पृश्य माणसे हिन दर्जाची कामे करीत नव्हे तर त्यांना ती कामे करावीच लागत असे.
गावात त्यांना उच्च जातीच्या माणसांसमोर झुकूनच काम करावं लागत असे. त्यांचा स्पर्श जर झाला तर विटाळच होता. मात्र शुद्ध अशुद्धतेच्या बाबतीत थोडा वेगळा प्रकार होता. जर इतर समाजाची माणसं मरण पावली तर ब्राम्हण समाजाला जीवनावश्यक वस्तू दान देत असत. त्यानं आपल्या घरची अलाबला जावून आपल्याला चांगलं वैभव प्राप्त होते असं लोकांचं मानणं होतं. त्यातच ब्राम्हणाच्या घरी जर मैयत झालीच तर त्यांना स्वतः शुद्ध करण्यासाठी अस्पृश्यांची गरज होती.
गावात अस्पृश्यासह इतरही जातीची माणसं अगदी गुण्यागोविंदानं राहात असत. ते एकमेकांच्या कामात पडत असत. इतर जातीसह अस्पृश्य माणसेही सेवेचं कार्य करीत असत.
राजेरजवाड्याचा काळ. गावात जशी माणसं राहायची. ती माणसं मेल्यानंतर त्या प्रेताची विल्हेवाट लावण्याचं काम जी होत असे. त्यात अस्पृश्यांची फार मोठ्या प्रमाणात मदत होत असे. जशी शिकोटी बांधणे आणि शरण रचण्यासारखी कामं अस्पृश्य करीत. तसेच त्या प्रेताला वाजतगाजत न्यायची कामही अस्पृश्य करीत. त्यातच ही अस्पृश्य माणसे रक्षा गोळा करण्यासाठी येत असत. ती रक्षा गोळा करण्यासाठी अस्पृश्यच माणसे कामात येत असत. गावात ज्याप्रमाणे माणसं राहायची. तसं पशूधन राहायचं. त्या पशूधनाची मरणानंतर विल्हेवाट लावायचं काम अस्पृश्यच करीत असत.
ती अस्पृश्य माणसं पशुधन मृत होताच त्या पशूधनाला ओढायचे. त्याचं चामडं काढायचे व. त्या चामड्यांना पकवून त्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवायचे. ही अस्पृश्य माणसं जेव्हापर्यंत ब्राम्हणांच्या घरी दूरुन का होईना, जेवत नसत. तोपर्यंत ब्राम्हण माणसे शुद्ध होत नसत. मग या अस्पृश्यांना ही ब्राम्हण मंडळी वेगवेगळं दान देवून आपल्या घरची अलाबला या अस्पृश्य माणसांच्या घरी दत्त म्हणून देत. असाच त्यांचा समज होता.
गावात जी अस्पृश्य माणसं होती. त्यांच्यासाठी कडक नियम असल्यानं ती माणसं इतर जातीच्या वाट्याला जात नसत. जर गेलीच तर त्यांना वाळीत टाकलं जाई. ज्यात त्यांची कोंडी होत असे. त्यातच अशा कारणानं त्यांची उपासमार होवून ते उपासानं तडफडून मरत असत.
वढू गावातही असाच भेदभाव होता. गोविंदालाही या गावात विटाळाचे चटकेच बसत होते. त्याला गावात काही सहानुभूतीची वागणूक मिळाली नव्हती. त्यातच त्याचेशी वार्तालाप करतांना तो वार्तालाप दूरुनच केला जाई. तसेच व्यवहारही दूरुनच केला जाई.
वढू गाव पुण्याच्या आसपासच असल्यानं या भागात शिवरायांची वतनदारी होती. ज्यावेळी जिजाबाई पुण्याला राहायला आल्या. त्यावेळी याही भागात चोरांचा व लांडग्यांचा हैदोस वाढला होता. लोकं चोरांच्या भीतीनं व लांडग्यांच्या भीतीनं परेशान होती. त्यातच काही लोकं पुणं सोडून पळाले होते. त्यावेळी शिवराय लहान होते.
महार माणसं ही शुरवीरच नाही तर जीवावर उदार होवून लढणारी माणसं होती. त्यातच या माणसांची जी मुलं असायची. ती मुलंही लहानपणापासूनच शुरवीर असायची. ती लहानपणापासूनच जीवंत साप, सरडे पकडण्यात माहिर होती. त्यातच ही लहान अस्पृश्यांची मुलं त्या लहानपणीच या साप, सरड्यांना मारुन त्यांना जंगलातच भाजून टाकून ते खात असत.
शिवराय हे लहानपणापासूनच मावळ्यांच्या मुलांसोबत राहणारे. या मावळ्यात ती अस्पृश्य मुलेही होती. जी शिवरायांसोबत कांदा भाकर आवडीनं खात होती. त्यातच त्यांना भेदभाव कसा असतो हे अगदी लहानपणापासूनच माहित असतांना त्यातच शिवराय हे भेदभाव पाळणारे नसल्यानं व सोबतच जेवन करणारे असल्यानं ते या अस्पृश्य मुलांना आवडत. त्यातच ही अस्पृश्य मुलं ही शिवरायांच्या बरोबर रमतगमत खेळत खेळत लहानाची मोठी झाली. ती जीवाला जीव देणारी ठरली. कारण त्यांना शिवरायांमध्ये स्वतःच्या जातीच्या अस्पृश्यतेवरील कलंक धुणारा माणूस दिसला.
वढू गाव हे पुण्याच्या आजूबाजूलाच असल्यानं त्याही गावात लोकं दहशतीतच राहात. चोरं आणि लांडग्याची भीती असल्यानं जी लोकं घाबरली होती. ती लोकं जीजामाता या पुण्याला राहायला येताच निर्भीड झाली. त्यातच जीजाबाईनं घोषणा केली की जो कोणी जास्त लांडगे मारेल. त्याला योग्य बक्षीस देण्यात येईल. त्यातच जीजाबाईच्या घोषणेनुसार याच अस्पृश्य जातीनं जास्तीत जास्त लांडगे मारले व योग्य बक्षीसही मिळवले होते. ही कर्तबगारी पाहता जीजाबाईनं पुढे जावून या अस्पृश्य माणसांना आपल्या राजदरबारात योग्य मानाच्या जागा दिल्या. हे जीजाबाईचे कार्य लहानपणापासूनच शिवरायांनी हेरलं. ज्यामुळं लहानपणापासूनच शिवरायांवर अस्पृश्यांबाबत योग्य संस्कार झाले.
शिवरायांची सवंगडी म्हणजे डोंगरावरील ही आदिवासी मुलं. ज्यात अस्पृश्यांचीही मुलं होती. ती अस्पृश्यांची मुलंही कधीकधी शिवरायांबरोबर राजवाड्यात येत. त्यातच जीजाबाई त्याही मुलांना हिन न समजता शिवरायापाठोपाठ योग्यच वागणूक देत. ह्याच गोष्टी शिवरायांवर संस्कार करणा-या ठरल्या. पुढे जेव्हा शिवराय मोठे झाले. तेव्हा ते आपल्या या सवंगड्यांना विसरले नाहीत. त्यांनी या सर्वांना सोबत घेवून स्वराज्य स्थापन केलं.
गोविंदा असाच व्यक्ती की ज्याने पुण्याच्या लालमहालात जीजाबाईचा मुक्काम असतांना नोकरी केली. त्यानं संभाजीला कित्येक वेळा दरवाज्यातून येता जाता पाहिलं. त्यामुळं त्याच्या मनात संभाजीबाबत साहजिकच. ऋणानुबंध व आत्मीयता निर्माण झाली होती.
शिवराय हे जाणते राजे होते. ते अस्पृश्यता पाळत नव्हते. जावळीच्या मो-याचा पराभव केल्यानंतर शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर एक किल्ला बांधला होता. ज्याचं नाव प्रतापगड ठेवलं होतं. तिथं भवानीमातेचं एक मंदिर बांधलं होतं. या मंदिरात ज्यावेळी देवीची प्राणप्रतिष्ठा स्थापन झाली. त्यावेळी काही अस्पृश्य माणसेही तिथं हजर होती. त्यावेळी ती विटाळ व भेदभावामुळे थोडी दूर उभी होती. शिवरायांनी त्यावर चौकशी केली असता कळलं की ह्याच माणसांनी देवीची मुर्ती घडवली आहे. अर्थात बनवली आहे.
शिवरायांनी त्यावर या माणसांना देवीची पुजा करण्यास सांगीतले. पण त्यात पुजा-यानं आक्षेप घेतला की त्यांना पुजेचा अधिकार नसून त्यांना पुजा करु देवू नये. त्यातच शिवरायांनी पुजा-याला त्याचं कारण विचारलं. पुजा-यानं सांगीतलं की या लोकांच्या पुजा करण्यानं ती मुर्ती अपवित्र होईल. त्यावर शिवराय म्हणाले,
"ही मुर्ती जर याच माणसांनी बनवली आहे तर ही मुर्ती यांच्या पुजा केल्यानं अपवित्र कशी होणार?" त्यावर पुजारी म्हणाले,
"अपवित्र आणि पवित्रपणाचे नियम हे आमच्या पुर्वजांनी बनवले असून त्यांच्या मतानुसार ज्यावेळी ही मुर्ती बनवली गेली. तेव्हा तिच्यात जीव नव्हता. पण आज ती मुर्ती बनलेली आहे व आज केलेल्या प्राणप्रतिष्ठेनं तिच्यात जीव आला आहे. म्हणून ही मुर्ती अपवित्र होणार आहे."
त्यावर शिवराय म्हणाले,
"अशी जर मुर्ती अपवित्र होत असेल तर ती देवी कशी? देवीला कोंबडं बकरं चालतं. मग ही अस्पृश्य माणसं पुजेला का चालत नाहीत? असे जर तुमच्या पुर्वजांचे नियम असतील तर ते बदलवून टाकावे. हे असे नियम मला मान्य नाही."
शिवरायांच्या या प्रश्नानं पुजा-याला हार मानावी लागली व या प्रतापगडावर अस्पृश्यांनाही पुजा करता आली.
ही घटना त्यावेळी अस्पृश्यांसाठी लाभदायक ठरली होती. याचाच परीणाम गावोगावी झाला. अस्पृश्य मंडळी शिवरायांना देव मानू लागली. त्यांना अन्नदाता समजू लागली. हा शिवरायांवर झालेला अस्पृश्यता निर्मुलनाचा परीणाम म्हणजे त्याला जीजामातेनं लहानपणीच जे अस्पृश्यता निर्मुलनाचे बाळकडू पाजले होते. त्याचाच परीणाम होता. ज्या परीणामाने आज अस्पृश्यांना शिवरायात देव दिसला होता.
या अस्पृश्यांना मानाचं स्थान देण्याचा परीणाम व प्रतापगडावर पुजा करु देण्याचा परीणाम जसा गावोगावी झाला. तसा वढू गावातही झाला. तेथीलही अस्पृश्य माणसे ही शिवरायांना देव मानू लागली. त्यातच ते अन्नदाता समजून शिवरायच नाही तर त्यांच्या पूर्ण वंशावळीसाठी जीव द्यायलाही ते तयार झाले. ज्यातून गोविंदानं संभाजीचे तुकडे गोळा करुन त्याला अग्नी देण्याचं कसब दाखवलं. त्याला माहित होतं की आपल्या अशा कृत्याबद्दल बादशहा औरंगजेब पकडेल. कैद करेल. अनन्वीत यातना देईल आणि शेवटी मृत्युदंड. ज्याप्रमाणे त्यानं संभाजी व कवी कलशांना तडपवलं. अगदी तसंच आपल्यालाही करेल असं गोविंदालाही माहित होतं. तरीही त्यानं ते सर्व केलं होतं. एक कर्तव्य म्हणून त्यानं संभाजीला अग्नी दिला होता.
शिवरायांनी आपल्या कर्तृत्वानं अस्पृश्य जातीचीही माणसं जोडली होती. त्यांचा वैयक्तीक सेवक मदारी मेहतर होता. शिवाजी महाराजांनी अस्पृश्य आणि महारांना किल्लेदार बनवले होते. हेरप्रमुख बहिर्जी नाईक हा महार समाजाचा होता. तसेच शिवरायांच्या फौजेत हेच अस्पृश्य लोकं असल्यामुळे ते वेगवेगळ्या स्तरावरच्या लढाया जिंकू शकले. कारण अस्पृश्य मंडळी ही पुर्वीपासूनच काटक व शुर मंडळी होती.
गोविंदाला औरंगजेबानं पकडून त्याला कैद केलं होतं. तसं पाहता औरंगजेब गोविंदावर चिडलेलाच होता. त्याची दोन कारणं होती. पहिलं कारण होतं, ते म्हणजे संभाजीच्या पार्थीवाला अग्नी तर दुसरं कारण निराळच होतं.
गोविंदाचे बाबा गोपाळराव हे महार जातीचे होते. महार जातीचा स्वतःचा असा कोणताही व्यवसाय नसायचा. ती मंडळी मिळेल ती कामे करायची. त्यातच शिवरायांनी रायरीचा किल्ला जिंकला.
रायरीचा किल्ला हा अभेद्य असा किल्ला असून त्या किल्ल्याला आजुबाजूनं जंगलांनी वेढलेलं होतं. त्यातच हा किल्ला जेव्हा जिंकला. तेव्हा या किल्ल्याचं बांधकाम करण्यात आलं. त्यात दगडं फोडण्याचंही काम होतं. ती कामं करण्यासाठी गावोगावची मंडळी बोलावली होती. त्यात गोविंदाच्या वडीलाचा समावेश होता. गोपाळराव रायगडाच्या बांधकामाची दगडं फोडण्यात आघाडीवर होते. तसं पाहता रायगडावर दगडं फोडत असतांना ती दगडं फोडणं चाणाक्ष असलेल्या शिवरायांच्या लक्षात आलं. कारण गोपाळराव सफाईनं दगडं फोडत. त्यातच ते गोपाळरावांच्या कामावर खुश झाले व एक दिवस गोपाळरावांना म्हणाले,
"गोपाळराव, तुम्ही दगडं फोडण्यात अतिशय माहिर दिसता. सांगा याबद्दल तुमास्नी कोणता पुरस्कार हवा. आम्ही मासाहेबांना सांगून तुम्हाला ताबडतोब पुरस्कार देवू."
यावर गोपाळराव शिवरायांना म्हणाले,
"महाराज, आपण कायले मले पुरस्कार देता जी? हे माह्य काम हाये. ते मी करणारच. मी त्याचे पैसे घेतो न जी."
"नाही नाही गोपाळराव. आम्ही तुम्हाला पुरस्कार देणार म्हणजे देणारच."
शिवराय चाणाक्ष बुद्धीमत्तेचे होते. तसे तेे पुढे म्हणाले,
"बोला गोपाळराव, तुम्हाला काय हवं. लाजू नोका. मागून घ्या." असे म्हणताच गोपाळराव म्हणाले,
"महाराज द्यायचेच तर माह्या लेकराले नोकरी द्या. आपल्या सैन्यात घ्या माह्या पोराले."
शिवराय विचार करु लागले. तसे शिवराय म्हणाले,
"ठीक आहे. मी तुमच्या मुलांना नोकरीत घेतो."
शिवरायांनी म्हटल्याप्रमाणे गोविंदाला आपल्या सैन्यात सामावून घेतलं होतं. अनेक सारे पराक्रम गोविंदानं केले होते.
शिवाजी महाराज हे जातपात मानत नव्हते. त्यांच्या सैन्यात अठरापगड जातीची माणसं होती. त्यातील गोविंदा एक. गोविंदा हा लहानपणापासूनच धष्टपृष्ट होता. त्याचं पीळदार व बलदंड शरीर पाहून शिवरायांनी त्याला सैन्यात घेतलं. त्यातच शिवरायांच्या मृत्यूनंतर त्याचे महाराज संभाजीशी संबंध दृढ झाले होते.
संभाजीही ज्यावेळी राजा बनले. त्यानंतर ते आपल्या वडीलांसारखे जातीयवाद विरोधीच होते. त्यांच्याही सैन्यात समतेचे तत्व असून त्या तत्वांना तत्कालीन ब्राम्हण मंडळी मानत नसत. अशातच ब्राम्हण मंत्र्यांकडून संभाजी महाराजांना मारण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यातच जेव्हा हा कट उधळला गेला व या कटाची माहिती संभाजींना झाली. तेव्हा या संभाजींनी त्या गुन्हेगारांना कडक शिक्षा दिल्या. त्यातच या शिक्षा देणा-या लोकांमध्ये गोविंदाचा समावेश केला गेला. गोविंदा महाराजांच्या आदेशानं या लोकांना चाबकाचे फटके मारायचे काम करीत होता. याचा परीणाम हा झाला की या ब्राम्हण मंडळींच्या मनात संभाजीबाबत द्वेषाचे वारे निर्माण झाले. पुढे औरंगजेब जेव्हा दक्षिणेत आला. त्याच्याशी संभाजीच्या शत्रूंनी हातमिळवणी केली. त्यातच संभाजीला पकडण्यासाठी शत्रूंच्या गोटातून गुप्तपणे हालचाली सुरु झाल्या. त्यातच ज्यावेळी नाशिकजवळील रामसेजचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी औरंगजेब प्रयत्न करु लागला. त्यावेळी तो किल्ला लढविण्याची जबाबदारी संभाजीनं गोविंदावर टाकली. ती जबाबदारी गोविंदानं चांगलीच पेलवून धरली. त्यानं ती जबाबदारी समर्थपणे पेलवून औरंगजेबाच्या सैन्याचा पाडाव केला. त्यातच संभाजींनी गोविंदाला किल्लेदाराचे वस्र देवून त्याचा सन्मान केला.
रामसेजचा किल्ला औरंगजेब बादशाहाचे सैन्य अफाट असूनही त्याला जिंकता आला नव्हता. त्या किल्ल्यावर चढाई करणारे औरंगजेबाचे सरदार शाहबुद्दीन व फिरोजनंग यांचा पराभव झाला होता. त्यातच या प्रकरणानं बादशहा ज्याप्रमाणे संभाजीवर चिडून होता. त्यातच तो याच प्रकरणानं गोविंदावरही चिडला होता. तसेच संभाजीचा ज्यावेळी राज्यभिषेक झाला. त्यावेळी चौदा दिवसातच त्यांनी ब-हाणपूर येथे हल्ला चढवून जी लुट मिळवली. त्यातही गोविंदा आघाडीवरच होता. त्यातच ती संपत्ती सुरक्षीतपणे रायगडावरही पोहोचवली गेली. त्यात ती जबाबदारीही गोविंदानंच विश्वासानं पार पाडली. तसेच ज्यावेळी संभाजी संगमेश्वर मार्गे रायगडाला निघाली. तेव्हा ते संगमेश्वर भागात काहीवेळ थांबले. त्यावेळी संताजी घोरपडे व इतर माणसे सोबत होते. संभाजीनं संताजी व गोविंदाला पुढं पाठवलं व ते शेतक-यांची गा-हाणी ऐकण्यासाठी संगमेश्वरला थांबले. त्यातच या संगमेश्वरला संभाजीचे नातेवाईक गणोजी शिर्केच्या फितूरीमुळं संभाजींना पकडलं गेलं, त्यावेळीही गोविंदा रायगडाकडे निघून गेल्यानं, परंतू थोड्याशा चुकीनं संताजी व गोविंदा पुढे निघून गेल्यानं घात झाला. त्यातच संभाजीचं अपहरण होताच महाराणी येशूबाईनं त्याचा शोध घेण्यासाठी दोन पथकं नेमली. त्यामध्ये एका पथकाचं नेतृत्व संताजी व दुस-या पथकाचे नेतृत्व गोविंदाच करीत होते.
ज्यावेळी औरंगजेबानं गोविंदाला पकडलं. त्यावेळी त्याला औरंगजेबाच्या मनात भयंकर राग होता. त्याला वाटत होतं की यापुढं संभाजीला मानणारे पैदा होवूच नये. म्हणून बादशाहा भयंकर चिडूनच बोलला गोविंदावर. कारण त्याला वाटत होतं की जो मराठ्यांचा राजा होता. त्या मराठ्यांच्या राजावर कोणीही अंत्यसंस्कार करु नये. तर ते मांस गिधाडांनी खावं. पण तसं काही घडलं नव्हतं. आज गोविंदानं असं काही कृत्य केलं होतं की ज्यामुळं औरंगजेबाची मान खाली गेली होती. कालचा औरंगजेबाचा हुकूम धुळीस मिळाला होता. ती दवंडीही धुळीस मिळाला होता. त्यातच एवढं मोठं साम्राज्य आणि एवढी अफाट सैन्यसेना सर्व त्याला हास्यास्पद वाटत होतं. तो दुखावला गेला होता.
ज्याप्रमाणे औरंगजेबानं गोविंदाला कैद केलं, त्याचप्रमाणे औरंगजेबानं जनाबाई आणि राधाईसह अनेक लोकांना कैद केलं होतं.
"डाल दो इसे काले घने अंधेरे मे। इन्हे ऐसे तडपाना की ये खुद अपने मृत्यू को याद करे। मगर मेरे आदेश के बिना इसे पाणी तक नही देना। यह बाद याद रहे। जो गुस्ताख इसे पानी देगा। उसे भयानक मौत मिलेगी। याद रहे।"
गोविंदाला त्या अंधा-या कालकोठडीत नेण्यात आलं. सोबतच जनाबाईलाही नेण्यात आलं. जनाबाईला कुठं ठेवलं माहित नव्हतं. त्यातच जनाबाईच्याच मुळं संभाजीला अग्नी देण्यात आली होती.
गोविंदाला आज हायसं वाटत होतं की त्यानं आपल्यावर उपकार करणा-या संभाजीचं ऋण चुकवलं. त्याला आता मरण आलंही, तरी तो सुखानं मरेल.
असाच तो दिवस उजाडला होता. पण तो दिवस उजाडल्यासारखा त्या कालकोठडीत वाटत नव्हता. ज्या कालकोठडीत गोविंदाला ठेवण्यात आलं होतं. सर्वत्र अंधार पसरला होता. तसा तो आज पाण्यासाठी तडपत होता. पण जल्लादांनी त्याला पिण्याचं पाणी दिलं नव्हतं.
ती कालकोठडी औरंगजेबानं संभाजीलाच संपविण्यासाठी बनवली होती. त्या कालकोठडीत हवाही औरंगजेबाच्याच मर्जीनं आत प्रवेश करीत होती. त्याच कालकोठडीत आज गोविंंदाही होता.
गोविंदा विचार करीत होता त्या संभाजीचा. तो संभाजी या कालकोठडीत कसा राहिला असेल. आपल्यालाच एवढा त्रास होत आहे. कदाचित असाच त्रास माझ्या अन्नदात्यालाही झेलावा लागला असेल. हा औरंगजेब म्हणजे जल्लाद माणूस की ज्याने माझ्या राजाचा कत्ल करावा.
तसा औरंगजेबही विचार करीत होता. या मराठ्यांना हरविण्याची स्वप्न पाहात होता. असाच एक दिवस उजळला. बादशाहाला वाटलं की आपण गोविंदाची भेट घ्यावी. त्याला विचारावं की या कटात आणखी कोण कोण सहभागी आहेत. कदाचित हे कार्य एकट्या गोविंदाचं होवू शकतच नाही. यात आणखी काही लोकं सहभागी असू शकतात.
या कृत्यात अख्खा गावच सहभागी होता. कोणी कपडे शिवले होते तर कोणी लाकडं आणली होती. कोणी गोव-या आणल्या होत्या. तर कोणी धसकटं. त्यातच या अंत्यसंस्कारात अडचण जावू नये म्हणून दामाजीनं चांगली तरणेताठ पोरं गोफनगुंडा घेवून गावाच्या बाहेर उभे केले होते. प्रत्येक मुलांना आदेश होता की जर असे कोणी औरंगजेबाचे सैनिक दिसलेच तर त्यांचेवर त्या गोफणीनं असा वार करायचा की ती माणसं जागीच मरुन पडतील. आपल्या अग्नीसंस्कारात व्यत्यय येणार नाही.
ती तरणीताठ मुलं अंत्यसंस्कार जागेच्या आजूबाजूलाच गावाच्या दूर अंतरावर उभी होती. त्यातच अगदी पहाटेपर्यंत अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपला. परंतू प्रेत लवकर जळलं नव्हतं. काही शरीराचा भाग अजूनही शिल्लक होता. आता काय करावे असा प्रश्न दामाजीला पडला. त्यातच दामाजीनं गोरखनाथाला विचारलं की जर हे पेटतं शरण विझवून याला जमीनीत पुरलं तर काही अंत्यसंस्कारात बाधा तर उत्पन्न होणार नाही. कारण जर तांबडं फुटलंच आणि मुघल सैनिकांना याची चाहूल लागलीच तर आपली काही खैर नाही. शेवटी नाथानं सांगीतलं की असं काहीही होणार नाही. तुम्ही निश्चींत असा. शेवटी एक ताबडतोब खड्डा खणण्यात आला व त्यात संभाजी राजाचा अर्धवट जळालेला मृतदेह पुरण्यात आला.
नाथानं सांगीतलं की असंं काहीच होणार नाही. त्याचं कारण म्हणजे आपण हे शरीर बेवारस सोडत नाही आहोत. तर त्याची यथोचित विल्हेवाट लावत आहोच.
बादशाहा औरंगजेब त्या अंधा-या कालकोठडीकडं आला. तसं त्यानं गोविंदाला न्याहाळलं. तसा तो विचार करु लागला की ज्यावेळी संभाजीला जाळलं असेल, ते काम काही एकट्याचं नाही. ते काम इतरही गावातील माणसांचं असावं. तसा तो त्याला म्हणाला,
"हे गोयंद्या, तुझ्या या कटात कोण कोण सहभागी आहेत?"
"..........." गोविंदा काहीच बोलला नाही. तसा बादशाहा पुुन्हा म्हणाला,
"हे पाहा, तू जर मला यथोचित पुरेपूर माहिती देशील तर मी तुझे सर्व गुन्हे माफ करील आणि तुला सोडूनही देईल कदाचित. काय त्या संभाजीची काही माणसं. पण त्यांना तर काहीच माहित नाही की हे तुकडे मी कुठं आणि कसे टाकले. मग त्यांना ते कसं कळलं. कदाचित गोविंदा माझ्याच गोटातील माणसं! तुला माहित तरी कसं झालं आधी ते तर सांग."
गोविंदानं त्याच अंधा-या खोलीतून बादशहाकडं एक कटाक्ष टाकला. तसा तो गप्प झाला. त्यानं चूप राहाणं योग्य समजलं. तसा औरंगजेब बादशाहा ओरडत म्हणाला,
"बता प्यार से हरामज्यादे, नही तो तेरी खाल उधाड देंगे।"
गोविंदानं बादशाहाच्या कोणत्याच प्रश्नाला दुजोरा दिला नाही. तोच त्याला बरंच वैषम्य वाटलं. त्यातच त्यानं आपल्या शिपायाला आदेश दिला की या गोविंंदाला चाबकाचे फटके मारा.
गोविंदाच्या त्या कालकोठडीचं कुलूप उघडण्यात आलं. त्याच्या हातात व पायात बेड्या टाकण्यात आल्या. त्याला बाहेर काढण्यात आलं. त्याचबरोबर त्याला त्याच तटबंदीत एका खांबाला बांधण्यात आले. त्यातच त्याच्यावर एकामागून एक चाबकाचे फटके मारण्यात येवू लागले. जे चाबकाचे फटके आजपर्यंत त्याने स्वतः संभाजीच्या आदेशानं इतरांना मारले होते. आज गोविंदाला ते सर्व आठवत होतं. तो चाबकाचा एकेक फटका जीवघेणा वाटत होता. अगदी असह्य होत होता. त्यातच गोविंदाच्या शरीराची तो चाबकाचा फटका पडताच अंगार होत होती. पण तो निधड्या छातीचा वीर आज संभाजीसाठी नव्हे तर आपल्या धन्याच्या लेकरासाठी सर्वकाही झेलत होता. तसा बादशाहा म्हणाला,
"बोल साले, जल्दी बोल। कौन कौन था वहाँपर?"
संभाजीलाही असेच मारले असेल या बादशाहाने. गोविंदा विचार करु लागला. थोड्याच वेळात तो लहूलूहान झाला होता. त्याच्या शरीरातून रक्त निघत होतं. तसा बादशाहा जवळ आला. त्याच्या दोन्ही गालावर जोरात चापटा मारु लागला. तसे त्यानं दोन्ही गाल आपल्याा हाताच्या चिमटीत पकडून तो म्हणाला,
"गोयंद्या, तुले बोलावंच लागेल. तुझ्या या कटात कोण सहभागी होता?"
गोविंदा काहीच बोलला नाही. ते पाहून बादशाहा अाणखी वैतागला. याचं करु तरी काय, असं त्याला वाटायला लागलं. तसा तो विचार करु लागला. तशी त्याला एक नामी युक्ती सुचली.
बादशाहा औरंगजेबानं आदेश दिला की त्या गोविंदाला घेवून जावं व पुन्हा कालकोठडीत टाकावं. त्याला आज अन्न देवू नये. पाणीही नको.
दुसरा दिवस उजळला. काल त्याला अन्न आणि पाणीही दिलं गेलं नाही. तसा तो त्या अन्नपाण्यावाचून तडपत होता. तसा आज बादशाहा पुन्हा त्या कालकोठडीजवळ आला. म्हणाला,
"सांगतोस गोयंद्या. कोण होता तुला मदत करायला."
गोविंदानं बादशाहाकडं एक कटाक्ष टाकला. तसा तो हसला व म्हणाला, औरंग्या, तू मले मारुच शकत नाही. माहित हाये, मी जर मेलो तं तू बी मरशीन. तडपू तडपू. हा राज जो आहे ना. तो राजच राहिन. जर हा राज तुले मालुम जर झाला नाही तं तुले झोप बी येणार नाही रातीची." तसा गोविंदा परत हसला व तिथून निघून जावून त्यावर विचार करु लागला.
थोडा वेळ विचार करताच त्याला वाटलं की कदाचित गोविंदा त्याला आपला राज सांगेल. काही दिवसानं सांगेल. पण त्याचा जर अन्नपाण्याविना जीव जर गेला तर हा राजच राहिल कायमचा दफन होवून. त्यामुळं त्याला जीवंत राहाणं भाग आहे. शेवटी उपाय नसल्यानं बादशाहानं गोविंदाला काही दिवस की असेना जीवंत ठेवण्यासाठी शिपायाला बोलावून त्या कालकोठडीत अन्न आणि पाणी पाठविण्याची व्यवस्था केली होती.
सकाळ झाली होती. त्यातच पक्षी अन्न मिळविण्यासाठी दूर जंगलात रवाना झाले होते. तांबडं फुटलं होतं. त्याचबरोबर सुर्यही निघाला होता. अशातच बादशाहाचा एक दूत गावात येवून धडकला. म्हणाला,
"एक सरकारी आदेश हाय. बादशाहा औरंगजेबाचं म्हणणं हाये की या संभाजीच्या अंत्यसंस्कारात कोण कोण हजर होतं, त्यांनी स्वतः होवून बादशाहाकडं यावं. त्यांची माफी मागावी. बादशाहा त्यांना खुल्या मतानं माफ करेल."
बादशाहा औरंगजेब........त्या बादशाहाबाबत सर्व गावालाच नाही तर पंचक्रोशीत माहित होतं की त्याचा स्वभाव कसा आहे. तसं पाहता बादशाहाचा तो आदेश जरी असला तरी आज सर्व गाव एक होतं. कोणी कोणाची नावं उजागर केली नव्हती वा कोणीही बादशाहाचा हेर नव्हता. सर्वांनी एकत्र येवून संभाजीच्या अंत्यसंस्काराला मदत केली होती. त्यातच आता ते शिपाही येत. दोन गोष्टी बोलत आणि निघून जात. पण कोणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हते वा त्या कटाबाबत कोणीही सांगत नव्हतं.
सर्व गावाचा गोविंदा एक नेता ठरला होता की ज्यानं गुन्हा आपल्या अंगावर घेतला होता. ज्यानं आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती. त्यातच माझा परीवार उपाशी मरेल याची चिंताही केली नव्हती. फक्त एक विनंती दामाजी पाटलाजवळ केली होती की माझ्या मृत्यूपश्चात माझी पत्नी व माझ्या लेकराबाळाला सांभाळावं. आज संंपूर्ण गावानंही त्या परीवाराला अंतर दिलं नाही.
रोजच येणारे ते शिपाही. त्या शिपायांच्या येण्यानं गाव त्रासून गेलं होतं. त्यातच काही जणं गावंही सोडून गेले होते. त्यांना वाटत होतं की यदिकदाचित बादशाहाला माहित झाल्यास बादशाहा आपल्याला सोडणार नाही.
गोविंदा जीवंत होता. त्याला क्षणोन् क्षण आठवत होता. ती बादशाहाची माणसं त्या अंधा-या कालकोठडीत येत. कधी तंबी देवून जात. तर कधी जोरजोरानं हसत असत. कधी ती माणसे अंगावर तलवारीच्या जखमा करीत तर कधी तलवारीनं मुंडकं छाटण्याची धमकी देत. एक एक दिवस गोविंदासाठी कठीण जात होता. त्याला काय करावं आणि काय नाही असं होवून जात होतं. पण उपाय नव्हता.
गोविंदा असा व्यक्ती होता की ज्यानं संभाजीच्या प्रेताला स्वतः अग्नी तर दिली होती. त्या गोष्टीला आपलं भाग्य समजला होता. एरवी कोण्या महाराजाला अग्नी देण्यासारखं पुण्याईचं काम एका अस्पृश्याला मिळणं म्हणजे नशीब फळफळण्यासारखं गोविंदाला वाटलं. कारण आतापर्यंत ह्या गोविंदाला त्याच गावातील इतर समाजानं व्यवहार करतांना तो व्यवहार दुरुननच केला होता. त्यांना पाणीही दुरुनच पाजलं होतं. जरी त्यानं संभाजीच्या सैन्यात एका किल्लेदाराची भुमिका पार पाडली असेल. त्यानंच जनाबाई आणि गावातील इतर माणसांना सोबत घेवून औरंगजेब बादशाहाच्या धाकाची पर्वा न करता संभाजीचे तुकडे गोळा केले होते. तसेच त्याला शिवून त्याचा दाहसंस्कारही उरकवला होता. एवढंच नाही तर त्यानंच दुस-या दिवशी महाराणी येशूबाईंना गडावर जावून त्याबद्दल सर्वकाही रितसरपणे सांगून मी कसा पुढाकार घेतला याचं वर्णनही केलं होतं. त्यामुळं की काय, कोण्यातरी आपल्याच हेराकडून ही माहिती औरंगजेबाला माहित होताच त्यानं गोविंदाला अटक केली होती. आज गोविंदा बादशाहाच्या कालकोठडीत अखेरच्या घटका मोजत होता. निर्भीड, नबोलक्या मनानं. त्याला कोणताही कशाचाही पश्चाताप नव्हता. उलट त्याच्याच पराक्रमानं आणि मौन वागण्यानं बादशाहा औरंगजेब दिवसेंदिवस परेशान होत होता.
गोविंदा एकटाच शूरवीर नव्हता. तर त्याची अख्खी खानदानही शुरवीर होती. त्यांना लढाईत मोठमोठे पराक्रम कसे गाजवावे हे माहित होते. त्यातच त्याचा मावशभाऊ रायप्पाने केलेला पराक्रम हा त्याच्या पाठीशी होता. तो पराक्रम गोविंदालाही पाठबळ देवून गेला होता.
संभूराजे हे जेव्हा लहान होते, तेव्हा ते रायप्पाकडे जेवायला जायचे, तेव्हा अमात्य अण्णाजी दत्तो अस्पृश्य व सवर्ण भेदभाव असल्यानं जीजामातेला त्याबद्दल सांगायचे आणि जीजाबाई शिवरायांना सांगायची. तेव्हा शिवराय हसून द्यायचे आणि त्याकडे दुर्लक्ष करायचे. कारण जीजाबाईनं जातपात पाहून मैत्री करायचे संस्कार शिवरायांवर केले नव्हते. तसेच त्याबाबत शिकवलंही नव्हतं.
रायप्पाचं मुळ गाव तवं. आज तवं गाव मुळशी तालुक्याच्या वरसगाव धरणात बुडालेले आहेे. हे गाव तुळापूरच्या मोसे खो-यात आहे. तो पराक्रमी असा व्यक्ती असून त्याच्या पराक्रमामुळं त्याची नेमणूक संभाजीचा अंगरक्षक म्हणून झाली होती. अगदी बालपणापासूनच रायप्पा शंभूराजाचा अंगरक्षक होता.
ज्यावेळी शंभूराजे व कवी कलशांना पकडण्यात आलं. त्यावेळी त्यांंना औरंगजेबानं बहादूरगड इथे आणलं. त्यातच त्याचा छळंही करण्यात येवू लागलाा. हे जेव्हा रायप्पाला कळलं, तेव्हा त्याचं मस्तक खवळलं व मोजक्या सैन्यानिशी तो बहादूरगडाच्या दिशेनं चालून गेला. त्यातच त्या ठिकाणी पाच लक्ष सैन्याची तुकडी तैनात होती.
रायप्पानं त्या ठिकाणच्या परिस्थीतीचं निरीक्षण केलं व तो शत्रूच्या गोटात शिरला. त्यातच त्यानं वेषांतर करुन सैनिकांना पाणी पाजणा-या लोकांचा पोशाख धारण केला. अशातच एका सैनिकाला पाणी पाजत असतांना त्याच्या कानावर एक बातमी येवून धडकली की कोणाची तरी धिंड काढण्यात येत आहे. ज्यावेळी त्यानं एका सैनिकाच्या तोंडून मरहठ्ठा संभा असं नाव ऐकलं. तेव्हा तर आणखी रायप्पाचं पित्त खवळलं. त्यातच तो रागानं लालबुंद झाला आणि तिकडं धावतच सुटला.
रायप्पानं पाहिलं की कोणीतरी तेजस्वी पुरुष साखळदंडात जखडला असून त्यांचा अपमान होत आहे. त्याला मुघल सैनिक लाथा बुक्क्या मारत आहेत. त्यातच कोणी शिव्याही देत आहेत. ते पाहून रायप्पाला बरे वाटले नाही. त्यातच त्या साखळदंडाजवळ असलेल्या लाखोच्या मुघल सैन्यावर रायप्पा एकटाच चालून गेला. क्षणातच त्यानं दोन अंमलदार कापून काढले. ज्यामुळं बादशाहा सुद्धा हैरान होता. अचानक झालेला हमला...... त्या हमल्यामुळं बादशाहा औरंगजेबही गोंधळून गेला होता.
तो काटेरी साखळदंड, त्यातच तो लोखंडी साखळदंड त्यामुळं त्या साखळदंडाच्या शक्तीपुढं रायप्पाचं काहीच चाललं नाही. त्यातच लाखो सैनिक भोवताल असलेले. त्या सैनिकांच्या लाखो तलवारी. सपासप ते सैनिक वारकर्ते ठरले. त्यातच रायप्पा महाराला वीरमरण आले. ते संभूराजाच्या पायाशी झुकले व म्हणाले,
"राजे, मला माफ करा. मी हरलो. मी तुम्हाले सोडवू शकलो नाही. मी हरलो. शेवटी त्याचं रक्त संभाजीच्या पायावर सांडलं. त्यातच अगदी संभाजीच्या पायावरच रायप्पानं आपला जीव सोडला.

************************************************************************************************

ते बंदीवासातील दिवस गोविंदाचं काळीज फाडून टाकत होते. त्याला ती कालकोठडी बेचैन करीत होती. कारागृहाचा अर्थ मुळात जे गुन्हे घडले. ते गुन्हे पुन्हा घडू नये. तसेच ज्याने गुन्हा केला. त्याला सुधरवता यावं यासाठीग दिलेली शिक्षा करण्यासाठी उभ्या केलेल्या व्यवस्था आणि शिक्षेचा अर्थ गुन्हेगाराने किंवा इतरांनी तसा गुन्हा पुन्हा करु नये म्हणून केलेले शासन. अशी शिक्षा करण्याचा अधिकार हा राज्यकर्ते, गुरु व मायबाप यांनाच असतो. ज्यावेळी व्यक्ती तुरंगातील शिक्षा भोगून किंवा जामीनावर स्वतःची निर्दोष सुटका करुन समाजात जाते. तेव्हा या समाजात वावरतांना कैद्याचे मोठे हाल होत असतात. त्याला वाळीत टाकलं जातं. त्याला हिन दर्जाची वागणूक दिली जाते. त्यातील अनेकजण आपली शक्तीही हरवून बसतात. त्यामुळं ते गुन्हेगारीचा मार्ग पत्करतात.
औरंगजेबाचा तुरुंग म्हणजे केवळ तुरुंग नव्हता. तिथं एकएक दिवस काढणं मुश्किल होत होतं. उद्याचा दिवस कसा निघेल हे काही सांगता येत नव्हते. पण गोविंदानंही कंबर कसली होती. प्रत्येक दिवसाचा तो सामना करीत होता. औरंगजेबाच्या शिक्षेला न घाबरता.
औरंगजेबांच्या कारागृहात कैद्यांना व्हि आय पी वागणूक नव्हती.तर तिथं अमानुषता होती. असंवेदनशीलता होती. त्यातच धाकानं का होईना, त्या औरंगजेबाचे आदेश पाळणारे काही अंमलदारही होते. ज्यावेळी गोविंदाला वेदना होत. त्यावेळी त्यांंना हसू येत असे. ती माणसं माणूसकी मेलेलीच होती. त्यांच्याकडं पाहून असं वाटायचं की ते मेलेले मुदडे आहेत की काय? औरंगजेबापेक्षा त्यांचाच त्रास गोविंदाला जास्त होता.
तुरुंग हे खरंच मानवाचं मन बदलविणारं दालन नाही असं पदोपदी वाटत असतं. कारण एकदा का तुरुंगात एखादा कैदी गेलाच, तर तो सुधारुन येईलच याचा थांगपत्ता नाही. कारण आज तुरुंगाची व्याख्याच मुळात बदलली आहे. आज तुरुंगात शिक्षा कमी आणि हसतखेळत जगणंच शिकवलं जात.
तुरुंगात गुन्हेगारच येतात असे नाही. कधीकधी चांगली मंडळीही येत असतात. ज्यांनी गुन्हे केलेले नाही. त्यातच काही शिकलेलीही माणसं येतात.
तुरुंगात येणा-या कैद्यात भेदभाव दिसत नाही. हा उच्च जातीचा हा कनिष्ठ जातीचा. पण एक भेदभाव तेवढा असतो. तो म्हणजे सीनिअर ज्युनीअर. जो जास्त जुना होत जातो. तो जास्त प्रमाणात इज्जतदार बनत जातो. त्यातच त्या तुरुंग अधिकारी वर्गाची जी मंडळी कामे करतात. ती जवळची असतात. मग अशावेळी एखाद्याला कोणतं एखादं छोटंसं व्यसन असेल, तेही पुरवलं जातं. आता कैद्यांना अगदी सहिष्णू आणि दयाभावनेची वागणूक दिली जाते. त्यांच्याकडून जास्त कामं केली जात नाहीत.
कारागृह........पुर्वीचे कारागृह असे नव्हते. त्या कारागृहात अतिशय हिन दर्जाची वागणूक मिळत असे. कारण ती कारागृह बदल्याच्या भावनेनंं प्रेरीत असायची. प्रत्येकाला स्वतंत्र्य असे बैरीकेट असायचे. त्यात एक किंवा दोनच कैदी राहात असायचे. कैद्याचा गुन्हा कोणता आहे. त्यावरुन त्या कारागृहाची रचना असायची. अर्थ असा की कैदी किती महत्वाचा आहे.
विशेष सांगायचं म्हणजे या देशात जे ही कोणी महान झालेत. त्यांनी अशा कारागृहाच्या असंख्य यातना भोगलेल्या आहेत. काहींच्या यातना लिखीत असल्याने त्या बाहेर आल्या. तर काहींच्या यातना ह्या लिहिल्या नसल्यानं समजलेल्या नाहीत. पर्यायानं सांगायचं झाल्यास हा देश ज्याला देव म्हणून पुजतो, त्या देवाचाही जन्म बंदीगृहात झाला. तसेच जिला देवी म्हणून पुजतो. त्या देवीलाही बंदीगृहातच ठेवलं होतं.
आता प्रश्न हा पडतो की तो बंदीगृहातील देव कोण? तसेच ती बंदीगृहातील देवी कोण? तर याचं उत्तर सहज सोपं आहे. तो बंदीगृहातील देव म्हणजे क्रिष्ण आणि ती देवी म्हणजे सीता. याचा अर्थ असा की क्रिष्णाला महाराजा कंसानं बंदीगृहात टाकलेलं नव्हतं. परंतू जी आकाशवाणी झाली असा जो उल्लेख काही पुराणात आहे. त्यानुसार कंसानं वासूदेव व देवकीला बंदीवासात टाकले होते. त्यातच देवकीचा रथ हाकलत असतांना अचानक आकाशवाणी झाली आणि राजा कंसाला कळलं की देवकीचा आठवा पुत्र त्याला मारणार आहे. त्यातच तो आठवा मुलगा पहिल्याच वेळी जन्माला आला तर........ म्हणून कंसानं चक्क आपल्या बहिणीलाच बंदीवासात टाकले. त्याच ठिकाणी कंसाचाही जन्म झाला. तसेच सीतेलाा तर राक्षसराज रावणानं अशोकवाटिकेत ठेवले होते. तेही नजरकैदेत. यामध्ये त्रास असा की दर जन्माच्या दिवशी कंस यायचा व देवकी व वासूदेवाची सख्खी लेकरं मारुन जायचा. हा त्रास अति भयंकर होता नव्हे तर ती एक शिक्षाच होती. तसाच सीतेलाही तसा त्रास भोगावाच लागला. दररोज रावण अशोकवाटीकेत यायचा आणि म्हणायचा की सीते, तू माझ्याशी विवाह करण्यास तयार झाली काय? त्यातच ते तिला दररोजचं सतावणं म्हणजे कारागृहात दिला जाणारा त्रासच होता. त्यातच काही रावणासोबतची मंडळी हसतही होती. यातच रामायणात रामाला चौदा वर्ष झालेला वनवास तसेच महाभारतात पाच पांडवांना भोगावा लागणारा बारा वर्षाचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास ही देखील एक कारागृहाचीच वेदनाच होती.
संभाजीलाही कारागृह भोगावा लागला. त्यातच त्या काळी किती प्रमाणात यातना दिली गेली संभाजीला हेही कळलं नसतं. पण तिथं असलेल्या एका गुप्तहेराकडून ते माहित पडलं. त्याचं नाव होतं मियाखान. मियाखान असा व्यक्ती होता की ज्यावेळी संंभाजी घरच्यांच्या रोषामुळं दिलेरखानाला जावून मिळाला होता. त्यावेळी दिलेरखानाच्या आश्रयास असतांना त्यानं दिलेरखानाचा विरोध असूनही मियाखानच्या दोन्ही मुलीचे विवाह लावून दिले होते. त्यामुळं मियाखान हा संभाजीचा हस्तक बनला होता. मियाखान हा संभाजीला जेवण आणून देत असे.
रायप्पा महार संभाजीला सोडविण्याच्या प्रयत्नात मरण पावला होता. तो मरण पावला होता. पण त्याचा भाऊ देवप्पा अजून जीवंत होता. ज्यावेळी रायप्पा व देवप्पा दोघंही बंधू संभाजीची पत्नी संभाजीच्या गैरहजेरीत गादीवर बसताच तिची आज्ञा घेवून जेव्हा संभाजीला सोडवायला निघाले, तेव्हा रायप्पा म्हणाले कीमला वीरमरण आलं तरी चालेल, पण मी राजाला सोडवेन. परंतू त्यावेळी महाराणी येशूबाईनं त्यांच्या हातात एक चिठ्ठी देत म्हटले की रायप्पा तुम्ही काहीही करा. पण ही चिठ्ठी संभाजीपर्यंत नक्की पोहोचवा. रायप्पानं तसं आश्वासन दिलं व सांगीतलं की मी काहीही करीन. पण ही चिठ्ठी संभाजीपर्यंत पोहोचवीन.
रायप्पा व देवप्पा हे दोघंही भाऊ संभाजीला वाचवायला रायगडावरुन निघाले. त्यातच रायप्पा व देवप्पा पखालजीचं वेषांतर करुन व भुमिका करुन औरंगजेबाच्या सैन्याला कातडी पिशवीतून पाणी पाजण्याचे उद्योग करु लागले. त्यातच रायप्पानं पाहिलं की त्याच्या धन्याची या स्थळी धिंड काढली जात आहे. तेव्हा त्यांच्या अंगात विरश्री संचारली. त्यातच त्यानं ती चिठ्ठी आपले बंधू देवप्पाच्या हातात देत तो म्हणाला की देवप्पा मला ही आपल्या अन्नदात्याला मिळत असलेली वागणूक माझ्यानं पाहणं होत नाही. ही चिठ्ठी ठेव. सुरक्षीत ठेव. आता काहीही झालं तरी चालेल. मी या दोन चार अंमलदारांना कापूनच टाकतो. त्यातच ती चिठ्ठी देवप्पानं जवळ ठेवली व रायप्पानं आपले दात विचकवीत त्यानं एका सैनिकांच्या म्यानातील तलवार हिसकली आणि दोन अंमलदारासह तब्बल बारा जण अौरंगजेबाच्या गोटातील सैनिक कापून टाकले. मात्र ज्यावेळी त्या रायप्पाला त्या औरंगजेबाच्या शेकडो सैनिकांनी मारलं, तेव्हा त्याच्या बंधूचीही इच्छा होत होती की आपल्या भावाला वाचवावे. पण तो तसे करु शकत नव्हता. कारण त्याच्यावर त्या चिठ्ठीची जबाबदारी होती. देवप्पा नाईलाजानं का होईना काही काळ चूप बसला.
रायप्पाच्या मृत्यूनंतर औरंगजेबानं संभाजीचा पहारा खुप वाढवला. त्याचा मियाखानवर खुप विश्वास होता. त्याला काहीही माहित नव्हतं की मियाखानच खरा संभाजीचा जासूस आहे. जेव्हा देवप्पाला सैनिकांना पाणी पाजता पाजता समजलं की मियाखान हा संभाजीचा चहेता आहे आणि तोच एकटा संभाजीला जेवण देण्यास जात असून संभाजीच्या कम-यात त्याच्याशिवाय कोणीच जावू शकत नाही. तेव्हा देवप्पानं मियाखानला चिठ्ठी दिली. ज्यावेळी ती चिठ्ठी घेवून मियाखान संभाजीला जेवण देण्यासाठी संभाजीच्या कक्षात गेला. तेव्हा त्यानं संभाजीला ती चिठ्ठी दिली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की राजे तुम्ही चिंता करु नको. इकडे सर्व खुशाल आहे. राज्याचा कारभार व्यवस्थीत आहे. सैन्याची जुळवाजुळव सुरु आहे. योग्य संधी चालून येताच आम्ही योग्य वेळी त्या औरंग्यावर हल्ला करु व तुम्हाला सुखरुप सोडवू. तेव्हापर्यंत तुम्ही मात्र निश्चींत राहा.
संभाजीनं ती चिठ्ठी वाचली. त्याला आपल्या राणीची किव आली. तसं त्याच्या डोळ्यातून अलगद पाणी टपकलं त्याचबरोबर तो मियाखानला म्हणाला,
"मियाभाई, आपले उपकार मी कसे फेडणार. आपण या संकटसमयीही मला ही चिठ्ठी आणून दिली."
तेव्हा मियाखान म्हणाला,
"राजे, लवकर सांगा तुमचा काय निरोप आहे ते. ही वेळ काही बरी नाही. थोडासाही वेळ झाला तर हे सैनिक आतमध्ये येतील. मग समदं राहून जाईल जाग्यावरच."
त्यावर संभाजी म्हणाले,
"मियाभाई, हा राज फक्त तुमच्या ओठात ठेवा. कोणालाही कळता कामा नये. हं एक गोष्ट आवर्जून सांगा सरुबाईंना की तुम्ही चिंता करु नका. आम्ही बरे आहोत. आमच्याकडे लक्ष देण्याऐवजी तुम्ही फक्त दुर्ग सांभाळा. आमच्या आबासाहेबांनी अत्यंत कष्टानं किल्ले मिळवले आहेत. ते किल्ले औरंग्याच्या घशात जायला नको. आम्ही मेलो तरी चालेल. पण दुर्ग औरंग्याच्या हातात लागता कामा नये."
मियाखाननं ते ऐकलं. तो राज त्यानं मनातच दफन केला. तो राज ज्यावेळी सरुबाईला माहित झाला होता. तेव्हा वेळ निघून गेली होती. संभाजीनं तेव्हापर्यंत मृत्यूला मिठी मारली होती.
मियाखान समोर औरंग्यानं संभाजीवर केलेले अनन्वीत अत्याचार पुढे मियाखाननं रायगडावर बयाण केल्यानं मराठ्यांना संभाजीवर औरंग्यानं कोणते कोणते अत्याचार केले ते संपूर्ण माहित झालं. त्यातच रायगडालाही माहित झालं. रायगडंही तो अत्याचार ऐकून थरारला होता.
गोविंदा ज्यावेळी कैदेत होता. तो काही गुन्हेगार नव्हता. पण तरीही औरंगजेबाच्या पाहणीतून व समजण्यातून तो गुन्हेगारच होता. त्यातच तो जेव्हा संभाजीला अग्नी देवून व त्याचा अंत्यसंस्कार करुन रायगडावर गेला होता. त्यावेळी त्याला रायगडावर महाराणी सरुबाईच्या तोंडून महाराज संभाजीला मिळालेल्या यातनेबाबतची माहिती मिळाली होती. आज तो औरंगजेबाच्या कारागृहात त्या अंधा-या खोलीत एकटाच राहात असला तरी त्या कैदेबाबत त्याला वाईट वाटत नव्हतं वा वैषम्यता वाटत नव्हती. तसेच त्या औरंगजेबाचे त्याच्यावर होत असलेले अत्याचार म्हणजे जणू कोणी आपल्या अंगावर फुलेच उधळत आहेत की काय, असेच वाटत होते. त्याच्या डोळ्यासमोरुन आज तो क्रिष्णाच्या मातापित्याचा, पाच पांडवांचा, माता सीतेचा व धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास तरळत होता. ज्यांनी सत्तेसाठी नाही तर आपल्या कर्तव्यासाठी आपल्या शरीरावरील शत्रूंकडून होणारे अत्याचार सहन केले होते. हाच इतिहास गोविंदाला बळ देत होता. तसेच त्याच्या अंगातही नवी उर्मी आणत होता.
आज त्याला तेही आठवत होतं की राजाच्या कैदेत असणारे कैदी कौलू चालवतात नव्हे तर शेतात बैलाच्या जागी जुंपले जातात. आज त्याला तेही आठवत होतं की त्याच्या कित्येक बिरादरीनं भोसले घराण्याच्या पालख्या उचलण्यासाठी आपले खांदे झिजवले होते. पण तो अत्याचार नव्हता तर ती एक धन्यासाठी केलेली स्वामीभक्ती होती.
हे तुरुंग म्हणजे कैद्यांना सुधारण्यासाठी केलेली उपाययोजना असते हे जरी बरोबर असलं तरी यात संभाजीला मिळालेली कैद हा बदला होता. तसेच गोविंदाला मिळालेली कैद हाही बदलाच होता. त्यातच बदल्याच्या भावनेनंच ज्याप्रमाणे संभाजीला ठार केलं होतं. त्याचप्रमाणे गोविंदालाही ठार करण्याचाही औरंगजेबाचा मानस होता.
तुरुंग म्हणजे कैद्यांना सुधारण्याचे केंद्र असून त्यात कैद्यांना सुधारण्याची पूर्ण सुविधा असावी. तो कुणाचाही बदला घेण्याचं केंद्र बनू नये. तसेच तुरुंगातून कैदी सुधारुन निघायला हवे. जेणेकरुन तुरुंगावर कोणीही विश्वास ठेवेल. त्यासाठी तुरुंग हे शिक्षेचे केंद्र ठरु नये.

************************************************************************************************

आज गोविंदा विचार करीत होता. आपण केलं ते अतिशय चांगलं केलं असं त्याला वाटत होतं. त्याला त्याबाबत पश्चाताप वाटत नव्हता. तसं पाहता गोविंदाला विचारायला खानाची माणसं वारंवार येत होती. तरीही तो गप्प होता. ती विचारीत होती की त्याच्या कटात कोण होती. पण तो सांगत नसल्यानं बेवारस फटक्यांना झेलावं लागत होतं.
गोविंदा आत होता. त्या अंधा-या कोठडीत. ती कोठडी आज गोविंदाला पाषायमान वाटत होती. त्यातच त्यांचे अत्याचार पाहून गोविंदाला वाटत होते की त्याला लवकर मृत्यू यावा किंवा त्याला लवकरच औरंगानं मृत्युदंड द्यावा. पण तसं काही होत नव्हतं.
संताजी व धनाजी दोन सख्खे भाऊ होते. महाराज संंभाजीच्या मृत्यूनंतर राजाराम गादीवर बसले. त्यातच संताजी हे मराठ्यांचे सरससेनापती होते. त्यांचा घोडा सुद्धा त्यांना घाबरत होता.
औरंगजेब बादशाहा ज्यावेळी दक्षिणेस आला. तेव्हा त्यानं संगमेश्वरला आपली राजधानी बनवली. त्यातच संताजीचं राजेरामाशी पटेनासं झालं. त्यामुळं राजारामनं संताजीकडून सेनापतीपद काढलं. ते पद धनाजीला दिलं व ते जींजीला चालले गेले. पुढे राजारामने जींजीला आपली राजधानी बनवली. परंतू संताजीनं सेनापती पद जरी सोडलं असलं तरी त्यानं लढाई बंद केली नव्हती. त्यातच त्याला संभाजीच्या खुनाचा बदला घ्यायचा होता. ज्या संभाजीच्या खुनाला मुकर्बखान जबाबदार होता. त्याला ठार केल्याशिवाय त्याला चैनच पडणार नव्हतं. त्यानं प्रतिज्ञा केली होती, ती म्हणजे ज्या माणसाने संभाजीला पकडले, त्याला ठार करण्याची.
औरंगजेब बादशाहा जेव्हा संगमेश्वरला आला. तेव्हा त्यानं संगमेश्वराला आपली राजधानी बनवली. त्यातच संताजीनं बेत आखला. आपण संगमेश्वरवर हमला करायचा. त्यातच योजनेनुसार गनीमी काव्यानं संताजीनं औरंगजेबाच्या संगमेश्वरावर हल्ला चढवला. त्यात मकर्बखान जबर जखमी झाला. तो पळायला लागला. त्यातच धनाजीनं त्याचा पिच्छा सोडला नाही. त्यानं मकर्बखानाचा पिच्छा केला. आता मुकर्बखान जीवाच्या आकांतानं पळत होता. पण संताजीही तेवढाच चपळ होता. त्यानं मुकर्बखानाला वाटेतच पकडलं. त्यातच अतिशय घाबरलेला मुकर्बखान भीतीच्या भयानंच मृत्यू पावला व संताजीनं संभाजीच्या खुनाचा बदला घेतला.
ती कालकोठडी. त्या कालकोठडीला नतमस्तक होत गोविंदा आपले दिवसं काढत होता. एवढ्यात बादशाहा औरंगजेब आला. बादशाहा जसा आला. सगळे त्याला सलाम करु लागले. त्यातच दरवाजे उघडले गेले व गोविंदाला साखळदंडात जखडून बाहेर काढण्यात आले. तसा तो धिप्पाड देहाचा औरंगजेब म्हणाला,
"गोयंद्या, तू का बरं सांगत नाहीस ती माहिती? का बरं गावाला वाचवतोस? का बरं त्यांचे गुन्हे आपल्या अंगावर घेतोस? तू का बरं त्यांच्यासाठी मरण पत्करतोस?"
बादशाहाचं ते निर्मळ बोलणं. आज अचानक त्याच्यात एवढं परीवर्तन. अगदी गोड गोड बोलायला लागला होता बादशाहा. एवढं प्रेम काहून त्याच्याच गोटातील एक सरदार म्हणाला,
"बादशाहा सलामत, गुस्ताखी माफ करो तो एक बात कहूँ।"
"बोलो, क्या बात है?"
"बादशाहा.सलामत, यह गीदड की औलाद है। मराठा है ये। ये लोग प्रेम से बाज नही आते। इन्हें सख्त कडी से कडी सजा देनी पडती है।"
बादशाहानं ते बोलणं ऐकलं. तसा त्यानं हात आडवा करीत चूप राहण्याचा इशारा दिला. त्याला चूप राहण्याचा आदेश देत बादशाहा गोविंदाला म्हणाला,
"गोयंद्या, पाहा. अरे जेव्हा माणूस जन्म घेतो. तेव्हा तो एकटाच येतो आणि मरतो तेव्हा एकटाच मरतो. तू ज्या गाववाल्यांना वाचवतोस ना. ते गावकरी तूला वाचवायला एकतरी येईल का? अन् आला काय, नाही ना. मग तू असा कसा वागतोस. अरे सांग कोण कोण होतं त्या संभाजीचे मांसाचे तुकडे गोळा करायला. तू एकटाच होता का?"
औरंगजेब बादशाहाचा कुटील डाव गोविंदाच्या लक्षात आला. तसं समद्या मराठ्यांना माहित होतं की बादशाहा औरंगजेब कपटी आणि कुटील वृत्तीचा माणूस आहे. तेव्हा या बादशाहापुढं न वाकलेलं बरं. कारण ज्यावेळी बादशाहा जेव्हा राजगादीवर आला. तेव्हा त्यानं आपल्या गादीवर बसण्यापुर्वी आपल्या बापाला कैदेत टाकलं. त्यातच आपल्या भावाची हत्याही केली. तसं त्यानं स्तब्धता बाळगली.
गोविंदा चूप बसलेला पाहून बादशाहा म्हणाला,
"गोयंदा, बताओ तो सही. क्या हुआ था उस रात? अगर तू वह राज बतायेगा, तो तुझे छोड देंगे।"
गोविंदा विचार करीत होता. बादशाहा कपटी आहे. तो आपल्याला विचारत आहे प्रेमाप्रेमाने. पण समजा सांगीतलंच तरीही बादशाहा आपल्याला सोडणार नाही. त्यातच ही आपली मातृभुमी आहे. ही मातृभुमी आपल्याला दुषीत करायची नाही. ही मातृभुमी आपली आई आहे. आपली एक वेगळी भाषा आहे. त्यातच आपली एक संस्कृती. आपला एक धर्म आहे. जो धर्म पवित्र असा धर्म. त्या धर्मासाठी महाराज माझे अन्नदाते प्राणास मुकले. त्यांनी वीरमरण पत्करलं. शिवाय ती माणसं. ती जीवाभावाची माणसं. त्या माणसांनी आपल्यावर विश्वास ठेवून संभाजीचे तुकडे गोळा करायला मदत केली आणि मी त्यांचा विश्वासघात करु. नाही आपण त्या लोकांशी विश्वासघात करु नये. ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला.
तो त्या दामाजीचा विचार करु लागला की जो दामाजी अख्ख्या गावाचा पाटीस. बिचा-यानं जागा दिली नाही. पण त्याच्याच प्रयत्नानं आज संभाजीचे तुकडे गोळा झाले. जर दामाजी नसता तर जनाबाईनं कोणाला सांगीतलं असतं तुकडे गोळा करायला. बिचारी जनाबाई. तिला तर पकडलं या बादशाहानं. बिचारी जनाबाई....... कुठं ठेवलं तर माहित नाही तिला.
ही मातृभुमी. या मातृभुमीची रक्षा करणे हे माझं प्रथम कर्तव्य आहे. मी जे काही केलं. ते माझं कर्तव्य होतं आणि त्यांनी जे काही केलं, तेही कर्तव्य होतं. त्या कर्तव्याचा अर्थ मी असा घेवू नये की त्यांना परेशानी व्हावी. कदाचित हा औरंगा माझ्याशी आणि त्यांच्याशी संभाजीसारखाच व्यवहार करेल हे नाकारता येत नाही. तसंच ती माझी गावची माणसं. अगदी जीवाभावाची माणसं. ती माणसं. त्यांनी माझ्यावर प्रेम करुन मला मदत केली. ज्यांनी संभाजीवर प्रेम करुन मला मदत केली. समजा त्या दामाजी पाटलानं मला कळवलंच नसतं तर, मला संभाजीची चिता जाळायची संधी मिळाली असती का? बिचारा दामाजी! त्या दिवशी गोरेगावावरुन आला होता. त्याच्या अपेक्षेवर पाणी फेरु की काय मी. अन् ती बिचारी राधाई. हिमतबाज बाई. तिच्याच हिमतीवर तुकडे गोळा झाले. मर्दानी आहे ती. मी तिच्या स्वप्नांचा बळी देवू.
दामाजी तर ऐकतच नव्हता तुकडे गोळा करायला. म्हणत होता जावू द्या. त्या औरंग्यांचे सैन्य पहारा देवून आहेत नदीपलिकडं. जर एवढासाही आवाज झाला की औरंगा सैनिक येतील. प्रेत बाजूलाच राहिल अन् आपल्याला पकडून नेतील. जावू द्या. तो संभाजी तर मेला. पण त्याच्याबरोबर आपणही मरुन जावू. कारण संभाजीपाठोपाठ औरंगजेब आपल्यालाही मारुन टाकेल. पण ती राधाई माऊली. ती एकटीच निघाली जनाबाईच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून आपली मर्दानगी दाखविणारी बाई. ती बाई तेवढ्याच हिंमतीनं एकटीच निघाली. त्याचबरोबर तिच्या मागं ती जनाबाई. अन् पुर्ण नारीशक्ती. व्वा व्वा. नारीशक्ती जिंदाबाद. त्या होत्या म्हणून मीही हिमतीनं पुढं झालो. अन् तो गोरखनाथ. बिचारा बुवा. तो तर यायलाच तयार नव्हता. त्यातच आमचा दामाजी पाटील. त्याचा तर पानच नव्हता हालत गोरखनाथाशिवाय. दामाजीमुळंच आला बिचारा. बिचारा गोरखनाथ. तेवढ्याच रात्री त्यानं बेलफुलं गोळा केली. अन् अग्नी द्यायला मदत केली संभाजीले. अन् ती माणसं. ते समदे तरुण त्या संभाजीसाठी झटले. बिचारे दामाजीच्या इशा-यावर गावच्या शिवेवर उभे राहिले गोफनगुंडा घेवून. अन् ती सारी गावातील माणसं......... बिचारी! मरणाची भीती होती त्यांना, तरीही त्यांनी ती भीती न बाळगता माझ्यासोबत संपूर्ण इंद्रायणी ढवळून काढली. महाराज संभाजीचे तुकडे गोळा करायला आणि तीही माणसं थोरंच म्हणावी की त्यांनी शेणकुर धसकट अन् लाकडं गोळा केली. हं अग्नी मी दिला. माझ्या अंगणात. माझ्या शेतात. जंगलात त्या काळोख्या रात्री. माझं शेत........ ते माझं शेत नसून माझ्यासाठी अंगणच आहे. माझा भाऊच होता संभाजी. कारण त्याच्या बापानं माझ्या बापाची गोष्ट ऐकून मला संधी दिली. नवे पराक्रम करण्याची. त्याचा बाप होता म्हणून मला कर्तबगारी दाखवता आली. नाहीतर याच वळूच्या मातीत मी खितपत पडून राहिलो असतो. आज मला हा वळू गावच नाही तर संपूर्ण इंद्रायणी ओळखते.. मी जरी अस्पृश्य असलो तरी. आज संपर्ण गाव माझी इज्जत करते. मला पुसते. कारण मी किल्लेदार झालो रामशेजचा म्हणून. पण मी जर सैन्यात भर्ती झालो नसतो तर रामशेजचा किल्लेदार झालो नसतो. अन् रामशेजचा किल्लेदार झालो नसतो तर मला या गावानं सन्मान दिला नसता. हं मी गुन्हा केला. संभाजीला जाळण्याचा गुन्हा. हं हाच गुन्हा झाला माझा. अन् तो गुन्हा मी एकट्यानंच केला नाही तर माझ्या गावानं केला. कुणासाठी? तर त्या लाडक्या संभाजीसाठी. ते लेकरु. माझा भाऊ. माझा एकट्याचाच भाऊ नाही तर जगाचा भाऊ. तो माझ्या मायबापाचा लेकरु. माझ्या मायबापाचा एकट्याचाच लेकरु नाही तर तो सा-या गावाचा लेकरु. हे कसं विसरु मी. हं केला असन संपूर्ण गावानं गुन्हा आपल्या लेकरासाठी. हं केला असल आपल्या भावासाठी या गावानं गुन्हा. पण मी कशाला त्याला गोवू या वादात. हा वाद माझा आहे. मग मी फासावर गेलो तरी चालेल. मला मृत्युदंड झाला तरी चालेल. पण मी माझ्या गावाला संंकटात टाकत नाही. जर मी आज या गावाला संकटात टाकलं तर.........उद्या मला माझा गाव माफी देणार नाही. माफ करणार नाही. जरी मी संभाजीला अग्नी दिला असेल तरी. अन् जर मी गुन्हा कबूल केला आणि मला जर मृत्युदंड झालाच तर उद्या हीच माती माझ्यावर गर्व करेल. म्हणेल की धर्मासाठी प्राण देणा-या संभाजीला कर्तव्याचे पालन करणा-या त्या इंद्रायणीच्या लेकरानं म्हणजेच गोविंदानं अग्नी दिला. त्या शिरप्याचाही उदोउदो होईल. ज्यानं संभाजीचे तुकडे शिवलेे अन् त्या शिर्क्याचाही उदोउदो होईल. ज्यानं कपडे शिवले. एक गणोजी शिर्के असा होता की ज्यानं संभाजी राजांना पकडायला शत्रूंना मदत केली अन् एक हा शिर्के की ज्यानं संभाजीचे कपडे शिवले. जर मला माझं कर्तव्य पार पाडतांना वीरमरण आलंच तर उद्या हीच इंद्रायणी धन्य होईल आणि ओरडू ओरडू सांगेल की या भीमेच्या काठी असाही कर्तव्यवीर होवून गेला की ज्याने आपले कर्तव्य तर केलेच. पण कर्तव्यासाठी प्राणही दिला. आज मी जरी अस्पृश्य असलो तरी मला कोणाला फसवायचं नाही. मग मी मेलो तरी चालेल.
हा गाव संभाजीच्या अंत्ययात्रेवेळी सहभागी होता. या गावानं संभाजीला अग्नी देण्यासाठी बरीच मदत केली. ही संभाजीला अग्नी देणारी गोष्ट काही साधीसुधी गोष्ट नव्हती.
आज इंद्रायणी धन्य झाली संभाजीच्या रक्षेला आपल्यात सामावून घेवून. उद्याही धन्य होईल, जेव्हा माझी राख या नदीत विरघळेल. उद्या इंद्रायणी म्हणेल आणि ओरडून सांगेल की ती दोन लेकरं या धरणीवर जी झाली. ती कधीच झाली नव्हती. कधीच होणार नाही. एक लेकरु धर्मासाठी मरण पावला तर दुसरा आपलं कर्तव्य बजावत. कदाचित मी मेलोही या औरंग्याच्या हातानं. तरीही या धरणीवर माझे एकट्याचे नाव होवू नये संभाजीला अग्नी देणारा म्हणून. माझ्या संपूर्ण गावाचं नाव व्हावं. कोणीही उद्या म्हणू नये की एकट्या गोविंदानं संभाजीला अग्नी दिला. तर म्हणावं या वळू गावच्या संबंधीत सर्व लोकांनी अग्नी दिला. उद्या माझंच नाव संभाजीबरोबर अजरामर होवू नये.
हे परमेश्वरा, तू मला त्याबद्दल सद्बुद्धी दे आणि हे औरंग्याचे अत्याचार सहन करण्याची ताकद दे. माझी उद्या जीभ जरी कापली गेली संभाजीसारखी किंवा माझं मुंडकं जरी छाटलं गेलं संभाजीसारखं तरी मला हसता हसता स्विकारता यायला हवी ती वेळ. अन् हसता हसता मला माझ्या वेदनाही सहन करता यायला हव्यात. हे परमेश्वरा, मला एवढा काफिर बनवू नकोस की माझ्या तोंडून अलगद गाववाल्यांचं नाव निघावं. जेणेकरुन बिचा-यांना संभाजीसारख्याच वेदना सहन कराव्या लागतील. माझ्यामुळं असं काही होईल. असं घडू नये देवा माझ्याहातून. हे मातृभुमी यदी कदाचित माझं चुकत असेल, हे इंद्रायणी तूही सांग माझं चुकत असेल तर मला माफ कर. पण मी माझ्या संभाजीसाठी या संपूर्ण माणसांचा बळी देवू शकत नाही.
गोविंदा विचार करीत असतांना औरंगजेब बादशाहा म्हणाला,
"क्या सोच रहा है गोयंदा?"
ते औरंगजेबाचे शब्द अचानक गोविंदाच्या कानावर पडले. तसा गोविंदा भानावर आला. म्हणाला,
"काही नाही."
"तो फिर बता कि उस रात तेरे साथ कौन कौन था?"
"कोणीच नव्हता माझ्यासोबत."
"म्हणजे तू एकटाच होता का?"
"होय, मी एकटाच होतो."
"असं कसं होईल? अरे गोयंद्या, कोणाच्या मुदड्याले अग्नी देणं हे एकट्याचं काम तरी आहे का अन् तेही एवढ्या लवकर?"
"होय, मी एकट्यानंच या सर्व गोष्टी केल्या. मीच लाकडं आणली. मीच तुकडे गोळा केले. मीच शेण धसकटं गोळा केली. अन् मीच अग्नी दिला. सर्व मीच केलं. दिसलं नं वं शेतात. माझ्या शेतात जावून पावा. तेथंच तुम्हाले त्या संभाजीच्या अग्नीची जागा दिसन. तेथंच अंत्यसंस्कार झाला संभाजीचा."
"पण हे सारं तू केलं?"
"होय, मीच केलं हे सारं."
बादशाहा गोंधळात पडला होता. त्याचा विश्वासच बसत नव्हता की ही अग्नी आणि तो संभाजीचा अंत्यसंस्कार विधी एकट्या संभाजीनं केला.
बादशाहानं गोविंदाचं सगळं ऐकलं. त्यावर थोडासा विचार केला. तसा तो ओरडून म्हणाला,
"बंद करो इस कालकोठडीका दरवाजा बंद. हम इसके बारे में कल निर्णय लेंगे।"
सैनिकांनी पुन्हा गोविंदाला त्या अंधा-या कालकोठडीत टाकलं व त्याला टाळेबंदी करीत ते बादशाहाला म्हणाले,
"जहापनाह, अब इसको कमरे में डाल दिया है। अब आपका आदेश आनेतक यह कालकोठडी में बंद रहेगा।
सकाळ झाली होती. आज बादशाहा औरंगजेब लवकर उठला होता. तसा तो दररोजच लवकर उठत असे. तसा तो नमाज पढत असे. त्यानंतर तो आपल्या कामाची सुरुवात करीत असे. दुपारी फावला वेळ मिळाला की टोप्या शिवत असे. तसा आजही बादशाहा तो सकाळी लवकर उठला होता. त्यानं नमाजही संपवला होता. पण आज त्याला काम करावसं वाटत नव्हतं. त्याला टोप्याही शिवावाश्या वाटत नव्हत्या. त्याला काही लिहावसंही वाटत नव्हतं. तसा तो कोणत्यातरी विचारात असावा असं वाटत होतं. तो कसलातरी विचार करीत होता. तसे दुपारचे बारा वाजले होते.
दुपारचे बारा वाजले खरे. पण बादशाहाचं कोणत्या गोष्टीकडे लक्ष नाही हे पाहून एक सरदार त्याला म्हणाला,
"जहापनाह, क्या आप बेचैन हो?"
"हाँ।"
"बेचैनी का कारण?"
"वो गोयंद्या।"
"क्यो? क्या किया गोयंद्या ने?"
तसा दुसरा एक सरदार म्हणाला,
"जहापनाह, कहे तो मै उसकी गर्दन उडा दूँ?"
"नही नही नही। ऐसी भूल कभी नही करना। मै वह राज जानना चाहता हूँ कि आखिर यह ताकत आती है कहाँसे उन मराठों में?"
"कौनसी ताकत?"
"अरे ये लोग इतनी तकलिफ सहन करते है। मगर अपनी जबान तक नही खोलते। देखो, वह संभा की ही बात ले लो। आखिर वह मर गया।परंतू जबान जैसी की वैसी रही। न किल्ले का अता पता बताया, न साला इस्लाम कबूल किया। आखिर वह मर गया। किंतू टस से मस नही हुअा और यह गोयंद्या भी बता नही रहा वह राज कि किसकिसने संभाजी का अंत्यसंस्कार किया है।"
"जहापनाह, कैसे बतायेगा वह। वह इतना बुजदील नही कि आपको अपना राज बतायेगा।"
"क्या वह राज का राज ही रहेगा कि पता चलेगा?"
सरदार चूप होते. त्यातच त्या सरदारांना हेही माहित नव्हतं की त्या गावातील कोण कोण या कटात सहभागी असू शकतात. तसेच तो गोविंदाही त्याबाबत काहीच सांगत नव्हता. तसा अचानक बादशाहा म्हणाला,
"आपण त्या जागी जावूया का?"
"कुठे जहापनाह?"
"ज्या ठिकाणी संभाजीला जाळलं तिथं."
सर्वांनी इकडंतिकडं पाहिलं. त्याचबरोबर त्यांनी होकार दिला आणि ठरलं की बादशाहानं तिकडं प्रस्थान करावं.
बादशाहा वळूच्या त्या स्थळी जायला तयार झाला होता. त्यानं नमाज अदा केला. तसा सांडणीस्वारानं त्याच्यासाठी खास शाही उंट सजविण्यात आला. त्यातच बादशाहा त्यावर स्वार झाला व तो त्या वळूच्या संभाजीच्या अग्नीस्थळावर पोहोचला.
ते संभाजी राजाचं अग्नीस्थळ. त्या अग्नीस्थळावर दुपारचे तीन वाजले होते. आजुबाजूला पक्षाचा कलारवंही नव्हता. झाडं भरपूर होती. पण ती झाडंही बोलकी नव्हती. आजूबाजूला ऊन्हं पडलेलं होतं. ते ऊन एवढं प्रखर होतं की त्या ऊन्हाचे चटके अंगाला झोंबत होते. वाराही सुटला नव्हता. तसेच अंगात उकाडा आला होता. अंगाला घामही आला होता. जणू असं वाटत होतं की या औरंगजेबाला येथील पक्षी, प्राणी, झाडं, झुडपं आणि येथील हवाही घाबरत असावी. जणू तसंच दृश्य परीसरात तयार झालं होतं.
बादशाहा औरंगजेब उंटावरुन खाली उतरला. त्यानं गुडघे टेकले. तसा तो त्या जागेचं निरीक्षण करु लागला. तोच त्याच्या तोंडून शब्द फुटले.
"हे अल्ला, तुने क्या किस्मत बनाई मराठी राजा संभाजीकी। हमने तो सोचा था कि इसके तुकडों को अग्नी ना मिले। इसके तुकडों को कोई गीदड कौए खाए। कोई इन नदियों की मछलियों का शिकार बने संभाजी। मगर नही। संभाजी की किस्मत सही निकली। हमारी ही किस्मत खराब है।"
बादशाहा स्वगत बोलला. त्याचं मन त्याला काही स्वस्थ बसू देत नव्हतं. तसा तो उभा झाला. आजुबाजूला पाहू लागला. तसा त्याला काहीच पुरावा आढळला नाही. तोच तो चिंतीत झाला होता.
आज गोविंदा विचार करीत होता. आपण केलं ते अतिशय चांगलं केलं असं त्याला वाटत होतं. त्याला त्याबाबत पश्चाताप वाटत नव्हता. तसं पाहता गोविंदाला विचारायला खानाची माणसं वारंवार येत होती. तरीही तो गप्प होता. ती विचारीत होती की त्याच्या कटात कोण होती. पण तो सांगत नसल्यानं बेवारस फटक्यांना झेलावं लागत होतं.
गोविंदा आत होता. त्या अंधा-या कोठडीत. ती कोठडी आज गोविंदाला पाषायमान वाटत होती. त्यातच त्यांचे अत्याचार पाहून गोविंदाला वाटत होते की त्याला लवकर मृत्यू यावा किंवा त्याला लवकरच औरंगानं मृत्युदंड द्यावा. पण तसं काही होत नव्हतं.
संताजी व धनाजी दोन सख्खे भाऊ होते. महाराज संंभाजीच्या मृत्यूनंतर राजाराम गादीवर बसले. त्यातच संताजी हे मराठ्यांचे सरससेनापती होते. त्यांचा घोडा सुद्धा त्यांना घाबरत होता.
औरंगजेब बादशाहा ज्यावेळी दक्षिणेस आला. तेव्हा त्यानं संगमेश्वरला आपली राजधानी बनवली. त्यातच संताजीचं राजेरामाशी पटेनासं झालं. त्यामुळं राजारामनं संताजीकडून सेनापतीपद काढलं. ते पद धनाजीला दिलं व ते जींजीला चालले गेले. पुढे राजारामने जींजीला आपली राजधानी बनवली. परंतू संताजीनं सेनापती पद जरी सोडलं असलं तरी त्यानं लढाई बंद केली नव्हती. त्यातच त्याला संभाजीच्या खुनाचा बदला घ्यायचा होता. ज्या संभाजीच्या खुनाला मुकर्बखान जबाबदार होता. त्याला ठार केल्याशिवाय त्याला चैनच पडणार नव्हतं. त्यानं प्रतिज्ञा केली होती, ती म्हणजे ज्या माणसाने संभाजीला पकडले, त्याला ठार करण्याची.
औरंगजेब बादशाहा जेव्हा संगमेश्वरला आला. तेव्हा त्यानं संगमेश्वराला आपली राजधानी बनवली. त्यातच संताजीनं बेत आखला. आपण संगमेश्वरवर हमला करायचा. त्यातच योजनेनुसार गनीमी काव्यानं संताजीनं औरंगजेबाच्या संगमेश्वरावर हल्ला चढवला. त्यात मकर्बखान जबर जखमी झाला. तो पळायला लागला. त्यातच धनाजीनं त्याचा पिच्छा सोडला नाही. त्यानं मकर्बखानाचा पिच्छा केला. आता मुकर्बखान जीवाच्या आकांतानं पळत होता. पण संताजीही तेवढाच चपळ होता. त्यानं मुकर्बखानाला वाटेतच पकडलं. त्यातच अतिशय घाबरलेला मुकर्बखान भीतीच्या भयानंच मृत्यू पावला व संताजीनं संभाजीच्या खुनाचा बदला घेतला.
ती कालकोठडी. त्या कालकोठडीला नतमस्तक होत गोविंदा आपले दिवसं काढत होता. एवढ्यात बादशाहा औरंगजेब आला. बादशाहा जसा आला. सगळे त्याला सलाम करु लागले. त्यातच दरवाजे उघडले गेले व गोविंदाला साखळदंडात जखडून बाहेर काढण्यात आले. तसा तो धिप्पाड देहाचा औरंगजेब म्हणाला,
"गोयंद्या, तू का बरं सांगत नाहीस ती माहिती? का बरं गावाला वाचवतोस? का बरं त्यांचे गुन्हे आपल्या अंगावर घेतोस? तू का बरं त्यांच्यासाठी मरण पत्करतोस?"
बादशाहाचं ते निर्मळ बोलणं. आज अचानक त्याच्यात एवढं परीवर्तन. अगदी गोड गोड बोलायला लागला होता बादशाहा. एवढं प्रेम काहून त्याच्याच गोटातील एक सरदार म्हणाला,
"बादशाहा सलामत, गुस्ताखी माफ करो तो एक बात कहूँ।"
"बोलो, क्या बात है?"
"बादशाहा.सलामत, यह गीदड की औलाद है। मराठा है ये। ये लोग प्रेम से बाज नही आते। इन्हें सख्त कडी से कडी सजा देनी पडती है।"
बादशाहानं ते बोलणं ऐकलं. तसा त्यानं हात आडवा करीत चूप राहण्याचा इशारा दिला. त्याला चूप राहण्याचा आदेश देत बादशाहा गोविंदाला म्हणाला,
"गोयंद्या, पाहा. अरे जेव्हा माणूस जन्म घेतो. तेव्हा तो एकटाच येतो आणि मरतो तेव्हा एकटाच मरतो. तू ज्या गाववाल्यांना वाचवतोस ना. ते गावकरी तूला वाचवायला एकतरी येईल का? अन् आला काय, नाही ना. मग तू असा कसा वागतोस. अरे सांग कोण कोण होतं त्या संभाजीचे मांसाचे तुकडे गोळा करायला. तू एकटाच होता का?"
औरंगजेब बादशाहाचा कुटील डाव गोविंदाच्या लक्षात आला. तसं समद्या मराठ्यांना माहित होतं की बादशाहा औरंगजेब कपटी आणि कुटील वृत्तीचा माणूस आहे. तेव्हा या बादशाहापुढं न वाकलेलं बरं. कारण ज्यावेळी बादशाहा जेव्हा राजगादीवर आला. तेव्हा त्यानं आपल्या गादीवर बसण्यापुर्वी आपल्या बापाला कैदेत टाकलं. त्यातच आपल्या भावाची हत्याही केली. तसं त्यानं स्तब्धता बाळगली.
गोविंदा चूप बसलेला पाहून बादशाहा म्हणाला,
"गोयंदा, बताओ तो सही. क्या हुआ था उस रात? अगर तू वह राज बतायेगा, तो तुझे छोड देंगे।"
गोविंदा विचार करीत होता. बादशाहा कपटी आहे. तो आपल्याला विचारत आहे प्रेमाप्रेमाने. पण समजा सांगीतलंच तरीही बादशाहा आपल्याला सोडणार नाही. त्यातच ही आपली मातृभुमी आहे. ही मातृभुमी आपल्याला दुषीत करायची नाही. ही मातृभुमी आपली आई आहे. आपली एक वेगळी भाषा आहे. त्यातच आपली एक संस्कृती. आपला एक धर्म आहे. जो धर्म पवित्र असा धर्म. त्या धर्मासाठी महाराज माझे अन्नदाते प्राणास मुकले. त्यांनी वीरमरण पत्करलं. शिवाय ती माणसं. ती जीवाभावाची माणसं. त्या माणसांनी आपल्यावर विश्वास ठेवून संभाजीचे तुकडे गोळा करायला मदत केली आणि मी त्यांचा विश्वासघात करु. नाही आपण त्या लोकांशी विश्वासघात करु नये. ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला.
तो त्या दामाजीचा विचार करु लागला की जो दामाजी अख्ख्या गावाचा पाटीस. बिचा-यानं जागा दिली नाही. पण त्याच्याच प्रयत्नानं आज संभाजीचे तुकडे गोळा झाले. जर दामाजी नसता तर जनाबाईनं कोणाला सांगीतलं असतं तुकडे गोळा करायला. बिचारी जनाबाई. तिला तर पकडलं या बादशाहानं. बिचारी जनाबाई....... कुठं ठेवलं तर माहित नाही तिला.
ही मातृभुमी. या मातृभुमीची रक्षा करणे हे माझं प्रथम कर्तव्य आहे. मी जे काही केलं. ते माझं कर्तव्य होतं आणि त्यांनी जे काही केलं, तेही कर्तव्य होतं. त्या कर्तव्याचा अर्थ मी असा घेवू नये की त्यांना परेशानी व्हावी. कदाचित हा औरंगा माझ्याशी आणि त्यांच्याशी संभाजीसारखाच व्यवहार करेल हे नाकारता येत नाही. तसंच ती माझी गावची माणसं. अगदी जीवाभावाची माणसं. ती माणसं. त्यांनी माझ्यावर प्रेम करुन मला मदत केली. ज्यांनी संभाजीवर प्रेम करुन मला मदत केली. समजा त्या दामाजी पाटलानं मला कळवलंच नसतं तर, मला संभाजीची चिता जाळायची संधी मिळाली असती का? बिचारा दामाजी! त्या दिवशी गोरेगावावरुन आला होता. त्याच्या अपेक्षेवर पाणी फेरु की काय मी. अन् ती बिचारी राधाई. हिमतबाज बाई. तिच्याच हिमतीवर तुकडे गोळा झाले. मर्दानी आहे ती. मी तिच्या स्वप्नांचा बळी देवू.
दामाजी तर ऐकतच नव्हता तुकडे गोळा करायला. म्हणत होता जावू द्या. त्या औरंग्यांचे सैन्य पहारा देवून आहेत नदीपलिकडं. जर एवढासाही आवाज झाला की औरंगा सैनिक येतील. प्रेत बाजूलाच राहिल अन् आपल्याला पकडून नेतील. जावू द्या. तो संभाजी तर मेला. पण त्याच्याबरोबर आपणही मरुन जावू. कारण संभाजीपाठोपाठ औरंगजेब आपल्यालाही मारुन टाकेल. पण ती राधाई माऊली. ती एकटीच निघाली जनाबाईच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून आपली मर्दानगी दाखविणारी बाई. ती बाई तेवढ्याच हिंमतीनं एकटीच निघाली. त्याचबरोबर तिच्या मागं ती जनाबाई. अन् पुर्ण नारीशक्ती. व्वा व्वा. नारीशक्ती जिंदाबाद. त्या होत्या म्हणून मीही हिमतीनं पुढं झालो. अन् तो गोरखनाथ. बिचारा बुवा. तो तर यायलाच तयार नव्हता. त्यातच आमचा दामाजी पाटील. त्याचा तर पानच नव्हता हालत गोरखनाथाशिवाय. दामाजीमुळंच आला बिचारा. बिचारा गोरखनाथ. तेवढ्याच रात्री त्यानं बेलफुलं गोळा केली. अन् अग्नी द्यायला मदत केली संभाजीले. अन् ती माणसं. ते समदे तरुण त्या संभाजीसाठी झटले. बिचारे दामाजीच्या इशा-यावर गावच्या शिवेवर उभे राहिले गोफनगुंडा घेवून. अन् ती सारी गावातील माणसं......... बिचारी! मरणाची भीती होती त्यांना, तरीही त्यांनी ती भीती न बाळगता माझ्यासोबत संपूर्ण इंद्रायणी ढवळून काढली. महाराज संभाजीचे तुकडे गोळा करायला आणि तीही माणसं थोरंच म्हणावी की त्यांनी शेणकुर धसकट अन् लाकडं गोळा केली. हं अग्नी मी दिला. माझ्या अंगणात. माझ्या शेतात. जंगलात त्या काळोख्या रात्री. माझं शेत........ ते माझं शेत नसून माझ्यासाठी अंगणच आहे. माझा भाऊच होता संभाजी. कारण त्याच्या बापानं माझ्या बापाची गोष्ट ऐकून मला संधी दिली. नवे पराक्रम करण्याची. त्याचा बाप होता म्हणून मला कर्तबगारी दाखवता आली. नाहीतर याच वळूच्या मातीत मी खितपत पडून राहिलो असतो. आज मला हा वळू गावच नाही तर संपूर्ण इंद्रायणी ओळखते.. मी जरी अस्पृश्य असलो तरी. आज संपर्ण गाव माझी इज्जत करते. मला पुसते. कारण मी किल्लेदार झालो रामशेजचा म्हणून. पण मी जर सैन्यात भर्ती झालो नसतो तर रामशेजचा किल्लेदार झालो नसतो. अन् रामशेजचा किल्लेदार झालो नसतो तर मला या गावानं सन्मान दिला नसता. हं मी गुन्हा केला. संभाजीला जाळण्याचा गुन्हा. हं हाच गुन्हा झाला माझा. अन् तो गुन्हा मी एकट्यानंच केला नाही तर माझ्या गावानं केला. कुणासाठी? तर त्या लाडक्या संभाजीसाठी. ते लेकरु. माझा भाऊ. माझा एकट्याचाच भाऊ नाही तर जगाचा भाऊ. तो माझ्या मायबापाचा लेकरु. माझ्या मायबापाचा एकट्याचाच लेकरु नाही तर तो सा-या गावाचा लेकरु. हे कसं विसरु मी. हं केला असन संपूर्ण गावानं गुन्हा आपल्या लेकरासाठी. हं केला असल आपल्या भावासाठी या गावानं गुन्हा. पण मी कशाला त्याला गोवू या वादात. हा वाद माझा आहे. मग मी फासावर गेलो तरी चालेल. मला मृत्युदंड झाला तरी चालेल. पण मी माझ्या गावाला संंकटात टाकत नाही. जर मी आज या गावाला संकटात टाकलं तर.........उद्या मला माझा गाव माफी देणार नाही. माफ करणार नाही. जरी मी संभाजीला अग्नी दिला असेल तरी. अन् जर मी गुन्हा कबूल केला आणि मला जर मृत्युदंड झालाच तर उद्या हीच माती माझ्यावर गर्व करेल. म्हणेल की धर्मासाठी प्राण देणा-या संभाजीला कर्तव्याचे पालन करणा-या त्या इंद्रायणीच्या लेकरानं म्हणजेच गोविंदानं अग्नी दिला. त्या शिरप्याचाही उदोउदो होईल. ज्यानं संभाजीचे तुकडे शिवलेे अन् त्या शिर्क्याचाही उदोउदो होईल. ज्यानं कपडे शिवले. एक गणोजी शिर्के असा होता की ज्यानं संभाजी राजांना पकडायला शत्रूंना मदत केली अन् एक हा शिर्के की ज्यानं संभाजीचे कपडे शिवले. जर मला माझं कर्तव्य पार पाडतांना वीरमरण आलंच तर उद्या हीच इंद्रायणी धन्य होईल आणि ओरडू ओरडू सांगेल की या भीमेच्या काठी असाही कर्तव्यवीर होवून गेला की ज्याने आपले कर्तव्य तर केलेच. पण कर्तव्यासाठी प्राणही दिला. आज मी जरी अस्पृश्य असलो तरी मला कोणाला फसवायचं नाही. मग मी मेलो तरी चालेल.
हा गाव संभाजीच्या अंत्ययात्रेवेळी सहभागी होता. या गावानं संभाजीला अग्नी देण्यासाठी बरीच मदत केली. ही संभाजीला अग्नी देणारी गोष्ट काही साधीसुधी गोष्ट नव्हती.
आज इंद्रायणी धन्य झाली संभाजीच्या रक्षेला आपल्यात सामावून घेवून. उद्याही धन्य होईल, जेव्हा माझी राख या नदीत विरघळेल. उद्या इंद्रायणी म्हणेल आणि ओरडून सांगेल की ती दोन लेकरं या धरणीवर जी झाली. ती कधीच झाली नव्हती. कधीच होणार नाही. एक लेकरु धर्मासाठी मरण पावला तर दुसरा आपलं कर्तव्य बजावत. कदाचित मी मेलोही या औरंग्याच्या हातानं. तरीही या धरणीवर माझे एकट्याचे नाव होवू नये संभाजीला अग्नी देणारा म्हणून. माझ्या संपूर्ण गावाचं नाव व्हावं. कोणीही उद्या म्हणू नये की एकट्या गोविंदानं संभाजीला अग्नी दिला. तर म्हणावं या वळू गावच्या संबंधीत सर्व लोकांनी अग्नी दिला. उद्या माझंच नाव संभाजीबरोबर अजरामर होवू नये.
हे परमेश्वरा, तू मला त्याबद्दल सद्बुद्धी दे आणि हे औरंग्याचे अत्याचार सहन करण्याची ताकद दे. माझी उद्या जीभ जरी कापली गेली संभाजीसारखी किंवा माझं मुंडकं जरी छाटलं गेलं संभाजीसारखं तरी मला हसता हसता स्विकारता यायला हवी ती वेळ. अन् हसता हसता मला माझ्या वेदनाही सहन करता यायला हव्यात. हे परमेश्वरा, मला एवढा काफिर बनवू नकोस की माझ्या तोंडून अलगद गाववाल्यांचं नाव निघावं. जेणेकरुन बिचा-यांना संभाजीसारख्याच वेदना सहन कराव्या लागतील. माझ्यामुळं असं काही होईल. असं घडू नये देवा माझ्याहातून. हे मातृभुमी यदी कदाचित माझं चुकत असेल, हे इंद्रायणी तूही सांग माझं चुकत असेल तर मला माफ कर. पण मी माझ्या संभाजीसाठी या संपूर्ण माणसांचा बळी देवू शकत नाही.
गोविंदा विचार करीत असतांना औरंगजेब बादशाहा म्हणाला,
"क्या सोच रहा है गोयंदा?"
ते औरंगजेबाचे शब्द अचानक गोविंदाच्या कानावर पडले. तसा गोविंदा भानावर आला. म्हणाला,
"काही नाही."
"तो फिर बता कि उस रात तेरे साथ कौन कौन था?"
"कोणीच नव्हता माझ्यासोबत."
"म्हणजे तू एकटाच होता का?"
"होय, मी एकटाच होतो."
"असं कसं होईल? अरे गोयंद्या, कोणाच्या मुदड्याले अग्नी देणं हे एकट्याचं काम तरी आहे का अन् तेही एवढ्या लवकर?"
"होय, मी एकट्यानंच या सर्व गोष्टी केल्या. मीच लाकडं आणली. मीच तुकडे गोळा केले. मीच शेण धसकटं गोळा केली. अन् मीच अग्नी दिला. सर्व मीच केलं. दिसलं नं वं शेतात. माझ्या शेतात जावून पावा. तेथंच तुम्हाले त्या संभाजीच्या अग्नीची जागा दिसन. तेथंच अंत्यसंस्कार झाला संभाजीचा."
"पण हे सारं तू केलं?"
"होय, मीच केलं हे सारं."
बादशाहा गोंधळात पडला होता. त्याचा विश्वासच बसत नव्हता की ही अग्नी आणि तो संभाजीचा अंत्यसंस्कार विधी एकट्या संभाजीनं केला.
बादशाहानं गोविंदाचं सगळं ऐकलं. त्यावर थोडासा विचार केला. तसा तो ओरडून म्हणाला,
"बंद करो इस कालकोठडीका दरवाजा बंद. हम इसके बारे में कल निर्णय लेंगे।"
सैनिकांनी पुन्हा गोविंदाला त्या अंधा-या कालकोठडीत टाकलं व त्याला टाळेबंदी करीत ते बादशाहाला म्हणाले,
"जहापनाह, अब इसको कमरे में डाल दिया है। अब आपका आदेश आनेतक यह कालकोठडी में बंद रहेगा।
सकाळ झाली होती. आज बादशाहा औरंगजेब लवकर उठला होता. तसा तो दररोजच लवकर उठत असे. तसा तो नमाज पढत असे. त्यानंतर तो आपल्या कामाची सुरुवात करीत असे. दुपारी फावला वेळ मिळाला की टोप्या शिवत असे. तसा आजही बादशाहा तो सकाळी लवकर उठला होता. त्यानं नमाजही संपवला होता. पण आज त्याला काम करावसं वाटत नव्हतं. त्याला टोप्याही शिवावाश्या वाटत नव्हत्या. त्याला काही लिहावसंही वाटत नव्हतं. तसा तो कोणत्यातरी विचारात असावा असं वाटत होतं. तो कसलातरी विचार करीत होता. तसे दुपारचे बारा वाजले होते.
दुपारचे बारा वाजले खरे. पण बादशाहाचं कोणत्या गोष्टीकडे लक्ष नाही हे पाहून एक सरदार त्याला म्हणाला,
"जहापनाह, क्या आप बेचैन हो?"
"हाँ।"
"बेचैनी का कारण?"
"वो गोयंद्या।"
"क्यो? क्या किया गोयंद्या ने?"
तसा दुसरा एक सरदार म्हणाला,
"जहापनाह, कहे तो मै उसकी गर्दन उडा दूँ?"
"नही नही नही। ऐसी भूल कभी नही करना। मै वह राज जानना चाहता हूँ कि आखिर यह ताकत आती है कहाँसे उन मराठों में?"
"कौनसी ताकत?"
"अरे ये लोग इतनी तकलिफ सहन करते है। मगर अपनी जबान तक नही खोलते। देखो, वह संभा की ही बात ले लो। आखिर वह मर गया।परंतू जबान जैसी की वैसी रही। न किल्ले का अता पता बताया, न साला इस्लाम कबूल किया। आखिर वह मर गया। किंतू टस से मस नही हुअा और यह गोयंद्या भी बता नही रहा वह राज कि किसकिसने संभाजी का अंत्यसंस्कार किया है।"
"जहापनाह, कैसे बतायेगा वह। वह इतना बुजदील नही कि आपको अपना राज बतायेगा।"
"क्या वह राज का राज ही रहेगा कि पता चलेगा?"
सरदार चूप होते. त्यातच त्या सरदारांना हेही माहित नव्हतं की त्या गावातील कोण कोण या कटात सहभागी असू शकतात. तसेच तो गोविंदाही त्याबाबत काहीच सांगत नव्हता. तसा अचानक बादशाहा म्हणाला,
"आपण त्या जागी जावूया का?"
"कुठे जहापनाह?"
"ज्या ठिकाणी संभाजीला जाळलं तिथं."
सर्वांनी इकडंतिकडं पाहिलं. त्याचबरोबर त्यांनी होकार दिला आणि ठरलं की बादशाहानं तिकडं प्रस्थान करावं.
बादशाहा वळूच्या त्या स्थळी जायला तयार झाला होता. त्यानं नमाज अदा केला. तसा सांडणीस्वारानं त्याच्यासाठी खास शाही उंट सजविण्यात आला. त्यातच बादशाहा त्यावर स्वार झाला व तो त्या वळूच्या संभाजीच्या अग्नीस्थळावर पोहोचला.
ते संभाजी राजाचं अग्नीस्थळ. त्या अग्नीस्थळावर दुपारचे तीन वाजले होते. आजुबाजूला पक्षाचा कलारवंही नव्हता. झाडं भरपूर होती. पण ती झाडंही बोलकी नव्हती. आजूबाजूला ऊन्हं पडलेलं होतं. ते ऊन एवढं प्रखर होतं की त्या ऊन्हाचे चटके अंगाला झोंबत होते. वाराही सुटला नव्हता. तसेच अंगात उकाडा आला होता. अंगाला घामही आला होता. जणू असं वाटत होतं की या औरंगजेबाला येथील पक्षी, प्राणी, झाडं, झुडपं आणि येथील हवाही घाबरत असावी. जणू तसंच दृश्य परीसरात तयार झालं होतं.
बादशाहा औरंगजेब उंटावरुन खाली उतरला. त्यानं गुडघे टेकले. तसा तो त्या जागेचं निरीक्षण करु लागला. तोच त्याच्या तोंडून शब्द फुटले.
"हे अल्ला, तुने क्या किस्मत बनाई मराठी राजा संभाजीकी। हमने तो सोचा था कि इसके तुकडों को अग्नी ना मिले। इसके तुकडों को कोई गीदड कौए खाए। कोई इन नदियों की मछलियों का शिकार बने संभाजी। मगर नही। संभाजी की किस्मत सही निकली। हमारी ही किस्मत खराब है।"
बादशाहा स्वगत बोलला. त्याचं मन त्याला काही स्वस्थ बसू देत नव्हतं. तसा तो उभा झाला. आजुबाजूला पाहू लागला. तसा त्याला काहीच पुरावा आढळला नाही. तोच तो चिंतीत झाला होता.
"कौन कौन होगे साले जलानेवाले." बादशाहा स्वगत म्हणाला.
बादशाहाला काहीच पुरावा न सापडल्यानं बादशाहा निराश झाला होता. तसा त्याला भयंकर राग आला होता. त्याचा चेहरा लालबुंद झाला होता. कारण पुरावा न सापडल्यानं त्याला व्यथीत व्हावं लागलं होतं.
पुरावा सापडला नाही. त्यामुळं घोर निराश होवून बादशाहा माघारी फिरला. त्याला वाटलं होतं की निदान संभाजीला जिथं जाळलं तिथं तरी पुरावे सापडतील.
गोविंदा एक दिवस काही ना काही सांगेलच असं वाटून घेवून औरंगजेब बादशाहा गोविंदासमोर प्रेमाचं नाटक करीत होता. त्यातच एक दिवस एक सरदार त्याचा एक सरदार म्हणाला,
"जहापनाह, आप ऐसे इन मराठों से प्रेम से पेश क्यो आते हो? इन्हे प्यार की भाषा नही समजती।"
त्यावर बादशाहा थोडा वेळ मौन होता. त्यातच थोड्या वेळानं तो म्हणाला,
"इन मराठों को तो तलवार की भी भाषा नही समजती। ये कटने पर मजबूर हो जाते है। मगर कोई राज नही उगालते।"
"ऐसा नही है।"
"क्यो नही है? अरे उस संभा को ही देख लो। उसके नाखून उखाड़ दिये गये। उसकी जिव्हा छाटी गई। उसके शरीर के एकएक अंग तक छाटे गये। परंतु उसने एक भी राज नही उगाला। आखिर गर्दन भी छाटी मगर वह राज का राज ही रह गया। पता ही नही चला कि शिवाजी के कितने किले और वे किले कहाँ कहाँ पर है।"
"हाँ, लेकिन इसका मतलब यह तो नही कि गोयंद्या प्रेम की भाषा समझे?"
"समझेगा, गोयंद्या प्रेम की भाषा समझेगा। सुना है ये मराठे काफिर होते है। इनको थोडासा तुकडा डालना पडता है। जैसे हम कुत्ते या बिल्ली को डालते है। इनको थोडा लालच दे दो। ये पिघल जाते है। पता है मै पहले वो संभा के अंत्यसंस्कार में कौन कौन था यह जानने की कोशिश में लगा हूँ। बाद में धिरे धिरेे वो शिवाजी के पास कौन कौन से किलेे थे। यह बात जानूँगा। यह किले की बात गोयंद्या को भी पता होगी। क्योंकि यह भी रामशेज के एक किले का किल्लेदार रह चुँका है।"
बादशाहाला भयंकर राग येत होता गोविंदाचा. पण आता त्याच्याजवळ काही उपाय नव्हता. तसा एकदा तो आपल्या रोपवाटिकेत बसला होता. तसा त्याला त्याचा भुतकाळ आठवला. तो आपल्या सरदारांना त्याबद्दल सांगू लागला. तसा तो विचार करु लागला.
"मी सहावा मुगल सम्राट, बाबराच्या वंशाचा. मला पूर्ण हा देश इस्लाममय बनवायचा आहे. जे काम माझ्या बापाला, दादार,पडदादांना जमलं नाही. ते काम मला करायचं आहे. तेही आपल्या कारकिर्दीत.
मी शाहजहान आणि मुमताजची सहावी संतान. मी माझा मोठा भाऊ दारा शुकोहलाच सोडलं नाही तर हे मराठे माझ्यासाठी कोण लागले. दारा शुकोह........ त्याला तर मीच कैद केलं होतं नुरजहाँच्याा मदतीनं। जेव्हा माझा बाप राजा बनला. माझा बाप गुजरातचा सुभेदार. तो राजा बनल्यावर मीही गुजरातचा सुभेदार. गुजरातवालेच राजे बनतात की काय. मीही बनलो. पण मला डावपेच खेळावे लागले.
ज्यावेळी मला दक्षिणेचं सुभेदार बनवलं गेलं. तेव्हा मी स्वतः गोवळकोंडा आणि विजापूरवर आक्रमण केलं. परंतू मला अगदी विजयाच्या काळात माझ्या बापानं परत बोलावलं. अगदी विजयाच्या काळात. मला राग तर येणारच त्यामुळं. कोणालाही राग आलाच असता त्यावेळी.. मलाही आला. आज जसाा मी दक्षिणेत आलो राजा बनल्यावर. तेव्हा सर्वप्रथम मी गोवळकोंडा अन् विजापूरच जिंकलं आणि माझं स्वप्न साकार केलं. परंतू ज्यावेळी मला असं निर्णायक क्षणी माझ्या बापानं परत का बोलावलं हे माहित झालं. तेव्हा मला दारा शुकोहचा रागच आला. तो माझाच द्वेष करीत होता.असं वाटलं. त्यानंच माझ्या बापाच्या कानाशी लागून मला अगदी निर्णायक क्षणी परत बोलावलं.
मला आलेला भयंकर राग. ज्यावेळी माझा बाप आजारी पडला. मी सर्वप्रथम त्यालाच बंदी बनवलं आणि स्वतःला शासक घोषीत केलं. दारा शुकोहला गद्दार ठरवलं मी स्वतः. त्यातच सख्ख्या भावाला मी फाशी दिली. का? तर तो केव्हाही विद्रोह करुन मला हटवू शकला असता राजगादीवरुन. मी दारा शुकोहच्या रुपानं आपल्या मार्गातील काटाच हटवला.
माझा पडदादा अकबर उदार होता या हिंदूबाबत. त्याला हिंदू आवडत होते. हे हिंदू हिन दर्जाचे. नाही....... मी या देशाला हिंदू ठेवणारच नाही. मी दख्खनचा प्रदेश पुर्ण जिंकल्यावर आपला शासनकाल सुरु करणार आणि मग.......मग माझ्या वंशजांना जे जमलं नाही, ते मी करणार म्हणजे मी हा देश मुस्लीम करणार.
मी बादशाहा औरंगजेब. मी व्यसनी नाही. दारुला शिवत नाही. त्याचं कारणंही तसं आहे. मी एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो. तिचं नाव होतं हिरा. हिराबाई जैनाबादी नाव होतं तिचं. ती एक गायिका व नर्तकी होती. ती एकदा झाडावरील आंबे तोडत होती. ज्यावेळी ती एकदा झाडावरील आंबे तोडत होती. त्यावेळी मी तिला पाहिलं आणि प्रेमात पडलो. मी तिच्या इतका प्रेमात पडलो की मी कधीही दारु न पिण्याची शपथ घेणारा तिच्यासाठी दारु प्यायला तयार झालो. आता मी दारु पिणारच. त्यातच आता तो दारुचा ग्लास तोंडाला लावणारच. तेव्हा ती जवळ आली आणि तिनं मला दारु पिण्यापासून रोखलं. मी दारुला कधी शिवू नये असं तिनं माझ्याकडून वचन घेतलं. आज मी निर्व्यसनी आहे. त्याचं कारण तीच आहे. ती काही जास्त काळ जगली नाही. ती त्या घटनेनंतर दोन वर्षातच मरण पावली. तिला औरंगाबादमध्ये दफन केलं आहे.
कोणी म्हणतात की माझा मोठा भाऊ दारा शुकोह राजा बनायला हवा होता. पण त्याच्यात राजा बनायचे तरी गुण होते का? ज्याला माझाच सामना करता आला नाही. तो राजा कसा बनू शकेल. मी माझ्या बापाला व माझा लहान भाऊ मुरादला आग्र्याच्या किल्ल्यात घेरलं. मी किल्ल्याचा पाणीपुरवठा तोडला. मग काय माझ्या बापाला समजलं की आता ही वेळ खरी नाही. साम्राज्याची वाटणी करावी. मग माझ्या बापानं पाच जणात वाटणी करायचा प्रस्ताव ठेवला. जो प्रस्ताव मला मान्य नव्हता.
दारा शुकोहला मीच ठार केलं. त्याला व त्याच्या मुलाला पकडून मी दिल्लीला आणलं. त्यानंतर त्या दोघांनाही खरुज झालेल्या हत्तीच्या पाठीवर बसवलं. त्यातच त्याला दिल्लीच्या रस्त्यावरुन फिरवलं. त्यानंतर मी दाराला विचारलं समजा तुझं मत बदललं आणि मी तुला सोडलं तर काय करशील? त्यावर तो म्हणाला की मी तुझ्या शरीराचे चार तुकडे करुन या दिल्लीच्या चार प्रवेशद्वारावर लटकवेन. मग मला त्याचा भयंकर राग आला. तो एवढा राग आला की मी स्वतःच त्याची गर्दन उडवायचा आदेश दिला त्या नजीरला. ज्यावेळी नजीर त्याची गर्दन उडवायला गेला. तेव्हा तो व त्याचा मुलगा जेवन बनवीत होते. पण मी त्याचा जल्लाद बनून वागलो त्याच्याशी."
ते सांगतांना बादशाहाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्याला ते सांगण कठीण जात होतं. तसा तो परत सांगू लागला आपली आपबीती.
"त्यानंतर मला फार वाईट वाटलं. माहित आहे. माझा भाऊ मरण पावताच मी फार रडलो. एवढा रडलो की माझा आवाजही बसला होता. मी जेव्हा माझ्या बापाला कैदेत टाकलं. त्याचा दुष्परीणामही झाला. मक्केच्या शरीफांनी मला या हिंदुस्तानचा शासक मानण्यास नकार दिला. मी मक्केत पाठविलेल्या भेटी न स्विकारता परत पाठवल्या जात होत्या. माहित आहे दारा माझा भाऊ माझ्या कैदेत कसा पडला. ज्यावेळी माझा बाप आजारी होता. तेव्हा आम्ही तिनही भाऊ आमच्या बापाला भेटायला गेलो. त्यावेळी माझा भाऊच दिल्लीचा कारभार सांभाळत होता. पण माझ्या भावानं आम्हाला आमच्या बापाला भेटू न देता आमच्याविरुद्ध लढाईचं आव्हान दिलं. त्यानं आपल्या शिकोह नावाच्या मुलाला माझा एक भाऊ शुजाशी लढायला पाठवलं आणि तो स्वतः माझ्याशी लढायला आला. पण त्याला माझी ताकद माहित नव्हती.
त्यावेळी त्याच्याजवळ चार लाख सैन्य होते व माझ्याजवळ चाळीस हजार. त्यातच त्याच्याजवळच्या सैन्यात लढाईचे अनुभव नसणारे भांडे विकणारे, दुकान चालविणारे, मजूरी करणारे लोकं होते. ती मंडळी, त्यांना लढाईचा अनुभव नव्हता. फक्त संख्या वाढविण्यासाठी त्यांना दारा शुकोहनं सैन्यात भर्ती केलं होतं. त्यातच तो हत्तीवर बसून लढाई करीत असतांना तो लढाई जिंकलाच होता. एवढ्यात मी ज्या त्याच्या सरदाराशी संगनमत केलं होतं. ज्याला त्यानं केव्हातरी अपमानीत केलं होतं. त्या सरदाराचं नाव होतं खलीलुल्लाह. तो सरदार त्याला म्हणाला, की जहापनाह, शत्रूचा बाण आपल्या कंठात केव्हा येवून धडकेल आणि आपण केव्हा कोसळाल हे सांगता येत नाही. तेव्हा तुम्ही हत्तीवरुन उतरुन या घोड्यावर बसा. नाहीतर तुम्ही गेलात की आपण युद्ध हरलो असं समजावं. बिचारा दारा,, मुर्ख माणूस. तो हत्तीवरुन उतरुन घोड्यावर बसला.
तो जेव्हा हत्तीवरुन उतरुन घोड्यावर बसला. तेव्हा त्याच्या सैनिकांना वाटलं राजा मरण पावला. ते सैरावैरा पळू लागले. त्यातच माझे सैनिक त्यांना करकर कापू लागले आणि क्षणातच मी युद्ध जिंकलो. माहित आहे. मी दाराची हत्या करताच माझे बाकीचेही भाऊ नमले व ते मला राजा मानण्यात तयार झाले. मी ज्यावेळी नजीरला आदेश दिला की त्यानं दारा शुकोहची गर्दन माझ्यासमक्ष पेश करावी. तेव्हा त्यानं दारा शुकोहची गर्दन माझ्यासमक्ष आणली. मी त्या मस्तकाला चांगलं धुतलं. त्याची शहीनिशा केली की तोच दारा शुकोह आहे की नाही. मग मी नजीरला जायला लावलं. त्यातच त्याला बक्षीसही दिलं आणि त्याला व खुजल्या हत्तीवरुन दारा शुकोहला दिल्लीत फिरवून अपमानीत करणा-या जीवन खानला ते रस्त्यानं जात असतांना मीच माणसं पाठवून ठार केलं. असा माझा राजा बनण्यासाठीचा खडतर प्रवास. आज मी सम्राट झालो. पण त्यासाठी मला फार संघर्ष करावा लागला. आता माझा जीव गेला तरी चालेल. पण मला हा दक्षिण प्रांत जिंकायचा आहे मग उत्तर. त्यानंतर या पूर्ण हिंदुस्थानला मुस्लीम बनवायचे आहे. हे अल्ला, माझी एवढीच तुला हाक आहे की तू माझी ही अखेरची इच्छा पूर्ण कर."
बादशाहा औरंगजेब आपला भुतकाळ......आपली आपबीती सांगत होता. ते ऐकून अंगात रोमांच भरत होते. कदाचित एक एक प्रसंग ऐकतांना अंगावर काटाही उभा राहात होता. तशी सायंकाळ झाली होती. अंधारही पडायला लागला होता. पण त्याला रोखायला कोणीच तयार नव्हतं. जो आपल्या बापाला कैदेत टाकू शकतो. आपल्या सख्ख्या भावाची हत्या करु शकतो. तो माणूस आपण जर त्याची आपबीती ऐकली नाही आणि मध्येच व्यत्यय आणला तर आपल्यालाही मारु शकतो असं त्यांना वाटत होतं. म्हणून की काय, ते सरदार चूप बसले होते. एवढ्यात एक सरदार म्हणाला,
"बादशाहा सलामत, अभी अँधेरा हो गया है। अभी यहाँ से निकलते है।"
ते शब्द........ते शब्द बादशाहा औरंगजेबाच्या कानावर पडले. तसा तो भानावर आला आणि उठून महालाकडे चालू लागला. आता त्याला त्याचं मन हलकं वाटू लागलं होतं.
गोविंदा आपले एक एक दिवस मोजत होता. तसा गोड गोड बोलत औरंगजेब त्याच्याकडून तो राज उलगडविण्याचा प्रयत्न करीत होता. पण त्याच्याकडून काही केल्याा तो राज उलगडवला जात नव्हता. त्यामुळं तो अधिक चिंताग्रस्त होत होता.
गोविंदा हार मानणारा योद्धा नव्हता. त्याच्या रक्तामध्ये महाराष्ट्रातील मातीचे अंकूर मिसळले होते. त्याचा जन्म अंदाजे १० अॉगष्ट १६५९ ला याच मातीत झाला होता. जी भुमी त्याच्या जन्मानं पावन झाली होती.
लहानपणापासूनच आपला मुलगा काहीतरी महान कार्य करणार असं गोपाळरावांना वाटत होतं. कारण लहानपणापासूनच तो हुशार आणि हिंमतवान होता. वडील मनाई करीत असले तरी लहानपणापासूनच तो एकटा जंगलात जावून लाकडं आणायचा. तसेच गावातील कोणाचीही कोणतीही कामं करायचा. त्यातच जीवन असतांना त्या इंद्रायणीत उतरुन त्यातील मासोल्या, खेकडे व झिंगे पकडून आणायचा. लहानपणीच त्या रानात लांडग्याची भीती असतांना तो कधीकधी एकटा फिरत असे. पण त्याला भीती वाटत नव्हती. अगदी लहानपणापासूनच तो कुस्ती खेळण्यात पटाईत असून गावोगावी बापाला न सांगता जायचा व कुस्त्या जिंकायचा. त्यातच आखाड्यात कुस्त्या मारण्यात तो अगदी तरबेज झाला होता.
वळू गावातील ती तरणीताठ मुलं गोफनगुंडा अगदी हिरीरीनं चालवित असत. ती मुलं गोफनगुंडा चालविण्यात तरबेज होती. त्यातच अगदी ती मुलं सात आठ वर्षाची झालीच तर त्यांच्या हातात गुलेर यायचा. एका झाडाच्या एका फांदीला चामड्याची वादी लावून गुलेर बनवला जाई. ह्या गुलेरला लहान लहान दगडं लावून ही लहान मुलं नेम धरायची. त्यातच झाडावर बसलेल्या पक्षांवर नेम लावून तो पक्षी ही मंडळी अचूकतेनं पाडायची. त्यातच ही लहान मुलं झाडावर चढून खारी व पक्षांना फास लावून त्यांना पकडायची. ते पक्षी लहानपणापासूनच धिटाईनं भाजून खायची.
लहानपणापासूनच गोविंदाला अस्पृश्यतेचे चटके बसले होते. गावातील या अस्पृश्यतेबाबत त्याच्या मनात चीड होती. अस्पृश्यता म्हणजे काय, ते अगदी लहानपणापासूनच गोविंदाला कळायला लागली होती. परंतू त्याबाबत त्यानं कधीतरी ब्र काढला नाही.
गोविंदाचे बापावर अतिशय प्रेम होते. बापाच्या आज्ञेत वागणारा तो मुलगा जरी असला तरी कधीकधी कोणत्या कोणत्या गोष्टी तो मायबापांना सांगून करीत नसे. एकदा त्यानं न सांगता एकट्यानं लांडगा मारला होता. ते जेव्हा गोपाळरावाला माहित झालं. तेव्हा त्यानं त्याला शाबासकी दिली होती आणि प्रेमानं म्हटलं होतं की माझा मुलगा हा गणपतीसारखा मस्तीखोर आहे. तेव्हापासून त्याला लोकं गणप्या म्हणू लागले. त्यातच पुढं जावून त्याला गणपत महार म्हटलं जावू लागलं.
गणपतचं खरं नाव गोविंदा होतं. पण त्याचा खोडसर स्वभाव पाहून लोकं त्याला गणप्या म्हणायचे. पुढं जेव्हा तो शहाणा झाला. तेव्हा गणपत महार म्हणून त्याला गाव ओळखायला लागलं होतं.
लहानपणच्या या धिटाईमुळं त्याच्या बापाला गोविंदाबाबत काळजी वाटत होती. त्यातच जेव्हा तो सैन्यात दाखल झाला. तेव्हा याच धिटाईचा त्याला फायदाही झाला होता.
गाव संपन्न होतं. पण गाव जरी संपन्न असलं तरी गावात अस्पृश्यता पाळली जात होती. ही अस्पृश्यता एवढी सहन करावी लागली होती गोविंदाला की त्या अस्पृश्यतेमुळे त्याच्या मनात अन्याय, अत्याचार सहन करण्याची ताकत निर्माण झाली होती.
बादशाहा औरंगजेब हा ज्याप्रमाणे कपटी, धुर्त व कावेबाज होता. त्याचप्रमाणे तो एकांगीही होता. त्यातच लहरीही. त्याला श्रीमंतीचा माज नव्हता. त्याच्या हाताखाली एवढे नोकर चाकर असुनही तो टोप्या शिवण्याचं काम करीत असे हा त्याचा विशेष गुण होता. लहानपणापासूनच त्याला कोणतंच व्यसन नव्हतं. तसेच त्याची राहणीही साधी होती. त्यानं मरणाआधीच सांगीतल होतं की त्याची कबर विशेष अशी नसावी. त्याला कच्च्या कबरीत दफन केलं जावं. तसं पाहता बादशाहा औरंगजेब हा हुशार होता. पण त्याला जेव्हा लहर यायची. तेव्हा तो काय करतो हे त्याला कळत नसे.
तो लहरी स्वभावाचा असल्यानं त्याच्या मनात राजसत्ता हाती घेण्याची इच्छा निर्माण झाली. त्यातच त्याच्या या मुढी स्वभावानं आपण काय करीत आहो किंवा काय करायला हवं हे न कळाल्यानं त्यानं खुद्द आपल्याच बापाला नजरकैदेत ठेवलं. त्यातच आपल्याच भावाला म्हणजे दारा शुकोहला ठार केलं. त्यातच जेव्हा त्याचा भाऊ मरण पावला. तेव्हा पुष्टी होताच ज्याला मारलं त्याच्यासाठी तो त्याला पाहू पाहू रडत बसला होता. एवढंच नाही तर त्या बादशाहानं ज्या नजीरला भावाला मारायला लावले होते. त्या नजीरची व ज्यानं त्याच्या भावाला ज्या खुजल्या हत्तीवर बसवून अपमान केला होता. त्या जीवन खानाला बक्षीस तर दिलं, पण रस्त्यातून जाता जाता मारुनही टाकलं होता. एवढंच नाही तर स्वाभीमानी संभाजीची हत्याही साध्यापणानं केली नव्हती तर त्या धर्मवीराला अगदी तडपवू तडपवू मारलं होतं. हात, पाय कापले. नखे उखडली. जीभ छाटली. हे असे तडपवू तडपवू मारणे म्हणजेच विक्षीप्तपणाचे लक्षण दिसते. त्याला असे करण्यात फार मजा वाटत असे.
गोविंदालाही तो असाच मारण्याचा विचार करीत होता. तसा तो गोविंदाशी प्रेमानं तर बोलायचा. पण ते त्याचं गोविंदावर प्रेम नव्हतं तर ते नाटक होतं. जर प्रेम असतं तर त्यानं त्याला सोडून दिलं असतं काही न करता किंवा सामुहिक कैद्यासोबत त्याला ठेवलं असतं. कारण गोविंदाचा पाहिजे तसा गुन्हा नव्हता.
गोविंदाला माहित होतं की बादशाहाच्या मनात काय आहे. बादशाहा आपल्याकडून असा राज उलगडून घेवून आपलीही संभाजीसारखीच हत्या करेल हे गोविंदाला चांगलं ठाऊक होतं. त्यातच बादशाहाचा स्वभाव गोविंदाला माहित होता. तो लहरी बादशाहा असून त्याच्या मनात येईल तेव्हा तो आपल्याला मारणारच आहे हे गोविंदाला चांगलं ठाऊक होतं. मग आपण त्याला आपल्या वढू गावातील माणसांबाबत सांगीतलं तरीही. तसं पाहता गोविंदासोबत अाणि त्याच्या परीवारासोबत गाव जरी अस्पृश्यतेनं वागला असला, अस्पृश्यतेनं वागत असला तरी गोविंदा त्या गावाचा बदला काढू पाहात नव्हता. त्यानं तो राज आपल्या मनात अखेरचा दफन केला. जरी मरण आले तरी चालेल. पण आपल्या मरणासोबत हा राज दफन करायचा. असं गोविंदानं मनात ठरवलं होतं. असाच तो दिवस उजळला.
आज बादशाहा औरंगजेब सकाळीच उठला होता. त्याला तशी गोविंदाची आठवण आली. तसा तो आपल्या एका सरदाराला म्हणाला,
"उस गीदड के बच्चे ने राज उगल दिया क्या?"
ते सरदार एकमेकांकडं पाहू लागले. तसा बादशाहा समजला. त्याला काय म्हणायचं आहे ते आपले सरदार अजून समजलेले नाहीत. तसा तो परत म्हणाला,
"क्या इधर उधर देख रहे हो? वह गीदड का बच्चा........वह गोयंद्या."
तसा एक सरदार म्हणाला,
"नही जहापनाह."
"तो अभीतक तुमने क्या किया?"
त्याचं ते आवेशपुर्ण बोलणं. त्यातच त्याचा लहरी स्वभाव. सर्व सरदार चूप बसले. तसा बादशाहा म्हणाला,
"देखो, आप उसको प्यार से पुछते नही क्या कभी? क्या वह प्यार से मानता नही क्या?"
तसा एक सरदार म्हणाला,
"जी जहापनाह, हम प्यार से ही पेश आते है, मगर वह मानताही नही।"
"तो तोडो उसको, मेरा मतलब है तोडो संभा की तरह।"
तसा एक सरदार म्हणाला,
"जहापनाह, गुस्ताखी माफ हो तो एक बात कहूँ?"
"बोलो।"
"..........."
तो सरदार काही न बोलता चूप बसला खाली मान टाकून. त्याला वाटलं आपण बोलतो तर खरं. पण पूर्ण बोलणं होताच व ते बादशाहानं ऐकताच बादशाहा आपल्याला तोफेच्या तोंडी देईल. कारण बादशाहा लहरी स्वभावाचा असल्यानं तो लहर येईल तसा वागतो. तसा बादशाहा जोरात म्हणाला,
"अब बोलो भी तो सही।"
"जी जहापनाह।"
आपण बोलून तर गेलो. पण काळ आपल्यावरच उलटला असा विचार करीत व आता जे काही होईल. ते पाहिल्या जाईल असा विचार करीत तो सरदार म्हणाला,
"गुस्ताखी माफ करो जहापनाह, मै कहता हूँ कि आप उस गोयंद्या के साथ कभी प्रेम से पेश आते हो तो कभी गुस्ताखी से?"
"मतलब?"
"मतलब आप उस गोयंद्या को मार क्यो नही डालते?"
"खबरदार!" बादशाहा आवाज चढवीत म्हणाला.
"गुस्ताखी माफ हो जहापनाह।" तसा तो परत खाली मान घालून स्तब्ध उभा राहिला. थोडा वेळ शांतता होती. तसा परत तोच सैनिक म्हणाला,
"जहापनाह, इन मराठों की चमडी आखिर गीदड की ही है। ये मरने के सिवा बाज नही आते। ये लोग मर जायेंगे परंतु कोई भी राज उगलेंगे नही।"
"पता है, सब पता है मुझे।" बादशाहा म्हणाला व विचार करु लागला. थोडा वेळ पुन्हा शांतता पसरली होती. कोणाची बोलायची हिंमत होत नव्हती. तसा बादशाहा म्हणाला,
"देखो, भलेही इनकी चमडी गीदड की क्यो न हो? ये लोग प्रेम की ही भाषा समजते है। नफरत की नही। इसिलिए हमे गोयंद्या के समक्ष प्रेम से ही पेश आना है। अब देखते है कब तक मानता नही वो।"
बादशाहानं दिर्घ श्वास घेतला. तसा तो उठला व झपाझप पावले टाकत त्या कालकोठडीकडं चालू लागला. ज्या कालकोठडीत गोविंदाला ठेवलं होतं.
************************************************************************************************

बादशाहाला अचानक पाहून सर्व द्वारपालक घाबरले होते. तसं पाहता तो जेव्हा जेव्हा यायचा. तेव्हा तेव्हा ते द्वारपालक घाबरायचे. आजही तसेच द्वारपालक घाबरले होते. त्यांनी पटापट दरवाजे उघडले. कारण बादशाहा आज भयंकर रागात दिसत होता. तसा गोयंद्या जिथे होता तिथलं दार उघडलं गेलं. तसं बादशाहानं गोविंदाकडं एकटक पाहिलं व म्हणाला,
"गोयंद्या, किस खेत का अनाज खाया तू? तुझे जबान है क्या नही, जरासा भी नही बोलता।" तसं बादशाहानं त्याच्या पाठीवरुन हात फिरवला.
बादशाहानं पाठीवर हात फिरवताच गोविंदाचं रक्त गरम झालं. तसा आपल्या अंगावर कोणी मीठ चोळत आहे असं गोविंदाला वाटलं व गोविंदा चरफडत म्हणाला,
"दूर हो औरंग्या. माझ्या नजरेसमोरुन दूर हो. जर तू दूर झाला नाहीस तर माझी हीच नजर तुला जाळून भस्म करेल."
"इतनी ताकद है तेरी इन आँखों में। ठीक है मै भी देखता हूँ कि तेरी आँखे क्या करती है।" तसा तो आपल्या सरदाराला म्हणाला,
"इसकी आँखे नोंच लो। इसको इतना तडपाओ कि ये जीते जी मर जाये और तब भी नही मरे तो बाद मेंं इसका क्या करना यह हम देखेंगे। इसको संभाजी जैसीच मौत पसंद है ना। वैसी ही मौत देंगे। ताँकि इसके बाद ना संभा पैदा होगा कोई ना कोई गोयंद्या पैदा होगा, जो किसी भी संभाओं को या कोई भी संभा के तुकडों को अग्नी देने की कोशिश नही करेगा।"
तसं त्यानं गोविंदाला चांगले चाबकाचे फटके मारायला लावले. ते चाबकाचे फटके खाता खाता आता सवय झाली होती गोविंदाला. त्यातच बादशाहाला वाटत होतं की त्या गोविंदाच्या डोळ्यातही संभाजीसारख्याच गरम सळाखी टाकाव्या. त्या सळाखी टाकायला जल्लादांनी कचरु नये किंवा घाबरु नये म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणात संभाजीच्या वेळी जशी जल्लादांना दारु पाजण्यात आली होती. तशी दारु पाजण्यात यावी. त्यातच त्या गरम तप्त सळाखी त्याच्या डोळ्यात टाकून त्याचे डोळे फोडण्यात यावे. त्याचबरोबर जीवांच्या आकांतानं गोविंदा ओरडेल. पण त्या ठिकाणी त्याचा आवाज ऐकणारे कोणी नसेल. त्यातच त्या गोविंदाला डोळेे नसल्यानं त्याच्या समोर काळाकुट्ट अंधार असेल. परंतू बादशाहा एवढ्यावरच थांबला नाही. तो त्या गोविंदाला म्हणाला,
"गोयंदा, अब भी वक्त है। बता दे उस रात कौन कौन थे तेरे साथ। बता दे कि मेरे दुश्मन संभा को किसकिसने अग्नी दिया? अब भी वक्त है गोयंद्या, बता दे। नही तो मै आपकी जान ले लुगा।"
ते शब्द त्या संभाजीचे डोळे फोडणा-या सळईपेक्षाही गोविंदाला तिक्ष्ण वाटत होते. ते शब्द त्याच्या अंतकरणाला टोचून निघाले होते. त्या शब्दानं त्याचं अंगअंग छिन्नविछिन्न केलं होतं. जेवढा घायाळ तो त्या औरंगजेबाच्या त्रासानं झाला होता. तेवढाच घायाळ नव्हे तर त्याहीपेक्षा घायाळ त्या शब्दानं गोविंदा झाला होता. तसा गोविंदा त्याला घाबरता म्हणाला,
"साल्या औरंग्या, तुले भेते तरी कोण बे. आमी महार माणसं. आमच्यात रग हाये हे असले तुह्ये तुच्छ अत्याचार सहन करायची. तूले माहित नाही की आमची पुर्व पिढी त्या सवर्णांचे अत्याचार सहन करायचे. आमची संपूर्ण पिढी हे असले अत्याचार सहन करत करत लहानाचे मोठे झालो. कोणी कोणी थोड्याशा चुकीसाठी आमच्या कानात गरम उकळलेलं शिसं ओतत आन् तुले माहित नाय,म्हून सांगतो, आमी जर उच्च जातीच्या पोरीकडं वा एखाद्या नारीकडं पाह्यलं तं आमचे डोळे बी फोडत. आमाले सवय हाये याची. पण तूच पाहा. तू अत्याचार करतेस ना एवळे, तुले झोप तरी येते का रे? तू सुखानं झोपू तरी शकते का रे? आमी तं सुखानं झोप तरी घेतो एवळा त्रास असतांनी."
ते गोविंदाचे शब्द. ते शब्द बादशाहाच्या छातीला चिरुन गेले. कारण गोविंदा खरे बोल बोलत होता. त्या अत्याचार करणा-या औरंगजेब बादशाहाला रात्रीची बरोबर झोपच येत नव्हती. त्याला वाटत होतं की ही मराठी माणसं अशी मौन कशी राहतात. त्याला वाटत होतं की ही माणसं एवढा अत्याचार सहन कशी करतात. त्याला वाटत होतं की ही माणसं काही साधीसुधी माणसं नाहीत. जी अत्याचार सहन करतात, पण एवढासाही तोंडानं ब्र काढत नाहीत. त्यातच संभाजीचे डोळे फोडून समाधान न झालेला औरंगजेब आणखी खवळला त्या शब्दांनी. तसं गोविंदानं त्या औरंगजेबाची झोप काढताच त्याला एवढा राग आला की त्यानं आणखी आदेश दिला. म्हणाला,
"याच्या जखमा फोडलेल्या जागी व संपूर्ण शरीरावर मीठाचं पाणी टाका."
बादशाहाचाच तो आदेश. अंमल करणारे सारेच जण. त्यातच त्या आदेशाची पायमल्ली कोणीही करु शकत नव्हते. त्यातच मीठाचा घोळ बनविण्यात आला व ते पाणी गोविंदाच्या शरीरावरुन टाकून देण्यात आले. तसंच जखमातही. त्या मीठाच्या पाण्यानं गोविंदाच्या पाठीची व जखमांची एवढी अंगार झाली की संपूर्ण ती इंद्रायणी कापली होती. ज्या इंद्रायणी परीसरात त्यानं जन्म घेतला होता. तो ओरडत होता जीवाच्या आकांतानं. पण ते सांगणारा व ते टिपणारा कोणीही मियाखान त्या ठिकाणी अस्तित्वात नव्हता. ज्यानं संभाजीची आपबीती रायगडावर महाराणी येशूबाईंना ऐकवली होती. तसेच येशूबाईनं त्याच ऐकलेल्या आपबीतीनं संभाजीच्या मरणाचा बदला घेण्याचं जाहिर केलं होतं.
अंधार पडू लागला होता. तसा बादशाहा गोविंदाला म्हणाला,
"गोयंद्या, आज तुझा अखेरचा दिवस. उद्या परत मी त्याच वेळेला येईल तुला भेटायला. तेव्हा तू काय ते ठरव. आता तूच ठरव की तुला जगायचं आहे की मरायचं आहे. त्यानंतर माझा दोष राहणार नाही."
बादशाहा ते बोलून गेला खरा. तसं त्या बादशाहानं त्याला सोडलं आणि तो माघारी फिरला आणि झपाझप पावले टाकत तो आपल्या कक्षाकडं जावू लागला. तसे त्याच्या मनात असंख्य विचार होते. ही मराठी माणसं मरणं पसंत करतात. पण सत्यता उलगत का नाहीत.
गोविंदाला त्या कालकोठडीत पुन्हा टाकण्यात आलं. ती आधीच अंधारलेली कालकोठडी आज आणखी अंधारमय वाटत होती. तसा तो अधिकच घायाळ होत होता. तो तळपत होता जीवांच्या आकांतानं. त्याचबरोबर तो एकटाच त्या कालकोठडीत असल्यानं आपलं दुःख कोणाला सांगूही शकत नव्हता. तशातच तो विचार करीत होता की यापेक्षाही मोठ्या यातना संभाजी आणि कवी कलशाला भोगाव्या लागल्या. माझ्यातर जखमाच काढल्या ओरबाडून आणि मीठाचं पाणी टाकलं माझ्या अंगावर. त्यांची तर जीभ आणि कानही छाटलं होतं. त्याचबरोबर डोळंही, मानही. माझी मान अजून शिल्लक आहे.
ते मीठाचं पाणी. ते पाणी जखमेवर टाकताच होणारी जखमांची आग. त्यातच त्या जखमाच नाही तर संपूर्ण अंगाची त्या मीठाच्या पाण्यानं होणारी आग अंगाची लाहीलाही करीत होती. कारण गोविंदा काही केल्या गावातील लोकांची माहिती सांगत नव्हता. त्यातच त्या औरंगजेबाला त्या लोकांचीच नावं माहित करुन घ्यायची नव्हती तर त्याला शिवाजीच्या पिढीजवळ असणारे किल्ले माहित करुन घ्यायचे होते. ज्या किल्ल्यामुळं औरंगजेब आणखी सशक्त होणार होता. हे गोविंदा ओळखून होता. गोविंदाला वाटत होतं की हाच राज उद्या औरंगजेबाला माहित होवू नये. तसेच दक्षिणेत औरंगजेबाचं राज्य प्रस्थापीत होवू नये. त्यातच गावाला कोणताच त्रास होवू नये.
बादशाहा ज्याप्रमाणे संभाजीच्या दाहसंस्कारासंबंधी गोविदाला त्रास देत होता. त्याचप्रमाणे त्याचे सैन्य गावालाही त्रास देत असल्याने जे त्या अंत्यसंस्कारात सहभागी होते, त्यातील काही मंडळी गाव सोडून गेले होते. तर जे काही उरले होते. ते धिटाईनं मौन बाळगून होते. त्यातच संपूर्ण गाव कमालीची गुप्तता बाळगून होतं. त्यातच गोविंदाही कोणत्याच गोष्टी आपल्या तोंडून उलगडत नसल्यानं औरंगजेबाचे स्वप्न धुळीस मिळत होते.
आज औरंगजेबानं केलेलं कृत्य लाजीरवाणं जरी असलं तरी त्याला त्याची सवयच पडली होती. त्याला वाटत होतं की बादशाहा हाच सर्वशक्तीमान असून कोणीही त्याच्या विरोधात जावू नये. त्याच्या समोर भराभर आपले राज ओकावेत. हं, ठीक आहे संभाजी एक राजा होता. पण गोविंदा......गोविंदा एक चिल्लर माणूस आहे. त्यानं तर मौन बाळगूच नये.
औरंगजेब एक बादशाहा होता. पण त्याला एका शुल्लक माणसानं म्हणजेच गोविंदानं हरवलं होतं. आज औरंगजेबानं केलेलं कृत्य औरंगजेबाला आठवत होतं. तो राजमहालात परतला तर खरं, पण आज त्याला जेवनही व्यवस्थीत धकलं नव्हतं. त्यातच तो अंथरुणावर पहूडला. पण तो रात्रीचे तारे मोजत होता. त्याला व्यवस्थीत झोप येत नव्हती. तशी झोप तर त्याला दररोजच येत नव्हती. पण आज तो जास्त काळजीत होता.
तो विचार करु लागला की गोविंदा एक शुल्लक माणूस. पण तो मरण पत्करीत आहे. परंतू कोणतेच राज उलगडत नाही. तो एक शुल्लक व्यक्ती, परंतू तो अत्याचार सहन करीत आहे. काश! अशी माणसं आमच्याकडं नाहीत. ही महाराष्ट्रातील माती....... या मातीत वीर पैदा होतात. बुजदील नाही. ज्याचं इमान जातं, अशी गणोजी शिर्के सारखी माणसं या भुमीतील नसावीत. गोविंदा एक साधा माणूस, ज्यानं मला हरवलं. या बादशाहाला हरवलं. माझं गर्वहरण केलं. हा लहानसा दख्खन प्रांत. पण आजही ह्या दख्खन प्रांतात माझी डाळ शिजत नाही. मी कुतूबशाही घेतली. विजापूर घेतला. पण मला आजही दख्खन घेता येवू शकत नाही. वाटलं शिवाजी गेला. आता दख्खन जिंकता येईल. म्हणून मी स्वतःच आलो या दख्खन भुमीत. वाटलं संभाजीला मारल्यावर दख्खन घेता येईल. पण माझा निर्धार फोल ठरला. गोविंदासारखी साधारण माणसं हिच तर मला ऐकत नाही तर इथले राजे किती दमदार असतील याची कल्पना न केलेली बरी.
हा गोविंदाच नाही तर इतरही या मातीतील लोकं माझं ऐकणारी नाहीत. चाहे ती आपलं प्राणंही देतील. पण राज सांगणार नाहीत. आता जास्त वेळ वाट पाहू नये. कारण गोविंदा कोणतेच राज सांगणार नाही.
बादशाहा एवढा विचार करीत बसला होता. त्याला सुचत नव्हतं काय करावं. तशी ती रात्र आणखी परेशान करीत होती. त्यातच रात्रीचे तीन वाजले असतील. त्यातच झोप न येत असल्यानं ताबडतोब तो अंथरुणातून उठला व त्यानं नमाजाची तयारी केली.
पाच वाजले असतील, पक्ष्यांची किलबिल ऐकायला येत होती. आज डोळे जळजळ वाटत होते. मनाची त्याच्या कालवाकालव होत होती. वाटत होतं की आताच जावून त्या गोविंदाला ठार करावं एवढा संताप त्या औरंगजेबाला येत होता.

************************************************************************************************

औरंगजेब रात्रभर झोपला नाही. त्यातच आता त्याच्या बुबूळाची अंगार होत होती. त्याचे डोळे लाल झाले होते. त्यातच त्याला वाटत नव्हतं की हा परीणाम त्यानं गोविंदाच्या जखमा चिघळविण्याचा परीणाम आहे. त्यामुळं की काय त्याला झोप आली नव्हती. परंतू त्या क्रुरकर्मी बादशाहाला त्याचं काहीच वाटत नव्हतं.
आज मात्र त्यानं ठरवलं होतं की आज आपण संभाजीचे तुकडे गोळा करणा-या गोविंदाला ठार करायचं. तसा तो त्याच गोष्टीची प्रतिक्षाच करीत होता.
दुपार झाली होती. तरीही त्याला झोप येत नव्हती. तसा तो चिंताग्रस्त झाला. त्यातच आपल्या निवडक सरदारांना म्हणाला,
"आज काहीही करा आणि मला गोविंदाचं कापलेलं मस्तक आणून दाखवा."
त्याचे सरदार हे आदेशाचे पालन करणारेच होते. तसे दोन सरदार पुढं होवून म्हणाले,
"जी जहापनाह."
त्यांनी होकार दिला. तसे सरदार त्यांच्या कालकोठडीत जावू लागले. त्यातच ती कालकोठडी आली.
सरदारांनी एक कटाक्ष गोविंदाकडं टाकलं. त्याचप्रमाणे त्यांनी त्याचे हात आणि पाय बांधायला लावले व त्यातच एका सरदारानं आपल्या म्यानातून एक नंगी तलवार काढली आणि ती गोविंदापुढं झळकवली. परंतू गोविंदाही काही घाबरणारा वीर नव्हता. तो म्हणाला,
"हे औरंग्याच्या कुत्र्यांनो, नामर्दांनो, नपुसकांनो, तुमच्यात मर्दानगी तरी हाये काय? तुमच्या या नंग्या तलवारींना आमी घाबरतो की काय, आम्ही महार माणसं, जे आमच्यावर जुलूम करत होते एवढ्या वर्षापासून. त्यांनाच आमची पिढी घाबरली नाही तर मी तुमच्या या नंग्या तलवारीले घाबरणार तरी काय. आमी या नंग्या तलवारीसमोर झुकत नाही. आमी झुकतो फक्त आमच्या मायबापासमोर अन् त्या मातृभुमीसमोर, जी मातृभुमी आमाले पोसते. लहानाचं मोठं करते. आमाले अन्न देते."
ते गोविंदाचे शब्द. ते अखेरचे शब्द ठरणार नव्हतेच गोविंदाचे. त्यातच औरंगजेबाचा तो हुुकूम. तसे ते सरदार. ते सरदार आदेशाचे पालन करणारे. त्यातच त्या सरदारांंना कुत्रं म्हटलेलं आवडलं नाही. त्यातच त्यांना गोविंदाचा भयंकर राग आला. मग क्षणाचाही विलंब न करता एका सरदारानं एक धारदार हत्यार काढलं. तसा तो गोविंदाच्या जवळ गेला व त्यानं ते हत्यार गोविंदाच्या मानेवर ठेवत म्हटलं,
"साल्या कुत्र्या, आम्हाला तू नपुंसक म्हणतोस काय. आता तू त्या अल्लाची आठवण कर."
त्या सरदारानं मानेवर तो खड्ग ठेवताच गोविंदाला माहित झालं की आता आपण मरणार. त्यानं क्षणात घट्ट डोळे मिटले. त्याचबरोबर मानेवर तो खड्ग सुरीसारखा चालवत तो सरदार गोविंदाची मान करकर कापणार होता. तोच एक दूत तिथं येवून धडकला. म्हणू लागला,
"गुस्ताखी माफ करो सरकार."
"बोलो, क्या आदेश है जहापनाह का?"
"जी सरकार, जहापनाह का आदेश है कि गोविंदा को छोड दिया जाये।"
औरंगजेबाचा आदेश. त्या सरदारांनी स्वप्न रंगवलं होतं. त्याचबरोबर त्या स्वप्नात गोविंदाच्या रक्ताच्या चिरकांड्या